कोर्लई चा किल्ला आणि पोर्तुगीज (क्रिओल) भाषा....

संदीपसाठे's picture
संदीपसाठे in भटकंती
8 Nov 2012 - 3:45 pm

अलिबाग-मुरुड या प्रसिद्ध पर्यटन स्थळाना वारंवार भेट देवूनही कोर्लई गावाजवळील किल्ला आणि त्या गावची चमत्कारीक भाषा याविषयी बर्याच जणांना माहिती नसते.अलिबागहून मुरुड कडे जाताना वाटेत लागणारा हा किल्ला समुद्रात घुसलेला किंवा समुद्राने वेढलेला दिसतो.
या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीय लोक रहातात. यातील ख्रिश्चन लोक जी भाषा बोलतात तिला ’क्रीओल" असे संबोधले जाते, व स्थानिक लोक तिला "नौ लिन्ग" (आमची भाषा) असे म्हणतात. या भाषेचा उद्भव मराठी आणि पोर्तुगीज अशा मिश्रणातून झाला आहे.

इ.स. १५२३ मध्ये पोर्तुगीजांनी चौल व रेवदंडा येथील किल्ले ताब्यात घेतले. त्यानंतर काही स्थानिक लोकांचे धर्मांतर झाले अथवा वांशिक मिश्रण होवून त्या लोकांचे सध्याचे वंशज आता ही पूर्णपणे वेगळी भाषा बोलतात.हे गांव मुख्य भूमीपासून समुद्राने अलग केलेले असल्याने रेवदंड्याच्या खाडीवर पूल होईपर्यंत या गावाचा आसपासच्या परिसराशी संबंध मर्यादित होता. त्यामुळे ही भाषा शेकडो वर्षे जतन झालेली आहे.मात्र अलिकडे या गावातील तरूण पिढी बाहेरच्या जगाशी वाढत असलेल्या संपर्कामुळे मराठी बोलू लागली आहे, आणि कदाचित भविष्यात ही "क्रीओल" भाषा नामशेष होण्याचीही शक्यता आहे.

या कोर्लई गावच्या भाषा-वैशिष्ट्याबरोबरच येथे पोर्तुगीजकालीन किल्ला आणि चर्चही आहे.
किल्ला हा तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला असून त्यावर एक दीपगृह आहे.किल्ल्यावरून रेवदंडा, अलिबाग परिसराचे व समुद्राचे विलोभनीय दर्शन होते.येत्या दिवाळीच्या सुट्टीत अलिबाग व मुरुड ट्रीप आखत असाल तर त्यात या कोर्लईच्या किल्ल्याचा अवश्य समावेश करा- पैसा वसूल !

प्रतिक्रिया

क्रिओलबद्दल अजून डीटेल्ड माहिती वाचायला आवडली असती, काही वाक्ये/शब्दांच्या माध्यमातून, असो. :)

इनिगोय's picture

8 Nov 2012 - 9:23 pm | इनिगोय

हं.. शीर्षकात 'भाषा' शब्द वाचल्यावर जे आठवले ते अगदी दिसलेच इथे :)

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Nov 2012 - 9:30 pm | बिपिन कार्यकर्ते

या भाषेबद्दल मागेच सविस्तर वाचलं होतं. लिंक शोधतोय.

सुनील's picture

8 Nov 2012 - 10:55 pm | सुनील

पूर्वी मिपावरच एका प्रतिसादात सदर जमातीविषयी थोडेसे लिहिले होते. आता सापडत नाही!

असो, माझी माहिती थोडी वेगळी आहे.

ही मंडळी धर्मांतरीत नसून मूळचीच पोर्तुगीज होती. उत्तर कोकणातून पोर्तुगीज हटले आणि त्यांचा अन्य मूळ पोर्तुगीजांशी संपर्क राहिला नाही. तशातच मिश्र विवाहामुळे रक्तातील पोर्तुगीज अंशदेखिल पातळ होऊ लागला! आता ही मंडळी पूर्ण भारतीयच आहेत.

यातील ख्रिश्चन लोक जी भाषा बोलतात तिला ’क्रीओल" असे संबोधले जाते

क्रीऑल नावाची अशी कुठली एक भाषा नसते. दोन वा अधिक भाषांच्या मिश्रणातून बनलेल्या "सुधारीत" भाषेस क्रीऑल अशी संज्ञा आहे.

(मिश्र "असुधारीत" भाषेस पिजिन अशी संज्ञा आहे)

बाकी तो संपूर्ण पट्टा मनोहर आहे, यात शंका नाही!

राही's picture

9 Nov 2012 - 12:35 am | राही

मॉरिशस् मध्येही स्थानिक भाषा ही फ्रेंच च्या गडद प्रभावाखाली असलेली क्रिऑल आहे.