लकांन्नो ....
ईकडे यकापेक्षा यक ईचारवंत पायले (खरं तर वाचले) लिखान जाम डेंजर नसलं तरी वह्यांची पानं आम्हीही लई
खरडली बगा . पन आक्षरांपेक्षा आक्रूत्याच जास्त भावल्या आन आवडत्या बाईंपासनं(तेंव्हा ८वी असेन) ते जाड भिंगाच्या मारकुट्या
मास्तरांना खरडंलय. मास्तर मला हाताखालंन काढायचं आन मग म्या त्यांना (कागदाबर बरं का) हाताखालून काढायचो.
ते एवढ कार्टून व्हयचं की म्या बसत आसल्याला कोपरा हासून हासून 'यडा' व्हायचा.मंग ते पान आख्या वर्गातंन हास्यलाटा तयार करत शिवटी मास्तरच्याच हातात थांबायचं.. मंग त्यो मला पुन्यांदा हाताखालनं काडायचा... साळत मास्तरचा "रेकार्ड नंबरन मार खाल्ला हाय" आपन वर्गात मार खानारा टेंडल्या हाय. आप्ल्या जवळपन कोन न्हाय त्या ईभागत (आपला चॅलेंज हाय समद्यास्नी).. लहानपणा पास्नंच ईतिहासाच्या पूस्तकातल्या म्हापूरषांना धाडी-मिशा काडून झाल्यात. समद्या परकारात (प्रकारात... ईथे ऊकल महारथी आहेत म्हणून स्पेसिफाय करनं गरजेचंच) आपली माश्टरी हाय. पन कार्टुन आन व्यक्तीचित्तार काडायची जास आवाड. यकाद्या बेवड्या कवि येवडी पानं नक्कीच भरवली आसत्याल.
आपली थूडीफार आडव्या-तिडव्या रेषा खरडल्याले प्रयोग चढवतुया.....
याच्या पयल्याच पिच्चरन याड लावलं व्हत.. याचं बगून म्या बी जिम लावली
हीचं नाव न्हाय माईत.. ईंजीनियरींग च्या २र्या वर्षाला आसताना पीयल मधी कालिजात आब्यासाला(!?!) जायचो. आब्यास कमी(जवळ जवळ नाहीच म्हणा) आन काड्या जास.
ही समोरच्या टेबलावर बसलेली. आमी आब्यास करून खरडल्याली पूरवनी......आरदं खराडलं आन बया ऊठून गिली ..
मंग रागारागांन तिला 'सेंटर शॉक" खाऊ घातलं... झाली का केसं हूबी ? बस्स बोंबलंत
ह्ये आमचं दैवत... आरनॉल्ड शिवाजीनगर.... देवानं जेवड धिल त्यापे़क्षा कैक कमवलंय पठ्ठ्यानं...
याला पाऊन आमीबी चार जोर मारल्यात...
बॉलीवूड चा चिकना हीरू -टॉम क्रुज.... (गटनेकाका तुमच्या वैनीच्या बांगड्या मंदी चानोस देता का याला?)
आतापथूर लई कागदं खरडंली... चित्रकलेची लै आवड... बा ला म्हनलं मला याच्यातंच जायचं पन बा म्हनला त्ये काय बी न्हाय
आतापथूर क्येलं त्ये बास...प्वाटापान्याचं बगा....
आता पैका हाय पन खरडन्यातली मजा न्हाय लेका...
मार क्वेरी.. कर कंपाईल.... कर डीबग....माझ मन न्हाय लागत... जगन्यातंला चार्मच हारवलाय ... बापाकड मुबलक पैका आस्ता तर नक्की लै भरी चित्रकार जालो आस्तो ..आन त्या नागव्या यम यफ हूसेनची च नागवी चित्र खराडली आस्ती....
खरडकार
कुबड्या खवीस
प्रतिक्रिया
1 Jul 2008 - 2:42 am | भाग्यश्री
चित्रं छान आली आहेत.. सगळ्यात जास्त ती मुलगी आवडली! :) नंतर ह्रितीक (परफेक्ट नाही आला, पण तरी डोळे वगैरे मस्त!).. अर्नॉल्डचं तोंड वाकडं आलय का जरा? बाकी मसल्स वगैरे 'भारी'च!!
टॉम क्रुझ नाही आला पण चांगला हो.. :( काय आहे, तो विक पॉईंट आहे.. तो परफेक्टच आला पाहीजे :) (अर्थात मला इतकसं सुद्धा नाही जमणार! पण असंच मत सांगितलं.. डोंट माईंड..)
http://bhagyashreee.blogspot.com/
1 Jul 2008 - 2:54 am | टारझन
भाग्यश्री ताई (योगाने माझ्या बहीनीचं पण नाव हेच आहे)
चित्रे ही विना खोडरबर काढलेली आहेत .. मला खोड्या काढायची सवय आहे ... खोडायची नाही.
हो मान्य आहे तिथे परकेक्शनंच हवं .. मला ह्रुतिक आवडला.. आम्ही हौशी चित्रकार ,,, खरडंच ती.
प्रतिक्रीयेने (धन आणि ॠण) आनंद होतो.... कोणीतरी दखल घेतली ...याचा
क्रुपाभिलाशी
कु ख
http://picasaweb.google.com/prashants.space
1 Jul 2008 - 2:56 am | एडिसन
आहेत चित्रं..ती मुलगी मस्त आलीये राव..काय केस आहेत..वा..ह्रितिकचे ओठ सोडून बाकी परफेक्ट!
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
1 Jul 2008 - 3:01 am | भडकमकर मास्तर
त्या मुलीचे चित्र उत्तम आहे.... :)
अजून इतर चित्रे असल्यास इथे द्यावीत...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
2 Jul 2008 - 12:54 am | टारझन
मास्तर .....
आता म्या आफ्रिकेत हाय ना .... सगळीकंड काळ्या कुट्ट च पोरी हो....... आता तुमची जर विच्छाच आसल तर
"खास तुमच्या"साठी एक-दोन जळक्या पूर्या खरडीन म्हणतो (ह घ्या)....
पन तरी बी नविन कायतरी नक्कीच घिऊन यील.......
च्यामारी .....तुमी बी मास्तरच की... मला हाताखालनं काडू नकावो प्लीज... (तसं बी आता मला काय मार लागत नाय बा.... काडंल तर तुमालाच लागंल...)
हौशी कलाकार ) कु ख
http://picasaweb.google.com/prashants.space
1 Jul 2008 - 3:05 am | चतुरंग
हृतिक आवडला, दोन नं मुलगी (झांटिपी?) पण चांगली जमली आहे!
(अर्नोल्ड आणि टॉम क्रूझ हे मात्र हुकलेत!)
प्रयत्न स्तुत्य.
चतुरंग
1 Jul 2008 - 3:49 am | पिवळा डांबिस
चतुरंगकाकांशी सहमत आहे...
खविसराव, हे क्षेत्र तुम्हाला चांगलं जमतंय असं दिसतंय!
अजुन नवनवीन चित्रं येऊ द्या...
आन त्या नागव्या यम यफ हूसेनची च नागवी चित्र खराडली आस्ती....
आयडिया झकास आहे!!:)
त्या हुसेनाला असा आगळावेगळा अहेर कुणी दिला नसेल!!:)
1 Jul 2008 - 7:41 am | झकासराव
मास्तर मला हाताखालंन काढायचं आन मग म्या त्यांना (कागदाबर बरं का) हाताखालून काढायचो>>>>>>>>.
=))
सगळ वर्णन जबरा केल आहेस रे. :)
मुलगीच चित्र सगळ्यात जास्त आवडलं.
प्रयत्न सुरु ठेव रे.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
1 Jul 2008 - 7:45 am | यशोधरा
मुलीचं चित्र आवडलं. हृतिक जमता जमता राहिला थोडासा, असं वाटलं.
अरनॉल्ड आणि क्रूझबाबा मात्र नाही जमले एवढे असं वाटलं... अर्थात, मला एवढही नाही जमणार...
1 Jul 2008 - 10:41 am | टारझन
यशोधरा दिदि,
"पोरगी" सगळ्यांनाच आवडली.(मला जरा पर्सनली आवडंलेली... पण... असो) हो गं.हृतिक थोडक्यात हुकलाय. पण त्याच नाक मात्र सही आलंय. त्या आर्नोल्डच्या मस्कल्स-बॉडी वर खंरतंर प्रतिक्रीया अपेक्षित होती...
>>>> अर्थात, मला एवढही नाही जमणार...
अहो हे खासकरून ऊल्लेखायची जरूर नव्हती...वर म्हट्ल्या प्रमाणे.. कोणीतरी दखल घेतल्याचा आनंद फार
http://picasaweb.google.com/prashants.space
1 Jul 2008 - 8:27 am | विसोबा खेचर
खविसा,
सगळीच चित्रं मस्त आहेत रे. पण खास करून ऍरनॉल्डचं चित्रं! त्याचा चेहेरा अंमळ विनोदी व उंचीला थोडा कमी आला आहे पण त्याची बॉडी बाकी लै भारी रेखाटली आहेस. हा पठ्ठ्या माझा पण लै आवडता आहे! :)
देवानं जेवड धिल त्यापे़क्षा कैक कमवलंय पठ्ठ्यानं...
याला पाऊन आमीबी चार जोर मारल्यात...
हा हा हा! खरं आहे..
बाकी, 'शिवाजीनगर' हे त्याचं नामकरण मस्तच आहे! :)
आपला,
(ऍरनॉल्डप्रेमी) तात्या.
1 Jul 2008 - 10:31 am | टारझन
तात्याबा,
बरोबर बोललात त्या आर्नोल्डचं तोंड आधी बनंवल आन् मग शरीर... आता ते शरिर एबढ जबरा झालं की तोंड बारिक दिसाया लागलं.
आन् मी खोडरबर वापरंत नसल्यांन ते (अज्जिबात) न जमलेंल तोंड तस्संच ठेवलं. पण खरडलेल्या बॉडीवर मी पण खूष झालो.
आणि त्याच मला आड्नाव सोडून बाकी सर्व आवडंत. कूणी ठेवलंय कूणास ठाउक ना लिवता येत ना उच्चारता! (आडनावं कोण ठेवतं हो ?)
तात्या (विंचू) चा हस्तक
कु.ख.
http://picasaweb.google.com/prashants.space
1 Jul 2008 - 10:43 am | इनोबा म्हणे
प्रयत्न चांगला आहे. सरावाने आणखी सहजता येईल.
बाकी मला विचारशिल तर तुझ्या पेन्सिलीपेक्षा तुझा पेनच लय जबरा चालतोय. चित्रांपेक्षा तुझं लेखनच मला लय आवडलं. हसून हसून पोट दूखलं की लेका!
फूकटचा सल्ला: चित्र काढताना पेन्सिल टोकाजवळ न धरता तिच्या मध्यावर धरत जा.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
1 Jul 2008 - 11:04 am | टारझन
आयलां आमचं लेखन आवडलं ... च्ययला हे तर अनपेक्षितच झालं इनोबा राव. :)
आणि सल्ला फारच पटला. आपण याच क्षेत्रातले दिसता !!!
फुकट ते पौष्टिकंच ... नाही का ?
http://picasaweb.google.com/prashants.space
1 Jul 2008 - 1:12 pm | शैलेन्द्र
हसुन हसुन मेलो........
1 Jul 2008 - 2:29 pm | मदनबाण
तुमाचा 'सेंटर शॉक" चा इफेक्ट जबरदस्त जाणवतोय..... :)
(बबलगम प्रेमी)
मदनबाण.....
2 Jul 2008 - 3:53 am | स्वप्निल..
भाऊ..मानले तुम्हाला....
चित्रे मी पण काढतो ( घोडा काढला कि गाढव ते चित्र पुर्ण झाल्यावरच समजते)
पन खोडरबर शिवाय....म्हणजे कमालच...मला माहिती आहे किती अवघड काम आहे ते....
स्वप्निल..
4 Jul 2008 - 3:16 am | टारझन
स्वप्निल दादा .......
विदाऊट पेन्सिल हे अवघडंच काम ...... होतो मोह बर्याचदा... पण खोडरबराने १२ वर्षापूर्वीच साथ सोडली ...
मला डायरेक्ट वॉटर कलरनें पन चित्र काढायला आवडतात... ते अजुन जिकरीचं काम आहे.
तुझे "गाढव" "घोडा" "खेचर"अजून काही निसर्ग चित्र असल्यास इथे चढव....
कु ख
http://picasaweb.google.com/prashants.space
2 Jul 2008 - 2:42 pm | अनिल हटेला
श्रीमान खवीस यासी,
आपण काढलेली चित्रे पाहिली...
अर्थात पोरगी मस्त जमलीये....
ह्रतीक ,टॉम पेक्षा आपला शिवाजीनगर बरा वाटतोये....
आणी हो अफ्रीकेतल्या ४-५ पोरीची चित्रे काढा....(कमीत कमी)....
आणी चढवा....
बाकी लिखाण पन जबरा आहे....
मास्तरा चा मार खण्यात आपली पन पी एच डी झालिये....
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
2 Jul 2008 - 4:21 pm | टारझन
प्रिय बैलोबास....
तुमच नाव भयंकर(!!!) आवडलं.. तूमी बी मास्तरचा मार खाल्लाय ..लई झाक...
आर्रे पण तू रिकी पाँटींग असशील... मी तेंडुलकर आहे. एक्क ही मास्तर असा नव्हता ज्याने मला (आणि मी त्याला) हाताखालनं काढलं नाही. मार खाऊन-खाऊन पाठ आणि हात निबार झाले होते. अतिशय खोडकर, टवाळक्या, टूकार , मस्कर्या, बेशरम, निर्लज्ज, बैल असल्या लोकमान्य पदव्या एकमताने मला (५वी ते १०वी) सतत मिळाल्या. तुर्त तरी कामाचा व्याप जरा जास्त असल्याने एवढा वेळ नाही मिळत ...
वर आधीच "आमचं प्रकरण" (आमचं म्हणजे फक्त माझं बरंका!!!) त्यांचं रेखाचित्र अजूनही न काढल्यानं अंमळ नाराजीचा सूर काढतय.
फावल्या वेळात नक्की काढेन(चित्र) आणि चढवेन(चित्रच) .....
लिखान आवडतय याचा बेंबीपर्यंत आनंद झाला.
थांकू थांकू
http://picasaweb.google.com/prashants.space
2 Jul 2008 - 4:58 pm | अनिल हटेला
धन्य हो देवा!!!
बघ बाबा प्रकरण आधी उरक ....
त्यानन्तर काही प्रकरन (अफ्रीकन) इकडे चढव म्हणजे...
आणी तु सचिन च रे !!!!
अवान्तरः तुला कोणी भाउ आहे का जो कुम्भ मेळ्यात बिछडला होता....
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
2 Jul 2008 - 5:14 pm | टारझन
हो रे ... बरंच काही ऊरकायचं आहे.... मूड वर असतं सगळ.....
आणि एक भाऊ नकी हरवला होता.... कूंभ मेळ्यात नाही ... पण चंबळ्च्या जंगलात ....
आम्ही दोघे विटी दांडू खेळता खेळता तिकडे पोचलो. मी एक लांव टोला लावला... तो विट्टी शोधायला गेला तर परतलाच नाही..
म्हणून तर मी जगातली सगळी जंगलं शोधत ईकडे आलोय. बाबानीं आमच्या दोघांच्या गळ्यात "लिंक" या कंपनी चे कुलूप-किल्ली घातले होते.ती किल्ली अजुन माझ्या गळ्यात आहे. माझ्या भावाच्या गळ्यात नकी ते कूलूप असेल. जर ते कुलूप ऊघडले तर तो नक्किच माझा भाऊ..... शेवटी "लिंक ताले.... सिर्फ अपनी ही चावी से खुलते है"....
तुला रे कसं ठाव ?
http://picasaweb.google.com/prashants.space
3 Jul 2008 - 8:02 pm | टिंग्या
रामराम गाववाले...............
सुगावा दिल्याबद्द्ल मंड्ळ आपले आभारी आहे.
साभार पोचपावती नंतर घेउन जावी.
4 Jul 2008 - 2:51 pm | अनिल हटेला
च्यायला!!!!
आरे मीच रे तो टाळा!!!
म्हणजे......
जन्गल-जन्गल बात चली है पता चला है.....
आणी तीकडे अफ्रीकेत कशापायी शोधतोयेस...
मी इथे चायनीज खायला म्हून चायना त (बोम्बलत) फिरतोये....
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
4 Jul 2008 - 5:42 pm | टारझन
बैलोबा .. तुला मी खरड नाही करू शकत रे .... पान नाही सपडत ...
तुला गूगल निरोप्यावर विनंती केली आहे. विनंतीला मान दे.
http://picasaweb.google.com/prashants.space
12 Aug 2008 - 5:25 pm | स्मिता
ह्रुतिक चे नाक मस्तचं जमले आहे...
आर्नोल्डच्या मस्क्युलर बॉडीपण झक्कास आली आहे..
12 Aug 2008 - 11:03 pm | संजय अभ्यंकर
अप्रतिम चित्रे!
मी बी साळत लै मार खल्लाय, पन चित्र न काडता आल्या बद्दल!
मी चित्रकलेत एकदम डफ्फर
तू, सप्रेभाऊ इ. तर गुरु लोक हैसा!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
13 Aug 2008 - 6:16 am | मनीषा
... का वापरत नाही तुम्ही ? चित्र छानच आहेत.. आणि त्यांची कॅप्शन्स तर तुमच्या सिग्नेचर सारखीच " लई भारी..."
शाळा/कॉलेज च्या आठवणी फारच मनोरंजक
..साळत मास्तरचा "रेकार्ड नंबरन मार खाल्ला हाय" आपन वर्गात मार खानारा टेंडल्या हाय.
आवडलं.
13 Aug 2008 - 12:46 pm | टारझन
मनिषा , खोडरबर आम्हास वर्ज्य आहे.. आम्ही खोडरबर वापरणे आमच्या कलेचा अपमान समजतो .. =)) तसे काही नाही .. मला मनात आलं .. आपण नाही वापरायचं .. सो नाही वापरत ..
अभ्यंकर भाऊ .. लै मोठ्या लायनित बसवलं राव .. आम्ही छोटे मोठे हौशी कलाकार हाओत .. बाकी काय नाय ...
बाकी सर्व लोक्स चे आभार ...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
13 Aug 2008 - 12:56 pm | धमाल मुलगा
टारझन,
तुलापण हा चित्रकलेचा किडा चावलेला आहे की काय?
च्यायला, आम्हाला एक रेघ सरळ मारता येईल तर शपथ, आणि इथं एक से बढकर एक चित्रकार जमा होताहेत.
हृतिकचं नाक, शिवाजीनगरकरची बॉडी सही आलंय.
आणि लेका त्या अनामिकेवर इतकं चिडायचं होय? डायरेक्ट सेंटरशॉक खिलवलंस की तिला.
लगे रहो...
येऊ दे अजुनही स्केचेस :)
13 Aug 2008 - 1:06 pm | टारझन
तुलापण हा चित्रकलेचा किडा चावलेला आहे की काय?
हो रे .. काही किडे जन्मजात असतात ... हा त्यातलाच एक ...
च्यायला, आम्हाला एक रेघ सरळ मारता येईल तर शपथ,
वाकडी तिकडी चित्र काढ ना मग ? आणि मुक्तचित्र म्हणून डकव .. म्हणायचं शोधा चित्र यात =))
आणि इथं एक से बढकर एक चित्रकार जमा होताहेत.
हो पण आम्ही पहिले बरका !!! :)
हृतिकचं नाक, शिवाजीनगरकरची बॉडी सही आलंय.
ह्रितिक ने ७-८ तास घेतले रे पण .. आणि अर्नॉल्ड ने ६ तास .. पेकाट दुखल होतं पण ... एकदा बसलो की पुर्ण झाल्यावरच उठणे ...
अनामिकेवर फिदा होतो रे .. फार डिक्टू चित्र आलय ते ... पण आर्ध चित्र झाल्यावर ऊठून गेली राव .. ते पण मला न सांगता ... मला राग आला ना ?. काश के मेरे पास न७३ होता और मै एक मायक्रोसेकंद मे ऊसको मेरे कॅमरे मे हमेशा के लिये कैद कर लेता ...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
20 Dec 2008 - 6:54 am | स्वानन्द
चित्रात तशी प्रमाणबद्धता आहे पण माझ्या मते तू डोळे काढण्यावर जास्त मेहनत घे. नुसत्या डोळ्यांकडे बघूनच व्यक्तीची ओळख पटते. बाकी शिवजीनगरची बॉडी ( शरीरयश्टी ) एकदम झकास रेखाटली आहे!
मी ही मागे ह्रुतीक चे चित्र काढले होते. सवडी ने अप्लोड करेन. आण्खी काही चित्रे ही काढली होती. पण ती माझ्या भावाला आवडली म्हणून देऊन टाकली. असो... पण मित्रा तू नुसता 'कल्लाकार' नाहीस 'कलाकार' ही आहेस एवढे मात्र नक्की!
--चित्रानन्द
20 Dec 2008 - 12:05 pm | टारझन
हा हा हा !!! मस्त ... प्रतिक्रिया आवडली भो !! च्यायला णायतर पब्लिकचे बरेच गैरसमज झालेत आमच्या विषयी हल्ली !! अचानक रिसेंट लिस्ट मधे माझा लेख पाहून अंमळ आश्चर्य प्लस खुषी झाली !!
बाकी धागा वर आणल्याबद्दल वेगळे आभार !! आपल्याला जरा वेगळी चित्र काढायची आवड आहे !!
(कलाकार) टार्या कल्लेकर
20 Dec 2008 - 12:19 pm | परिकथेतील राजकुमार
वाह वाह एम्.एफ. टारुसेन
अतिशय सुंदर व हुबेहुब जमली आहेत हो चित्रे ! कुठल्या कंपनिची शिशी पेन्शील वापर्ली ? पोईंट ०.३२ वापरली असती तर रेषांना अजुन उठाव आला असता. आपली कला थोडी राजा रवी वर्म्याच्या अंगानी जाणारी आहे , एक दिवस आपण पिकासोची पातळी गाठ्णार हे निश्चीत. पुढच्य वेळी फलाना फलाना कंपणीच्या पेपर ऐव़जी अमक्या तमक्या ढीमक्या कंपनीचा पेपर रेखाटना साठी वापरलात तर चित्रे निश्चीतच एक वेगळी उंची गाठतील. लवकरच ह्या विषयावर लीहिणार आहे, तेंव्हा इतर शंकाचे समाधान करिनच.
अवांतर :- शाळेत आम्ही काढलेल्या चित्राखाली दरवेळी नाव दयावे लागायचे. नाहितर ते एकच चित्र कोणाला बादली, कोणाला विदुषकाचा चेहरा तर कोणाला फांदिवरील पोपट वाटायचे !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
20 Dec 2008 - 1:39 pm | विनायक प्रभू
लगे रहो टारझन भाई. होईल सुधारणा हळुह्ळू.
20 Dec 2008 - 3:42 pm | भिडू
मस्तच... सगळी चित्र आवडली....माझा आणी चित्रकलेचा ३६ चा आकडा....शाळेत विज्ञाना च्या प्रयोग शाळेतील वहीत जि चित्र काढली होति त्याना खाली नावे देवुन पण ओळखता येत नव्हती.परिक्षानळी कुठली आणी चंचुपात्र कुठेले ते.....त्वचेचे स्तर्,कानाचा आतील भाग्,बेडकाचा आतील भाग सारखी चित्र तर सरळ मित्राकडुन काढुन घेतलि होति. पुढे ईंजिंनीअरिंग ला असताना..बटर पेपर वापरून किंवा दुसरयाच्या कंम्प्लीट झालेल्या ड्राईंग शीट खाली टुयब पेटवुन त्यावरुन माझ्या शीट वर पडणारे प्रतीबिंबा वरून माझ्या शीट कंम्प्लीट केल्या होत्या.(नशीब आम्हाला एकच वर्ष ड्राईंग होते)
21 Dec 2008 - 5:49 pm | टारझन
अर्रे लेका सरळ बोल ना "जीटी मारली " म्हणून .... काय राव ... जीटी समद्यांना म्हाईत आसते ...
असो ... प्रतिक्रियांबद्दल पुन्यांदा आभार ... आम्ही आमचं पेंटींग- ड्रॉईंग भारताळल्यावर पुण्हा चालू करणार आहोत... लवकरच केल्याने रेखाटण - २ येओ अशी स्वतःकडेच अपेक्षा करतो ..
असाच लोभ असून द्या समद्यांनी ...
प्रभू मास्तर ... आपण सावध रहा बरका ! ;) चित्र आणि मास्तर यांचा जवळचा संबंध आहे माझ्या बाबतीत