विकट गड अर्थात किल्ले पेब

स्पा's picture
स्पा in भटकंती
29 Mar 2013 - 2:30 pm

धूळवडीच्या सुट्टीच निमित्त साधून एका दिवसात करता येण्याजोगा विकटगड सर करायचे ठरले. सोबत मिपाकर किसन,सौरभ आणि अल्पेश, चिन्मय होते. भयंकर तापणार्या उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून पहाटेच निघायचे ठरले.

१. धुक्यात हरवलेले ठाकुर्ली स्टेशन

A

६..३० ची कर्जत पकडली , किसन अल्पेश ठाण्याहून आले, मग नेरळला उतरल्यावर आधी पोटात इडल्या ,मेदूवडे सारले (आधी पोटोबा , मग ट्रेकोबा :) ). नेरळ हून रिक्षा करून कातकर वाडीत पोचलो, खर तर आम्हाला 'वॉटर पाईप' स्टेशन मार्गे जायचे होते, पण रिक्षावाल्याने आमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, कातकर वाडीत उतरवले आणि समोर उंचावर दिसणाऱ्या विकट गडाकडे बोट दाखवून ' हा इथून जा आता' सांगत पसार झाला.

२. पेब डोंगररांग
olp

3. स
सोबत ट्रेक क्षितीज ची प्रिंट आणलेली होतीच, त्यात कातकर वाडीतून जाणार्या रस्त्याबाबत माहिती दिलेली होती. तीन वाटा वर किल्ल्यावर जात होत्या म्हणे .
१. धबधब्यातून
२. मधली मुख्य वाट
३. इलेक्ट्रिक टोवर च्या बाजू बाजूने जाणारी लांबची वाट.

पण प्रत्यक्षात आमच्या समोर चारी बाजूनी डोंगर वेढलेले होते ,

४. qa

५.s

६. आंब्याचा एक विस्तीर्ण वृक्ष
qa
आणि मुख्य दिसेल अशी एकही वाट दिसत नव्हती , असंख्य लहान गुरवाटा होत्या, पण त्यावर पुढे जाणं शक्यच नव्हत. ( सिद्धगड ला असेच हरवून शेवटी हात हलवत घरी गेल्याची आठवण ताजी झाली ). शेवटी किसन द्येवांबरोबर सल्ला मसलत करून परत कातकर वाडीत आलो, आणि एक वाटाड्या सोबत घेतला, ५०० ,४०० अशी घासाघीस करत शेवटी २५० रुपयांवर साहेब वर पर्यंत यायला तयार झाले . १० मिनिटात येतो सांगून तो घरी पळाला तोवर सूर्य तळपायला लागलेला होता . एक पांगार्याच झाड दिमाखात फुललेलं होतं
७. पांगारा
z
८. ss
काही वेळातच तो आला,आम्हाला त्याने जी सर्वात लांब आणि कठीण आहे, अशा तिसर्या वाटेने न्यायला सुरुवात केली. सुरुवातीलाच सरळ सरळ उभे चढ लागायला लागले , आणि प्रचंड उन्ह आणि दमट वातावरणाने त्रास व्हायला लागला,
किसनद्येव डी हायड्रेट झाल्यागत झाले. पण मी सोबत द्राक्षे आणलेली होती. ती खाल्ली आणि रानात भरपूर करवंदे लागलेली होती, ती खात हळू हळू पुढे सरकायला लागलो. थोड्या वेळात वातावरणाची सवय झाली आणि आम्ही आमचा वेग वाढवला.
९. धुकट सकाळ
lk

१०. रानमेवा
lm

मध्ये मध्ये रॉक प्याचेस लागत होते, तापलेल्या दगडांवर हात ठेवून वर जात होतो. आजूबाजूचा निसर्ग सुरेखच होता.

११.
lm

१२. रानफुल
a

१३.a

१४. तीन नंबरच्या डोंगरातून आम्ही वर आलो
tyyu

शेवटी एकदाचे आम्ही पेब गडाकडील गुहांपर्यंत आलो. समोर प्रचंड डोंगर रांग दिसत होती. दक्षिण बाजूला प्रबळगड उठून दिसत होता. येथील कातळात प्रचंड मोठी गुहा खोदलेली आहे. एकावेळी शे दोनशे माणसं आरामात राहतील एवढी मोठी गुहा आहे.

१५. कोरलेली गुहा
a
ह्या गुहेच्या आसपास अजूनही पाच,सहा भुयारी गुहा दिसतात, मात्र यात जायचे म्हणजे रांगतच जावे लागते, एका वेळी एक माणूस या प्रमाणात. शिवाय सोबत विजेरी आवश्यक. गुहा पाहून पुढे निघाल्यावर किल्ल्याची ढासळलेली तटबंदी दिसते, इथून वर जायला आता एक शिडी लावलेली आहे. तिथून वर आलो.
१६. शिडी
a

१७. वर आल्यावर समोरच एक लहानशी मारुतीची मूर्ती दिसते.
az

१८.त्याच्यावरच्या बाजूला एक पाण्याच भरलेलं टाकं आहे, पण यातल पाणी पिण्याजोग नाही.
n
आम्ही अजून सर्वोच्च टोकावर पोचलेलो नव्हतो. पण आजूबाजूचा भूप्रदेश सुरेखच दिसत होता.

१९. pl
२०.a
दूरवरचा गाडेश्वर तलाव, पनवेल, उरण दिसत होतं.
२१. गाडेश्वर तलाव
weqwe
लांबवरचा धुक्यात हरवलेला चंदेरी सुद्धा डोकवत होता. उत्तरेला मलंगगडाचे सुळके दिसत होते.

२२. a

२३.a
उन्हाने अंगाची लाही लाही होत होती. मस्त गरमागरम वारे वाहत होते. टोकावर कुठले तरी निसर्गमित्र गडाच्या डागडुजीच काम करत होते.
२४. 'वॉटर पाईप' स्टेशन कडून येणारी वाट

a

वाटाड्याने आम्हाला पिण्याच्या टाक्याजवळ नेलं. बाजूलाच एक शिवालय होतं, वर देवीची मूर्ती होती.
२५. a

२६. अष्टभुजा
a
टाक्यातून गार पाणी काढून ढसाढसा प्यायलो. जवळजवळ अर्धी आंघोळच झाली. डोक्यावर बदाबदा पाणी ओतून जीवाला शांत केलं. आता समोरच्या बाजूने आम्हाला "वॉटर पाईप " स्टेशन बाजूने येणारी वाट दिसत होती. हि खूपच सोप्पी वाटत होती, सर्वांनी त्या रिक्षावाल्याला भरपूर श्या घातल्या.
गडाच्या सर्वोच्च टोकावर एक दत्त मंदिर आणि कुठल्यातरी बाबांचा आश्रम आहे. आम्ही आश्रमात काही गेलो नाही. मस्त एका झाडाच्या सावलीत विसावलो , आणि पोट्पुजेला सुरुवात केली. "ब्रेड, सॉस, काकडी, फोडणीचा भात, बिस्कीट, चकली,आणि उकडलेली अंडी असा झकास बेत होता. मी या सर्व पदार्थांना एकत्र करून एक जम्बो sandwich बनवलं आणि खायला सुरुवात केली :). (सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते, पण मला भूक लागलेली असल्याने मला क्क्काही क्क्काही फरक पडला नाही ;) )सर्वांनी भरपूर हादडल्यावर किसन द्येवांनी एक कोपरा पकडला आणि सुखाने निद्राधीन झाले, मग आम्ही बी त्यांचच अनुकरण करून आडवे झालो, अर्धा तास आराम केल्यावर परतीला लागलो. अर्थातच आलो त्या वाटेने उतरणार नव्हतो, जाताना आम्ही समोरची वाट पकडली, इथेही शिड्या लावलेल्या होत्या, त्या उतरून खाली आलो,
२७.a

२८. गडाच्या तटबंदीचे उरलेले अवशेष
a

अर्धा पाउण तास चालल्यावर एक गणपतीच छोटंसं देऊळ लागलं , त्यापुढेच आम्हाला नेरळ- माथेरानचा रूट दिसला , हुश्श , पोचलो तर.

२९. rtr

३०. lm

आता उतरण सोप्पी होती. पण खूपच कंटाळवाणी. जल्ला वॉटर पाईप स्टेशन येता येत नव्हत, रस्ता दिसत नव्हता, आम्ही नुसतेच चालतोय . मधेच मागून हळूहळू डुगडूगत नेरळ -माथेरान छोटी ट्रेन निघून गेली .

३१.a

आजूबाजूचे सह्याद्रीचे कडे छातीत धडकी भरतील असेच होते.

३२.a

३३. एक सुंदर वृक्ष
a

३४.a
काही वेळाने खाली नेरळ दिसायला लागलं. अजून बराच वेळ चालल्यानंतर शेवटी एकदाचा रस्ता
दिसला. एक ओम्नी वाला उभा होताच. त्याने सरळ नेरळ स्टेशन ला सोडले. स्टेशन ला बाहेर मस्त चहा मारला. ३.३० वाजलेले होते. म्हणजे आम्ही एकदम टैमात होतो. थोड्याच वेळात ट्रेन आली, आणि आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो

३५. n

समाप्त

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

29 Mar 2013 - 2:48 pm | अमोल केळकर

मस्तच, फोटोही खुप छान :)

अमोल केळकर

भर उन्हात ट्रेक करणार्‍यांना साष्टांग नमन !!

शिद's picture

29 Mar 2013 - 3:19 pm | शिद

माझी हिम्म्त नाही होणार असे साहस करायची.

प्रचेतस's picture

29 Mar 2013 - 3:00 pm | प्रचेतस

छोटासाच पण सुरेख वृत्तांत. फोटो तर छानच आहेत.
पेब किल्ला टेहळणीसाठी वापरला जात असावा. गुहांच्या रचनेवरून सातवाहनकाळात किंवा उत्तर कोकण शिलाहार राजवटीत याची निर्मिती झाली असावी. जास्त करून शिलाहारच, असा माझा अंदाज.

आदूबाळ's picture

29 Mar 2013 - 3:03 pm | आदूबाळ

खूप छान! फोटो मस्तच!

जरा विकटगडाची माहिती द्या की राव...

मला विकट गडाबद्दल काहीच माहिती नाही, शिवाय गडाचे फक्त अवशेष उरलेले आहेत , ब्बाकी काहीच नाही .
अंतर्जालावर सुद्धा याबाबतीत काही मदत मिळाली नाही
पण वल्ली म्हणतो तसा हा टेहळणी साठीच वापरात असावेत कारण, पुण्याकडून ठाण्याला येताना हा एक महत्वाचा किल्ला आहे . ठाणे आणि रायगड जिल्ह्यातले महत्वाचे किल्ले सुद्धा पेब वरून दिसतात

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Mar 2013 - 3:04 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

काय ते फटू.. काय तो वृत्तांत..
निवले डोळे...

प्यारे१'s picture

29 Mar 2013 - 3:32 pm | प्यारे१

मस्तच रे स्पावड्या!

मूकवाचक's picture

29 Mar 2013 - 3:47 pm | मूकवाचक

+१

परिकथेतील राजकुमार's picture

29 Mar 2013 - 4:04 pm | परिकथेतील राजकुमार

अरे स्पावड्या..

तुला काल बजावले होते ना?

स्पा's picture

29 Mar 2013 - 4:23 pm | स्पा

:)

धन्या's picture

29 Mar 2013 - 4:05 pm | धन्या

चान चान.

बॅटमॅन's picture

29 Mar 2013 - 4:23 pm | बॅटमॅन

मजाये बॉ स्पांडूची.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Mar 2013 - 5:51 pm | अत्रुप्त आत्मा

लै भारी....... :)

स्पंदना's picture

29 Mar 2013 - 5:58 pm | स्पंदना

सुरेख फोटोज. गडाचं वर्णन त्रोटक आहे खर, पण असो.

कवितानागेश's picture

29 Mar 2013 - 7:01 pm | कवितानागेश

"ब्रेड, सॉस, काकडी, फोडणीचा भात, बिस्कीट, चकली,आणि उकडलेली अंडी असा झकास बेत होता. मी या सर्व पदार्थांना एकत्र करून एक जम्बो sandwich बनवलं आणि खायला सुरुवात केली>
:D रोज का जात नाहीस गडावर?

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Mar 2013 - 4:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

स्पावड्या त्या सँडवीच ची पाककॄतीचा फोटु सकट एक धागा काढ आणि त्याला नाव दे भेळ सँडवीच
ट्रेक मस्त,वर्णन मस्त, फोटु मस्त, खाली सौरभने डकवलेले फोटोही मस्त आहेत.

मन१'s picture

29 Mar 2013 - 7:13 pm | मन१

मस्त दुपारच्या चांदण्यात झालाय म्हणायचा ट्रेक.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Mar 2013 - 7:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. शॉर्ट बट स्वीट. :)
एक गृप फोटो पाहिजे शेवटी.

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

30 Mar 2013 - 12:53 am | अभ्या..

+१ अगदी सहमत हो सर.
आणि ग्रुप फोटोत पार्श्वभूमीला तो किल्ला पण दिसला पाहीजे. ;)

फटू टाकलाय बिरुटे सार्र

चौकटराजा's picture

29 Mar 2013 - 8:22 pm | चौकटराजा

वृतांत ओके ! सगळे फटू मस्त. ते रानमेवा म्हणजे कोणते फळ ? फटू अगदी रसरशीत आलय त्याचा ! बाकी शंकराच्या पिंडीचा फोटो मला सर्वात आवडला कारण त्यात सावलीतील तपशील स्पष्ट दिसतात.ज्यात सावली सावली वाटते व उन खर्‍या उन्हासारखे वाटते तो फोटो उत्तम असे माझे मत आहे. यासाठी टोनल डिस्ट्रीब्युशन अगदी बैजवारीत यावे लागते. अति कलर सेचुरेशन हे लग्नाचे फोटो काढण्यासाठी ठीक पण निसर्गात जादा रंग पण बटबटीत दिसतात.काही फोटोत कडक उन्हाळा मस्त उतरलाय !

स्पा's picture

30 Mar 2013 - 11:32 am | स्पा

चौरा काका

तो कच्च्या करवंदांचा फटू आहे :)

प्यारे१'s picture

30 Mar 2013 - 2:47 pm | प्यारे१

पुन्हा मे महिन्यामध्ये पिकलेल्या करवंदांचा येऊ द्या! ;)

५० फक्त's picture

29 Mar 2013 - 8:31 pm | ५० फक्त

लई भारी रे, आजच व्यनि केला आहे.

वर माउ लि. म्हणते तसं, हे असलं सँडविच दररोज खात जा, तीन तासाला एक.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Mar 2013 - 9:13 pm | अत्रुप्त आत्मा

@तीन तासाला एक.>>> =)) पण्णास यांचेशी अत्यंणतिक सहमत,म्हणजे जरा वाढलास तर आंम्ही तुला एक्स्पांडू म्हणु शकू :-p

सौरभ उप्स's picture

30 Mar 2013 - 12:29 am | सौरभ उप्स

मस्त लिहिलस रे स्पा ...
पेबच्या वारीला मी काढलेले काही क्लिक्स...
०१
1
०२
2

०३
3

पोटोबा झाल्यावर सगळे आडवे झाले आणि मी माझा कॅमेरा काढून काही क्लीकायला मिळतंय का यासाठी पाय मोकळे केले,
आणि हा चतुर सापडला.... मस्त पोर्टफ़ोलिओ बनेल एवढे त्याचे फोटो काढले.
०४
4

०५
5

पेब वर बघण्यासारख अस विशेष काही आढळल नाही,
त्यामुळे मोजके फोटोज च काढले गेले म्हणून या धाग्याला लागुनच ठराविक फोटो टाकले.....

किसन शिंदे's picture

30 Mar 2013 - 11:48 am | किसन शिंदे

ट्रेक छान झाला, पण इथून पुढे उन्हात ट्रेक बिलकूल नाही!!

किसन शिंदे's picture

30 Mar 2013 - 11:48 am | किसन शिंदे

ट्रेक छान झाला, पण इथून पुढे उन्हात ट्रेक बिलकूल नाही!!

अजून एकदा म्हणाला असतास तर 'तलाक तलाक तलाक' झालं असतं की रे!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Apr 2013 - 3:39 am | निनाद मुक्काम प...

झकास
उन्हाचा ट्रेक खतरनाक
किसन देवांना उन्हाने लई त्रास दिलेला दिसत आहे ,
पुढच्या टायमाला हे जवळ बाळगा

सूड's picture

1 Apr 2013 - 2:27 pm | सूड

>>पण इथून पुढे उन्हात ट्रेक बिलकूल नाही!!

काय सांगता स.सं. ?? तुम्ही असं म्हणून कसं चालेल. हौसेला मोल नसतं म्हणे.

स्पा's picture

1 Apr 2013 - 2:48 pm | स्पा

=))

सस्नेह's picture

30 Mar 2013 - 2:13 pm | सस्नेह

सर्व फोटो आवडले ! निवडक सेव्ह केले आहेत.
उन्हात ट्रेक करू नका असा सल्ला देत आहे.

शैलेन्द्र's picture

31 Mar 2013 - 11:14 pm | शैलेन्द्र

तरी मी सांगीतल होत की दस्तुर पाँइंटला जावून तिथुन खाली उतरा.. :) पब्लीक डोक चालवत, :)

शुचि's picture

1 Apr 2013 - 3:45 am | शुचि

फारच सुरेख वर्णन.

नितिन काळदेवकर's picture

1 Apr 2013 - 9:12 am | नितिन काळदेवकर

फोटु एकदम झकास ..कोणता कॅमेरा वापरला राव ?