गाभा:
'दृष्टी तशी सृष्टी'
पण दृष्टीचा अधिकारी कोण ?
मन ? बुद्धि ? की शरीर ?
की आणखी कुणी ?
'ज्याची दृष्टी त्याची सृष्टी'
असे तर नाही ?
बुद्धिचा लगाम
मनाचा चॉखुर अश्व
शरीररथाला वेडीवाकडी वळणं
याचा अर्थ काय ?
लगाम कुणा हाती ?
त्याचे नाव काय ?
काळा पहाड
प्रतिक्रिया
30 Jun 2008 - 1:49 pm | वैशाली हसमनीस
माझ्यामते आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अर्थात माझ्या अल्पमतिनुसार''सर्वव्यापी ,सर्व चराचरात भरुन राहिलेला,परमेश्वर''असे असावे.
30 Jun 2008 - 2:17 pm | काळा_पहाड
वैशालीताई प्रतिसादासाठी धन्यवाद.
माझ्यामते आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अर्थात माझ्या अल्पमतिनुसार''सर्वव्यापी ............
मलाही ह्या प्रश्नाचे निश्चित उत्तर ज्ञात नाही. म्हणुन तर 'काथ्थ्याकुट' मध्ये टाकलाय विषय. म्हटले बघुया मिपाकरांना काय वाटतेय ! मला वाटते तुमचे उत्तर देव मानणाय्रांच्या दृष्टीने बरोबर ठरावे. मात्र त्याचीही खात्री देणे कठीणच.
काळा पहाड
30 Jun 2008 - 4:15 pm | अभिरत भिरभि-या
आपले वर्णन वाचून एका श्लोकाची ( बहुतेक गीतेतल्या ) आठवण आली . त्यात असे म्हटलयं की पंचेन्द्रिये ही पाच घोड्यांप्रमाणे असून त्याचा लगामधारी सारथी असते मन.
मनोबुद्धीअहंकार या सुक्ष्म व पाच बाह्य इन्द्रिया अशा या रथ यंत्रणेचा सम्राट असतो आत्मा ..
4 Jul 2008 - 10:10 pm | हेरंब
मला ही या प्रश्नाचे उत्तर 'आत्मा' हेच असावे. आणि आत्म्याचा मालक 'परमात्मा.
5 Jul 2008 - 7:29 pm | विसोबा खेचर
जाऊ दे रे काळ्या!
फार विचार नको करू! :)
तात्या.
--
"न पेलणार्या गोळ्या घेऊ नयेत. मग त्या भांगेच्या असोत वा अध्यात्माच्या!" (इति काकाजी, नाटक : तुझे आहे तुजपाशी)