क्लू नंबर वन वॉज व्हेन यू नॉक्ड ऑन माय डोअर..
क्लू नंबर टू वॉज द लुक दॅट यू वोअर..
दॅट्स व्हेन आय न्यू इट वॉज अ प्रिटी गुड साईन..
समथिंग वॉज राँग अप ऑन क्लाऊड नंबर नाईन..
धुवांधार पाऊस पडत होता. कारच्या विंडशिल्डवरुन थळाथळा पाणी निथळत होतं आणि समोरचं काही दिसायला लागायच्या आत नव्या धारा बदबदून येत होत्या.
वेल इट्स लाँग वे अप अँड वुई वोंट कम डाऊन टुनाईट..
वेल इट मे बी राँग बट बेबी इट शुअर फील्स राईट..
ब्रायन अॅडम्सचं हे गाणं ऐकता ऐकता मी समोरच्या धापा टाकणार्या वायपर्सकडे बघत होतो..बर्याच कोरड्या दिवसांनी ताण दिल्यावर आता मात्र पाऊस असा काही आला होता की जसे भळभळून आलेले आनंदाश्रू.. आयला आवरतच नायत..
क्लाऊड नंबर नाईन.. नाईन.. नाईन.. गुणगुणता गुणगुणता आपोआपच असं झालं की मी तातडीने लोणावळ्याच्या "क्लाऊड नाईन" कडे जायचं ठरवलं.. आणि दुसर्या दिवशी तिथे धडकलो सुद्धा..
लायन पॉईंटच्या पुढे हा हिलटॉप रिसॉर्ट आहे. लोणावळ्यातल्या मरणाच्या ट्रॅफिक जामने मला जमिनीवर आणलं.. पण पुढे अंबे व्हॅली रोड पुन्हा नऊ नंबरच्या त्या जादुई ढगाकडे घेऊन जायला लागला. पाऊस इमानदारीत साथ देत होता..
धुकंही मधेच हलकं मधेच गडद.. ईश्वर मोठ्ठाले नि:श्वास टाकत असावा.
"क्लाऊड नाईन"ला पोहोचलो तेव्हा बाकीच्या ढगांशी शर्यत लावून त्यांना मागे टाकत आलो होतो. पण ते मागून मला गाठायला येताना दिसलेच..
सर्वात आधी पावसाला नेवैद्य दाखवणं आलं..
मग निवार्याची जागा.. आपली खोली कोणती त्याची खात्री करुन घेतलेली बरी असते. काय आहे की नंतर सापडायला सोपी जाते..
नजर के सामने एक रास्ता जरुरी है..
भटकते रहेने का भी सिलसिला जरुरी है..
कुठल्याही नव्या ठिकाणी गेलो की मी एक ठिकाण हेरुन ठेवतो. ते माझं ठिकाण.. मग तिथे असेपर्यंत वेगवेगळ्या वेळी त्या ठिकाणाचे रंगढंग बघत बसायचे. माझं ठिकाण पक्कं झालं. ही जागा माझी.
चर्र थंडीत तिथे बसून आता लांब शून्यात पाहात राहायचं. ब्रायन अॅड्म्स काही पाठ सोडणार नाही..
अँड देअर एंट नो प्लेस इआय वुड रादर बी..
अँड वी काण्ट गो बॅक बट यू आर हियर विथ मी..
द वेदर इज रियली फाईन.. अप ऑन क्लाऊड नंबर नाईन..
आता ही जागा नक्की वेगळी दिसेल.. प्रश्न फक्त वेळ बदलण्याचा आहे. आणि ती बदलेलच..
तोपर्यंत बघण्यासाठी इथे मला खूप मोठ्ठा कॅनव्हास आहे..
वेळ चालला.. हातात घड्याळ नसलं तरी वेळेची जाणीव सर्वच सेन्सेसना होतेय..
ठिकाणाचे रंग बदलताहेत. हिरव्याकरड्या शेड्स.. आणि एकदम धुवांधार पाऊस येऊन कॅनव्हास धुतला त्याने. मग सगळं क्षणभर स्वच्छ स्वच्छ..
मग पुन्हा एकदा शुभ्र रंगाचा ब्रश घेऊन रंगकाम सुरु.. शुभ्रांधळं होण्याचा भास.
ऑल दॅट आर लेफ्ट आर शेड्स ऑफ ग्रे..
रात्री थंडी बोचून अन ढोसून उठवायला लागली तेव्हा शेवटी उठून आपल्या निवार्याकडे जाऊ म्हटलं. पण आसमंत भारित झाला होता. ऑलरेडी स्वप्नातच असताना पुन्हा हॉटेलच्या खोलीत जाऊन झोपण्याची गरज काय? म्हणून मग तिथेच रेंगाळत राहिलो. हा खेळ मस्त होता. लहानपणी जसे बॉल आणि बॉलर दोघेही अंधारात दिसेनासे होईस्तोवर क्रिकेट खेळायचो त्यातलाच प्रकार.
ऐक.. मी तुला क्लाऊड नाईन गाणं म्हणून दाखवतो.. अर्धांगिनीला आणखी थोडावेळ या स्वप्नात ठेवण्यासाठी मी उपाय काढला.. गाणं पुढे चालू..आठवेल तसं..
सो बेबी टुनाईट लेट्स लीव्ह द वर्ल्ड बिहाईंड..
अँड स्पेंड सम टाईम अप ऑन क्लाऊड नंबर नाईन..वेल वी वोंट कम डाऊन टुनाईट..
नो वी वोंट कम डाऊन टुनाईट..
वी कॅन वॉच द वर्ल्ड गो बाय..
अप ऑन क्लाऊड नंबर नाईन...
सगळं धूसर दिसायला लागलं. वातावरण, वेळ आणि सूर.. खरंच खूप धूसर... पुन्हा अश्रू..?! आनंदाश्रू?
प्रतिक्रिया
18 Oct 2012 - 5:26 pm | आनन्दा
थीम आवडली!
18 Oct 2012 - 5:55 pm | तर्री
फोटो सुंदर ! निवेदनात ह्या वेळी माफक अपेक्षाभंग !
सपष्ट पणे -----
18 Oct 2012 - 6:03 pm | शैलेन्द्र
अॅब्स्ट्रॅक्ट.. छान रंगवलात.. अस क्लाउड नाईन वर रहायला नेहमीच आवड्त.. :)
18 Oct 2012 - 6:53 pm | रेवती
एकदम भारी! लेखन आणि छायाचित्रेही.
18 Oct 2012 - 7:04 pm | गणेशा
मानुस स्वताच स्वताशी बोलताना हे असे आता तसे असे जे बोलतो तसेच वाटले लेख वाचुन.
साधा सरळ मनामनाचा खेळ वाटला वाचताना.. तेच तेच चित्र वेगवेगळ्या क्षणी टिपलेले आ नि त्याबरोबरचे भाव मस्त वाटले..
लिहित रहा.. वाचत आहेच
18 Oct 2012 - 8:20 pm | सस्नेह
फोटो कानात छानशी गोष्ट सांगताहेत असं वाटलं.
18 Oct 2012 - 9:06 pm | सस्नेह
'फोटो कानात छानशी गोष्ट सांगत आहेत असं वाटलं.' असे वाचावे
18 Oct 2012 - 8:27 pm | प्रचेतस
सुंदर.
मोजकीच वाक्यं पण अगदी समर्पक.
18 Oct 2012 - 9:54 pm | मदनबाण
ओह्ह... असं काय ! ;)

मला वाटलं...
या एनर्जी ड्रिंक बद्धल लेख लिहलाय की काय... ;)
पावसाला नेवैद्य दाखवण्याची कल्पना आवडली. :)
19 Oct 2012 - 12:41 am | संजय क्षीरसागर
मुक्तक आवडलं.
हा क्लाऊड नाईन कुठे तरी हृदयात असतो आणि असा अचानक बेभान होऊन केंव्हातरी प्रकट होतो. आपल्याला स्वतःत वेढून घेतो आणि मग आपणच क्लाऊड नाईन होतो. जमीनीपासनं वेगळे होतो आणि आसमंतात वावरायला लागतो!
19 Oct 2012 - 1:01 am | श्रीरंग_जोशी
जरा हटके असलेला हा चित्रलेख आवडला.
अन त्यावर संजय यांचा वरील प्रतिसाद म्हणजे मोदकावर ओतलेले तूप!!
20 Oct 2012 - 5:27 pm | बॅटमॅन
मोदकावर तूप :D सुद्द तुपातील परतिक्रिया ;)
21 Oct 2012 - 12:25 am | श्रीरंग_जोशी
आयसिंग ऑन द केकचे मराठीकरण करण्याचा एक क्षीण प्रयत्न केला अन मिपाकरण करून बसलो ;-).
23 Oct 2012 - 9:49 am | लाडू
सहमत!
19 Oct 2012 - 12:47 am | वरुण मोहिते
माझं पण आवडीच ठीकाण आहे....पावसाळ्यात एकदा तरी चक्कर असतेच
19 Oct 2012 - 12:59 am | प्रभाकर पेठकर
सादरीकरण आणि छायाचित्र आवडली.
क्लाऊड नाईन म्हंटल्यावर मला वाटलं गवींमध्ये पुन्हा 'गगन विहारी' संचारला. पण अपेक्षाभंग झाला.
पण हरकत नाही, ही कल्पना, 'क्लाऊड नाईन' वरील 'लाऊड थिंकींग' आवडले.
छायाचित्रांमध्ये अजून जरा वैविध्य आवडले असते.
19 Oct 2012 - 2:38 am | नंदन
फोटो आणि स्फुट, दोन्ही मस्त.
19 Oct 2012 - 3:35 am | स्पंदना
बाकिचे सारे फोटो ढगात घेउन जाताहेत. तेव्हढा नैवैद्याचा फोटो तेव्हढा काळजात कळ उठवुन गेला.
19 Oct 2012 - 1:51 pm | मेघवेडा
आवडेश
19 Oct 2012 - 2:44 pm | मी_आहे_ना
मनातील विचारांचे (गविंच्या) शब्दांच्या जाळ्यात अडकणे आवडले... फोटो पण (नेहमीप्रमाणे) आवडेश.
19 Oct 2012 - 10:54 pm | प्रास
खूपदा हे गवि म्हणतोय तसंच होतं. एखादं गाणं, त्यातले शब्द आणि सूर असा काही परिणाम करतात की त्यातून उत्पन्न झालेली एक विशिष्ठ झिंग आपल्याकडून तदनुषंगाने काही कृती करवून घेते. ही प्रक्रिया गविच्या (टंचनिके)ने मस्तंच उतरवलीय.....
बाकी ब्रायन अॅडम्सचं 'क्लाऊड नं. ९' हे अशाच लायकीचं गाणं आहे, आपलंही फेव्हरिट....
19 Oct 2012 - 11:03 pm | पैसा
अप्रतिम!
20 Oct 2012 - 12:33 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
गवि, झक्कास वाटले.
एकदम फ्रेश झालो..
20 Oct 2012 - 6:27 pm | प्रेरणा पित्रे
फोटो आणि लेख नेहमीप्रमाणेच रिफ्रेशिंग!! :)
20 Oct 2012 - 11:45 pm | निनाद मुक्काम प...
चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारा मनाला तजेला देणारा सचित्र लेख.
कॉलेज च्या दिवसात शैक्षणिक सहल अशी घरी थाप मारून मित्र मैत्रिणी सोबत अश्याच एका ठिकाणी ....... आता तू नळीवर पुरानी जीन्स ऐकतो.
22 Oct 2012 - 10:00 am | वपाडाव
गवि, यु अगेन रॉक्ड...
फोटो सुरेख...
22 Oct 2012 - 12:24 pm | बिपिन कार्यकर्ते
:) :)
22 Oct 2012 - 12:59 pm | ५० फक्त
लई भारी फोटो गवि.
11 Jan 2013 - 5:05 pm | श्रिया
शब्दांत मांडलेल्या भावना आणि छायाचित्रे ह्यांची सुरेख सांगड!
12 Jan 2013 - 10:07 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
आधी ब्रायन अडम्स च्या गाण्याचं नाव वाचुन आलो होतो. फोटु लयं भारी आहेत. :)
12 Jan 2013 - 10:29 am | रणजित चितळे
आपला लेख वाचायच्या आधी मी फोटो न्याहाळले. रस्त्याचे फोटो पाहून वाटले हे बहूतेक फॉरेनला जाऊन आले आहेत, व म्हणून क्लाऊड नाईन वर बसलेत. ;-)
मग कळले लोणावळ्याला गेला होतात.
खूप छान, मस्त रंगलाय.
12 Jan 2013 - 10:49 am | डॉ सुहास म्हात्रे
एकदम मस्त विषय आणि खुपच सुंदर पेशकश ! फोटोही छान आहेत.
विशेषतः दुसरा फोटो अप्रतीम आहे आणि पावसाला नैवेद्य द्यायची कल्पना अतिशय आवडली.
12 Jan 2013 - 12:20 pm | मेघनाद
लेख वाचून क्लाउड ९ ला भेट देण्याची इच्छा झाली आहे.....अप्रतिम निसर्ग आणि छायाचित्रे सुद्धा