तो आधिचा लेख वाचून अजून एक धागा काढावा असे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच....
माझ्या मते लायकी म्हणजे एखाद्या प्रसंगात/परिस्थितीत/ त्यावेळी लागणारी परिपक्वता....ज्या मुळे प्रामुख्याने स्वतःपेक्षा इतरांचा विचार व एकंदरीत लार्जर ग्रुप /समाजाचे हित साधले जाऊ शकतं..आयुष्यातील चांगली मूल्ये जपली जावून अजून तशी चांगली मूल्ये निर्माण होवू शकतील असे बघणे..
"साल्याची लायकीच नाहीये" ...ह्याचा अर्थच मुळी अमुक विषय/परिस्थिती/प्रसंगातल्या आधीच्या घटना समजून न घेता काहीतरी ऑफ द नोट वागणे/बोलणे/करणे इ. आणि समजा चुकून झाला असेल तर माफी मागण्या ऐवेजी दडपून तसेच वागणे ...
उदा:
१. एखाद्या सुरेल मैफिलीत चमत्कारिक दाद देणे किंवा मोबिअईल वाजायला लागल्या वर तसाच बोलत बोलत बाहेर जाने...साल्याची लायकीच नाहीये अश्या मैफिलीत येण्याची.
२. उत्तम प्रकारची कार विनाकारण रेझ करत, जोरात म्युझिक लावून कुणाचीही परवा न करता जोरात जाणे, सिग्नल व रहदारीचे नियम तोडणे..साल्याची लायकीच नाहीये गाडी वापरण्याची
३. अन्न टाकणे, सार्वजनिक ठिकाणी पचापच थुंकणे ....लायकी ना.....
४. विमानतळावर सामानाच्या बेल्ट ला लागून गर्दी करणे...पुन्हा ला ना सा...
उलट..
उदा : पाश्चिमात्य देशात..
१. ९९% लोक सार्वजनिक ठिकाणी व्यवस्थित वागतात...लायकी आहे त्यांची तशी घर/रस्त../ सोशल सिस्टीम असण्याची...
२. लोक रांग लावतात मोडत नाहीत...सार्वजनिक स्वच्छता गृहात सुद्धा 'घुसणे' नाही...लायकी आहे त्यांची चांगली टोयलेट्स असण्याची...
माझी आजी म्हणायची..."First Deserve and then Desire"...
मुद्दा पटतोय का? (पहिल्यांदाच जाहीर लिहितोय:-) )
प्रतिक्रिया
9 Dec 2012 - 2:58 pm | परिकथेतील राजकुमार
मी तर बॉ हा देश सोडून जाण्याच्याच तयारीत आहे.
9 Dec 2012 - 3:06 pm | प्रकाश घाटपांडे
आपण एखाद्या गोष्टीसाठी लायक नाही हे सांगताना आपण त्या गोष्टीसाठी नालायक आहोत असे आपण म्हटले कि काय वाटते? वाक्यात आपण ऐवजी तो शब्द वापरला तर काय अर्थ तयार होतो हे अजमावणे हा चांगला अभ्यास आहे असे वाटते.
9 Dec 2012 - 3:15 pm | अत्रन्गि पाउस
असे मला वाट्ते..
9 Dec 2012 - 3:15 pm | श्री गावसेना प्रमुख
सगळे अनुभवाचे बोल आहेत का भारतातले,तुमचा नंबर असतांना तुम्हाला ढकलुन कोणी पुढे गेला संडासीत म्हणुन राग काढताय का,


स्वताची गाडी असतांना कुनाच्या बापाला काय भ्यायचे,सीग्नल तोडु कुनाच्या बाच काय गेल
वाजवा रे धताड तताड धताड तताड धताड तताड
10 Dec 2012 - 10:21 am | विश्वनाथ मेहेंदळे
तुम्ही सेनावाले ना, मग ठीक आहे..