कोल्हापूर

सलिल २४'s picture
सलिल २४ in भटकंती
25 Dec 2012 - 3:43 pm

1

shivling opp.wadi

opp wadi

shivalay

kalayogo kamble

dwar

shirol bhojan patr mandir

deep stambh

baheril nandi

mukhya dwar

shivalay

कोल्हापूर.कलानगरी.मी इथे गेलो आणि हरखून गेलो.मुख्य कारण मला येथे भेटलेली माणसे.जी काही भ्रमंती केली आज पर्यंत त्यात कोल्हापूरकर अतिशय आवडले.निदान मला तरी त्या तीन दिवसात अतिशय चांगली माणसे मिळाली.आपुलकीने वास्तपुस्त करणारी.काही माहिती विचारली तर लगेच मदत करणारी.जशी आधी पासूनची ओळख आहे अशी वागणारी.

महालक्ष्मी मंदिरामागे माउली लॉजवर उतरलो होतो.तिथले मालक आणि त्यांचे व्यवस्थापक श्री.काणे यांनी कोण कुठले याची चोकशी केली.मग म्हणाले आमच्या ओळखीचा रिक्षावाला देतो योग्य दरात तुम्हाला ठिकाणे दाखवील.मग रिक्षावाले बाबासाहेब भेटले.''साहेब उद्या बरोबर आठला तयार राहा.मी येतो''.मग दोन दिवस या माणसाने मला सर्व ठिकाणे जी मला पहायची होती ती आणि काही अशी जी सगळे लोक पाहतातच असे नाही,कारण त्यांना माहीतच नसते.तर ती ठिकाणे मला या बाबासाहेबांमुळे पाहता आली.

त्यात शिवालय-कैलासगडाची स्वारी मंदिर.या मंदिरा बाहेर बावीस फुटी अश्या दोन समया,दाराबाहेर बसलेला पितळयाचा एक टनी भरीव नंदी.पितळ्याची नक्षीकामयुक्त दारे.आत चांदीची सजावट.आणि गाभार्यात लावली आहेत चत्रा चित्र महर्षी कांबळे यांची तैल चित्रे.श्री कांबळे यांच्याबद्दल रिक्षावाल्यानी माहिती दिली ती ज्यांना माहित नाही त्यांच्याकरता देत आहे.कांबळे देवळात जात नसत.म्हणजे देव देव करणारे नव्हते.त्यांना शिवाजी महाराजांचे चित्र काढायचे होते पण राजा ना तर पहिले नाही मग कसे काढावे?या विचारात होते.त्यांना कुणी स्नेह्याने इथे आणले आणि सांगितले या देवाचा आशीर्वाद घे काही तरी नक्कीच सुचेल.त्यांनी पिंडीला हात लावून नमस्कार केला तर त्यांना ती थोडी नरम म्हणजे कुणा माणसाच्या त्वचे सारखी जाणवली.मग ते इथे नेहमी येऊ लागले.

nandi

rath

एक दिवस त्यांना स्वप्नात देवाने सांगितले तुला राजांचे चित्र काढायचे आहे आणि त्यांना तू पहिले नाहीस म्हणून अडलंय न मग बघ असे होते राजे.आणि त्यांना शिवाजी महाराज दिसले.त्यांनी लगेच चित्र काढले,लोकांना खूप आवडले.कालांतराने सरकारला पाठ्य पुस्तकात आणि सरकारी कचेर्यात लावायला राजांचे चित्र हवे होते.कोल्हापूरवासियांनी यांचे चित्र आग्रहाने पाठवले.अनेक चित्रात ते निवडले गेले.पण सरकारने यांना म्हटले कि हे चित्र आम्ही एका डच कलाकाराने राजाना समोर बसवून काढलेले चित्र आहे हॉलंड येथे त्याच्याशी जुळवून पाहू मग घेऊ.आणि दोन्ही चित्रे अगदी जुळली.मग सरकारने यांना काही कोट रुपये रोयलटी म्हणून देऊ केले ते यांनी घेतले नाही.म्हणाले मी राजाना पहिले नाही देवाने दाखवले मी कसे पैसे घेऊ.आपण पुस्तकातून पाहतो ते राजांचे चित्र इथे आहे.

rajyabhishekh

raje

एक महाभारतातील गीता सांगितली तो विश्वरूप दर्शन प्रसंग आहे त्यात रथाचे चित्र कांबळे यांनी काढलेले लावलाय. यातील रथ जसे आपण पुढे मागे होतो तसा आपल्याकडे फिरताना दिसतो.राज्याभिषेक प्रसंगाच्या चित्रात प्रत्येक माणूस स्पष्ट दिसतो आणि फक्त मासाहेब आपल्या हालचाली बरोबर मान फिरवताना दिसतात.तीच गोष्ट शंकराच्या गळ्यातील नागाची.जरूर पाहून या.या कांबळेचे सुपुत्र नेमके तेव्हा आले.रिक्षावाल्यांनी ओळख करून दिली.लगेच तो माणूस मला घरी घेऊन गेला.त्यांनी काढलेली चित्रे दाखवली.अगदी वडिलांसारखेच प्रतिभावान.खूप बोलले.मुघले आझमची पोस्टर कांबळे यांनीच काढली होती.

shankar

shivasamadhi

ती पाहायला राणी विक्टोरिया सुद्धा थबकून पाहत राहिली असे कळले.मग आणखी एक मंदिर पहिले.याचे वेगळेपण म्हणजे नंदी आत आणि शंकर बाहेर आहे.आणि गुरुचरित्रात कथा आलीय.त्या घरात गेलो.दोन्ही ठिकाणी त्यांचे वंशज भेटले.एक शिरोळ आणि वाडी समोर पलीकडे छोटे घर आहे तिथे आजी आजोबा आहेत.या दोन्ही घरात दत्तात्रयांनी दिलले शिवलिंग आणि हाताचा ठसाआहे.ठसा शिरोळ आणि लिंग वाडी समोरील तीरावर.

ju.kamble.

vanshaj

लांबलचक झाल्याने आवरते घेतो.आणि हो दावणगिरी डोसा खाल्ला.मुठीने तो करणारा माणूस लोणी सोडत होता डोश्यावर.सांबर चटणी हवी तेवढी.वेगळी चव आहे.खून पहा .येताना घेतलेली विंचू काटा चप्पल अजूनही करकर वाजतेय.

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

25 Dec 2012 - 4:33 pm | परिकथेतील राजकुमार

आमच्या आंतरजालीय ज्ञानेश्वराच्या सिंदबाद कोल्हापूरात ह्या लेखाची आठवण झाली.

छान केले आहेत लेखन. चित्रे लेखाच्या अध्ये मध्ये आली असती तर अजून छान लुत्फ उठवता आला असता.

सलिल २४'s picture

25 Dec 2012 - 7:45 pm | सलिल २४

धन्यवाद पराशेठ.तुमचा सिंदबाद वाचला.झक्क.मला खरच सगळेजण छान भेटले.राहून राहून आश्चर्य वाटण्या जोगे.फक्त संग्रहालय पाहायला गेलो तिथे wood land बूट नाहीसे झाले.मग शाहू पद्धतीची विंचू काटा चप्पल घेतली.अनवाणी गेलो त्यामुळे पाहत राहिला.मग त्याला सांगितले चोरी बद्दल तर त्याने तेथील अधिकारी असलेल्या मित्राला फोन केला.तो माणूसही मला म्हणाला जर तुमचे बूट सापडले तर तुम्हाला कळवतो पत्ता देऊन ठेवा.पण मिळणे कठीणच आहे.काही खाताना हि मालक लोक विचारीत,काय साहेब अजून वाढू का?आवडले नाही का?अहो रंकाळ्यावर चहाची गाडी आहे तिथेही हाच अनुभव.चंद्रकांतजींच्या कडे चित्र पाहायला गेलो.तिथे त्यांच्या वृद्ध पत्नी होत्या.कोण? कुठून आलास?.मग चक्क तासभर गप्पा मारीत होत्या.मग अजून प्रदर्शनात न लावलेले चंद्रकांतजींकांतजींचे शेवटचे पेंटिंग दाखवली.ते घालत असलेले कपडे,त्यांचे पाईप ,काठ्या आवर्जून दाखवली.तुला कुठले आवडले पेंटिंग?मी म्हटले सूर्यकांतजी आणि सुलोचना बाईंचे.यावर हसून म्हणाल्या अरे एक भाऊ आणि ती तर त्याची हिरोईन होती न.असा तासभर कधी गेला कळलाच नाही.उसाच रस प्यायला गुऱ्हाळावर त्याने पैसेच घेतले नाही.बहुदा नशिबातले उत्तम दिवस होते.हे हि लिहिणार होतो पण खूप मोठ झाल असत म्हणून लिहिले नाही.तुमच्या लिखाणाचे अजूनही दुवे असतील तर द्या.तुमच्या राज्यात चक्कर असतेच.काही अपुरे लेख पुरे केलेत का?नवे हि काही आहे का?ते पहायला..बाकी चित्र आणि लेख यांची सांगड अजून घालता येत नाही.तेव्हढे सांभाळून घ्या.

वेगळ्या कोल्हापुरबद्दल माहिती,धन्यवाद.

तो पितळी नंदी चोरीला जाउ नये ही त्याच्याच चरणी प्रार्थना. सांभाळ रे स्वताला.

सलिल २४'s picture

25 Dec 2012 - 7:08 pm | सलिल २४

अगदी मनातले बोललात.

समयांत's picture

25 Dec 2012 - 7:08 pm | समयांत

एकंदरित कोल्हापूरबद्दल माहिती कमी पण जी माहिती सांगितलीत ती आवडली.
आणखी लिखाण करा, वाचायला आवडेल कोल्हापूरबद्दल. व्यक्तिशः तरी कोल्हापूर मला आवडत नाही ;)

सलिल २४'s picture

25 Dec 2012 - 8:01 pm | सलिल २४

अहो मी फक्त एकदाच गेलो तिथे.पण न विसरता येण्या सारखा अनुभवहोता.तिथला दावणगिरी डोसा आणि आप्पे असा एक पदार्थ लहान ट्रे मध्ये लहान लहान टेबल टेनिस चेंडू सारखा असतो तो हि चाखून पहा मस्त होता.दोन्ही बरोबर चटणी सांबार जास्तीचे घेऊ शकता.बटाटे वडे मात्र नाही आवडले.मसूर उसळ भाकरी.आणि पन्हाळ्यावर भाकरी आणि ठेचा.तो ठेचा तर मला चिमूटभर दोन भाकर्यांना पुरला.नरसोबाच्या वडील जाताना संजय धारिवाल या उद्योगपतीचा बंगला बाहेरून पहा.सगळ्या कुंपणाला वीज प्रवाहित केलीय.चार पाच अलिशान गाड्या ज्यात सचिन तेंडूलकर याच्याकडून घेतलेली फेरारी दिसली.हे सर्व त्या रिक्षावाल्याने सांगितले.आणि बंगल्यातच .हेलीप्याड आहे.कधी गेलेत तर बाबासाहेब पाटील यांच्या रिक्ष्यातून फिरा.वाजवी दारात सर्व स्थानांची इथंबूत माजीतीही मिळेल.त्यावेळी त्यांचा नंबर घेतला तो देत आहे.९९६०१२३१२८.

सस्नेह's picture

25 Dec 2012 - 9:42 pm | सस्नेह

संजय धारिवाल नव्हे, संजय घोडावत.
स्टार इंडस्ट्रीवाले. आणि त्यांचे संग्रहालय बघाल तर थक्क व्हाल. सालारजंगच्या खालोखाल आहे.

सलिल २४'s picture

25 Dec 2012 - 10:40 pm | सलिल २४

एकदम बरोबर.ते जरा विसरायलाच झाल.चूक मान्य.त्यांचे संग्रहालय कुठे आहे ते माहित नाही.पुढील वेळी नक्की पाहीन.धन्यवाद.

सस्नेह's picture

26 Dec 2012 - 9:09 pm | सस्नेह

पुढील वेळी नक्की पाहीन.
नाही पाहणार. ते आम जनतेसाठी खुले नसतेच मुळी. आम्हाला 'ऑन ड्यूटी' असल्यामुळे पहायला मिळाले.

सलिल २४'s picture

25 Dec 2012 - 10:40 pm | सलिल २४

एकदम बरोबर.ते जरा विसरायलाच झाल.चूक मान्य.त्यांचे संग्रहालय कुठे आहे ते माहित नाही.पुढील वेळी नक्की पाहीन.धन्यवाद.

अभ्या..'s picture

26 Dec 2012 - 3:29 am | अभ्या..

काय आवडत नाही हो तुम्हाला व्यक्तीशः ?
सांगा तरी. उगा आपलं व्यक्तीशं: बिक्तिशः काय काढू नगा.
नीट्ट सांगा ह्ये आवाडलं नाय म्हणून. हैकानैका.

दावणगिरी डोसा चा पत्ता देऊ शकाल काय ? आम्हाला गेल्या ट्रीपच्यावेळी मिळाला नव्हता.

अनुप कुलकर्णी's picture

25 Dec 2012 - 10:51 pm | अनुप कुलकर्णी

अर्धा शिवाजी पुतळा (जुने लोक "निवृत्ती चौक" असेही म्हणतात)

सलिल २४'s picture

26 Dec 2012 - 2:07 am | सलिल २४

धन्यवाद.

महलक्ष्मी मंदिराच्या मागेही दावणगिरी डोसा, लोणी डोसा मिळतो. जेव्हा जातो तेव्हा तिथेच खातो.

सस्नेह's picture

26 Dec 2012 - 9:12 pm | सस्नेह

हल्ली कोल्हापुरात कोणत्याही गजबजलेल्या कोपर्‍यावर 'दावणगेरे' लोणी डोसा गाडीवर मिळतो.

सलिल २४'s picture

25 Dec 2012 - 10:45 pm | सलिल २४

मला लक्ष्यात नाही.पण जिथे खाल्ला त्या माणसाने हा प्रकार तिथे लोकप्रिय केला आहे.बरेच मराठी कलाकार तिथे येत असतात.वर बाबासाहेब पाटील यांचा नंबर दिलाय.त्यांनी मला तिथे नेले होते.त्यांना फोन करून पहा.

..."मुघले आझमची पोस्टर कांबळे यांनीच काढली होती. ती पाहायला राणी विक्टोरिया सुद्धा थबकून पाहत राहिली ".......

मुगले आझमची (१९६०) पोस्टर्स व्हिक्टोरिया राणीने (१८१९ - १९०१) कशी बघितली, हे समजले नाही. तसेच कांबळे यांना काही कोट देऊ करणारे 'सरकार' कोणते? ब्रिटिश की भारत सरकार? चित्रकार कांबळे हे व्हिक्टोरिया चे काळी होते का?

सलिल २४'s picture

26 Dec 2012 - 1:27 am | सलिल २४

अहो सर तो रिक्षावाला जे सांगत होता ते लिहिलंय.माझा काहीच अभ्यास नाही त्या बाबतीत.पण जे चुकले त्याबद्दल माफी असावी.मी फक्त जे पाहिले आणि आइकले ते मांडले.आपला अधिकार मोठा आहे.चूक दाखवल्या बद्दल आभार.मंदिरातही काही माणस सांगत होती.मी फक्त श्रोता होतो.

पिशी अबोली's picture

25 Dec 2012 - 11:44 pm | पिशी अबोली

रंकाळ्याच्या जवळ एक बसवानंदी नावाचं देऊळ आहे.तिथे नंदी आत देवळात आणि पिंडी बाहेर असा प्रकार आहे.काही वर्षांपूर्वी मी पाहिला होता..नंदी सुन्दर आहे. दगडी असावा.त्याविषयी माहिती,फोटो वगैरे असल्यास कॄपया टाकावेत..

किसन शिंदे's picture

25 Dec 2012 - 11:58 pm | किसन शिंदे

कोल्हापुरबद्दल नवीन माहिती मिळाली तुमच्यामुळे.

कोल्हापूर.कलानगरी.मी इथे गेलो आणि हरखून गेलो.मुख्य कारण मला येथे भेटलेली माणसे.जी काही भ्रमंती केली आज पर्यंत त्यात कोल्हापूरकर अतिशय आवडले.निदान मला तरी त्या तीन दिवसात अतिशय चांगली माणसे मिळाली.आपुलकीने वास्तपुस्त करणारी.

अगदी..अगदी.

आमच्या अन्याकडे पाहिल्यावर तर याची खात्रीच पटते. :)

येडाखुळा's picture

26 Dec 2012 - 12:00 am | येडाखुळा

..."मुघले आझमची पोस्टर कांबळे यांनीच काढली होती. ती पाहायला राणी विक्टोरिया सुद्धा थबकून पाहत राहिली "......ही माहिती बरोबर आहे. ते एक महान पोस्टर आर्टिस्ट होते. चित्रगुप्त, खालील लिन्का पहा:
http://shamaaemahafil.blogspot.in/2012/08/blog-post_12.html

राणी साहेब एलिझाबेथ द्वितियः http://en.wikipedia.org/wiki/Elizabeth_II

सलिल २४'s picture

26 Dec 2012 - 2:04 am | सलिल २४

आभार.

सुरेख माहिती मिळाली. साधारण १२ वर्षांपुरवी मी कोल्हापूरला गेले होते... खुपच छान ठीकाण आहे... तेव्हा आम्ही एक "रामलींग" नावाचे ठीकाण पाहिले होते. तेथे महादेवाची अतीशय सुंदर अशी स्वयंभु पींड आहे... जरुर भेट द्यावी असे स्थळ...

सलिल २४'s picture

26 Dec 2012 - 1:56 am | सलिल २४

आपण म्हटल्या प्रमाणे फोटो टाकला आहे.अजून खूप शिकायचं इथे. त्यामुळे फोटो तुम्हाला दिसतोय का नाही माहित नाही.बहुदा हाच असावा.आत नंदी आणि बाहेर शंकराची पिंडी असे हे देऊळ पहिले प्रथमच पाहिले .

किसन शिंदे's picture

26 Dec 2012 - 2:00 am | किसन शिंदे

संपादित करून फोटो दृश्य केला आहे.

जेनी...'s picture

26 Dec 2012 - 2:06 am | जेनी...

बर.

५० फक्त's picture

26 Dec 2012 - 8:22 am | ५० फक्त

चला लागले कामाला सा आणि सो.संपादक.

अरे वा .खरच आभार.

जेनी...'s picture

26 Dec 2012 - 2:23 am | जेनी...

उत्तम .
कोल्हापूरचं दर्शन , आणि तिथल्या लोकांची मनोभावे केलेली भक्ति आवडली .
साधं सरळ आणि सोप्प्या भाषेतलं लिखान .

आता अवांतर : सचोविस काका असं प्रत्येकाला धन्यवाद वेगवेगळ्या प्रतिसादात
लिहित बसलात तर धाग्यावर तुमच्याच प्रतिक्रिया जास्त दिसतायत म्हणुन मागे लागतिल
मिपाकर . त्यापेक्षा चार्पाच प्रतिसादाना एकाच प्रतिसादात उत्तर द्यावो .
नाय .. होतं काय कि .. काहि माझ्यासारखे लोक असतात वो ज्यांना प्रतिसाद वाचायलाहि
मज्जा वाटते . मग आमी आपलं आशेनं नव्या प्रतिसादावर क्लिक करायचं आन तिथं
तुमचं ' धन्यवाद ' तोंडावर आदळायचं :-/ नव्हं ते आदळतयच .
तवा हे टाळा सचोविस काका .
आणि चुकलं माकलं असल माझं तर लान पूतनी किवा मोठी .. तुमच्या सुइनुसार
कशीबी पूतनी सम्जुन माफ करा .

तुमी २२ ते २६ वयोगटात असाल तर भैन समजुन माफ केलात तरि हरकत नै .

लेख आवडला .

५० फक्त's picture

26 Dec 2012 - 8:24 am | ५० फक्त

माज्याशी मयत री कर्नार का ? असे व्यनि बरेच आलेले दिसतात.

बॅटमॅन's picture

26 Dec 2012 - 8:29 am | बॅटमॅन

+११११११११११११.

काय गं पण्णासराव म्हंतायत ते बरोबर है का =))

जेनी...'s picture

26 Dec 2012 - 9:31 am | जेनी...

इश्श्य .

अय्या पन्नास राव तुम्हाला कसं कळ्ळं ते ?? :D

:P

अभ्या..'s picture

26 Dec 2012 - 2:55 am | अभ्या..

सलील दादा कसंय माह्यतीय काय?
ह्ये कोल्हापूरचं कलाविश्व समजून घ्यायला एक तर आर्टीस्ट व्हावं नाय तर ववाळून टाकावं.
त्याशिवाय न्हाय समजायचं त्ये.
कलामहर्षी चे पेण्टींग बघायला आम्ही कायम जायचो. डेप्थ जाणवायची. कष्ट नाही. :(. कोल्हापूरला कलापूर म्हणतेत ते अगदी खरय पण ते जाणवायला पंचगंगगेचे पाणीच पचवावे लागते. मोठमोट्या आर्टीस्ट्कडे उमेदवारी करायसाठी दिवसेंदिवस थांबावे लागायचे. आजकालच्या मुलांना ते जमायचे नाही. :(
तरीही अनंत खासबागदार, सुहास कद्रे, संजय शेलार सारख्या अनेक कलावंतांनी आणि कलानिकेतन सारख्या शिक्षण संस्थांनी आजही हा लौकिक टिकवला आहे. आम्हालाही त्याचा अभिमान आहे.
आणि मुख्य म्हण्जे विंचू़काटा चप्पल ती कुरुंदवाडी. ती कोल्हापुरी नाही. :(

चित्रगुप्त's picture

26 Dec 2012 - 3:13 am | चित्रगुप्त

ऐकीव माहितीची आधी स्वतः शहानिशा करून मगच ती लेखात टाकणे केंव्हाही बरे. अश्याने लेखाचे गांभीर्य आणि विश्वसनीयता तर वाढतेच, शिवाय स्वतःलाही एक शिस्त लागते.

सुहास..'s picture

26 Dec 2012 - 9:40 am | सुहास..

ईंटरनेट हिंदुनी ईंटरनेट हिंदुसाठी काढलेला धागा ;)

बाळ सप्रे's picture

26 Dec 2012 - 9:48 am | बाळ सप्रे

वेगळी चव आहे.खून पहा

बाप रे!!

जोतीबा डोंगरी महलक्ष्मिच्या दारी
डोक्यावरी फेटा आणि गळ्यात साज हा भारी
जगातहो जगात भारी, कोल्हापुरी ..............

ह भ प's picture

26 Dec 2012 - 1:29 pm | ह भ प
अमोल केळकर's picture

26 Dec 2012 - 3:06 pm | अमोल केळकर

खुप छान

अमोल केळकर
मला इथे भेटा

पिशी अबोली's picture

26 Dec 2012 - 8:18 pm | पिशी अबोली

येस्स्स..तोच तो..भारी..खूप दिवसांनी दिसला..धन्यवाद.. :)

पद्मा गेस्ट हौस म्हणून आहे, भवानी मंडपापासून जवळच. तिथले मटन ताट उत्तम असते- क्वांटिटी उत्तम, विशेषतः तांबडा आणि पांढरा सढळ हाताने वाढल्या जातो, तब्येत खूष!.