नागेश्वर ट्रेक
“ trek “ ह्या शब्दाचा मराठी अर्थ काय आहे ? नाही ना पटकन आठवत आहे , मला पण नाही आठवल . जिसका कोई नाही , उसका google होता है यारो . असा म्हणून मी पटकन " google “ वर search मारला , आणि आपण किती इंग्लिशळेलो आहे , याची जाणीव झाली .असो , ट्रेक चा मराठी अर्थ 'अवघड प्रवास' असा काही तरी search result मध्ये आल .तसा तो अर्थ , मला काही पटला नाही . कारण त्या अनुशंगाने जीवनालाही ट्रेक म्हणावं लागेल .
आता ह्या विषयावर मी जास्त चकटफू सल्ले न देतो सरळ आपलं भटकंतीच्या वर्णनावर येतो .
साधारणतः भीमाशंकरचा ट्रेक जेव्हा चालू होता , त्या वेळेसचं ' वासोटा ' ट्रेक करायचा हा विचार चालू झाला . ५ डिसेंबरला आमची १ छोटेखानी मीटिंग झाली , आणि वासोटा ट्रेक with night hault .असा प्लान झाला .
त्या नन्तर परत शुक्रवारी ०७ डिसेंबरला परत भेटलो ,कोण येणार ,अंदाजे खर्च ,जायचं कस सर्वांचा आराखडा आखण्यात आला . या ट्रेकचा "headcount” ठरवण्यात आला तो ७ .जास्त डोकी headache वाढवतात , नि संख्या वाढली कि ट्रेकिंगचा " feel “ जाऊन ट्रेकिंग'चा 'घो' होतो. तर असा टाळण्याजोग्या गोष्टी आम्ही टाळल्या .
त्यातच अशी माहिती आली कि , नागेश्वारला राहायची परवानगी मिळत नाही . वासोटा - नागेश्वर (रात्रीचा थांबा ) - चोरवड हा थांबण्याचा प्लान बोंबलला. त्यानंतर वासोटा - नागेश्वर – back to pune असा प्लान कागदावरती तयार झाला . ७ सदस्य final झाले . शनिवार जायचे निश्चित झाले .धीरज ,समीर ,भरत ,भूषण , तुषार ,प्रतीक नि प्रतिकचा मित्र . जेवणाची सोय प्रत्येकानी आपापली करायची असे हि ठरले . आणि " तकालीया " म्हणून मीटिंग बरखास्त झाली .
पण हा हि प्लान फिस्कटला, त्याची कारणे पुढील प्रमाणे .
१. शुक्रवारी दिनांक १४ /१२/२०१२ या शुभ मुहूर्तावर , कंपनीने ( राम गोपाल वर्माची नाही ) सर्वसाधारण वार्षिक पार्टी ठवली होती . “ AREA 51 “ येथे साम्ग्रसंगीताची सोय , अधिक नृत्यास परवानगी + नि फुकट मदिरापान पण असल्यामुळे , कंपनीचे मन आम्हाला मोडवेना आणि आलेला थकवा थोडक्यात Hangover ,“over“ करण्यासाठी शनिवार पाहिजे होता .त्यामुळे त्यासाठी शनिवार निघणे थोडे कठीणच होते .
२.शनिवार रात्री निघायचं हा प्लान ठरला , पण …....
प्रतीक was invited for party . :P.
असो झाकली मुठ सव्वा लाखाची . त्या नंतर रविवारी पहाटे शार्प ५ वाजता पुण्यातून निघायचे ठरलं .
गाडीची अरेंजमेंट हि arrange marriage इतकीच कठीण आहे . पण समीरने ते बरोबर अरेंज केल .
शुक्रवार दिनांक १४ डिसेंबर ( ठिकाण : 'AREA 51' )
पार्टीत आम्हाला परत १ कदा ५ मिनटात आढावा घायचा होता .
मी नि माझा १मित्र पार्टीत साधारण ८.३० वाजता पोहचलो . Area 51 हा आमच्यासाठी गूढ ,अगम्य प्रदेश होता . मनगटावर डिस्कोचा शिक्का उमटवून , मानगुटीवरचे डिस्कचे भूत उतरवायला
आम्ही शिरलो . पार्ट्यानमधल्या पोरी पाहून ,ह्या पोरी आपल्याच ऑफिसमधल्या का ? कि ऑफिस मध्ये ह्याच पोरी असतात का ? असले प्रश्न पडले आणि त्यांना पाहून जगात चमत्कार घडतात यावर माझा विश्वास बसला .
पार्टीत जो गोंधळ घालायचा तो घातला . फक्त समीरचं कौतुक वाटल , सवाई गंधर्वला हजेरी लावून तो डिस्क मध्ये आलेला होता .मेहफिलीच्या रागापासून ते डिस्क च्या बिट्स पर्यंत ,या सर्वां साठी १ मुक्त नि कलात्मक मनाची गरज असते .
त्या वेळेस सुरेश भटांची १ ओळ आठवली .
“ रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा , गुंत्यात गुंतुनी साऱ्या पाय माझा मोकळा "
पार्टीचा रंग उधळून आम्ही घरी आलो
शनिवार दिनांक १५ डिसेंबर
फोनाफोनी झाली , सकाळी ४.१५ वाजता मला कोथरूड वरून पिक अप करणर होते. ५ वाजता पुणे सोडायचं ठरलं .
रात्री भरत माझ्याकडेच आला ,आणि लग्न नि पोरी या विषयावर बोलता बोलता रात्रीचा १ कधी वाजला ? कळलाच नाही .तसा हा न संपणारा विषय .सगळ्यांच सर्वज्ञात असलेला विषय .सकाळी ३.४५ गजर लावून झोपी गेलो .
रविवार दिनांक १६ डिसेंबर
सकाळचे प्रातः विधी आटपून तयार झालो . त्यावेळेस घडल्यात बरोबर ४.३० वाजले होते .
समीर नि भूषण ला कॅाल करून झालेत . आणि गाडी बरोबर ठरल्याप्रमाणे ५.१५ वाजता ४५ मिनिटे उशिरा आली .
मग तुषारला just सातारा रोडवरच फक्त ४ km आतून कोंढव्या वरून गाडीत घातलं नि निघालो .
( मी व्याकारणाचा गळा घोटला आहे , माहित आहे पण …..)
त्यानंतर बरोबर ०६.०५ मिनिटांनी पुणे सोडले .
फुटकळ विनोद झाले , चहा झाला , एकमेकांचे पाय ओढून झाले , आणि मध्ये बायोब्रेकहि झाला.
गाडीने सातारा सोडलं नि आम्ही कास पाठराकडे निघालो .
कास पठारावर ना फुल ना पान , सगळा कास पठार शुष्क पडलेला.
सगळी कडे कुंपण बांधलेली . काही महिन्यांनपूर्वी फुलांनी बहररेला , माणसांनी गजबजलेला अशा पठारावर आमच्याशिवाय कोणीच नव्हतं. आमचे हि कॅमेरे बॅगेतच होते. सौंदर्य हे चिरकालीन नाही , आणि सौंदर्यासाठी येणारे पण कायम साथ देत नाही हेच खरे .
त्यानंतर १५ वीस मिनटातचं आम्ही बामणोली ला पाहोचालो .
बामणोली म्हणजे " base village for Vasota trek “.
साताऱ्यापासून ३८ किलोमीटर वर .
मला तसे कांदे पोहे खायचे होते , त्या वरून जरा फिरकी पण घेतली गेली .
पण कांदे पोह्यांची भूक मिसळवर भागवली .
वासोट्याला जाण्यासाठी , बामणोलीला वन खात्याची परवानगी घ्यावी लागते .
परवानगी घेण्यासाठी तुषार नि समीर रवाना झाले .
परवाना सरकारी खात्यात (न खाता/पिता ) मिळणं , हा कलीयुगातला चमत्कार म्हणव लागेल .
असो परवानगी साठी खालील गोष्टी लागल्यात .
१. प्रत्येक माणसासाठी प्रवेश फी :- रुपये ३० ( ३० * ७ = २१० )
२. बोटीची प्रवेश फी :- रुपये १५०
३. कॅमेरा फी :- ४० रुपये /कॅमेरा (४०*४ =१६०)
४. pan कार्ड ,ओळखीच्या किंवा नात्यातल्या लोकांचे नंबर.
आणि त्या व्यतिरिक्त ३००० रुपये बोटीचे .
आमच्या ६ लोकां व्यतिरिक्त , नाही हो नाही नि परत हो करत आमच्या गाडीचा ड्रायव्हरपण आला .
कॅमेरे निघाले , कोणी कॅमेराच्या पुढे तर कोणी कॅमेराच्या मागे .
बोट येई पर्यंत १०.३० वाजले . बोटीत बसलो . आम्ही फक्त बोटीत ८ लोक , ६ आम्ही + १ आमच्या गाडीचा ड्रायव्हर + १ बोटीचा ड्रायव्हर .
पाणी किती खोल , कोणाला पोहता येत /येत नाही , किती वेळ लागतो असे नेहमीचेच प्रश्न त्या नावाड़याला विचारून घेतले . जाताना एका ठिकाणी त्रिवेणी संगम आहे ,असं तो म्हंटल खरा , पण कोयना back water मध्ये त्रिवेणी संगम , काही झेपलं नाही . काही न झेपलेले प्रश्न सोडून दिलेले बरे , त्याने वाद टाळता येतो , हे अनुभवाने आलेले शहाणपण आहे .जवळपास ११.४० ला आमची बोट किनाऱ्याला लागली . तिथे पाण्यात जळू आहे हे समजलं. महाराष्ट्रात जळू नाहीsss !.अशी काहीशी माझी प्रतीक्रिया होती . आणि माझ्या ( अति) शहाणपणाची झालर गळून पडली .
हं त्यानंतर , घेतलेली परवानगी चौकीवर दाखवून , आम्ही जंगलात शिरलो . साधारण घडाळ्यात ११.४५ किंवा १२ वाजले असतील .जंगल दाट होते .दुपार असून सुद्धा गर्द झाडीमुळे उन्ह भासत नव्हते.
रस्त्यात ओहळ लागलेत , पावसाळ्यात नक्कीच ते ओढे असावेत .
अशाच १ का ठिकाणी १ छोटस मंदिर होत . हनुमान आणि गणपतीचे . ४ हि बाजूला २ फुटाची दगड ठेवून बनवलेली भिंत आणि छत नसलेले . कदाचित म्हणूनच झाडवेलींचे छत त्याच्या डोक्यावर असेल . मग पुन्हा कॅमेरात आणि मनात ते क्षण टिपून पुढचा प्रवास चालू झाला . कुठे तरी झाडत हळद्या पक्ष्याचा आवाज एकू आला . त्याची छबी कॅमेरात टिपण्याचा अयशश्वी प्रयत्न हि झाला.आता वाट जर खडतर ,चढण असलेली झाली होती आणि बॅग जड असल्यामुळे जर थकवा पण लागत होता .
१ गोष्ट चांगली होती चढताना , जोगो जागी दिशा दर्शवणारे फलक होते . एक सव्वा तास झाल्यावर आम्ही एका ठिकाणी थांबलो . मी तर जाम थकलो होतो . जरा आराम करून ,glukon D पिऊन बर वाटल. तिथून २ रस्ते होते , १ वासोटा किल्ल्याकडे जात होता नि २ रा नागेश्वर , नि एकमताने आम्ही नागेश्वरचा रस्ता धरला . माझ्या खांद्यावरची जवाबदारी तुषारने त्याच्या खांद्यावर घेतली . म्हणजे माझी बॅग त्याने घेतली . आणि मी मस्त चालू लागलो , ते हि सर्वात पुढे . आम्ही सलग १ तास चालत होतो , आणि झाडीतून बाहेर आल्यवर लक्षात आले , आम्ही डोंगराच्या माथ्यावर होतो . समोर डोंगरांची रांग , खोल दरी आणि दूर नागेश्वरची गुफा दिसत होती .
डोंगराच्या कडेकडेने जात दुसऱ्या डोंगरावर नागेश्वरच्या इथे जायचे होते . डाव्या हाताला दरी नि उजव्या हाताला पर्वत ,अगदी डोळे गरगरतील असं दृश्य . चालत चालत १दाच आम्ही २.३० वाजता नागेश्वारला पाहोचलो.दुपारच्या उन्हात पण मस्त थंड वाटत होतं त्यात वार हि होते . परत कॅमेरात ते क्षण टिपून जेवयला बसलो . मेथीचे पराठे , टोमटो सॅास , चटणी ..मस्त जेवण झाल . काही जणांनी दुपारची वाम कुशी पण घेतली . एवढ्या शांततेचा भंग करणारी १च गोष्ट होती , ते म्हणजे आमच्या ड्रायव्हरचं घोरण .
त्यानंतर परतीचा प्रवास चालू झाला . थोडा रस्ता हि चुकलो ,पण परत वाटेवर आलो . ( तस हे आम्हाला जीवनात नि ट्रेकवर सवयीचे झाले आहे ) . माझा पाय मुरगळा , तरीसुधा उसन अवसान आणून , मी किती इ 'strong' आहे हे दाखवत मी चालत होतो . पण शेवटी relief spry मारूनच घेतला. काही लोक थकले होते पण चालत होते .उतार असूनसुद्धा वेळ लागत होता , पाय थकले होते नि मन हि असेल .
परत १दा हळद्या पक्षाचा आवाज आला , जागा हि तीच होती . संध्याकाळ होता होता आम्ही परत नावेपाशी आलो . घडाळ्यात ५.३० वाजले होते. ताक पिऊन परत होडीवर(मध्ये) ( जे काही असेल ते ) बसलो . आमचं सोबत १ मावशी पण होत्या ,त्याच त्या ' ताक ' विकणाऱ्या. होडीत बसल्यावर
त्यांच्या लक्षात आले , त्यांच्या पायावर जळू होता ,आणि जळू पाहण्यचे भाग्य आमच्या नशिबी आले.
आमच्या यांत्रिक नावेला आणखी १ नाव जोडली ,ती त्यांच्या मुलाची होती , जी हाताने वल्व्हवावी लागायची .सूर्य डोंगरापर गेला होता , संधी प्रकाश पडला होता आणि मधोमध चालणारी आमची नाव .
Its heaven . तोच नदी किनारी पाणी प्यायला रानगवा आला होता .आम्हाला पाहताच तसाच तो मागे फिरला . अर्थात अस ( माणसांचे )मागे फिरन ,सवयीचे झाले असल्यामुळे घडलेल्या प्रसंगाचे काही वाटले नाही . नाव पुढे निघाली .पुढे
त्या मावशी मध्ये १का ठिकाणी उतरल्या.तिथे फक्त २च घर होती . ते हि जंगलात …. खरच माणसाला जगण्यासाठी किती पैसा लागतो किंवा खुश राहण्याची किमत तरी किती ???
हे प्रश्न अजून हि माझ्यासाठी अनुउत्तरीतच आहे . अंधार दाटला होता .आणि डोक्यावर दिसत होती ती चंद्रकोर . त्या चंद्रकोरीला पाहून कोणाकोणाची आठवण आली हे नका विचारू . शेवटी नाव बामानोलीच्या किनारी लागली . तिथेच चहा पिऊन आम्ही निघालो . कास → सातारा → NH4 . गाडी चालत होती . ड्रायव्हरची फालतू बडबड चालू होती .भूक पण जबरी लागली होती .एक ठिकाणी थांबून , मस्त मालवणी चिकन हाणल नि निघालो .
मधेच काय जोर आला , काय मस्ती आली त्या ड्रायव्हरच्या अंगात , गाडी पळवू लागला . २ ठिकाणी गाडी ठोकलीच होती . एकदाची गाडी पुण्यात आली , पहिल्यांदा तुषारला घरी सोडलं नि नंतर मला .माझ्या सोबत भरत पण होताच. घरी जाताच भरत झोपी गेला , मी अंघोळ करून पलंगावर पडलो होतो.
२ दिवसापूर्वी असाच ' area 51 ' ची पार्टी करून घरी आलो होतो . वेळ अशीच १२ साडे बाराची असेल . पार्टीमधला दंगा , नाच गाणे , तरीसुद्धा घरी आल्यवर १ प्रकारचा एकटेपणाच होता . सुख असते तरी काय ?
area 51 , party , दारू , पैसे कि माणस ( जी माझी नाहीत ) …
कि
वासोट्याचे जंगल , होडीतून पाहिलेला तो संधीप्रकाश किंवा ती चंद्राची कोर .
कि जंगलात पायावर जळू चढलेल्या त्या मावशी ….
मला अजून तरी ते माहित नाही , कालापरे ह्याही प्रश्नांची उत्तरे सुटतील .
पण १ मात्र खर ,आज ट्रेक वरून आल्यावर भारी वाटत होत. माझ जग म्हणजे ' area 51 ' नाही ते आहे माझ्या फोटोग्राफित , ट्रेक नि माझ्या कवितात …..
“ रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा , गुंत्यात गुंतुनी साऱ्या पाय माझा मोकळा "
by dhiraj bhandare
dhiraj.bhandare@gmail.com
प्रतिक्रिया
26 Dec 2012 - 3:46 pm | मालोजीराव
...असे उल्लेख करून धाग्याला 'पुनम पांडे' किंवा 'सनी लियोन' टच देणे टाळता आले असते.
26 Dec 2012 - 4:35 pm | नावात्_काय्_आहे
योग्य तो बदल करण्यात आला आहे .
26 Dec 2012 - 5:17 pm | मालोजीराव
धन्यवाद मालक ! महाराष्ट्रातले असंख्य ट्रेकर्स,भटके भटकंती सदरातील लेख त्यातील माहितीसाठी वाचतात...त्यात टीनएजर्स जास्त असतात...म्हणून बदल सुचवला....दिल पे मत लो :)
26 Dec 2012 - 3:52 pm | चाणक्य
जास्त पाल्हाळ न लावता, निसर्गाचं sterotype वर्णन न करता लिहिलेलं ट्रेक चं वर्णन आवडलं. आणि विशेष करून शेवट आवडला.
26 Dec 2012 - 3:59 pm | मालोजीराव
26 Dec 2012 - 4:36 pm | नावात्_काय्_आहे
https://docs.google.com/open?id=0B7x3xQF1KdPRU3prWTM1WkotSkU
26 Dec 2012 - 4:52 pm | गणेशा
अप्रतिम
26 Dec 2012 - 6:12 pm | मनराव
छान.... फोटो टाका कि राव......
27 Dec 2012 - 12:14 am | संजय क्षीरसागर
वाचायला मजा येते.
आणि हे ...
एकदम मस्त!
आता फोटो टाक.
27 Dec 2012 - 9:51 am | इरसाल
प्रॉडाँचा आवडता शब्द " शुद्धचिकित्सा" ;) हा इथे वापरावासा वाटत आहे.
27 Dec 2012 - 11:38 am | नावात्_काय्_आहे
संजय सर,
धन्यवाद , तुमच्या सूक्ष्म नजरेतून हि वाक्य सुटली नाही . खरी दाद हि तुमच्या सारख्या वाचकांची .
आभारी आहे .
मालोजीराव, इरसाल,चाणक्य and my friend ' Ganesha '
दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे .
24 Mar 2013 - 10:34 pm | कंजूस
Area 51 ते नागेश्वर हा विरोधाभास चांगला व्यक्त झालाय . trek म्हणजे long strenuous walk ,पायपिट ?
23 Apr 2013 - 12:03 pm | नावात्_काय्_आहे
आभारी आहे.
23 Apr 2013 - 7:26 pm | अग्निकोल्हा
कारण डोक्यावर उद्या ट्रेकला जायचय याच दडपण होतं. म्हणूनच निवांतपणा न्हवता, इतकच काय तुमचा ' area 51 ' चा फेरफटकाच मुळी ओढुन ताणुन केलेला होता मनापासुन न्हवता... पण ट्रेक ??? तो संपताना ठरवलेल्या संकल्पपुर्तीचा आनंद सोबत होता म्हणून मन तात्पुरते वर्तमानातच रमले होते, काहिसे निर्वीचार झालं होतं... म्हणून भारी वाटत होतं. ही अनुभुती तुम्हाला ' area 51 ' ने सुध्दा १००% मिळेल.
23 Apr 2013 - 11:54 pm | मुक्त विहारि
अजून लिहा..