मा़झ्या चारोळ्या

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जे न देखे रवी...
21 Nov 2012 - 10:21 am

Tea Time Break साठी माझ्या काहि चारोळ्या.......

१. विषय : प्रेम

बागेतली ती दोन फुल ...

गुन्तलेली एकमेकात ,

जसे ओलेचिम्ब आपण दोघ ....

गारान्च्या पावसात...!!!

शृंगारचारोळ्या

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

25 Nov 2012 - 10:14 pm | अत्रुप्त आत्मा

@ओळखा पाहू मी कोण ?' चे कोडे टाकू का ?>>> लै वेळा टाका http://www.sherv.net/cm/emo/funny/1/crazy.gif

अवांतर---@आत्माराव,>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif इथेच ओळखलय... अता तुंम्ही काय नाव सांगता पाहू........ http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt014.gif

अविनाश लोंढे.'s picture

26 Nov 2012 - 10:28 am | अविनाश लोंढे.

शुभप्रभात.....

विषय : विरह ..

एकच आशा , एकच मागणे...

फक्त तु "स्वप्नात" अशीच येत जा...

"प्रत्येक्शात" जरी सोडून गेलीस मला...

स्वप्नात तरी मला तुझ्या " ह्र्यदयात " घेत जा....!!!

श्री गावसेना प्रमुख's picture

26 Nov 2012 - 12:56 pm | श्री गावसेना प्रमुख

एकच आशा ,अन एकच गाने

फक्त तु अशीच स्वप्नात येत रहाणे

जिवनातुन जरी गेली निघुन

तरी पिशाच्च बनुन भेटत रहाणे1

एक शंका, ती पिशाच्च कशी बनेल, हड्ळ बनेल ना ? जाउदे यावर एक बेक्कार श्लेष आठवतोय असो नको इथं द्यायला, संपाद्क मित्र असले म्हणुन काय झालं.

श्री गावसेना प्रमुख's picture

28 Nov 2012 - 8:38 am | श्री गावसेना प्रमुख

देउन टाका घाबरता काय,

अविनाश लोंढे.'s picture

27 Nov 2012 - 1:11 pm | अविनाश लोंढे.

शुभप्रभात
विषय : सुर

तुझ्या "प्रेमाच्या " पावसाने ,

ह्र्यद्यात "पुर" आलाय.....

अन त्याच पुरात, सुर मारायचा.....

मला "सुर " घावलाय......!!!

ह भ प's picture

27 Nov 2012 - 5:19 pm | ह भ प

माझी दारोळी..

त्वांडात टाकला श्येंगदाना
ग्लासात वतली दारू..
अन चंद्रीसंगट नाचाय लागली
देव्.ड्याची पारू..

चढली का??

५० फक्त's picture

27 Nov 2012 - 7:18 pm | ५० फक्त

हभप, हे तर उखाणा म्हणुन पण चालेल.
त्वांडात टाकला श्येंगदाना
ग्लासात वतली दारू..
चंद्री गेली प़ळुन
म्ह्नुन केली देव्.ड्याची पारू..

सूड's picture

27 Nov 2012 - 8:06 pm | सूड

चंद्रीला सवत आणली
देव्.ड्याची पारू..

ह भ प's picture

28 Nov 2012 - 8:58 am | ह भ प

५० फक्त, सूड माझ्या दारोळीचं चीज झालं..

श्री गावसेना प्रमुख's picture

28 Nov 2012 - 9:12 am | श्री गावसेना प्रमुख

माझ्या दारोळीचं चीज झालं..
चीज दुधापासुन तयार होत हे माहीत होत्,हे तर नवीनच आहे दारोळी पासुन

ह भ प's picture

28 Nov 2012 - 9:19 am | ह भ प

नविन पाकृ शोधून काढल्याबद्दल श्री गा. प्र. व ह भ प यांचे मनःपुर्वक अभिनंदन..

श्री गावसेना प्रमुख's picture

28 Nov 2012 - 9:28 am | श्री गावसेना प्रमुख

1

अविनाश लोंढे.'s picture

30 Nov 2012 - 1:58 pm | अविनाश लोंढे.

तुझ्याशी फकत मैत्री करायची ....

हाच माझा " डाव " होता......

पण मला काय माहीत ...

तोच माझ्यावरती " घाव " होता....!!!