गाभा:
ग्यास गीझर वापरणे बेकायदेशीर आहे का ?
माझ्या एका मित्राच्या घरी gas डीलर चा माणूस तपासणी साठी आला होता. तेंव्हा त्याने सांगितले कि गिजर साठी gas वापरणे बेकायदेशीर आहे. त्या करिता तुम्हाला कमर्शियल सिलेंडर घ्यायला हवा.
पूर्वी आठवत असेल आपल्या पैकी बरेच जण ग्यास वर मोटारी चालवत असत..त्याला स्वयंपाका साठी वापरले जाणारे सिलेंडर आपण वापरायचो...त्या वर पुढे बंदी आली..
तशीच गिझर वर पण येणार का?
ज्या व्यक्ती १२महीने गार पाण्यानी स्नान करतात त्यांचे बरे आहे ......
प्रतिक्रिया
8 Dec 2012 - 10:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काका, किती किरकोळ गोष्टी काथ्याकुटाला घेत आहात ?
समजा गीझरला गॅस वापरणे बेकायदेशीर असेल तर वापरु नये.
छ्या. काका, काही तरी चांगला विषय घ्या बरं काथ्याकुटाला ?
अवांतर : काका आमिरखानचा तलाश पाहिला का ?
नसेल पाहिला तर पाहा आणि चित्रपट परिक्षण टाका.
-दिलीप बिरुटे
8 Dec 2012 - 10:36 pm | अविनाशकुलकर्णी
ओके ५ जबरी विशय आहेत ..
9 Dec 2012 - 5:40 am | स्पंदना
जबरी विषयांची काही गरज नाही. सर्वसामान्य माणसे वाचु पाहु शकतील, चार माणसात संकोच नाही वाटणार मिपा उघडायला असले विषय घ्या. नाहीतर आम्हाला गॅसवर जाव लागेल.
9 Dec 2012 - 8:52 am | श्री गावसेना प्रमुख
तुमचा कालचा जपानी जेवणाचा धागा कुठे गेला हो
9 Dec 2012 - 11:14 am | अविनाशकुलकर्णी
निर्दय पणे उडवला गेला.
आर्,आय्,पी
9 Dec 2012 - 11:25 am | बॅटमॅन
डोळे पाणावले.
9 Dec 2012 - 11:34 am | श्री गावसेना प्रमुख
तुमच्या दुखात सहभागी आहे हो मी
9 Dec 2012 - 12:27 pm | प्रचेतस
वा वा.
एक तर अतिशय फालतू, बायामाणसांना लाज वाटेल असे धागे पिंक टाकल्यागत टाकायचे आणि वर म्हणायचे निर्दय पणे उडवला गेला.
9 Dec 2012 - 3:02 am | दादा कोंडके
का? गॅसवर भांडं ठेउन पाणी गरम करून केलेली आंघोळ बेकायदेशीर आहे का?
9 Dec 2012 - 4:50 am | रुस्तम
हा हा हा ...
12 Dec 2012 - 10:51 pm | मस्त् राम
दादा, आवडल बर का. च्यायला या देशात आंघोळच बेकायदेशीर ठरवली पाहिजे !!!
9 Dec 2012 - 3:19 am | जेनी...
पाच जबरी विषय नविन आहेत ना अविका ??
9 Dec 2012 - 9:25 am | श्री गावसेना प्रमुख
गॅस गिझर वापरण्यापेक्षा हे घ्या माझ्याकडुन सप्रेम भेट
फक्त लाकड किंवा गोवर्या गोळा करा
9 Dec 2012 - 10:56 am | संजय क्षीरसागर
कमर्शियलचा अर्थ व्यावसायिक वापर. तुमचा सिलिंडर तुम्ही कोणत्याही घरगुती कामासाठी वापरू शकता. स्नान दिवसातला एक आनंद सोहळा आहे. बिन्धास्त आणि कितीही वेळ अंघोळ करा. तुम्ही काहीही बेकायदेशिर करत नाही.
9 Dec 2012 - 11:30 am | परिकथेतील राजकुमार
आमच्या एका शेतकरी मित्राकडे एकदा असाच वीज मंडळाचा माणूस आला होता. शेतीसाठी सोडलेले खडकवासल्याचे पाणी पिण्यासाठी वैग्रे वापरणे बेकायदेशीर आहे असा दम देऊन गेला.