जाहिरातीमधील चुकीचे मराठी !!

अभिजित - १'s picture
अभिजित - १ in काथ्याकूट
23 Jan 2013 - 10:00 am
गाभा: 

. आजचा सकाळ ( २३/१/२०१३ ) . बहुतेक फक्त ठाणे आवृत्ती . शेवटचे पान . टीप टोप प्लाझा ची जाहिरात.
एक वधुपिता आणि त्याची मुलगी. रुबाबदार जोडी. जाहिरात अशी आहे -
'कन्या परक्याचे धन ' मानून
घडवलं व्यक्तिमत्व छान
सासरी करताना वाटे
सार्थ अभिमान
-----------------------------------------------
आता कल्पना करा कि पहिल्या दोन ओळी वधूपिता म्हणत आहे. आणि शेवटच्या दोन ओळी ती मुलगी म्हणतेय !!
अर्थात ती जाहिरात समोर असेल तर खरी मजा समजेल.
इथे त्या लोकांनी "करताना" ऐवजी "पाठवताना" हा शब्द वापरायला पाहिजे होता.
तुम्ही अशा जाहिराती पहिल्या आहेत का ?

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

25 Jan 2013 - 6:47 pm | किसन शिंदे

बाकी अशा अशुध्द शब्दांसाठी मटा तर एक नंबर हाय. :D

काही महिन्यांपुर्वी बहुतेक नवरात्रात ठाण्यातल्या चिंतामणी ज्वेलर्सची झायरात करताना कुष्मांड हा शब्द त्यांनी कुशमांड असा टाकल्यांच चांगलं आठवतंय.

क्लिंटन's picture

25 Jan 2013 - 6:51 pm | क्लिंटन

आपले टिव्ही चॅनेलही या बाबतीत फार मागे नाहीत.विलासराव देशमुखांचे निधन झाल्यानंतर अशाच एका मराठी चॅनेलवर विलासरावांबरोबर २० पेक्षा जास्त वर्षे काम केलेल्या त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याला बोलावले होते.मुलाखत घेणाऱ्याने त्या सहकाऱ्याला विचारले--"तुमच्यावर विलासरावांचे सहकारी म्हणून त्यांच्याबरोबर अनेक वर्षे काम करायचा प्रसंग आला.....". असा प्रश्न विचारायच्या "प्रसंगी" हा "प्रसंग येणे" हा वाक्प्रचार अगदी चुकीचा आहे हे त्या मुलाखत घेणाऱ्याच्या गावीही नव्हते. :(

किसन शिंदे's picture

25 Jan 2013 - 6:53 pm | किसन शिंदे

काम करायचा प्रसंग आला.....".

=)) =))

त्या मनुष्यावर मग 'प्रसंगच' आला होता की! ;)

शॉक अ‍ॅब्सॉर्बर हा अजून एक असा शब्द जो मी कधीही देवनागरीमध्ये व्यवस्थित लिहीलेला पाहिला नाही. प्रत्येक गॅरे़जवाला आपापल्या पद्धतीने त्याचं बारसं करतो. कधी तो शॉकप्सर असतो, कधी शॉकॉप्सर असतो, तर कधी शॉक अबसरबर.... :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2013 - 8:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी भाषेत रुढ झालेला 'शॉकप्सर' 'शॉकप' हा वरीजनल 'शॉकअ‍ॅब्सॉर्ब' आहे, हे आज मला माझ्या वयाच्या [असो] या वर्षी कळले. धन्स.

-दिलीप बिरुटे

लई भारी's picture

27 Jan 2013 - 12:47 am | लई भारी

मराठी पेपरात ERP प्रोडक्टची जाहिरात होती, त्यात एक वाक्य होते:
'शेतात सिद्ध झालेले!'
त्यांना 'Proven in field' म्हणायचे असेल :D