मागच्या रविवारी अचानक मनात आले की कुठेतरी भटकायला जावे . . .लगेच प्लॅन केला. . .राजेसाहेबांना फोन केला आणि ते घरी आहेत याची खात्री केली. . .परंतु जायचे होते अलिबागला! राजेसाहेब सहज येतील अशी खात्री नव्हती. . .म्हणून सरप्राईझ ट्रिप ठरवली. . .राजेसाहेबांना सांगितले की आपल्याला लोणावळ्याच्या पुढे एका स्पॉट ला जायचे आहे. . .राजेसाहेब तयार झाले.
पेणला आल्यावर राजेसाहेबांना कल्पना दिली की आपण अलिबागला जावून परत येऊ शकतो. . .राजेसाहेबांनी होकार दर्शवला.
मग पेणला नाष्टा करून अलिबागच्या दिशेने रवाना झालो.
किनार्यावर गेल्यावर फोटो काढणे सुरुच होते. . .शेजारून लोक घोडा-गाडीवरून समोरील किल्ल्यावर जात होते.
त्यातील एका घोडागाडीचा फोटो खाली लिंक करत आहे.
समोर दिसणार्या सूर्याचा आणि वाळूवर दिसणार्या परावर्तीत किरणांचा फोटो काढला. तो खाली लिंक करत आहे.
पुढे गेल्यावर समोर एक किल्ला पहायला मिळाला.
चौकटराजा 'साहेब' म्हणाले समोर किल्ला आहे त्यामुळे आपल्याला परफेक्ट सूर्यास्त मिळणे कठीण आहे. . . म्हणून मग पुढे जावून एखादा छान अँगल मिळतो का ते पाहू लागलो. . .तेवढ्यात एक छान अँगल मिळाला. तो खाली लिंक करत आहे.
परतीचा प्रवास सुरू केला. . . वाटेत खोपोलीमध्ये थांबून एक्सप्रेस वे वर शटरस्पीड फोटोग्राफीचा प्रयत्न केला.
त्यात काढलेला फोटो खाली लिंक करत आहे.
यानंतर सरळ होम स्वीट होम तेपण १०.३० वाजता.
प्रतिक्रिया
25 Jan 2013 - 1:41 am | श्रीरंग_जोशी
छायचित्रे च संबंधीत वर्णन दोन्हीही आवडले.
25 Jan 2013 - 9:17 am | मुक्त विहारि
छान लिहिले आहे..
25 Jan 2013 - 9:45 am | धन्या
फोटो आवडले.
पण ते नावाचं वॉटरमार्क खटकतं राव. निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण करतो, ती फुकट असते. आपण फक्त डोळ्यांनी ते सौंदर्य प्यायचं. पण आपण करतो काय, एक डीजीटल कॅमेरा घेऊन जातो, क्लिक करतो आणि त्यावर आपलं नांव टाकतो. जसा काय तो समुद्र, तो सुर्य आणि ते मावळतीचे रंग आपल्याच बापजादयांनी घडवलेले असतात.
वापरु दया की लोकांना ते फोटो वापरायचे असतील तर. आणि ते लोकांनी वापरु नये असं वाटत असेल तर ते फोटो जालावर चढवूच नयेत. आपल्या कॅमेर्याच्या मेमरी कार्डमध्येच पडू दयावेत.
कृपया प्रतिसाद वैयक्तिक घेऊ नये. हे सर्व यच्चयावत चांगले फोटो काढणार्यांना उद्देशून आहे. आणि आमच्या सागर गडकरींचा याबाबतीत अभिमान आहे. त्यांच्या लेण्यांच्या आणि किल्ल्यांच्या फोटोत कधीही वॉटरमार्क पाहीला नाही. अर्थात दगडाधोंडयाचे फोटो कशाला कोण ढापतोय म्हणा. ;)
25 Jan 2013 - 9:51 am | चौकटराजा
आम्ही टाकलेले फटू पहा. त्यात कापी राईट वगैरे काय बी नसतया ! आमचे उधारन धन्याराव तुम्ही का नाय धिले ?
25 Jan 2013 - 9:58 am | धन्या
आवशिक खाव, तात्यानू जल्ला ता लक्षातच नाय इला माज्या. पुढच्या टायमाक नक्की तुमचा नाव लिवता हां.
25 Jan 2013 - 9:45 pm | हुकुमीएक्का
मी सुध्धा सहमत आहे . . . परंतू इथे काही लोक आहेत ज्यांना वॉटरमार्क नसलेले फोटो इंटरनेट वरून टाकल्यासारखे वाटतात. . .नंतर हे देखील ऐकावे लागते की हे फोटो आधी कुठेतरी पाहिले आहेत . . .म्हणून नाव टाकावे लागते. . .परंतु आपण व चौकटराजा यांच्या सल्ल्याचा मान ठेवून हा बदलदेखील करून पाहीन. . .
25 Jan 2013 - 11:41 pm | अभ्या..
इथे बरेचसे लोक असे पण आहेत ज्यांना ईंटरनेटच्या फोटोवर स्वतःचे वॉटरमार्क पण टाकता येतात आणि वॉटरमार्क असले तर ते उडवता पण येतात.
25 Jan 2013 - 11:44 pm | अभ्या..
इथे बरेचसे लोक असे पण आहेत ज्यांना ईंटरनेटच्या फोटोवर स्वतःचे वॉटरमार्क पण टाकता येतात आणि वॉटरमार्क असले तर ते उडवता पण येतात.
25 Jan 2013 - 11:48 pm | धन्या
भावना समजून घेतल्याबद्दल. :)
25 Jan 2013 - 10:16 pm | जेनी...
हानतिच्यायला =))
25 Jan 2013 - 11:05 pm | तर्री
मग पेणला नाष्टा करून
निघालात त्याचे फोटो नाही वर्णन नाही म्हणजे काय ? हे मिपा आहे आणि सगळ्या इतर उपद्व्यात खाण्याला असे अनुल्लेखाने मारणे तथा फाट्यावर मारणे मला तरी पसंत नाय.बाकी अप्रतिम फोटो आणि वर्णन ही छान.
26 Jan 2013 - 9:45 pm | हुकुमीएक्का
बर...पुढच्या वेळी नक्की वर्णन करीन अगदी फोटोसहित. . . :) ट्रिप घाईत पार पडली म्हणून काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाले . . .
26 Jan 2013 - 9:48 pm | पैसा
फोटो आवडले आणि लिहिण्याची स्टाईल पण.
28 Jan 2013 - 1:45 pm | यशोधरा
ग्रे रंगाचा वॉमॉ टाकलात किंवा प्रकाशचित्रातील इतर रंगसंगतीशी मिळताजुळता वॉमा टाकलात तर अधिक चांगले दिसेल.
तिसरा फोटो आवडला.
1 Feb 2013 - 8:27 pm | कंजूस
ठसठशित आणि छान आणि मोजकेच फोटो आलेत हुकमिएक्का !