बहुतेक परिवारात एखादा तरी घोरणारा प्राणी असतोच..
साथीदाराच्या घोरण्यामुळे तुमच्या झोपेचे खोबरे होत असेल तर त्याकडे तुच्छतेने दुर्लक्ष करू नका, घोरणे हे फक्त श्वासोच्छ्वासांतील अनियमितता नसून ते संभाव्य मोठ्या विकारांचे मूळ असू शकते.
असे वाचण्यात आले..
इंग्लंड मध्ये तर नवरा जोरात घोरतो त्या मुळे घतस्फोटा पर्यँत प्रकरण गेले असे वाचल्याचे स्मरते..
एकदा लग्न घरात रात्री झोपण्याचा भयानक अनुभव घेतला..
सीमांत पूजन झाले कढिभाताचे जेवण तब्ब जेवून " भट्ट जेवुनि तट्टची फुगले" अशी अस्वस्था होती..... 12-15 जाणानी पथारी लावत ताणून दिली ..अन ताल स्वरात लयबद्ध घोरण्याने कार्यालय दणाणून गेले ..
पहिला दुसरा व टॉप चा गिअर टाकीत एसट्या चालल्या आहेत असा भास झाला...
क्षण भर कार्यालयात नाही तर आपण एसटी स्टॅन्ड वर तर झोपलो नाही ना अशी शंका मनात आली व रात्र जागून काढली ..
मधे एका मित्राचा अनुभव ऐकला काही औषधामुळे त्याच्या बायकोचे वजन वाढले होते, तेव्हा काही महिने घोरायची, पण विशेष नाही. काही दिवस व्हायची त्याची झोपमोड. नंतर औषध बंद झाल्यावर हळुह्लु तिचे घोरणे पूर्ण थांबले.
यावरून वाढलेले वजन व घोरणे याच हि एकमेकाशी नाते असावे का??असा प्रश्न मनात उभा राहतो..
भगिनी मंडल पण यात मागे नसते...त्या हि तोडीस तोड असतातच
असो हल्ली धोरण्याच्या रोगावर यंत्र पण निघाले आहे असे समजते
ढाराढुर झोपणे व घोरणे याचा संबंध असावा
प्रतिक्रिया
3 Feb 2013 - 3:07 pm | दादा कोंडके
नवरा-बायकोने घोरणार्यांना दुवे दिले असतील. ;)
3 Feb 2013 - 3:39 pm | मोदक
(नेहमीप्रमाणे) काही शंका..
भगिनी मंडल पण यात मागे नसते...त्या हि तोडीस तोड असतातच
काही विदा आहे का..? तुमचे विधान स्त्रीयांना उद्देशून असल्याने पाशवी गटाकडून तुमच्या धाग्यावर लाटणे मोर्चा येण्याची आणि तुम्हाला पॉपकॉर्नचा हार स्वीकारायला लागण्याची दाट शक्यता आहे. बेस्ट ऑफ लक. ;-)
असो
ब्वॉर.
हल्ली धोरण्याच्या रोगावर यंत्र पण निघाले आहे असे समजते
धोरण्याचा कोणता रोग म्हणता..?
3 Feb 2013 - 3:42 pm | श्री गावसेना प्रमुख
बाकी घोरणारे लोक बाकीच्यांना जागते रहो चा संदेश देत असावीत(असा माझा अंदाज)
3 Feb 2013 - 3:59 pm | संजय क्षीरसागर
येस! कपडे वाळत घातल्यावर लावतात तो चिमटा घोरणार्याच्या नाकाला लावायचा.
`ढाराढूर पंढरपूर
घोरतोय हादडून बकासुर'
असं संतवचनच आहे
3 Feb 2013 - 4:32 pm | अत्रुप्त आत्मा
काय म्हणावे या मनुक्शाला??? अठवड्याला 1 कूटं काथ्या "टाकल्या" शिवाय तुंम्हाला झोप लागत नै का हो? :-/
3 Feb 2013 - 5:06 pm | बॅटमॅन
यावरून सोपानदेव चौधरींची "इतिहाससंशोधन" ही कविता आठवली.
"आजा घोरतसे, तसाच मुलगा, ती सूनही घोरते |
नातू आणि तशीच नात शयनी घुर्घूर घुंकारिते |
झोपेचे मम जाहले खवटसे त्या रात्रिला खोबरे,
आले मात्र हसू, मला गवसले घोरी घराणे खरे!!!" =)) =))
3 Feb 2013 - 9:30 pm | अत्रुप्त आत्मा
@आले मात्र हसू, मला गवसले घोरी घराणे खरे!!!">>> =)) __/\__/\__/\__ =)) खतम झालो हाय
3 Feb 2013 - 5:47 pm | अविनाशकुलकर्णी
3 Feb 2013 - 5:56 pm | श्री गावसेना प्रमुख
ही क्लीप तर एका महाराष्ट्रीयन माणसाने तयार केली आहे ना?कुठेतरी वाचल्याचे आठवते
3 Feb 2013 - 9:20 pm | नितिन थत्ते
हे सगळे पृथ्वीराज चौहान (चेतक फेम) याच्यामुळे होतं आहे. त्याने घोरीला पुन्हापुन्हा सोडला म्हणून असं आहे.
3 Feb 2013 - 11:03 pm | बाबा पाटील
चेतक महाराणा प्रतापांचा आहे हो.
3 Feb 2013 - 11:32 pm | खटासि खट
घोरणे आणि घटस्फोट ! हरे राम .. काडीमोड घ्यायचा ना सोप्पा
(घटस्फोट शब्दाची व्युत्पत्ती सांगू शकाल का ? घटस्थापना, घटकंचुकी ऐकून आहे. )
4 Feb 2013 - 12:24 am | अत्रुप्त आत्मा