कोपरगावात अनुभवा "तृप्ती"

१००मित्र's picture
१००मित्र in भटकंती
14 Nov 2012 - 11:45 pm

कोपरगांव माहितिये ? साईबाबांच्या शिर्डी पासून फक्त १७ किमी वर. २ साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध. मी साधारण १९९२ पासून जातोय. मुद्द्याचं म्हणजे : इथे एक भार्री जेवणाची जागा आहे. "तृप्ती भोजनालय ".

आम्ही , म्हणजे मी आणी माझा मित्र अजय , कधी कधी उशीरा पोचलोय तेव्हां आम्ही चक्क बंद केलेलं शटर सुधा उघडायला लावलेलय. दिवस भराचं काम सम्पवायचं आणी तृप्ती मधलं जेवण हाणायचं.

आज सुधा तीच चव, तश्शीच व्यवस्था, तोच आखडू मालक.१९७७ पासून चालू आहे म्हणे. म्हणजे बघा , आपण जर प्रेमानी त्याचं कौतुक करायला गेलो , तर हा मनुष्य बिल्कूल बोलत नाही. फोटो काढायला दिले हेच नशीब. खरं म्हणजे छोटासा इंटर्व्यू घ्यायचा प्लान होता माझा.असो. त~हेवाईक असेनाका. जेवण मात्र एक नंबर. "टमाटो प्लेट" वगैरे म्हणजे खासियत.पोळ्या गरमागरम. ठेचा लय भारी.

फक्त टायमिंग मधे या. रात्री आलात तर ९ नंतर मिळणार नाही. मालक तुमच्या "विनंती" ला वगैरे बधला तर माझ्या बरोबर पार्टी. मुद्दा - वेळात जा , फार गोड बोलण्याची अपेक्षा ठेवू नका. [पुण्यातले असाल तर सोप्पं जाईल]. पण एवढं साधं [??] पथ्य पाळलत तर ला-जवाब जेवण मिळेल हे नक्की.

कोपरगाव बस स्टँड पासून अगदी जवळ आहे. कोणालाही विचारलं तरी सांगतील.

इथला हा फळा बघा तर :-

phirasta.com

सर्वात खालची टीप पाहून मी वर काय म्हणतोय ते लग्गेच कळेल !

असो. उत्तम जेवणाचा आस्वाद घ्याच !

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

14 Nov 2012 - 11:59 pm | अत्रुप्त आत्मा

गेलो त्या भागात तर लै वेळा जाणार हो.................! :-)

१००मित्र's picture

15 Nov 2012 - 7:02 am | १००मित्र

"अत्रुप्त आत्मा" शांत करा, यूसरनेम फारच आवडलं !

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Nov 2012 - 11:24 am | श्री गावसेना प्रमुख

आमच्या इथुन जवळच आहे.८० किमी

1

१००मित्र's picture

15 Nov 2012 - 12:32 pm | १००मित्र

ओरपा , चेपा आन हाना जोरात ज्येवान

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Nov 2012 - 12:36 pm | श्री गावसेना प्रमुख

ओरपु का चेपु आता तुम्हीच सांगा(हाजमोला घेउन या)हे1आहे का तिथे

१००मित्र's picture

15 Nov 2012 - 12:59 pm | १००मित्र

मस्तच राव , हाजमोला ची आयडियाची कल्पना

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Nov 2012 - 1:09 pm | श्री गावसेना प्रमुख

1

अभ्या..'s picture

15 Nov 2012 - 12:37 pm | अभ्या..

भावफलकाचा फटू नुकताच काढलेला (वाटतोय तर तसा) असला तर परवडेबल आहे की चांगलेच.
फक्त खिचडीचेच दर का वाढवलेत असे विचारले मालकाला, तर चालते का ?
उपासवाल्यावर का एवढा राग?

१००मित्र's picture

15 Nov 2012 - 12:57 pm | १००मित्र

रेट वाजवी. खिचडी दर ....हं... मालकस्नी इच्चाराय हवं.

पघा की इचारून तुमीच ..

आँ..? जेवताना पेपर वाचू नये?

ते का बॉ?

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Nov 2012 - 1:10 pm | श्री गावसेना प्रमुख

पेपर खराब होतो म्हणुन्,बाकी काही नसाव(अशी अपेक्षा)

ज्ञानेश's picture

16 Nov 2012 - 6:43 pm | ज्ञानेश

वेळ जास्त लगतो म्हनुन !! जेवन करतान पेपर वाचला तर जेवायला वेल भरपुर लगतो म्हनुन. अनि बकिचे गिर्ह्यिक वाट पहात आस्तिल.

अभ्या..'s picture

15 Nov 2012 - 1:10 pm | अभ्या..

आमी कशाला? तुम्ही मालकाच्या एवढे जवळचे. बंद शटर ऊघडायला लावणारे. :)
मग तुम्हीच विचारा आन आमाला सांगा. ;) खरे उत्तर तरी कळेल.
आणि कोपरगाव मंजे सोलापुराहून कितीसं हो? (बहुतेक ते नाही परवडेबल).

@ अभिजित,सासुरवाडी करुन घेताय का बघा कोपरगाव, तुम्हाला अजुन चान्स आहे तो.

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Nov 2012 - 1:25 pm | श्री गावसेना प्रमुख

आरारा काय लोक बघा,हाटेलीसाठी च्छा.

अभ्या..'s picture

15 Nov 2012 - 1:31 pm | अभ्या..

पन्नासराव कैच्याकै हां.
नुसता खिचडीचा रेट जास्त का आणि कोपरगाव कुठे एवढं विचारलं तर लगेच सासरवाडी?
चान्स तर हाय पण कुठं पण का? एवढ्या जवळ नगं बाबा सासरवाडी.
आणि खिचडीच खायची तर आपला अनाधी वाला सहस्त्रबुध्दे आहेच की.

५० फक्त's picture

15 Nov 2012 - 1:58 pm | ५० फक्त

हो + सुगरण आहे स्टेशनजवळ, अजुन अजुन काय आठवणी काढायच्यात सांगा.

सोत्रि's picture

16 Nov 2012 - 7:47 am | सोत्रि

समस्त सोलापुरकर हो!

आठवणींसाठी हे नक्कीच वाचा, हे न वाचाल तर बरेच काही मुकाल:)

- (सोन्नलगीचे रंग आवडणारा) सोकाजी

अभ्या..'s picture

15 Nov 2012 - 2:29 pm | अभ्या..

सुगरण तर आहेच, अजिंक्य, निसर्ग, वैशाली असे बरेच आहेत.
आणि चटकमटकला सराफा, सातरस्ता, आपला भय्या तर आहेच पार्कात.
काढ रे एकदा सोलापुराचा आढावा. कळू दे लोकांना नुसत्या चट्णीशिवाय सोलापुरात काय काय मिळते ते.
घर्गुती 'हुग्गी' पायजेलच त्यात.

राघवेंद्र's picture

16 Nov 2012 - 12:50 am | राघवेंद्र

मित्रानो, विनायक (पुणे नाका) आणि अरविन्द ( वालचन्द कौलेज )तसेच सुप्रजा पावभाजी पण मस्तच ...

अभ्या..'s picture

16 Nov 2012 - 1:33 am | अभ्या..

अरे वा. सोलापूरकरात अजून एक भर का?
पण राघवा अरविंदचे कौतुक फक्त डब्ल्युआयटी वाल्यांना. बाकी नाही राव.
विनायक आणि सुप्रजा ओक्के.

भोजनालयाबद्दल वाचून खूपच उत्सुकता वाटते आहे. बघुया नशिबात असेल तर मिळेल.
'जेवताना पेपर वाचू नये' वरून आठवले, मी पूर्वी संडासात पेपर न्यायचो, तेंव्हा आई नाराज व्हायची. पुढे पेप्राची अवड संपल्यावर पुस्तक नेऊ लागलो.
अलिकडे तिथे रोज एक रेखाचित्र बनवतो. ही संडास-चित्रे पुरेशी झाली, की मिपावर देण्याचा विचार आहे.
(या हुच्च चित्रगुप्ताला कश्यावरून काय सुचेल, काही नेम नाही. कुठे लज्जतदार जेवण आणि कुठे संडास-चित्रे... शी..)

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Nov 2012 - 4:03 pm | श्री गावसेना प्रमुख

लवकर येउ द्या,नवीनच आहे कलाकृती संडासचित्र.1

अलिकडे तिथे रोज एक रेखाचित्र बनवतो. ही संडास-चित्रे पुरेशी झाली, की मिपावर देण्याचा विचार आहे.

कशाची आहेत ही चित्रे..?? :-$

-(धडधडत्या हृदयाने) गवि

शैलेन्द्र's picture

15 Nov 2012 - 4:43 pm | शैलेन्द्र

अब्स्ट्रक्ट असावीत.. घाबरु नका..

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Nov 2012 - 4:57 pm | श्री गावसेना प्रमुख

1

अभ्या..'s picture

15 Nov 2012 - 5:06 pm | अभ्या..

अब्स्ट्रक्ट असावीत

ह्म्म मग येऊ द्यात.
फुल्ल प्रतिसाद फिक्स एकदम.
प्रत्येकाला मत मांडायची संधी मिळेल.
चित्रातनं सगळंच कळलं तर मिपाकर काय करणार मग?
नुसतेच चान चान?

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Nov 2012 - 5:15 pm | श्री गावसेना प्रमुख

त्यांच काम अपुर्ण आहे अजुन त्यांना डीस्टर्ब नका करु,चित्र चुकेल अश्याने.

शैलेन्द्र's picture

15 Nov 2012 - 9:54 pm | शैलेन्द्र

चित्र चुकल तर चुकु द्यात, ते फक्त "मनातल्या" गोष्टी बाहेर काढायच एक साधन आहे :)

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Nov 2012 - 9:55 am | श्री गावसेना प्रमुख

आता इथ मनाचा काय संबन्ध.ते तर ...जाउ द्या उगीच ...

१००मित्र's picture

15 Nov 2012 - 5:12 pm | १००मित्र

सुरेख चवीचे दिवाणे असाल तर नक्कीच नशीब फळफळेंगा !
बाकी रही बात संडासात पेपर नेण्याची :- पेपराशिवाय पूर्वी व्हयचीच नाही !
आता होते - हेहेहे !

शैलेन्द्र's picture

15 Nov 2012 - 9:56 pm | शैलेन्द्र

नवाकाळच संपादकीय हा बद्धकोष्टावर राम्बाण उपाय आहे अस आमच्या एका मित्राच मत आहे.. :)

काय मागासलेले लोक आहेत! अजून संडासात पेपर नेतात. अहो आयपॅड वापरा आयपॅड. पाहिजे तो पेपर वाचा, वर कुणी मित्र ऑनलाईन आला तर फेसटाईम च्याटसुद्धा करता येईल.

राघवेंद्र's picture

16 Nov 2012 - 12:53 am | राघवेंद्र

फेसटाईम ची आयडिया :)

१००मित्र's picture

16 Nov 2012 - 1:28 pm | १००मित्र

पेपरचा दुहेरी उपयोग आहे

दादा कोंडके's picture

16 Nov 2012 - 1:37 pm | दादा कोंडके

लिंक बघितली. शोल्लेट आहे एकदम.
कल्पकता म्हणायची की काय म्हणाचं ?
पण दादा, तुमास्नी शेअर करायचं सुच्लं अगदी योग्य !

चैदजा's picture

16 Nov 2012 - 2:39 pm | चैदजा

धाग्याला प्रतिसाद --
लहानपणी कोपरगावला बरेच वेळेला गेलो आहे. मावाशी राहची. बोरावके पेट्रोल पंपावर. सदर हॉटेल तेव्हा माहित नव्हते. कोपरगावला अजुन एके ठिकाणी बरेच वेळा आईसक्रिम मिल्क्शेक खाल्ले आहे. ते अजुन आहे का ? मजा असायची कोपरगावला. बोरावकेंचे थिएटर होते. एक सिनेमा पुन्हा पुन्हा बघायचो. शेजारील कॉलेज मध्ये जाऊन लपछपी खेळायचो. बैलगाडीतुन ऊस चोरायचो.

१००मित्र's picture

16 Nov 2012 - 7:36 pm | १००मित्र

१९७८ पासून त्रुप्ती आहे. आत्ता-आत्ता जरा त्यांनी स्टाइल [टाइल्स] वगैरे लावल्यात - गिर्‍हाइकांवर थोडीश्शी मेहेरबानीच म्हणायची. नाहीतर कळकट्ट होतं हे. अगदी बस-स्थानकाच्या समोरच - साधारण ३-४ मिनिटं चाललात की येतं- मार्केट किंवा गावात जायच्या रस्त्यावर. पहिल्या मजल्यावर आहे. बाहेरून तसं दिसत वगैरे नाही. पण जुन्या-जाणत्यांना विचारलत की लग्गेच तपास लागेल.

तरी काही वर्षांपूर्वी ह्या इसमाला स्पर्धाच नव्हती, मधे २-४ hotels आली. पण बोंबलली. अजूनही आहेत म्हणा काही, पण काही दम नाही यार !

तुम्ही जे आइसक्रीमचं म्हणताय , ते अगदीच समोर आहे बस-स्थानकाच्या. हे तिथूनच थोडस्सं पुढे आहे.

बोरावकेंचे थिएटर ठाऊक नाही , पण पंप आहे नाअ अजून, हिरो होंडा एजन्सी आहे. बाजुला span executive hotel आहे. तिथेच तर राहतो मी गेलो की. २ करखान्यांमुळे जाणं व्हायचं, आता विशेष नाही.

तरी गेलात , तर जरूर "त्रुप्त" व्हा , शुभेच्छा !

१००मित्र's picture

16 Nov 2012 - 7:39 pm | १००मित्र

ह्म्म , आठवलं आत्ता - डेअरी-डॉन की असंच काहीसं खतरनाक नाव होतं ह्या आईस्क्रीम पार्लर चं.

धागाकर्त्याचे काही प्रतिसाद बीनचूक आहेत तर धाग्याच्या मुख्य लेखनात बर्‍याच चुका. आजाकाल शंका येते की थोड्या प्रयत्नांनंतर जर इतके बरे लिहायला येणार होते तर आधी सराव न करता धागा टाकायची घाई कशाला?

दादा कोंडके's picture

16 Nov 2012 - 8:51 pm | दादा कोंडके

अशा प्रकारे संपादकांनी हौशी नवलेखकांवर ताशेरे ओढले... :)

१००मित्र's picture

16 Nov 2012 - 11:51 pm | १००मित्र

कसचं कसचं दादा !
कशी नशीबानं थट्टा आज मांडली !

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Nov 2012 - 9:57 am | श्री गावसेना प्रमुख

माझ्या काळजाची तार कुणी तोडली?

१००मित्र's picture

16 Nov 2012 - 11:50 pm | १००मित्र

सत्यवचन - अगदी "बीन" चूक , रेवती"ताई"
आजाकाल विसरून जायला होतं !