तुम्ही चंगळ वादी आहात का?

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
30 Nov 2012 - 10:19 pm
गाभा: 

तुम्ही चंगळ वादी आहात का?
ब्रांडेड कपडे...महागडे आफ्टर शेव्ह ..शूज व अक्सेअसरिज ..
उंची हॉटेल मध्ये पार्ट्या ..मोल मध्ये खरेदी ...इत्यादी..इत्यादी ..
चंगळ वाद पूर्वी आमच्या लहान पणी पण होता पण स्वरूप निराळे होते ..
केळीचे शिकरण व मटार उसळीचा बेत म्हणजे चंगळ ..

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

30 Nov 2012 - 11:10 pm | पिवळा डांबिस

तुम्ही चंगळ वादी आहात का?
ब्रांडेड कपडे...महागडे आफ्टर शेव्ह ..शूज व अक्सेअसरिज ..
उंची हॉटेल मध्ये पार्ट्या ..मोल मध्ये खरेदी ...इत्यादी..इत्यादी ..

हे चंगळवादाचे तुमचे तुम्हीच ठरवलेले निकष (कशावरून ठरवले तुम्हालाच माहिती)वापरायचे म्हटले तर हे सगळं आपण आनंदाने करतो बुवा. करत नाही असं म्हणणं म्हणजे खोटेपणा होईल आणि आम्ही एकवेळ चंगळवादी ठरणं पसंत करू पण भोंदू खोटारडेपणा आपल्याला आजाबात पसंत नाय!!!
:)

चंगळ वाद पूर्वी आमच्या लहान पणी पण होता पण स्वरूप निराळे होते ..
केळीचे शिकरण व मटार उसळीचा बेत म्हणजे चंगळ ..

आयायायायाया!!!!
केळीची शिक्रण आणि मटार उसळ हे चंगळीचं स्वरूप आमच्या लहानपणी कधीच नव्हतं...
(आणि त्याबद्दल आम्ही आमच्या आईबापांचे अत्यंत ऋणी आहोत!!!)
आमच्या लहानपणी चंगळ म्हणजे, भरलं पापलेट, सुकं मटण, मेट्रो-रीगल मध्ये आईवडिलांबरोबर पिक्चर, क्वचित बस न वापरता केलेली टॅक्सी...
:)

आमच्या लहानपणी चंगळ म्हणजे, भरलं पापलेट, सुकं मटण >>

असे असेल तर मग आम्ही पण चंगळवादी ( किंवा मग चवचाल जिभेचे) आहोत ;)

केळीची शिक्रण आणि मटार उसळ ही पुणेकरांच्या चंगळीची परिसीमा..असे पुलं म्हणाले आहेत.. तिथून ही ओळ आली असावी असा आमचा अंदाज.

आनंदी गोपाळ's picture

2 Dec 2012 - 7:36 pm | आनंदी गोपाळ

केळीची शिक्रण आणि मटार उसळ ही पुणेकरांच्या चंगळीची परिसीमा..

DesiSmileys.com

अत्रुप्त आत्मा's picture

30 Nov 2012 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-whacky099.gif

अत्रुप्त आत्मा's picture

30 Nov 2012 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-whacky099.gif

जेनी...'s picture

30 Nov 2012 - 11:37 pm | जेनी...

हो .

आम्हि चंगळवादी आहोत ....!

मालोजीराव's picture

1 Dec 2012 - 12:11 am | मालोजीराव

lavni

ह्यो खर्च बी मांडा कि कुनीतर....सगळ्यात जास्त 'दौलतजादा' तर हिकडं करावं लागतंय !

- चंगळवादी आणि खानदानी ऐय्याश मालोजी

जेनी...'s picture

1 Dec 2012 - 12:13 am | जेनी...

मालोजीराव ,
ह्यात कसलीओ चंगळ??
ऐय्याश शब्द एकटाच ठिक वाटतय .

विस्कटवुन सांगाना :(

मालोजीराव's picture

1 Dec 2012 - 12:24 am | मालोजीराव

तमाशाच्या बारीला चला एकदा चंगळवाद आणि चंगळवादी एकाच ठिकाणी दिसतील !
बाकी किती मिपाकर बारीला हजेरी लावून चंगळवादाला चालना देतात काय माहित ;)

अभ्या..'s picture

1 Dec 2012 - 1:27 am | अभ्या..

चंगळवादाला नाही, शासनपुरस्कृत लोककलेला चालना देतो. ;)
ते हिसाब अल्लग राहतंय.
वो शौक लई बडी चीज है.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

4 Dec 2012 - 11:04 am | घाशीराम कोतवाल १.२

मालोजी राव आमच्या धमालपंत देसमुख बारामतीकर आणि आम्ही स्वतः हि चंगळ्वादी आहो
चला ट्रिप काडु चौफुल्याला

परिकथेतील राजकुमार's picture

4 Dec 2012 - 11:12 am | परिकथेतील राजकुमार

घाशा भाड्या मागच्या टैमाला चार पेग लावून त्या सुनंदाचा हात धरला होतास, तेंव्हा झालेला तमाशा विसरला का? आता काय मार खायला नेतो का परत सगळ्यांना तिकडे ?

मालोजीराव's picture

4 Dec 2012 - 2:20 pm | मालोजीराव

परा यंदाच्या टायमाला चौफुला नको...अकलूज लावणी महोत्सवाला जाऊत...सगळी 'व्हरायटी'आणि अदाकारी बघायला मिळेल ;)
पयल्या रांगेतच नंबर लाऊ शक्यतो !
akluj lavani

परिकथेतील राजकुमार's picture

4 Dec 2012 - 2:25 pm | परिकथेतील राजकुमार

राजे तुम्ही फक्त आवाज द्या. आम्ही हजर होतोच.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

5 Dec 2012 - 3:23 pm | घाशीराम कोतवाल १.२

मायला आम्ही फक्स्त हात धरलात एव्हडा गजब आणि तुम्ही काय केलत त्याच का फ्लेक्स लावायचा का आम्ही ?
आहो व्हत कधी कधी आस त्याचा एव्हडा गाजावाजा कशा पाई करताय राव..
चला आमच्या नारायणगावच्या फार्महाउस वर बैठक ठिवु तुमच्या साठी पेश्शल ..

मालोजीराव's picture

5 Dec 2012 - 3:34 pm | मालोजीराव

बैठकीसाठी परा ला व्यनी कराल तेव्हा मला CC मध्ये ठेवा ;)

परा बैठकी घेतो? बाबौ नवीनच माहीती मिळाली. ;)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

6 Dec 2012 - 8:58 am | घाशीराम कोतवाल १.२

चला मालोजीराव तुम्ही आणि गणपाशेट तुमी बी या बॉर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र

अभ्या..'s picture

6 Dec 2012 - 9:50 am | अभ्या..

कोतवालदादा आमाला इसर्लायसा जणू. ती पांढरी स्कार्पिओ ४१४१ वाली. ते मोडनिंबचे आवतन. :(
आता आठवण आलीया व्हय? :(

घाशीराम कोतवाल १.२'s picture

6 Dec 2012 - 1:36 pm | घाशीराम कोतवाल १.२

न्हाय न्हाय तुमाला कस ईसरनार तुमी न धमाल राव तर पैले

चला म्या बी येतू , घाश्या संग

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2012 - 3:14 pm | अत्रुप्त आत्मा

@चला म्या बी येतू , घाश्या संग >>> ख्याक...! ;-) काय उपेग??? ;-) असो.... अनेक जणं अ‍ॅडवताय,,,कोतवाल जाण्यापूर्वी जाहिर धागा काढा बरं =))

आबा's picture

1 Dec 2012 - 12:22 am | आबा

चंगळवादाची व्याख्या, मिसळपाववरच्या "जिलबी" या शब्दाच्या व्याख्येइतकी लवचीक आहे...

जेनी...'s picture

1 Dec 2012 - 12:26 am | जेनी...

म्हणजे हा चंगळवाद (धागा ) म्हणजे मिसळपाव वरची एक येड्यात येडी घातलेली 'जिलबी ' आहे
असं तर नाय ना म्हणायचय तुमाला आबा? ;)

तुम्ही चंगळ वादी आहात का?
हो.

ब्रांडेड कपडे...
काही ब्रँडेड तर काही आवडणारे पण साधे.

महागडे आफ्टर शेव्ह
नाईलाजाने मला वापरता येत नाही....स्त्री (आयडी) असल्याने.

शूज व अक्सेअसरिज
बर्फामुळे साध्या शूजपासून बूटस पर्यंतचे प्रकार (तसे उन्हाळ्यात स्यांडल, चपला) आवश्यक.
अ‍ॅक्सेसरीजची आवड कमी.....आळशीपणामुळे.

उंची हॉटेल मध्ये पार्ट्या ..मोल मध्ये खरेदी
एकूणच हाटेलात पार्ट्या देण्याची वेळ येत नाही कारण 'घरी स्वयंपाक करा जेवायला बोलवा' असे मित्रमंडळी म्हणतात. मॉलमध्ये खरेदी कर्ण्याशिवाय पर्याय नाही. तशीही खरेदीची आवड फारशी नाही.

चंगळ वाद पूर्वी आमच्या लहान पणी पण होता पण स्वरूप निराळे होते
वाद घालायला मिळणे हीच लहानपणी चंगळ वाटायची....अजूनही वाटते.
बाकी हौशी पालकांमुळे सुदैवी ठरल्यामुळे देवाचे आभार मानते. त्यांनी भरपूर वेळ दिला.

केळीचे शिकरण व मटार उसळीचा बेत म्हणजे चंगळ
शाळेतून घरी आल्यावर शिकरण पोळी हा आवडता बेत असल्याने तो बरेचदा असायचा.
मटार उसळ ही मटार सोलायला मदत केल्यास मिळत असे. इडली सांबार, दोसा म्हणजे चंगळ असे लहानपणी वाटत असे, आणि ती केली.
अश्यारितीने आमच्यामुळे चंगळवाद फोफावला आहे हे मान्य करते.
अकुकाका, तुमचा धागा यायची मी नेहमी वाट पहात असते. ;) जरा टारगटपणा करायला मिळतो.

रेवा आज्जी ,टारगट कुठली ! ;)

:P

अगोचर's picture

1 Dec 2012 - 3:55 am | अगोचर

वस्तूचे कार्य, वापरण्याची सुलभता आणि शेवटी सौंदर्य (functionality, usability, aesthetics) हे तीन निकष याच प्राधान्यक्रमाने लावून काय आणि कुठे खरेदी करायचे ते ठरवतो. मॉल त्यात बसतोच असे नाही.

उदाहरणार्थ म्युझिक सिस्टीम खरेदी करताना काहींची किंमत वाचून तसली सिस्टीम घेणे कदाचित काहि लोकान्ना चंगळ वाटेल पण तेव्हढी जास्त किंमत केवळ ब्रँड मुळे नसून सिस्टिम च्या निर्दोष ध्वनी निर्माण करण्याच्या क्षमते बद्दल आहे हे एकदा पटले की किंमत परवडत असेल तर चंगळ वाटत नाही.

बरेचदा मॉल मधे वस्तु बघुन ती आवडली तर जालावरून सगळ्यात वाजवी दरात जिथुन मिळेल तिथुन घेतो.

कधी कधी सौंदर्य हेच कार्य (फंक्षन) असते. केवळ चवी साठी (सौंदर्य) जाण्या येण्याचे श्रम आणि पैसा न मोजता कित्येक विषिश्ठ जागी जायला आवडते. खाण्या पिण्याची चंगळ मान्य आहे.

श्री गावसेना प्रमुख's picture

1 Dec 2012 - 9:32 am | श्री गावसेना प्रमुख

चंगळवादाची व्याख्या काय,
जिथे गरीब बाजरीची भाकरी खातो तिथे चंगळवादी पिझ्झा तत्सम आयटेम खातात,(घर का ढाबा मध्ये जाउन भाकरी खाने कारण घरी जमतच नाही ना)
जिथे गरीब किंवा सामान्य माणुस अनवाणी किंवा साध्या चपला वापरतो तिथे हे १०००/१०००० चे शुज वापरतात
जिथे सामान्य माणुस(गरीब तर आभाळाकडे बघुनच वेळ सांगतो)साधारन घड्याळ वापरतो तिथे हे1असे वापरतात.
कामापेक्षा(की अकलेपेक्षा ) जास्त पैका मिळु लागला की काय करु काय नाही असे होउन जाते बघा.

क्लिंटन's picture

1 Dec 2012 - 10:10 am | क्लिंटन

जिथे गरीब किंवा सामान्य माणुस अनवाणी किंवा साध्या चपला वापरतो तिथे हे १०००/१०००० चे शुज वापरतात

बरोबर आहे.

"चंगळवाद" या शब्दात (लेखात नव्हे) एकूणच थोडा नापसंतीचा सूर आहे.म्हणजे चंगळवाद हा शब्द सामान्यतः कोणी चांगल्या अर्थाने वापरत नाही. पण चंगळवाद हा प्रकार इतका वाईट आहे का?समजा श्रीमंतांनी (ज्यांना परवडते त्यांनी) असे दहा हजार रूपयांचे शुज वापरलेच नाहीत आणि सगळेच "साधी राहणी उच्च विचारसरणी" असे म्हणायला लागले तर असे शुज (किंवा अन्य कोणतीही "चैनीची" वस्तू) बनवायच्या कारखान्यांमध्ये/विक्री आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये रोजगाराच्या संधी आहेत त्या कमी होतील.मग ते गरीब गरीबच राहतील (आणि कदाचित अनेक मध्यमवर्गीयांना सुध्दा याचा फटका बसेल). तेव्हा मी तर म्हणतो की परवडत* असेल तर जरूर चंगळवादी बना.परवडत असेल (आणि बायकोला आवडत असेल) तर तिच्यासाठी जरूर पैठणी घ्या.त्या निमित्ताने काही लोकांची पोटे भरायला हातभार लागेल.

*: परवडणे म्हणजे नक्की काय याची व्याख्या करता येणार नाही.मला कदाचित गोव्यामधील १५-२० हजार रूपयात होणारी टूर परवडत असेल तर आणखी कोणाला झुरिकमधील पंचतारांकित हॉटेलात ५-१० लाखात होणारी टूर परवडत असेल.तेव्हा सांगायचा उद्देश म्हणजे भविष्यासाठी किती पैसे लागतील हे बघून वरचे पैसे मजेसाठी खर्च केले तर सामाजिक आणि आर्थशास्त्र दृष्टीने तितके वाईट नाही. पण कर्ज काढून "लिव्हरेज्ड" मजा केली तर अमेरिकेत आणि युरोपात झाले/होत आहे तसे अंगाशी यायची शक्यता आहे.तेव्हा ती काळजी घ्यावी.

अप्रतिम प्रतिसाद ़क्लिंटन .

एकदम सहमत :)

श्री गावसेना प्रमुख's picture

1 Dec 2012 - 10:29 am | श्री गावसेना प्रमुख

क्लिंटन राव चंगळवादच नव्हे हो जी गरीब आणी श्रीमंताची दरी रुंदावत चाललीये,तिच्या बद्दलही आक्षेप आहे हो,जिथे गरीबाला ३५ रुपयात दिवस काढायला सांगतात तो बिचारा काय चंगळवादी असणार अन दुसरीकडे मोजुन १ तास शिकवीणार्‍या? प्राध्यापकाला ७०००० हजार पगार मग तो तर चंद्रावरही जाइल ना
माझ्या मते फालतु गरज नसतान्नही केलेल खर्च म्हणजे चंगळवाद

तिच्यासाठी जरूर पैठणी घ्या.त्या निमित्ताने काही लोकांची पोटे भरायला हातभार लागेल

येवल्यात फिरुन या काय पैठनीने सम्रुद्धी?आणलीये

नितिन थत्ते's picture

1 Dec 2012 - 10:54 am | नितिन थत्ते

>>मोजुन १ तास शिकवीणार्‍या? प्राध्यापकाला ७०००० हजार पगार

कॉलिंग प्रा. डॉ........

नितिन थत्ते's picture

1 Dec 2012 - 10:58 am | नितिन थत्ते

कपडे (साधे देखील) घालणे ही चंगळ आहे का?

कारण मुंबई ठाण्यासारख्या ठिकाणी कपडे घालणे ही मुळीच गरज नाही. शिवाय मुंबई ठाण्यासारख्या ठिकाणी सारखे कपडेघातल्याने घाम येऊन त्वचारोग होतात मग पुन्हा डिओ, पावडर, इचगार्ड वगैरे आणखी चंगळवादी खर्च होतात.

श्री गावसेना प्रमुख's picture

1 Dec 2012 - 11:07 am | श्री गावसेना प्रमुख

मुंबई ठाण्यासारख्या ठिकाणी कपडे घालणे ही मुळीच गरज नाही. शिवाय मुंबई ठाण्यासारख्या ठिकाणी सारखे कपडेघातल्याने घाम येऊन त्वचारोग होतात मग पुन्हा डिओ, पावडर, इचगार्ड वगैरे आणखी चंगळवादी खर्च होतात.

थत्ते चाचा आप चीटिंग करते हो,नाइंसाफी है ये,
मुंबैत लोक कपडे घालीत नाही का?घालतात तर कोणते?ब्रँडेड कि साधे?शुज वापरतात का(नाही शुज वापरल्याने पाय दमट वातावरनाने खराब होतिल म्हणुन)?ब्रँडेड की साधे?गॉगलही असेल धुळ जाते ना डोळ्यात.
मुंबईत खुप गरीबी आहे सांगतात लोक म्हणुन विचारले

नितिन थत्ते's picture

2 Dec 2012 - 4:34 pm | नितिन थत्ते

>>मुंबैत लोक कपडे घालीत नाही का?

घालतात. तीच तर चंगळ आहे असं म्हणतो आहे मी. मुंबईत कपडे घालणे ही नैसर्गिक गरज मुळीच नाही. जे नैसर्गिक रीत्या गरजेचे नाही ती सर्व चंगळ.

चंगळ की गरज हे वस्तूच्या/सेवेच्या किंमतीवरून ठरवायचे असेल तर ती फारच सापेक्ष होईल. म्हणजे कॅडबरी चॉकलेट हे एकासाठी चंगळ* होईल तर दुसर्‍यासाठी नाही.

*चंगऴ म्हणजे उत्पन्नाच्या मानाने जास्त खर्च असे धरून. अन्यथा कुठलीच गोष्ट निरपेक्षपणे चंगळ म्हणता येणार नाही.

श्री गावसेना प्रमुख's picture

2 Dec 2012 - 6:12 pm | श्री गावसेना प्रमुख

मुंबईत कपडे घालणे ही नैसर्गिक गरज मुळीच नाही.
111

चंगऴ म्हणजे उत्पन्नाच्या मानाने जास्त खर्च असे धरून

उत्पनाच्या मानाला खर्च जास्त केला तर तो फार तर कर्ज बाजारी होउन आत्महत्या करेल.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Dec 2012 - 6:16 pm | परिकथेतील राजकुमार

तुम्ही रस्त्यावरती झेब्रा क्रॉसींग किंवा फुटपाथवरती पट्टे रंगवणार्‍यांचे फॅन आहात का हो ? बघावं त्या प्रतिसादात रंगाचे पट्टे ओढत असता म्हणून आपली चांभार चौकशी.

श्री गावसेना प्रमुख's picture

2 Dec 2012 - 6:18 pm | श्री गावसेना प्रमुख

मी तेच तर काम करतो ना हो म्हणुन ओळख दाखवतो माझी,

आपली चांभार चौकशी.

घोलप नाराज होतील अशाने

परिकथेतील राजकुमार's picture

2 Dec 2012 - 6:22 pm | परिकथेतील राजकुमार

प्रतिसाद शब्दांनी आणि ज्ञानाने वाचकांच्या डोळ्यात भरेल तर जास्ती उत्तम.

अर्थात ही विनंती आहे. कारण शेवटी ज्याची त्याची जाण समज इ. इ...

श्री गावसेना प्रमुख's picture

2 Dec 2012 - 6:28 pm | श्री गावसेना प्रमुख

बघावं त्या प्रतिसादात तुम्ही असे बोलले ना,मला वाटल की रागावले काय म्हणुन,स्वॉरी हो राजकुमार साहेब

क्लिंटन's picture

2 Dec 2012 - 6:21 pm | क्लिंटन

गरीब आणी श्रीमंताची दरी रुंदावत चाललीये,तिच्या बद्दलही आक्षेप आहे

गरीब आणि श्रीमंतांमधील दरी रूंदावत आहे ही वाईट गोष्ट आहे.पण गरीब आणि श्रीमंतांमध्ये असलेल्या दरीमुळे श्रीमंतांनी खर्च केला तर तो चंगळवाद असे गरीब म्हणू शकतात की श्रीमंतांनी केलेल्या चंगळवादामुळे गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढते?आणि गरीब आणि श्रीमंतांमधील ही दरी आहे ती कमी करायचा मार्ग कोणता?जास्तीत जास्त गरीबांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे की श्रीमंतांनी खर्च न करणे?आणि माझा असा दावा आहे की श्रीमंतांनी खर्च केला नाही तर त्यामुळे गरीबांच्या रोजगाराच्या संधी कमी होतील आणि गरीब हे आणखी गरीब होतील.पिझ्झा खाणे हा चंगळवाद असेल आणि तो बंद करायचा म्हटला तर पिझ्झा हट आणि डॉमिनोजमधील अनेक (फोनवर पिझ्झाची ऑर्डर घेणे,पिझ्झाची होम डिलिव्हरी देणे इत्यादी) रोजगाराच्या संधी कमी होतील.असे इतर अनेक रोजगाराच्या संधींविषयी लिहिता येईल.अशा प्रकारच्या नोकऱ्या करणाऱ्या लोकांकडे इतर "हाय प्रोफाईल" नोकऱ्या करायला आवश्यक असणाऱ्या गोष्टी असतात असे वाटत नाही (अन्यथा ते अशी नोकरी करायला का गेले असते?). आणि श्रीमंतांनी चंगळवाद केला नाही तर त्यांच्या रोजगाराच्या या संधीही कमी होतील आणि ते आणखी गरीब होतील त्याचे काय?

आणि दुसरी गोष्ट म्हणजे गरीब आणि श्रीमंत यामधील दरी काही प्रमाणात हवीच असे मला वाटते.सध्या जी दरी आहे ती पाहिजे तितकी आहे की कमी आहे की जास्त आहे हे मला माहित नाही.पण थोडीशी दरी हवीच. मुंबईत आज माझ्या नावाने घर नाही म्हणजे मी इतरांच्या मानाने गरीब झालो.आणि मुंबईत स्वत:चे घर होण्यासाठी बॅंकेचे कर्ज मिळायला देखील वर्षाला किमान २५-३० लाखाचे पॅकेज हवे (तेव्हा बॅंका सव्वा-दीड कोटीचे कर्ज देतील).म्हणून तिथपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी अगदी जीवाचा आटापिटा मला करावासा वाटतो.अशा स्पर्धेतूनच अंगभूत गुणांचा कस लागतो आणि माणसाला त्याचा सर्वोत्तम performance देता येतो.यातूनच समाजाची फायदा होतो.जर का गरीब आणि श्रीमंत हा भेद राहिलाच नाही तर मात्र माझ्यासारख्यांना काही करण्यासाठी काहीही इन्सेन्टीव्ह राहणार नाही.आणि तस इन्सेन्टीव्ह नसेल तर सगळे थंडगार पडून राहिले तर त्यात समाजाचे भले नाही.रेसमध्ये मागे असलेल्यांनाच पुढे जाण्यासाठी इन्सेन्टीव्ह असतो आणि म्हणूनच त्यांना जोरात धावायला इन्सेन्टीव्ह असतो.जर सगळे एकत्र जात असतील तर कोणालाच अधिक वेगाने धावायला इन्सेन्टीव्ह नसतो.तर सगळ्यांनाच मंद गतीने धावायला इन्सेन्टीव्ह असतो. म्हणूनच संपत्तीचे समान वाटप या टिपीकल डाव्या विचारांना माझा विरोध आहे.

बाकी २०% लोकांकडे ८०% संपत्ती आहे असे म्हणत असाल तर आयुष्यात पुढे जाण्यासाठी लागणारे गुण आणि कष्ट करायची प्रवृत्ती आणि महत्वाकांक्षा थोड्या (२०% की नक्की किती हे माहित नाही) लोकांकडेच असते.तेव्हा २०-८० किंवा १०-९० हा भेद असणे अगदी स्वाभाविक आहे.आणि अगदी ५०-५० अशी बळजबरीने व्यवस्था केली तरी काही काळाने परत २०-८० किंवा १०-९० यावरच ती व्यवस्था परत स्थिरावेल.

रघुनाथ माशेलकर (चु.भू.दे.घे) म्हणतात की आयुष्यात आपल्याकडे नाही अशी एखादी तरी गोष्ट हवी. कारण ती गोष्ट आपल्याला मिळवायची आहे आणि या परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडायचे आहे या भावनेतून कष्ट केले जातात.तेव्हा आपल्याकडे एखादी गोष्ट नाही ही तक्रार करायची की त्याच गोष्टीच्या अनुपस्थितीचा वापर जिद्द आणि महत्वाकांक्षा वाढवून आपल्या प्रगतीसाठी वापरायची हे ज्याच्या-त्याच्यावर आहे.

माझ्या मते फालतु गरज नसतान्नही केलेल खर्च म्हणजे चंगळवाद

माणसाच्या नक्की गरजा किती?अन्न, वस्त्र आणि निवारा.गुहेत राहणाऱ्या माणसाला शेवटच्या दोन गोष्टींचीही गरज नव्हती.तेव्हा खरी मूलभूत गरज म्हणजे केवळ अन्न.गुहेत किंवा रस्त्यावर राहिले तरी निवाऱ्याचा प्रश्न सुटतो तरी तुम्ही (व्यक्तिश: तुम्ही नाही तर "चंगळवादावर" टिका करणाऱ्या लोकांचे प्रातिनिधिक म्हणून) एका घरी राहता-- चंगळवादी कुठले.कंदमुळे खाऊनही पोट भरते तरी तुम्ही वरणभात आणि भाजीपोळी खाता--चंगळवादी कुठले.ज्या गोष्टी (संगणक,इंटरनेट आणि फोन) नसल्या तरी फारसा काही फरक पडत नाही तरी त्या वापरता--चंगळवादी कुठले.कपडे वापरायची गरज नसतानाही झब्बा-लेंगा वापरता--चंगळवादी कुठले.अनवाणी फिरूनही चालत असताना चपला वापरता--चंगळवादी कुठले. असो.

श्री गावसेना प्रमुख's picture

2 Dec 2012 - 6:50 pm | श्री गावसेना प्रमुख

भारतात बहुतांश गरीब लोक हे बिगारी,सेंट्रींग काम्,शेतात मजुरी,अशी कामे करतात त्यात श्रींमतानी पिझ्झा किंवा बार मध्ये बियर ओर्डर केली तर ह्या लोकांना काय फायदा होनार आहे.
वरणभात भाजीपोळी झब्बा-लेंगा गुहेत राहने अन घरात राहणे ह्या गोष्टी चंगळवादात कसे काय येतील बरे
गरीब आणी श्रींमतांची ही दरी वेतनाच्या फरकाने येतेय्,शेतात काम करणारे,मोलकरणी,कारखान्यात काम करणारा अकुशल मजुर्,ट्रक ड्रायव्हर एका बाजुला अन क्लास १, २ वाले ,शाळेत कित्ती मोलाच ज्ञानार्जन्?करणारे दवाखान्याचा १० वी पास शिपाइ हा सुद्धा २५००० हजार पगार घेतो असे लोक दुसर्या बाजुला,

वेतनातील फरक हा कमी केला तर थोडा फार का होइना फरक पडेल अन चंगळवादाची चर्चा बाजुला पडेल

क्लिंटन's picture

2 Dec 2012 - 7:27 pm | क्लिंटन

वरणभात भाजीपोळी झब्बा-लेंगा गुहेत राहने अन घरात राहणे ह्या गोष्टी चंगळवादात कसे काय येतील बरे

का येणार नाहीत?ज्या माणसाला खायला मिळत नाही तो शिळेपाके पदार्थ खात असलेल्यालाला "चंगळवादी" म्हणू शकेल. जो शिळेपाके खाऊ शकतो तो दररोज ताजे वरणभात-भाजीपोळी खाऊ शकत असलेल्याला "चंगळवादी" म्हणू शकेल.तो वरणभात-भाजीपोळी खाऊ शकतो तो उडप्याच्या हॉटेलात खात असलेल्याला "चंगळवादी" म्हणू शकेल.जो उडप्याच्या हॉटेलात खाऊ शकतो तो एसी हॉटेलात खात असलेल्यांना "चंगळवादी" म्हणू शकेल.जो एसी हॉटेलात खाऊ शकतो तो हजार-पंधराशे रूपये देऊन मिडनाईट डिनर बफेमध्ये खात असलेल्यांना "चंगळवादी" म्हणू शकेल.म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्याला "चंगळवादी" म्हणता तेव्हाच दुसरे कोणीतरी तुम्हालाही "चंगळवादी" म्हणत असेल हे तुमच्या लक्षात येत नाही का?

श्री गावसेना प्रमुख's picture

4 Dec 2012 - 9:33 am | श्री गावसेना प्रमुख

येस सर्,आल माझ्या लक्षात की मलाही कुणी चंगळवादी म्हणत असेल

जाउ द्या ज्याच त्याच ज्याने त्यानेच ठरवाव.

चौकटराजा's picture

2 Dec 2012 - 1:19 pm | चौकटराजा

माझाही पाहित्यांदा या शब्दाला विरोध होता. पण हव्यासी , मूर्ख, चक्रम माणसे सुद्धा समाजाला आवश्यक आहेत. त्यानेच शहाण्याला शहाणपणाला वाव आहे. चंगळवाद हा शब्द म्हणजे गरीबाने श्रीमंत माणसाकडे पाहून केलेला उद्वेग आहे.श्रीमंत माणूस खरेच सूज्ञ झाला तर २५ टक्के रोजगारास तिलांजली मिळेल.
क्लिंटनचे चिन्तन स्वागतार्ह !

श्री गावसेना प्रमुख's picture

2 Dec 2012 - 1:27 pm | श्री गावसेना प्रमुख

श्रीमंत माणूस खरेच सूज्ञ झाला तर २५ टक्के रोजगारास तिलांजली मिळेल.

श्रींमत हा कधी सुज्ञ व्हायचा,
एखाद्या गरीब वस्तीत जाउन तिथे एखाद्या माणसाला विचारा की चंगळवाद काय भानगड आहे ते त्याला एका वेळेची खायची पडलेली असते त्या बिच्चार्याला काय माहीत,चंगळवाद हा नवश्रींमताने निर्माण केलेला विषय आहे,

चौकटराजा's picture

2 Dec 2012 - 2:41 pm | चौकटराजा

चौकटराजाचे अर्थ शास्त्र सांगते की जितका पैसा अधिक मिळायला लागतो तितकी तू सूज्ञपणे वापरायची अक्कल कमी व्हायला लागते.मग॑ एका बोटाऐवजी सर्व बोटात अंगठ्या येतात. हे फक्त एक उदाहरण झाले. पूर्वी मला पंचा चालत असे आता पैसे थोडे वाढले मग आता मला टर्किश टॉवेल लागतो. समोरच्या चाळीत रहाणारा म्हणतो "हा शुद्ध चंगळवाद आहे.
पंचाने काय अंगाला भोके पडतात काय ? "

आनंदी गोपाळ's picture

2 Dec 2012 - 8:12 pm | आनंदी गोपाळ

एखाद्या गरीब वस्तीत जाउन तिथे एखाद्या माणसाला विचारा की चंगळवाद काय भानगड आहे ते त्याला एका वेळेची खायची पडलेली असते त्या बिच्चार्याला काय माहीत,चंगळवाद हा नवश्रींमताने निर्माण केलेला विषय आहे,

गावसेनाप्रमुख महोदय,

वर क्लिंटन यांनी मुंबईत रहाते घर -पक्षी फ्लॅट- याबद्दल लिहिलेले आहे. एक किस्सा सांगतो.
परवाच मुंबईच्या चांदिवली नामक एका भागात एका कंपनीच्या रेस्ट हाऊसमधे रहाण्याचा योग आला. कंपनीने भाड्याने ३ बेडरूमचा फ्लॅट घेऊन तिथे एक केअरटेकर ठेवलेला होता. सुमारे २७-२८ वयाच्या त्या ओरिया मुलाकडे झाडूपोछापासून पाहुण्यांसाठी स्वयंपाक, धुणी भांडी इ. सर्व जबाबदारी होती.
याचा पगार महिना ३८ हजार रुपये. (राहून खाऊन) होता.
सहज त्याच्याशी गप्पा मारताना त्या फ्ल्याटच्या किमतीचा विषय निघाला, जी सुमारे २.२५ कोटी रुपयांच्या आसपास होती. व मी 'श्रीमंत' चंगळखोर असलो तरी माझ्या आवाक्यात ओढून ताणून आणता आली असती..
खिडकीतून समोरच्या डोंगराखाली एक झोपडपट्टी दिसत होती. त्यात असंख्य पक्की बांधकामेही दिसत होती. हा केअरटेकर, त्या झोपडपट्टीतल्या २०x४० जमीनीवर बांधलेल्या घराचा मालक होता. ;)
(अधोरेखिताबद्दलः फ्ल्याट 'हवे'त असतो, जमीन जमीनी'त' असते)

***
आता गरीब अन गरीब वस्तीबद्दल.

कधीतरी 'गरीब' वस्तीत चला माझ्याबरोबर. नक्की गरीब अन गरीबी काय असते ते लक्षात यायला मदत होईल :)
रस्त्यावर भीक मागणार्‍या 'गरीब' भिकार्‍याला सांगून पहा जरा, की जरा अमुक काम कर, उदा. माझी मोटारसायकल धूवून दे. मी तुला १० रुपये देतो. तो काय करतो, बोलतो, ते इथे लिहा.

***

गरीबांच्या गरीबीसाठी मी जबाबदार नाही. मी त्यांना गरीब केलेले नाही. उलट माझ्या व्यवसायातून मी ४ लोकांना रोजगार देऊन त्यांना श्रीमंतच करण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या गरजा भागल्यानंतर उरलेल्या पैशातून मी थोडे पैसे गम्मत म्हणून खर्च केले, तर तो माझा खासगी प्रश्न आहे. चंगळ कुणी करावी की नाही हा टोटल खासगी प्रश्न आहे.

आता, गरीबांच्या चंगळीबद्दल :
यंदाच्या दिवाळीत नेहेमीप्रमाणे माझ्या सर्व कर्मचार्‍यांना १ पगार बोनस, २ किलो फराळाचे पदार्थ व सुमारे २०० रुपये किमतीचे फटाके, जे होलसेल मधून आणल्यामुळे स्वस्त मिळाले, व सगळ्या स्टाफची मुले ५-१० वयोगटातली असल्याने भरपूर झाले होते, असे वाटले.
माझ्या रात्रीच्या वॉचमनची २ मुले आहेत. पत्नी नाही. दोन्ही मुले वसतीशाळेत रहातात. एका मुलाच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च मी करतो, दुसर्‍याच्या खर्चाची जबाबदारी लोकल 'मित्रमंडळा'स दिली आहे.
या माणसाने (पगार महिना ४५००, राहणे फुकट) दिवाळीच्या दिवशी, मुलांसाठी १००० रुपयांचे फटाके विकत आणले. व ते फोडलेही. अन रात्री दोन्ही मुले हातगाडीवरील २० रुपयांचा भुर्जीपाव खात होती...

याला काय करावे? मी ४ शिव्या हासडून समजावून पाहिले, की #$व्या, हजार रुपये जाळून टाकलेस, त्यापेक्षा पोरांना चांगल्या हॉटेलीत नेऊन जेवू घालायचे होते..

'सर, हौसेला मोल नसते हो..'
निर्लज्जपणे हसून त्याने मला सांगितले.
***

असे अनेक किस्से आहेत, असतात. त्याचमुळे क्लिंटनसाहेब जे थेअरॉटिकल डिस्कशन, पक्षी तात्विक चर्चा करीत आहेत, त्याला इमोशनली न घेता, नीट समजून घ्या ही नम्र इनंती.

संतुलित प्रतिसाद, धन्यवाद.

श्री गावसेना प्रमुख's picture

4 Dec 2012 - 10:04 am | श्री गावसेना प्रमुख

गरीबांच्या गरीबीसाठी मी जबाबदार नाही. मी त्यांना गरीब केलेले नाही.

मी कुठे म्हनतोय की तुम्ही जबाबदार आहात

त्याला इमोशनली न घेता, नीट समजून घ्या

इथे भावनेचा काही एक संबध नाहीये,
मुंबैतले गरीब म्हनजेच सगळे गरीब नाही होत
महाराष्ट्रात २/३ गरीब जनता राहते,जी की १००००/२०००० हजाराच्या कर्जा मुळे आत्महत्या करते (आता राहीले मुंबैतले गरीब त्यांना उद्याची चिंता असते का?)त्यांच्या बद्दल सरकारला काहीही सहानभुती नाहीये,ते लोक ४०/५० रुपये रोजाने काम करतात त्यांच सांगतोय मी ,नाही की मुंबइ मधले गरीब्,तुम्ही गरीबीच्या व्याख्येत महाराष्ट्रातल्या ग्रामिण भागातले गरीब ही आणा ही विंनती

माझ्या सर्व कर्मचार्‍यांना १ पगार बोनस, २ किलो फराळाचे पदार्थ व सुमारे २०० रुपये किमतीचे फटाके, जे होलसेल मधून आणल्यामुळे स्वस्त मिळाले, व सगळ्या स्टाफची मुले ५-१० वयोगटातली असल्याने भरपूर झाले होते

आमच्या ग्रामिण गरीबांना चंगळ परवडत नाहीहो कशाच फराळ कशाचे फटाके एक करंजी मोलाचीहीच त्यांची दिवाळी त्यांच्याकडे बघन आपल कर्तव्य नाही का
जाता जाता हे ही बघा
आणी तुम्हाला माझा प्रतीसाद पटत नसल्यास जाउद्या.

आनंदी गोपाळ's picture

9 Dec 2012 - 12:07 pm | आनंदी गोपाळ

जाऊ दिले आहे.

कारण तुम्ही झोडग्याचे "ग्रामिण" दिसता. समजावून सांगून समजले नाही. करंजा गोळा करून इकडची टोपी तिकडे घालण्यापेक्षा स्वतःच्या खिशातून मी काय केले, ते लिहिले आहे तिथे.

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Dec 2012 - 3:52 pm | श्री गावसेना प्रमुख

स्वताच्या हाताखालच्या लोकांना दोन घास दिले म्हनजे फार मोठे उपकार केल्याच्या थाटात बोलु नका,ते तर प्रत्येक मालक करतो (करणार नाही तर काय करतील कामगार पळुन नाही का जाणार)एक तर ते लोक तुमच काम करतात म्हणुन दुसर्याच करुन दाखवा म्हणजे मिळवल.
आणी एक लक्षात ठेवा वैयक्तीक पातळीवर नका उतरु, कोणी ग्रामीण असला तर तो गावंढळ आणीक शहरातले हुशार हे तुमच तत्वज्ञान तुमच्याकडेच ठेवा फायदा होईल ( तुमच तत्वज्ञान हे रिकाम्या खोक्यासारख आहे )

1

अ कू कडून अपेक्षित धागा

योग्य ठिकाणी मारलेले आहेच
असो

इरसाल's picture

1 Dec 2012 - 9:50 am | इरसाल

व्याख्या व्यक्तिसापेक्ष आहे.
१० पैश्याची लिम्लेट्ची गोळी ही अत्युच्च खरेदीची परमावधी असणार्‍या मुलाला कॅडबरी चॉकलेट ही चंगळ
खाटीकाकडुन हमेशा "पोटला" खरेदी करणार्‍याला वाहनाच्या धडकेने मेलेला बकरा/कोंबडी ही चंगळ
३००० रु. पगार असताना रस्त्यावर हातगाडीवर बर्गर खाणे व तोच बर्गर मॅक्डीमधे खाणे ही चंगळ
रोज घरी भांडी घासणार्‍याला बायकोने म्हणणे "राहु द्या आज...थंड पाण्याने नको, पाणी गरम करुन देते आज " ही चंगळ.
हॅच्बॅक वाल्याला सेडान, सेडान वाल्याला एस्युव्ही चंगळ....
आहे अजुन बरेच मग बघु

रोज घरी भांडी घासणार्‍याला बायकोने म्हणणे "राहु द्या आज...थंड पाण्याने नको, पाणी गरम करुन देते आज " ही चंगळ.

आगागा .... जबराट ....एकदम इरसाल

खटक्यावर बोट जाग्यावर पलटी ........ शून्य ठार झिरो जखमी

पैसा's picture

1 Dec 2012 - 10:42 am | पैसा

आपल्यासाठी तर बुवा अकुंचे धागे आणि त्यावरच्या प्रतिक्रिया वाचणे ही चंगळ आहे.

तिमा's picture

1 Dec 2012 - 10:43 am | तिमा

आम्ही चंगळवादी नसून मंगळवादी आहोत. उद्या मंगळावर वसाहती झाल्या तर जाऊन रहायचा बेत आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Dec 2012 - 11:04 am | परिकथेतील राजकुमार

अविनाशकाकांनी चक्क चक्क पाचोळी धागा काढला आहे.

चंगळ आहे बॉ मिपाकरांची.

अविनाशकुलकर्णी's picture

1 Dec 2012 - 12:58 pm | अविनाशकुलकर्णी
नितिन थत्ते's picture

2 Dec 2012 - 2:19 pm | नितिन थत्ते

चंगळवादाचे प्रतीक असलेली मॉल संस्कृती शहरांत फोफावल्यामुळे बर्‍याच अकुशल लोकांना तेथे कामे मिळत आहेत. उदाहरणार्थ मॉलमध्ये झाडू मारण्याचे दिवसाला २०० रु मिळतात असे ऐकले आहे. ही अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे. (घरोघरी कामाला किंवा छोट्या कारखान्यांमध्ये काम करायला माणसे मिळत नाहीत* अशी ओरड ऐकू येत आहे त्या अर्थी तिथे चांगले पैसे मिळतात हे खरे असावे).

*माणसे मिळत नाहीत याचा अर्थ ५० रु रोजावर मिळत नाहीत असा आहे. कामगारांना चांगले पैसे मिळणे ही चांगलीच गोष्ट आहे.

चंगळवाद झिंदाबाद.

दादा कोंडके's picture

2 Dec 2012 - 3:47 pm | दादा कोंडके

*माणसे मिळत नाहीत याचा अर्थ ५० रु रोजावर मिळत नाहीत असा आहे. कामगारांना चांगले पैसे मिळणे ही चांगलीच गोष्ट आहे.

हे सरसकट खरं नाही. उलटपक्षी आपल्याकडे श्रमप्रतिष्ठा कमी (झाली) आहे. लोकांना कमी श्रमात पैसे (इझी मनी) मिळवून छान-छौकीत उडवावेसे वाटतात.

-आमच्या घरी काम करायला *(मदत करायला)येणार्‍या बाईचा मुलगा जास्त श्रमाचं काम असेल तर घरी येउन काम करायचा. नंतर तो येइनासा झाला कारण दोन तास काम करण्यापेक्षा निवडणुक/मोर्चे वगैरेत भाग घेउन त्याला जास्त पैसे मिळू लागले. वर पुडी-बाटलीची 'सोय' वेगळीच.

-गावाकडे मजूर मिळेनात कारण तरूण मंडळींना नाक्या-नाक्यावर दिवसभर पडीक रहायचं असतं आणि बाकिच्या लोकांना 'नरेगा'वर जाउन फक्त एक सही करून मुकादमाचं कमिशन देण परवडतं.

*त्यांना 'कामवाली' किंवा 'मोलकरीण' म्हणावसं वाटत नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Dec 2012 - 5:17 pm | llपुण्याचे पेशवेll

-२ सहमत.
पण येवढा विचार कोनी करायचा नसतो. कोकणासारख्या ग्रामीण भागातही प्रत्येकाला घरबसल्या किंवा ऑफिसात पंख्याखाली बसून काम करायला हवे श्रमाचे काम करायला नको.

परिकथेतील राजकुमार's picture

3 Dec 2012 - 5:29 pm | परिकथेतील राजकुमार

पण येवढा विचार कोनी करायचा नसतो. कोकणासारख्या ग्रामीण भागातही प्रत्येकाला घरबसल्या किंवा ऑफिसात पंख्याखाली बसून काम करायला हवे श्रमाचे काम करायला नको.

एसीत, छान छान ,गुबगुबीत खुर्चीवर बसुन अशा प्रतिक्रिया द्यायला लाज कशी वाटत नाही ? आज एक मिपाकर म्हणून अशी प्रतिक्रिया पाहून शरम वाटली.

संतप्त आणि शरमिंदा
परा भयंकर

पुण्याचे वटवाघूळ's picture

6 Dec 2012 - 9:26 am | पुण्याचे वटवाघूळ

चंगळवाद झिंदाबाद.

गर्व से कहो हम चंगळवादी है :)

एखाद्याची गरज ही माझी चंगळ असु शकते. त्याच्या लेखी मी चंगळवादी.
तद्वत माझी गरज ही तिसर्‍या कुणाची चंगळ असु शकते. त्या दृष्टीनं मी गरजु.

.

सर्व चित्रे जालावरुन साभार.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Dec 2012 - 5:59 pm | परिकथेतील राजकुमार

तुझ्या प्रतिसादामुळे ह्याच विषयाशी संबधीत असा श्री. उत्तम कांबळे ह्यांचा 'पायासूप' हा लेख आठवला. नक्की वाचावा असाच हा लेख आहे.

टिवटिव's picture

2 Dec 2012 - 8:17 pm | टिवटिव

सुंदर लेख...

किसन शिंदे's picture

2 Dec 2012 - 5:41 pm | किसन शिंदे

अकु काका, कुठे गेला होतात इतके दिवस??

अविनाशकुलकर्णी's picture

2 Dec 2012 - 6:56 pm | अविनाशकुलकर्णी

वस्तुंच्या बाबत च्या चंगळ वादाचा विचार तर झालाच....
पण वैचारिक चंगळ पण मस्त पैकी फोफावला आहेच..
तोरेंत वरून डाऊन लोड केलेले एके काळी अश्लील व असभ्य वाटणे सिनेमे व पोर्ण क्लिपा...व साईट्स
तसेच पिवळे साहित्य ...व्यक्ती स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य बद्दलची मते ..
हा प्रकार पण चंगळ वादात मोडतो का?

प्रदीप's picture

2 Dec 2012 - 8:58 pm | प्रदीप

अनेक गरीबांच्या मुलांना कॉम्प्युटर वगैरे काही दिसतही नाही, मग ते वापरणे तर दूरच राहो.

अशा परिस्थितीत, कॉम्प्युटर/ ल्यॅपटॉप/ नोटबुक/ स्मार्टपॅड/स्मार्टफोन इत्यादी काही वापरून, इंटरनेटला ते जोडून, कुठल्यातरी दूरस्थ सर्व्हरवर असलेल्या ह्या मिसळपाव नामक संकेतस्थळाला भेट देऊन, त्यावर साडेसात ओळींचा का होईना धागा काढणे, इतर काहीबाही वाचणे, प्रतिक्रिया वाचणे, देणे-- हे सगळेही चंगळीचेच म्हणावयास हवे, नाही अविनाश?

प्रदीप's picture

2 Dec 2012 - 9:07 pm | प्रदीप

इथे लिहीतांना 'चंगळ वादी', 'मोल मध्ये', 'चंगळ वाद', 'लहान पणी', 'बाबत च्या', 'मस्त पैकी' अशा भिकारXX तर्‍हेने विनाकारण अधेमधे २~ २ बायटींचा जागा सर्व्हरवर फुकट घालवणे हाही चंगळीचाच प्रकार. आमच्या लहानपणी मराठीतून 'चंगळवादी', 'मॉलमध्ये', 'चंगळवाद', 'लहानपणी', 'बाबतच्या', 'मस्तपैकी' असे मराठीतून लिहीणे म्हणजेच चंगळ होती!

अविनाशकुलकर्णी's picture

2 Dec 2012 - 6:57 pm | अविनाशकुलकर्णी

वाटणे=वाटणारे

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2012 - 8:17 am | अत्रुप्त आत्मा

@तुम्ही चंगळ वादी आहात का?>>> नाय, आंम्ही चंबळवादि आहोत. :-b =))

खटासि खट's picture

3 Dec 2012 - 8:56 am | खटासि खट

शेजारच्या घरात नुकतीच डेथ झाली आहे हे माहीत असतानाही हॅपीवाल्या बड्डेचा इव्हेन्ट स्पीकर वरून चालू ठेवणे याला चंगळवाद म्हणता येईल का ?

परिकथेतील राजकुमार's picture

3 Dec 2012 - 10:28 am | परिकथेतील राजकुमार

त्याला भिकारचोटपणा असे म्हणतात.

आपल्याबद्दलचा आदर वाढीस लागला आहे.

आदिजोशी's picture

4 Dec 2012 - 2:08 pm | आदिजोशी

संयमित प्रतिसादाबद्दल निषेध.

बॅटमॅन's picture

4 Dec 2012 - 11:14 am | बॅटमॅन

हौ, हम है चंगलवादी.....तो??? का *&^ना है??

पुण्याचे वटवाघूळ's picture

6 Dec 2012 - 9:24 am | पुण्याचे वटवाघूळ

पण चंगळवादाविषयी इतकी चर्चा इतरांनी केली पण त्यावर चर्चा सुरू करणारे अकु यांचे मत काय हे कळलेच नाही :(

कवितानागेश's picture

6 Dec 2012 - 2:23 pm | कवितानागेश

मी स्वतः लई चंगळ करते. पण दुसर्‍या कुणी तशीच चंगळ केली तर त्याला मोठ्ठे लेक्चर मारते! ;)
-समाजसुधारक माउ

ह भ प's picture

6 Dec 2012 - 2:35 pm | ह भ प

आमी टंगळवादी+मंगळ्वादी हावोत.. फक्त मंगळावर जाऊन टंगळ करावी अशी मनिषा आहे..

चिगो's picture

6 Dec 2012 - 4:34 pm | चिगो

आहे चंगळवादी.. काय कराल ? (नागपूरी वाक्ये मनातच ठेवतो.) बाकी गरीबांच्या गरीबीबद्दल न बोललेलेच बरे.. त्यासाठी स्वतः श्रीमंत, एसीधारी विचारजंत व्हावे लागते. अतएव, आमचा पास..