मध्यपुर्वेत असताना (तेव्हाच्या)आम्हा बॅचलर लोकांच मधल्या वेळेतलं खाणं म्हणजे शवर्मा(शोरमा). स्वस्त आणि मस्त. तेव्हा व्हेज शवर्माच्या वाटेला जरी फारसा जात नसलो तरी मला फलाफील फार आवडायचे. नुसते फलाफील आणि सोबतीला डीप म्हनुन हमुस बस, एका बैठकीत ७-८ रिचवले की पोटभरू काम व्हायचं.
साहित्य :
ताहिनी सॉससाठी.
अर्धी वाटी ताहिनी.(तिळाची पेस्ट)
लिंबाचा रस.
३-४ लसणाच्या पाकळ्या.
थोडीशी पार्सली.
मीठ चवी नुसार.
फलाफीलसाठी.
१ वाडगा काबुली चणे (रात्रभर भिजवलेले.)
१ मोठा कांदा.
२ हिरव्या मिरच्या.
बचकाभर पार्सली.
२ मोठे चमचे मैदा.
१ मोठा चमचा भाजलेल्या जीर्याची पुड.
१ मोठा चमचा काळीमिरी पुड.
मीठ चवी नुसार.
तळण्यासाठी तेल.
कृती :
एका भांड्यात ताहिनी आणि लिंबाचा रस फेटुन घ्यावा. प्रवाहीपणासाठी गरजे नुसार पाणी घालावे.
लसुण आणि पार्सली बारीक चिरुन टाकावे. चवी प्रमाणे मीठ घालावं
हा झाला सॉस तयार.
आता फलाफील.
काबुली चणे, कांदा, मिरच्या, पार्सली सगळं फुडप्रोसेसरमध्ये घालुन भरड वाटावं. (फुडप्रोसेसर नसल्यास मिक्सर ही चालेल पण अगदिच पीठ होणार नाही याची काळजी घ्यावी.)
नंतर त्यात मैदा, जीरे-काळिमीरी पुड आणि मीठ टाकुन एकत्र करावं.
तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करावे. मंद आचेवर तेलात सोनेरी रंगावर तळुन घ्यावे.
हे फलाफील नुसतेच हमूस सोबत चापता येतील.
जर घरात खूबूस/पीटा ब्रेड असेल तर व्हेज शवर्मा बनवायला वेळ नाही लागायचा.
शवर्मा :
खूबूस / पीटा ब्रेड.
फलाफील.
लेट्युस, टॉमेटो चिरलेले.
ताहिनी सॉस.
फ्रेंच फ्राईज.
खूबूस / पीटा ब्रेड अर्धवट उघडुन घ्यावा. २-३ फलाफील कुस्करुन घ्यावे. टॉमेटो, लेट्युस फ्रेंच फ्राईजचे तुकडे करुन ते घालावे. वरुन ताहिनी सॉस घालावा आणि त्याचा रोल करुन सर्व्ह करावा.
हे गरम गरम असताना खाण्यातच मजा.
प्रतिक्रिया
1 Nov 2012 - 4:23 pm | मदनबाण
मस्त ! :)
फ्रेंच फ्राईज मला लयं आवडतं ! :)
ते फलाफील का फलाफल ? एकदा-दोनदा खाल्ल व्हतं म्या...
1 Nov 2012 - 4:31 pm | Mrunalini
वा... खुपच छान.. मला फलाफल हा प्रकार खुप आवडतो.
1 Nov 2012 - 4:49 pm | कच्ची कैरी
मस्त ! तोंड लाळावले ,पाणावले !!! फलाफल आधी करुन बघितले आहे पण आता तुमच्य रेसेपिप्रमाणे शोरमा करुन बघितला जाईल :)
http://mejwani.in/
1 Nov 2012 - 5:29 pm | पैसा
वाचले.
1 Nov 2012 - 5:33 pm | बॅटमॅन
आयला गणपाभौ तुम्ही पट्टीचे बल्लव आहात ब्वॉ!!
1 Nov 2012 - 5:46 pm | बाळ सप्रे
खूपच छान !
पण हा खबुस / पिटा ब्रेड कुठे मिळेल ?
1 Nov 2012 - 5:52 pm | बाळ सप्रे
ताहिनी सॉस पांढरा असल्याने दिसत नहिये? की प्लेट खरच रिकामी आहे? (फोटो क्र. ५)
1 Nov 2012 - 6:04 pm | प्रचेतस
जबरी.
फलाफील नाव बघून आधी फळांपासून तयार केलेले डेझर्ट असावे असे आधी वाटले होते.
1 Nov 2012 - 6:08 pm | बॅटमॅन
कल्याणीनगर येथे मरकेश नामक येका हाटलात हा पदार्थ उत्तम मिळतो.
1 Nov 2012 - 6:20 pm | प्रचेतस
जाउयात खायला राव.
1 Nov 2012 - 6:24 pm | बॅटमॅन
जरूर, पण फालाफेल सोडले तर व्हेजवाल्यांसाठी जास्त असे काही नाही तिथे, सामिष आहे सगळे जवळपास :)
7 Jan 2013 - 11:51 pm | मोदक
अरे रे रे रे..
वाल्गुदेया,
तुला त्या मुक्या प्राण्याच्या डोळ्यातील भिती आणि मरताना होणार्या वेदना दिसत नाहीत का रे? इथे तुम्ही कुणाची तरी हत्या करून मिटक्या मारत त्याच्या शरीराला खाता, त्याचे निर्दयपणे वर्णनही करता..
हे असले सगळे पाहून लोकांच्या मनाला क्लेष पोहोचतात, ते दु:खी होतात.. आणि त्यांचे दु:ख मिपावरच्या धाग्याच्या रूपात बाहेर पडते. जरा खोदकाम कर पाहू, नक्की काहीतरी मिळेल तुला.
मांसाहारी - मोदक. :-D
8 Jan 2013 - 12:17 am | बॅटमॅन
ही ही हा हा हा हा......खोदकाम केले अन प्रमाण दिसलेसुद्धा =))
बाकी आमच्या डीएने मध्येच रक्तपिपासूपणा आणि नॉनव्हेजगिरी आणि स्थितप्रज्ञता लिहिली आहे त्याला काय करणार?
स्थितप्रज्ञता अशासाठी, की स्वयं श्रीकृष्णाने सांगितले आहे :-
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी |
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुने:||
जेव्हा सर्व प्राणिमात्र झोपलेले असतात तेव्हा तो जागतो आणि जेव्हा बाकीचे जागतात तेव्हा त्याची रात्र असते =)) =))
8 Jan 2013 - 4:54 am | Nile
आमच्या श्रीकृष्णानं मला एकदा सांगितलं होतं त्याला बिपीओवाला म्हणतात. ;-)
(आमचा कुळकर्ण्यांचा श्रीकृष्ण हो, फार आचरट आहे बेणं!)
8 Jan 2013 - 7:11 pm | बॅटमॅन
कुलकर्ण्यांचा होय, मला तर ब्वॉ यादवांच्या कृष्णानं सांगितलं होतं ;)
1 Nov 2012 - 6:21 pm | मी_आहे_ना
जबरी पाकृ. आणि नेहमीप्रमाणेच छान सादरीकरण.
विमान-नगर(पुणे)'फिनिक्स'मॉल मधे आहे एक फूड आऊटफूड, तिथे 'ड्रॅगन फायर' (हॉट) फलाफिल जबरी मिळतो.
1 Nov 2012 - 6:33 pm | अत्रुप्त आत्मा
बोंबला....
वाइट भूक पेटली राव गंपादादाच्या पोश्टीनी ;-)
आज दिल्ली किचनला जावं लागणार... :-)
1 Nov 2012 - 7:19 pm | रेवती
मस्त रे! फलाफल आणि हमस हे एका रेस्टॉरंटात खाल्ले, एकदाच. आवडले पण दोन फलाफलचे गोळे सकाळी ११वा. खाल्ल्यावर रात्रीपर्यंत आज्याबात भूक लागली नव्हती आणि सारखी झोप येत होती. नंतर मैत्रिणीनं सांगितलं की असं फूड खाऊन मस्त ताणून द्यायची असते. ;) व्हेजाहारींसाठीची पाकृ पाहून भरून आले.
2 Nov 2012 - 2:29 am | प्रभाकर पेठकर
मस्त चविष्ट पाककृती.
पण फिलाफिल वेगळं आणि शवार्मा वेगळा.
फिलाफिल मध्ये वरील प्रमाणे जिन्नस असून त्याचे वडे तळलेले असतात. थोड्याफार फरकात पांढर्या चण्यांबरोबर ब्रॉड बिन्स (डबल बी?) आणि पार्सलीच्या सोबत मुळ्याची पाने घालूनही बनवितात.
'शवार्मा' हा मांसाहारी पदार्थ असून त्यात चिकन किंवा मटण एका उभ्या सळईवर लावून भाजलं जातं आणि त्याचा सर्वात वरचा थर खरपूस भाजला गेला की मोठ्या सुर्याने तासला जातो आणि ते तासलेले मांस जरा बारीक करुन पीटा ब्रेड (खाबुस्)मध्ये इतर जिन्नसांबरोबर भरून त्याची गुंढाळी करून ते सँडविच म्हणून दिले जाते.
'शवार्मा' हा तुर्की शब्द असून त्याचा अर्थ साधारणपणे, 'फिरवून भाजलेले मांस' असा आहे.
फिलाफिल किंवा शवार्माची खरी चव उपभोगायची असेल तर बटाटा चिप्स टाळाव्यात असे माझे व्यक्तिगत 'चव-मत' आहे.
2 Nov 2012 - 12:15 pm | गवि
गोव्याला कोळवा बीचवर संध्याकाळी रिक्षा कन्व्हर्ट करुन त्याचाच गरमागरम शवार्मा देणारा स्टॉल बनवून लावला जातो. गोव्यातल्या मिपाकरांना ठाऊक असेलच. शिवाय पर्यटकांच्या नजरेतूनही सुटला नसेल.
लांबुडक्या ब्रेडमधे ते रसरशीत चॉप्ड मसालेदार चिकन भरतात. हॉटडॉग रोल शेपच्या त्या ब्रेडला रोटी सारखा ऑप्शनही असतो.
फलाफिल ही पाककृती आवडली. धन्यवाद गणपाभाऊ..
2 Nov 2012 - 1:08 pm | गणपा
अगदी बरोबर काका. खरतर मी आधी चीकन शवार्माचीच पाकृ टाकणार होतो पण म्हटलं अलीकडेच एका कोंबडीला सद्गती देउन झाली आहे, तेव्हा थोडं थांबावं. ;)
खाली गविने दाखवल्या प्रमाणे शेगडी घरी घेणं शक्य नाही आणि माझ्या सारख्यांना शवार्मा आसपास उपलब्ध नाही. तेव्हा घरच्या घरी करायचा झाल्यास कसा करता येईल याचा प्रयोग केलाय.
लुक्स नसले तरी चव उत्तम जमली होती. मिपाकरांच्या पसंतीला उतरतो का? ते कळेल लवकरच. :)
अस आहे होय. आजवर जितके वेळा खाल्लाय दर वेळी आत बटाटा होताच. (बहुतेक आपल्या कोंबडी/मटण रस्स्यामध्ये असतो तसा पुरवठा म्हणुन बटाटा टाकत असतील लेकाचे. ;))
मे बी नेक्स्ट टाईम असही करुन पाहीन.
2 Nov 2012 - 2:07 pm | प्रभाकर पेठकर
नो प्रॉब्लेम. अरे, ती उभी शेगडी म्हणजे 'स्ट्रिट फुड' चा 'शो' आहे. बाकी आपल्या बार्बिक्यूवरही अगदी तस्साच परिणाम साधता येईल. हाडे विरहीत चिकन मंद आंचेवर क्रिस्प शिजवणे महत्त्वाचे.
2 Nov 2012 - 2:16 pm | गवि
त्या मधल्या शाफ्टच्या प्रचंड वेगाने गरागरा फिरत राहण्याने ते चिकन करपत नाही असं माझं मत होतं. बारबेक्यूवरही तोच परिणाम साधला जाईल हे वाचून घरी बनवण्याची आशा जागृत झाली... :) फक्त ते गरागरा फिरवायचं कसं हा प्रश्न आहे.
2 Nov 2012 - 2:45 pm | इरसाल
पाहिलेल प्रचंड वेगाने फिरत नव्हत तर हळुवारपणे फिरत होतं.
दुसरे असे की केरळ सरकारने ह्या प्रकारालाच आता बंदी आणली आहे.
2 Nov 2012 - 2:48 pm | गवि
त्याचा स्पीड मधेच हळू आणि मधेच मिक्सरप्रमाणे गरागरा असा फास्ट होत असतो असं दिसलं. वर फोटोतही ते दिसतंय (खालून दुसरा फोटो हलल्याने धूसर आलेला नसून तो त्या शिगेचा फिरण्याचा स्पीड आहे...) मधेमधे थांबलेलंही दिसतं.
एनीवे.. केरळात बंदी का बोवा? बरा असतो की पदार्थ.. केरळ सरकारचं काय घोडं मारलंय या पदार्थाने? की तिथे घोडं मारुन त्याचंच करतात? ;)
3 Nov 2012 - 5:36 pm | इरसाल
घोड्याचं माहित नाही पण सरप्राईज गवर्नंमेंट व्हिजीटमधे हायजीन पातळीवर हे रोड साईड दुकानदार खरे उतरले नाहीत. काहीतरी सिरीयस इश्शु झाला मग बंदीच आणली.
सेम प्रकार स्विस आणी इटलीमधे खाल्ला आहे दोन्ही ठिकाणी हिटींग इलेमेंट पुर्ण रॉड्च्या उंचीचा होता व शाफ्ट अतिशय हळुवाररित्या फिरत होते ते ही चिकन न जळता बाकी त्या रॉडला लटकवलेल्या चिकनलाच काही मसाला चोपड्लेला होता त्यामुळे ते अतिशय चविष्ट लागत होते. ६/८ युरोत/स्विस फ्रँक(इटली/स्विस) एक फलाफल, फ्रेंच फ्राइज, कोल्डड्रिंक.
3 Nov 2012 - 5:28 pm | प्रभाकर पेठकर
माझ्या बघण्यातली सर्व शवार्मा शाफ्ट हे हाताने हळूवारपणे, आपल्या मर्जीनुसार, चिकनचा वरचा थर शिजला की, फिरवायचे होते. पुण्यात मी सिम्बॉयसिस कॉलेजचे कँटीन चालवित असताना स्वत: विकत घेतलेले शवार्मा मशीनही हाताने फिरवायचे होते. असो. कदाचित, बाजारात दोन वेगवेगळी यंत्रे उपलब्ध असावित.
3 Nov 2012 - 5:55 pm | गणपा
असेच म्हणतो.
शक्यता नाकारता येत नाही.
2 Nov 2012 - 6:55 am | स्पंदना
अहो या फलाफलवर तर आम्ही दिवस काढतो. बाहेर जाउन नॉनव्हेज खाण आवडत नाही माझ्या घरी. मग हे फलाफल रॅप किंवा तसेच नुसते फलाफल.
बाकि रेसेपी फारच छान. फोटो तर सुरेखच.
2 Nov 2012 - 11:39 am | सुहास..
हुच्च !
2 Nov 2012 - 12:36 pm | नगरीनिरंजन
नेहमीप्रमाणेच झकास!
चला आता परत अरब स्ट्रीटवर जाणे आले!
3 Nov 2012 - 1:35 pm | जयवी
अरे...... ये तो हमारे इलाकेवाला है.
फिलाफिल आणि शवरमा आमचे पण अतिशय आवडते आहेत.
3 Nov 2012 - 1:43 pm | सोत्रि
देवा,
पुढच्या जन्मी, मला गणपाची बायको बनव किंवा गणपाला स्त्रीचा जन्म देऊन त्याला माझी बायको बनव!
-(तोंडभर लाळ जमा झालेला*) सोकाजी
*पाककृतीने
3 Nov 2012 - 2:00 pm | मृत्युन्जय
पुढच्या जन्माच्या बाबतीत अजुनही काही ऑप्शन्स शक्य आहेत. शेवटी प्रश्न खाण्याचाच असेल तर काय फरक पडतो, नाही का?
देवा मला कुठल्याही जन्मात गणपाचा मित्रच बनव. हा पण ते टेसदार (व्हेज) खाणे त्याने रोज खिलवावे असे काही बघ ;)
5 Nov 2012 - 1:02 am | स्वाती दिनेश
छान आहे रे पाकृ!
अवांतर-येथे तुर्की इंबिसमध्ये (छोटी टपरीसदृश्य हाटेल)फलाफल, शोरमा आणि डोनियर केबाप (कबाब?)मस्त मिळतात.
स्वाती
5 Nov 2012 - 1:40 am | प्रभाकर पेठकर
डोनियर केबाप (कबाबंच.), डोनर, शवार्मा, शोरमा हे सर्व एकच आहे, उच्चार वेगवेगळे. ह्याचा उगम तुर्कस्थानी भाषेत आणि खाद्य संस्कृतीत आहे. आखाती प्रदेशात सर्वत्र उपलब्ध असून इथल्या खाद्यसंस्कृतीतही शवार्माला मानाचे स्थान आहे.
7 Jan 2013 - 4:36 pm | केदार-मिसळपाव
ड्योनर केबाप...वा वा वा... एकदम भूक लागली... आहो फारच चविष्ठ आहे..माझे अतिशय म्हणजे अतिशय लाडके जलद-अन्न (फास्ट-फूड) आहे (होते) हे. विद्यार्थी दशेत हे अगदी स्वस्त आणि पोटभर पुरायचे मला म्हणून दिवसातून किमान एका ताव मारायचो.. सध्या मात्र घास-फूस किंवा (शाकाहारी ड्योनर) खावून रहावे लागत आहे (तेव्हडाच जेवणात थोडा बदल म्हणून).
5 Nov 2012 - 1:26 am | जागु
नेहमीप्रमाणेच छान.
5 Nov 2012 - 11:52 am | llपुण्याचे पेशवेll
उसात फलफल राईस खाऊन अनेक दिवस ढकलले होते ते आठवून गेले. पण माझ्या सारख्या गवताळ लोकांसाठी हा एक चांगला पर्याय होता.
7 Nov 2012 - 10:15 pm | प्रास
धागा वाचला.
फोटो पाहिले.
8 Nov 2012 - 1:40 am | रेवती
आज माझ्या नवर्याच्या हापिसात बाहेरून जेवण आलं होतं (म्हणे). शाखारींसाठी पिटात गुंडाळून हा पदार्थ आला होता (म्हणे).
12 Nov 2012 - 3:43 pm | विलासराव
सध्या रोजच खायचा योग आहे.
पण रोज खात नाहीये.
पण हा पदार्थ मला आवड्ला.
15 Nov 2012 - 2:43 pm | ऋषिकेश
बल्लावाचार्यांनी कुर्निसात स्वीकारावा!
१. बाकी तिळाची पेस्ट घरी करता येईल का? कशी? का भारतात बाजारात मिळेल?
२. पिटाब्रेडला काही पर्याय?
३. पार्सली ऐवजी कोथिंबीर चालेल का? :) तेवढेच १-२ तास आणि भरपूर रुपये वाचतील (म्हणजे मॉलमध्ये पार्सली मिळेल पण तिथे गेलं की "अग्ग बै, हे बघ काय नवीन मस्त आलंय? घेऊयात?" अश्या प्रश्न कम -म्हणजे हिंदीतला कम- आदेशामुळे <विनाकारण> जाणारे रुपये आणि बिलिंगच्या रांगेत <वाया> जाणारा वेळ वाचवायचा प्रयत्न.. कदाचित क्षीण ;) )
7 Jan 2013 - 10:41 pm | श्रिया
नेहमीप्रमाणेच एक रंगतदार रेसिपी.
8 Jan 2013 - 4:57 am | Nile
च्यायला.. आता काहीतरी चमचमीत खायला मिळेल असं हाटेल शोधावं लागणार..
21 Aug 2024 - 11:40 am | Bhakti
अहाहा!!मस्त फोटू!