मदत हवी आहे...

पाटव's picture
पाटव in काथ्याकूट
30 Oct 2012 - 12:27 pm
गाभा: 

समस्त मिपाकार मित्रहो,

अश्विन शुध्द पक्षी प्रतिपदेच्या (घटस्थापनेच्या) मुहुर्तावर आमच्या येथे मुलगी जन्माला आली आहे. आता बारसे करावे लागणार तर नाव ठरवावे लागेल ना! मग इथे मिपावर नाही येणार तर कुठे जाणार? तर मदत हवी आहे मुलीचे नाव ठरवण्यासाठी (नावे ठेवण्यासाठी नाही)

नावाबद्दल अपेक्षा
१. नाव शक्यतो नव्हे मराठीच हवे
२. साधे, सोपे, सुटसुटीत असावे
३. स्वाती नक्षत्र आणि तुळ रास आहे

तर टंकताय ना?

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

30 Oct 2012 - 12:39 pm | चिरोटा

राशीवरून नावाचे पहिले अक्षर ठरते. रास कुठली?

चिरोटा's picture

30 Oct 2012 - 12:42 pm | चिरोटा

तूळ रास म्हणजे नाव र किंवा त पासून हे कळले. हे घ्या.
http://www.bachpan.com/Hindu-Tula-Rashi-Names-Girls.aspx

पुण्याचे वटवाघूळ's picture

30 Oct 2012 - 1:19 pm | पुण्याचे वटवाघूळ

तूळ रास म्हणजे नाव र किंवा त पासून हे कळले.

त वरून सुरू होणारे तनीशा नाव कसे वाटते?

चिगो's picture

30 Oct 2012 - 1:31 pm | चिगो

हे बघा की..

नावाबद्दल अपेक्षा
१. नाव शक्यतो नव्हे मराठीच हवे

म्हणून तर लोचा आहे,कारण हिंदू नावे मिळतील भरपुर, पण "मराठीच" म्हटल्यावर रमा, तुळजा, रुक्मिणी एवढ्यातच गाडं अडलं, माझ्यापुरतं तरी..

पुण्याचे वटवाघूळ's picture

30 Oct 2012 - 1:40 pm | पुण्याचे वटवाघूळ

म्हणून तर लोचा आहे,कारण हिंदू नावे मिळतील भरपुर, पण "मराठीच" म्हटल्यावर रमा, तुळजा, रुक्मिणी एवढ्यातच गाडं अडलं, माझ्यापुरतं तरी..

अरे हो की. आमच्या ऑफिसात अगदी सदाशिव पेठेतल्या दोन तनीशा आहेत तेव्हा हे नाव मराठीच वाटले मला :(

पाटव's picture

30 Oct 2012 - 2:19 pm | पाटव

हिंदु चालेल पण ते पंजाबी नको राव... लय वैतागलोय त्या नावांना...

राशीच्या अक्षरावरुन नावं ठेवण्याचे काही फायदे आहेत काय?

पाटव's picture

30 Oct 2012 - 2:25 pm | पाटव

पण ज्यांचा अभ्यास असतो अश्या विषयांचा ते विचारु शकतात म्हणुन आधीच सांगितले...

प्रकाश घाटपांडे's picture

30 Oct 2012 - 2:54 pm | प्रकाश घाटपांडे

राशीवरुन जन्मनाव ठरवतात. पण जन्मनाव लक्षात राहते व राशी लक्षात राहत नसत. म्हणुन जन्मनावावरुन राशी ओळखली जायची.

गणपा's picture

30 Oct 2012 - 2:57 pm | गणपा

धन्स पकाकाका.

धन्स ! आता हे rational बर्‍याच ठिकाणी वापरता येईल...

प्रकाश घाटपांडे's picture

30 Oct 2012 - 3:08 pm | प्रकाश घाटपांडे

अधिक माहिती ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी प्रश्नोत्तरातून सुसंवाद मधे http://mr.upakram.org/node/806 प्रश्न क्रं ५ पहा

ह भ प's picture

30 Oct 2012 - 8:49 pm | ह भ प

रश्मिका कसं वाटतयं??

साधं, सोपं, सुटसुटीत, प्रचलित नाव ठेवा अशी विनंती. फारच अनवट, एकमेवाद्वितीय, लांबलचक आणि जडजंबाल नाव ठेवलं की मुलाला / मुलीला पुढे सगळीकडे एका विचित्र प्रतिक्रियेला सामोरं जावं लागू शकतं. ग्लोबल वातावरणात पोरं पुढे कोणत्या देशी नशीब काढायला जातील माहीत नाही. तिथे त्यांचं नाव म्हणजे टंग ट्विस्टर ठरु नये.

प्रत्येक फोनवर "आँ?" "कुड यू प्लीज रिपीट?" "सॉरी.. कुड यू प्लीज स्पेल इट आउट.." असं ऐकावं लागू नये, म्हणून राधा, रिया, ऋता (अक्षर अवघड असलं तरी उच्चार सोपा), राणी, रसिका, रती, रुची अशी तीन किंवा त्याहून लहान अक्षरी नावं द्या.

कुंडलीवरुन / राशीवरुन आद्याक्षर फिक्स करुन मग नाव देण्यात खरा अर्थ नाही, मनाला आवडलेलं नाव ठेवलं तर खरा आनंद मिळतो.

..पण यात पुन्हा आपापल्या विश्वासाचा भाग आला.

पाटव's picture

30 Oct 2012 - 2:34 pm | पाटव

:)

गणपा's picture

30 Oct 2012 - 2:35 pm | गणपा

कुंडलीवरुन / राशीवरुन आद्याक्षर फिक्स करुन मग नाव देण्यात खरा अर्थ नाही, मनाला आवडलेलं नाव ठेवलं तर खरा आनंद मिळतो.

एक्झॅक्ट्ली.

- पॅट्रीक

>>प्रत्येक फोनवर "आँ?" "कुड यू प्लीज रिपीट?" "सॉरी.. कुड यू प्लीज स्पेल इट आउट.." असं ऐकावं लागू नये,

सहमत !!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Oct 2012 - 4:03 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आपण नाव ठेवावे ते आपल्यासाठी. उगाच पुढे मोठे झाल्यावर फलाण्या माणसाला आपले नाव घेता येणार नाही या भीतीने सोपे नाव ठेवावे हे काही खास पटले नाही. तसेही फोरीनरांना आपली साधी साधी नावे पण घेता येत नाही. माझे जोडाक्षर विरहित नाव अनेकांना घेता येत नाही.

राशीवरून आद्याक्षर ठरवण्याबद्दलच्या मताशी सहमत.

आपल्या नावाचा पुरेपूर आनंद मिळत असेल तर सत्यकाम जाबाल हे नावही ठेवायला हरकत नाही रे. फक्त लोकांच्या पुन्हापुन्हा होणार्‍या पृच्छा, हरजागी संदर्भ सोडून नावाचे अर्थ किंवा स्पेलिंग विचारलं जाणं, नावाचे चित्रविचित्र उच्चार, या सर्वांनी आपल्या डोक्याला हेडॅक होत नसला आणि आपण खूष असलो तर जरुर ठेवावं कितीही अनवट नाव.

फक्त स्वतःच्या नावाविषयी हा विचार करण्याइतकी समज आणि हक्क त्या पाळण्यातल्या लहानग्याला नसते. माझं नाव "डिंकू" ठेवा असं प्रत्यक्षात तो सांगू शकत नाही. मात्र नंतर त्याच्या "समीहन" किंवा "याज्ञवल्क्य" नावाचा अर्थ, उच्चार आणि इतिहास समजवायला आईबाबा सर्वत्र येणार नसतात इतकंच.

अरे स्वाती नक्षत्र आहे ना? मग स्वाती हेच नाव ठेवा की! तुम्हाला हव्या असलेला राशीच्या नावाचा 'त' येतो त्यात.

जेनी...'s picture

30 Oct 2012 - 9:14 pm | जेनी...

रती .

शुचि's picture

30 Oct 2012 - 11:41 pm | शुचि

नको ग .... सुमती बरं त्यापेक्षा.

जेनी...'s picture

31 Oct 2012 - 12:18 am | जेनी...

अगं मग रास बदलतेय ना ....

बरं मिथ्या ,शाल्वी ,शैली , नीरा , निलांशी ..

मीरा बेस्ट :)

पुष्करिणी's picture

30 Oct 2012 - 9:18 pm | पुष्करिणी

रमा नाव छान आहे. सोपं, मराठी आणि शिवाय लक्ष्मीचं नाव, घटस्थापनेला जन्म झालेल्या कन्येला अगदी मस्त.

मला रमा नाव फार आवडते पण जुनं वाटतं ग.

राशीवरून जन्म नाव ठेवायचं आणि कागदोपत्री तुमच्या आवडीचं ठेवा. हाकानाका
(मी पण तूळ रास आणि स्वाती नक्षत्र वालाच आहे. जन्म नाव त वरूनच आहे :))

दुर्गा/क्षमा/शिवा/धात्री ? ;)

शुचि's picture

30 Oct 2012 - 11:31 pm | शुचि

स्वधा / स्वाहा नको का? ;)

मुलाचे "आहूत" हे नाव माझ्या आवडीचे आहे. पण तुम्ही तर मुलीचे नाव विचारता आहात मला "आकांक्षा" नाव आवडते. त्यात उमेद आहे स्वप्न आहे.

आहूत असे नाव असलेल्या मुलाला सगळे अनाहूतपणे सल्ले देत असतील नै ;)

Pearl's picture

30 Oct 2012 - 11:35 pm | Pearl

अजून काही नावं,
रमा, अनुजा, तनया, तनुजा, सई, सायली, जुई, सान्वी, अनया

श्रीरंग_जोशी's picture

31 Oct 2012 - 12:08 am | श्रीरंग_जोशी

सुटसुटीत नावे आवडली.

अवांतर - कुंडली, पत्रिका वगैरे प्रकार स्वतःपुरते थांबवावेत असे कुणाला वाटते का? मी कधीच थांबवले आहेत अन पुढेही तेच धोरण जोमाने चालवायचे आहे. सदर धाग्याचे अवाजवी विषयांतर होवू नये म्हणून अदृश्य स्वरूपात लिहितोय. ज्यांना कुणाला या विषयावर चर्चा करायची असेल त्यांनी खरडवहीतून संपर्क साधावा...

सोत्रि's picture

31 Oct 2012 - 6:40 pm | सोत्रि

ब्वॉर.. ब्वॉर...
रंगाराव नावाची शोधाशोध तुमचीही चालू झाली तर... ;

-(भोचक) सोकाजी

प्रभाकर पेठकर's picture

31 Oct 2012 - 2:22 am | प्रभाकर पेठकर

क्षमता, रेवा, रिमा, रिहा.

श्रीरंग_जोशी's picture

31 Oct 2012 - 2:37 am | श्रीरंग_जोशी

'क्षमता' हे नाव आपण प्रत्यक्षात पाहिले आहे का आजवर? मी तर प्रथमच ऐकतोय.
क्र. २ चे नाव मला फार आवडते ; आवडायला हवेच.

अत्यंत सुटसुटीत अन बहुधा आजवर मराठी व्यक्तीला नाव सुचवतो - 'अना', पश्चिमी लोक अ‍ॅना म्हणतील कदाचित.
पण इंग्रजी स्पेलिंग केवळ ३ अक्षरांत :-).

रंगा काका क्रमांक दोनचे नाव तुम्हाला प्राणापेक्षाहि जास्त प्रिय असेल नै ?? ;)

प्रभाकर पेठकर's picture

31 Oct 2012 - 2:12 pm | प्रभाकर पेठकर

'क्षमता' हे नाव आपण प्रत्यक्षात पाहिले आहे का आजवर?

होय. अशा नांवाच्या एका मुलीला मी प्रत्यक्ष भेटलो आहे आणि ओळखतोही. मलाही त्या नांवाचे अतिशय कुतुहूल वाटले होते.

गवि's picture

31 Oct 2012 - 2:25 pm | गवि

"क्षमता" यावरुन काही खत्रा नावं सुचली. धागाकर्त्यासाठी नव्हे, जस्ट अशीच मज्जा..

-घनता
-दक्षता (पोलीस टाईम्स नव्हे)
-विष्यंदिता
-लवचिकता
-तन्यता
-वारंवारिता
-चिकित्सा
-वास्तविकता

हॅ हॅ..

प्रभाकर पेठकर's picture

31 Oct 2012 - 2:41 pm | प्रभाकर पेठकर

गवि,

जस्ट मज्जे मज्जेत ९ मुलींना जन्म द्यावा लागेल.

नववीचे नाव "नवमी" ठेवावं की आणि काही असा विचार करतोय..

पाटव's picture

31 Oct 2012 - 2:50 pm | पाटव

विजया असे अपेक्षित नाही ;)

मृत्युन्जय's picture

31 Oct 2012 - 3:28 pm | मृत्युन्जय

नववी झाली तर तिचे नाव "सावधानता" ठेवा.

जरासी सावधानी जिंदगीभर आसानी. ;)

गुड्डू's picture

31 Oct 2012 - 3:43 am | गुड्डू

ऋचा
रक्षा
रिया
तनया

...................आणि हो अभिनंदन, अभिनंदन, त्रिवार अभिनंदन !

पाटव's picture

31 Oct 2012 - 10:21 am | पाटव

मंडळ आभारी आहे!!!

स्पंदना's picture

31 Oct 2012 - 6:03 am | स्पंदना

तुलिका.

बघा कस वाटतय.
मला विचाराल तर रमा हे अतिशय सुंदर, मनाला भावणार अन लक्ष्मीच नाव आहे. हाक मारुन पहा. "रमेऽऽ!" हे रागान, 'रमाऽऽ!" हे प्रेमान, "रमुटल्याऽऽ!" हे लाडान.

ज्ञानराम's picture

31 Oct 2012 - 9:53 am | ज्ञानराम

ज्ञानेश्वरी विद्या , शांभवी , केवल्या ( क वर दोन मात्रा - इथे टंकता आल नाही म्हणून )

पुजा ताई ( मिथ्या चा अर्थ खोटा असा होतो , म्हणून ते शक्यतो नको)

र आणि त वरुन शक्यतो खूप कमी नाव आहेत. वरील नावं मला भावली म्हणून तुम्हाला सांगितली आहेत.

इरसाल's picture

31 Oct 2012 - 9:57 am | इरसाल

हे डोरेमॉन मधल्या जियान सारखं दोन्ही हात डोक्यावर जोडुन स्वतःभोवती एक गिरकी घेवुन प्रेमाने म्हणतोय असे इमॅजिन करुन पहा बरं.

ज्ञानराम's picture

31 Oct 2012 - 9:58 am | ज्ञानराम

शूचि नाव पण खूप छान आहे. :)

द्यानुकाका मिथ्याचा अर्थ खरच माहित नव्हता वो :(

नकोच्च मिथ्या नाव थेवु:-/

आपण दुसल नाव शोदुया हं ! :-/

पाटव's picture

31 Oct 2012 - 10:22 am | पाटव

:)

सावकार स्वप्निल's picture

31 Oct 2012 - 10:15 am | सावकार स्वप्निल

'र' जर राशी तुळा साठी असेल तर,
आम्ही म्हणतो राशी हे नाव छान जमेल .

एवढ्या सगळ्या नावात अजुन काहि ..

रुचिरा , वॅरोनिका ,अहाना

पाटव's picture

31 Oct 2012 - 10:23 am | पाटव

वॅरोनिका ,अहाना

म्हणजे काय? अर्थ काय या नावांचा?

:(

वॅरॉनिका माझ्या एका कलिग च नाव आहे :(

मला आवडतं ते :) म्हणुन सांगितलं :(

अहाना नाव मी लंडन एअर्पोर्टवर ऐकलं होतं :) इकडे येताना मध्येच लंडनला दोन तासांचा हॉल्ट होता .
तेव्हा एअरपोर्टवर एका इंडीयन मुलीशी अशीच ओळख झाली होती . तिचं नाव 'अहाना ' होतं .
गोड होती दिसायला :)
अर्थ माहित नाहि :(
आता अर्थ विचारलात तर ...आमी नाय जाबाबा कट्टी :-/

श्रीरंग_जोशी's picture

31 Oct 2012 - 10:56 am | श्रीरंग_जोशी

वेरॉनिका ग्रीक देवीचे नाव आहे बहुधा.

अहाना - हेमा मालिनिच्या धाकट्या मुलीचे नाव आहे. दर वर्षी पुणे फेस्टिवल मध्ये येत असते ती आईबरोबर.

वेरोनिका लॅटीन नाव आहे. (पण अर्थ चान आहे, विजयश्री आणणारी. कुणाला?;))
मराठीच पाहिजे मग वरूणिका ठेवा.;)
आणि ईशाची बहीण आहना आहे? का अहाना?

जेनी...'s picture

31 Oct 2012 - 11:09 am | जेनी...

एहाना रे !

'ए हाना ' रे यांना कुणीतरी :-/

पोप्य्लोन's picture

31 Oct 2012 - 11:41 am | पोप्य्लोन

मुलीच नाव स्वाति ठेवा
स्वाती नक्षत्र हे स्त्रीया साथि फारच चान्गले आहे .
स्वाती नक्षत्रावर जन्म हा भाग्यकारक असतो.

स्वाती नक्षत्रावर जन्म हा भाग्यकारक असतो. खरेच? :)
का तो सुध्दा स्त्रियांचाच? :(

पाटव's picture

31 Oct 2012 - 12:04 pm | पाटव

मनुष्य जन्म मिळण्यास भाग्यच लागते... (नक्षत्र कुठले का असेना... पण काहींना ते कळत नसावे :()

अभ्या..'s picture

31 Oct 2012 - 12:30 pm | अभ्या..

हो एकदम सहमत :)
नायतर कुठले नक्षत्र आणि कुठले नांव?
ठेवा एखादे छानसे नाव जे तुमच्याच मनाला भावेल ते.

तूळ राशीतलाच स्वाती नक्षत्रातलाच
तानाजी ;) जन्मनाव असलेले
२८ वे नक्षत्र

पाटव's picture

31 Oct 2012 - 12:36 pm | पाटव

मुजरा घ्या...

अय्या :) , तुमची कन्या सुद्धा ' कला'कार होणार तर ! ;)

पाटव's picture

31 Oct 2012 - 5:34 pm | पाटव

आणि पुजाबाई, हा मुजरा शिवाजी महाराजांच्या "तानाजी" ला होता... कॄप्या वर पहा...

जेनी...'s picture

31 Oct 2012 - 6:02 pm | जेनी...

पाटव बूवा,
आणि माझी पोस्ट स्वाती नक्षत्रात जन्माला येणार्‍यांच्या विशेष कलागुणांवर होती.
क्रुपया समजुन घ्या . :)

पाटव's picture

1 Nov 2012 - 10:37 am | पाटव

गैरसमजाबद्दल क्षमा असावी... काय आहे ना सध्या मिपावर सौजन्य सप्ताह चालु अस्ल्याचा अमंळ विसर पडला होता !!! कळावे लोभ असावा...

जेनी...'s picture

1 Nov 2012 - 11:07 am | जेनी...

जाव माफ किया :D

कान्होबा's picture

31 Oct 2012 - 6:07 pm | कान्होबा

जे जन्मणार ते कुठले आणी कसे नक्षत्र आहे ते नंतर कळेल की

रागीणि .. ( कस सुचल नाही ब्वा कुणाला )
रूद्रा ( माझ्या ओऴखीतल्याच्या मुलीचे आहे .)
रेवती
रेखावती
रूप ( आठवा रूपकुवँर राठोड )
रेणुका

तन्मयी .
तनुश्री
तनुजा
तुळजा

बाकी अभिनंदन ! ..लक्ष्मी आली घरात :)

RUPALI POYEKAR's picture

31 Oct 2012 - 1:26 pm | RUPALI POYEKAR

रुता पण छान नाव आहे

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

31 Oct 2012 - 1:40 pm | निनाद मुक्काम प...

सध्या रमा नावाची चलती आहे.
अनिता , विभावरी , शामिष्ठा , देवयानी , ही काही माझी आवडती नावे

पाटव's picture

31 Oct 2012 - 2:54 pm | पाटव

रमा फार चलतीचे आहे... Zee Marathi क्रुपा???

तुम्हाला आवडेल ते नाव ठेवा.. एक सुचवू इच्छितो. नावात "क्षित" येईल असे नाव ठेवू नका, जसे की रक्षिता, अक्षिता इ. कारण की स्पेलिंगमध्ये 'शिट' येईल आणि आजकाल कार्टी लै इब्लिस असतात. पोरीला त्रास होईल.

अवांतर: माझ्या मुलीचे जन्मनावही र किंवा त वरुनच आले. मी "तेजस्विनी" ठेवलं.. नाव "नंदिनी", कारण मला खुप आवडलं..

पाटव's picture

31 Oct 2012 - 2:08 pm | पाटव

शिर साष्टांग दंडवत...

राही's picture

31 Oct 2012 - 2:42 pm | राही

राही,रूही,रोहना,रोचना,ऋचा,ऋजुता,ऋद्धी,रजता,राजसी,राखी,राधा
अनन्या,अनीता,अनाहिता(पारसी),अनुष्का,अनुपमा,असि,अस्मिता
समिधा,समीरा,श्रीकला,चित्कला,उत्पला,उत्तरा,इंदिरा
शर्वरी,शर्वाणी,शरयू,शुभ्रा,शुक्ति

शर्वरी,शर्वाणी,शरयू,शुभ्रा,शुक्ति
बर्‍याच दिवसांनी शुभ्राचे नाव ओठावर आले माझ्या ! ;)

अरे शहाण्या, शुभ्राचे नाव ओठावर यायचं तेंव्हा लगीन झालं नव्हतं तुझं. आता बाप झालास तरी हे उद्योग? ;)
मला राजसी हे नाव फार आवडलं. तसंच रिद्धी.

मदनबाण's picture

31 Oct 2012 - 7:14 pm | मदनबाण

अरे शहाण्या, शुभ्राचे नाव ओठावर यायचं तेंव्हा लगीन झालं नव्हतं तुझं. आता बाप झालास तरी हे उद्योग?
खी. खी.. खी... आज्जे ! तू पण ना ! ;)

dipak_borole's picture

31 Oct 2012 - 2:43 pm | dipak_borole

"तपस्या" कसे वाटते?

शुचि's picture

1 Nov 2012 - 12:50 am | शुचि

सुंदर.

ध्यानाला बसल्यागत वाटते .

सुर's picture

31 Oct 2012 - 3:27 pm | सुर

अमॄता कसे वाटते?

किंवा तेजस्विता कसे वाटते?

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2012 - 4:13 pm | अत्रुप्त आत्मा

प्रतिक्रीयांचा पाऊस पडलाय इथे ;-) अता या धाग्याला नाव ठेवायला सुद्धा जागा नाय उरणार ;-)

धाग्याला मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता, मिपाकर 'नावं' ठेवण्यात मागे नाहित याची खात्री पटली. ;)

पाटव's picture

31 Oct 2012 - 4:52 pm | पाटव

म्हणुन तर इथे आलो मदत मागायला! :)

पैसा's picture

31 Oct 2012 - 6:15 pm | पैसा

बरं, जिऊ, जिजा, सई, पुतळी, सिंधू, अंबा, सारजा, कितीतरी आहेत. अगदी म्हाळसा, मैना, यमू, चिमा, सगुणा, तुळसा नको असेल तरी तारा, रेशमा, राजस, दीपा, राही, रूपा कित्ती नावं आहेत!

रेवती's picture

31 Oct 2012 - 7:34 pm | रेवती

ऋषिका हेही नाव मला फार आवडायचं. पुण्यात आमच्या इमारतीत ती छोटी रहायची. तिचा लहान भाऊ तिला लुचीका म्हणायला लागल्यानंतर ते आवडेनासं झालं.

नर्मदेतला गोटा's picture

31 Oct 2012 - 11:30 pm | नर्मदेतला गोटा

आम्ही नावे सांगू पण तुम्ही ते खरेच ठेवणार आहात का ते सांगा
की न्यायालयाचा सल्ला मागायचा पण दिल्यावर मानायचाच असलानको व्हायला

हा लेख दिसायला हवा होता
http://www.misalpav.com/node/20133

नर्मदेतले गोटेसाहेब, इतकी नावे एका बाळाची कशी ठेवणार? प्रत्येक बाळाचे एक नाव ठेवायचे ठरवले तरी या धाग्यावरची पन्नासेक नावं ठेवायला इतकी बाळं होण्याची कल्पनाही धागाकर्त्यांना सहन होणार नाही.

पाटव's picture

1 Nov 2012 - 10:23 am | पाटव

:D

जेनी...'s picture

1 Nov 2012 - 10:24 am | जेनी...

=))

पाटव's picture

1 Nov 2012 - 10:41 am | पाटव

घेतली आहेत... त्यातही Shortlisting चालु आहे...
एक विशेष सुचना : आपण सुचवलेले नाव निवडले गेल्यास बारशाचे आमंत्रण दिले जाईल...

नवरात्रात झाली म्हणून - अनिका - देवीचे नाव आहे. सुटसुटीत आणि सोपे.
त वरून हवे असेल तर - तनिशा - जिच्या शरीरात इश्वराचे वास्तव्य आहे असा काहिसा अर्थ ऐकला होता.
र चे - रिमा, रमा , ऋजुता, राधा
इतर - गरिमा, सरस्वती, शलाका, स्वराली, अश्मिका, सानिका, प्रियंवदा

अनिका नाव पहिल्यांदा ऐकले आणि आवडले. असेच नवे नाव म्हणजे अन्विता.

नर्मदेतला गोटा's picture

1 Nov 2012 - 6:53 am | नर्मदेतला गोटा

आशा उशा लता मीना हृदया नलिनी सुमती गीता गितांजली
मधुरा मीरा(बोरवणकर) वैजयंती शारदा माधुरी अमृता रेवती रेवा कावेरी जया लीला इंदिरा
सुप्रिया सारीका शशिकला शकुन्तला राजश्री कविता बागेश्री (धाकटा भाऊ केदार हे ओघानेच आले)
मंदोदरी विनया राधिका उर्मिला सावित्री इरावती विमल सूर्यकांता वंदना प्रतिभा प्रतिमा
वैदेही(फ़ारच कॉमन) जान्हवी मैथिली रुक्मिणी लक्ष्मी लीलावती रागिणी विभावरी सुदेष्णा
माला मालती नीना नयना सुनन्दा सुरुचि सुनीती (अनकॉमन पण लोकन्ना आवडणारे)
श्रद्धा भक्ति विद्या जिजाई सई भवानी अस्मिता देविका नंदिनी कमला (सोवनी)दुर्गा (भागवत)
ललिता अभिलाषा स्वरांगी मृण्मयी शर्मिला शैला शैलजा पद्मावती वनमाला तनया यशोदा रोहीणी
देवकी मेनका सोनिया अंबिका ऋजुता सुकन्या शीला सुमित्रा

कान्होबा's picture

1 Nov 2012 - 10:38 am | कान्होबा

कुठ्लेतरी १ नाव ठेवा की कशाला उगाच किस पाड्ताय प्रतिक्रियांचा.
नावांची पुस्तके बाजारात मिळतात त्यात पहा.
नाव काय ठेवायचे यावर मदत करा हा काही एवढं चर्वण करायचा विषय आहे का त्यापेक्शा चांगले नविन विषय येउ द्या
उगाच मि पा ची २ पाने फुकट घालवीली

श्रीरंग_जोशी's picture

1 Nov 2012 - 10:43 am | श्रीरंग_जोशी

शतकाबद्दल श्री पाटव यांचे अभिनंदन.

आपल्या कन्येला अनेक उत्तम आशीर्वाद

पाटव's picture

1 Nov 2012 - 11:06 am | पाटव

पहीलाच धागा शतक करेल याची कल्पना नव्हती
तेही धाग्याचा काश्मिर न होता... ;)

नर्मदेतला गोटा's picture

1 Nov 2012 - 10:31 pm | नर्मदेतला गोटा

फुलांसारख्या मुलींसाठी
अबोली प्राजक्ता जाई निशिगंधा जुई पुष्पा

बाकी

सुलभा सुनयना सुचित्रा सुनेत्रा सुधा

झेलम गंगा भागीरथी जमुना यमुना पूर्णा

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2012 - 1:53 pm | प्रभाकर पेठकर

अबोली प्राजक्ता जाई निशिगंधा जुई पुष्पा

ती नांवाला साजेल अशी जन्मभर राहिली पाहिजे.

मी 'लता' नांवाची एक बाई पाहिली होती तिचं नांव खर तर 'पिंपळ' पाहिजे होतं. असो.

जेनी...'s picture

1 Nov 2012 - 10:38 pm | जेनी...

असो,

तर समस्त मिपा परिवाराची अशी इच्चा आहे कि
तुमच्या कन्येचे नाव ' रमा ' असावं .
ते न ठेवल्यास , इथे प्रतिक्रिया देण्याचे जे कष्ट आम्ही मिपा वासियानी
घेतलं त्याचा बदला म्हणुन , तुमच्या मुलीचे नाव काहिहि ठेवा ,
आम्हि तिला ' रमा' च म्हणु =))
( बास आता . पळायला पायजेल =)) )

अत्रुप्त आत्मा's picture

1 Nov 2012 - 11:28 pm | अत्रुप्त आत्मा

चला शंभरी भरली एकदाची,नावं ठेवता ठेवता,अता हा घ्या आमचा,

अरे हा तर माझाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. माझ्या मुलीला आता सव्वा महिना झाला २३ ऑगस्टला झाली पण अजुन आमचे नाव ठरत नाही. तिची रासही तुलाच आली आहे. १८ नोव्हेंबरला बारसे करायचे ठरवले आहे. तोपर्यंत नाव ठरवायचेच आहे. इथे खुप मदत होईल. धन्स पाटवजी हा धागा काढल्याबद्दल.

पाटव's picture

2 Nov 2012 - 10:35 am | पाटव

आणि सर्व मिपाकार मित्रांचे हार्दिक आभार!!! नामकरण झाले कि पुन्हा हा धागा वर काढुन नाव कळवले जाईल... व्यनिद्वारे नावे सुचविणार्‍या मित्रांचे देखिल जाहीर आभार!!!

तिलोत्तमा, रमा, रेवा, तारा, तारामती, रोचना, गार्गी, मैत्रेयी, अंभृणी, शची, शुचिस्मिता, स्वच्छतोया, ऋक्मवती, रुक्मिणी, इ.इ.

पाट्व्जी तुम्च्या कन्येचे नाव काय थेवले ते नाही सागितले. मी ही तुला रास आणि स्वाती नक्श्त्राची आहे. पण जन्म पोणिर्र्मेचा म्हणुन पुनम.