साहित्यः
२५० ग्रॅम मिक्स सलाड पाने (लेट्युस, रोमैन, रॉकेट, पार्स्ले इ.)
१ सफरचंद, फोडी केलेलं
१ वाटी चेरी टोमेटो
१ क्यूब प्रोसेस्ड चीज किंवा १०० ग्रॅम पनीर , छोटे तुकडे
थाई चिली ड्रेसींगसाठी साहित्यः
१ टीस्पून लिंबाचा रस
२ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल
१ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर
१ टेबलस्पून चिली फ्लेक्स
१ टेबलस्पून साखर
५ पाकळ्या लसूण, सोलून बारीक चिरलेल्या
मीठ व मिरपूड चवीनुसार
कृती :
ड्रेसिंग च्या सर्व सामग्री ला एका छोट्या काचेच्या बाटलीत (उ.दा. जॅम ची बाटली) घालून, एकजीव होईपर्यंत हलवावे. सलाड लीव्ह्स, सफरचंद, चेरी टोमेटो व चीज ला एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यावर थोडा मीठ व मिरपूड घालावे मग त्यावर थाई चिली ड्रेसींग ओतून हलक्या हाताने मिक्स करावे. लगेच सर्व्ह करावे.
प्रतिक्रिया
12 Dec 2012 - 1:06 pm | गवि
थाई, विशेषतः थाई करी, म्हणजे आपल्या मालवणीच्या जवळ जाणारं असल्याने फार आवडतं.
या सॅलडचा फ्लेवरही भारी असणार यात शंका नाही. :)
12 Dec 2012 - 4:36 pm | स्पंदना
ड्रेसींगच साहित्य वाचुनच तोंडाला पाणी सुटल.
12 Dec 2012 - 4:49 pm | निवेदिता-ताई
खरचच....तोंडाला पाणीच सुटले...
फोटो खूपच्च छान
12 Dec 2012 - 8:29 pm | रेवती
सॅलड पाहून तोंडाला पाणी सुटलं. त्याची चव कशी असणार याचा अंदाज आलाय. अगदी भारी.
12 Dec 2012 - 10:21 pm | पैसा
एवढी रंगीबेरंगी डिश बघूनच खावीशी वाटतेय लग्गेच!
12 Dec 2012 - 11:19 pm | Mrunalini
मस्त आहे पाकॄ... या मधे ग्रीक चिज पण मस्त लागेल.
16 Dec 2012 - 8:28 pm | खादाड अमिता
फेटा चीज तर कुठल्याही सलाड मधे मस्त लागते. पण हे थाई सलाड असल्या मुळे ह्यात टोफू घातले तर?
12 Dec 2012 - 11:58 pm | विकास
फोटो आणि रेसिपी एकदम मस्तच आहे!
13 Dec 2012 - 1:32 am | सानिकास्वप्निल
पाकृ आवडली नक्की करून बघणार :)
थाई चिली ड्रेसींग तर अहाहा...क्या बात है :)
13 Dec 2012 - 1:42 am | श्रीरंग_जोशी
सॅलड हा प्रकार मी कधी कधीच खात असलो तरी हे सॅलड लगेच खावेसे वाटत आहे.
अवांतर - एकेकाळी सॅलड खाणार्यांना मी 'काय हा पालापाचोळा खाताय?' असे चिडवत असे. आजकाल मलाही खाताना कॅलरीजचा विचार करावा लागतोय. काव्यगत न्याय ;-).
13 Dec 2012 - 8:15 am | अत्रुप्त आत्मा
हम्म... छान दिसतय :-)
15 Dec 2012 - 1:23 am | हिरवळ
बघुनच खाणाचा मोह आवरत नाहिये....प्रेझेन्त्तेशन अतीव सुन्दर...
16 Dec 2012 - 8:29 pm | खादाड अमिता
तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. कोणी करून बघितल मग हे सलाड?