(१) सध्या प्रयागला चालू असलेला कुंभ मेळा व्यवस्थित आणि शांतपणे जात आहे हे वाचून बरं वाटलं. पैलतीरावर (NRI) विविध समुदायांतून कुम्भाबद्दल बरेच प्रश्न विचारले जात आहेत. त्यापैकी मुख्य म्हणजे सद्य मेळावा कुंभ कि महाकुंभ (जो बारा कुंभानंतर म्हणजे १४४ वर्षांनी येतो) मेळा आहे? सद्य (महा) कुंभाची उपस्थिती काही कोटींवर जाईल असं म्हणतात. तर सर्वसामान्य यात्रेकरुबद्दल काय म्हणता येईल? त्याचा/तिचा अनुभव काय आहे? कोणी मि.पा. सदस्य (किंवा त्यांच्या ओळखीचे कोणी) मेळ्याला गेलं होतं का?
(२) आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे यात्रेकरू बहुधा हिंदूच असतात का काही जैन, बौद्ध, आणि शीखहि त्यात सामील होतात? हल्ली त्यांची संख्या बरीच कमी झाली असल्याचं वाचलं. इतिहास या बाबतीत काय सांगतो? धर्मांतर करून हिंदू झालेल्या परदेशस्थित यात्रेकरूंची संख्या मात्र वाढत आहे असं दिसतं. BBC करता लिहिलेल्या २६/२ च्या वार्तापत्रात पत्रकार अमिताव संन्याल अशा तीन यात्रेकरुंचा उल्लेख करतात: (1) Sir James Mallinson (5th baronet of Walthamstow):१९९२ साली त्यांनी उज्जैन येथे दीक्षा घेऊन जगदीश दास हे नाव धारण केले. पुढे २००२ साली Oxford विद्यापीठातून योग विषयावर PhD मिळविली आणि आता तेथेच प्राध्यापक आहेत. हठयोगप्रदीपिका आणि घेरंडसंहिता हे दोन ग्रंथ त्यांनी भाषांतरित केले आहेत; (2) Valery Victorovich Mintsev: २०१० मध्ये त्यांनी विष्णूदेव या नावाने दीक्षा घेतली. त्यांचा अद्वैत वेदांताचा अभ्यास असून Moscow पासून ६०० किमी अंतरावर त्यांचा आश्रम आहे जेथे १८मी उंचीची श्री दत्तात्रेयांची मूर्ती उभारत आहेत; (3) बाबा रामपुरी: हे मूळचे California तील असून १९७० पासून भारतात राहत आहेत. Autobiography of a Sadhu: A Journey into Mystic India हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
(3) बरेच ख्रिस्ती धर्मप्रचारक मेळ्यात प्रसार करत फिरत असतात असं वाचलं होतं. तसेच सद्य मेळाव्याला शीख प्रचारक पाठवण्याचा निर्णय शिरोमणी गुरु प्रबंधक कमिटी (SGPC) ने घेतला होता त्याला काही शीख बांधवांचा विरोध झाला. वास्तविक अशा उपक्रमांना कोणाचा आक्षेप नसावा. पण त्याबरोबरच हेही खरं कि प्रत्येक धर्माने या मेळ्यासारखे व्यासपीठ सर्वाना खुले ठेवावे.
प्रतिक्रिया
4 Mar 2013 - 7:02 am | स्पंदना
माझ्या माहितीप्रमाणे हा महाकुंभ आहे जो या नंतर साधारण दिडशे वर्षांनी येइल.
आता हिंदुधर्मात सार्यांचेच स्वागत असल्याने कुणीही येउन जर यात "सहभागी " झाले तर काहीच हरकत नसावी. पण येथे येउन दुसर्या धर्माचा प्रसार म्हणजे जरा जास्तच वाटल. तरीही असो. आमच्या भावना एव्हढ्या वरवरच्या नाहीत की येव्हढ्या तेव्हढ्याने दुखावतील. आपआपल्या कुवतीनुसार केलेली हिंदुधर्माची साधना अन कर्मकांड मला अतिशय वंदनिय आहे. आणखी लिहले असते पण नको.