मंदी, महागाई, कर्ज आणि गुंतवणूक

मनिष's picture
मनिष in काथ्याकूट
2 Jul 2008 - 4:48 pm
गाभा: 

जरा टेन्शन देणार्‍या विषयावर जाणकार (तात्या, नाना आणि इतर) व्यक्तिंचा सल्ला घ्यावा असे वाटले म्हणून ही चर्चा.

मंदी आणि महागाई हळुहळू पाय पसरत आहेत. अशा वेळेस काय करावे? घरांच्या कर्जाचे व्याजदर वाढतात आहे, त्यामुळे परतफेडीचा काळ वाढणार, तसेच इतर कर्जेही महाग होणार.

असे दिसते आहे की ऑटो आणि आय टी इंडस्ट्री ची वाट लागणार - तसेच आय टी मधील बर्‍याच नोकर्‍या जातील (२०००-२००१ चे ले-ऑफ अनुभवलेत मी), परिणामी बरीच घरांची कर्जे बुडतील, त्यामुळे कदाचित जागांचे भावही खाली येतील. पण अशा परिस्थितीत काय करावे? कर्जे प्री-पेमेंट करून लवकर फेडावीत का? की व्याजदर ४-५ वर्षाने खाली येईल म्हणून वाट पहावी? अशा वेळेस (पैसे असल्यास) गुंतवणूक कुठे करावी? शेअर मार्केट/म्युच्युअल फंड मधे पैसे टाकावेत (आज आय सी आय सी आय ५५३ ला होत, पण भीतीने घेतला नाही तर दिवस संपेपर्यंत ६२४ ला आला. आधीच शेअर मार्केट इतका तोटा झाला आहे, की अजून शेअर्स पडल्या भावात घ्यायची हिम्मतच होत नाही.) की बँकामधे राहू द्यावेत?

मंदीमधे आर्थिकदृष्ट्या सुरक्षित कसे रहावे? ह्या काळात खर्चाबाबत, गुंतवणुकीबाबत काय धोरण असावे? तुमची मते जाणून घ्यायला आवडेल.

प्रतिक्रिया

संजय अभ्यंकर's picture

3 Jul 2008 - 12:32 am | संजय अभ्यंकर

मनिष साहेब,

कोणीच उत्तर देत नाही!
कदाचीत, आपण एव्हडे प्रश्न एकदम विचारलेत की उत्तर देणार्‍याला ही काही सुचत नाही.

संयम आणी शांतता हे गुण आजच्या परिस्थितीत उपयोगी पडतात.

आजच्या घडिस, गुंतवणुक ही केवळ तज्ञांच्या सल्ल्याने करा.
बाजारात हे दिवस काही फार काळ रहाणार नाहीत.
फक्त फार काळ म्हणजे किती हे सांगणे कठिण.

मी आपली गुंतवणूक टप्प्या टप्प्याने चालू ठेवली आहे.
कारण बाजराच्या आजच्या स्थितीशी मला फार घेणे देणे नाही.
एकदा घेतलेले समभाग आणी म्यु.फं. मी अनेक वर्षे विकत नाही.
माझ्या कुटुंबाची एकंदर गुंतवणुक आजही नफ्यातच आहे.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

वरदा's picture

3 Jul 2008 - 12:37 am | वरदा

आधी घेतलेले म्यु .फं आता सॉलीड उतरलेत आणि अजुन उतरणार असं दिसतय्....जर असं केलं तर काय होईल.....आत्ता फार तोटा होत नाहीये तेव्हा विकून टाकले....मग खूप खाली गेले की परत घेतले...आणि मग परत वाढले की विकले....फक्त ते परत वाढणे होईल का याची भिती वाट्टे....:(
सध्या पैसे असतील तर कुठे गुंतवणूक करणं चांगलं?
इथे कुणाला शेती मधे करायची गुंतवणूक यावर काही माहिती आहे का? प्लीज मला द्याल का?
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

वरदाजी,

म्यु.फं. किंवा समभागाची खरेदि-विक्री हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे,
तरीही सांगावेसे वाटते की, लोक घाई करतात आणी अयोग्य वेळी विक्री करतात.

हा काळ संयमाचा आहे.

हर्षद मेहताच्या काळातही मी स्थितःप्रज्ञ होतो (त्या काळात बाजार चढा असतानाही आणी कोसळता असतानाही).

आजही माझे अनेक समभाग नफ्यात आहेत.

धन्यवाद!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

3 Jul 2008 - 8:44 am | विसोबा खेचर

संजयशी सहमत आहे.

सध्या बरेचसे उत्तमोत्तम समभाग अक्षरश: लोळताहेत व खूपच स्वस्तात मिळताहेत. ते घेऊन ठेवा. भविष्यात खूप फायदा मिळवून देतील.

माल लेके बैठ जाओ! :)

आपला,
(बाजाराची सगळी नाटकं खूप जवळून पाहिलेला) तात्या मारवाडी.

सहज's picture

3 Jul 2008 - 8:52 am | सहज

संयम [घाईत खरेदी-विक्रीचा निर्णय न घेणे] व दीर्घ काल [गुंतवणुकीचा काल] या दोन साधनांचा उपयोग करुन ह्या संधीचा फायदा घ्या.

आपण सगळेच दैनंदीन जीवनात छ्या सगळ्या गोष्टी काय महाग झाल्यात असेच म्हणत असतो ना . आता उत्तमोत्तम समभाग [ब्लु चीप - जे तात्यांना विचारा] स्वस्तात झालेत तर आनंदाची गोष्ट आहे की नाही?

www.moneycontrol.com या संकेतस्थळावर अनेक कंपन्यांचे ताळेबंद व तिमाही प्रगती पुस्तके पाहीली तर असे दिसते की, बहुसंख्य कंपन्या स्थिरगतीने प्रगती करीत आहेत व त्यांचे नफेही स्थिर आहेत (सध्या मार्च २००८ पर्यंतचे ताळेबंद उपलब्ध आहेत).

वॉरेन बफेट बाजाराला मि. मार्केट संबोधतो. त्याच्या लहरीपणाबद्दल त्याने भाष्य केले आहे.
http://www.sandmansplace.com/Mr_Market.html

Bull comes by stairs, Bear goes out of window!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

वरदा's picture

7 Jul 2008 - 6:43 pm | वरदा

दोघांनाही धन्यवाद्...आता मनी कंट्रोल वर अभ्यास करतेच....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

रामदास's picture

3 Jul 2008 - 7:06 am | रामदास

इराकचे युध्द संपल्याशिवाय ही पडझड थांबणार नाही.
त्यानंतर एकदीड वर्षंतरी तोल सांभाळण्यात जातील.
आतापर्यंत जे झालेलं आहे ते फक्त टायगर बाय टेल एव्हढंच आहे. हि शेपूट आहे. पुढे सहा फूटाचा वाघ बाकी आहे.

भडकमकर मास्तर's picture

3 Jul 2008 - 9:43 am | भडकमकर मास्तर

इराकचे युध्द संपल्याशिवाय ही पडझड थांबणार नाही.
सहमत..
अवांतर : असे ऐकले होते अमेरिका प्रत्येक मंदीनंतर एक मजबूत युद्ध करते आणि मग सारे काही ठीकठाक होते...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विनायक प्रभू's picture

26 Sep 2008 - 5:23 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
एकदम बरोबर

वैशाली हसमनीस's picture

3 Jul 2008 - 7:41 am | वैशाली हसमनीस

मला वाटते जास्त हव्यास बरा नाही.म्यु.फंडात असलेले पैसे सुरक्षित रहावेत,पण नव्याने येणारे विदेशी म्यु.फंड घेण्यात रिस्क आहे.रिअल प्रोपर्टीमधील पैसा कधीच कमी होत नाही असा आजवरचा अनुभव आहे.यापुढील आर्थिक काळ कठीण आहे हे मात्र खरे!! असलेला व मिळणारा पैसा अत्यंत सावधपणे गुंतवावा्. हा प्रश्न येथे उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद!

डॉ.प्रसाद दाढे's picture

3 Jul 2008 - 9:57 am | डॉ.प्रसाद दाढे

उत्पादन मूल्य तर कमी होत नाही (सिमे॑ट, लोख॑ड इ.) त्यामुळे विकसक घरा॑च्या कि॑मती खाली आणण्यास तयार नाहीत. तिढा असा आहे की वाढणार्‍या व्याजदरामुळे नवीन गृह-कर्ज घेण्यास ग्राहक कचरू लागले आहेत व त्यामुळे नवीन खरेदीवर त्याचा परिणाम होत आहे.
मला असे वाटते की ज्या विकसका॑ची था॑बण्याची क्षमता (होल्डि॑ग कॅपॅसिटी) आहे ते दर खाली आणणार नाहीत, गिर्‍हाईका॑ची वाट पाहात राहतील, तर लहान विकसक फार काळ तग धरू शकणार नाहीत. नफा कमी करून जितका बा॑धकामाचा खर्च असेल तेव्हढ्यात जागा विकतील.
अर्थात, कर्जाचे व्याज दर वाढत राहिल्यामुळे ग्राहकाला आधीच्याच (महाग) कि॑मतीत घर मिळेल.
मुळात प्रश्न असा आहे की सिमे॑ट व लोख॑ड का महागले आहे? हा खोटा फुगवटा आहे की खरोखरच त्या॑चे उत्पादन मूल्य वाढले आहे? मागणी जास्त असल्यामुळे सिमे॑ट क॑पन्या॑नी आपले खिसे भरण्यासाठी एव्हढी प्रच॑ड दर वाढ केली असावी. या नफेखोरीवर कुणाचाच क॑ट्रोल नसतो का?

घरांच्या किमतीत मुख्य मुद्दा आहे तो जागेच्या भावाचा?
जागा सोडलीतर पुण्यात्/मुम्बैत किंवा टेकावडे( खुर्द) मध्ये घराची प्रॉडक्षन कॉस्ट तेवढीच असते
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मनिष's picture

3 Jul 2008 - 11:16 am | मनिष

कंस्ट्र्क्शन कॉस्ट जास्तीत जास्त ८००-१००० पर स्के. फूट आहे. काही जणांच्या मते ती
त्यापेक्षाही कमी (६००-७००) असते. त्यामुळे जागांचे भाव हे मुळ कारण - त्याला
इन्ट्रींसिक (मराठीत माहित नही काय म्हणतात) मुल्य नाही. त्याच्या किमती
मागणी-पुरवठा तत्वाने होतात, मागणी कमी झाली की किंमती थोड्या तरी उतरतील. बँका
आपले कर्जे वसूल करण्यासाठई जेंव्हा को-लॅटरल प्रॉपर्टी विकतील तेव्हा त्या
बिल्डरपेक्षा कमी किमतीत मिळतील. आपसूकच भाव थोडे तरी कमी होतील -
मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी २५-३०% तरी कमी होतील असे तज्ञ म्हणतात आहे.

तात्या, संजय -- माहितीबद्द्ल धन्यवाद. नाना (चेंगट) च्या प्रतिक्रियेबद्द्ल
उत्सुकता आहे.

- मनिष

अवांतर - तात्या काही ब्ल्यू-चीप सुचवाल का?

अभिरत भिरभि-या's picture

3 Jul 2008 - 1:02 pm | अभिरत भिरभि-या

मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी २५-३०% तरी कमी होतील असे तज्ञ म्हणतात आहे.

मुंबई वा बंगलोर मधल्या काही ठिकाणी भावघसरण सुरु झाल्याचे वाचले. पुणे वा सुरत सारख्या नुकत्याच वर येणार्‍या शहरात भाववाढ लवकर थांबेल असे वाटत नाही . पुण्यात गेल्या वर्षभरात भाव जवळपास दुप्पट झाले आहेत. आमच्या परिचयाच्या बिल्डरच्या म्हणण्याप्रमाणे येत्या काही महिन्यात तरी पुण्यात भाव स्थिर राहतील .

अवलिया's picture

3 Jul 2008 - 12:23 pm | अवलिया

घाईत आहे

स्वतंत्र लेख टाकतो

नाना

वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

मनिष's picture

3 Jul 2008 - 12:38 pm | मनिष

आतुरतेने वाट पाहतो आहे.

ध्रुव's picture

4 Jul 2008 - 9:41 am | ध्रुव

घाईत आहे
स्वतंत्र लेख टाकतो
वाट बघतो.

--
ध्रुव

डॉ.प्रसाद दाढे's picture

4 Jul 2008 - 8:53 am | डॉ.प्रसाद दाढे

आयकराची सवलत असलेले मुच्युअल फ॑ड आपण घेतच असतो. पगारातून आयकर कपात कमीतकमी व्हावी म्हणून साधारणतः जानेवारी-फेब मध्ये (कि॑वा डिसे॑बर मध्ये) हे फ॑ड्स घेण्याची घाई केली जाते. बाजार खाली असल्यामुळे आत्ता हे फ॑ड्स घ्यावेत काय (म्हणजे जास्त युनिट्स मिळतील?)

शैलेन्द्र's picture

5 Jul 2008 - 12:23 am | शैलेन्द्र

फंड घ्याच, पण काहि चांगले समभाग नक्की घ्या, जसे अबन ऑफशोअर, एल अन टी, स्टेट बॅक वगैरे..

ई़कॉनॉमी बघायचि तर रस्त्यावर बघा, मॉलची गर्दी कमि झलिय? पेत्रोल पंपाची रांग कमि झलिय?

भारताच भविष्य उज्वल आहे. आनि ई़तकि मोठी अर्थ व्यवस्था अशी सहज नहि कोलमडनार.पॅनीक होवू नका.

मनिष's picture

26 Sep 2008 - 2:46 pm | मनिष

नाना - ह्या नंतर तुम्ही लिहीलेली इंग्लिश मधली लेखमाला वाचली, फार काही समजली नाही (खुद के साथ बातां : खर सांग की काय झेपलं नाय ते!) इथे ह्याच प्रश्नांवर सोप्या भाषेत, मराठीत काही लिहाल का? इतर जानकारांनीही आपली मते लिहावित. स्वतः बुश आता इकोनॉमी झोपली म्हणताहेत, मग स्जून काय, काय होईल ते बघायचे.

अवलिया's picture

26 Sep 2008 - 2:50 pm | अवलिया

खर्च कमी करा, कर्जात अडकु नका, बचत करा, एकाच बैंकेत सगळे पैसे ठेवु नका

कुछ भी हो सकता है..........कुछ भी

झकासराव's picture

26 Sep 2008 - 5:23 pm | झकासराव

नाना सोन्याचे भाव काय राहतील जर सगळच कोसळल तर??
त्याचा विचार लिक्विड ऍसेट म्हणुन कितपत योग्य आहे?
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

अवलिया's picture

26 Sep 2008 - 5:34 pm | अवलिया

कोसळल्यानंतर हायपर इन्फ्लेशन येवुन मग डीप्लेशन येणार की लगेच डिप्लेशन येणार हे सांगणे कठिण असले तरी माझ्या अंदाजानुसार डिप्लेशनच जोरात येईल.
अर्थात डिप्लेशनची चिन्हे दिसत आहेत
जागांचे भाव १५ टक्कयानी उतरले आहेत
व्यवहार बंदच झाले आहेत
शेअरबाजार तर लुडकतच आहे
सोन्याचे भाव त्यानुसारच रहातील

सोन्याचा मुख्य फायदा हा की नोटांचे मुल्य जरी शुन्य झाले तरी सोन्याचे मुल्य कमी होत नाही
रात्रीबेरात्री सुद्धा त्याचे रोकडीत रुपांतर होते

झकासराव's picture

26 Sep 2008 - 5:38 pm | झकासराव

सोन्याचा मुख्य फायदा हा की नोटांचे मुल्य जरी शुन्य झाले तरी सोन्याचे मुल्य कमी होत नाही>>>>>..
हे वाक्य कळाल नाही?
जरा स्पष्ट करणार का?
समजा मला त्यावेळी गरज आहे म्हणुन मी सोन विकल आणि त्यावेळी भाव आतापेक्षा कमी आहे तर त्या परिस्थितीत वरच विधान कस लागु होइल?

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

अवलिया's picture

26 Sep 2008 - 5:49 pm | अवलिया

सोन्याचा मुख्य फायदा हा की नोटांचे मुल्य जरी शुन्य झाले तरी सोन्याचे मुल्य कमी होत नाही>>>>>..

आपण वापरतो त्या नोटा रिझर्ब बैकेने इश्यु केलेल्या असतात. (१ रुपयाच्या सोडुन)
बघा त्यावर काय लिहिले आहे
आय प्रोमिस टु पे द बेअरर द सम औफ वन हंड्रेड रुपीज

व खाली सही असते
बरोबर
म्हणजे हा कागद म्हणजे १०० रु नाही तर ती एक प्रोमिसरी नोट आहे जी घेवुन तुम्ही आरबीआय कडे गेले तर तुम्हाला १०० रु मिळतील
आपण हाच कागद चलन म्हणुन वापरतो.
कारण आपला सरकारवर विश्वास असतो.
जागतिक उलथापालथीत जर सरकारवरचा हा विश्वास ( ते संसदेतला विश्वास ठराव वगैरे नाही बर का) संपला तर कागदाला मुल्य शुन्य
अशा वेळी होतो महागाईचा स्फोट
मग तुमचेपाशी जे काही चलन असेल त्याची किंमत झपाट्याने शुन्य होते
सध्या झिंम्बाब्वे मधे बघा काय चालु आहे
१ केळ्याची किंमत ५ मिलियन झिंबाब्वे डोलर्स

अशा वेळेस सोने मात्र त्याची किंमत गमावत नाही
कारण सोने हे धातु स्वरुपात आहे व त्याला सरकारच्या मानमान्यतेची गरज नाही