व्हॅट भरावा की नाही ?

चैदजा's picture
चैदजा in काथ्याकूट
1 Nov 2012 - 6:50 pm
गाभा: 

आम्ही आमची सदनिका २००९ सालामध्ये माजिवाडा, ठाणे येथे विकत घेतली. विकासक ३% व्हॅट मागत आहे. त्याच्याकडे आम्ही व्हॅट क्र्मांक मगितला. त्याने तो अजुन दिला नाही. ७०% सदनिका धारक ३% व्हॅट भरून आले आहेत. त्यांना पावती वर व्हॅट क्र्मांक दिला नाहि. आंजावर बरेच लेख वाचले. वेलणकरांशी देखिल संपर्कात आहे. तरी अजुन योग्य निर्णय होत नाही.
क्रुपया मार्गदर्शन करावे.

प्रतिक्रिया

चैदजा's picture

2 Nov 2012 - 2:38 pm | चैदजा

आयला, मी पहिल्याच मॅचला शून्यावर आउट झालो. पहिलच लेखन (मी लेख म्हणत नाही.), १२७ वाचने, आणि एक पण प्रतिसाद नाही.

मी_आहे_ना's picture

2 Nov 2012 - 2:40 pm | मी_आहे_ना

अहो, तसं नाही.. जाणकार हवेत उत्तर देणारे, उगाच चुकीचा प्रतिसाद कशाला द्यायचा. शेवटी पैश्यांचा प्रश्न आहे ना :)

थांबा हो जरा, जाणकार येतील हळूहळू, दमानं घ्या :) हा विषय हल्काफुल्का नै त्यामुळे प्रतिक्रियांचा पाऊस पडणे इथे अपेक्षित नै.

यावर मत देणार्‍यांपेक्षा मत मागणारेच जास्त असतील. कारण हे व्हॅट प्रकरण सर्वांच्याच अंगावर शेकलं आहे.

मी_आहे_ना's picture

2 Nov 2012 - 2:49 pm | मी_आहे_ना

आम्ही मात्र लकीली वाचलो ह्यातून, त्यावरून काढलेला (कायदेशीर निकाली लागलेला) निष्कर्ष - 'कंप्लीशन सर्टिफिकेट / भोगवटापत्र आधी झाले आणि बिल्डरने ग्राहकाला सदनिका विकण्याचा करारनामा (अ‍ॅग्रीमेंट टू सेल) नंतर केले तर, म्हणजेच रेडी पझेशन फ्लॅटला व्हॅट लागू नाही'
(सरसकट रेडी पझेशनला हे लागू असेलच असे नाही, कंप्लीशन आधी असलेल्यांनाच लागू आहे. असो, अवांतर प्रतिसाद, पण माहिती म्हणून दिलाय)

पाटव's picture

2 Nov 2012 - 2:50 pm | पाटव

सोसयटीमध्ये या विषयावर (कधीनव्हे ते आणि) पहिल्यांदाच एकमत झाले... अजुन कोणीही एक दमडी पण दिली नाहिये बिल्डरला...
१. बिल्डरने भरलेल्या VAT ची पावती मागा
२. त्याचा VAT registration number घ्या... तो तुम्हाला आलेल्या नोटीसच्या तारखेनंतरचा असेल तर सेल्स टॅक्स कमिशनर कडे तक्रार करा...
३. आणि तुमचे अ‍ॅग्रीमेंट घेवुन चांगल्या वकिलाकडे जा आणि सल्ला घ्या...

रीसेल फ्लॅट असेल तर पहिला मालक जबाबदार की सध्याचा?

सन्दीप's picture

2 Nov 2012 - 4:16 pm | सन्दीप

सध्याचा

सन्दीप's picture

2 Nov 2012 - 4:16 pm | सन्दीप

सध्याचा

रीसेल फ्लॅट असेल तर पहिला मालक जबाबदार असतो. सध्याचा नाही.

कपिलमुनी's picture

2 Nov 2012 - 6:00 pm | कपिलमुनी

बिचारा (?) परागंदा झालाय ...फर्म बंद झाली आहे ...मग व्हॅट कुणी भरावा हा प्रश्न पडला आहे

प्रकाश घाटपांडे's picture

2 Nov 2012 - 6:17 pm | प्रकाश घाटपांडे

एबीपी माझावर दुपारी व्हॅटवर कार्यक्रम लागला होता. रात्री ११ वाजता परत लागणार आहे.

इथे काही मदत मिळते आहे का ते पहा:--- www.flatvat.com

वेताळ's picture

7 Nov 2012 - 7:56 pm | वेताळ

तुमच्या विकसकाने भरावा असे सरकारने सुचवले आहे. मुळात त्याने सरकार ला तुमच्या सदनिकेची किंमत किती दाखवली आहे ते तपासुन घ्या. कारण किंमत सरकार ला कमी दाखवुन तो तुमच्या कडुन ज्यादा पैसे उकळु शकतो.

वेताळ's picture

7 Nov 2012 - 7:56 pm | वेताळ

तुमच्या विकसकाने भरावा असे सरकारने सुचवले आहे. मुळात त्याने सरकार ला तुमच्या सदनिकेची किंमत किती दाखवली आहे ते तपासुन घ्या. कारण किंमत सरकार ला कमी दाखवुन तो तुमच्या कडुन ज्यादा पैसे उकळु शकतो.