रामदासी संप्रदायाचा कन्हेरी मठ

विटेकर's picture
विटेकर in भटकंती
19 Jan 2013 - 5:18 pm

कण्हेरी मठ- मठाधिपती श्री.वासुदेव स्वामी
Samadhi

हा फोटो श्री.वासुदेव स्वामी - मठाधिपती कण्हेरी मठ यांच्या समाधीचा आहे. हे पूर्वाश्रमीचे सदाशिवशास्त्री येवलेकर! "वाद-विवदात हरल्यास जीभ कापून देईन" असा अहंकार असलेले! पण समर्थांनी चाफळ येथे त्यांचे एका मोळीविक्या कडून त्यांचे गर्वहरण केले व अनुग्रह दिला.

chitra

पुढे त्यांनी आपल्या प्रखर बुद्धीमत्तेच्या आणि पांडित्याच्या जोरावर समर्थ सम्प्रदायांत आणि महाराजांच्या राजकारणात त्यांनी फार मोठी कामगिरी बजावली.

bheem swami

त्यांचे शिष्य भीमस्वामी यांनी दासबोधावर टीकात्मक काव्य रचना ही केली आहे. त्यांचीही समाधी येथेच आहे.

mandir1

कण्हेरी मठ शिरवळ पासून १६ कि.मी. अंतरावर पुण्य़ाहून साताराला जाताना उजव्या बाजूस आहे.( सावित्रीबाई फुले यांच्या नायगांव पासून पुढे अंदाजे १० कि.मी.) मठाची पड्झड झाली असून पूजा- अर्चा मात्र टिकून आहे. रामनवमीला उत्सव होतो. आता आपले माय-बाप सरकार जिर्णोद्धार करणार आहे अशी वार्ता आहे. परिसर अतिशय रम्य आहे. अर्थात "पिकनिक स्पोट" म्हणुन नव्हे पण भाविकाच्या अंतकरणाने त्या काळच्या वातावरणाचा अनुभव घेता येतो.

mandir 2

मठाची सध्याची व्यवस्था मठाधिपती श्री. उमेश गोसवी पाहतात. समर्थ कार्याची आच आणि तळमळ असल्यामुळे तुट्पुंज्या साधनसामग्रीसह दम धरुन आहेत.
शिवकालात या मठाचे महत्व अनन्यसधारण होते. कारण हा मठ भौगोलिक दृष्ट्या मोक्याच्या जागी आहे. प्रतापगड- राजगड जवळ आहेत तसेच या मठातून मांढरदेवी काळुबाई पठार दिसते. या मठाचे चार उपमठ आहेत त्यांची नावे - मर्ढे , शिरवळ , पसरणी, माढे. समर्थ भक्तानी आवर्जून भेट द्यावी असे हे स्थळ आहे. कण्हेरी मठापासून वाईला जायलाही पायवाट आहे.
गावांत एक समर्थकालीन मारुती मंदीरही आहे. त्याचे फोटो घ्यायचे राहीले. गांव मुस्लीम बहुल असून देखिल गावचे मुसलमान पाटील समर्थ भक्त आहेत. मारुती मंदीराचा जुना बाज कायम ठेऊन अतिशय उत्तम जिर्णोद्धार केला आहे. (बहुधा पुरातत्त्व खात्याला त्याची गंधवार्ता नसावी.अन्यथा हे इतके सुंदर घडते ना!) आवर्जून एकदा जावे असे निश्चितच ठिकाण असून पुण्याहून सकाळी निघून दुपार पर्यंत परत येता येते.

प्रतिक्रिया

अनन्न्या's picture

19 Jan 2013 - 5:28 pm | अनन्न्या

samadhi

अनन्न्या's picture

19 Jan 2013 - 5:30 pm | अनन्न्या

हा समाधीचा फोटो!

आदूबाळ's picture

19 Jan 2013 - 5:33 pm | आदूबाळ

फोटु दिखताईच नई...

प्रचेतस's picture

19 Jan 2013 - 6:10 pm | प्रचेतस

काका, पिकासावर हा अल्बम तुम्ही शेयर केलेला दिसत नाही त्यामुळे फोटो दिसत नाहीयेत.
अल्बमला पब्लिक अ‍ॅक्सेस दिलात तर फोटो दिसू लागतील.

विटेकर's picture

19 Jan 2013 - 6:22 pm | विटेकर

तिकडे एका दुसर्या धाग्यावर वि़क्षिप्तपणामुळे डोके तापले होते .. आता करतो नीट !
धन्स !

दादा कोंडके's picture

19 Jan 2013 - 6:28 pm | दादा कोंडके

तिकडे एका दुसर्या धाग्यावर वि़क्षिप्तपणामुळे डोके तापले होते ..

हा हा. ते कळलंच. दर पाच-दहा मिनिटानी तुमचे नविन प्रतिसाद दिसत होते ते.

विटेकर's picture

21 Jan 2013 - 10:19 am | विटेकर

मंडली , ते योग्य जागी जातील अशी जरा मदत करा..
धन्यवाद !