आजूनहि मी

श्रीमत's picture
श्रीमत in जे न देखे रवी...
20 Dec 2012 - 1:44 pm

अजूनही

अजूनही मी वावरतो ह्या माणूस हरवलेल्या सनातन शहरात

ऐकतो
पवित्र परंपरा अन संस्कृतीचा झिंगलेला जयघोष,
नग्न करून धिंड काढलेल्या स्त्री बद्दलचे, भाड्याने आणलेल्या रडव्यांचे मुक्त पंचतारंकित परिसंवाद
गरिबी हटाव आणि जाती वादाच्या मादक गर्जना..........

पहातो
लोकशाहीच्या शाही सुपुत्रांकडून लोकांवर झालेला पाशवी बलात्कार
निर्विकारपणे मनावर एकही ओरखाडा उमटू न देता
मी मित्रांबरोबर चहा पितो ,सिगारेट ओढतो, हिंदी सिनेमा पहातो
प्रयेसीच्या दारावर चक्कर मारतो............

मग रात्री निर्लज्जपणे
माझ्यातला मी, स्वत:ला विचारतो
एवढा का मी षंढ अजून ही????????????

-- सुतार अंबेजोगाई
( कवितेच्या मूळ लेखका बद्दल एवढेच माहित आहे
माझ्या काहि संग्रहित कवितेमधली ऐक)

शांतरसजीवनमान

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Dec 2012 - 4:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिलं वाहिलं लेखन मिपावर दिसतंय, लिहित राहा. लेखन टाकण्यापूर्वी एकदा लेखन पूर्वपरिक्षण मोडमधे पाहून घेतले की मोठ्या चुका राहात नाही. जसे-

लोकशाईच्या शाही सुपुत्रांकडून लोकांवर झालेला पावशी बलात्कार

बाकी, अंबेजोगाईच्या परिसरातील लेखनही येऊ द्या. अंबेमाताच्या दर्शनाला येऊन आता दोन वर्ष झाली.
मुकुंदराजांच्याबद्दल वगैरे.

-दिलीप बिरुटे

श्रीमंत कविता आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद.

मी थोडी दुरुस्ती केली आहे. कारण ...एव्हढ्या चांगल्या कवितेचं हसं नको व्हायला हे.