पालकाची झटपट कोशिंबीर

रेवती's picture
रेवती in अन्न हे पूर्णब्रह्म
5 Dec 2012 - 7:19 am

साहित्य: पालक, गाजर, खजूर, कोथिंबीर,मिरची, लिंबू, साखर व मीठ.

कृती: सगळ्यात आधी वाटीभर खजुराचे बीया काढून उभे तुकडे करून घ्यावेत. नंतर वाटीभर गाजराचे पातळ काप करून घ्यावेत. सुरीने जमत नसल्यास बटाट्याची साले काढण्याच्या सोलण्याने गाजराचे तुकडे करावेत. वाटीभर पालक धुवून, बारीक चिरून घ्यावा. पालकाच्या अर्धी कोथिंबीर चिरून घ्यावी. चारही चिरलेले प्रकार वेगळे ठेवावेत. एका वाटीत लिंबूरस, साखर, मीठ व अगदी पेरभर (पाहिजे असल्यास जास्त) मिरचीचा ठेचलेला तुकडा असे एकत्र करून ठेवावे.वाढून घेण्याआधी हे सर्व प्रकार हलक्या हाताने एकत्र करावेत. ही कोशिंबीर लगेच संपवावी लागते पण एरवीच्या कोशिंबीरींमध्ये बदल म्हणून खूपच चवदार लागते. अगदी सॅलड म्हणूनही एरवी खाण्यास योग्य व शक्तिवर्धक.

1

सूचना: १. मिरची खूपच कमी पुरते.
२. मीठ, साखर हे लिंबूरसातच मिसळावे म्हणजे सगळीकडे सारखी चव येते.
३. पाहुणे येण्याच्यावेळी गाजराचे काप नक्षीदार व पातळ कापावेत.
४. पालकाचा किंचित उग्र स्वाद कोथिंबीरीमुळे कमी होतो म्हणून ती घालणे आवश्यक.
५. बरीच आधी कोशिंबीर कालवून ठेवल्यास भाज्यांचा रंग बदलतो व पाणी सुटते म्हणून आयत्यावेळीच भाज्या चिरून एकत्र कराव्यात.
ही कोशिंबीर झटपट करून पटकन् संपवावी लागते आणि संपतेही.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

पैसा's picture

5 Dec 2012 - 8:25 am | पैसा

पण पालक कच्चा खायला कसा लागेल माहिती नाही. नेहमीच्या पालक भात किंवा पालक पनीरमधे बदल म्हणून एकदा करून बघेन. एक शंका, बारीक चिरण्याऐवजी पालक मिक्सरमधे जरा भरड वाटला तर कसं लागेल?

सस्नेह's picture

5 Dec 2012 - 9:49 am | सस्नेह

पालक कच्चा कधी खाल्ला नाही. करून बघते.

ऋषिकेश's picture

5 Dec 2012 - 9:53 am | ऋषिकेश

अशी कोशिंबीर असते हेच माहित नव्हते.. पालक सॅलडमध्ये कच्चा खाल्ला आहे पण त्यावर बरेच ड्रेसिंग असे ;)
असे 'रॉ' धाडस करावे की नाही कळत नाहिये :P

परिकथेतील राजकुमार's picture

5 Dec 2012 - 9:54 am | परिकथेतील राजकुमार

फटू बघून एकदम 'हम्म्म्म्म्म्म्माआआअ' करावेसे वाटले.

नॉट आवडेश. :(

बॅटमॅन's picture

5 Dec 2012 - 6:00 pm | बॅटमॅन

+१.

जरा जास्तच पोषण-कॉन्शस आणि रुचिद्वेष्टा पदार्थ वाटला.

(मसालेदार खाण्याचा प्रेमी) बॅटमॅन.

५० फक्त's picture

5 Dec 2012 - 10:18 am | ५० फक्त

अरेरे, हा तर एक शुद्धा शाकाहारी आणि खाणेबल पदार्थ आहे, मला वाटले चारोंळ्यांनंतर पालकांचा नंबर लागला की काय, असो.

अवांतर - आज्जै डायरेक लिहा की ववसुमं मध्ये आणि वॅहॅल्यु अ‍ॅडिशन करुन मिळेल.

कोशिंबिरीतून खजूर वजा करुन फोडणी देउन एक वाफ काढली तर ? कच्चा पालक कसा लागेल याबद्दल साशंक आहे.

सलाड मधुन (बेबी)पालकची एक-दोन कच्ची पानं पचवली आहेत.
हे प्रकरण वेगळच दिसतय.

सविता००१'s picture

5 Dec 2012 - 1:01 pm | सविता००१

रेवतीताई, मस्त लागली कोशिंबीर. पण गाजराची फुलं कशी केलीस? खूप वेळ कलाकुसरीला लागला असेल नं?

सविता००१'s picture

6 Dec 2012 - 12:59 pm | सविता००१

रेवतीताई, आता गाजर वगैरे सगळ्या भाज्या, ज्यांच्यावर सटासट सुरी चालवता येइल, त्या कापून संजीव कपूर ला कॉम्प्लेक्स द्यावा म्हणते ;)

निवेदिता-ताई's picture

5 Dec 2012 - 1:50 pm | निवेदिता-ताई

छान लागतो कच्चा पालक.... ज्यांना आवडत नसेल त्यांनी थोडाच पालक घ्यावा, कोथिंबीर जास्त घ्यावी

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2012 - 1:56 pm | अत्रुप्त आत्मा

फोटो भारी आलाय... :-)

चांगली पाकॄ.... करुन बघायला पाहिजे.

सानिकास्वप्निल's picture

5 Dec 2012 - 3:17 pm | सानिकास्वप्निल

पालक आणी खजूर हे एकत्र छान लागेल असे वाटत आहे :)
दिसायला ही सुरेख दिसत आहे गं

स्मिता.'s picture

5 Dec 2012 - 4:19 pm | स्मिता.

व्हिटॅमिन ए युक्त हेल्दी कोशिंबिर आहे. पालक आणि गाजराच्या हिरव्या-केशरी रंगामुळे दिसतेही छान. फक्त कच्चा पालक...

पालक अन माझा ३६ चा आकडा आहे ;) माझे वडील खातील ही कोशिंबीर कारण ते मेथीची भाजिही कच्ची खातात :)

कच्च्या मेथीची पचडी फार छान लागते, त्यामुळे कच्ची मेथी खाणे हे पालक खाण्यापेक्षा फार सोपे असते.

स्वाती दिनेश's picture

5 Dec 2012 - 4:41 pm | स्वाती दिनेश

वेगळीच कोशिंबिर दिसते आहे, कच्चा पालक आहे म्हणजे बेबी पालक घेऊन करुन पाहिली पाहिजे.
स्वाती

हारुन शेख's picture

5 Dec 2012 - 5:02 pm | हारुन शेख

माहिती तशी ऐकीव आहे पण खूप कच्चा पालक खाणे चांगले नाही असे म्हणतात. कारण त्यात असलेले Oxalic acid पचनाला अडथळा करते आणि पालकातील लोह पूर्ण शोषून घेण्याची प्रक्रिया मंदावते. एक हलकी वाफ दिली तर मला वाटते ते योग्य होईल . वरील सलाडमध्ये पालकाबरोबर खजूर टाकला आहे.त्यामुळे एकदम iron packed salad .ज्यांना पंडुरोग ( Anemia) असेल त्यांच्यासाठी तर हे सलाड उत्तम औषध. तो गाजर कसा कापलात एकदम शोभा आली आहे.

मीनल's picture

5 Dec 2012 - 5:23 pm | मीनल

पदार्थ रंगामुळे आकर्षित करणारा आहे. चवीलाही रूचकर असावा.

प्रतिसाद देणार्‍यांचे आभार.
कच्चा पालक खाण्याबद्दल बर्‍याच जणांना शंका आहे ते समजले.
वरील सगळी कोशिंबीर करायला पालकाची कोवळी दहा ते पंधरा पाने लागली.
बाकीचे जिन्नस मिसळल्यावर चव चांगली लागते व ही कोशिंबीर (कोशिंबिरीसारखी वाढणी म्हणून)चार जणांना पुरते. त्यात पालक तो कितीसा कळणार? कृपया पालक वाफवून, मिक्सरमधून काढून ही कोशिंबीर करू नये.
सविता, गाजराची फुले करणे अवघड नाही. त्याचे वेगळे कटर बाजारात मिळते पण ते नसल्यासही ही फुले करता येतात. गाजराचा शेंडा, बुडखा काढून टाकायचा. थोडा थोड्या अंतरावर सुरीने दोन चिरा शेवटपर्यंत v आकारात द्यायच्या. त्यामुळे v मधील गाजराची छोटी पट्टी निघून येते. असे पाच सहा चिरा असलेले गाजर चकत्या काढताना आपण कापतो तसे कापून घ्यायचे.

कवितानागेश's picture

5 Dec 2012 - 6:19 pm | कवितानागेश

मस्तच कोशिंबीर. एकदा अशी खजूर घालून करुन बघेन.
मी एरवी पालकात फक्त टोमॅटो आणि मीठ मिरपूड घालून करते.

काय सजावट आहे रेवती. अन गाजर कापायची कलाही आवडली. वर हारुन शेख म्हणतात तसा पालक कच्चा खाऊ नये म्हणे, पण पाणी उकळुन त्यात हा पालक झटक्यात घालुन पुन्हा बर्फाच्या पाण्यात टाकला तर सहज पचेल अस वाटतय.

सुरेख सुरेख. घरात पाल्काच्या जुड्या आहेत. करुन पहाते.

प्रभाकर पेठकर's picture

7 Dec 2012 - 9:52 am | प्रभाकर पेठकर

सुरेख रंगसंगती आणि पोषणमुल्ये लाभलेली अप्रतिम कोशिंबिर. अभिनंदन.

ह्यावर घ्यायचे जे ड्रेसिंग दिले आहे त्यात ऑलिव्ह तेल (किंवा साधे घरगुती तेल)मिसळल्यास कोशिंबिरीला अजून चकाकी आणि चव येईल.

युके/युएस बेबि पालक मिळतो तो चान्गला धुतलेला असतो येथे (मुम्बै मधे ) रेल्वे लाइन च्या बाजुला लावलेल दिसतो तो असतो -- तो कच्चा खायला भिती वाटते

इरसाल's picture

8 Dec 2012 - 12:17 pm | इरसाल

पालक फक्त पालकाच्या पराठ्यातच आवडतो.
आणी पालकसभेत पालक खुर्चीवर बसलेला...उभा नाही.

पालकसभेत पालक खुर्चीवर बसलेला...उभा नाही
का वो ?
तुमी काय मास्तुरे आहात वाटतं ?

इरसाल's picture

8 Dec 2012 - 1:41 pm | इरसाल

आज काल पॅरेंट मीटींगला ही गर्दी असते ताटकळत उभे ठेवतात लेकाचे म्हणुन म्हटले.

हा हा हा. मजेशीर आहे बुवा!

आवो ताई, मास्तूरेंना आनंद व्हतो पाल्कास्नी हुबं करून ठ्येवताना. त्ये म्हंत्यात न्हाईतरी यांची पोरं आमाला लई तरास देत्यात तर र्‍हावा हुबं! ;) त्या पदार्ताला पालकाची पचडी असे म्हंत्यात.

सस्नेह's picture

9 Dec 2012 - 12:02 pm | सस्नेह

हांबघ रेवती. हाच पदार्थ अजून आला नाही मिपावर.
दे ना रेसिपी...'पालका'ची पचडी !

फोटो एकदम जबरदस्त आलाय. पण कच्चा पालक खायचं जरा टेन्शन येत. पण इतर साहित्य कडे बघून नक्कीच हा प्रयत्न करेन.
पौष्टिक तत्वांनी भरलय हे सलाड . अशी सलाड खावून एकदम फ्रेश वाटत .

चौकटराजा's picture

9 Dec 2012 - 5:38 pm | चौकटराजा

माझ्याकडे याच पदार्थाची कृती आहे पण कोणत्या पालकाची कोशीबीर करायची ? कारण मला वडीलांची व आईची कोशिंवीर करता येते ( मानसिक रितीने) अभ्यास केला नाही की वडिलांची व एखादे काम आईने सांगितले की न ऐकल्या सारखे करायचे अशी पालकाची कोशिंबीर करायची सोप्पी रीत आहे.

शुचि's picture

11 Feb 2013 - 6:57 pm | शुचि

हाहा मजेशीर प्रतिसाद.
मग पालक आपल्या पाठीचं धिरडं करतील त्याचं काय? :)

शुचि's picture

11 Feb 2013 - 6:56 pm | शुचि

नवीनच पाकृ. चविष्ट व अतिशय शक्तीवर्धक, पोषक वाटते आहे.