नाणेघाट

स्पा's picture
स्पा in भटकंती
29 Jan 2013 - 1:31 pm

नाणेघाट : मध्यम श्रेणीचा ट्रेक
उंची : अंदाजे २७०० फूट
जिल्हा: पुणे

कसे पोहोचाल :
१. कल्याण मार्गे : मुंबईकर कल्याण ला येऊन तिथून कल्याण - मुरबाड - टोकावडे - वैशाखरे असे करत नाणेघाटाच्या पायथ्याशी पोचू शकतात. इथून नाणेघाटात जायला साधारण २ तास लागतात
२. पुण्या मार्गे : पुण्याहून जुन्नर - घाटघर करत थेट नाणेघाटात येता येते .

भल्या पहाटे थंडीत निघून बरोबर ७ च्या आसपास आम्ही मिपाकर (मी, शैलेंद्र ,सौरभ उप्स ) नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेल्या नामनिर्देशक बोर्डापाशी पोचलो. गाडी खालीच लावली (होय, यावेळी बायका नव्हत्या सोबत ) आणि वर निघालो.
थंडीसोबतच जंगलात तुफान वारं सुटलेलं होतं. हा अनुभव पहिल्यांदाच घेत होतो. झाडांच्या आवाजाने आजूबाजूला पाणी वाहत आहे कि काय असं वाटत होत.

१. नाणेघाटाचे प्रथम दर्शन
a

वाटेत टिपलेले काही क्षण

२.z

३.भूछत्री
az

४.gb

मधेच रस्त्यात जे दिसेल त्याला सातवाहन कालीन म्हणण्याची हुक्की आली , दगड दिसलं कि सातवाहन कालीन, एके ठिकाणी जुनाट डाळींब असत तसं फळ दिसलं तेही सातवाहन कालीन ( वल्ली महाराज कि जय ) ! वल्ली काका मध्ये मध्ये फोन करून खुशाली विचारात होते.
फारसा दम न लागता, तब्येतीत वर पोचलो . आधीपासून एक ग्रुप वर आलेला होता, ते पुण्याहून आलेले होते, त्यामुळे त्यांना आम्ही ह्या मार्गाने आल्याचे कौतुक वाटले ( का ते समजले नाही :) )
घाटात वर पोचल्यावर एक पुरातन सातवाहन काळातली खोदलेली एक गुहा दिसते
५ . n

नाणेघाट हा साधारण अडीज हजार वर्षांपूर्वी खोदला गेला. त्याकाळी तो कल्याण बंदर आणि जुन्नर यांना जोडणारा महत्वाचा राजमार्ग म्हणता येईल , व्यापारी दृष्टीने या मार्गाला महत्वाचे स्थान असे, सदर मार्गावरून प्रवास करण्यासाठी 'करही ' गोळा केला जात असे . कल्याण बंदरात उतरणारा व्यापारी माल , हा घोडे बैल यांवर लादून थेट सातवाहनांची राजधानी ' पैठण ' येथे नेला जात असे .
सदर गुहा हि अतिशय प्रशस्त असून , पन्नास साठ माणसं सहज यात राहू शकतात
६.lm
७. pl

या लेण्यांमधील तिन्ही भिंतींवर शिलालेख कोरलेले आहेत, हा लेख २०,२५ ओळींचा दिसतो ,

या लेखामध्ये अनेक अंकनिर्दिष्ठ संख्या आहेत. पुराणकालातील इतकी संख्या असलेल्या भारतातील हा प्राचीन असा लेख आहे. या लेखात सातवाहन सम्राज्ञी ‘नागतिका’ हिने केलेल्या यज्ञांची नावे आहेत. येथे वाजपेय, राजसूय, अश्वमेध अशा प्रकारचे यज्ञ केले असल्याचे उल्लेख सापडतात. या यज्ञात ब्राह्मणांना केलेल्या दानांचा देखील उल्लेख या लेखांमध्ये आढळतो. या गुहेत सातवाहनांची शिल्पे देखील कोरलेली आहेत. यापैकी पहिले शिल्प सातवाहन संस्थापक शालिवाहनाचे, दुसरे शिल्प राजा सातकर्णी याची पत्नी देवी नायनिकीचे तर तिसरे शिल्प राजा सातकर्णीचे आहे.

संदर्भ : ट्रेक क्षितीज संस्था

८. शिलालेख
A

गुहेच्या आत जाऊन मस्त आराम केला , सोबत आणलेली खादाडी संपवली , बाहेर बरीच माकडं होती , त्यांच्या माकड चेष्टा टिपण्याचा मोह आवरला नाही :)

सायबानू मीच त्यो

९. lk

छोटा परिवार सुखी परिवार
१०. qa

गुहेच्या वर जी प्रचंड कातळाची भिंत दिसते , त्याला नानाचा अंगठा असे म्हणतात,वर तीन,चार पाण्याची टाकी आहेत. पाणी कायच्या काय थंड होतं
घाटातून चढून वर आलो

११. A

१२. z

डावीकडे एक भला मोठा दगडी रांजण दिसतो, त्यात म्हणे जकात भरली जात असे, खरे खोटे माहित नाही

13 az

उजव्या बाजूला एका लहानश्या गुहेत गणेशाची मूर्ती आहे .
१४. gb

१५. lk

१६. lm

आता उन्हात आल्याने ,मस्त उब जाणवत होती. थोडं अजून वर चढलो आणि आजूबाजूच्या भव्य प्रदेशाच दर्शन झालं.
मागच्या बाजूला भैरवगड , हडसर अशा किल्ल्यांची रांग होती

१९. A

२०.lm

प्रचंड ,भणाणत्या वाऱ्यात समोरचा जीवधन , वानर लिंगी लक्ष वेधून घेत होती. त्यामागेही काही किल्ले दिसत होते.

२१.qa

प्रचंड माणूस हातपाय पसरून बसलाय कि काय असं वाटत होतं. हि आवळ्याची लिंगी

२२.lm

२३.gb

समोरच्या बाजूने गोरखगड , सिद्धगड , माहुली सुद्धा दिसतात
थोड्याच वेळात खाली उतरायला लागलो .
एके ठिकाणी पांगारा (? )फुललेला होता, तिथेही थोडा क्लिकक्लीकाट केला
२४. qa

२५. lm

२६.z

२७. lk

साधारण तीन च्या सुमारास खाली आलो सुद्धा , एका दिवसात मुंबई - पुणेकरांना करण्याजोगा सहज ट्रेक आहे .
दोन दिवस असतील तर जीवधन - नाणेघाट करता येतो .
जेवणाची सोय होणं कठीणच आहे, सोबत जेवण नेल्यास उत्तम, जंगलात लाकूड फाटा बराच असल्याने गुहेतही मस्त जेवणाचा बेत करता येऊ शकतो .

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

29 Jan 2013 - 1:53 pm | प्रचेतस

मस्त रे.

त्या गुहेत सातवाहनांच्या सात मूर्ती होत्या. प्रत्येक मूर्तीवर त्यांची नावेही लिहिली होती. आजमितीस त्यांचे फक्त पाय शिल्लक राहिले आहेत.

ती नावे अशी
१)सिमुक सातवाहन - हा या कुळाचा आद्य संस्थापक नाही. सातवाहन नामक राजाच या घराण्याचा संस्थापक. सिमुक ह्या त्यानंतरच्या दोन तीन पिढ्यातील असावा.
२) राणी नयनिका - ही सिमुकाची सून आणि प्रथम सातकर्णीची पत्नी.
३) सातकर्णी - हा प्रथम सातकर्णी आणि सिमुकाचा पुत्र

पुढील तिघेही सातकर्णी आणि नयनिकेचे पुत्र
४)भायल- हा अल्पायुषी होता
५)हकुसिरी अथवा हकुश्री- हा अल्पकाळच राज्यपदावर होता.
६)कुमार सातवाहन अथवा वेदिश्री सातवाहन- हा पराक्रमी सातवाहन राजा झाला

आणि सातवी मूर्ती आहे ती
७) महारठी त्रिनकयीर अथवा त्रिणकवीर - हा सातवाहनांचा अमात्य आणि नायनिकेचा पिता असल्यानेच याची मूर्ती येथे कोराण्यात आली. त्रिनकयीराचे सातवाहन साम्राज्यामध्ये फार मोठे योगदान होते असे दिसते.

बाकी तो जकातीचा दगडी रांजण मला जकातीपेक्षाही पाण्यासाठी वापरलेला वाटतो.

शैलेन्द्र's picture

29 Jan 2013 - 1:55 pm | शैलेन्द्र

हो, परवाही त्यात पाणी होते..

शैलेन्द्र's picture

29 Jan 2013 - 1:57 pm | शैलेन्द्र

आणि स्पा सातवाहन स्ट्रोक मारुन त्यात पोहणार होता, पण आम्ही आवरलं त्याला..

मालोजीराव's picture

31 Jan 2013 - 11:56 am | मालोजीराव

वल्ली नामक आठवाहनाच्या मूर्तीचे फक्त पाय त्या गुहेत बसवायचा संकल्प आहे !

आठ वाहनं पुरतील? नक्की?

स्पा's picture

29 Jan 2013 - 1:54 pm | स्पा

ठांकू काका :)

शैलेन्द्र's picture

29 Jan 2013 - 1:58 pm | शैलेन्द्र

मस्त लिहिलय रे.. फोटुपण भारी..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Jan 2013 - 2:11 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आयला जायला पाहीजे राव एकदा...
पुढच्या वेळेस मला कळवा रे आधी..

नि३सोलपुरकर's picture

29 Jan 2013 - 2:13 pm | नि३सोलपुरकर

वाह..स्पाड्या मस्त ट्रेक केलात लिहिलय ही छान,फोटु(क्लिकक्लीकाट )पण भारी..
गाडी खालीच लावली (होय, यावेळी बायका नव्हत्या सोबत ) : ।हा.हा.हा हे खासच, तुझी मागील ट्रीप आठवली.

लई भारी. सातवाहन ट्रेक आवडला.

दगडी रांजण पाहून, त्यात जमा झालेली नाणी एकेक करुन बाहेर काढणं किती वेळखाऊ असेल याचा विचार करतो आहे. याहून हलकं आणि सहज उपडं करण्यासारखं पात्र का ठेवलं नसेल? कदाचित कोणी उचलून घेऊन जाऊ नये म्हणून असावं.

प्रचेतस's picture

29 Jan 2013 - 2:28 pm | प्रचेतस

म्हणूनच म्हणतो की तो जकातीच्या नाण्यांसाठी असलेला रांजण नाहीच.

मूळात हा रांजण घाटवाटेच्या अगदी तोंडावर आहे जेणेकरून गुहेशेजारील पाण्याच्या टाक्यांतील पाणी घाट चढून तहानलेल्या वाटसरूंना विनासायास देता यावे व टाकीही स्वच्छ राहावीत.
दुसरे असे की हा रांजण खूप खोल आहे. रांजण पूर्ण भरण्याइतकी नाणी जमण्यास कित्येक दिवस लागावेत तसेच सामान्यांकडून जकात बहुधा घेतली नसावी. श्रमणांच्या तांड्याकडून मात्र ती हमखास वसूल केली जात असावी. तसेच गोळा केलेली ही जकात रोजच्या रोज शेजारच्याच जीवधन किल्ल्याचा खजिन्यात पोचवली जात असे.

वाटसरुंच्या पाण्यासाठी असेल तर मग हा रांजण त्या मानाने लहान आकाराचा आणि लहान तोंडाचा नाही वाटत? करकोचाच त्यातून पाणी घेऊ शकेल..

प्रचेतस's picture

29 Jan 2013 - 2:56 pm | प्रचेतस

नाही.
भलामोठा आहे आणि जवळपास निम्मा जमिनीत गाडला गेला आहे.
हा बघा
a

अच्छा.. या अँगलने वेगळा दिसतोय.

आकारमानाविषयी मान्यता दर्शवून चिंचोळ्या तोंडाबद्दलचे मत कायम राखतो.

शैलेन्द्र's picture

29 Jan 2013 - 4:59 pm | शैलेन्द्र

गवि, तोंड चिंचोळे नाही, एक माणुस अख्खा आत उतरु शकतो..

आँ?? %) फोटोमुळे फसलो..अंदाज फारच चुकला..

स्पा's picture

29 Jan 2013 - 5:10 pm | स्पा

=))

गवि's picture

29 Jan 2013 - 5:11 pm | गवि

स्वतः बाजूला उभे राहून तरी फोटो काढून घ्यायचा होतास.... म्हणजे अंदाज आला असता..

गवि, स्पांडूच्या साईजचा माणुस शिरु शकत असेल हो.
तुम्ही भलतं-सलतं धाडस करायला जाऊ नका.

मी-सौरभ's picture

31 Jan 2013 - 7:20 pm | मी-सौरभ

गणपाशेटशी बाडीस

संजय क्षीरसागर's picture

29 Jan 2013 - 2:25 pm | संजय क्षीरसागर

फोटोपण उत्तम आलेत (थोडे एक्स्टेंड झालेत, मापात कर)

सुंदर फोटो. वर्णनही आवडले.
ती फुले पांगारा नसून पळस असावा असे वाटते.

सौरभ उप्स's picture

29 Jan 2013 - 2:48 pm | सौरभ उप्स

मस्त लिहिलयस.... क्लीक्क्लीकाट तर मस्तच...

हासिनी's picture

29 Jan 2013 - 3:02 pm | हासिनी

फोटो मस्त आलेत!!
:)

उपटसुंभ's picture

29 Jan 2013 - 3:20 pm | उपटसुंभ

मस्त आहेत फोटोज..!

मुक्त विहारि's picture

29 Jan 2013 - 3:22 pm | मुक्त विहारि

@ स्पा..

आता भारतात आलो की, एखादी ट्रिप काढू या का?

स्पा's picture

29 Jan 2013 - 3:24 pm | स्पा

;)

५० फक्त's picture

29 Jan 2013 - 3:59 pm | ५० फक्त

जाउन परत आलात हे उत्तम.

इथे भर पावसाळ्यात गेलो होतो.. फक्त चिंब भिजलो आणि थंडीने गारठलो..

- पिंगू

खर्र खर्र सांग, नव्या कॅमेर्‍याने फोटू काढायला मिळावे म्हणुन हा बेत आखला होतास की नै? ;)

फोटो बाकी खरच छान काढलेत. :)

स्पा's picture

29 Jan 2013 - 4:21 pm | स्पा

खर्र खर्र सांग, नव्या कॅमेर्‍याने फोटू काढायला मिळावे म्हणुन हा बेत आखला होतास की नै?

ट्रेक च्या आत क्यामेरा हातात यावा , म्हणून धावत पळत घेऊन आलो :D

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jan 2013 - 9:42 pm | अत्रुप्त आत्मा

@ नव्या कॅमेर्‍याने फोटू काढायला मिळावे म्हणुन हा बेत आखला होतास की नै?>>> =)) त्यात काय ओळखायला हवं!!!!!!!!!!?????????????? =)) त्याच साठी(स्पांडूनी)केला अट्टा-हासं ;-)

यावरून यक नवं गानं सुचाया लागलयं

स्पांडोबा सांग असा वागलास का?
क्यामेर्‍याच्या पाठिमागे लागलास का?
क्यामेर्‍याचा झूम हजारामं....दी...ईईईईईईई...
पांडू च्चा डोळा क्यामेरा मंदी....ईईईईई ;-)

सूड's picture

29 Jan 2013 - 4:35 pm | सूड

नवीन क्यामेर्‍याने काढलेले दिसतायेत फोटो !! छानच!!

स्पंदना's picture

29 Jan 2013 - 4:38 pm | स्पंदना

स्पा मस्त फिरलाय की रे! पण तेथे रात्री रहायला हवा होतास. अन तिथल्या हेऽऽ मोठमोठ्या सापांच्या काती? आई ग ! बघुनच कापर भरल होत मला. प्रत्यक्षात जर साप दिसता तर मी शोर्ट्कटन खाली येउन वर गेले असते.
अग्निशिखेचे फोटो आवडले, माकडांचे आवडले, पण नाणेघाट म्हंटल की मला दिसतो तो हा बेलाऽऽग कडा.

ithe

ithe

ithe

अर्थात हे फोटो मी स्कॅन केले आत्ता. रोल धुवायच्या काळातले आहेत.

प्रभाकर पेठकर's picture

29 Jan 2013 - 5:20 pm | प्रभाकर पेठकर

मस्त छायाचित्र आणि वर्णन.

नाणेघाटात अजून जायचा योग आला नाही, आता गुडघे कितपत साथ देतील शंकाच आहे. पण पाहू कधीतरी प्रयत्न करून.

रांजणाची उपयुक्तता, नाण्यांपेक्षा पा़ंथस्थांची तहान भागाविण्यासाठी जास्त असेल असेच वाटते.

नाणेघाटात अजून जायचा योग आला नाही, आता गुडघे कितपत साथ देतील शंकाच आहे. पण पाहू कधीतरी प्रयत्न करून.

काका, मुंबैकडून गेलात तर नाणेघाटाची खिंड चढून वर यावे लागते. त्यामुळे मुंबैकरांसाठी हा ट्रेक आहे, पुणेकरासांठी नाही. पुण्याहून गाडीने जुन्नरमार्गे थेट खिंडीच्या माथ्यापर्यंत जाता येते.

चित्रगुप्त's picture

29 Jan 2013 - 5:25 pm | चित्रगुप्त

फोटो आणि थोडक्यात माहिती छानच आहे.
पैठणला ज्यावरून बैलगाड्या जात, तो रस्ता म्हणजे फोटो क्र. ११ आणि १२ मधे दिसत असलेलाली खिंड का?

शैलेन्द्र's picture

29 Jan 2013 - 5:43 pm | शैलेन्द्र

बैल्गाड्या जाणे शक्य नाही.. बैलांचे तांडे जायचे.. तेही पैठणला नाही, तर जुन्नरला..

पैसा's picture

29 Jan 2013 - 5:27 pm | पैसा

मस्त फोटो आणि वर्णन! अगदी भूछत्रांसकट फोटो काढलेले पाहून अगदी भरून आलं.

अपर्णाचे फोटो पाहूनही मज्जा वाटली. अजून ट्रेकिंगला जावं असं वाटतंय ना अपर्णा?

बयो परवा हॉल्स गॅपला जवळ्जवळ १२ किमी वर चढत गेले होते, अन तेव्हढच खाली.
दुसर्‍या दिवशी एक छोटी स्टेप पाहिली तरी आई आठवत होती.

पैसा's picture

29 Jan 2013 - 10:08 pm | पैसा

आता दम गेला ना? मग वृत्तांत कोण लिहिणार?

बॅटमॅन's picture

29 Jan 2013 - 6:15 pm | बॅटमॅन

मस्त फोटो आणि वर्णन!

असेच म्हणतो.

अगदी भूछत्रांसकट फोटो काढलेले पाहून अगदी भरून आलं.

कोडाईकनाल असतं सोबत तर अजून मज्जा आली असती, हो की नै =))

पैसा's picture

29 Jan 2013 - 6:30 pm | पैसा

मन्या फेणे कोडाईकॅनॉलला गेला होता अशी एक बातमी आली होती खरी.

तिथुन सिडनीला गेल्याचीही अफवा होती, अर्थात फोटो नाहीत मिळाले नाहीतर पुरावा दिला असता. आज फेसबुकावर पाहतो, पुन्हा.

बाकी मन्याफेणेसिटुसि.कॉम साईट सध्या मेन टे नन्स खाली आहे असं समजते.

किसन शिंदे's picture

29 Jan 2013 - 6:11 pm | किसन शिंदे

वृत्तांत आणि फोटो दोन्ही आवडले.

मोदक's picture

29 Jan 2013 - 9:04 pm | मोदक

सहमत..

धन्या's picture

29 Jan 2013 - 9:29 pm | धन्या

मी ही...

नंदन's picture

1 Feb 2013 - 3:59 pm | नंदन

सहमत

कपिलमुनी's picture

29 Jan 2013 - 6:41 pm | कपिलमुनी

मस्त ट्रेक आणि छान फोटो !!
पूर्वी बैलांचे तांडे जसे वर चढायचे त्या मार्गाने खाली उतरता येते का ??

शैलेन्द्र's picture

29 Jan 2013 - 7:10 pm | शैलेन्द्र

हो तर.. आम्ही त्याच मार्गाने वर गेलो आणी खाली उतरलो.

सुंद्र्र ट्रेक आणि छान फोटो. अत्ताच ट्रेकिंगला जावं असं वाटतंय !! :)

मनराव's picture

29 Jan 2013 - 7:43 pm | मनराव

मस्त रे श्पांडु......!!! झक्कास फोटो...

लगे रहो. फोटो मस्तच

क्रान्ति's picture

29 Jan 2013 - 10:00 pm | क्रान्ति

१२, २१, २२, २३ हे फोटो अफाट आहेत! १५ मधली घंटा बघून जी. ए. यांच्या कथांमधलं गूढ वातावरण आठवलं. पळसाचे फोटो इतके मोहक आहेत, की हात लांबवून फुलं तोडायचा मोह होतोय! :)

अग्निकोल्हा's picture

29 Jan 2013 - 10:59 pm | अग्निकोल्हा

तु सिग्रेट हो :)

धन्या's picture

29 Jan 2013 - 11:34 pm | धन्या

पांगार्‍याच्या फुलांचे फोटो प्रचंड आवडले आहेत.
त्यावर कुठल्याही प्रकारच्या पाण्याच्या खुणा न उमटवण्यासाठी विशेष आभार. जर कधी कुठे फोटो वापरलेच तर तुमचा नामोल्लेख नक्की करण्यात येईल. :)

दीपा माने's picture

31 Jan 2013 - 9:13 am | दीपा माने

फोटो व वर्णन दोन्हीही आवडले.

कंजूस's picture

31 Jan 2013 - 6:21 pm | कंजूस

स्पा फारच छान ! १. रांजणाबद्दल हा अखंड दगडात कोरलेला नसून अचूक मापात वेगवेगळे तुकडे कोरून नंतर जोडले आहेत त्यामुळे तो जकातिसाठीच असणार . सातवाहन काळ म्हणजे दुसऱ्‍ या शतकाअगोदर आणि तो शिलालेख त्यामुळे रांजण अतिशय महत्वाचा ऐतिहासिक पुरावा आहे .

नाणेघाट मार्ग . जर तुमच्याकडे तुमचे वाहन नसेल तर . . . कल्याण एस टि डेपोत या , शक्यतो आळेफाटा/जुन्नर /घोडेगाव कडे जाणाऱ्‍या बस वाहकाला नाणेघाटला जायचे आहे हे सांगा/विचारा . हो म्हणाल्यास तुमचे काम सोपे होईल . तुम्हाला तिकिट पण मिळेल आणि जेथून नाणेघाटची पायवाट सुरू होते तिथेच तुम्हाला उतरवेल . नाहितर वैशाखरे गावाच्या थांब्यावर उतरुन रस्त्याने ३ किमी चालल्यावर ती वाट येईल . हा विनंती थांबा आहे . परतताना दुपारी ३ ते ४ दरम्यान ८ ते१० बस जातील हात दाखवून बस थांबवा . पाच नंतर एखादिच बस येते .

शैलेन्द्र's picture

31 Jan 2013 - 7:07 pm | शैलेन्द्र

अस नसत करायच, वैशाखरे सांगुन गाडीत बसायच आन पुढ उतरायच..

(अनुभवी )

मी-सौरभ's picture

31 Jan 2013 - 7:25 pm | मी-सौरभ

फोटो काय दिसत नाय हपिसातून
पन क्यामेरा नवा अन तु अनुभवी असल्याने चांगलेच असतील

पियुशा's picture

5 Feb 2013 - 4:49 pm | पियुशा

व्वा व्वा काय फोटु आलेत :)

नाणेघाट आम्ही नाईट ट्रेक केला होता तो ही पावसाळ्यात! खरं म्हंजे नाईट पेक्षा पहाट ट्रेक म्हणायला हवा. मुंबईतून मध्यरात्री निघालो, पहाटे पायथ्याशी.. फटफटल्यावर सूर्योदयाला माथा

तिथे पावसाळ्यात जाताना वाटेत तीन मोठ्ठाले ओढे लागतात, ते एकमेकांचे हात धरून - साखळी करून - पार केल्याचं आठवतंय.. त्या वयात तेच 'लै भारी थ्रिल' वाटलं होतं :)

ऋषिकेश's picture

5 Feb 2013 - 5:02 pm | ऋषिकेश

आणि हो.. वरचे लख, फटु सगळे आवल्डे!
स्वगतः वल्लीशेटबरोबर अशाच एखाद्या गडावर भटकायचा योग कधी येतोय देवच जाणे

सुहास झेले's picture

5 Feb 2013 - 6:28 pm | सुहास झेले

सहीच रे.... मज्जा केलीस... फोटो खूप आवडले

जेवणाची सोय होणं कठीणच आहे, सोबत जेवण नेल्यास उत्तम,

हल्ली जेवणाची सोय तिथे आरामात होते.. थोडी चौकशी केल्यावर तुला जेवण काय, अंथरूण-पांघरूण सगळं सगळं मिळतं ;-) :)

वेल्लाभट's picture

19 Feb 2013 - 2:29 pm | वेल्लाभट

सुंदर वर्णन आणि फोटो. एकच अपडेट असा की नाणेघाट ला वर जेवणाची, चहाची शिवाय गुहेत रहायचं नसल्यास घरात राहण्याची उत्तम सोय होते. आम्ही गेलो होतो ६ महिन्यांपूर्वी तेंव्हा आमची सोय झाली. संपर्क ९५५२७ ५०१३३

शैलेन्द्र's picture

19 Feb 2013 - 6:15 pm | शैलेन्द्र

शम्मत आहे..

माणिकमोति's picture

18 Sep 2013 - 1:21 pm | माणिकमोति

ह्या रविवारिच 'नाणेघाट' ला जावून आले.. जाण्याआधि तुमचा हा लेख वाचून गेले होते.. त्यामुळे खूप मदत झाली..

'नाणेघाट' खरच खूप सुंदर आहे.. ऐका दिवसात जावून येण्यासाठी एकदम मस्त..!! तुम्ही लोक परत कधी ट्रेकला जाणार असाल तर सांगा.. मिपाकराना भेटायला मला खूप आवडेल..