खंडोबा मंदिर - मुळगाव, बदलापूर

सौरभ उप्स's picture
सौरभ उप्स in भटकंती
8 Nov 2012 - 12:34 am

खूप इच्छा होती सगळ्यांची नाईट आउट करायची, दसर्यादरम्यान ठरवलेला प्लान कोसळून गेला, ठरता ठरता २७ ऑक्ट ला शनिवारी रात्री जायची मुहूर्तमेढ झाली.
मागच्या प्लान पेक्षा काहीजण वाढले पण अन्याने मात्र ऐन वेळी टांग दिली (चालायचंच).

कल्याण ला सगळे बाईकस्वार भेटलो, आणि हिरवा झेंडा फडकला....

पेट्रोल भरण्यासाठी मी आणि किसन मध्ये थांबून पेट्रोल पंपावर गेलो, आणि २ जण स्पा ची वाट बघत थांबले जेणेकरून तो पुढे जाऊन चुकामुक नको व्हायला, आणि व्हायचे तेच झाले,
स्पांडूराव आपण मागे राहिलो कि काय या विचाराने जे सुसाट पुढे गेले ते आम्हाला गावलेच नाहीत, १५-२० मिन्तानी आम्ही गाड्या काढून पुढे झालो, कारण फोने पण लागत नवता, शेवटी एकाचा फोन लागला आणि ते पुढे गेल्याचे कळले.
असो,
ठरलेल्या ठिकाणच्या जवळ पोचलो तिथेच १० मिनिट आधी एक धाबा लागला तिथे पोटभर जेवण करून सगळे निघालो..
आणि एका वळणावर भला मोठा ग्रुप दिसला ट्रेकर्स वाटले ते.... त्यांना ठिकाण विचारून आम्ही पुढे गेलो... खात्री केली जागेची आणि गाड्या लाऊन मंदिराच्या पायरा चढायला लागलो.
दिवसभर थकून आणि नुकतच जेवल्यामुळे पायरया चढायला कठीण जात होत जरा, तरी आमचे अल्पेश मास्तर आणि रोबिन हूड आपला अवरेज मेंटेन ठेऊन पुढेच होते नेहमीप्रमाणे.

अर्ध्यावर गेल्यावर आम्हाला आमच्या मागून टोर्च घेऊन मोठा ग्रुप येताना दिसला... हलक्याश्या निराशेने आम्ही आमचा स्पीड वाढवला जेणेकरून वरती आम्हाला आमची जागा पकडून ठेवता येईल या हेतू ने..

आम्ही आमच्या ब्यागा टाकतो न टाकतोच तर तो ग्रुप आमच्या मागोमाग पोचला पण... त्यांच्या पायरया चढण्याच्या स्पीड ला सलाम..

वाटलेलं आम्ही ७ जणच असू मस्त एन्जोय करू... पण या २५-३० जणांच्या ग्रुप ने पूर्ण वाट लावली.

थोडावेळ पहुडलो सगळे.. त्या ग्रुप चा धिंगाणा सुरु झाला.. इकडे आम्ही आमचा धिंगाणा सुरु केला मग...

साधारण १२-१ वाजले होते रात्रीचे आम्ही बरोबर बटाटे आणि रताळी नेले होते शेकोटी करून खायला..
लाकड तिकडेच शोधू म्हणून जाताना सुखी लाकड नवती नेली..
मग काय सुकलेली लाकड शोधण्याची मोहीम सुरु झाली..

कशी बशी थोडीशी लाकड मिळाली पण तेवढी पुरणार नवती, सो आजूबाजूला असलेल्या सुकलेल्या गवताचा फुटभर वाढलेला पेंढा आणि मोठी मोठी सुकलेली पान गोळा केली ... माल बर्या पैकी जमला होता.. आता लाकड रचून शेकोटी पेटवायला घेतली...
त्यात कोणी माहीर नसल्याने सुरुवातीला बरेच प्रयत्न फस्ले.. पण नंतर अथक प्रयत्नांनी पेटली एकदाची शेकोटी.. मग त्यात आम्ही आणलेले जिन्नस व्यवस्थित शेक मिळेल अश्याठिकाणी रचले... आलटून पालटून एक एक जण शेकोटीला जाग ठेवत होता...
मग काय फुल धम्माल आली
साधारण २-२.३० वाजलेले...मग एक एक करून बटाटे आणि रताळी काढली आणि फुक मारत हाताला चटके घेत ती सोलून खाल्ली,
.. अहा हा हा हा बर्याच वर्षांनी अशी मजा केली त्यामुळे सगळे अगदी रिफ्रेश झाले...

हळू हळू एकेकाने पाठ टेकली जणू काही हे लक्षातच नवत कि आपण नाईट आउट ला आलोय,, असो.. आम्ही काही जण परत गप्पांमध्ये आणि जुन्या किस्स्यांमध्ये रमलो.....

मग जशी जशी थंड हवा सुरु झाली तसे सगळेच गुमान झोपी गेले..

कधी नव्हे ते ६ वाजता अचानक जाग आली पाहते च ते क्लासिक दृश्य आणि वातावरण बघून झोपेतून उठण्याचा आलास कधीच पळून गेला होता...

त्या दुसर्या ग्रुप मधला एक जण आमच्या हद्दीत रात्रीपासून जाम वाईट डुलकत होता.. जणूकाही अथांग समुद्रात रिकामी नाव पेंगते तसा, त्याच टिंग टोंग टिंग चालूच होत....

मी, किसन आणि अल्पेश उठलो होतो, जोरजोरात आवाज करून बाकीच्यांना उठवल.... आणि मग ज्याची वाट बघत होतो तो सूर्योदय झाला ... कॅमेरा ची सेट्टीइंग करून फोटोग्राफी सुरु झाली काहींची....
मग काय सगळ आवरून आमची स्वारी निघाली. तो दूसरा ग्रुप पाहटे ५ च्या आस पास कलटी झाला होता.

या सर्व खटाटोपाचा गोल्डन पोइन्ट म्हणजे वैजयंती धाब्यावरची मिसळ खाणे...
सगळे अगदी तुटून पडले त्या मिसळीवर आहा हा हा हा क्लासिक असते तिथली मिसळ....
आणि मग तो पानी कम चाय तर अप्रतिमच... न राहून आम्ही प्रत्येकी २ कप प्यायलो....

मग काय सगळी मजा झाली आणि मग बाईक वर सेट्टल होऊन किक मारली ती थेट घरापर्यंत रेम्टवली...

दरम्यानचे काही फोटोस.....
१)
6

२)
8

३)
11

४)
12

५)
14

६)
15

७)
17

८)
19

९)
20

१०)
21

११)
22

१२)
23

धन्यवाद....

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

8 Nov 2012 - 9:50 am | श्री गावसेना प्रमुख

१५) २०) २२) नबंरचे फोटो छान आहेत(बाकी फोटो उगीच टाकले आहेत)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2012 - 10:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो छान आहेत. काही फोटो उगाच डकवले असे वाटत राहते.

मिसळपावच्या फोटोला पैकीच्या पैकी मार्ग दिले आहेत.

-दिलीप बिरुटे

श्री गावसेना प्रमुख's picture

8 Nov 2012 - 11:08 am | श्री गावसेना प्रमुख

क्षुधा शांती करुन घ्या असे म्हणतोय.

मला फक्त बाराच फोटो दिसत आहेत :-(

ज्ञानराम's picture

8 Nov 2012 - 10:18 am | ज्ञानराम

काटदरेंची मिसळ आहे वाटत ??? खंडोबाच्या मंदिरात जायला मिळाल नाही का?? फोटो अपेक्षेप्रमाणे नाहीत.

त्यांनी वैजयंती ढाबा लिहीलंय. हा ढाबा आत गावात आहे. काटदरेंचं हॉटेल स्टेशनपासून अगदी जवळ आहे.

मला तो नाकतोडा कि काडीकिटक भयंकर आवडला आहे हिंमत बघा लेकाची एकटाच भटकंती कर्तोय मस्तमौला एकदम ;)
फोटो छान आहेत फ्रेश वाटल :)

सौरभ उप्स's picture

8 Nov 2012 - 11:12 am | सौरभ उप्स

धन्यवाद पियुषा.....
खूप सही होता तो नाकतोडा...

बॅटमॅन's picture

8 Nov 2012 - 11:35 am | बॅटमॅन

नाकतोडा खरंच एक लंबर!!!!

नाकतोडा तर एखाद वाळलेलं पान पडलंय कि काय , इतका हुबेहूब होता

खबो जाप's picture

8 Nov 2012 - 12:01 pm | खबो जाप

शेवटचा फोटो ( बारा नंबरचा ) एकदम झकास भाऊ

वाह्यात कार्ट's picture

8 Nov 2012 - 3:43 pm | वाह्यात कार्ट

कैच्या कै भारी फोटो !!! आवडेश :)

५० फक्त's picture

11 Nov 2012 - 7:02 am | ५० फक्त

मस्त आले आहेत रे फोटो, धन्यवाद.

चौकटराजा's picture

11 Nov 2012 - 7:15 am | चौकटराजा

सगळेच फोटो चांगले आलेयत. मिसळीचा फोटो पाहून ताण आला आहे !

फोटो मस्तच ! ४था आणि ५वा इशेष आवडला ! :)
त्या किड्याच्या अ‍ॅंटिना भारी दिसतायत... ;)

१९९२ साली २-३ वेळा गेलो होतो,त्या आठवणी ताज्या झाल्या.
हो, आणी "काटदरे" मध्ये खाल्लेला "वडा-पाव" आठवला - येक्दम ब्येष्ट व्हता राव !

उमेश वैद्य's picture

14 Nov 2012 - 1:35 pm | उमेश वैद्य

तिस वर्षापूर्वी तिथ गेलो होतो. निर्मनुष्य जंगल होत. आदिवासी,कातोडी, मंढपाळ लोकांची ये जा असायची. त्या मंदिरात दरोडेखोर मालाची वाटणी करायला येत असतात (अर्थातच रात्री) अशीही वंद्यता होती.

१००मित्र's picture

14 Nov 2012 - 11:47 pm | १००मित्र

मलाही आठवतं - आसपास काहीच नव्हतं