मोदींनी गुजरातच्या निवडणुका जिंकल्या आणि मोठ्या फ़रकाने जिंकल्यात. मोदी गुजरातच्या निवडणुका का जिंकतात? त्यांच्यामुळे त्यांची पंतप्रधानपदाची दावेदारी मजबुत होते का? ह्यावर थोडी चर्चा करुयात.
मोदींचे गुजरात सरकार वर्षाला १५००० कोटी रुपये हे स्वत:च्या कामाच्या जाहिरातबाजीसाठी खर्च करते. जाहिरातबाजी सरकारी कामांची असते पण त्यायोगे श्रेय मोदींना दिलं जातं आणि त्यांची प्रतिमा मोठी होत जाते. गुंतवणुकदार आकर्षित करण्यात येणाऱ्या ह्या जाहिरातबाजी कॅंम्पेनचा मोदींच्या प्रतिमानिर्मीतीत मोठा हिस्सा आहे. ह्या जाहिरातबाजीचा परिणाम पक्षाच्या काडरवर आणि शहरी मध्यमवर्गीयांवर होणे अपेक्षित आहेच. त्यातुनच ह्या वर्गात मोदी पंतप्रधान बनावेत अशी भावना निर्माण होत चाललीय.
नुसत्या आपापल्या राज्याच्या निवडणुका जिंकणे आणि विकास करणे हा जर क्रायटेरीआ ठरवला तर मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान आणि बिहारचे नितीश कुमार हे दोघेही दावेदार ठरतात. अगदी प्रतिकुल परिस्थितीतुन ह्या दोघांनी त्यांची बिमारु राज्य पुढे आणली. तसेच ते वादग्रस्त नाहीयेत. अशा परिस्थितीत मोदींना पंतप्रधान पदाचे दावेदार रालोआ कशी जाहीर करु शकते?
मोदींना उघडपणे नेतत्व देण्याचा दुसरा धोका म्हणजे मोदींचा इतर राज्यात फ़ार मोठा करिश्मा नाहिये, उलट तिथे त्यांची प्रतिमा खराब आहे. परराज्यात त्यांच्या विरुद्ध मुस्लिम मतदार एकगठ्ठा कॉंग्रेसच्या (किंवा युपीमधे समाजवादी पक्षाच्या) बाजुने जमतील. गुजरात मधे मुस्लिमांनीही मोदींना मतदान केलं..इतर राज्यात हे शक्य होणार नाही बहुतेक. गेल्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेला त्यांनी जिथे जिथे प्रचार केला त्या बहुतेक ठिकाणी युतीचा पराभव झाला. मो्दींना पंतप्रधानपदासाठी प्रमोट करणे म्हणजे सगळ्या सेक्युलरवादी मतांना/पक्षांना एकत्र जोडण्यासारखं आहे.
तिसरा धोका म्हणजे रालोआ मधे मोदींचे नेतृत्व सर्वमान्य होणं शक्यच नाही. भाजपात होईल एखाद्यावेळेस, पण रालोआत अशक्यच आहे. रालोआकडुन मान्यता मिळावी म्हणुनच हल्ली मोदींनी मुस्लिमांना आपल्या जाहिरातबाजीचा भाग बनवलं आहे. काही दिवसांपुर्वी आयबीएन लाइव्ह वर गुजरातचे मुस्लिमांनी मोदींवर कसा विश्वास दाखवायला सुरुवात केलीय ह्याच्या जाहीरातबाजीचा प्रोग्राम झाला ह्या निवडणुकीतुन तर ते स्पष्टच झाले. प्रसारमाध्यमातुन आता ह्या गोष्टीची खुप जाहीरातबाजी मोदी घडवुन आणतील. पुढील १ वर्षात मुस्लिम-मोदी दोस्तीच्या खुप कहाण्या वाचायला मिळतीलच...नाही मिळाल्या तर मोदी पंतप्रधान होणे अशक्यच आहे.
प्रतिक्रिया
21 Dec 2012 - 11:58 am | तर्री
कोंग्रेस ला हरवणे सोप्पे नाही.
राहुल की चिडू - चिदंबरम हीच समस्या.
21 Dec 2012 - 12:01 pm | घाशीराम कोतवाल १.२
मोदी गुजरातच्या निवडणुका का जिंकतात?
कारण मोदि निवडणुक लढवितात म्हणुन जिंकतात
त्यांच्यामुळे त्यांची पंतप्रधानपदाची दावेदारी मजबुत होते का?
माहित नाही ब्यॉ बाकी होत आसल तर होउ दे आपल्याला काय फरक पडतो
बाकी मोदी निवडुन आले तर सेक्युलरांच्या पोटात दुखु लागलच ह्यांचा एक अजेंडा मोदी हटाव पण निवडुन आल्यामुळे त्यांचा खुंटा बळकट झाला
21 Dec 2012 - 12:05 pm | परिकथेतील राजकुमार
अत्यंत विनोदी लेख.
=)) =)) =))
22 Dec 2012 - 4:56 am | अर्धवटराव
=)) =))
अर्धवटराव
25 Dec 2012 - 4:52 pm | वेताळ
मोदींचे गुजरात सरकार वर्षाला १५००० कोटी रुपये हे स्वत:च्या कामाच्या जाहिरातबाजीसाठी खर्च करते
गुजरात चे वार्षिक अंदाजप्रत्रक मग किती रुपयाचे आहे रे?
26 Dec 2012 - 7:07 am | प्रदीप
ह्या वाक्यात टायपो होता, असे लेखकाने सांगून त्यांना अभिप्रेत असलेली खरी संख्याही अन्य एका उत्तरात लिहीलेली आहे, ती पहावी. लेखातील असल्या काही तृटींची भोके दाखवून त्यावरच चर्चा करण्याने काही पदरात पडेल असे वाटत नाही. त्यापेक्षा, लेखकाने ह्याच धाग्यात अन्यत्र, लेखातील काही विधानांच्या पुष्ट्यर्थ दुवे दिले आहेत, तपशिलवार माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या अनुषंगाने काही टिपण्णी व्हावी.
21 Dec 2012 - 12:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> मोदी गुजरातच्या निवडणुका का जिंकतात ?
राज्याचा सर्वांगीण विकास, परदेशी कंपन्यांच्या गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण, शांतता, रोजगार, मुबलक वीज, आणि पाणी. इ.
>>> त्यांच्यामुळे त्यांची पंतप्रधानपदाची दावेदारी मजबुत होते का ?
अजिबात नाही. एका राज्याच्या निकालावरुन संपूर्ण देशाचे नेतृत्त्वपदाचे ते दावेदारी करु शकत नाही, असे वाटते. सतराशे साठ आघाड्यांचे नेतृत्त्व नरेंद्र मोदी कडे जाईल, ही गोष्ट खरी गोष्ट नाही. स्वतंत्र भाजपाची सत्ता आली तरी दिल्लीचे भाजप नेतृत्त्व मोदींना गादीवर बसवेल याचीही शाश्वती नाही. मोदी देशाचे नेतृत्त्व करतील अशी त्यांची प्रतिमा आहे, असेही नाही. नरेंद्र मोदींच्या विकासाच्या राजकारणाचे गाजर दाखवून मतदारांना फार तर आकर्षित करता येइल, पण सत्ता मिळेल याची तर अजिबात शक्यता नाही.
-दिलीप बिरुटे
23 Dec 2012 - 11:46 am | अनामिका
नरेंद्र मोदींच्या विकासाच्या राजकारणाचे गाजर दाखवून मतदारांना फार तर आकर्षित करता येइल, पण सत्ता मिळेल याची तर अजिबात शक्यता नाही.डॉक्टर नका काळजी करु तुंम्ही या देशात विकासाचे राजकारण करण्याचा मक्ता फक्त आणि फक्त युपिए आणि बारामतीकरांकडे दिलाय..बाकी कुणाला विकास करुन दाखवला तरी मते मागण्याचा अधिकार नाही...बाकी मोदींच्या पंतप्रधानपदाला भाजपाच्या आतूनच विरोध होईल हे मात्र नक्की...यात खरच काही शंका नाही...कदाचित बारामतीकरांनी आपले कुंपण बदलले तर त्यांना सुद्धा पंतप्रधानपद मिळू शकते...आमच्या पंतानी तशी ग्वाहीच दिली आहे तेंव्हा काळजी नसावी...
१० एक वर्षे मोदींच्या गुजराथ मधे वास्तव्य करुन आलेल्या माझ्याच वर्गमैत्रिणी महाराष्ट्रातल्या एकंदरित परिस्थितीला व मुलभुत सुविधांना शिव्या घालतात्...तेंव्हा मला स्वतःचीच दया येते.....एक मात्र खर गुजराथचा मतदार किती जागरुक आहे याचे दर्शन परक्या देशात राहून देखिल घडले..माझ्या मित्र परिवारातले बरेच गुजराथी निव्वळ मतदानासाठी गुजराथला भोज्जा करुन आले ...कौतुकास्पद आहे....मुळात त्यांचा मोदी जिंकून येणार याबद्दलचा आत्मविश्वास इतका दांडगा होता कि ते बघून आपल्या महाराष्ट्राच नशिब असे कधी फळफळेल असा विचार मनात आला...असो बाकी चालू दे
21 Dec 2012 - 12:17 pm | चिरोटा
का काय प्रॉब्लेम आहे? जर राहूल गांधी पंतप्रधान होवू शकतात असे कॉंग्रेसवाले म्हणू शकतात तर मोदी व्हायला काय हरकत आहे? देवेगौडा झाले,गुजराल झाले. गेले आठ वर्षे मनमोहन पंतप्रधान आहेत. मनमोहन स्वतःच्या ताकदीवर गोवा,मिझोराम राज्यात निवडून येवून सरकार बनवू शकतील? नाही पण ते पंतप्रधान आहेत.
21 Dec 2012 - 1:24 pm | प्रसाद प्रसाद
+१
22 Dec 2012 - 3:00 am | शैलेंद्रसिंह
मोदी हे असे व्यक्तित्व आहे ज्यावर त्याचे समर्थक खुप डोक्यावर घेतात आणि इतर खुप टीका करतात. त्यामुळे जोवर ते स्वतःच्या नेतृत्वाखाली २७२ जागा मिळवु शकत नाहीत तोवर त्यांच्यासाठी पंतप्रधानपद कठीण आहे..आघाडीच्या राजकारणात तर जवळपास अशक्यच वाटतंय.
23 Dec 2012 - 11:08 am | अनामिका
सहमत!
21 Dec 2012 - 12:22 pm | ऋषिकेश
मोदींनी गेल्या पाच वर्षात गुजरातचा 'कायापालट' केला आहे या दाव्यावर माझे अनुमओदन नसले (त्यांची विकासाची पुण्याई याआधीच्या सत्रात २००२ ते २००७ मध्ये होती हे मान्य मात्र २००७ नंतर काय?) तरीही मोदींना पंतप्रधान पदाचा दावेदार म्हणून बघायला आवडेल कारण त्यामुळे मतांचे सर्वाधिक ध्रुवीकरण होईल आणि काँग्रेस किंवा भाजप यांच्यात थेट सामना होऊन कोणत्याही एका राष्ट्रीय पक्षाला किमान २२५ जागांच्या जवळ जाता येईल आणि छोट्या पक्षांचा प्रभाव कमी होईल अशी आशा वाटते.
21 Dec 2012 - 12:40 pm | शैलेंद्रसिंह
ध्रुवीकरण सगळीकडे होईल...पण ते कॉंग्रेस भाजपा असं होईल का? युपी मधे त्याचा फ़ायदा सपाला होईल. बंगालमधे कम्युनिस्टांना होईल. कॉंग्रेस भाजपा थेट सामना राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, हिमाचल, उत्तराखंड, छत्तीसगड, गोवा झारखंड ह्याच राज्यात होऊ शकेल. महाराष्ट्, बिहार आणि पंजाबमधे भाजप स्वबळावर नाहिये. तरीही तिथे रालोआ-कॉंग्रेस ध्रुवीकरण नवीन नाहीये. मोदींना पंप्रपदाचा उमेदवार जाहीर केला तर बिहारमधे रालोआ राहणार नाही.
युपी, आंध्र, बंगाल, तामिळनाडु, केरळ, हरयाणा ह्या महत्वाच्या राज्यांमधे युपीए-रालोआ अशी लढत होणार नाही. जर खोलात जाऊन आकडेवारी पाहिली तर फक्त २२० जागांवर कॉंग्रेस भाजपा थेट लढतीची शक्यता आहे.
21 Dec 2012 - 1:47 pm | ऋषिकेश
ज्याज्या वेळी मोठ्या पक्षांचे नेतृत्त्व कमकुवत होते तेव्हा तेव्हा छोट्या पक्षांचे फावले आहे. जर भाजपा वि काँग्रेसला मोदी वि. गांधी ची जोड मिळाली तर छोट्या पक्षांना आपली जागा तयार करायला बरेच अधिक कष्ट पडतील. सार्या स्थानिक पक्षांचे आकडे कमी होतील. बव्हंशी छोट्यापक्षांकडे मतदार वळतो कारण राष्ट्रीयपक्ष त्यांना योग्य तो पर्याय देऊ शकत नाही. '
यामुळे एका पक्षाला बहुमत नाही तरी छोट्या पक्षांवरची डिपेन्डसी बरीच कमी होईल असे वाटते.
22 Dec 2012 - 10:29 am | क्लिंटन
मी ऑक्टोबर २०१० मध्ये गुजरातमध्ये महानगरपालिका निवडणुका झाल्या होत्या तेव्हा अहमदाबादमध्ये होतो.त्या काळात मी थोडेफार बाहेर जायचो तेव्हा रिक्षावाले, दुकानवाले इत्यादींशी निवडणुकांविषयी बोललो होतो.अगदी फार नाही पण निदान १० जणांशी मी बोललो होतो.त्यातील अगदी प्रत्येक माणूस "नरेंद्रभाईंनी" गुजरातसाठी चांगले काम केले असेच म्हणत होता.
नरेंद्र मोदी म्हटल्यानंतर समर्थक त्यांनी किती विकास केला याचे पाढे वाचणार आणि विरोधक ते कसे खोटे आहे हे सिध्द करायचा प्रयत्न करणार ही गोष्ट गृहितच धरायला हवी.तेव्हा या आकडेवारीत मला जायचे नाही आणि माझे नाव गुजरातमध्ये मतदारयादीतही नाही.तेव्हा मी मोदी समर्थकाला/विरोधकाला मत देऊही शकत नाही. तरीही एक गोष्ट सांगतो.
मी अमेरिकेत एम.एस करत असतानाचे माझे गाईड मुळचे इराणी असलेले एक सद्गृहस्थ होते.२०११ मध्ये जानेवारी महिन्यात "व्हायब्रंट गुजरात" समिटसाठी विविध विद्यापीठांमधील प्राध्यापकांना गुजरात सरकारने निमंत्रण दिले होते.त्यातूनच गुजरातमधील विद्यापीठे आणि अमेरिकेतील विद्यापीठे यांच्यात सहकार्य वाढावे,विद्यार्थी आणि फॅकल्टी एक्स्चेंज प्रोग्रॅम वाढावेत अशा स्वरूपाचा उद्देश होता.त्या समीटसाठी माझे प्राध्यापक गांधीनगरला आले होते.अहमदाबाद-गांधीनगर अंतर अगदी ३० किलोमीटरच आहे.तेव्हा एका रविवारी मी त्यांना भेटायला गांधीनगरला गेलो होतो.ती समीट झाली आणि त्या दरम्यान एका शिष्टमंडळाबरोबर त्यांनी नरेंद्र मोदींची भेटही घेतली.मागच्या महिन्यात त्यांच्या भारत भेटीदरम्यान मी मुंबईत परत एकदा त्यांना भेटलो आणि त्यांना गुजरातमध्ये निवडणुका होत आहेत हे सांगितले. तसेच निवडणुकांचे निकाल आल्यानंतरही मी त्यांना ते निकाल ई-मेलवर कळवले.त्यावर त्यांनी दिलेले उत्तर जसेच्या तसे इथे टाईप करतो:
Hi ***,
It was good to see you in Mumbai.Many thanks for the update on the election results.Narendra Modi is a heck of powerful man! Not everyone agrees with his politics but he appears to have accomplished some economic improvement for Gujarat.
आता ही सत्य परिस्थिती आहे की मृगजळ? मला माहित नाही.पण एक गोष्ट नक्कीच की लोकांना सध्या तरी ही सत्य परिस्थिती वाटते. राजकारणात कोणी थोड्या लोकांना सर्वकाळ फसवू शकतो, सर्व लोकांना थोड्या काळ फसवू शकतो पण सर्व लोकांना सर्व काळ फसवू शकत नाही.तेव्हा हे मृगजळ असेल तर लोकच मोदींना शिक्षा करतील.
21 Dec 2012 - 12:30 pm | श्रीगुरुजी
भाजपला लोकसभा निवडणुकीत किमान २२५ जागा मिळाल्या व गुजरात मध्ये भाजपला २६ पैकी किमान २० जागा मिळाल्या तर नक्कीच मोदी पंतप्रधानपदाच्या शॉर्टलिस्टमध्ये असतील. सध्या तरी त्यांच्यासाठी सुषमा स्वराज या एकमेव प्रतिस्पर्धी आहेत. अडवाणी राष्ट्रीय नेते असले तरी त्यांची इनिंग संपलेली आहे. शिवराजसिंग चौहान, रमण सिंग, मनोहर पर्रीकर इ. ना त्यांच्या राज्याबाहेर कोणीही ओळखत नाही. अरूण जेटली, नितीन गडकरी इं. ना जनाधार नाही. फक्त मोदी व सुषमा स्वराज हेच भाजपचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे एनडीएची सत्ता आली तर या दोघांपैकीच कोणतरी पंतप्रधान होईल. नितीशकुमारांचा मोदींना असलेला विरोध दिखाऊ आहे. सप किंवा बसप या पक्षांचा एफडीआयला जसा दिखाऊ विरोध होता तसाच हा दिखाऊ विरोध आहे. बिहारमध्ये आपली प्रतिमा मुस्लिमविरोधी होऊन त्याचा फायदा लालू, पास्वान इं. ना होऊ नये या एकमेव कारणासाठी ते मोदींना जाहीर विरोध करत असतात. प्रत्यक्षात नितीशकुमारांच पक्ष प्रादेशिक आहे व त्यांना स्वतःला किंवा त्यांच्या पक्षाला बिहारबाहेर अस्तित्व नाही. बिहारमध्ये भाजप व संजद यांच्या युतीला ३८ टक्के मते मिळाली आहेत, तर काँग्रेस, राजद व लोकजनशक्ती यांच्या एकत्रित मतांची बेरीज ३६ टक्के आहे. त्यामुळे नितीशकुमारांची १-२ टक्के मते फिरली तरी राजद्+लोजश्+कॉं ही युती सत्तेवर होऊ शकते. याची नितीशकुमारांना जाणीव असल्याने मोदींशी जाहीर मैत्री करून आपली १-२ टक्के मते घालविण्यापेक्षा त्यांना जाहीर विरोध करून आपण निधर्मी असल्याचा दिखावा करणे हेच मोदींच्या विरोधामागचे मुख्य कारण आहे.
22 Dec 2012 - 7:24 am | क्लिंटन
सध्या मोदींना पाठिंबा द्यायला कोण तयार होईल?शिवसेना आणि जयललितांचा अण्णा द्रमुक नक्कीच.अकाली दलालाही मोदी पंतप्रधान बनले तरी काही आक्षेप असेल असे वाटत नाही.तेव्हा भाजप+शिवसेना+अण्णा द्रमुक+अकाली दल जर २७३ नाही तरी २३० पर्यंत पोहोचू शकत असतील तर कदाचित आणखी ४५ खासदारांचे समर्थन कुठून तरी जुगाडता येईल. स्वतः अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना या पक्षांना मिळून २२२ जागा मिळाल्या होत्या (१९९८ मध्ये). २०१४ मध्ये त्यापेक्षा जास्त जागा या पक्षांना मिळायला हव्यात कारण वाजपेयींना २२२ ते २७३ हे अंतर कापणे जितके सोपे होते तितके मोदींना नक्कीच सोपे नसणार.
भाजपला गुजरातमध्ये १९९१ मध्ये २६ पैकी २२ जागा मिळाल्या होत्या.पक्षाला ती कामगिरी लोकसभा निवडणुकीत परत करणे शक्य झालेले नाही.१९९६ मध्ये १६, १९९८ मध्ये १९ तर १९९९ मध्ये २० जागा मिळाल्या.पुढे २००४ मध्ये १४ आणि २००९ मध्ये १५ वर समाधान मानावे लागले. २००२ च्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच लोकसभेत मतदान झाले असते तर २६ पैकी २४ जागा मिळाल्या असत्या. (या निवडणुकीचा तसा अॅनॅलिसिस अजून करायचा आहे).
मला वाटते की गुजरातमध्ये २० पेक्षा थोड्या जास्तच (२२-२३) जागा मिळाल्या तर मोदींचा दावा अधिक बळकट होईल. १९८७ मध्ये देवीलाल यांनी हरियाणात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या साथीने ९० पैकी ८५ जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले.पण १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील १० पैकी ६ च जागा देवीलालांना जिंकता आल्या.जर त्यांनी १० पैकी १० जागा जिंकल्या असत्या तर पंतप्रधानपदावर त्यांचा दावा अधिक ठोस असता का?अर्थात या जर-तरच्या गोष्टी झाल्या.पण पंतप्रधानपदावर दावा करताना आपले राज्य आपल्या हातातून निसटत नसेल तर अशा नेत्याचा पंतप्रधानपदावरील दावा अधिक पक्का होईल असे मला वाटते. १९९६ मध्ये निवडणुकीनंतर स्थापना झालेल्या युनायटेड फ्रंटमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार होते त्यात सर्वात तगडे नाव ज्योती बसूंचे होते कारण ते एकामागे एक निवडणुका जिंकून देत होते.पण त्यांनी नाही म्हटल्यावर इतर उमेदवारांमध्ये देवेगौडांचे नाव नक्कीच अधिक वजनदार होते.कारण त्यांनी कर्नाटकात २८ पैकी १६ जागा जिंकल्या होत्या तर चंद्रबाबू नायडूंनी आंध्र प्रदेशात ४२ पैकी १७ तर मुलायमसिंहांनी उत्तर प्रदेशात ८५ पैकी १७ च जागा जिंकल्या होत्या.त्या मानाने देवेगौडांची कामगिरी सरस होती. असो.
22 Dec 2012 - 12:23 pm | श्रीगुरुजी
"सध्या मोदींना पाठिंबा द्यायला कोण तयार होईल?शिवसेना आणि जयललितांचा अण्णा द्रमुक नक्कीच.अकाली दलालाही मोदी पंतप्रधान बनले तरी काही आक्षेप असेल असे वाटत नाही.तेव्हा भाजप+शिवसेना+अण्णा द्रमुक+अकाली दल जर २७३ नाही तरी २३० पर्यंत पोहोचू शकत असतील तर कदाचित आणखी ४५ खासदारांचे समर्थन कुठून तरी जुगाडता येईल. स्वतः अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना या पक्षांना मिळून २२२ जागा मिळाल्या होत्या (१९९८ मध्ये). २०१४ मध्ये त्यापेक्षा जास्त जागा या पक्षांना मिळायला हव्यात कारण वाजपेयींना २२२ ते २७३ हे अंतर कापणे जितके सोपे होते तितके मोदींना नक्कीच सोपे नसणार."
२०१४ मध्ये शिवसेना ०-१२, अकाली दल ९-१० व अण्णाद्रमुकला किमान ३० जागा मिळाल्या तर त्यांची बेरीज ५० च्या आसपास जाते. जर भाजपला २२५ जागा मिळाल्या तर एकूण बेरीज २७५ होऊन स्पष्ट बहुमत मिळेल. पण भाजपला एवढ्या जागा मिळतील असे अजिबात वाटत नाही. भाजप १६० च्या पुढे जाईल, पण अजून ६० जागा कमी पडतील. त्यासाठी चौताला (लोकदल), आसाम गण परिषद, तेलंगणा राष्ट्रीय समिती अशा फुटकळ पक्षांशी युती करून एनडीएला अजून १५-२० जागांची भर घालता येईल. पण उरलेल्या ३५-४० जागांसाठी त्यांना संजद, तेलगू देसम, बिजद इ. पक्षांचे पाय धरावे लागतील. त्यात बिजद फारशी अडचण करणार नाही. पण तेलगू देसम व संजद नक्कीच खोडा घालण्याचा प्रयत्न करतील. संजदचे बहुतेक खासदार (शरद यादव, शिवानंद तिवारी, प्रभुनाथसिंग इ.) केंद्रात मंत्रीपद मिळणार असेल तर फारशी खळखळ करणार नाहीत. एकटे नितीशकुमार तोंडदेखला विरोध करतील. पण तेलगू देसम मोदींना नक्कीच पाठिंबा देणार नाही. त्यामुळे भाजपने कोणत्याही परिस्थितीत किमान २०० खासदारांचे लक्ष्य ठेवून निवडणुक लढविली पाहिजे.
22 Dec 2012 - 4:43 pm | क्लिंटन
हो बरोबर.पण सध्याच्या परिस्थितीवरून शक्य वाटते का?अगदी बॅक ऑफ द एन्वोलोप आकडेमोड करून भाजपला स्वतःहून पुढीलप्रमाणे जागा मिळतील असे वाटते:
तामिळनाडू: ३ (जयललितांशी युती झाल्यास. अन्यथा शून्य), केरळः शून्य, कर्नाटकः ८, गोवा: २, महाराष्ट्रः १०, गुजरातः १८, राजस्थानः १९, मध्य प्रदेश+छत्तिसगडः३०, उत्तर प्रदेश: ८, उत्तराखंडः३,आंध्र प्रदेशः ४ (तेलंगण राष्ट्रीय समितीशी युती झाल्यास जास्तीतजास्त),बिहारः १२, पश्चिम बंगालःशून्य, आसामः २, उत्तर पूर्वेतील इतर राज्ये: शून्य, ओरिसा: ५ (नवीन पटनाईकांशी युती झाल्यास. अन्यथा शून्य), हरियाणा: ३ (चौटालांशी युती झाल्यास), दिल्ली: ५, हिमाचल प्रदेशः १, पंजाबः ३, जम्मू-काश्मीरः २ (जास्तीत जास्त). तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये आणखी २ जागा मिळायला हरकत नसावी.गाडी १४० पेक्षा पुढे जाताना दिसत नाही.तेव्हा उरलेले ६० खासदार भाजपला आणायला हवेत.पुढील दीडेक वर्षात परिस्थिती इतकी बदलायला हवी :) पण सध्या तरी हा प्रकार अशक्य वाटत आहे.
22 Dec 2012 - 10:43 pm | विजुभाऊ
स्वतः अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना या पक्षांना मिळून २२२ जागा मिळाल्या होत्या (१९९८ मध्ये).
शः:::::::: थेट असे म्हणायचे नसते. त्याला जनादेश असे म्हणतात. तुटके मुटके यश मिळाले की भाजपच्या दिल्लीच्या नेत्यांचे वारू थेट पंतप्रधानपदाच्या वारसदारा पर्यंत उधळतात. भाजपा मध्ये तशीही पंतप्रधानांच्या उमेदवारांची उणीव नाहिय्ये. सुषमा स्वराज्य , जेटली , जसवंत सिंग,गडकरी याच्या पासून वरूण गांधी , राहूल महाजन हे देखील उमेवार म्हणून पात्र आहेत. ( ते तसेही पात्रच आहेत). अरे हो...अडवाणींचे नाव राहूनच गेले की........ घोट्टाळा होता होता वाचला.
25 Dec 2012 - 1:40 am | आशु जोग
भारी राजकीय विश्लेषण केलेत
श्रीगुरुजी तुमचे गुरुजी कोण बारामतीकर का
21 Dec 2012 - 11:00 pm | सिद्धार्थ ४
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17696744.cms
22 Dec 2012 - 7:08 am | क्लिंटन
याविषयी इतरत्र लिहिलेले चोप्य-पस्ते करतो:
एक अनुमान म्हणजे मोदींनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत आणि २०१२ मध्ये हिमाचल प्रदेशात जिथे प्रचार केला तिथे बहुतांश ठिकाणी भाजपचा पराभव झाला!!भाजपचा पराभव झाला यासाठी मोदींना जबाबदार ठरवले जात असेल तर मोदींनी प्रचार केला नसता तर भाजपचा विजय झाला असता (किमान मते तरी वाढली असती) हे सिध्द करता यायला हवे.ते कसे सिध्द करणार? समजा मागच्या वेळी भाजपला ३०% मते असतील आणि यावेळी २०% झाली तर असे म्हणता येईल की मोदींनी प्रचार करूनही भाजपची मते कमी झाली.पण मोदींनी प्रचार केला नसता तर ती २५% असती की १५% असती हे जोपर्यंत सिध्द करता येत नाही तोपर्यंत असे अनुमान कसे काढता येईल? दुसरे म्हणजे मोदींनी २००९ आणि २०१२ मध्ये बहुतांश वेळ गुजरातमध्येच घालवला.ते चार चार महिने अन्य कोणत्या राज्यात तळ ठोकून नव्हते. आणि नक्की कोणत्या जागांवर मोदींनी प्रचार केला याचा काही अॅनॅलिसिस कोणी केला आहे का?आताच्या गुजरात निवडणुकीतही राहुल गांधींनी प्रचार केलेल्या सातही जागा आम्ही जिंकल्या असे अत्यंत हास्यास्पद विधान काँग्रेस नेत्यांनी केले आहे.या नक्की जागा कोणत्या होत्या?जर राहुल गांधींचा इतका करिष्मा असता तर त्यांनी एलीस ब्रीज किंवा मणीनगरमध्ये प्रचार करून काँग्रेस उमेदवारांना निवडून का आणले नाही असे विचारले तर?
१९९८ मध्ये उत्तर भारतात वाजपेयींची लाट असतानाही राजस्थानात वाजपेयींनी प्रचार केला तिथे भाजपचा पराभव झाला होता (भिलवाडा, जोधपूर).म्हणजे अटलबिहारी वाजपेयी भाजपला निवडणुका जिंकून देण्यात असमर्थ होते असे अनुमान कोणी काढले तर? माझ्या मते मोदींची कामगिरी गुजरातबाहेर तपासली जायची आहे आणि आताच अशी अनुमाने काढणे योग्य नाही.
22 Dec 2012 - 8:05 am | शैलेंद्रसिंह
आकडेवारीवरुन अनुमान काढणं योग्य नाही हे मान्य. पण मोदी ध्रुवीकरण घडवुन आणतात. ते विरोधी मतांचेही तितकंच ध्रुवीकरण होऊ शकतं. त्यामुळेच त्यांचे नेतृत्व इतर राज्यात बुमरॅंग प्रमाणे भाजपावर उलटु शकतं. वाजपेयींचे असं नव्हतं. ते जिथे जायचे तिथे पॉझिटीव्ह वातावरण निर्माण करायचे. विरोधीही त्यांच्या बाजुला खेचले जातील असं त्यांचे नेतृत्व होतं. मोदींचा करिष्मा तसा नाहीये. त्यांना प्रत्येक गोष्ट स्वत:च्या कामातुन प्रुव्ह करुन दाखवावी लागते...नुसत्या त्यांच्या भाषणाने त्यांच्या समर्थकांमधे उत्साह निर्माण होत असेल, पण त्यांच्या विरोधकांमधेही तितकीच इर्षा निर्माण होते.
22 Dec 2012 - 12:15 pm | श्रीगुरुजी
"१९९८ मध्ये उत्तर भारतात वाजपेयींची लाट असतानाही राजस्थानात वाजपेयींनी प्रचार केला तिथे भाजपचा पराभव झाला होता (भिलवाडा, जोधपूर).म्हणजे अटलबिहारी वाजपेयी भाजपला निवडणुका जिंकून देण्यात असमर्थ होते असे अनुमान कोणी काढले तर? माझ्या मते मोदींची कामगिरी गुजरातबाहेर तपासली जायची आहे आणि आताच अशी अनुमाने काढणे योग्य नाही."
१९९८ मध्ये महाराष्ट्रात सुद्धा वाजपेयींनी प्रचार केला होता, पण भाजप-शिवसेनेला ४८ पैकी फक्त १० जागा मिळाल्या होत्या. त्यापूर्वीच्या १९९६ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेला ४८ पैकी तब्बल ३३ जागा मिळाल्या होत्या. मधल्या काळात १९९७ मध्ये रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरण घडले व १९९८ मध्ये शरद पवारांनी रिपब्लिकनच्या सर्व गटांबरोबर युती करून प्रकाश आंबेडकर, आठवले, कवाडे व गवई असे ४ खासदार निवडून आणले होते. रिपब्लिकन्-काँग्रेस युती मुळे व रमाबाई आंबेडकर नगर प्रकरणामुळे १९९८ मध्ये भाजप-शिवसेना युतीचा महाराष्ट्रात धुव्वा उडाला होता. त्यावेळी भाजपला देशभरातून १८० जागा मिळाल्या होत्या, पण त्या महाराष्ट व राजस्थानमधून ७३ पैकी जेमतेम १५ खासदार निवडून आले होते.
22 Dec 2012 - 8:08 am | शैलेंद्रसिंह
मतांची टक्केवारी अशी आहे. ग्रामीण भागात कॉंग्रेसने बऱ्यापैकी लढत दिलेली दिसते. शहरी आणि निमशहरी मतदारसंघामधे मात्र मोदींनी पुर्ण बाजी मारलेली आहे. मोदींची शहरी भागातील लोकप्रियता ह्यावरुन स्पष्ट होते.
विभाग भाजपा कॉंग्रेस
एकुण ४७% ३८%
शहरी ५५% ३३%
निमशहरी ४७% ३६%
ग्रामीण ४३% ४२%
22 Dec 2012 - 9:54 am | क्लिंटन
वर्षाला १५००० कोटी म्हणजे दिवसाला सुमारे ४१ कोटी.कोणत्याही राष्ट्रीय दैनिकाच्या पहिल्या पानावर पानभरून जाहिरात देशातील त्या दैनिकाच्या निघत असलेल्या सगळ्या आवृत्यांमध्ये दिल्यास किती खर्च येईल याची कल्पना नाही.तरीही लोकसत्तात "जागा भाड्याने देणे" अशा स्वरूपाच्या जाहिरातींसाठी हजार-पंधराशे रूपये खर्च येतो तेव्हा हे एक्स्ट्रापोलेट करून राष्ट्रीय दैनिकाच्या पहिल्या पानावर अगदी रंगीत जाहिरात दिली तरी जास्तीत जास्त वीसेक लाख लागावेत. म्हणजे मोदींनी अशा प्रकारच्या जाहिराती वर्षातून ३६५ दिवस दररोज अगदी प्रत्येक वर्तमानपत्रात दिल्या तरी ४१ कोटींचा हिशेब लागणे शक्य नाही. :)
22 Dec 2012 - 12:39 pm | शैलेंद्रसिंह
माफ करा..ते टायपो आहे...मला १५०० कोटी लिहायचे होते...एक शुन्य अधिक झाला. परवाच नारायण राणेंनी ह्याबद्दल वक्तव्य केल्याचे ऐकले होते.
23 Dec 2012 - 12:00 am | चिंतामणी
ह्या आकडेवारीचा स्त्रोत काय?? अगदी तुझ्या या दुरूस्तीप्रमाणे १५०० कोटी म्हणून. हे आकडे कुठुन मिळाले? (मा. नारायण राणे म्हणाले या बेसवर बोलत असशील तर बोलणे खुंटले)
केंद्र सरकार ज्या जाहिराती देते त्यात वेगळे काय असते?
23 Dec 2012 - 11:27 am | अनामिका
हेच म्हणते ..........................................नारोबाची साक्ष काढणे म्हणजे खरच अतिरेक......मोदींच्या विरोधात लिहिले किंवा त्यांना आणि गुजराथी जनतेच्या अकलेचे वाभाडे काढत शिव्या घातल्या कि आपोआप प्रसिद्धी मिळते म्हणतात्...गेलाबाजार शैलेंद्रसिंग यांना निखिल वागळे आजचा सवाल मधे खुर्ची आणि घसा गरम करायला बोलावू शकतात्..आता काय ते काँग्रेसने निलंबित केलेल्या अजित सावंताना देखिल राजकिय विश्लेषक म्हणून पाचारण करतात्...विस्थापितांचे राजकिय विश्लेषक म्हणुन पुनर्वसन करण्याचे कंत्राट सध्या वागळेंकडे आहे......काय हरकत आहे प्रयत्न करुन बघायला चार ओळी टंकून आणि एखादा लेख प्रसवून जर फुकटची प्रसिद्धी मिळणार असेल तर....त्यातून तिस्ता सेतलवाड ,संजिव भट यांच्या सारख्यांची या लेखावर नजर पडलीच तर सोनिया दरबारी त्वरीत हजेरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही...तेंव्हा लगे रहो..मोदींविरोधात टंकून आपला लेखन कंडू शमवणार्यांना पुलेशू ....
23 Dec 2012 - 11:34 am | परिकथेतील राजकुमार
=)) =))
२०१४ साली काँग्रेसने सदर लेखकासच गुजरातेत प्रचारासाठी पाठवावे अशी आमची मागणी आहे.
ह्या वेळी देखील मुर्खासारखे पुन्हा मोदींना निवडून देणार्या जनतेला कोणीतरी शहाणे करून सोडण्याची गरज आहे.
23 Dec 2012 - 11:47 am | अनामिका
परा साहेब ..प्रत्यक्ष प्रचारात भाग न घेता देखिल आमचे कार्य सुरु असते तेंव्हा काळजी नसावी.. ह घ्या
23 Dec 2012 - 12:02 pm | परिकथेतील राजकुमार
पण प्रत्यक्ष प्रचारात भाग घेतला तर बरे आहे. उगाच नाहीतर मग आडून आडुन प्रचार करणारे 'संघवाले' असल्याचा शिक्का बसायचा त्यांच्यावर. ;)
बाकी गेला महिनाभर गुजरातेतच असल्याने, लेखनातील आणि काही प्रतिक्रियांमधील फोलपण प्रत्यक्ष अनुभवत आहेच.
23 Dec 2012 - 12:23 pm | अनामिका
प्रत्यक्षात संघवाले नसले तरी अभिमानी हिंदू नक्कीच आहे...बाकी ज्याला जसे बघायचे तसे त्याने बघावे ...गुजराथच्या
विकासाची तुलना प्रत्येकजण देशातल्या कुठल्या प्रांताशी करतात ह्यावर देखिल बर्याच गोष्टी अवलंबून आहेत.....लोकशाही देशात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे...जसा तो तुंम्हाला आहे तसा तो मला देखिल आहे....असो वैचारिक विरोध असावा पण कटुता नसावी इतकच म्हणेन...
23 Dec 2012 - 12:42 pm | परिकथेतील राजकुमार
अहो, 'सदर' लेखकास प्रचारास पाठवावे म्हणजे धाग्याच्या लेखकास हो. ;) तुम्हाला कोण काय बोलतय ?
23 Dec 2012 - 12:56 pm | अनामिका
बघा झाली ना गल्लत ! तुंम्ही माझे वाक्य अधोरेखित करत प्रतिसाद दिलात मला वाटले तुंम्ही मलाच शालजोडीतून हाणताय्..नक्की तसेच आहे ना कि एकाच दगडात २ पक्षी मारताय ? ;)असो चु भु द्या घ्या....
23 Dec 2012 - 1:00 pm | परिकथेतील राजकुमार
नाय नाय !
तुम्हाला कशाला दगड मारु ? बाळासाहेब ज्यांना आदरणीय ते सगळे आम्हाला आदरणीय.
बाकी मी 'लेखक' असा शब्द वापरला होता, 'लेखीका' नाही. ;)
25 Dec 2012 - 1:53 am | आशु जोग
>> बाळासाहेब ज्यांना आदरणीय ते सगळे आम्हाला आदरणीय.
बाळासाहेब म्हटलं की आम्हाला बाळासाहेब देवरस आठवतात
आणि हिंदुहृदयसम्राट म्हटलं की एक आणि एकच
ते म्हणजे अंदमानच्या काळकोठडीला न भिणारे, द्रष्टे महापुरुष
तात्याराव सावरकर
25 Dec 2012 - 3:41 am | बॅटमॅन
अरे बापरे काय बेक्कार हाणलाय.......जियो!!!!!!
25 Dec 2012 - 10:38 am | परिकथेतील राजकुमार
झकास ! अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व.
कोणा कोणा बाळासाहेब म्हणलं की हृदयनाथ मंगेशक देखील आठवत असतील. अर्थात प्रत्येकाची आवड निवड / प्रेम / निष्ठा ह्या जुळायलाच पाहिजे असे काही नाही.
2 Jan 2013 - 5:47 pm | अनामिका
ह्म्म अंमळ "लेखक"नजरचुकीने वाचायचे राहून गेले...बाकी कोट्या करण्यात आणि शालजोडीतून हाणण्यात आपला हात कोण धरेल्?ह घ्या!
हे गृहितक जरा पचनी पडंणे अवघड..
23 Dec 2012 - 1:39 am | विश्वनाथ मेहेंदळे
तरीही तो आकडा ४.१ कोटी राहतो. क्लिंटन यांचा हिशोब २० लाखाचा आहे. त्यामुळे आक्षेप घेत येतोच या आकडेवारीवर.
ते नागोबाचे पिल्लू ?? त्याचे म्हणणे कुणी मनावर घेते हे बघून मज्जा वाटली.
23 Dec 2012 - 4:05 am | शैलेंद्रसिंह
राणे शिवसेनेत असतांना ते आकडेवारीसकट बोलणारे नेते म्हणुन प्रसिद्ध होते. त्यांचे शिक्षण कमी असेल तरी त्यांचे अर्थसंकल्पावरील भाषण हा चर्चेचा विषय असे. असो.
मोदींनी गुजरातच्या जाहीरातबाजी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने केलेली आहे. त्यामधे बरेच प्रोमशनल ऍक्टिव्हिटीज अंतर्भुत आहेत. कॉंन्फ़रंसेस भरवणं...पुरस्कार सोहळे..परदेशी दौरे इत्यादी..खुप खर्चाचं काम आहे ते, पण त्याचे रिटर्न्स ही त्यांना मिळतात. त्याबाबत काही आक्षेप नाहीच.
मुद्दा असा होता की ह्या जाहीरातबाजीचा फ़ायदा मोदी स्वत:च्या प्रतिमानिर्मीतीसाठी करुन घेतात. जणु काय गुजरात हे अगदीच मागास राज्य होते आणि ह्यांनी त्याला विकसित केलं.
बाकी मोदींनी आर्थिक विकास नाही, आर्थिक वाढ निर्माण केली. अर्थशास्त्रात विकास आणि वाढ ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी मानल्या जातात. आर्थिक वाढीमुळे विकास होणे गरजेचे नसते...अर्थव्यवस्थेतला पैसा झिरपत झिरपत खालच्या स्तरातील लोकांकडे जाईल ही थिअरी फ़ोल ठरली...म्हणुन आर्थिक विकास मोजायचे नवीन परिमाण असतात. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, हंगर इंडेक्स- कुपोषण वगैरे योग्य मोजमाप आहेत.
गुजरातमधे कुपोषणाची स्थिती भयाण आहे. उत्तर प्रदेश, ओरिसा, बंगाल ह्याच्यापेक्षाही गुजरात मागे आहे..जागतिक पातळीवर विचार केल्यास हैती ह्या देशापेक्षाही गुजरातची स्थिती भयाण आहे. मधे मोदींनी ह्या साठी मुलींना जबाबदार ठरवले होते आणि दिशाभुल केली होती. की मुली जेवत नाहीत..फ़िगर मेंटेन करायला. सर्वस्वी चुकीचे विधान होते ते. गुजरातमधील कुपोषणाची स्थिती काय आहे ह्याबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंक्स बघा.
http://infochangeindia.org/agriculture/analysis/the-hunger-index.html
http://ibnlive.in.com/news/gujarat-among-worst-in-fighting-malnutrition/...
http://ibnlive.in.com/news/affluent-gujarat-scores-low-on-hunger-index/7...
आर्थिक वाढीचे श्रेय घेणारे मोदी कुपोषणाची जबाबदारी घेतील का?
23 Dec 2012 - 5:23 am | विकास
हा प्रतिसाद थोडा अवांतर म्हणून वाचावात. मोदी बरोबर का चूक या चष्य्मातून नव्हे...
सर्व प्रथम कुपोषण, भूकबळी आदी भारतात गंभीर समस्या आहेत याबाबत माझ्या लेखी वाद नाही.
याच अहवालाप्रमाणे भारत हा बांग्लादेशच्या मागे आहे. त्याबद्दल आपण काय म्हणणार आहात? त्यामुळे संपूर्ण भारतच भयाण आहे असे म्हणावे लागेल. आणि तरी देखील बांग्लादेशी विस्थापीत होऊन भारतात येत आहेत...
मी उत्सुकतेपोटी "हंगर डेव्हलपमेंट इंडेक्स" नक्की काय भानगड आहे म्हणून थोडेसेच गुगलले. त्यात तथ्य नक्की असले तरी ते एका वीशिंग्टन स्थित The International Food Policy Research Institute (IFPRI) नामक एन जी ओ ने तयार केलेला इंडेक्स आहे. या वीना नफा असलेल्या संस्थेचे २००७ मधील उत्पन्न हे $४७ मिलीयन्स इतके आहे. तसे असले म्हणून मला काही इनो नकोय. पण वॉशिंग्टन, पॉलीसी रीसर्च आणि मिलियन्स मधील उत्पन्न बघितले की पाल चुकचुकली, मग थोडे अधिक बघितले तेंव्हा अशा संशोधनासाठी त्यांनी केलेली पब्लीक-प्रायव्हेट पार्टनरशिप बघितली आणि मोन्सँटो आणि बीएएसएफ सारख्या कंपन्या दिसल्या. आणि मग लक्षात आले की हा इंडेक्स युएन अथवा वर्ल्ड बँक का वापरत नाहीत ते.
बाकी नमो पंतप्रधान होणार का अजून कोणी ते चालूंदेत, कारण त्यांनीच गृहीत धरलेल्या त्यांच्या राजकीय आदर्शाने, वाजपेयींनी लिहील्याप्रमाणे: "कोई राजा बने, रंक को तो रोना है" अशीच अवस्था आहे. असो.
23 Dec 2012 - 6:41 am | शैलेंद्रसिंह
भारताच्या प्लानिंग कमिशन ने रिलीज केलेला मानवी विकास रिपोर्टही (India Human Development Report 2011) तेच म्हणतो. Human Development Index (HDI) तरी विश्वासार्ह मानायचा ना? ह्या इंडेक्स मधे विकासाच्या सगळ्या गोष्टी अंतर्भुत होतात. गुजरात १९९९-२००० साली १० क्रमांकावर होता भारतात...आता तो ११ व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रही ६व्या क्रमांकावरुन ७ व्या क्रमांकावर आलाय, पण गुजरातच्या विकासाचा डंका किती वाजतोय ते पहा.
पुर्ण रिपोर्ट इथे बघा:
http://www.pratirodh.com/pdf/human_development_report2011.pdf
संक्षिप्त माहिती.
http://www.firstpost.com/india/hdi-in-india-rises-by-21-kerala-leads-guj...
23 Dec 2012 - 7:01 pm | प्रदीप
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
सविस्तर पाहून लिहीत नाही आहे, कारण तूर्तास तेव्हढा वेळ मला नाही. (क्लिंटन, विकास, नगरीनिरंजन ह्यांजकडून इथे सविस्तर प्रतिवाद अपेक्षित आहेत).
पण अगदी वरवर चाळल्यावर पान ३ वरील आकृति ३ नजरेस पडली. ह्यात १९९९-२००० व २००७- ८ सालांच्या अनेक राज्यांच्या HDI चा तक्ता दिलेला आहे. २००७-८ साली ह्या इंडेक्सनुसार गुजरात म्हणे महाराष्ट्राच्याही मागे होता, इतकेच नव्हे, ईशाज्ञ भारत (आसाम सोडून) गुजरातच्या पुढे होता. हे HDI मेट्रिक जरूर तपासून पहाण्यासारखे आहे.
23 Dec 2012 - 9:01 pm | विकास
माझ्या आधीच्या प्रतिसादासंदर्भात - तेथे सुरवातीस म्हणल्याप्रमाणे, मोदींच्या संदर्भात तो प्रतिसाद नव्हता तर "हंगर डेव्हलपमेंट इंडेक्स" मधील फोलपणा दाखवण्यात होता. त्यात देखील तुम्ही दाखवलात म्हणजे तुम्ही दिशाभूल केली असे म्हणायचे नव्हते. पण आपण नक्की कशाच्या जीवावर बोलत असतो या संदर्भात नक्की होते. असो.
आता परत एक डिसक्लेमरः मी जे काही लिहीणार आहे त्याचा अर्थ मी मोदींच्या डिफेन्स मधे म्हणून लिहीत आहे असे घेऊ नये. तसा माझा उद्देश नाही. कारण परत तो वेगळा मुद्दा आहे. निवडणूका असल्या इंदेक्समुळे जिंकल्या अथवा हरल्या गेल्या असत्या तर काँग्रेसचे नाव आत्तापर्यंत इतिहासाच्या पुस्तकातच पहायला मिळाले असते. असो. त्यामुळे माझा मुद्दा केवळ विश्लेषण आणि त्याच्या मागे काय असू शकते इतक्याशीच मर्यादीत आहे.
ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा माणसाचे (समाजाचे) आयुष्य, उत्पन्न, आणि शिक्षण यांच्या वर आधारीत स्टॅटेस्टिक्स मधे काही विषेष समिकरणे करून काढला जातो. अर्थात यातील एकाचेही प्रमाण बदलले तर इंडेक्स बदलू शकतो. जे महाराष्ट्राच्या बाबतीतही घडलेले असू शकते आणि गुजरातच्या बाबतीतही. त्याचे प्रामुख्याने एक कारण म्हणजे भटक्या आणि विमुक्त जाती (एस टी) चे प्रमाणे किती ह्यावर देखील हे अवलंबून आहे. एक नॉर्थइस्टचा अपवाद सोडल्यास जी राज्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मधे वर आहेत त्यांच्यात एसटींचे प्रमाण नगण्य अथवा नाहीच आहे. त्या उलट जी मोठी राज्ये आहेत तेथे हे प्रमाण जास्त आहे. इशान्येकडे राज्यांमधे एस टी च जास्त प्रमाणात आहेत. त्यांचे आयुष्य-शिक्षण-उत्पन्न कसे धरले जाते हे माहीत नाही. थोडक्यात तिथपर्यंत विकासाची फळे पोचली आहेत का, तर नक्कीच नाही. पण त्याला वेळ लागू शकतो हे नक्की. विशेष करून हे एस टी हे खर्या अर्थाने ट्रायबल रिजन मधे आहेत हे लक्षात घेता.
असे दिसते आहे, की हे रिपोर्ट तयार करताना एस सी, एस टी आणि मुसलमान लोकसंख्येचा विकास कसा झाला आहे ह्यावर बराच भर दिला जातो. (किमाना आत्ता वाचल्याप्रमाणे गुजरातच्या बाबतीत तरी असे दिसले). त्यातच म्हणल्याप्रमाणे:
Across religious groups, the performance of the Muslim population, which accounts for only 8 per cent of the state’s total population, is quite close to the state and national outcomes for Muslims in terms of health indicators. A similar trend has been observed for the literacy rate where Muslims have a slightly lower literacy rate than the state literacy rate, but higher than the all India literacy rate for Muslims. However, Muslims fare far better than other communities in the state as well as Muslims across India, in terms of accessing improved sources of drinking water and toilet facilities. It is worth mentioning that Muslims are faring better than SCs and STs in the state in all the above human development outcomes. To sum up, it appears that the high growth rate achieved by the state over the years has not percolated to the marginalized sections of society, particularly STs and SCs, to help improve their human development outcomes.
तुम्ही इतरत्र म्हणले आहे की, "आर्थिक वाढीमुळे विकास होणे गरजेचे नसते...अर्थव्यवस्थेतला पैसा झिरपत झिरपत खालच्या स्तरातील लोकांकडे जाईल ही थिअरी फ़ोल ठरली..." ते या शहरीकरण आणि शहरीकरणाकडे झुकलेले ग्रामिण भाग सोडल्यास इतर ठिकाणा/समाजाच्या बाबतीत तुर्तास म्हणू शकता. पण ते पटणारे नाही कारण असा विकास एका रात्रीत होत नसतो. आणि तो केवळ आर्थिक वाढ झाली तरच होऊ शकतो. या संद्रर्भात १९९० च्या दशकात आर्थिक वाढीबरोबर झालेला नंतरच्या आर्थिक विकास आणि त्या आधी समाजवादी पद्धतीने चाललेल्या अर्थकारणातील आर्थिक विकास यांची तुलना केल्यास याचे उत्तर मिळू शकेल. म्हणूनच कदाचीत गुजरातच्या सुरवातीस या अहवालात म्हणले आहे की: In recent years the average annual growth rate of the NSDP and the per capita NSDP has been faster than the national average (Table 1). ...Further, agriculture was almost stagnant in the 1980s and demonstrated a negative growth in the 1990s. This has been a major barrier to Gujarat’s development (Gujarat Human Development Report 2004). However, during the period 2000–1 to 2007–8, agriculture and its allied sectors have grown at more than 10 per cent per annum who precedented in India, and as in Andhra Pradesh, been an important factor driving the overall GDP growth.
असो.
24 Dec 2012 - 7:27 am | शैलेंद्रसिंह
ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे काय? तो मोजायची पद्धत हा इथला विषय नाही. पण त्याबद्दल थोडं लिहितो आणि ट्रिकल डाऊन थिअरी ( अर्थव्यवस्थेचा पैसा झिरपत खालच्या स्तरापर्यंत जातो ही थिअरी) बद्दलही लिहितो. माझ्या लिखाणाने समाधान होणार नाही कदाचित तर अर्थशास्त्राच्या कुठल्याही अभ्यासकाला ह्याबद्दल विचारा तुमची खात्री होईल.
ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मधे दरडोई उत्पन्न (परचेसिंग पावर च्या स्वरुपात) अंतर्भुत असतंच. अमर्त्य सेन आणि महबुब हक ह्या नोबेल विजेत्या अर्थशास्त्रींनी हा कंसेप्ट मांडला..मानवी विकास मोजायचे समीकरणही त्यातुनच बनले. ते जागतिक पातळीवर सारखेच आहे. (२०११ नंतर ह्यात थोडे फेरफार करण्यात आलेले आहेत). त्यामुळे मुस्लिम, एससी-एसटी वर जास्त भर देण्यात येतो हा समज चुकीचा आहे. भारत सरकारची नियोजन समिती जो रिपोर्ट दरवर्षी प्रकाशित करते त्यात फक्त इंडेक्स बद्दल माहिती नसुन अनेक गोष्टींची चर्चा होते. असाच रिपोर्ट जागतिक पातळीवर युनडिपी (युनायटेड नेशन्स डेवलपमेंट प्रोग्राम) ही संस्था प्रत्येक देशाचा प्रकाशित करत असते.
१९९१ भारताने अर्थव्यवस्था खुली केली. लिबरलायझेशन आणि ग्लोबलायझेशन ही प्रक्रिया भारताने सुरु केली. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील गुंतवणुक वाढुन रोजगार निर्मीती झाली आणि त्यामुळे विकासही झाला, अर्थव्यवस्थाही वाढली. पण ज्या दराने अर्थव्यवस्था वाढली त्या दराने विकास झाला नाही. कारण विषमताही तेव्हढीच वाढत गेली. अर्थात आधीच्या व्यवस्थेपेक्षा (९१ पुर्व) ही व्यवस्थाही परवडली...कारण आधी सरकारने काही क्षेत्रात गुंतवणुकीला प्रायव्हेट सेक्टरला मनाई केली होती...इतर क्षेत्रात लायसंस-कोटा देऊन प्रायव्हेट सेक्टरला परवानगी दिली होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकच खुप कमी झाली होती. त्यामुळे रोजगारवाढीवरही मर्यादा आली होती..त्यातुन विकास अर्थातच मंदावला होता. अर्थव्यवस्था खुली झाल्याने गंतवणुक वाढली...रोजगार वाढले.. रोजगारातुन अनेकांचे.जीवनमान सुधारले. शहरी मध्यमवर्ग वाढला. अर्थव्यवस्थाही त्यातुन खुप वाढली...दर वर्षी आपण ५-९% दराने अर्थव्यवस्थेची वाढ बघतोय. पण त्याच दराने रोजगार वाढले का? तर उत्तर नाही असंच आहे. अर्थव्यवस्थेतील पैसा झिरपुन खालच्या स्तरावर जातो..पण तेव्हढा जात नाही जितकी आपण अपेक्षा करतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेची वाढ ही मानवी विकासाला कारणीभुत होईल हे गरजेचे नसते. गेल्या २० वर्षात भारतात इनइक्वालिटी कशी वाढत गेली ह्याबद्दल अधिक माहितीसाठी हे वाचा.
http://timesofindia.indiatimes.com/india/Indias-income-inequality-has-do...
म्हणुनच खुल्या अर्थव्यवस्थांमधे सरकारचं काम अधिक महत्वाचं होतं. समतोल विकास साधायचा असेल...तर सरकारने योग्य धोरणं आखली पाहिजेत आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीचा फायदा सगळ्यांना होऊन विकास साधला जाईल हे सरकारने बघणं गरजेचं आहे. कारण अर्थव्यवस्था वाढतच राहणार आहे. महाराष्ट्र, गुजरात सारख्या इंड्स्ट्रियल स्टेट्स मधेच गुंतवणुक अधिक होणार हे वेगळे सांगायला नकोच, पण प्रत्येक राज्याला गुंतवणुकीचे मह्त्व कळले असुन आंध्र, तामिळनाडु, ओरिसा सारखी राज्यंही आकर्षक योजना गुंतवणुकदारांपुढे उभ्या करतात. गुंतवणुक वाढणे ही बेसिक गरज आहेच. पण त्यातुन विकास कसा साधुन घेता येईल हे पाहणं सरकारचं कर्तव्य आहे. आणि सरकार ते योग्यपणे करतंय की नाही हे तुम्हाला ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट मधुन कळुन येतं.
26 Dec 2012 - 7:17 am | प्रदीप
HDI चे महत्व समजले, त्या निकषावरून काढलेले २०११ सालातील भारत तसेच त्यातील घटक राज्यांचे आकडेही पाहिले. त्यातील गुजरातचे स्थानही लक्षात आले. पण ह्याच बरोबर ह्याच इंडेक्सचे, गुजरात व इतर राज्यांचे, मोदी सत्तेवर येण्याअगोदरचे आकडे उपलब्ध आहेत का? तसे आकडे तपासल्यावर मोदींची दहा वर्षांची राजवट व त्याच कालखंडातील इतर राज्यांतील राजवटींची ह्या अनुषंगाने वाटचाल, ह्यावर काही ठोस प्रकाश पडू शकेल असे वाटते. २०११ सालातील अॅब्सोल्युट आकड्यांना गेली दहा वर्षे राज्य करत असलेले मोदीच केवळ जबाबदार मानणे थोडे चुकीचे वाटते.
23 Dec 2012 - 8:19 am | चिंतामणी
महाराष्ट्राचा नंबर कितवा आहे?
मेळघाटबद्दल मी सांगायला हवे का? वानगीदाखल ही एक बातमी वाचा. वर्षानुवर्षे फरक पडत नाही.
याबद्दल लिहीण्यासारखे खूप आहे. वेळ मिळाल्यावर लिहीन परत.
23 Dec 2012 - 8:25 am | चिंतामणी
अहवालांचा जो संदर्भ दिला आहे तो किती सालचा हे स्पष्ट का नाही लिहीले. ह्या अहवालात तर चक्क १९८० ची आकडेवारी आहे. १९८० साली मोदि अथवा भाजपचे सरकार होते गुजराथेत???
23 Dec 2012 - 9:56 am | शैलेंद्रसिंह
लिहा तुम्ही वेळ मिळेल तेव्हा...पण आधी तो रिपोर्ट वाचायचेही कष्ट घ्या...२०११ चा रिपोर्ट आहे तो..
त्यात HDI ची २००८ ची आकडेवारी दिलेली आहे. तुमच्याकडे आणखी लेटेस्ट माहिती असेल तर आकडेवारी शेअर करा.. Human Development Index (HDI) मधे जर गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले असेल, तिथले कुपोषण महाराष्ट्रापेक्षा कमी असेल तर सांगा.
23 Dec 2012 - 11:44 am | श्री गावसेना प्रमुख
जय हो शैलेन्द्र सिंह,कुपोषणावर उपाय तर सांगा आता. का फक्त प्रचार करताय
23 Dec 2012 - 11:45 am | अनामिका
अगदी अगदी नारोबांच्या हुशारी बद्दल अजिबात शंका नाही....पण हल्ली बर्याच जणांना दिगविजय या असाध्य रोगाची लागण झाली आहे म्हणुन शंका येते इतकच
23 Dec 2012 - 5:14 pm | चिंतामणी
त्यांच्या बद्दल हेच मत होते की "पदरी पडले आणि पवीत्र झाले".
आणि एक सांगा. की
महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार जाहिरातबाजीसाठी खर्च करतात, त्या जाहिरातीत्तून काय होते हेसुद्धा लिहा.
कुठलेही कर्तृत्व नसताना राहुल गांधी यांची दावेदारी पंतप्रधान पदासाठी सांगितली जाते त्या बद्दल तुमचे काय मत आहे?
22 Dec 2012 - 10:51 am | रमेश आठवले
वेगवेगळ्या संस्थांनी,वाहिनींनी आणि वर्तमानपत्रांनी घेतलेल्या कौलात, पंतप्रधान पदासाठी सर्वात अधिक मते मोदींना मिळाली आहेत. याचा अर्थ काय ?
जर भाजपला लोकसभेत बहुमतापेक्षा कमी परंतु भरपूर जागा मिळाल्या तर जनता दल (u ) मधून लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांमध्ये विभाजन होऊन मोदींना पाठींबा देणारा एक वेगळा गट निर्माण होऊ शकतो. ओरिसातील पटनाईक यांच्या पार्टीचे आणि तृणमूल कॉंग्रेसचे पाठबळ भाजपला यापूर्वी मिळाले होते, तसेच यावेळीही मिळू शकेल. नितीशकुमार शिवाय दुसर्या कोणीही आम्हाला मोदी चालणार नाही असे म्हटलेले नाही.
सरकार बनवायची वेळ आली कि सर्व पक्षांना तडजोड करावीच लागते. वैयक्तिक आवडी निवडी बाजूस ठेवाव्या लागतात.
22 Dec 2012 - 11:12 am | तिमा
लोकशाही मार्गाने मोदींना पंतप्रधान होता येणे शक्य नाही. कारण मुस्लिमांचे लांगुलचालन करणारे पक्ष त्यांना कायम विरोधच करणार. फक्त लष्करानेच देशाचा ताबा घेतला आणि व्यवस्थापक म्हणून मोदींना नेमले तरच हे शक्य आहे. आणि ते आपल्या देशांत घडणे अशक्य आहे.
22 Dec 2012 - 12:52 pm | नितिन थत्ते
लष्करी सत्ता आणि मोदी म्यानेजर .....
कल्पना वाचूनच थरकाप झाला.
22 Dec 2012 - 4:52 pm | दादा कोंडके
धागा वाचला आणि एकेक प्रतिक्रिया वाचत स्क्रोल करत होतो. काहितरी चुकल्या-चुकल्यासारखं वाटत होतं. शेवटी थत्तेचचांचा अपेक्षित प्रतिसाद वाचून हुश्य झालं. :)
22 Dec 2012 - 11:53 pm | चिंतामणी
:D
23 Dec 2012 - 4:57 am | विकास
माझा नुसताच लष्करी सत्ता वाचून थरकाप उडाला. कारण तशी उद्या सोनीया/मनमोहन अथवा मोदी असोत, कोणिही जरी ती आणली तरी ती अयोग्यच आहे.
23 Dec 2012 - 10:54 am | नितिन थत्ते
लष्करी सत्ता नकोच.
23 Dec 2012 - 10:55 am | नितिन थत्ते
त्यापेक्षा मोदींची लोकशाही सत्ता परवडेल.
23 Dec 2012 - 12:01 pm | अनामिका
त्यापेक्षा मोदींची लोकशाही सत्ता परवडेल.--नितिन थत्तेथत्तेकाका हि तर ब्रेकिंग न्युज म्हणायला हवी ...थत्तेकाका "तुंम्ही सुद्धा" ........ ;)
23 Dec 2012 - 5:02 pm | कवितानागेश
हे वाचण्याआधी मी लॉग आउट का नाही केले??? ;)
25 Dec 2012 - 5:09 pm | वेताळ
प्रभो ह्यांना क्षमा कर
2 Jan 2013 - 12:13 pm | जैतापकराचा प्रशांत
जनतेला माज आलाय.. लोकशाहीचा चुकीचा वापर करतात.
त्यापेक्षा शिवशाही आणा...
सगळ्यात बेस्त
23 Dec 2012 - 11:53 am | अनामिका
ति..मा हे असे काही तरी नका बोलूत ..स्वप्नातदेखिल असा विचार कुणाच्या मनात येऊ नये...
22 Dec 2012 - 10:35 pm | विजुभाऊ
गेल्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेला त्यांनी जिथे जिथे प्रचार केला त्या बहुतेक ठिकाणी युतीचा पराभव झाला
ते आले नसते तर १००% युतीचा उमेदवार निवडून आला असता. असे म्हणायचे आहे तुम्हाला?
राज ठाकरे / युतीच्या उमेदवाराची निष्क्रीयता यांचा यात काहीच सहभाग नाहीय्ये असाच अर्थ लावावा लागेल
23 Dec 2012 - 6:43 am | शैलेंद्रसिंह
मोदींमुळे पराभव झाला असं म्हणायचं नाही...तर त्यांचा करिष्मा गुजरातबाहेर नाही असं सांगायचं होतं. मी आधीही लिहिलंय की मोदी हे एक पोलोरायझिंग व्यक्तित्व आहेत..त्यांच्यामुळे विरोधकही एकत्र होऊन जोमाने लढत देतात. ते विरोधकांना आपलेसे सहजासहजी करु शकत नाहीत. वाजपेयींच्या व्यक्तित्वात ती जादु होती.
23 Dec 2012 - 8:29 am | चिरोटा
हे जादू वगैरे बोलायला असते. सरकार बनवायची वेळ आली की ह्या जादूपेक्षा पैशाच्या जादूला जास्त महत्व असते.सध्या अनेक पक्षांचे सरकात सत्तेत आहे केंद्रात. मनमोहन्/सोनिया ह्यांच्या खास जादूमुळे घटक पक्ष सरकारात सामील झाले आहेत असे म्हणायचे आहे का?
23 Dec 2012 - 12:04 pm | अनामिका
शैलेंद्रसिंह
एक साधा प्रश्न विचारते ,तुंम्हाला मोदी पंतप्रधानपदी नकोत तर नकोत मग २०१४ ल पंतप्रधान कोण व्हायला हवे? तुमच्या मते..जरा प्रकाश पाडाल का?
23 Dec 2012 - 1:09 pm | शैलेंद्रसिंह
माझं लिखाण तुम्ही नीट वाचलं असेल तर मी काय म्हणतोय ते लक्षात येईल. पुन्हा संक्षिप्त स्वरुपात लिहितो..
१] गुजरातच्या विजयाने मोदींची दावेदारी पंतप्रधानपदावर आपोआप सिद्ध होत नाही कारण रालोआ मधे तसेच विजय मिळवुन देणारे शिवराज सिंह चौहान आणि नितीश कुमार आहेत.
२] विकासपुरुष ही प्रतिमा त्यांनी जी निर्माण केलीय ती फ़क्त एक जाहीरातबाजी आहे. त्यांनी आर्थिक वाढ निश्चितच घडवुन आणलीय, आर्थिक विकास मात्र नाही.
३] मोदींची पंतप्रधानपदासाठी उमेदवारी हे रालोआसाठी निश्चितच त्रासदायक ठरु शकते कारण त्यांचा करिष्मा गुजरातबाहेर नाही, उलट त्यांचे व्यक्तित्व साऱ्या विरोधकांना एकत्र आणु शकते आणि निवडणुकीचे मुद्दे बदलु शकतात. निवडणुक कॉंग्रेस विरुद्ध इतर होण्याऐवजी मोदी विरुद्ध इतर होऊ शकते. मागच्या निवडणुकीला असंच कॉंग्रेसने ’लोहपुरुष’ अडवाणींना शेवटच्या टप्प्यात घेरुन सामना मनमोहन विरुद्ध अडवाणी केला होता, ज्यात अडवाणी मागे पडले.
आणखी एक नवा मुद्दा
४] संघपरीवारातही मोदींविषयी एकमत नाहीच...एकमत तर सोडाच पण मोदींमुळे गटतट पडु शकतात. नितीन गडकरींच्या बदनामीमागे मोदीच होते असं बोललं जातंय. म.गो. वैद्यांनी तसं उघडपणे सांगितलं. मोदींच्या उमेदवारीला संघाचा संपुर्ण पाठींबा मिळणे आवश्यक आहे. संघाने जर तटस्थ भुमिका घेतली तर भाजपाला निवडणुक कठीणच जाते.
रालोआ साठी सुषमा स्वराज ह्याच सर्वथा योग्य उमेदवार आहेत असं मला तरी वाटतं.
23 Dec 2012 - 1:29 pm | अनामिका
माझ्यामते मोदीच सगळ्यात पात्र उमेदवार आहेत कारण आता गांधी घराण्याच्या सरंजामशाहीतून मुक्त होण्याची वेळ आली आहे...आणि हे फक्त मोदीच करु शकतात ज्या प्रकारच राजकारण दिल्लीत व भाजपा मधे खेळल जातय ते बघितल तर सुषमा व जेटली यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमधे नाराजी आहे...काँग्रेस व सोनियांना झुकत माप सदर नेते देतात असा ठाम मतप्रवाह आहे...उमा भारती यांना बाजूला का केल गेले याचा विचार करा म्हणजे कळेल......गडकरींच्या बदनामीमागे मोदीच होते म.गो. वैद्यांनी तसं उघडपणे सांगितलं अस काहीही नाही .घटनांच्या पार्श्वभुमीवर कदाचित माध्यमांमधे असा अंदाज बांधला जाऊन मोदींविरोधात बातम्या पेरल्या जाऊ शकतात इतकच वैद्य म्हणाले होते...
23 Dec 2012 - 1:36 pm | शैलेंद्रसिंह
Vaidya in his blog on Sunday wrote, "The roots of the campaign against Nitin Gadkari have to be in Gujarat because when Ram Jethmalani demanded Gadkari's resignation, he also demanded that Narendra Modi be made the prime ministerial candidate of the party."
http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-11-12/india/35067791_1_...
23 Dec 2012 - 2:32 pm | अनामिका
तूनळी वर वैद्यांची मुलाखत धुंडाळा म्हणजे नक्की त्यांना काय म्हणायचे होते ते कळेल्..टाइम्स सारखी वर्तमान पत्रे वाचण्यापेक्षा वर्तमानपत्र विकत न घेतलेलेच बरे..
23 Dec 2012 - 8:50 pm | निनाद मुक्काम प...
सुषमा स्वराज
सिंग जी तुम्ही विनोद करू नका
त्यांनी एफ दि आय च्या निमित्ताने संसदेत जे भाषण केले ते पाहता त्यांची विद्वत्ता सिद्ध होते. भाषणे ठोकणे एक गोष्ट आणि सामान्य कार्यकर्ता ते सरकारी अधिकारी ह्यांना एकजूट करून राज्याचा विकास करणे एक गोष्ट आहे.
स्वराज ह्यांना कोणत्या राज्यातून जनाधार आहे असे तुम्हाला वाटते.
नितीश ह्यांनी बिहारचा कायापालट केला पण सलग तीन वेळा ते बिहार मध्ये जिंकून येतील असा आत्मविश्वास तुम्हाला वाटतो का
भारतात जो मध्यमवर्ग आहे त्यावर मोदी नावाने गारुड केले आहे ह्याचा फायदा यु पी ए ने का घेऊ नये.
ते स्वतःच्या जाहिराती साठी पैसा खर्च करतात किंवा उद्योगपती तो करतात ह्यात वाईट काय आहे ,
पैसा स्विस मध्ये ठेवण्यापेक्षा हे बरे नाही का
सिंग जी तुम्ही फक्त एक प्रश्न स्वतःला विचारून पहा
का तुम्हाला मोदी ह्यांच्यावर हा धागा काढावासा वाटला
का प्रसारमाध्यमे फक्त मोदी आणि मोदी ह्यांच्या विषयी लिहितात आणि त्यांनी टीका करूनही मध्यमवर्ग मात्र मोदी ह्यांच्या पाठीशी उभा राहतो.
ह्याचे उत्तर सोपे आहे
मोदी ह्या नावापुढे जे वलय आहे ते इतर नेत्यांच्या मागे अजिबात नाही आहे
मुळात तुम्ही मला असा एक नेता भारतातून सांगा जो स्वतःचे राज्य सोडून इतर राज्यात प्रचाराला गेला व एकहाती सत्ता जिंकून आणली.
महाराष्ट्रात पुढील २५ वर्षात एक नेता सर्व महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू शकेल असे चित्र दिसत नाही , आणि हीच परिस्थिती भारतात आहे आणि हेच मोदी ह्यांचे वैशिष्ट्य आहे.
गुजरात हे मोदी ह्यांच्या आधी प्रगत राज्य होते हा युक्तिवाद वाचून हसू आले
त्यांनी निदान प्रगत राज्य हा स्टेटस टिकवला
नाहीतर महाराष्ट्र
आधी महाराष्ट्र वीज इतर राज्यांना पुरवायचा
आता तो भार नियमाने दबला आहे.
मोदी ह्यांचे इतर नेत्यांच्या तुलनेत एकच वेगळेपण आहे ते म्हणजे त्यांच्या राज्यातील बहुतांशी जनता त्यांच्या पाठीशी १० वर्षाहून जास्त काळ आहे.
बंदे मे दम हे.
मानो यांना मानो
25 Dec 2012 - 3:32 am | शैलेंद्रसिंह
मोदींविषयी धागा काढावसा वाटला कारण ते पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणुन भाजपातर्फ़े उभे रहावेत असा त्यांचा प्रयत्न आहे. मोदींच्या उमेदवारीमधे काय काय अडचणी येऊ शकतात आणि त्यांची दावेदारी इतरांच्या तुलनेत किती मजबुत आहे ह्याबद्दल चर्चा व्हावी म्हणुनच हा विषय मांडला.
आता एक विषयांतर करतो..वीजेबद्दल बघायचे झाल्यास आजही महाराष्ट्रात गुजरातपेक्षा जास्त वीजनिर्मीती होते..संपुर्ण भारतात महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. पण आपल्याकडे मागणीही जास्तच आहे. त्यामुळे आपल्याला तीही कमी पडते. अर्थात त्यामागची प्लानिंग सरकारने करायला हवी आणि त्याचा दोष महाराष्ट्र सरकारला आहेच. पण वीजनिर्मीती साठी अनेक रिसोर्सेस लागतात. काही काळानंतर त्यावर बंधने येतात. महाराष्ट्रात अजुन विजनिर्मीतीचे किती पोटेंशियल आहे ह्याबद्दल फारशी माहिती नाही. पण आता न्युक्लिअर आणि अपारंपारीक क्षेत्रावरच महाराष्ट्राला भर द्यावा लागणार. पण त्याची वीज महागात पडते. गुजरात प्रमाणेच हिमाचल, सिक्किम, त्रिपुरा, दिल्ली देखील वीजेच्या बाबतीत सरप्लस आहेत. पण त्यांच्या कडे वीजेची मागणी किती हेही पहायला हवे ना? रिसोर्सेस उपलब्ध असतील तर त्या त्या राज्याचे सरकार अतिरिक्त वीज निर्माण करुन ग्रिडला पुरवत असते. ज्यांच्याकडे कमी आहे ते त्या ग्रीडमधुन उचलतात. उद्या झारखंड म्हणेल की आम्ही खनिजांच्या पुरवठ्यामधे पहिल्या क्रमांकावर आहोत. अर्थात असणारच..किंवा असायलाच हवेत. नसले तर मग काहीतरी गोची आहे.
ही लिंक बघा
http://www.cea.nic.in/reports/monthly/inst_capacity/jun12.pdf
25 Dec 2012 - 6:02 am | विकास
आपण दिलेला दुवा नक्कीच माहितीपूर्ण आहे आणि तो सेंट्रल इलेक्ट्रीसिटी ऑथॉरीटीचा असल्याने अधिकृत देखील आहे. त्यात महाराष्ट्रासंदर्भात installed capacity of power utilities: 26499.35 MW इतके आहे. तर महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशनचा अधिकृत आकडा 9996 MW इतका दिला आहे. तसेच गुजरातच्या संदर्भात सेंट्रल अऑथॉरीटीचा आकडा 23086.74 MW इतका आहे तर गुजरात सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसारः Installed capacity of the State has increased from 315 MW in 1960-61 to 13144 MW in 2010-2011. इतका आहे.
थोडक्यात: सेंट्रल ऑथॉरीटीने दिलेल्या आकडेवारी पेक्षा दोन्ही राज्यांनी क्लेम केलेली आकडेवारी कमी आहे पण त्यांची तुलना केल्यास गुजरातची जास्त दिसते.
त्या व्यतिरीक्त दोन्हीच्या बाबतीत ही installed capacity of power utilities आहे. क्षमता आहे. क्षमता आहे आणि ती ९०+% वापरणे यात फरक आहे.
23 Dec 2012 - 2:22 am | निनाद मुक्काम प...
ह्या देशात वि पी सिंग ते गुजराल ते चंद्रशेखर ते वारसा हक्काने पंत पंतप्रधानपद राजीव व इंदिरा ह्यांना मिळाले , आता राहुल ह्यांच्या नावाचा अजून मधून नाव चर्चेत असते ,
मग मोदींनी असे काय पाप केले आहे.
ढोंगी निधर्मी वाद काय कामाचा.
गुजरात मध्ये मोदी ह्यांनी विकास केला की आधीच गुजरात चा विकास झाला होता हा मूळ मुद्दा नाही आहे.
गुजरात मध्ये दंगल झाली ,आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमाच्या गोध्रा मधील कार सेवकांचे
जळलेले मृतदेह दिसले नाही त्यांना मुस्लिम धर्मीय लोकांचे बळी गेलेले दिसले ,
अमेरिका , युके व जर्मनी ने गुजरात ह्या राज्यावर बहिष्कार टाकला.
तरीही गुजरात मधील जनता मोदी ह्यांच्या पाठीशी उभी राहिली , तेही तीन वेळा
हे सर्वात महत्त्वाचे आहे.
आज एखादा नेता फक्त त्यांच्या करिष्म्यामुळे राज्यात सलग तीन वेळा आपल्या पार्टीला बहुमत मिळवून देतो हे आजच्या घडीला कोणता अजून नेता करू शकतो ,
आहे का महाराष्ट्रात किंवा इतरत्र कोठे ,
प्रसारमाध्यमातील काही गटांनी मोदी ह्यांच्यावर निवडणूक पूर्व टीकेचे आसूड ओढले पण मतदान झाल्यावर मोदी जिंकणार हा अंदाज पण बहुतेक सर्वांनी वर्तवला , जो अचूक निघाला ,
भारतात एवढे अचूक व नियमितपणे सध्या फक्त बलात्कार व घोटाळे होतात,
अश्या वेळी शाश्वत असे बहुमत मिळवणारे मोदी भले ते एका राज्याचे का असेना जर मिळवत असतील तर त्यांच्या दावेदारीला आक्षेप का म्हणून घ्यावा.
ते पंतप्रधान झाले किंवा नाही झाले
एक हिंदू म्हणून गुजरात मध्ये त्यांनी दंगल पूर्व व नंतर परिस्थिती योग्य हाताळली असे माझे मत आहे ,
हे बहुदा तेथील बहुसंख्य स्थानिक जनतेचे मत असावे जे मतदानातून त्यांनी सिद्ध केले.
23 Dec 2012 - 11:59 am | अनामिका
सहमत १ परवा माझावर ते अंजारिया गृहस्थ मुसलमानांचे प्रतिनिधी म्हणुन बोलत होते....त्यांनी केले उघड उघड वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटले नाही पण खेद वाटला...त्यांचे म्हणणे "मुसलमान २००२ च्या दंगली साठी मोदींना कधीही माफ करणार नाहीत ..आंम्ही त्यांना तसे करुन देणार नाही" आता यावर प्रतिप्रश्न म्हणुन गोध्रा जळित कांडाचा संदर्भ प्रसन्न जोशींना देता आला असता पण नाही तसे केले तर सांप्रदायिक ठरले असते..."
असो यावर खल करुन तितका कमी......
25 Dec 2012 - 3:02 am | शैलेंद्रसिंह
मोदींनी पाप केलंय म्हणुन त्यांना पंतप्रधान होता येणार नाही असं इथे कोणीही म्हटलेलं नाहिये..किंवा ते गुजरातच्या निवडणुका जिंकतात म्हणुन त्यांना पंतप्रधान होता येणार असंही लिहिलेलं नाहीये. उगाच इतकी चिडचिड कशाला? बाकी सलग निवडणुका जिंकलेले लोकं आहेत अजुनही. त्याचा उल्लेख मी केलेलाच आहे. बहुसंख्यांच्या मताबद्दल बोलत असाल, तर ते अजुन राष्ट्रिय पातळीवर सिद्ध व्हायचे आहे. ह्या धाग्याचा विषय असा आहे की मोदींची पंतप्रधानपदाची दावेदारी किती प्रबळ आहे ह्याचा उहापोह करणे. त्यावर मी माझंही मत मांडलं की त्यांना फ़ारसा चांस नाही. त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणुन जाहीर केलं तर ते कसे भाजपाचं किंवा रालोआचं सरकार केंद्रात आणु शकतील ह्याबद्दल आपण थोडं लिहिलंत तर ते विषयाला धरुन होईल.
4 Apr 2013 - 6:18 pm | पिशी अबोली
+१
23 Dec 2012 - 1:00 pm | अनामिका
यशस्वी मोदीमंत्र, ‘ओम नमोनम:’ गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सहज विजय मिळवणार हे गृहित होते आणि ते फ़क्त भाजपाचे गृहित नव्हते; तर अगदी त्यांना संपवायला टपलेल्या सेक्युलर पक्ष व माध्यमांचेही तेच गृहित होते. म्हणूनच गुरूवारी निकाल लागल्यावर जे आकडे गुजरातमधून समोर आले, त्यात काहीच अनपेक्षित नव्हते. जी स्थिती आधीच्या विधानसभेत होती, तशीच कायम राहिली. मोदी वा त्यांच्या चहात्यांना मोठी बाजी मारू अशी अपेक्षा असेल; तर मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला म्हणावे लागेल. पण अन्यथा मोदी यांनी सलग तिसर्यांदा मिळवलेले यश खरेच दैदिप्यमान आहे. निदान आता तरी कोणी त्यांच्यावर हिंदूत्वाचा मुखवटा लावून निवडणूक जिंकल्याचा आरोप करू शकणार नाही. पण ज्यांना नाक मुरडायचेच असते, त्यांना कारण नव्हेतर निमित्त हवे असते, तेव्हा मोदींचा विजय केवळ हिंदू मतांवरच झालेला आहे; असे म्हटले जाणार यात शंका नाही आणि त्याची सुरूवात निकालाची दिशा स्पष्ट होताच झाली होती. खरे तर त्याच्या आधीच झाली होती. उमेदवार याद्या जाहिर झाल्या; तेव्हाच त्यात एकही मुस्लिम उमेदवार नाही, अशी तक्रार करण्यात आली आणि ती सुद्धा जातियवादाच्या विरोधात बोलणार्यांनी केली, हे लक्षात घेतले पाहिजे. एका बाजूला म्हणायचे, की मोदी मुस्लिम विरोधक आहेत आणि दुसरीकडे त्यांनी मुस्लिम उमेदवार उभा केला नाही; म्हणूनही तक्रार करायची. पण जो आरोप मोदी यांच्यावर झाला; तो कॉग्रेसवर सुद्धा होऊ शकतो. दहा टक्के मुस्लिम लोकसंख्या असूनही कॉग्रेसने गुजरात विधानसभेसाठी दहा मुस्लिम उमेदवारही उभे केले नाहीत. मग कॉग्रेसला हिंदूत्ववादी का म्हणू नये?
असो. तो वादचा विषय नाही. कारण दहा वर्षात खुद्द मोदींनी त्या आरोपांना उत्तरे दिली आहेत आणि त्याकडे हल्ली साफ़ दुर्लक्ष केलेले आहे. शिवाय गुजरातमध्ये त्यांनी जवळपास निम्मे मते मिळवली आहेत. पण यावेळी गुजरातच्या विधानसभेसाठी मतदान होणार असले तरी त्याकडे दिड वर्षांनी येणार्या लोकसभेची पूर्वतयारी म्हणून बघितले जात होते. त्या निवडणुकीत मोदी हे भाजपा व एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील काय; ही चर्चा मागल्या दोन वर्षापासून सुरू झाली आहे. त्याच चर्चेच्या संदर्भात गुजरातच्या निवडणुकीला महत्व होते. जर पुन्हा दणक्यात गुजरात जिंकला, तर मोदी थेट पंतप्रधान पदाचे दावेदार होतात; असे माध्यमांनीच सातत्याने चर्चेतून समोर आणले आहे. त्याबद्दल मोदी वा भाजपाला छेडण्याचा प्रयत्न झाला; तरी त्यांच्याकडून अशा चर्चेला प्रतिसाद मिळालेला नाही. पण राजकारणात कधी, कोणी अशा सर्वांना सांगुन चाली खेळत नसतो. मग मोदी त्याला कसे अपवाद असतील? त्यांनीही सध्या माझ्यासमोर गुजरात हेच उद्दीष्ट आहे; असे सांगून माध्यमांच्या तोंडाला पाने पुसली. तर भाजपा नेत्यांनी असे निर्णय पक्षात चर्चा करून घेतले जातात; म्हणत प्रश्नाचे उत्तर नेहमी टाळले. पण मोदी यांची देहबोली आणि एकूण हालचाली बघितल्या, तर त्यांची दिल्लीच्या दिशेने सुरू केलेली वाटचाल लपलेली नाही. त्यांनी तसे सांगण्याची गरज नाही. आणि तसे झालेच, तर दिड वर्षांनी म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काय होईल?
एका वाहिनीच्या चर्चेत गुजरातचा पराभव पचवू न शकलेले व तोंडाळ असलेले नेते मणीशंकर अय्यर यांनी कॉग्रेसतर्फ़े मोदींच्या उमेदवारीचे स्वागतच केले. तेव्हा त्यात उपरोध भरलेला होता. मोदी यांना उमेदवार केल्यास भाजपाप्रणित एनडीए आघाडीत फ़ुट पडू शकते; असे त्यांना सुचवायचे होते आणि माध्यमातील सेक्युलर मंडळींचेही तेच मत आहे. त्यामुळे मोदी हा भाजपामध्ये आजतरी सर्वात प्रभावशाली व लोकमतावर प्रभाव पाडू शकणारा नेता आहे, याबद्दल कोणाचे दुमत नाही. पण त्यांच्यावर गुजरातच्या दहा वर्षापुर्वीच्या दंगलीचे डाग ( हेच कॉग्रेस वा अन्य कोणाच्या बाबतीत बोलतांना आरोप) असल्याने मोदींना पंतप्रधान पदासाठी पुढे केल्यास भाजपाला मुस्लिम मतांसाठी मुकावे लागेल, अशी भिती घातली जाते. दुसरीकडे भाजपा हिंदूत्व मानणारा पक्ष असल्यानेच त्याला मुस्लिम मते मिळणार नाहीत वा मिळत नाहीत असाही दावा आहे. मग ज्याला मुस्लिम मते मिळतच नाहीत, त्याने मोदींना उमेदवार केल्याने मुस्लिम मते गमवावी लागतील; म्हणून घाबरायचे कशाला? पण हे सामान्य माणसाला पडणारे प्रश्न वाहिन्या व माध्यमातील बुद्धीमंतांना कधी पडत नाहीत. आरोप असल्याने वा बदनाम असल्याने मते मिळत नाहीत हा दावा कितपत खरा असतो? त्याची तपासणी करून बघण्याची माध्यमातल्या शहाण्यांना आजवर गरज भासलेली नाही. ती त्यांनी केली असती, तर भ्रष्टाचारासह कसलेही आरोप असले म्हणुन सामान्य माणुस आपले मत बनवताना किंवा मतदान करताना; त्याचा विचार करत नाही, तर समो्र असलेल्या पर्यायातून निवड करतो, हे सत्य आहे. तेच गुजरातमध्ये घडले, तेच उत्तरप्रदेशमध्ये झाले आणि तेच मागल्या लोकसभा निवडणुकीतही झाले होते. अगदी ताज्या निवडणूका घेतल्या, तरी त्याची मोठी साक्ष हिमाचल प्रदेशच्या निकालातून समोर येते. तिथे कॉग्रेस कोणाच्या नेतृत्वाखाली जिंकली आहे?
वीरभद्र सिंग हे हिमाचलचे दांडगे कॉग्रेस नेता आहेत. या निवडणूका होण्याआधी ते केंद्रिय मंत्रीमंडळात मंत्री होते. त्यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने त्यांना पंतप्रधानांनी मंत्रिमडळातून वगळले होते. पण त्यांच्याखेरीज हिमाचलची लढाई लढवू शकेल, असा दांडगा नेता दुसरा नसल्याने तात्काळ त्यांनाच प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले. त्यावेळी याच दिल्लीत बसलेल्या माध्यमांनी कल्लोळ माजवला होता. भ्रष्टाचारासाठी ज्याला केंद्र सरकारा्मधून हाकलला, त्यालाच निवडणुकीची धुरा देऊन कॉग्रेसने आत्महत्या केली; असे निष्कर्ष याच दिल्लीतून पोपटपंची करणार्या वाहिन्यांवरील जाणकारांनी केली होती. त्यामुळे काय झाले? कॉग्रेसला हिमाचल गमवावे लागले का? तेवढेच नाही. याच निवडणुकीच्या तोंडावर कॉग्रेसने गॅस इंधन अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये भरघोस दरवाढ केली. त्याचाही विपरित परिणाम मतदानावर होणार अशी भाकिते होती. त्याचे काय झाले? हिमाचलमध्ये कॉग्रेस जिंकली आहे. मग त्या मतदाराने भ्रष्टाचाराला मत दिले असे समजायचे काय? गुजरातमध्ये लोकांनी पुन्हा मोदी यांना निवडून दिले, तेव्हा त्यांच्या हिंदूत्वाला किंवा मुस्लिम विरोधी दंगलबाजीला मते दिली आहेत काय? असे अजिबात नसते. सामान्य मतदार आणि वाहिन्यांसह माध्यमातले शहाणे; यांच्यात जमीन अस्मानाचा फ़रक असतो. मतदार व्यवहारी शहाणपणा करत असतो तर माध्यमातल्या शहाण्यांना वास्तवातल्या व्यवहाराशी कर्तव्य नसते. त्यांचे ज्ञान पुस्तकी असते. तसेच अंदाज आडाखेही पुस्तकीच असतात. त्यामुळेच माध्यमांना नेहमी तोडघशी पडायची वेळ येते. पण मुद्दा तो नसून या निकालांचा अर्थ काय व त्याचा भावी भारतिय राजकारणावर होणारा परिणाम काय; हा खरा प्रश्न आहे.
राजकारण असो किंवा अन्य कुठलाही व्यवहार असो, त्यात जो नियम एका समिकरणाला लागतो, तोच दुसर्याही समिकरणाला लागत असतो. इथे जो नियम हिमाचलमध्ये वीरभद्र सिंग यांना लागतो, तोच मग गुजरात वा इतरत्र नरेंद्र मोदी यांना लागत असतो. वीरभद्र सिंग यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकारमधून काढावे लागले; तरी त्यांना मते मिळू शकली, याचे कारण आरोपांना मतदार महत्व देत नाही, तर उपलब्ध असलेल्या पर्यायातून निवड करतो. हिमाचलमध्ये बदल करायचा होता आणि मतदारासमोर एकमेव पर्याय कॉग्रेस हाच होता. मग त्याचा नेता वीरभद्र आहे किंवा त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत; याच्याशी मतदाराला कर्तव्य नसते. त्याने तोच पर्याय निवडला. त्यामुळेच आरोप असूनही वीरभद्र सिंग कॉग्रेसला यश मिळवून देऊ शकले आहेत. आणि असे पहिल्यांदाच घडलेले नाही. उत्तरप्रदेशमध्ये वेगळे काहीही घडलेले नाही. तिथे लोकांसमोर दोन्ही पर्याय भ्रष्टच होते. मागल्या खेपेस त्यांनी मायावती यांना कौल दिला. मुलायम यांना हटवले होते. पाच वर्षे उलटून गेल्यावरही अन्य पर्याय कॉग्रेस वा भाजपा त्यांच्या समोर उभे करू शकले नाहीत. मग त्या मतदाराने काय करावे? त्यांनी आधीच भ्रष्टाचारी म्हणून हटवलेल्या मुलायमच्या पक्षाची निवड केली. पर्याय भ्रष्ट वा जातियवादी यातून निवडायचा नसतो. कोण शासन करू शकतो, कोण राज्य चालवू शकतो, या निकषावर लोक आपले मत बनवत व देत असतात. मुलायमला मस्ती आली; तेव्हा त्याला बाजूला करायला मायावतींवर भ्रष्टाचाराचे आरोप असूनही संघटित असलेल्या बसपाकडे मतदार वळला होता. त्यांना पाडायची वेळ आली तेव्हा पुन्हा मतदार संघटित अशा मुलायमच्या समाजवादी पक्षाकडे वळला. त्याने राहुल गांधींच्या स्वप्नांना दाद दिली नाही.
पाच वर्षापुर्वी मुलायमला संपवण्याची क्षमता कॉग्रेस वा भाजपामध्ये नव्हती आणि पाच वर्षानंतर मायावतींना रोखण्याची ताकदही त्या दोन्ही पक्षात नव्हती. ज्याला हटवायचे आहे, त्याला पराभूत करण्याची क्षमता व नेतृत्व कुठल्या पक्षात आहे; त्यानुसार तरंगता मतदार वळत असतो आणि तोच निर्णायक कल देत असतो. आज संसदेतील बहूमतासाठी मनमोहन सरकार सीबीआयचा वापर करून मुलायम वा मायावती यांना आपल्या बाजूला झुकवते असे उघडपणे म्हटले जाते, त्याचा अर्थ काय? दोघे भ्रष्ट आहेत व त्यांची प्रकरणे सीबीआयकडे आहेत, असाच अर्थ होतो ना? मग उत्तरप्रदेशच्या मतदाराने त्यांनाच इतकी मते का दिली? तुलनेने भ्रष्ट नसलेल्या कॉग्रेस वा भाजपाकडे पाठ का फ़िरवली? तर या दोन्ही दुबळ्या पक्षांकडे संघटना व ठराविक मतदार नक्कीच आहे. पण पारडे झुकवणारा निर्णायक मतदार हा नेता व क्षमता बघूनच मते देतो व पारडे फ़िरवत असतो. ती क्षमता असलेले नेते भाजपा कॉग्रेसने स्वत:च नामशेष केले आहेत. म्हणून उत्तरप्रदेशचे राजकारण माया मुलायम यांच्या भोवती केंद्रीत झाले आहे. वाजपेयी बाजूला झाल्यावर देशभरच्या लोकसंख्येला समान व व्यापक भुरळ घालू शकेल; असा नेता नसल्याने भाजपा मागे पडला होता. ती जागा अडवाणी यांना भरून काढता आली नाही. पण मोदींमध्ये ती क्षमता आहे. त्यांना पंतप्रधान पदाचा म्हणजे भाजपाचा राष्ट्रीय नेता बनवल्यास; त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जिंकण्याची इर्षा निर्माण करायची क्षमता मोदीमध्ये आहे. आणि ती इर्षा निर्माण झाली मग मरगळलेली संघटना चमत्कार घडवू शकत असते. मुलायम, मायावती, ममता, पटनायक, जयललिता अशा नेत्यांचे यश म्हणजे त्यांचे पक्षातील निर्विवाद स्थान होय. गुजरातमधील भाजपाचे यश म्हणूनच पक्षापेक्षा मोदींचे व्यक्तीगत यश आहे. पक्षावरिल त्यांची निर्विवाद हुकूमत; त्यांच्या यशाचे खरे गमक आहे. जी त्यापुर्वी केशूभाई पटेल वा सुरेश मेहता असे मुख्यामंत्री दाखवू शकले नव्हते. अटलबिहारी वाजपेयी त्या निर्विवाद स्थानी पोहोचले होते आणि अडवाणी यांना ते साधले नाही. पण दहा वर्षात गुजरातमध्ये केलेल्या कामाच्या बळावर देशभरच्या भाजपा कार्यकर्त्यांना तसा हुकूमत असलेला व निर्विवाद नेता मिळाला असे वाटू लागले आहे. आणि तीच मोदी यांची खरी ताकद आहे.
देशाची सत्ता मिळवण्याची कल्पनाही भाजपाने १९९६ सालात केली नव्हती. पण संसदेतील सर्वात मोठा पक्ष होण्यापर्यंत मजल मारल्यावर मात्र अन्य पक्षांची मदत घेऊन सत्ता मिळवण्याच्या नादात पक्ष, कार्यकर्ता व आपल्या भूमिकांना भाजपाच्या दिल्लीतल्या नेत्यांनी तिलांजली दिली. तिथून त्याची वाढ थंडावली. हिंदूत्वाचा जो मुद्दा घेऊन भाजपाने १८६ खासदारांपर्यंत मजल मारली होती, त्याला सत्तेसाठी भाजपा नेतृत्वाने दगा दिला. सत्तेचे गणीत जुळवताना मतदाराला दिलेला शब्द सोडून दिला. मग तो मतदार गोळा करणार्या व मतदारांमध्ये वावरणार्या कार्यकर्त्याचा हिरमोड झाला होता. तिथून जी पक्षात मरगळ आली; तेव्हा तो पक्ष म्हणजे संघटना सत्तालोलूप नेत्यांच्या कब्जात गेली. सहाजिकच तो इतक्या यशापर्यंत घेऊन जाणारा भाजपा कार्यकर्ता निराश व निष्क्रिय झाला. त्याचे परिणाम मग पुढल्या निवडणुक निकालातून दिसले आहेत. पण असा कार्यकर्ता व मतदार पुन्हा सक्रिय झाला, तरच भाजपाला संसदेत मोठा पक्ष किंवा बहूमतापर्यंत मजल मारता येईल. ती मजल सेक्युलर चेहरा घेऊन मारता येणार नाही; तर हिंदूत्वाचा अजेंडा घेऊनच मारता येईल. आणि मोदी हाच त्यासाठीचा यथायोग्य नेता आहे. तो खमक्या, खंबीर व आपल्या भूमिकेवर ठाम उभा राहू शकणारा नेता आहे, अशी जी देशभरच्या भाजपा कार्यकर्त्यांची धारणा आहे, तिथूनच भाजपाचे पुनरुज्जीवन सुरू होऊ शकते. मुस्लिम मते देणार नाहीत, यावरचा उपाय मोदींनी गुजरातमध्ये दाखवला आहे. मुस्लिमांशिवाय पुरेशा मतांचा गठ्ठा उभा केला, तर बहूमतापर्यंत मजल मारता येते; हे त्यांनी तीनदा दाखवून दिले आहे. सवाल आहे तो तोच प्रयोग देशभर यशस्वी होऊ शकतो का?
देशभर पसरलेल्या लोकसभा मतदारसंघांचे गणित मांडले तर त्याचे उत्तर मिळू शकते. दिल्ली, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, हिमाचल, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात भाजपाकडे चांगले संघटन व लढायची कुवत आहे. त्यात साडेतीनशेच्या आसपास जागा आहेत. याखेरीज हरयाणा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यामध्ये कॉग्रेस विरोधी पक्षांचे प्राबल्य आहे व ते भाजपासोबत येऊ शकतात. त्या राज्यातल्या जागांची संख्या सव्वाशे होते. म्हणजेच साडे चारशे लोकसभेच्या जागा अशा आहेत, की ज्यावर भाजपा बहूमताचे गणित मांडू शकते. मोदींमुळे जर अन्य सेक्युलर मित्र पक्ष सोबत आले नाहीत, तरी यातल्या भाजपा किमान साडेतीनशे जागी तुल्यबळ लढ्त देऊ शकतो. आणि मोदी विरुद्ध जेवढा हिंदू विरोधी प्रचार होईल; त्याचा हिंदूत्वाची मतपेढी निर्माण व्हायला हातभार लागतो. म्हणूनच मग या साडेतीनशे अधिक अन्य राज्यातील पन्नास जागा मिळून चारशे जागी भाजपा स्वतंत्ररित्या लडू शकतो. अगदी हिंदूत्वाच्या अजेंड्यावर लढू शकतो. नुसता लढू शकत नाही, तर अपप्रचारामुळे हिंदूत्वाची मते मिळवून दोनशे ते सव्वा दोनशे जागांपर्यंत मजल मारू शकतो. पण इतके धाडस करायला मोदी वगळता अन्य नेत्याचे ते काम नाही, हे सुद्धा स्पष्टच आहे. मग दोनशे किंवा त्यापेक्षा अधिक जागा मिळवणार्या पक्षाला सेक्युलर नाही म्हणून टाळणे अन्य पक्षांना शक्य होणार नाही. त्यांनाही हिंदूत्वाचा अजेंडा स्विकारावाच लागेल, जसा गुजरातमध्ये कॉग्रेसने स्विकारला आहे. गेल्या तीन निवडणूकीमध्ये कॉग्रेसच्या मुस्लिम उमेदवारांची संख्या गुजरातमध्ये १७ वरून सात इतकी खाली आलेली आहे. यावेळच्या निवडणुकीत त्या पक्षाने मुस्लिम हा शब्दही उच्चारायचे टाळले. हे कशाचे लक्षण आहे?
ज्याची प्रतिमा खंबीर, धाडसी व निर्णय घेऊ शकणारा नेता अशी आहे आणि ज्याच्यावर कुठला भ्रष्टाचाराचा आरोप होऊ शकत नाही. ज्याने सुरक्षित आणि घातपात विरहित कारभाराचा दाखला दिलेला आहे; अशी मोदींची प्रतिमा आहे. आज तीच देशभरच्या मध्यमवर्गाला भुरळ घालते आहे. पण त्याच्याही पलिकडे हा माणूस जातो तिथे भाजपासह हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांना तो आकर्षित करून घेतो. आणि हळूहळू मुस्लिम समाजातही त्याच्याविरुद्धच्या भावनेचा पुनर्विचार सुरू झालेला आहे. मग मोदी यांना को्ण रोखू शकणार आहे? जर वीरभद्र सिंग इतके आरोप असताना जिंकू शकतात, तर दहा वर्षापुर्वीच्या दंगलीचे आरोप मोदींना रोखू शकतील काय? ज्याला सेक्युलर माध्यमे कलंक म्हणतात, तीच बाब देशाच्या अन्य भागात आणि हिंदू समाजात मोदींसाठी शक्तीस्थान असेल तर मग भाजपासमोर पर्याय उरतो काय? एक आहे, कदाचित सेक्युलर पक्ष त्यांच्या विरोधात एकवटतील, पण मग संपुर्ण देशाचा गुजरात होणार नाही का? आणि मोदी तशा स्थितीत बाजी मारण्यात वाकबगार आहेत. मोदी विरुद्ध इतर असा सामना होण्याची शक्यता असली तर मोदींना ती हवीच असेल. कारण मग खरेच देशभरच्या मतांचे धृवीकरण होईल आणि जिथे आजही भाजपा दुर्बळ आहे; तिथेही त्याला पाय रोवण्याचे काम सोपे होईल. १९९८ नंतर भाजपाने सेक्युलर होण्याचा प्रयत्न सुरू केला; त्यातच त्याने आपला शक्तीक्षय करून घेतला. आपला कार्यकर्ता व पाठीराखा मतदार यांच्यापेक्षा भाजपाचे नेते माध्यमांच्या आहारी जाऊन सेक्युलर नाटक करू लागले, त्यातून त्यांचा हिंदूत्व पाठीराखा नाराज होऊन अलिप्त झाला आणि सेक्युलर म्हणतात, तसला पाठीराखा त्यांच्याकडे आलाच नाही. त्यातून बाहेर पडायचे तर त्या पक्षाला मोदींसारख्या खमक्या व आक्रमक करिष्मा असलेल्या नव्या चेहर्याचीच गरज आहे, आणि आरोप असून मतदार त्याकडे पाठ फ़िरवतो व जवळचा पर्याय निवडतो, हेच अलिकडल्या निवडणूक निकालांनी सिद्ध केले आहे. कॉग्रेस व युपीएला पराभूत करू शकेल, असा पर्याय मतदारासमोर मांडला तरच त्याला दाद मिळू शकेल. सेक्युलर वगैरे पुस्तकी गोष्टी असतात. तो अभ्यासकांचा विरंगुळा किंवा टाईमपास असतो. त्याचा मतदार वा मतदानाशी संबंध नसतो. हे मोदी उत्तम जाणून आहेत. म्हणूनच पुढल्या काही महिन्यात ते दिल्लीच्या दिशेने वाटचाल करायचे, डावपेच खेळू लागतील. त्याची सुरूवात त्यांनी गुजरातमधून केली आहे. ‘ओम नमो नम:’ हा मंत्र गुजरातमध्ये गेले काही महिने चालू आहे. त्यातला ‘नमो’ म्हणजे नरेंद्र मोदी यातली अद्याक्षरे होत. आज मोदींच्या गुजरातमधील विरोधकांना तोच मंत्र म्हणायची वेळ आली आहे. उद्या कोणावर येईल?
भाऊ तोरसेकर
( प्रसिद्धी :प्रवाह, रविवार पुरवणी पुण्यनगरी २३/१२/१२)
14 Feb 2013 - 3:24 am | आजानुकर्ण
भाऊ तोरसेकर यांचा लेख आम्हाला उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद. ह्या लेखाबद्दल आमचे आभार त्यांनाही कळवा.
23 Dec 2012 - 5:31 pm | श्रीगुरुजी
"गेल्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेला त्यांनी जिथे जिथे प्रचार केला त्या बहुतेक ठिकाणी युतीचा पराभव झाला. "
२००९ च्या महाराष्ट्रातल्या विधानसभेची आकडेवारी अशी आहे.
एकूण जागा - २८८
बहुमतासाठी आवश्यक जागा - १४५
काँग्रेस + राष्ट्रवादी = १४४
भाजप + शिवसेना + शेकाप = ४४ + ४६ + ४ = ९४
मनसे - १३
इतर - उरलेल्या जागा
तब्बल २५ जागांवर शिवसेना-भाजप व मनसेच्या एकत्रित मतांची बेरीज काँग्रेस + राष्ट्रवादीला मिळालेल्या मतांपेक्षा अधिक होती. पण मतांची विभागणी झाल्यामुळे या जागा कॉं+राकाँ कडे गेल्या. अन्यथा भाजप-शिवसेना-शेकापच्या एकूण जागा ३८ ने वाढून (मनसेच्या १३ + ह्या २५) १३२ झाल्या असत्या व काँग्रेस्-राष्ट्रवादीकडे ११९ जागा असत्या. भाजप-शिवसेनेने आपल्या वैयक्तिक अहंकारातून गुहागर (जिथे डॉ. श्रीधर नातू व रामदास कदम एकमेकांविरूद्ध लढून राष्ट्रवादीला विजय मिळवून दिला आणि औरंगाबाद (जिथे शिवसेनेच्या जैस्वाल यांनी बंडखोरी करून शिवसेनेलाच पाडले) अशा २ जागा फुकट गमाविल्या. म्हणजे भाजप्-शिवसेनेच्या २००९ मधल्या पराभवाचे मुख्य कारण मोदींनी केलेला प्रचार हे नसून मनसे व वैयक्तिक अहंकार हे कारण आहे.
24 Dec 2012 - 11:46 pm | तर्री
(जिथे डॉ. श्रीधर नातू व रामदास कदम एकमेकांविरूद्ध लढून राष्ट्रवादीला विजय मिळवून दिलाडॉ. श्रीधर नातू हे अत्यंत सालस , मनमिळावू आणि कार्यक्षम आमदार होते. ते इ.स.२००० च्या आसपास वारले.
23 Dec 2012 - 10:02 pm | श्रीगुरुजी
"याच निवडणुकीच्या तोंडावर कॉग्रेसने गॅस इंधन अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये भरघोस दरवाढ केली. त्याचाही विपरित परिणाम मतदानावर होणार अशी भाकिते होती. त्याचे काय झाले? हिमाचलमध्ये कॉग्रेस जिंकली आहे."
स्वयंपाकाचे पहिले ६ सिलिंडर ४३० रू. या दराने मिळणार आहेत. उरलेले ९५० रू. या दराने. हे धोरण जेमतेम २ महिन्यांपूर्वी सुरू झाले. हिमाचलमध्ये ४ नोव्हेंबरला निवडणुक झाली. तेव्हा मिळणारा सिलिंडर ४३० रू. नाच मिळत होता. ९५० रूपयांचे सिलिंडर साधारणपणे जानेवारीपासून घ्यावे लागतील व तेव्हाच जनतेला सिलिंडरच्या महागाईची खरी जाणीव होईल. ४ नोव्हेंबरला मत देताना जुन्या दरानेच सिलिंडर मिळत असल्याने हा मुद्दा फारसा पुढे आला नसावा. पण हीच निवडणुक २०१३ मध्ये झाली असती तर नक्कीच हा मुद्दा महत्त्वाचा ठरला असता.
23 Dec 2012 - 11:12 pm | आशु जोग
>अत्यंत विनोदी लेख.
या लिखाणाला लेख म्हटल्यबद्दल परा यांचा निषेध
बादवे
असे लिखाण करायला फार अभ्यास आणि दृष्टी लागते
23 Dec 2012 - 11:17 pm | आशु जोग
या लेखात एका समाजाचा जो केवळ एक वोटबँक म्हणून विचार केलाय
तो निंदनीय वाटतो.
इथे प्रत्येक मनुष्य स्वतंत्र आहे आणि त्याने आपल्या बुद्धिला पटेल त्याप्रमाणे निर्णय घ्यावा
24 Dec 2012 - 11:11 am | श्रीगुरुजी
"अगदी अगदी नारोबांच्या हुशारी बद्दल अजिबात शंका नाही...."
भाजप-शिवसेनेने ऑक्टोबर १९९९ मध्ये महाराष्ट्राची सत्ता घालविली. त्यानंतर पुढील २-३ वर्षे मार्चमध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला गेला की नारोबा लोकसत्तामधून एक प्रदीर्घ लेख लिहून व त्यात बरीच आकडेवारी देऊन अर्थसंकल्पाचे विश्लेषण करून चिरफाड करायचे. आपल्या राजकीय कार्कीर्दीत नारोबांनी सन २००० पूर्वी व २००२ नंतर अर्थसंकल्प व अर्थशास्त्र या विषयांवर असे अभ्यासपूर्ण लेख लिहिल्याचे आठवत नाही. नारोबांचे व्यक्तिमत्त्वही असे कधीच अभ्यासू वाटले नाही. त्यावेळी अशी एक वदंता होती की यामागचा 'लिहवता' धनी कोणीतरी वेगळाच आहे.
24 Dec 2012 - 11:36 pm | रमेश आठवले
http://www.ndtv.com/article/india/in-india-a-dangerous-and-divisive-tech...
नरेंद्र मोदी यांच्यावर तारीख २४.१२.१९१२ ला new york times मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचा धागा वर दिला आहे.
25 Dec 2012 - 1:23 am | खटासि खट
२] विकासपुरुष ही प्रतिमा त्यांनी जी निर्माण केलीय ती फ़क्त एक जाहीरातबाजी आहे. त्यांनी आर्थिक वाढ निश्चितच घडवुन आणलीय, आर्थिक विकास मात्र नाही.
लेखक महाशय, आपल्या बद्दलचा आदर वाढीस लागलेला आहे. या आदरापोटीच विचारावंसं वाटतंय कि इंदिरा गांधी यांच्या जमान्यात आणि राजीव गांधी यांच्या जमान्यात प्रत्येक काम त्यांनीच केलं सरकारी दूरदर्शनवरून दाखवलं जात असे त्याचे पैसे कोण भरत असे ? दूरदर्शनचं नाव राजीवदर्शन असं पडल्याचं ऐकतो ब्वॉ ! अग्नी कि उपलब्धी मे ही भारत का.... बाजूला राजीवजींची हसरी मुद्रा !
बाकि तुमच्या भाजप इ काँग्रेस वादात इंटरेस्ट नाही पण आदर वाढीस लागलाच आहे तर एक शंका विचाराविशी वाटते. मोदी किंवा भाजपाच्या आधी गुजरातेत कुणाची सत्ता होती ? मतदार कृतघ्न होते का तिथले ? नारायणदत्त तिवारींच्या दैदीप्यमान कारकिर्दीचा आदर्श मोदींनी घ्यावा कि जगन्नाथ मिश्र यांच्या? उप्र आणि बिहारचा आजचा तोंडात बोटं घालायला लावणारा विकास यांनीच तर केला.
एक अडाणी, अशिक्षित बिहारी मजूर म्हणत होता इन काँग्रेसवालों से तो लालू अच्छा ! कम से कम लोगोंको अपने होने का अहसास तो दिलाया !! जौ द्या.. अडाणीच तो. आपल्यासारख्या आदरणिय हस्तीस हे सांगून काय मिळणार ?
25 Dec 2012 - 2:52 am | शैलेंद्रसिंह
बरं...मग तुम्हाला ते राजीवदर्शन योग्य होतं असं म्हणायचंय का? अडाणी, अर्धशिक्षित लोकांना गांधी-नेहेरु घराणे जसे मायबाप वाटायचे तसे आता काहींना मोदी वाटताहेत. बाकी तुम्ही योग्य analogy दिलीत. बऱ्याच मंडळींना कदाचित आता मोदी काय करताहेत हे समजेल.
25 Dec 2012 - 11:16 am | खटासि खट
मानवी विकास निर्देशांक, आर्थिक वाढ कि विकास अशा अनेक मुद्यांचा एकाच वेळी घोळ झालाय महाराज. लेख नेहमी तटस्थ असावा तर स्विकारायला सोपं जातं. मानवी विकास निर्देशांक ही संकल्पना जर गांधी नेहरू काळात असती तर देशाची किती नाचक्की झाली असती याची कल्पनाही करवत नाही. सरकारने मनात आणलं तर काय होतं हे कसाबच्या फाशी प्रकरणात सिद्ध होतं. आणि मनावर घेतलंच नाही तर काय होतं हे टू जी स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळा, गोदावरी बेसीन गॅस घोटाळा (हा सर्वात महाभयंकर घोटाळा असावा), आशियाई गेम्स घोटाळा इ. इ. न संपणा-या मालिका दिसतात. या सर्वांकडे काणाडोळा करून सातत्याने एकांगी लिखाण येऊ लागलं तर ते कसं पचेल ? काँग्रेसने बंदीस्त अर्थ्व्यवस्थेत फक्त गांधीजींच्या जवळ असणा-या मूठभर घराण्यांचा विकास होईल अशी धोरणे आखली. जमनालाल मेहता, जमनालाल बजाज, मोदी, बिडला, टाटा या सर्वांनी काँग्रेसला साथ दिली, गांधींना साथ दिली आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने यांना साथ दिली. देशाचा अर्थसंकल्प टाटांना दाखवल्यावर शेवटचा हात फिरवला जात असे अशी एक वदंता होती. त्यात तथ्याचा अंश असण्याची शक्यता असू शकते. कारण धोरणं कुणाला अनुकूल होती हे तुमच्यासारख्या अभ्यासू व्यक्तीला लगेचच समजून येईल. त्याच वेळी परदेशी गुंतवणूक खुली केली असती तर त्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापुढे बजाजची तिरकी करून स्टार्ट करावी लागणारी स्कूटर आणि धूर मारणारा टाटाचा ट्रक टिकले असते का ? स्पर्धाच नसल्याने वर्षानुवर्षे बजाजच्या स्कूटरसाठी वेटींंग असायचं. इतरांना परवानाच नाही अशा पद्धतीने हे उद्योग पुरेसे श्रीमंत झाल्यावर आणि पैसा खुळखुळायला लागल्यावर पुढच्या टप्प्यात त्यांना तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले. राजीव गांधींनी परदेशी कंपन्यांना थेट उत्पादने विकू नका... आमच्या देशातील या अग्रगण्य कंपन्यांबरोबर कोलॅबरेशन करून तुमची उत्पादने विका अशी अट घातली. यात या उद्योगांना जागतिक तंत्रज्ञान विनासायास उपलब्ध व्हावे आणि होंडा, सुझुकी, यामाहच्या समोर त्यांचा पालापाचोळा होऊ नये असा दुहेरी हेतू होता. तेव्हाही परवाना ठराविक लोकांनाच दिला गेला. अशा पद्धतीने धंद्याची हमी + फुकटात तंत्रज्ञान मिळून या कंपन्या जेव्हां स्वतःच्या पायांवर उभ्या राहील्या तेव्हांच उदारीकरणाची भाषा तुमच्या काँग्रेसवाल्यांनी सुरू केली. सोनं गहाण वगैरे बाता आहेत भीती दाखवायला.
तुमच्या अभ्यासाला वाव म्हणून पुष्कळ आहे करण्यासारखं. काँग्रेसच्या प्रत्येक टप्प्यात मानव विकास निर्देशांक किती विकसित झाला हे सरकारी ग्रंथालयातल्या उपलब्ध सर्वे आणि इतर आकडेवारीवरून काढायचं. त्याच वेळी मूठभर घराण्यांचा किती विकास झाला हे ही काढायचं. बघा जमतंय का ते ! असं काही बेसिक आणि कसदार असेल तर वाचायची तयारी आहे. उगाच पत्रकारांप्रमाणे पोपटपंची करणारे इथं पैशाला पासरी आहेत.
आपणा सर्वांबद्दल आदर आहेच तो आणखी वाढीस लागावा.
2 Jan 2013 - 11:46 am | शैलेंद्रसिंह
आग्रह नाहीये तुम्ही काही वाचावे म्हणुन. मोदींच्या भाटाप्रमाणे लिखाण करुन उगाच चर्चा भरकटवता आहात. इतरांनी चुका केल्या म्हणजे मोदी बरोबर ठरतात असं आहे का? तुम्हाला विषयही कळालेला दिसत नाहीये. कदाचित तुम्हाला पोपटपंची वाचायची सवय नसेल म्हणुन न वाचताच लिहित सुटला आहात.
2 Jan 2013 - 1:49 pm | खटासि खट
इतरांनी चुका केल्या म्हणजे मोदी बरोबर ठरतात असं आहे का? >>>
तर्कशास्त्रच समजलं नाही. उलट विचार करूयात, काँग्रेसच्या चुकांचे मूल्यमापन करायचेच नाही असा काही निश्चय केलाय का ? जे मुद्दे मोदी किंवा कुठल्याही गैरकाँग्रेसी नेत्याबद्दल काँग्रेसचे भाट मांडत असतात त्यांनी आरशात पहायला काय हरकत आहे ?
तुम्हाला विषयही कळालेला दिसत नाहीये >>>
हा विषय म्हणजे हिग्ज बोसॉनचा शोध आहे का न कळायला ? गूगल सर्च द्या किंवा कुठल्याही दिवसाचं वृत्तपत्र काढा. कुणी न कुणी हेच तर लिहीलेलं असतं. त्यात आपण पदरचं काय मूल्यवर्धन केलं हा साधा आणि सरळ सवाल आहे. कमी पडलं तर आजचा सवाल, झी रोखठोक आणि स्टार माझाच्या चर्चा आहेतच. या विश्लेषणाला काही हुषारी लागते असा तुमचा ग्रह असेल तर आपण इथून पुढे न भेटलेलंच बरं. तुम्हाला जरी राग आलेला असेल तरी जो अभ्यास सुचवला आहे तो गूगल वर उपलब्ध नाही म्हणूनच सकस असं वाचायला आवडेल असं म्हटलं होतं.
पटत नसेल तर राहू द्या. आदर वाढीस लागलेला होताच. आता परमोच्च पातळीकडे वाटचाल चालू आहे. Wish u Happy New Year 2013
3 Jan 2013 - 4:37 am | शैलेंद्रसिंह
मोदींची पंतप्रधानपदावरील दावेदारी एव्हढाच विषय आहे. एका राज्याचा मुख्यमंत्री पंतप्रधानपदाचा दावेदार कसा ठरतो ह्याच्या अनुषंगाने त्यांनी केलेली जाहिरातबाजी वगैरेची चर्चा सुरु होती. ह्यात मुद्दे उपस्थित होतात, त्यावर उत्तरे दिली जातात...वाद-प्रतिवाद होत जातो...हे होत असतांना वेगळ्या विषयाची चर्चा करायचा आग्रह कशाला? तुम्हाला काँग्रेसची चर्चा करायची असेल तर खुशाल करा..पण तो वेगळा विषय आहे...वेगळा धागा काढा ना. आम्ही पण लिहु तिथे. इथे मोदींविषयी लिहा..ते जो दावा करत आहेत त्याबद्द्ल काही मुद्दे मांडा..आकडेवारी द्या..उगाच चिडचिड कशाला?
तुम्हालाही Wish u Happy New Year .......आयुष्यभर सदैव आनंदी रहा
3 Jan 2013 - 6:04 am | खटासि खट
अच्छा अच्छा, आता आलं लक्षात.चिडचिड इथे फक्त तुमचीच होत आहे असं दिसतंय. तुम्ही आता विनोद देखील करू लागला आहात. तुम्ही विषय मांडून यज्ञ आरंभला आहे. तो तुमच्या विशफुल थिंकिंगप्रमाणे पुढे जावा. अडचणीत आणणारे मुद्दे नकोत तर. मग कशाला मानव विकास निर्देशांक मधे आणला ? क्ष व्यक्ती पंतप्रधानपदाची दावेदार नको हा विषय मांडताना आधीच्या य ने काय दिवे लावले होते ही तुलना तुमच्या मते विषय भरकटवणे आहे तर. इथेच तुमच्या निष्ठा उघड झाल्या आहेत. आता पुन्हा वेगळा विषय कशाला. हा यज्ञ तुम्ही आरंभला आहे म्हटल्यावर सल्ले तुम्हालाच मिळणार. प्रतिसादकांना आम्हाला हवे तसे प्रतिसाद द्या असे जाहीर सल्ले आंतरजालाच्या इतिहासात प्रथमच पाहण्यात आले आहेत. या अभिनव कामगिरीबद्दल आपण अभिनंदनास पात्र आहात. आदर आणखी वाढीस लागला आहे याची नोंद घेण्यात यावी.
ता.क. : पंतप्रधान कुणीही झाले तरी आम्हांस फरक पडत नाही. पोरांच्या शाळेच्या फिया आणि भाजीपाल्याचे दर काही उतरणारे नाहीत. आमचा आदर वाढीस लागणार आहे.
3 Jan 2013 - 9:55 am | शैलेंद्रसिंह
विषयाची तुमची समज बघुन कौतुक वाटले. आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी होतच असतं. नाविन्य हे हवेच. मुख्यमंत्र्याची बरोबरी पंतप्रधानांबरोबर करुन तुम्ही एकुणच चर्चेचं मुल्यवर्धन केलेलं आहेच. आम्ही मात्र मुख्यमंत्र्याची कामगिरी...त्याच्या राज्याची कामगिरी इतर मुख्यमंत्र्यांबरोबर-राज्यांबरोबर उगाच करुन उगाच मिडियात सांगितलेल्या गोष्टीच पुन्हा उगाळत होतो. पुन्हा पुन्हा तेच तेच वाचुन तुम्हाला जो त्रास झाला...त्यातुन जी चीडचीड झाली त्याबद्दल क्षमस्व.
3 Jan 2013 - 11:01 am | खटासि खट
हायला म्हणजे मुख्यमंत्री झाल्यावर पंतप्रधान होऊ नये असं तर नव्हतं ना म्हणायचं ? कि पंतप्रधानपदासाठी राज्यसभेवर निवडून येणे हा निकष आहे तुमच्या मते ? गोंधळ उडाला ब्वॉ ! देवेगौडा मॉडेल हे तुमचं आदर्श असेल तर काहीच म्हणायचं नाही. आमचं म्हणणं इतकं साधं आणि सोप्पं आहे ना कि बस्स. २०१४ मधे जी आघाडी बहुमतात येईल ती ठरवेल काय करायचं ते. मोदी पंतप्रधानपदाचे दावेदार का नसावेत हा तुमच्या लेखाचा विषय पचनीच पडेना. जो माणूस गुजरातमधे विकास करू शकतो तो देशाचा का नाही करू शकणार इतकं साधं गणित आहे आमचं. बरं तुम्ही मानव विकास निर्देशांक आणि काय काय बाता मारायला लागलात, त्या फुटपट्ट्या इतरांना लावायच्या नाहीत हे ही जाहीर करून मोकळं झालात. तुमच्या असल्या अप्पलपोट्या नियमांनी चालायला लोक काय रिकामटेकडे आहेत का ?
तुम्हाला झालेल्या चीडचीडीबद्दल कुणाची माफी मागताय ? स्वतःचीच ? हे तुफान विनोदी आहे. आपल्याइतका आदर याक्षणी कुनाबद्दलही वाटत नाहीये. प्लीज नोटच.
3 Jan 2013 - 11:23 am | शैलेंद्रसिंह
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान होऊ नये हे कुठेही म्हटलेलं नाही....एका मुख्यमंत्र्याच्या कामगिरीची तुलना दुसर्या मुख्यमंत्र्याशीच करायला हवी..राज्याची तुलना राज्याची..असो
आणि मानवी निर्देशांकांची गुजरातची तुलना इतर राज्यांबरोबर दिलेली आहे.
3 Jan 2013 - 11:52 am | खटासि खट
मानवी विकास निर्देशांक आत्ता आत्ता सुरू झालेला आहे. भारतात याआधी काँग्रेसचं राज्य होतं हे लेखकमहाशय सोडून इतरांना मान्य असावं. त्या काळात झालेल्या विकासाच्या असमतोलाने सर्वच निर्देशांकाच्या बाबतीत काहीच राजे अग्रस्थानी राहिली तर बिहार, उप्र, राजस्थान इ. राजे मागे राहिली. इशान्य भारत, उत्तराखंड अशांबद्दल बोलणेच नको. म्हणूनच मानवी निर्देशांकाच्या कसोट्या लावून काँग्रेसची प्रत्येक टप्प्यातली कामगिरी पाहिल्याशिवाय याबद्दल बोलणे शक्य नाही. गुजरात आज अकराव्या क्रमांकावर आहे. पूर्वी चिमणभाई पटेल असताना कितव्या क्रमांकावर होता हे पाहिल्याशिवाय मोदींची पिछाडी झाली कि आघाडी हे कसं काढता येणार ? तशी आकदेवारी उपलब्ध नाही असं आपलं आम्हाला वाटतं.
बाकि मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्यांचा प्रधानमंत्रीपदासाठी विचार होऊ शकत नाही हे वाचून भयंकर करमणूक झालेली आहे. कदाचित मोदींना रिझर्व बँकेच्या गवर्नरपदासाठी अर्ज करावा लागेल असं वाटतंय. त्यानंतर मग राज्यसभेवर निवड झाली तर मग कुठल्याही कामगिरीचा विचार करावा लागणार नाही असंच काहीतरी म्हणायचं असेल या महाराजांना. काय म्हणता मंडळी ?
3 Jan 2013 - 12:04 pm | शैलेंद्रसिंह
गुजरात मोदींच्या काळात दहाव्या क्रमांकावरुन अकराव्या क्रमांकावर आलेला आहे. अभ्यासाची गरज नक्कीच आहे...बाकी मुख्यमंत्री म्हणुन केलेल्या कामगिरीच्या जोरावर इतर समकालीन मुख्यमत्र्यांपेक्षा मोदी सरस कसे ह्याबद्दल लिहिले असते तर आणखी कौतुक वाटले असते.
3 Jan 2013 - 12:08 pm | खटासि खट
दहाव्या क्रमांकावरून अकराव्या क्रमांकावर आला कारण..
http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-06-02/india/31983641_1_...
बिहार आता अग्रस्थानी आहे. (फास्टेस्ट ग्रोईंग ).
3 Jan 2013 - 12:18 pm | शैलेंद्रसिंह
भारत ६% ने विकसित होतो तर अमेरीका २-३% ने. ह्यामुळे भारत अमेरिकेपेक्षा प्रगत बनत नाही. जे आधीच विकसित असतात त्यांचा विकासदर कमीच भासतो.
3 Jan 2013 - 12:24 pm | खटासि खट
आता आले मुद्यावर. गुजरात दहाव्या क्रमांकावर होता तेव्हा भाजपच होता. अकराव्या क्रमांकावर असतानाही भाजपच होता. पहिल्यापासून केंद्रातली गुंतवणूक महाराष्ट्रात जास्त झाली आहे. तेव्हां कदाचित चिमणभाई असताना गुजरात तिसाव्या स्थानावरही असू शकतो. सरदार सरोवर प्रकल्पानंतर गुजरातेत झालेली वाढ पाहता सर्वच निर्देशांकामधे सुधारणा झाली असावी. यासाठी आधीच्या आकदेवारीची गरज आहे.
3 Jan 2013 - 2:45 pm | प्रदीप
अत्यंत चांगल्या सुरू असलेल्या चर्चेच्या दरम्यान तुम्हा दोघांतील ह्या संवादातील वैयक्तिक टिपण्णी दुर्दैवी आहे.
वास्तविक शैलेंद्रसिंह ह्यांनी खटासि खट ह्यांनी विशेष टोकेपर्यंत बर्याच सहनशीलतेने ह्या धाग्यावरील चर्चा सुरू ठेवली होती. 'धागा विनोदी आहे' अशी इतर काहींची उडवाउडवीची टीका त्यांनी मनावर घेतली नाही. बर्याच असंबंद्ध उपचर्चांत त्यांनी भाग घेतला नाही. धाग्यावरील चर्चेच्या दरम्यान त्यांनी काही विचार करण्यायोग्य माहितीपूर्ण दुवे दिले,आताही ती त्याच संयमाने सुरू ठेवावी अशी मी आपणां दोघांस विनंती करतो.
हे शैलेंद्रसिंह ह्यांनीच वर म्हटले आहे. त्यावर खटासि खट ह्यांनी त्यांना समजली तशी ह्या क्रमाच्या घसरणीची कारणमीमांसा सांगितली. तेव्हा आता शैलेंद्रसिंहांचा त्यावरील हा प्रतिवाद मला समजलेला नाही. भारतातील राज्यांच्या तुलनात्मक HDI ची क्रमवारी लावावयाची, की नाही? ती तशी लावायचीच म्हटले तर एकाद्या राज्याच्या HDI मध्ये घसरण होणे/ वृद्धिंगत होणे हे त्या राज्याच्या परफॉर्मन्सप्रमाणे इतर राज्यांच्या ह्याच काळातील परफॉरम्न्सवरही अवलंबून असणार ना? ह्यात चूक काय आहे, हे शैलेंद्रसिंहांनी कृपया शांतपणे विशद करावे.
खटासि खट जो युक्तिवाद करता आहेत, तसाच मीही अगोदरच ह्याच धाग्यात केला आहे. मोदींच्या कारकीर्दीचा HDI च्या सहाय्याने आढावा घ्यायचा झाला तर त्याची आताची अॅब्स्लोल्यूट वॅल्यू न पहाता, त्यांच्या कारकीर्दीत त्याची किती टक्के वाढ/ घट झाली, व ह्याच कालखंडात इतर राज्यांची ती किती झाली ह्याची तुलना करणे आवश्यक नाही काय?
3 Jan 2013 - 7:56 pm | शैलेंद्रसिंह
ह्यात इतर राज्यांची तुलना अंतर्भुत आहेच ना. आधी गुजरात १० व्या क्रमांकावर होता. आता ११ व्या क्रमांकावर आहे. म्हणजे इतर राज्यांनीही त्यांच्यापेक्षा अधिक प्रगती केली असाच होतो ना? HDI प्रत्येक राज्याचा वाढलाय...सपुर्ण भारताचाच वाढलाय. ह्याचा अर्थ मोदींची कामगिरी अगदी बाकीच्यांपेक्षा सरस नाहीये. ती साधारण म्हणावी अशीच आहे. आणि तोच मुद्दा मी पहिल्यापासुन मांडतोय की विकास हा निकष ठेवला तर मोदींपेक्षा सरस कामगिरी केलेली मंडळी आहेत.
गेल्या दशकात गुजरातची आर्थिक वाढ ८.७% झाली, तर महाराष्ट्राची ८.२% ने. पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आधीपासुनच खुप मोठी आहे. गुजरातच्या दुप्पटीपेक्षाही जास्त आहे. महाराष्ट्राचा जीडीपी २२२.७६ बिलीयन डॉलर्सचा आहे तर गुजरात १०५.५ बिलीयन डॉलर्सचा. म्हणजे नुसत्या अर्थवाढीच्या तुलनेतही गुजरातची कामगिरी महाराष्ट्राच्या तुलनेत सरस म्हणता येत नाही.
बिहारची अर्थव्यवस्थाच छोटी आहे.४७.६७ बिलियन डॉलर्स हा बिहारचा जीडीपी आहे. पण त्यांचा असा प्रश्न होता की त्या अर्थव्यवस्थेची वाढच होत नव्हती. नितीश कुमार आल्यानंतर ती व्हायला लागली. सध्या तिथला वाढीचा दर १३% आहे. जे खरोखरच कौतुकास्पद आहे. पण अजुनही HDI बिहारचा खुप कमी आहे. सध्या आर्थिक वाढ सुरु झालीय इतकंच. आता ह्या वाढीचे फायदे ट्रिकल डाऊन होतात का ते बघायचे. जर योग्य नियोजन केले तर आर्थिक वाढीचा फायदा सगळ्या लोकांनाच होतो, अन्यथा अर्थव्यवस्थेतील विषमता वाढते, जस गुजरातमधे झालं. बिहारचं काय होईल, अर्थवाढीचा हा वेग बिहार सस्टेन करु शकेल का ह्यावर पुढच्या गोष्टी अवलंबुन आहेत. पण सध्या तिकडे आशादायक स्थिती अनेक वर्षातुन पहिल्यांदाच निर्माण झालीय. ह्यामुळे नितीश कुमारांची कामगिरी प्रभावी वाटते. पण अजुन खुप काम त्यांना करावं लागणार आहे.
गुजरातची गेल्या वीस वर्षाची कामगिरी पाहिली तर डोमेस्टीक इनव्हेस्टमेंट्स तिथे खुप वाढलेल्या आहेत. गेल्या वीस वर्षात १०९९१ प्रोजेस्ट्स तिथे आलेत. महाराष्ट्रातही १६६८६ प्रोजेक्ट्स आलेत. पण एकुण गुंतवणुक गुजरातमधे थोडी अधिक झालीय. महाराष्ट्रात ८.१ लाख कोटींची तर गुजरातमधे ९.४ लाख कोटींची. ह्यात अनेक फ़ॅक्टर्स आहेत. लेबर महाराष्ट्रात महागला आहे. विकसित अर्थव्यवस्थांचा हा प्रॉब्लेम असतोच की तिथे लेबर महाग होत जातात. महाराष्ट्राबाबतही तसे घडते आहे. त्यामुळे अनेक मोठे स्थानिक उद्योगधंदे महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत, पण हे होणं अपेक्षित होतंच. इथे मात्र गुजरातची कामगिरी प्रभावी आहे.
परकिय गुंतवणुकीत मात्र अजुनही महाराष्ट्रच पहिल्या क्रमांकावर आहे. भारताच्या एकुण परकिय गुंतवणुकीच्या २५% गुंतवणुक एकट्या महाराष्टात होते. २०११-१२ मधे महाराष्ट्रात ९.५ बिलियन ची परकिय गुंतवणुक झाली तर गुजरातेत १ बिलियनची झाली.
बाकी किती गुंतवणुक कुठे झाली ह्यापेक्षा त्यामुळे किती रोजगार निर्माण झाले ह्याला अधिक महत्व आहे. त्यामुळेच HDI वाढेल. गेल्या दहा वर्षात HDI मधे फारशी नेत्रदिपक कामगिरी गुजरातची नाही. येत्या काही वर्षात चित्र अजुन स्पष्ट होईल.
संदर्भः
http://www.dnaindia.com/india/report_fdi-inflows-in-gujarat-up-cross-1bi...
http://articles.timesofindia.indiatimes.com/2011-09-22/mumbai/30189236_1...
3 Jan 2013 - 12:25 pm | श्री गावसेना प्रमुख
,
अगोदरच गुजरात पुढे आहे,आता बिहार गेला एव्हढेच
बाकी तुम्ही संजीव भट्टांच्या मानसिकतेचे आहात काय
21 Jan 2013 - 9:23 am | पिंपातला उंदीर
मतांचा प्रतिवाद मतानिच व्हयला हवा. भावनिक होऊन वैयक्तिक हल्ले करून नव्हे. शैलेन्द्रजि चे प्रतिसाद आवडले.
2 Jan 2013 - 3:41 pm | श्री गावसेना प्रमुख
मोदींच्या भाटाप्रमाणे लिखाण करुन उगाच चर्चा भरकटवता आहात
तुम्ही मराठीच का हो,मग ही खेकडावृत्ती का,तुमचा तो राहुल अन समोरच्याचा नर्या मोद्या
3 Jan 2013 - 12:13 pm | खटासि खट
आकडेवारी आणि लिंक्स म्हणजे विशेष असेल तर घ्या ! गूगलल्यावर सगळं मिळतं. हापिसात काम नसणे पक्षी हाताशी वेळ असणे हा फॅक्टर असेल ना तर आख्खं गूगल इथे डकवता येतं. प्रश्न असा आहे, या घटना ठळक आहेत. महिंद्राची गुंतवणूक तमीळनाडूला गेली त्याबरोबर इतर दोन महत्वाचे उद्योगही तिकडे गेले. टाटांचा नॅनो गुजरातेत गेला. या ठळक गोष्टी लिंक्स न देता मान्य करणार कि नाही हे तपासून पहात होतो. असो. एकंदर आपल्यासाठी महत्वाचे असणारे विषय ध्यानात आले. आमच्यासाठी घर चालवणे हा मोठा विषय आहे हो. वर हापिसातली कामं. तेव्हां इथं काय रांगोळ्या काढल्यात हे सावकाशीने पाहू.
http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-06-03/india-business/32...
3 Jan 2013 - 8:26 am | श्री गावसेना प्रमुख
लेखाची आणी लेखकाची हाजमोला प्रवृत्तीची खरी गोम इथे आहे होय,
म्हणजे गुंतवणुकदार आमीषाला बळी पडुन फसले असे म्हणायचे काय तुम्हाला.तुम्ही सांगा मर्हाठीयन राज्यकर्त्यांना आमीष दाखवायला,इथे ह्यांना खायला काही उरले नाही तेव्हा गुंतवणुक करणार्यांना काय देणार्,सातबारा खाउन खाउन अजीर्ण झालाय हाजमोला हवाय त्यांना.
3 Jan 2013 - 10:45 am | शैलेंद्रसिंह
आकडेवारी देऊ का? पचली नाही तर इनो पण देतो हवंतर
http://www.dnaindia.com/india/report_fdi-inflows-in-gujarat-up-cross-1bi...
http://blogs.timesofindia.indiatimes.com/true-lies/entry/gujarat-growth-...
http://www.mid-day.com/news/2011/jan/150111-Vibrant-Gujarat-Global-Summi...
http://en.wikipedia.org/wiki/List_of_Indian_states_by_GDP
http://en.wikipedia.org/wiki/Indian_states_by_transport_network
3 Jan 2013 - 11:09 am | खटासि खट
गुजरातच्या सरदार सरोवर प्रकल्पाची आणि महाराष्ट्रातल्या जलसिंचन प्रकल्पांची (७८००० कोटी रु खर्च) याची देखील तुलना हवी होती.
3 Jan 2013 - 11:39 am | श्री गावसेना प्रमुख
तुम्हाला काही स्वताच माहीत आहे का ,उगीच ह्याची आकडेवारी त्याची आकडेवारी शेअर मार्केट कोसळल्यानंतर कोणत्या नागरीकाने आत्महत्या केली,विकास दराशी सामान्य लोकांना काय घेण देण आहे.
,
3 Jan 2013 - 11:50 am | शैलेंद्रसिंह
महाराष्ट्र परफ़ेक्ट नाही...तरी तो आकडेवारीत पुढे आहे..विचार करा आकडेवारीतही मागे असलेली राज्य काय असतील ह्याचा..आपल्याला आपल्या राज्यातील डिटेल्स माहित असतात, इतर राज्यांमधले काय प्रश्न आहेत हे माहित नसतं.
तरीही वस्तुनिष्ठ पणे आर्थिक विकास मोजता येतो. आणि त्यासाठीच आकडेवारी बघणे गरजेचे आहे. आकडेवारी मी बनवलेली नाहीये. विश्वासार्ह सोर्सेस कडुन असलेली आकडेवारी आहे.
महाराष्ट्राच्या सरकारला कंटाळुन एखादा तारणहार शोधत असाल आणि मोदींच्या फ़सव्या प्रचाराला भुलुन तो तारणहार म्हणजे मोदीच ह्या भावनेतुन लिहित असाल तर मात्र समजु शकतो.
3 Jan 2013 - 12:02 pm | श्री गावसेना प्रमुख
म्हणजे एखाद्या मठ्ठ विद्यार्थ्याने मास्तराला हाताशी धरुन गुण वाढवुन घ्यावेत असेच का,जाउ द्या महाराष्ट्र परफेक्ट नाही असे मान्य केले हेही नसे थोडके,
आता गुजरात आणी महाराष्ट्रा बद्दल तुलनात्मक तुम्हाला माहीत असलेली माहीती सांगा आणी उपकृत करा
आणी एक सांगतो आम्हाला तारणहाराची गरज नाही,आम्ही समर्थ आहोत
20 Apr 2013 - 8:10 am | पुष्कर जोशी
रोचक माहिती .. येऊ द्या ..
25 Dec 2012 - 10:23 am | क्लिंटन
हा अहवाल मी पण पूर्ण बघितला नाही.खरं सांगायचे तर ३००-४०० पाने आणि तितक्याच आकृत्या आणि आलेख बघून घाबरायलाच झालं :) मी इथे एक राजकारणाचा ऑब्झर्व्हर म्हणून प्रतिसाद लिहित आहे सोशल ऑब्झर्व्हर म्हणून नव्हे. कारण मी राजकारण गेले २०+ वर्षे वाचत आलेलो आहे पण सामाजिक विषयांवर माझे अजिबात वाचन नाही आणि त्यातले फारसे काही मला कळतही नाही.तेव्हा माझा फोकस नेते एकामागून एक निवडणुका कोणत्या कारणाने जिंकतात यावर असेल. आणि हा प्रतिसाद प्रदीप यांनी वर विचारलेल्या प्रश्नाच्या डोमेनमध्ये नाही म्हणून त्या प्रश्नाला तिथेच उत्तर न देता स्वतंत्र प्रतिसाद लिहित आहे.
भारताच्या स्वातंत्रोत्तर राजकीय इतिहासात एकामागोमाग एक निवडणुका जिंकत गेले असे नेते फार नाहीत.केंद्रात केवळ जवाहरलाल नेहरू ३ वेळा (१९५२,१९५७ आणि १९६२) तर राज्यांमध्ये ज्योती बसू ५ वेळा (१९७७,१९८२,१९८७,१९९१ आणि १९९६) यांचा विक्रम एवढ्यात कोणी मोडू शकेल असे वाटत नाही. त्या खालोखाल अरूणाचल प्रदेशचे गेगाँग अपाँग चार वेळा (१९८०,१९८५,१९९० आणि १९९५) राज्यांमध्ये तीन वेळा सलग निवडून गेलेले नेते म्हणजे नरेंद्र मोदी (२००२,२००७ आणि २०१२), शीला दीक्षित (१९९८,२००३ आणि २००८), तरूण गोगोई (२००१, २००६ आणि २०११), नवीन पटनायक (२०००,२००४ आणि २००९), एम.जी.रामचंद्रन (१९७७, १९८० आणि १९८५),लालू प्रसाद यादव (१९९०, १९९५ आणि २००० आणि राजस्थानचे मोहनलाल सुखाडिया (१९५७,१९६२ आणि १९६७). म्हणजे नरेंद्र मोदी तीनदा सलग निवडून आले म्हणजे त्यांनी इतर कोणालाही न जमलेली गोष्ट केली आहे असे अजिबात नाही.भाजपचेच दुसरे मुख्यमंत्री छत्तिसगडचे रमण सिंह २०१३ मध्ये परत निवडून आले तर (शक्यता नक्कीच चांगली आहे) ते ही सलग तीनदा निवडून येतील.
या यादीमद्ये गेगॉंग अपॉंग, तरूण गोगोई आणि मोहनलाल सुखाडिया यांनी नक्की काय केले म्हणून ते एकामागोमाग एक निवडणुका जिंकत गेले याची मला कल्पना नाही.त्यामुळे त्यांच्याविषयी काही भाष्य करत नाही.ज्योती बसूंनी सुरवातीच्या काळात बंगालमध्ये जमिनींच्या मालकींचे पुनर्वाटप केले आणि त्याचा फायदा त्यांना नक्कीच झाला.पण त्यानंतर एकामागोमाग एक निवडणुका ज्योती बसू कसे जिंकले, त्यांनी नक्की काय केले होते याचीही मला खरोखरच कल्पना नाही.त्यांच्या २३ वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत बंगालमध्ये नवे उद्योगधंदे आले असे फारसे झाले नाही. (याउलट २०११ मध्ये "स्युडो कम्युनिस्ट" बुध्ददेव भट्टाचार्य नव्या उद्योगांना राज्यात आणायचा प्रयत्न करत होते म्हणून की काय "खऱ्या कम्युनिस्ट" ममता बॅनर्जींना लोकांनी निवडून दिले की काय ही शंका नक्कीच येते).त्यापूर्वी बिधनचंद्र रॉय १९४८ ते १९६२ अशी १४ वर्षे मुख्यमंत्री होते यावरून बंगाली मतदार एखादा नेता आवडला की त्याला वर्षानुवर्षे मते देत राहतात की काय अशीही शंका येते. असो.
लालू प्रसाद यादवांचे बिहारमधले वर्चस्व इतके निर्विवाद कधीच नव्हते.ते आपले बाय डिफॉल्ट निवडून येत होते.१९९० मध्ये ३२४ पैकी १२३ जागाच त्यांच्या जनता दलाला मिळाल्या होत्या.१९९५ ही एकच निवडणुक लालूप्रसादांनी अगदी आरामात जिंकली होती.२००० साली विरोधकांमध्ये फाटाफूट झाली याचा त्यांना फायदा मिळाला.तसेच मधल्या काळात झालेल्या १९९६,१९९८ आणि १९९९ या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाचा पराभवच झाला.तेव्हा या यादीत लालू प्रसाद यादवांचा समावेश "बाय डिफॉल्ट" करावा लागेल.
एम.जी.रामचंद्रन यांच्यामागे तामिळ चित्रपटसृष्टीचे जबरदस्त वलय होते.तसेच वलय आंध्र प्रदेशात एन.टी.रामाराव यांच्यामागेही होते.पण रामारावांचा पराभव झाला पण एम.जी.आर यांनी एकही विधानसभा निवडणुक कधीच गमावली नाही.याचे काय कारण असावे? एम.जी.आर यांनी १९८५ ची तिसरी निवडणुक जिंकली तेव्हा ते आजारी होते.निवडणुकांच्या प्रचाराच्या काळात त्यांच्यावर न्यू यॉर्कमध्ये उपचार चालू होते आणि कदाचित यामुळे लोकांची सहानुभूती त्यांना मिळाली असेल का?कदाचित असेलही.
पण असे कोणतेही वलय नसलेले आणि तरीही परत परत निवडून गेलेले नेते म्हणजे शीला दीक्षित आणि नरेंद्र मोदी.दोघांचाही पहिला विजय "बाय डिफॉल्ट" होता.जर १९९८ मध्ये जर कांद्याचे भाव गगनाला भिडले नसते तर दिल्लीत कॉंग्रेसचा विजय होणे केवळ दुरापास्त होते.दिल्लीत विधानसभा निवडणुका झाल्या त्यापूर्वीच ९ महिने झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीतील ७ पैकी ६ जागा भाजपने जिंकल्या होत्या.पण कांद्याने सगळी जादू केली. १९९८ च्या विधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेस पक्षाने शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून जाहिर केले होते (आणि त्याला तोंड द्यायला म्हणून सुषमा स्वराज यांना औट घटकेचे मुख्यमंत्रीपद भाजपने दिले होते).पण त्या पूर्वी शीला दीक्षित या फार लोकप्रिय किंवा करिश्मा असलेल्या नेत्या अजिबात नव्हत्या.१९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचा कनौजमधून पराभवही झाला होता. त्याचप्रमाणे मोदी ऑक्टोबर २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपची गुजरातमध्ये अवस्था वाईट होती.२०००-०१ मध्ये झालेल्या सगळ्या पोटनिवडणुकांमध्ये आणि जिल्हा परिषद निवडणुका, महानगरपालिका निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाने मोठे यश मिळवले होते.इतकेच काय तर मोदींनी फेब्रुवारी २००२ मध्ये राजकोटमधून गुजरात विधानसभेचे सदस्य होण्यासाठीची निवडणुक लढवली तेव्हा ती निवडणुक ते थोडक्यात जिंकले होते.नरेंद्र मोदी हे नाव संघाच्या वर्तुळात माहित होते पण त्याबाहेर त्यांना फारसे कोणी ओळखतही नव्हते.मी त्यांचे नाव त्यापूर्वी १९९५ मध्ये ऐकले होते (मोदी तेव्हा केशुभाईंचे सल्लागार होते आणि वाघेलांनी केशुभाईंविरूध्द १९९५ मध्ये बंड केले तेव्हा त्यामागे केशुभाईंवर नरेंद्र मोदींचा प्रभाव हे पण एक कारण होते).पण नंतरच्या ६ वर्षात मी ते नाव एकदाही ऐकले नव्हते. जर २००२ च्या दंगली झाल्या नसत्या तर २००२ च्या निवडणुका भाजप अजिबात जिंकू शकला नसता हे वेगळे सांगायलाच नको. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे दीक्षित आणि मोदी यांच्यात साम्य म्हणजे दोन्ही रिलेटिव्हली अनोळखी चेहरे होते आणि अचानक मुख्यमंत्रीपदावर जाऊन बसले आणि दोघांचेही पहिले विजय "बाय डिफॉल्ट" होते.
पुढे दोन्ही नेत्यांनी आणखी दोन निवडणुका जिंकल्या.दिल्लीमध्ये राज्य सरकारच्या हातात जे काही अधिकार आहेत त्याचा शीला दीक्षित यांनी वापर करून दिल्ली मेट्रोचा विस्तार, दिल्लीत बसना सी.एन.जी ची सक्ती करून प्रदूषण कमी करणे अशा पध्दतीची कामे नक्कीच केली.त्याचा परिणाम म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिले.त्यांना विरोध करण्याइतका विरोधी पक्ष बलिष्ठ नव्हता का?तसे नक्कीच नाही.दिल्लीमध्ये भाजपही स्वत:चे अस्तित्व राखून होताच.
मोदींनी २००२ ची निवडणुक दंगलींमुळे जिंकली हे मान्य.पण २००७ आणि २०१२ या दोन निवडणुका काहीतरी काम केल्याशिवाय जिंकल्या असतील असे मला तरी वाटत नाही.गुजरातमध्ये लोकांमधील व्यापारी वृत्तीचे प्रमाण अगदी पूर्वापार जास्त आहे (छत्रपतींनी सुरत दोनदा लुटली याचे कारण त्या काळीही सुरत हे आघाडीचे व्यापारी केंद्र होते.आय.आय.एम ची स्थापना अहमदाबादमध्ये व्हावी यासाठी पुढाकार घेतलेल्यांमध्ये एक होते उद्योगपती कस्तुरभाई लालभाई.त्यांचे पूर्वज जहांगीर,शाहजहान आणि औरंगजेब यांच्या कुटुंबियांचे सरकारी जवाहिर होते).अशा व्यापारी वृत्तीच्या समाजात मतदार अधिक प्रॅक्टिकल असतील हीच शक्यता मला अधिक वाटते.म्हणजे आपल्या व्यापाराला पाहिजे त्या गोष्टी--चांगले रस्ते,पाणी,वीज इत्यादी योग्यप्रकारे देणाऱ्या नेत्याला ते मत देत असतील तर त्यात फार काही चूक असेल असे वाटत नाही.दुसरे म्हणजे गुजरातमध्ये कुपोषण मोठ्या प्रमाणावर आहे अशा प्रकारचीही माहिती येत असते.पण अशा "कुपोषणग्रस्त" ग्रामीण भागातूनही मोदींचेच उमेदवार निवडून आले आहेत/येत आहेत.म्हणजे कुपोषण असले तरी मोदीच ते कुपोषण दूर करू शकतील म्हणजे त्या बाबतीत कॉंग्रेसपेक्षा मोदीच जास्त चांगले असे लोकांना वाटते असे म्हटले तर त्यात काय चुकले?
अर्थातच हे सगळे कल्पनेचे खेळ.मोदींनी खरोखरच या गोष्टी केल्या आहेत की नाही हे मला माहित नाही.आणि राजकारणाचा एक विद्यार्थी म्हणून या प्रश्नाचे उत्तर शोधून काढणे मला महत्वाचे वाटतही नाही.मोदींनी खरोखर विकास केला आहे या प्रश्नापेक्षा लोक मोदींना वारंवार मते का देतात (आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लोक वारंवार शिवसेनेला मते का देतात,१९७७ पासून तीन दशके लोक वारंवार डाव्या आघाडीला मते का देत होते) या प्रश्नांची मते शोधून काढणे राजकारणाचा विद्यार्थी या "हैसियत" मध्ये मला अधिक महत्वाचे वाटते. वर लिहिलेली गोष्ट परत लिहितो--"राजकारणात तुम्ही काही लोकांना सर्व काळ फसवू शकता, सर्व लोकांना काही काळ फसवू शकता पण सर्व लोकांना सर्व काळ फसवू शकत नाही".
लोक वारंवार एकाच नेत्याला मते का देत असावेत या संदर्भात मी मिपावरच मागे कधीतरी लिहिलेल्या प्रतिसादाचा काही भाग चोप्य-पस्ते करतो:
प्रत्येकाला अभिनेता आवडण्यामागे/नावडण्यामागे वेगवेगळी कारणे असतात. कोणाला अभिनेत्याच्या आवाजातील चढउतार आवडतात तर कोणाला देहबोली. कोणाला चेहऱ्यावरील हावभाव आवडतात तर कोणाला अजून काही.प्रत्येकाला अभिनेत्याची कोणती गोष्ट भावेल याचे काही गणिती सूत्र नक्कीच नाही.त्यामुळेच कोणाला तीन खानांमधला एक आवडतो तर कोणाला हृतिक. आता समजा एखाद्याला आमिर खान आवडत असेल त्याने शाहरूख समर्थकाला चुकीचे म्हटले तर तो त्याच्या बाजूने बरोबरच असतो. पण असे चुकीचे म्हणणे योग्य आहे का? कारण त्याच न्यायाने इतर अभिनेत्यांचे समर्थक आमिर समर्थकाला चुकीचे म्हणतील. तेव्हा चित्रपट क्षेत्रातल्या दोन दर्दी आणि माहिती असलेल्या व्यक्तींचे कोणता अभिनेता चांगला यावर एकमत होणे कठिण आहे.
आता वळू या लोकशाहीकडे.आपण शिकले-सवरलेले, चांगल्यापैकी नोकरी/व्यवसाय असलेले आणि आज दोन वेळेला जेवायला मिळाले तरी उद्या मिळेल का असा प्रश्न न पडणारे लोक आहोत. आपल्या सारख्यांना कदाचित राष्ट्राचा अभिमान (म्हणून राम मंदिर, अणुचाचण्या, भारताच्या पंतप्रधानपदी परदेशात जन्मलेली व्यक्ती नको, स्वीस बॅंकेतून पैसे परत आणणे वगैरे) मुद्दे भावतील. पण हातावर पोट असलेल्यांना हे मुद्दे भावतील का? काही काळ प्रचारतंत्र जोरात वापरून त्यांना या मुद्द्यांचे महत्व जरूर पटवून देता येईल पण ते फार काळ चालणार नाही. १९९० मध्ये लालूप्रसाद यादवांनी बिहारच्या मागासवर्गीय जनतेला सांगितले--’मै आपको स्वर्ग तो दे नही सकता लेकिन स्वर तो जरूर दुंगा’. पिढ्यानपिढ्या जातीव्यवस्थेच्या ओझ्याखाली दबलेल्या त्या मतदारांना या गोष्टीचे आकर्षण वाटले नसेल तर नवलच. तसेच ’कॉंग्रेस का हाथ आम आदमी के साथ’ ही कॉंग्रेस पक्षाची घोषणा अशा हातावर पोट असलेल्यांना आपल्यासाठी वाटली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. आता आपण आपल्या बाजूने विचार केला तर अशा लोकांचे मत जरूर चुकीचे वाटेल पण आपण स्वत: त्यांना आयुष्यात येत असलेल्या हालअपेष्टांना सामोरे गेलेलो नसल्यामुळे ते नक्की कसा विचार करतात आणि त्यांना काय भावते हे आपल्याला सांगता येणे कठिण आहे. यात अनेकदा होते असे की राजकारणी मंडळी भूलथापा देऊन या सामान्य जनतेला हातोहात फसवतात. असे म्हणतात की Public memory is short. त्यामुळे राजकारणी मंडळी आपला स्वार्थासाठी वापर करत आहेत हे त्यांना समजायला उशीर होतो. हे सर्व पक्षांसाठी तितकेच लागू होते. आपल्यासारखे लोक बिहारच्या जनतेने लालू यादवांना आणि राबडीदेवींना वर्षानुवर्षे निवडून कसे दिले, कॉंग्रेसने ’फारसे काही न करता’ त्यांचा पक्ष एकामागून एक निवडणुका कशा जिंकतो किंवा पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट वर्षानुवर्षे निवडून कसे येतात हा प्रश्न जरूर विचारू. पण त्याचवेळी कॉंग्रेस समर्थक मुंबई महापालिकेत काहीही न करता शिवसेना कशी निवडून येते किंवा गुजरात दंगलींमध्ये हात असूनही (खरा-खोटा भगवंतालाच माहित) नरेंद्र मोदी निवडून कसे येतात असे प्रश्न विचारतील. आता असा प्रश्न विचारणे म्हणजे एखाद्या आमीर खान समर्थकाने ’काय तो इतरांना सलमान खान आवडतो समजत नाही. आमचा आमीर किती चांगला अभिनय करतो’ असे म्हटल्यासारखे आहे. असा प्रश्न विचारून उपयोग नाही कारण दोन अभिनेत्यांचे समर्थक वेगळ्या मापदंडांवर दोन अभिनेत्यांना मोजतात. त्यामुळे निर्णयात थोडी तरी subjectivity येतेच.
तेव्हा मोदींनी खरोखरच विकास केला आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर शोधून काढण्यात खरे म्हणजे मला अजिबात रस नाही.आणि मोदींनी विकास केला नाही असे कोणाचे म्हणणे असेल तर त्याविषयीही काही बोलायचे नाही.ते म्हणणे खरे असेल तर मतदार २०१७ मध्ये मोदींना शिक्षा देतीलच (म्हणजे मोदी २०१४ मध्ये केंद्रात जायची शक्यता मला तरी फारच थोडी वाटत आहे असा अर्थ झाला :) )
2 Jan 2013 - 11:21 am | श्रीगुरुजी
"ज्योती बसूंनी सुरवातीच्या काळात बंगालमध्ये जमिनींच्या मालकींचे पुनर्वाटप केले आणि त्याचा फायदा त्यांना नक्कीच झाला.पण त्यानंतर एकामागोमाग एक निवडणुका ज्योती बसू कसे जिंकले, त्यांनी नक्की काय केले होते याचीही मला खरोखरच कल्पना नाही.त्यांच्या २३ वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत बंगालमध्ये नवे उद्योगधंदे आले असे फारसे झाले नाही."
माझ्या असे वाचण्यात आले आहे की, १९७२ साली प. बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीत सिद्धार्थ शंकर रे हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. त्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करून काँग्रेस निवडून आली. त्यामुळे बंगाली जनता सिद्धार्थ शंकर रे यांच्यावर नाराज होती. त्यापूर्वी काही वर्षे बंगालमध्ये नक्षलवादी चळवळ सुरू झाल्यानंतर १९६७ मध्ये चारू मुजुमदार या नक्षलवादी नेत्याचा बंगालमध्ये पोलिसांनी निशस्त्र अवस्थेत एनकाऊंटर करून त्याला ठार मारले. त्यामुळेही जनमत विरोधात जाऊ लागले होते. नंतर आणिबाणीच्या काळात बंगाली जनतेची काँग्रेस व रे यांच्याविरूद्धची चीड शिगेला पोचली. त्यामुळे १९९७ साली असलेल्या काँग्रेसविरोधाच्या लाटेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला बहुमत मिळाले. पश्चिम बंगालमध्ये डावी चळवळ पूर्वीपासूनच सामर्थ्यवान होती. त्यांच्यात डावे कम्युनिस्ट, उजवे कम्युनिस्ट, नक्षलवादी, फॉरवर्ड ब्लॉक, क्रांतिकारी समाजवादी पक्ष इ. डावे पक्ष बंगालमध्ये पाय रोवून उभे होते. ज्योती बसूंनी अतिशय शहाणपणे स्वतःच्या पक्षाला बहुमत असताना सुद्धा या सर्व पक्षांना एकत्र आणून सरकार स्थापन करून डाव्या मतांची फाटाफूट टाळली.
१९७७ नंतर डाव्या आघाडीने बंगालमध्ये भक्कम पाय रोवले. गावागावातून कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी दहशत निर्माण करून निवडणुकीत मतदान आपल्याच बाजूने होईल अशी व्यवस्था केली. तसेच बांगलातून मोठ्या प्रमाणात आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांना ओळखपत्रे व शिधापत्रिका देऊन आपले कायमचे मतदार निर्माण केले. दुसर्या बाजूने राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व निर्नायकी होते. ममता बॅनर्जी वगळता इतर सर्व काँग्रेस नेते डाव्या पक्षांविषयी सहानूभूती बाळगून होते. त्यामुळे सलग ३२ वर्षे तिथे डाव्या पक्षांना राज्य करता आले.
काँग्रेसमध्ये राहून डाव्या पक्षांची यशस्वीपणे सामना करता येणार नाही हे लक्षात आल्यानंतरच ममता बॅनर्जी १९९८ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी आपली वेगळी चूल मांडली. परंतु अत्यंत धरसोड धोरणामुळे व चंचल स्वभावामुळे (१९९८ व १९९९ मध्ये भाजपशी युती, नंतर २००१ पासून काँग्रेसशी युती, नंतर परत २००६ मध्ये भाजपशी युती, नंतर २००९ मध्ये काँग्रेसशी युती आणि २०१२ पासून एकला चलो रे) त्यांना सत्ता मिळवायला २०११ पर्यंत थांबावे लागले. डाव्या सरकारने नंदीग्राम व सिंगूरमध्ये केलेल्या अत्याचारांचा त्यांच्या पराभवात मोठा वाटा होता.
2 Jan 2013 - 1:13 pm | क्लिंटन
पण हे सगळे प्रकार "गोरगरीबांच्या" नावावर केले जातात त्यामुळे सगळे गुन्हे माफ अशी डाव्या पक्षांच्या समर्थकांची धारणा असते.आणि या पक्षांचे नेते "सुशिक्षित" आणि अगदी सफाईदार इंग्रजी बोलणारे असतात.तेव्हा त्यांची कृत्येही अधिक सफाईने केलेली असतात.
१९९८ मध्ये महाराष्ट्रात युती सरकारने बेकायदा बांगलादेशींना पकडून त्यांच्या देशात परत पाठविणे सुरू केले होते.कोर्टाने भारतीय नागरिक नाहीत असे प्रमाणपत्र घेतले होते. अशांना पकडून ट्रेनमध्ये घालून बांगलादेशात परत पाठवायचे होते. ती गाडी बंगालमध्ये गेल्यानंतर कोणा कम्युनिस्ट आमदाराने नेतृत्व केलेल्या जमावाने (आमदाराचे नक्की नाव आता विसरलो) त्या ट्रेनवर हल्ला केला आणि त्या बांगलादेशींना सोडविले. इतकेच नव्हे तर हे प्रकार करणारे लोक "देशभक्त" होते हे प्रमाणपत्र सोमनाथ चॅटर्जींनी दिले होते.
तसेच २००७ मध्ये प्रकाश करात या मनुष्याने भारत आणि अमेरिकेतील वाढते संबंध हे चीनविरोधात आहेत म्हणून त्याला त्यांचा पक्ष विरोध करेल असे म्हटले होते (http://www.expressindia.com/latest-news/ltBgtIndoUS-ties-antiChina-so-we...). जर अमेरिकेशी वाढते संबंध भारताच्या हिताचे नाहीत असे कोणाचे मत असेल तर त्याला जरूर विरोध करा.लोकशाहीत तो प्रत्येकाचा अधिकार आहे.पण असे संबंध चीनच्या विरोधात आहेत म्हणून त्याला विरोध करणे कसे समर्थनीय असेल? असो.
(कम्युनिस्टांचे नाव एकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा) क्लिंटन
2 Jan 2013 - 1:32 pm | क्लिंटन
हे वाक्य सरकारने कोर्टाकडून (पाठवले जात असलेले लोक) भारतीय नागरिक नाहीत असे प्रमाणपत्र घेतले होते असे पाहिजे.
2 Jan 2013 - 8:14 pm | श्रीगुरुजी
"१९९८ मध्ये महाराष्ट्रात युती सरकारने बेकायदा बांगलादेशींना पकडून त्यांच्या देशात परत पाठविणे सुरू केले होते.कोर्टाने भारतीय नागरिक नाहीत असे प्रमाणपत्र घेतले होते. अशांना पकडून ट्रेनमध्ये घालून बांगलादेशात परत पाठवायचे होते. ती गाडी बंगालमध्ये गेल्यानंतर कोणा कम्युनिस्ट आमदाराने नेतृत्व केलेल्या जमावाने (आमदाराचे नक्की नाव आता विसरलो) त्या ट्रेनवर हल्ला केला आणि त्या बांगलादेशींना सोडविले. इतकेच नव्हे तर हे प्रकार करणारे लोक "देशभक्त" होते हे प्रमाणपत्र सोमनाथ चॅटर्जींनी दिले होते."
त्या आमदारांची नावे आठवत नाहीत, पण ते फॉरवर्ड ब्लॉकचे आमदार होते असे वाचल्याचे आठवते.
2 Jan 2013 - 12:16 pm | श्रीगुरुजी
"लालू प्रसाद यादवांचे बिहारमधले वर्चस्व इतके निर्विवाद कधीच नव्हते.ते आपले बाय डिफॉल्ट निवडून येत होते.१९९० मध्ये ३२४ पैकी १२३ जागाच त्यांच्या जनता दलाला मिळाल्या होत्या.१९९५ ही एकच निवडणुक लालूप्रसादांनी अगदी आरामात जिंकली होती.२००० साली विरोधकांमध्ये फाटाफूट झाली याचा त्यांना फायदा मिळाला."
लालूप्रसाद यादवांच्या पक्षाला १९९० मध्ये ३२४ पैकी १२३, १९९५ मध्ये ३२४ पैकी १६५ आणि २००० मध्ये ३२४ पैकी फक्त १२३ जागा मिळाल्या होत्या. २००० मध्ये समता पक्ष-भाजप युतीला सुद्धा १२३ जागा मिळाल्या होत्या. बहुमतासाठी १६३ जागा हव्या होत्या. राज्यपालांनी समता पक्ष-भाजप युतीला सरकार बनविण्यासाठी पाचारण करून नितीशकुमारांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती. पण उर्वरीत ४० जागा त्यांना मिळविता आल्या नाहीत. याउलट लालूला काँग्रेस व डाव्या पक्षांनी पाठिंबा देऊन राबडीदेवीला पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी पाठबळ दिले होते.
2 Jan 2013 - 12:28 pm | श्रीगुरुजी
"आपल्यासारखे लोक बिहारच्या जनतेने लालू यादवांना आणि राबडीदेवींना वर्षानुवर्षे निवडून कसे दिले, कॉंग्रेसने ’फारसे काही न करता’ त्यांचा पक्ष एकामागून एक निवडणुका कशा जिंकतो किंवा पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट वर्षानुवर्षे निवडून कसे येतात हा प्रश्न जरूर विचारू."
महाराष्ट्रात १९९५ चा अपवाद वगळता काँग्रेस कायम कशी निवडून येते हे एक रहस्यच आहे. एक गोष्ट आठवते. पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला. अगदी १९५७ साली संयुक्त महाराष्ट्र आंदोलन अतिशय पेटलेले असताना व इतर सर्व भागात काँग्रेसचा जोरदार पराभव होत असताना पश्चिम महाराष्ट्राने हात दिल्यामुळे काँग्रेसला काठावरचे बहुमत मिळाले होते.
कृष्णा नदी पाणीवाटपासाठी कर्नाटक, आंध्र व महाराष्ट्र या राज्यात जी भांडणे सुरू होती त्यावर सर्वोच्च न्यायालयाने १९७५ साली एक निकाल देऊन महाराष्ट्राला पुढील २५ वर्षात म्हणजे २००२ सालापर्यंत जेवढे पाणी अडविता येईल तेवढे अडवा, पण २००० सालानंतर कृष्णा खोर्यात धरण, बंधारे इ. ची कामे करता येणार नाही असा आदेश दिला होता. परंतु पुढील २० वर्षात १९९५ पर्यंत तत्कालीन काँग्रेस सरकारने याविषयी फारसे काही केलेच नाही. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी वेगात पावले उचलून कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करून रोखे विक्रीस काढून निधी जमा केला व अनेक धरणे व लहानमोठ्या बंधार्यांची कामे वेगात सुरू केली. हे अतिशय महत्त्वाचे काम होते. काँग्रेसने पूर्ण दुर्लक्ष करूनसुद्धा युती सरकारने वेगात पावले उचलल्यामुळे कृष्णा खोर्यात पाणी अडविण्याचे थोडे तरी काम २००० पूर्वी होऊ शकले. पण याचा युतीला काय फायदा झाला? १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेस एकमेकांविरूद्ध लढूनसुद्धा पश्चिम महाराष्ट्रात भाजप्-सेना युतील १९९५ पेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या.
याचबरोबरीने पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग, मेळघाटात प्रथमच बांधलेले डांबरी रस्ते, मुंबईतील ५५ उड्डाणपूल, रेशनवरील साखर, गहू, तांदूळ, तेल इ. भाव ५ वर्षात स्थिर ठेवणे इ. भरीव कामे करूनसुद्धा व काँग्रेस फुटलेली असताना सुद्धा १९९९ मध्ये युतीचा पराभव झाला व आजतगायत युती सत्तेबाहेर आहे.
गेल्या १३ वर्षात काँग्रेस-राकॉ सरकारने काहीही भरीव केलेले दिसत नाही. तरीसुद्धा २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा तेच सत्तेवर येणार हे नक्की. यामागची मतदारांची मानसिकता अजिबात समजत नाही.
25 Dec 2012 - 12:04 pm | शैलेंद्रसिंह
तुमच्या ह्या आधीचा उतारा आणि हा शेवटचा उतारा एकमेकांना contradict करतात. जनता निवडुन देते म्हणजे मोदींनी विकास केला हे कसं मानायचं? विकास मोजायचे काही वस्तुनिष्ट निर्देशांक आहेत. ते महत्वाचे. गुजरातची अर्थव्यवस्था वाढलीय हे कोणीही अमान्य करणार नाहीत. आकडे स्पष्ट तसं सांगतात. पण विकासात अजुन खुप मोठा पल्ला गाठायचा आहे गुजरातला.
निवडणुका जिंकणे हे शेवटी समीकरणांवर अवलंबुन असतं...समीकरणं जातीय, भाषिक, धार्मिक असतात..जी आपण वर्षानुवर्षे आपल्या राजकारणात पाहिलेली आहेत, वाढत्या शहरीकरणामुळे ही समीकरणं बदलत चाललेली आहेत. तिथे वर्गीय समीकरणं महत्वाची असतात. मोदींनी हे अचुकपणे ओळखुन गुजरात गौरव, हिंदुत्व, आर्थिक प्रगती ह्यांची सरमिसळ करणारे राजकारण केले..जे केले त्यापेक्षा अधिक मध्यमवर्ग आणि उच्चवर्गीयांपर्यंत पोहोचवले आणि शहरी-निमशहरी भागांमधे विरोधकांना नामोहरम केले. ह्यात मोदींचे राजकिय कौशल्य दिसुन येतंच. पण ह्या प्रकारचं राजकारण देशाच्या पातळीवर किती यशस्वी होईल, त्यांच्याबरोबर किती लोकं येऊ शकतील हा वादाचा मुद्दा आहे. देशाच्या पातळीवर यशस्वी होण्याकरता मोदींना फक्त विकासाचाच मुद्दा कामी येणार आहे, म्हणुन मिडियात फक्त गुजरातच्या आर्थिक प्रगतीचीच चर्चा घडवुन आणली जातेय. तो ब्रॅंडिंगचा भाग झाला. ब्रॅंड बनविणे..तो प्रमोट करणे, तो मेंटेन करणे ह्यासाठी व्यावसायिक मॅनेजर्स असतात. ते ह्या सगळ्या गोष्टी बघत असतात. उदाहरणार्थ कोहलीने शतक मारलं तरी त्याने सचिनच्या सल्ल्याचा..किंवा त्याच्यापासुन मिळालेल्या प्रेरणेचा ओझरता उल्लेख सगळीकडे छापुन येतो. त्याला पत्रकार परिषदेत आवर्जुन सचिनविषयी प्रश्न विचारले जातात....हे आपोआप होत नाही. ते घडवुन आणलं जातं. त्यात चुकींचं असं काही नाही. ब्रॅंड बद्दल लोकांमधे चांगले परसेप्शन निर्माण होणे शेवटी महत्वाचे..मोदीचे विकासपुरुष म्हणुन जे ब्रॅंडिंग केले जाते त्याला आपला तथाकथित सुशिक्षित मध्यमवर्ग बळी पडतोच कारण तो अर्थसाक्षर नाहीये. तेव्हा जनताच मोदींना सजा देईल हे विधान राजकिय भाबडेपणाचं आहे.
27 Dec 2012 - 12:52 pm | क्लिंटन
त्याच न्यायाने जनता निवडून देते म्हणून काँग्रेसचा हात "आम आदमी" बरोबर आहे हे मानायचे का? १९९० ते २००५ या काळात जनता लालूंना निवडून देत होती म्हणजे लालूंनी खरोखरच "सामाजिक न्याय" आणला हे मानायचे का?मुंबई महापालिकेत १९८५ पासून १९९२ ते १९९६ ही चार वर्षे वगळता शिवसेनेचाच महापौर आहे.म्हणजे शिवसेना "मराठी माणसांची तारणहार" आणि "छत्रपतींच्या विचारांची वारसदार" मानायची का?बंगालमध्ये डावे पक्ष ३४ वर्षे निवडून येत होते म्हणजे डाव्यांनी तिथे "वर्गविरहित समाज" आणला असे मानायचे का...................
अहो सगळेच पक्ष आपण केलेल्या किंवा न केलेल्या कामाचा डंका पिटत असतात.लोकशाही व्यवस्थाच अशी आहे की त्यात असा डंका खोटा असेल तर कायमस्वरूपी पिटता येत नाही.तुमच्या मते मोदींचा डंका खोटा असेल तर लोक त्यांना पुढच्या वेळी हरवतीलच की.मग याविषयी इतकी आदळ-आपट कशाला?
मोदींची "व्हायब्रंट गुजरात" समिट पहिल्यांदा भरली २००३ मध्ये.तेव्हापासून दर दोन वर्षांनी ही समिट भरत आलेली आहे.तरीही सुरवातीच्या काळात मोदींच्या या "विकासाच्या" दाव्यावर इतका काथ्याकूट होत नव्हता.कारण मोदीविरोधकांना गुजरात दंगलींच्या मुद्द्यावरून मोदींना झोडपता येत होते.पण एस.आय.टी च्या अहवालानंतर त्यांची पंचाईत झाली आणि मग झोडपायला दुसरा मुद्दा कोणता तर विकासाचा दावा!! दंगलींच्या मुद्द्यावर कोर्टांमध्ये अजूनही न्यायालयीन प्रक्रीया चालू आहे आणि जर मोदी त्यात दोषी आढळले तर त्यांना शि़क्षा करावी यासाठी मीच तितक्याच हिरीरीने लिहिन याची खात्री बाळगा.दंगलीत हात असणे आणि निरपराधांना मारणे हे वाईट आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यानेच ते करणे हे हजार पटीने अजून वाईट त्यामुळे याच गुन्ह्यासाठी सामान्य माणसाला शिक्षा असेल त्याच्या हजारपट मोठी शिक्षा द्यायला हवी.पण तिस्ता सेटलवाड एट ऑल म्हणतात म्हणून मोदी दोषी नक्कीच ठरत नाहीत.पण एस.आय.टी च्या अहवालामुळे याच मंडळींची अडचण झाल्यावर मोदी विरोधकांना अजून कुठलातरी झोडपायला मुद्दा हवा ना. मग तो मुद्दा विकासाचा!!
आता काय भाबडेपणाचे आहे आणि काय सत्य परिस्थिती होऊ शकते हे जरा इतिहासात डोकावून बघू.
१९६७ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून जॉर्ज फर्नांडिस यांनी स.का.पाटलांचा पराभव केला. त्या पूर्वी कदाचित स.का.पाटलांचा पराभव होणे हे भाबडेपणाचे वाटत असेल.
१९६७ च्याच विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तर भारतात काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला.त्याकाळी एकाही काँग्रेसशासित राज्यातून न जाता दिल्ली ते कलकत्ता जाता येईल असे म्हटले जाऊ लागले.असे होणे हे त्याकाळी कदाचित भाबडेपणाचे वाटत असेल.
१९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झालाच तर त्याच बरोबर स्वतः इंदिरा गांधींचाही पराभव झाला. त्याकाळी असे होईल असे वाटणे कदाचित भाबडेपणाचे असेल.
१९८७ मध्ये हरियाणात देवीलालांनी काँग्रेसच्या बन्सीलालांचा दणक्यात पराभव केला.९० पैकी ८५ जागा देवीलाल-भाजप युतीने जिंकल्या.पण त्याच जनतेने १९९१ मध्ये त्याच देवीलालांचा जोरदार पराभव केला.स्वतः देवीलाल लोकसभा आणि हरियाणा विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये पराभूत झाले.नंतर देवीलालांना कुठलीच निवडणूक जिंकणे शक्य झाले नाही.
१९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीने काँग्रेसला पराभूत केले.महाराष्ट्रातून काँग्रेस हरणे हे कदाचित भाबडेपणाचे त्यावेळी वाटत असेल. (मलाही तेव्हा काँग्रेसचा पराभव होईल असे वाटले नव्हते).
२००४ मध्ये "इंडिया शायनिंग" वाल्यांना त्याच "भाबड्या" जनतेने घरी बसवले होते. इत्यादी इत्यादी.
तेव्हा भारतीय मतदार तुम्हाला भाबडा जरूर वाटत असेल पण त्याला अंडरएस्टीमेट करणे हाच खरा भाबडेपणा आहे :).
27 Dec 2012 - 10:15 pm | शैलेंद्रसिंह
मीही हेच म्हणतोय. जनता निवडुन देते म्हणजे सरकार काम करते असं नाही.
27 Dec 2012 - 10:31 pm | शैलेंद्रसिंह
तुम्ही लाट..अंडरकरंट वगैरे गोष्टी ऐकल्या असतील...हा सगळा तोच प्रकार आहे. आपल्याकडे एकदा वातावरण निर्मीती झाली की मग निवडणुकीचा निकाल अगदीच नक्की असतो. त्यात जनतेचा शहाणपणा दिसुन येतो की भाबडेपणा हे ज्याने-त्याने ठरवावे.
२००४ इंडिया शायनिंगच्या वेळी भाजपाचा पराभव झाला, पण तो राजकिय समीकरणांचा विजय होता, काँग्रेसने निवडणुकपुर्व अलायंस केले होते. ते नसते केले तर भाजपा २००४ साली सत्ता सहज राखु शकला असता.
जनता जर इतकी समंजस असती तर इतके वर्ष काँग्रेसची सत्ता नसती. जनतेला अंडरएस्टीमेट करत नाहीये, आपल्या लोकशाहीचे खरे एस्टिमेशन करतोय. लोकशाही आहे की झुंडशाही हे कळत नाही. झुंडी जमवा, त्यांची समीकरणं बनवा आणि सत्ता ताब्यात घ्या...ह्यातुनच गुन्हेगारी, काळा-पैसा, भ्रष्टाचार राजकारणात बोकाळले आहेत.
26 Dec 2012 - 7:31 am | प्रदीप
आजच्या मराठी वर्तमानपत्रांतून मोदींच्या विजयाचे राजकीय विश्लेषण इथे व इथे वाचावयास मिळाले. ह्यांपैकी मटामधील प्रताप आसबे ह्यांचा लेख निव्वळ उठवळ वाटला, तो सोडून देतो. लोकसत्तेतील अग्रलेख मात्र डोके ताळ्यावर ठेऊन, सविस्तर उहापोह करत आहे. थोडक्यात ह्यातील निकष असा की, मोदींना महानगरे व शहरी-नवनिमशहरी भागातील नवमध्यमवर्गाची साथ मिळालेली आहे. मात्र ग्रामिण भागांत काँग्रेसने भाजपपेक्षा अधिक मते घेतलेली आहेत.
26 Dec 2012 - 2:20 pm | बॅटमॅन
लोकसत्तेचा लेख संतुलित वाटला. पण एका मुद्द्याचा परामर्श त्यांना नीट घेता आला नाही असे वाटते. मुस्लिम बहुल मतदारसंघांत त्यांना मिळालेली मते ही जर शहरी लोकांमुळे असतील तर ते शहरी लोकही मुसलमान असण्याची शक्यता जास्तच, नैका?
26 Dec 2012 - 6:19 pm | प्रदीप
मुस्लिम बहुल मतदारसंघांतील भाजपच्या घवघवीत यशाबद्दलची त्या लेखातील कारणमीमांसा न पटण्यासारखी आहे. तरीही, तेव्हढे सोडल्यास, लेख एकंदरीत संतुलित आहे.
27 Dec 2012 - 8:04 am | क्लिंटन
भारतात आपण निवडणुकांसाठी वेस्टमिन्स्टर मॉडेल अवलंबले आहे आणि त्याअंतर्गत ज्या उमेदवाराला सगळ्यात जास्त मते मिळतात तो उमेदवार जिंकतो.भारतात असलेल्या विविधतेमुळे विजयी उमेदवारांमध्ये ५०% पेक्षा जास्त मते मिळणारे उमेदवार फार नसतात आणि त्यामुळे असे आकड्यांशी खेळून विविध तर्कटे काढता येतात.
१९७७ ते २०११ या काळात पश्चिम बंगालमध्ये डावी आघाडी सत्तेत होती.१९८२ ते १९९६ च्या निवडणुकांदरम्यान डाव्या आघाडीला ४७ ते ४९% मते आणि २९४ पैकी २१० ते २५४ जागा मिळत असत. तर कॉंग्रेस पक्षाला ४०% ते ४२% मते आणि ४० ते ७५ जागा मिळत असत.मतांमधला हा ६-७% चा फरक जागांमध्ये पाचसहा पटींच्या फरकामध्ये रूपांतरीत होत असे.
१९८४ मध्ये राजीव गांधींना लोकसभेत ५४५ पैकी ४१५ जागा मिळाल्या आणि अभूतपूर्व यश मिळाले पण मते किती मिळाली?तर ४९.८% म्हणजे त्यावेळीही ५०.२% मतदार कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात होते.
प्रत्येक पक्ष काही जिल्ह्यांमध्ये/विभागांमध्ये बलिष्ठ असतो तर काही ठिकाणी कमजोर असतोच. १९९८ मध्ये राजस्थान विधानसभेत कॉंग्रेस पक्षाला २०० पैकी १५३ जागा मिळाल्या होत्या.पण पाली जिल्ह्यात ७ पैकी केवळ दोनच जागा कॉंग्रेस पक्षाला मिळाल्या होत्या.शिवसेना-भाजप युतीला १९९५ मध्ये महाराष्ट्रात २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या. युतीने मुंबईत ३४ पैकी ३० जागा जिंकल्या म्हणजे उर्वरीत महाराष्ट्रात २५४ पैकी १०८ च जागा जिंकल्या.पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी युतीचा मोठा पराभव झाला.इतकेच काय तर त्या निवडणुकीत शरद पवारांच्या कॉंग्रेस पक्षाला ३०% आणि युतीला २९% मते मिळाली होती तरी जागा युतीला १३८ तर कॉंग्रेसला ८०!! राजीव गांधींना १९८४ मध्ये अभूतपूर्व यश मिळाले पण आंध्र प्रदेशात ४२ पैकी ३० जागा विरोधी तेलुगु देसमने जिंकल्या.१९९१ मध्ये उत्तर प्रदेशात भाजपला ४२५ पैकी २२१ जागा मिळाल्या पण मते होती ३१%. पण १९९३ मध्ये भाजपची मते ३३% झाली तरी जागा १७७ वर खाली आल्या. पण त्याच वेळी २७% मते आणि १७६ जागा जिंकून सपा-बसपा युतीचे मुलायमसिंह यादव मुख्यमंत्री झाले. असे अनेक आकडे मी देऊ शकेन.अर्थात तो उद्देश नाही.उद्देश आहे की असे सगळे निकाल येतात त्याचे कारण वेस्टमिन्स्टर पध्दतीमुळे हा माझा मुद्दा मांडणे!!
तेव्हा अहमदाबाद, बडोद्यातून भाजपचा विजय झाला पण बनासकाठामधून,आणंदमधून भाजपचा पराभव झाला, इथून पराभव झाला असली अनुमाने काढून नक्की काय मिळते हे मला अजूनही कळलेले नाही.प्रत्येक पक्षाचा कुठून तरी विजय होणार, कुठून तरी पराभव होणार हे नक्कीच आहेच की.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे शहरी मतदारसंघ वाढले याचा मोदींना फायदा झाला म्हणून बोटे मोडण्यात काय अर्थ आहे?यापूर्वीची मतदारसंघांची पुनर्रचना झाली होती १९७० च्या दशकात आणि १९७७ मध्ये पहिल्यांदा निवडणुका या मतदारसंघांप्रमाणे झाल्या होत्या.नंतरची पुनर्रचना झाली २००८ मध्ये म्हणजे किमान ३१ वर्षांनंतर. या ३१ वर्षांमध्ये शहरीकरणाचे प्रमाण भारतात खूप वाढले म्हणजे शहरी मतदारसंघ वाढणार आणि ग्रामीण मतदारसंघ कमी होणार हे ओघाने आलेच. बदलेल्या भारताचे प्रतिबंब या बदललेल्या मतदारसंघांमध्ये नक्कीच आहे आणि असलेच पाहिजे.आणि शहरी मतदारसंघ वाढले आणि ग्रामीण मतदारसंघ कमी झाले हा प्रकार देशातील सगळ्या राज्यांमध्ये झाला आहे.म्हणजे जो पक्ष शहरी भागांमध्ये अधिक शक्तीशाली आहे त्या पक्षाला त्याचा आपसूक फायदा होणारच आहे.त्याविषयी तक्रार करायचे काय कारण आहे?
27 Dec 2012 - 8:23 am | विकास
ह्याच संदर्भात लिहीणार होतो. पण आकडेवारी आपण मस्त दिली आहेत.
बाकी उरला प्रश्न ६ कोटी जनतेचा विजय वगैरे म्हणणे. असेच कायम विजेत्याकडून म्हणले जाते. त्यात नवीन काहीच नाही. फक्त मोदी म्हणतात म्हणून बोटे मोडण्यातला प्रकार झाला.
अमेरीकन निवडणूकीत तर लाल (रिपब्लीकन) राज्ये कुठली, निळी (डेमोक्रॅट्स) राज्ये कुठली आणि अधांतरी राज्ये (स्विंग स्टेट्स) कुठली हे जवळपास माहीत असते. ज्या राज्यात एखाद्या पार्टीस बहुमत मिळते त्या राज्याची सर्वच मते (दोन राज्यांचा अपवाद सोडल्यास) त्या पार्टीच्या पदरात पडतात!
आत्ता केंद्रातील सरकारला देखील त्या सरकारमधील बहुमत वाले अर्थात काँग्रेस आणि जनता काँग्रेसचेच सरकार समजते जरी ते संपुआचे सरकार असले तरी...
26 Dec 2012 - 11:37 pm | नर्मदेतला गोटा
>> बाळासाहेब ज्यांना आदरणीय ते सगळे आम्हाला आदरणीय.
महाराष्ट्रात अजुनही काही आदरणीय व्यक्तिमत्वे आहेत
त्यातले आघाडीचे नाव म्हणजे खा राऊत
खूप छान बोलतात, घणाघाती बोलतात
30 Dec 2012 - 4:56 pm | श्रीगुरुजी
"२००४ इंडिया शायनिंगच्या वेळी भाजपाचा पराभव झाला, पण तो राजकिय समीकरणांचा विजय होता, काँग्रेसने निवडणुकपुर्व अलायंस केले होते. ते नसते केले तर भाजपा २००४ साली सत्ता सहज राखु शकला असता."
१००% सहमत! इंडिया शायनिंगचा किंवा गुजरात दंगलींचा व भाजपच्या पराभवाचा काहीच संबंध नव्हता. त्या निवडणुकीत भाजपने द्रमुक, चौतांलाचा लोकदल पक्ष, आसाम गणपरिषद, तृणमूल काँग्रेस असे अनेक सहकारी पक्ष गमावले व बर्याच राज्यांतून स्वबळावर निवडणू़क लढवावी लागली. याउलट काँग्रेसने द्रमुकला आपलेसे केले. त्याबरोबरीने तृणमूल काँग्रेस, राजद, तेलंगणा राष्ट्रीय समिती, लोकजनशक्ती इ. पक्षांना आपलेसे केले. त्याचा फायदा होऊन युपीएला एनडीएपेक्षा थोड्या जागा जास्त मिळून सत्ता स्थापन करता आली. वास्तविक पाहता २००४ च्या निवडणुकीत भाजपला १३८ व काँग्रेसला १४५ जागा होत्या, तर युपीएला २१० व एनडीएला १८७ जागा होत्या. इतका कमी फरक असूनसुद्धा काँग्रेसला सरकार स्थापन करता आले कारण डावे पक्ष (६२ जागा), समाजवादी (३८ जागा) व बसप (२० जागा) यांनी दिलेला भक्कम पाठिंबा.
31 Dec 2012 - 4:45 pm | क्लिंटन
२००४ मध्ये नक्की काय झाले ते बघू.१९९९ मध्ये एन.डी.ए ला ३०४ जागा मिळाल्या तर २००४ मध्ये १८५. म्हणजे ११९ जागा कमी झाल्या.त्या जागा कुठून कमी झाल्या? आंध्र प्रदेशात १९९९ मध्ये ३६ तर २००४ मध्ये ५ (३१ जागा कमी), तामिळनाडू मध्ये १९९९ मध्ये २६ तर २००४ मध्ये ० (२६ जागा कमी), उत्तर प्रदेशात १९९९ मध्ये भाजपच्या २९ तर लोकतांत्रिक काँग्रेसच्या २ अशा ३१ तर २००४ मध्ये उत्तर प्रदेशात १० आणि उत्तराखंडमध्ये २ अशा १२ (१९ जागा कमी), हरियाणात १९९९ मध्ये १० तर २००४ मध्ये १ (९ जागा कमी), दिल्लीत १९९९ मध्ये ७ तर २००४ मध्ये १ (६ जागा कमी), गुजरातमध्ये १९९९ मध्ये २० तर २००४ मध्ये १४ (६ जागा कमी), पश्चिम बंगालमध्ये १९९९ मध्ये १० तर २००४ मध्ये १ (९ जागा कमी), बिहार+झारखंड मध्ये १९९९ मध्ये ४१ तर २००४ मध्ये १३ (२८ जागा कमी) या राज्यांचा मुख्य समावेश आहे.
एन.डी.ए ने सर्वात मोठी आपटी खाल्ली आंध्र प्रदेशात.त्यावेळी चंद्रबाबू नायडू भाजपबरोबरच होते.पण सप्टेंबर १९९५ ते मे २००४ अशी ८.५ वर्षे सत्तेत असल्यामुळे तिथे अॅन्टी इन्कंबन्सी होती आणि २००४ मध्ये आंध्र प्रदेशात एन.डी.ए चा पराभव झाला यात फार नवल नाही.
तामिळनाडूमध्ये त्या खालोखाल आपटी खाल्ली.१९९९ मध्ये द्रमुक एन.डी.ए बरोबर होते तर २००४ मध्ये अण्णा द्रमुक. द्रमुकने सोडलेली साथ हे केंद्रात युपीएचे सरकार आले याचे मोठे कारण आहे.आता हिंडसाईटमध्ये द्रमुकने साथ सोडली आणि द्रमुकला थांबवायला भाजपने प्रयत्न केले नाहीत ही चूक जरूर वाटते.पण २००४ मधली परिस्थिती काय होती?२००१ मध्ये जयललितांनी निवडणुका स्वीप केल्या होत्या.२००२ आणि २००३ मधल्या पोटनिवडणुकांमध्येही इतर सर्व पक्षांनी साथ सोडलेली असतानाही जयललितांनीच विजय मिळवला होता.तेव्हा जयललितांचा २००४ मध्ये अगदी पुरता धुव्वा उडेल अशी अपेक्षा एन.डी.ए ची नसावी. (२००९ मध्ये तामिळनाडूत लोकसभा निवडणुकीत द्रमुक-काँग्रेसचा विजय झाला अगदी पी.एम.के आणि एम.डी.एम.के ने साथ सोडलेली असतानाही.२००४ मध्ये तसे होईल अशी एन.डी.ए ची अपेक्षा कदाचित असावी).आता हिंडसाईटमध्ये तो निर्णय चुकीचा वाटतो पण त्यावेळची परिस्थिती बघता तो निर्णय इतका चुकीचा ठरेल अशी अपेक्षा नसावी.
पश्चिम बंगालमध्ये २००४ मध्ये ममता बॅनर्जी एन.डी.ए बरोबरच होत्या.पराभव झाल्यानंतर ममतांनी गुजरात दंगलींमुळे आमचा पराभव झाला असे म्हटले होते.तृणमूल आणि काँग्रेसमध्ये सख्य वाढले २००८ मध्ये डाव्यांनी मनमोहन सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर.डिसेंबर २००६ मध्ये ममतांनी सिंगूरप्रकरणी उपोषण केले तेव्हाही एन.डी.ए त्यांच्याबरोबरच होते.
बिहारमध्येही नितीश कुमार आणि जॉर्ज फर्नांडिस २००४ मध्ये एन.डी.ए बरोबरच होते.१९९९ पेक्षा काय बदलले असेल तर पासवानांनी एन.डी.ए ची साथ सोडून लालू-काँग्रेस युतीबरोबर जायचे ठरविले.तरी त्यामुळे १९९९ मधील ४१ पासून २००४ मधील १३ पर्यंत आपटी खाल्ली जाईल याचे कारण जस्टीफाय होते असे वाटत नाही.त्यावेळी केंद्र सरकारविरूध्द अॅन्टी इन्कबन्सी बिहार+झारखंडमध्ये नक्कीच होती.
हरियाणामध्येही चौटाला १९९९ पासून सत्तेत होते आणि चौटालांचा कारभार फार लोकप्रिय वगैरे अजिबात नव्हता. त्यामुळे तिथेही प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसणार हे नक्कीच होते.त्यातून आयत्या वेळी चौटालांनी एन.डी.ए ची साथ सोडली म्हणून भाजपला किशनसिंग सांगवानांची सोनीपत ही एक जागा तरी जिंकता आली.इतर जागा काँग्रेसने अगदी २+ लाख मताधिक्याने जिंकल्या होत्या.चौटालांचा अगदी पूर्ण धुव्वा उडाला होता.
आसामात १९९९ मध्ये आसाम गण परिषद एन.डी.ए बरोबर नव्हता तर तो २००१ मध्ये विधानसभा निवडणुकांसाठी आला होता.२००४ मध्ये परत त्या पक्षाने एन.डी.ए ची साथ सोडली.१९९९ मध्ये आणि २००४ मध्येही भाजपला आसामात दोन जागाच मिळाल्या. (गुवाहाटी,सिलचर, मंगलदोई आणि दिब्रुगढ यापैकी एक-दोन जागा भाजप जिंकत आला आहे).तेव्हा आगप बरोबर नसल्याचा भाजपला तोटा जागांच्या स्वरूपात झाला नव्हता.
तेव्हा किती राज्यांमध्ये मित्रपक्ष सोडून गेले आणि एकट्याने निवडणुक लढवावी लागल्याचा तोटा भाजपला झाला याचा निर्णय वाचकांवरच सोडतो.
तरीही २००४ मध्ये योग्य प्रकारे मित्रपक्ष मिळविले असते तरी भाजपने सत्ता सहज राखली असती असे म्हणणे जरा धाडसाचे वाटते.याचे कारण आंध्र प्रदेशात अॅन्टी इन्कबन्सी होती (ज्याची कल्पना स्वतः चंद्रबाबूंना होती.म्हणून नोव्हेंबर २००३ मध्ये नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यावर लोकांची सहानुभूती मिळावी म्हणून त्यांनी लगेच आंध्र विधानसभा बरखास्त केली होती आणि वाजपेयींच्या लोकप्रियतेचा राज्यात फायदा व्हावा म्हणून एप्रिल-मे २००४ मध्येच लोकसभा निवडणुकाही व्हाव्यात असा त्यांचा आग्रह होता हे अडवाणींच्या पुस्तकातही लिहिले आहे) तसेच हरियाणामध्येही तोच प्रकार होता. या दोन राज्यांमधून १९९९ मध्ये एन.डी.ए ला ४६ जागा मिळाल्या होत्या.त्यातल्या खूप जागा कमी होणार हे दिसतच होते.तसेच दिल्लीमध्ये डिसेंबर २००३ मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला परत २/३ बहुमत मिळाले होते. (१९९८ मध्येही तोच प्रकार झाला होता पण नंतरच्या काळात कारगील युध्द आणि वाजपेयींचे सरकार एका मताने पडणे हे दोन मोठे घटक झाले होते ज्यामुळे भाजपने १९९९ मध्ये दिल्लीतील सातही जागा जिंकल्या होत्या. तशी कोणतीही घटना डिसेंबर २००३ आणि मे २००४ मध्ये घडलेली नव्हती आणि लोकांची सहानुभूती भाजपला मिळायची शक्यता नव्हती). तेव्हा दिल्लीतही नुकसान होणार हे नक्कीच होते.उत्तर प्रदेशात पक्षाची अवस्था २००२-२००३ मध्ये अजून कमजोर झाली होती हे दिसतच होते. तेव्हा १९९९ मधील ३१ जागा राखणे कठिणच होते. तेव्हा आंध्र, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशात किमान ५० जागांचा फटका बसणार असा अंदाज मला तरी आधीच आला होता (त्यावेळी मिसळपाव नव्हते नाहीतर तेव्हाही माझे अंदाज आधीच जाहिर केले असते ) भाजपचे सरकार बनायला किमान २६०-२६५ जागा हव्यातच. काँग्रेसला २१० जागा मिळाल्या तरी सेक्युलॅरिझमच्या नावावर उरलेले अंतर कापणे अधिक सोपे पण भाजपला नाही.तेव्हा २००४ मध्ये योग्य युती झाली असती तरी भाजप-एन.डी.ए २६०-२६५ पर्यंत पोहोचले असते असे मला तरी वाटत नाही.
त्यावेळी राजदिप सरदेसाई एन.डी.टी.व्ही मध्ये होते.आणि एन.डी.ए ची पिछेहाट होत आहे हे कळताच त्यांनी एक मार्मिक टिप्पणी केली.India is not shining even in Malabar Hill or Connaught Place. याचे कारण भाजपचा शहरी जागांमधूनही पराभव होत होता !!
31 Dec 2012 - 7:41 pm | श्रीगुरुजी
तुमचे विश्लेषण जबरदस्त आहे. अगदी बारिकसारिक गोष्टीसुद्धा तुमच्या लक्षात आहेत.
फक्त एकाच चुकीची दुरुस्ती करतो.
"तामिळनाडूमध्ये त्या खालोखाल आपटी खाल्ली.१९९९ मध्ये द्रमुक एन.डी.ए बरोबर होते तर २००४ मध्ये अण्णा द्रमुक. द्रमुकने सोडलेली साथ हे केंद्रात युपीएचे सरकार आले याचे मोठे कारण आहे.आता हिंडसाईटमध्ये द्रमुकने साथ सोडली आणि द्रमुकला थांबवायला भाजपने प्रयत्न केले नाहीत ही चूक जरूर वाटते.पण २००४ मधली परिस्थिती काय होती?२००१ मध्ये जयललितांनी निवडणुका स्वीप केल्या होत्या.२००२ आणि २००३ मधल्या पोटनिवडणुकांमध्येही इतर सर्व पक्षांनी साथ सोडलेली असतानाही जयललितांनीच विजय मिळवला होता.तेव्हा जयललितांचा २००४ मध्ये अगदी पुरता धुव्वा उडेल अशी अपेक्षा एन.डी.ए ची नसावी. "
२००४ मध्ये तामिळनाडूमध्ये भाजपला एकट्याला निवडणुका लढवाव्या लागल्या, कारण अद्रमुक ने १९९९ मध्ये व द्रमुकने जानेवारी २००४ मध्ये भाजपाची साथ सोडली होती. जानेवारी २००४ पर्यंत द्रमुक एनडीएमध्ये सामील होते व केंद्रात द्रमुकचे ७-८ मंत्री होते. गुजरात दंगलीपासून करूणानिधी अस्वस्थ होते. शेवटी जानेवारी २००४ मध्ये द्रमुकचे मुरासोली मारन (करूणानिधींच्या बहिणीचा मुलगा) यांचे निधन झाल्यावर द्रमुक एनडीएतून बाहेर पडले. काँग्रेसने लगेचच द्रमुकबरोबर युती करून जबरदस्त फायदा मिळविला.
1 Jan 2013 - 8:28 am | क्लिंटन
धन्यवाद श्रीगुरूजी.
१९९९ मध्ये अण्णा द्रमुकने भाजपची साथ सोडली होती पण २००४ मध्ये भाजप-अण्णा द्रमुक युती परत झाली होती. आऊटलूकमधील हा दुवा म्हणतो की २००४ च्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूमध्ये धुव्वा उडूनही भाजप-अद्रमुक युती चालूच राहिल असे भाजपने म्हटले (तसे प्रत्यक्षात झाले नाही ही गोष्ट वेगळी). २००४ मध्ये राज्यात भाजपने अण्णा द्रमुकबरोबर युती करून कोईम्बतूर,निलगिरी,तिरूचिरापल्ली, कन्याकुमारी आणि इतर २-३ जागा (आता लक्षात नाही) लढविल्या होत्या.
मला वाटते की १९९२ मध्ये जयललितांनी राष्ट्रीय एकात्मता परिषदेत राममंदिर आंदोलनाला पाठिंबा दिल्यापासूनच भाजपचा ओढा जयललितांकडे होता.१९९९ ते डिसेंबर २००३ दरम्यान द्रमुकबरोबर भाजप होता पण तो मनापासून नाही.
30 Dec 2012 - 5:18 pm | श्रीगुरुजी
२०१४ च्या निवडणुकीत १९९६ ची परिस्थिती येईल असे मला वाटते. १९९६ मध्ये काँग्रेस १४०, भाजप १६० व इतर २४२ अशी परिस्थिती होती. कोणत्याही परिस्थितीत भाजपचे सरकार बनू द्यायचे नाही असा काँग्रेसने चंग बांधला होता. पण काँग्रेसला फक्त १४० जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसची हतबलता बघून प्रादेशिक पक्षांनी संगनमत करून काँग्रेसच्या पाठिंब्यावर स्वतःचे सरकार स्थापन केले. जो माणूस ग्रामपंचायतीचा सदस्य बनण्यास देखील लायक नाही, अशा देवेगौडाला पंतप्रधान बनविले गेले. काँग्रेसने आपल्या विश्वासघातकी परंपरेला जागून आधी देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढला व नंतर गुजराल सरकारचा पाठिंबा काढून देशावर २ वर्षांच्या आत निवडणूक लादली.
काँग्रेसच्या पाठिंब्यावर आजवर ४ सरकारे सत्तारूढ झाली पण सर्व अल्पायुषी ठरली. शपथविधी होताच काही महिन्यांच्या आतच सरकार पाडण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. आजपर्यंत काँग्रेसने आपल्या पाठिंब्यावर उभी राहिलेली ४ सरकारे खाली खेचली आहेत. त्यात चरणसिंग (२१ दिवस), चंद्रशेखर (४ महिने), देवेगौडा (१० महिने) व गुजराल (७ महिने) यांचा समावेश आहे.
माझा असा अंदाज आहे की २०१४ मध्ये काँग्रेस व भाजप या दोघांनाही १४०-१६० च्या आसपास जागा मिळतील व त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसच्या पाठिंब्यावर तिसर्या आघाडीचे सरकार सत्तेवर येईल. त्यानंतर काही महिन्यांतच काँग्रेस पाठिंबा काढून घेईल व २०१५ (किंवा जास्तीत जास्त उशीरा म्हणजे २०१६ मध्ये) मध्यावधी निवडणुका होऊन १९९८ किंवा १९९९ ची परिस्थिती निर्माण होईल.
२०१४ मध्ये तिसर्या आघाडीच्या पंतप्रधानपदासाठी नवीन पटनाईक, चंद्रबाबू नायडू, जयललिता व नितीशकुमार ह संभाव्य प्रतिस्पर्धी असतील. त्यात काँग्रेसचा कल जयललिता किंवा नितीशकुमारांकडे असेल. त्याचे कारण म्हणजे चंद्रबाबू नायडू व नवीन पटनाईक हे त्यांच्या राज्यात काँग्रेसचे थेट प्रतिस्पर्धी आहेत. पण बिहार व तामिळनाडू या राज्यात काँग्रेस ही मुख्य खेळाडूच नसल्याने जयललिता किंवा नितीशकुमारांना पाठिंबा देण्यात त्यांना काहीच अडचण नाही. उलट त्यामुळे त्या राज्यात काँग्रेसला एक नवीन साथीदार मिळेल.
जयललिता भाजपवर अजिबात अवलंबून नाही. त्यामुळे काँग्रेसचा पाठिंबा घेण्यात त्यांना कुठलीच अडचण नाही. नितीशकुमार व भाजपची युती असली तरी भाजपने बिहार सरकारचा पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही कारण २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत संजद कडे तब्बल ११५ आमदार आहे व बहुमतासाठी कमी पडणार ७ आमदार हे काँग्रेसच्या ४, लोजश च्या ३ व राजदच्या २१ आमदारांमधून सहज गळाला लागतील.
एकंदरीत २०१४ मध्ये १९९६ सारखी परिस्थिती व त्यानंतर होणार्या मध्यावधी निवडणुकीत (२०१५ किंवा २०१६ मध्ये) १९९८ किंवा १९९९ सारखी परिस्थिती निर्माण होईल असे मला वाटते.
1 Jan 2013 - 1:15 pm | क्लिंटन
हो सध्या तरी असे चित्र दिसत आहे.
जयललिता किंवा नितीश कुमार अशा सरकारचे प्रमुख बनायला तयार होतील का हा प्रश्न आहे.मध्यंतरी देवेगौडापुत्र एच.डी.कुमारस्वामींनी म्हटले की १९९६ मध्ये देवेगौडा पंतप्रधान झाल्यामुळे तसे नुकसानच झाले.कारण एकदा पंतप्रधानपद भुषविल्यावर राज्यात मुख्यमंत्री म्हणून जाणे प्रशस्त दिसणार नाही आणि दहा-अकरा महिन्यातच सरकार पडल्यामुळे मुख्यमंत्रीपदही गेले आणि पंतप्रधानपदही गेले अशी परिस्थिती.तशी परिस्थिती जयललिता किंवा नितीश कुमारांना परवडेल का हा प्रश्न आहे.
त्यापेक्षा मग मुलायमसिंहांचे पंतप्रधान बनायचे चान्सेस जास्त दिसतात.मला वाटते २०१२ मध्ये स्वतः मुख्यमंत्री न बनता त्यांनी अखिलेशला मुख्यमंत्री केले त्याचे कारणही तेच असावे. की आणखी कोणी कृष्णअश्व पंतप्रधान बनेल ही पण शक्यता आहेच.
बिहारमध्ये भाजपची स्वतःची व्होटबँक आहे. उत्तर प्रदेशात जशी भाजपच्या व्होटबँकेला गळती लागली तशी बिहारमध्ये तितक्या प्रमाणावर लागलेली नाही.तेव्हा २०१४ मध्ये भाजपने पाठिंबा काढून घेतल्यास नितीश कुमारांचे सरकार पडणार नाही पण २०१५ मध्ये विधानसभा निवडणुकांच्या वेळी नितीश कुमारांना भाजपशिवाय एकट्याने बहुमत मिळेल असे वाटत नाही.कारण जेडीयु आणि भाजपची मते एकमेकांना पुरक आहेत आणि त्या अर्थी दोघांनाही एकमेकांची गरज आहे.नवीन पटनायकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली पण ओरिसामध्ये भाजप हा बलिष्ठ पक्ष कधीच नव्हता. पण बिहारमध्ये भाजप ओरिसामध्ये आहे तितका कमजोर नाही.तेव्हा सध्या तरी नितीश कुमार भाजपला सोडेल असे वाटत नाही.
+१
1 Jan 2013 - 5:40 pm | श्रीगुरुजी
"कारण एकदा पंतप्रधानपद भुषविल्यावर राज्यात मुख्यमंत्री म्हणून जाणे प्रशस्त दिसणार नाही आणि दहा-अकरा महिन्यातच सरकार पडल्यामुळे मुख्यमंत्रीपदही गेले आणि पंतप्रधानपदही गेले अशी परिस्थिती.तशी परिस्थिती जयललिता किंवा नितीश कुमारांना परवडेल का हा प्रश्न आहे."
तशी परिस्थिती नितीशकुमारांना परवडणार नाही हे नक्की, पण जयललिताला एकदा पंतप्रधान झाल्यावर काही काळाने परत मुख्यमंत्री होण्यास नक्कीच आवडेल. कारण (१) अद्रमुक हा संपूर्ण एकखांबी तंबू आहे. त्यामुळे जयललिता आपल्याव्यतिरिक्त कोणत्याही इतर आमदाराला सामर्थ्यवान होऊन देणार नाही. जर पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर आपल्याजागी एका अत्यंत दुर्बल आमदाराला मुख्यमंत्रीपदी बसवून त्या दिल्लीला सुखाने पंतप्रधानपदावर बसतील व नंतर जर पंतप्रधानपद गेले तर लगेच त्या आमदाराला हटवून पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील. (२) सत्तेवर नसलेल्या व्यक्ती अडगळीत पडतात व त्यांचा प्रादेशिक पक्ष राज्यात अत्यंत दुर्बल होतो हे त्यांनी देवेगौडांवरून शिकले असेलच. त्यामुळे पुन्हा एकदा एक पायरी खाली उतरण्यास त्यांची अजिबात हरकत नसेल व त्यांनी तसे करण्यास तामिळ जनतेचीही अजिबात आडकाठी नसेल.
नितीशकुमारांची परिस्थिती जरा वेगळी आहे. त्यांच्या पक्षात त्यांच्याशिवाय शरद यादव, शिवानंद तिवारी इ. काहीसे नाव असलेले नेते आहेत. त्यामुळे त्यांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर पंतप्रधानपद गमाविल्यानंतर परत राज्यात येणे त्यांना अवघड जाईल.
"त्यापेक्षा मग मुलायमसिंहांचे पंतप्रधान बनायचे चान्सेस जास्त दिसतात.मला वाटते २०१२ मध्ये स्वतः मुख्यमंत्री न बनता त्यांनी अखिलेशला मुख्यमंत्री केले त्याचे कारणही तेच असावे. की आणखी कोणी कृष्णअश्व पंतप्रधान बनेल ही पण शक्यता आहेच."
मुलायमसिंग जोरदार प्रयत्न करणार हे नक्की, पण मायावती व अजितसिंग त्यांना अजिबात पाठिंबा देणार नाहीत. तसेच काँग्रेसही पाठिंबा देणार नाही, कारण १९९९ मध्ये मुलायमसिंगांनी आपल्या परकीय नागरिकत्वाचा मुद्दा पुढे आणून आपली पंतप्रधान बनायची संधी घालविली हे सोनिया गांधी अजून विसरल्या नसतील.
शरद पवार, मायावती, मुलायमसिंग, चंद्रबाबू नायडू, नवीन पटनाईक इं. ना काँग्रेस पंतप्रधानपदासाठी अजिबात पाठिंबा देणार नाही असे मला वाटते. अजितसिंग कदाचित "कृष्णअश्व" ठरू शकेल.
1 Jan 2013 - 10:47 pm | क्लिंटन
एकदा पंतप्रधान झाल्यानंतर मुख्यमंत्री होऊ नये असा घटनात्मक दंडक अजिबात नाही.पण अधिक मानाच्या आणि अधिकाराच्या पदावर काम केल्यानंतर खाली उतरणे कठिण आहे हा मानवी स्वभाव झाला.जयललिता काहीही झाले तरी स्वतःचा मान राखून असतात.१९९९ मध्ये वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेताना त्यांनी कुठेही आपल्या पक्षाचा/आपला मान राखूनच सगळ्या गोष्टी केल्या.म्हणजे पहिल्यांदा सत्ताधारी आघाडीच्या समन्वय समितीतून माघार घेतली मग आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावले आणि नंतरच सरकारचा पाठिंबा काढून घेतला.म्हणजे सरकारला आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना मंत्रीमंडळातून काढले अशी बातमी यायला वाव दिला नाही.तरीही अण्णा द्रमुक हा एकखांबी तंबू आहे तेव्हा जयललिता काहीही करू शकतील ही गोष्ट नाकारता येणार नाहीच.२००१ मध्ये जयललिता काही काळ मुख्यमंत्रीपदापासून दूर होत्या तेव्हा त्यांनी थंबीदुराई किंवा पी.एच.पांडियन या त्या मानाने थोडा जनाधार असलेल्या नेत्यांना मुख्यमंत्री न करता पन्नीरसेलवम या फार महत्वाकांक्षी नसलेल्या नेत्याला मुख्यमंत्री केले होते.
हो बरोबर.काँग्रेस या बाबतीत खूपच पर्टिक्युलर आहे.आपल्याला पाहिजे तेव्हा काँग्रेसवाले मुलायमसिंहांची मदत जरूर घेतील पण मुलायमसिंहांना पाठिंबा द्यायची वेळ आली तर १९९९ आठवेल ही शक्यता बरीच जास्त.१९९६ मध्ये काँग्रेसने देवेगौडांना पाठिंबा दिला तो ज्योती बसू आणि वि.प्र.सिंह यांनी पंतप्रधानपदाला नकार दिल्यानंतर.यापैकी वि.प्र.सिंहांनी तब्येतीच्या कारणावरून पद नाकारले (वरकरणी) तरी १९८९ मध्ये राजीव गांधींचा पराभव करण्यात वि.प्र.सिंहांचा वाटा मोठा होता हे काँग्रेस पक्ष विसरला नसणार आणि त्या कारणाने त्यांच्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा मिळणे फारच कठिण होते (अर्थात हा माझा तर्क).तसेच देवेगौडा १९९१ मध्ये चंद्रशेखरांच्या पक्षाचे खासदार म्हणून कर्नाटकातून लोकसभेवर निवडून गेले होते.त्यांनी १९९३ मधील "झामुमो लाच" प्रकरणाने बदनाम झालेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान मतदानात भाग घेतला नव्हता आणि एका प्रकारे नरसिंह राव सरकारला मदत केली होती.ते नरसिंह रावांच्या लक्षात असायची शक्यता असेलच.
तरीही काँग्रेस पक्ष कोणत्याही राज्यात आपला प्रतिस्पर्धी असलेल्या कोणाही पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून पाठिंबा देणार नाहीत असे वाटत असले तरी १९९६ मध्ये देवेगौडांना पाठिंबा दिलाच होता आणि कर्नाटकात देवेगौडा हे काँग्रेसचे प्रतिस्पर्धी होते हे नक्कीच.
तरीही कोणी "कृष्णअश्व" पंतप्रधान होणार का हा प्रश्न नक्कीच पडेल. पण तो "कृष्णअश्व" अजितसिंह असेल तर मात्र ती संधीसाधूपणाची कमाल असेल.हा गृहस्थ वि.प्र.सिंह सरकारपासून (चंद्रशेखर सरकारचा अपवाद वगळता) प्रत्येक सरकारमध्ये कधीना कधी मंत्री होता/आणि अजूनही आहे.तेव्हा ते पंतप्रधान होणे म्हणजे त्या संधीसाधूपणाचे "कल्मिनेशन" असेल.तरीही अधिक काळ पंतप्रधान म्हणून वावरायची आपल्या दिवंगत पित्याची (चरण सिंह) इच्छा त्यांना पूर्ण करायला आवडेलच :)
2 Jan 2013 - 6:23 am | खटासि खट
कुठे गेले ?
आपल्या म्हणण्याप्रमाणे मोदींनी लोकशाहीची थट्टा लावली असेल तर आपल्याबद्दल आदर आहेच, पण याची सुरूवात काँग्रेसनेच सुरू केली होती हे ही आदरपूर्वक नमूद करावेसे वाटतेय. काय म्हणता ?
3 Jan 2013 - 6:14 am | खटासि खट
नरेंद्र ओदी अथवा भाजपा यांचा भाट नाही तरीदेखील काँग्रेसपेक्षा या सरकारची कामगिरी उत्तम आहे हे डोळ्यांना दिसतंय. मी गुजरातमधे जाऊन आलो. वीज आणि इंटरनेटची जोडणी यातली प्रगती पाहून थक्क झालो. अहमदाबादची बस सर्विस, बडोद्यातली स्वच्छता आणि प्रगती हे सगळं व्हिजिबल आहे. ज्या मुद्यांच्या द्वारे लेखकमहाशय हरकतीचे मुद्दे उपस्थित करत आहेत ते त्यांना काँग्रेसच्या राज्यात दिसत नाहीयेत हे समजण्यापलिकडे आहे. जर मोदी नाहीत तर पृथ्वीराज चव्हाण किंवा अजितदादा लायक आहेत का इतकंच सांगायचंय. सध्या स्पर्धा असेल तर नीतीशकुमार आणि मोदी यांच्यातच. बाकि राजकारण हा पत्रकारांचा प्रांत आहे. भविष्यवेध हा त्यांचा विषय आहे. त्याप्रमाणे घडत नाही हे आजवरच्या इतिहासातून शिकायला हवं. देवेगौडा किंवा चंद्रशेखर प्रधानमंत्री होतील हे कुणाही राजकिय पंडिताला आधी सांगता आलेले नव्हते. अशा राजकिय पांडित्यासाठी इतका वेळ खर्चणे हे राजकिय पक्षांशी संबंधितांशिवाय इतरांना शक्य नाही इतकाच निष्कर्ष आम्ही काढू इच्छितो.
2 Jan 2013 - 3:48 pm | क्लिंटन
हे वाचून तर नक्की काय बोलायचे ते समजत नाहीसे झाले आहे बघा. आणि हे लिहिणारे जगदिश भगवती म्हणजे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते पॉल क्रुगमन यांचे पी.एच.डी गाईड. ते लिहित आहेत त्याचा अर्थ नक्की काय लावायचा?
3 Jan 2013 - 3:36 pm | संपादक मंडळ
या धाग्यावरील लेखक शैलेंद्रसिंह आणि खटासि खट यांचे अनेक प्रतिसाद उपप्रतिसाद मिपा धोरणाप्रमाणे सपादित्/अप्रकाशित केले आहेत. सदस्यांनी विषयानुरूप लिहावे आणि अवांतर वैयक्तिक टीका टिप्पणी कृपया टाळावी. अन्यथा धागा वाचनमात्र करण्यात येईल.