केरळ सहल

बंडा मामा's picture
बंडा मामा in काथ्याकूट
17 Oct 2012 - 10:00 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकर!
बर्‍याच वर्षांनी आम्ही (मामा आणि मामी) देशांतर्गतच एक सहल करण्याचे ठरवतो आहोत. सध्या केरळ हा भाग निश्चित केला आहे. पूर्वी कधी पाहिलेला नसल्याने आणि सुंदर चित्रे पाहुन हा निर्णय घेतला आहे. मिपाकरांपैकी कुणी केरळ सहल केली असल्यास खालील बाबतीत मार्गदर्शन करावे म्हणून हा धागा टाकत आहे. ह्या माहितीचा फायदा इतरही केरळ जाण्यास उत्सुक लोकांना व्हवा हा उद्देश आहे.

१. केरळ्ची सहल घडवणार्‍या चांगल्या ट्रॅवल कंपन्य कोणात्या? तुम्ही ट्रॅवल कंपनीमार्फत गेले असलास तुमचे अनुभव कसे अहेत?

२. ट्रॅवलकंपनी शिवाय जाणार्‍यांचे अनुभव काय?

३. आमचे बजेट ५०,०००/- रुपये आहे. ह्यामधे आरामदयी सुविधा देणारे प्याकेज मिळू शकते का? (आरामदायी = स्वच्छ ए/सी हॉटेले, एसी वाह्तुक)

४. केरळमधे मस्ट ट्राय केले पाहिजे असे खाण्याचे पदार्थ कुठले (शाकाहारी किंवा मासाहारी, शक्यतो उपाहारगृहांची नावे दिल्यास उत्तम!)

५. तिथल्या बॅक वॉटर्स विषयी ऐकले आहे तिथे हाउस बोट हा काय प्रकार असतो? त्यात रहायला मिळतात की सफरीला घेउन जातात. त्याचे बुकिंग कुठे करतात?

माहितीच्या प्रतिक्षेत..

प्रतिक्रिया

सर्वसाक्षी's picture

17 Oct 2012 - 10:20 pm | सर्वसाक्षी

कधी जायचे आहे?
किती दिवस?
कुठे कुठे जायचे आहे?

वरील गोष्टींवर बजेट आणि अपेक्षा यांचा मेळ बसतो का ते ठरेल.
बॅक्स वॉटर्स साठी सर्वात प्रसिद्ध अलेप्पी आणि कुमारकोम. बोट आवडणे ही वैयक्तिक बाब आहे. सर्वसाधारण अनुभव असा की एकदा २-३ तास फिरले की माणूस पकतो. शिवाय सूर्यास्त ते सूर्योदय बोटींना परवानगी नाही, त्यामुळे सायंकाळी सहा ते सकाळी आठ बोटी नुसत्या उभ्या असतात आणि हा पकाऊ अनुभव आहे, बोटीवर डास मस्त चावतात, आणि एक प्रकारचा वासही येतो. यापेक्षा तलावाकाठचा निवारा शोधावा आणि सकाळ संध्याकाळ तास दोन तास बोटीने फिरावे.

काही मदत हवी असल्यास व्य नि करा.

पिवळा डांबिस's picture

17 Oct 2012 - 11:26 pm | पिवळा डांबिस

नाही म्हणजे बोटीच्या प्रवासाची मजा ही उसळत्या लाटा वगैरे असल्या तर जास्त येते. इथे हे बॅकवॉटर असल्यामुळे फारश्या लाटा असतील असं वाटत नाही...
या बोटीवर काही कॅसिनो, शोज वगैरे असतात का हो?
नसेल तर मग माणूस पकणारच!

मिपासदस्य गणेशा हे जाऊन आले होते त्यावेळी अनामिक भटकंती http://www.misalpav.com/node/20253 अशी लेखमाला केरळवर आली होती.

मामा आणि मामी ,तुमच्या केरळ दौर्‍याला (फायनल झाला तर ) भरपूर शुभेच्छा :)

गणेशा's picture

18 Oct 2012 - 2:51 pm | गणेशा

केरळ हा पर्याय निवडला त्याबद्दल अभिनंदन..

केरळ खरेच सुंदर आहे.. आणि तेथील स्वच्छता..भेटनारे लोक हे खुप निर्मळ आणि छान वाटते..

सर्व प्रथम मी तुम्हाला ग्लोबल विझन ह्या ट्रवल्स येजन्सीचे नाव सुचवु इछितो. अतिशय माफक दर आणि सुंदर सेवा आहे त्यांची..

३५००० (६-७ दिवस) रुपयात रुपयात तुम्ही दोघे असतील तर चांगली हॉटेल्स ( ३ स्टार , आणि त्यासारखी ) ही घेवु शकता, सोबत तुम्हाला एक AC car आणि द्रायव्हर ७ दिवस मिळेल.
तुम्ही जर ४ जन असतील तर ३१००० रुपयात सेम ट्रीप होयील ( गाडी १च), आणि ६ जन असाल तर टवेरा मिळेल आणि आनखि पैसे कमी होतील.)

जर हॉटेल्स आनखिन थोडी कमी बजेट ची असतील तर २ दोघांसाठी ३१००० रुपये होतील.

या सर्व पॅकेजमध्ये, कार , ड्राय्व्हर, सकाळचा नाष्टा इन्क्ल्युड असेन.

माझा या ट्रवल्स कंपणीबरोबरचा अनुभव खुप सुंदर आहे. आणि यापुढील प्रत्येक टुर्सच्या वेळेस गरज लागल्यास मी याच कंपणीकडे जाणार आहे. अजुनही तसे कॉन्टक्ट मध्ये असतोच..
ड्रायव्हर ही खुप छान गाडी चालवत होता..
त्याचा ही सेपरेट नं ही माझ्याकडे आहे.

बाकी केरळ ट्रीप आणि ठिकाणे या बद्दल सविस्तर पुढच्या रिप्लाय मध्ये लिहितो आहेच.

गणेशा's picture

18 Oct 2012 - 3:07 pm | गणेशा

जनरली टुर्स आनि ट्र्वल्स कंपणीकडे गेलात की ते तुम्हाला कोचीन, मुन्नार, टेक्कडी, अल्लेपी, कुमारकोम, कोवल्लम, त्रिवेंद्रम कन्याकुमारी असा प्लॅन सांगतात..

तुम्ही जर ६-७ दिवस जात असेन तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की.

तुम्ही कोचीन आणि टेक्कडी तुमच्या प्लॅन मधुन रहित केले तरी चालेल..
त्या बदल्यात तुम्ही १ दिवस तरी कमीत कमी मुन्नार चा स्टे वाढवाच वाढवा. अतिशय सुंदर ठिकाण आहे मुन्नार.

कोचीन ला तसे काही विशेष नाही, मी ही केन्सल केले होते.

टेक्कडी ची फक्त हवा आहे, तेथे जाण्यासाठीचा रोड मात्र खुप छान आणि जंगलातुन आहे, पण तेथील बोट सफरीपेक्षा चांगला अनुभव नंतर मी तुम्हाला सांगतो. फक्त तेव्हड्या बोट सफरीसाठी तेथे जाणे योग्य वाटत नाही.. हा तुम्हाला जंगल ट्रेक करावयाचा आहे, कींवा एक जीप घेवुन जंगलात जायचे आहे तर टेक्कडी करा.. परंतु फक्त जावुन जंगला कडेने पाण्यात साध्या बोट ने फिरायचे असल्यास तो केन्सल करा.

म्हणजे मुन्नार ३ दिवस स्टे करा...
मुन्नर गावात सूर्यासोमा हॉटेल आहे , ४०-५० रुपयात लाजवाब फिश फ्राय मिळतील तेथे.
शिवाय एक लक्षात राहुद्या , आपल्या रेस्टॉरंट मध्ये न जेवता तुम्ही लोकल हॉटेल्स मध्ये जेवा.. खरा केरळी जेवनाचा आस्वाद घ्याल.
आणि दूसरी गोष्ट जेथे जाईन तेथीलच जेवन जेवा.. मी तर केरळी थाळी- भात - मासे हेच प्रेफर केले होते..आणि ते स्वस्तात पण होते. हार्डली २००-३०० बिल व्हायचे दोघा जनांचे तेच हॉटेल्स मध्ये १००० च्या पुढे होयील.
सूर्यासोमा हे हॉटेल चुकवु नका, तसे हॉटेल पुन्हा नाही.

तुम्हाला जर सिटीपासुन दूर आणि जंगलात रिसोर्ट चालेत असेन तर ग्रेट एस्केप रीसॉर्ट खरेच खुप सुंदर आहे ते निवडाच.. ५ ऑउट ऑफ ५.

मुन्नार चे काही फोटो देतो

http://www.misalpav.com/node/20240

गणेशा's picture

18 Oct 2012 - 3:19 pm | गणेशा

जरी तुम्ही टेकडी ला गेलाच तर तेथे मनमुराद खरेदी करुन घ्या कारण पुन्हा तेव्हड्या कमी किमतीत कोठे तश्या वस्तु मिळनार नाही.. आणि खुप वेळ असतो तेथे, कारण शेवटची बोट ५ ला असते तेथे.

आम्ही तेथे खुप खरेदी केली १५०-३०० रुपयांना मस्त साद्या मिळाल्या.. बाकी वस्तु.. पेंटीग्स खुप स्वस्तात मिळाले.

पण तरीही वेळ कमी असल्यास टेक्कडी वगळले तरी तुम्ही खुप काही मिस केले असे होणार नाही..

अल्लेपी - बॅकवॉटर . मात्र मिस करु नका..
वरती सर्वसाक्षी यांनी म्हंटले म्हणुन तुम्हाला तसाच अनुभव येईन असे होणार नाही.
मी ज्या टुर्स कंपणीकडुन गेलो होतो, त्या पेकेज मध्ये त्यांची स्वताचीच हाउस बोट होती.. खुप क्लिन आणि फुल डे AC सुद्दा. बोटीवर जेवन बनवणारे खुप छान आहेत, आणि केरळ मधले पहिले चिकन आम्ही बोटीवर खाल्ले .. खरेच खुप छान.

सर्वसाक्षी म्हंटले तसा अनुभव बर्याच जनांना आला होता.. पण माझ्या केरळ च्या मित्रानुसार कुट्ट्नाड तालुका अजुन पर्यटना पासुन थोडा दूर असल्याने स्वच्छ आणि छान आहे, आणि नशिबाने आमची बोट कुट्टनाड ह्या मध्येच जास्त फिरली त्यामुळे अतिशय छान वाटले.. तुम्ही मुंबईचे असताल तर तेथील गर्मी तुम्हाला काहीच वाटनार नाही.

आमचा एक दिवस बोटीमध्ये होता..
कुमारकोम पण खुप सुंदर आहे, पण त्याच बॅकवॉटर मध्ये पाण्याच्या कडेला हॉटेल्स मध्ये राहायचे कशाला म्हणुन मी तो ओप्शन कॅन्सल केला. ६००० रुपये ट्रिपचे कमी झाले.
आणि त्याबद्दल्यात मी कोवल्लम -त्रीवेंद्रम चे २ दिवस अॅड केले.

परंतु तुम्हाला निवांत या हॉटेल मध्ये दिवस घालवायचा असेन तर तुम्ही हा ओप्शन पण घेवु शकता.

http://www.misalpav.com/node/20253

गणेशा's picture

18 Oct 2012 - 3:39 pm | गणेशा

२ दिवस कोव्वलम चे अ‍ॅड केले पण हॉटेल कोवल्लम मध्येच घेतले फक्त ( कंट्री स्पा क्लब - ३ आउट ऑफ ५). तेथुन १५ मिनिटावर त्रिवेंद्रम मधील प्रसिद्ध पद्मनाभ मंदिर आहे. ते चकवु नका.

त्रिवेंद्रम मध्ये बाकीची सर्व ठिकाने मी कॅन्सल केली आनि फक्त सकाळी मंदिरात दर्शन घेवुन आलो..
नंतर फक्त बीच आणि बीच.. खुप सुंदर बीचेस आहेत तेथे..

त्रीवेंद्रम चा वाचलेला एक दिवस आम्ही पुवार ला घालवला.. आणि खरेच सआंगतो हा अनुभव घ्याच..
आनि पुवार पर्यटन अजुन बर्याच जनांना माहित नाहिये, गर्दी कमी.
तेथे गेल्यावर आम्ही अर्जुन या संस्थेची छोटी बोट घेतली होती.. १८०० रुपयाला २-२.३० तास

समुद्रकिनार्यावरती बीच च्या दूसर्या बाजुला नदी.. ती समुद्राला मिळते ते ठीकान आणि बॅकवॉटर निव्वळ अप्रतिम.. आणि त्या नदिच्या पाण्यातुन झाडातुन प्रवास करताना खुप छान वाटते..

कोवलम पासुन १७ किमि दूर, आणि कन्याकुमारी ला जोडुन केरळचे सर्वात शेवटचे टोक म्हणजे पूवार. नेय्यार नदि येथे समुद्राला मिळते, जेथे समुद्राला मिळते तेथे बॅक वॉटर मध्ये तीन आयलंडस तयार झालेत, गर्द झाडी.. निळेशार नदिचे स्वच्छ पाणी, आणि नदी आणि समुद्राच्या मध्ये असलेला सोनेरी बीच, (Golden beach म्हणजे येथे संध्याकाळी सर्व किनारा सोनेरी होतो)

तुम्ही येथे ४-७ या वेळेतच जा.

बाकी कोव्वलम ला जेवल मात्र येव्हडे छान मिळत नाही. आम्ही थांबलेलो हॉटेल ग्रेट होते, परंतु तेथील जेवल थर्डक्लास आनि खुप महाग होते, पहिल्यांदा आम्ही ज्या हॉटेल मध्ये थांबलो तेथील जेवन घेतले होते.
दूसर्या दिवशी आम्ही तेथुन जवल्च गाडी न्हेवुन १० किलोमिटर सुमारे साध्या हॉटेल मध्ये जेवन केल, नाव लक्षात नाही.

http://www.misalpav.com/node/20316

बाकी निसर्गाच्या मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर कसलीही काळजी न करता जा..
भात खात असला तर कसलाच प्रश्न नाही, घम्याल्यानेच थाळीत भात येतो...

१५ डिसेंबर नंतर जावु नका लगेच, ख्रिसमस मुळे गर्दी आणि हॉटेल्स रेट जास्त असतात.

नोव्हे - डिसेंबर १५, खरेच खुप छान दिवस आहेत तेथील भटकंतीला..

-------------------------------------------

ग्लोबल विझन च्या बेलापुर ऑफिस चा नं :०२२४०१२४५६९
अ‍ॅन्सी म्हणुन को-ओर्डीनेटर आहे तीचा नं - ०९९८७०६८६३३

बाकी जाताना फ्लाईट बुक करा. मी २-३ महिने आधी बुक केली होती म्हणुन जाऊन - येवुन दोघांचे फक्त ९००० रुपये लागले होते (स्पाईट जेट).
ट्रेन ने फुकट दिवस वाया जातील.

ट्रीप ला शुभेच्छा !

मैत्र's picture

18 Oct 2012 - 4:04 pm | मैत्र

अतिशय सुंदर आहे केरळ आणि उत्तम वेगवेगळ्या स्वरुपाची ठिकाणं आहेत.
गणेशाशी अनेक बाबतीत सहमत - विशेषतः
१. मुन्नार मध्ये नक्कि एक दिवस किमान मुक्काम करा. कोचिन मध्ये विशेष काही नाही त्यामुळे कोचीन फक्त प्रवासाचे स्टेशन / एअरपोर्ट म्हणून वापरा. तिथून लगेच पुढचे कनेक्शन घ्या.
२. यासाठी एक मार्ग म्हणजे आधी त्रिवेंद्रम ला जायचे आणि त्रिवेंद्रम / कन्याकुमारी पाहून नागरकॉइल ते एर्नाकुलम ही रात्रीची ट्रेन आहे जी पहाटे एर्नाकुलम (म्हणजेच कोचीन) ला पोचते आणि पुढे दिवस मोकळा राहतो.
३. या प्रवासाला गाडीने गेल्यास दमणूक होते आणि विनाकारण खर्च वाढतो.
४. कोचीन नंतर मुन्नार / पेरियार पाहून अलेप्पी / कुमारकोम अशा रचनेने ठिकाणे पाहता येतील. अलेप्पी ते कोचीन अंतर कमी आहे त्यामुळे परतीच्या प्रवासात वेळ वाया जात नाही.
५. सर्व स्थानिक पदार्थांचा आस्वाद घ्या.
- सर्वत्र हॉटेलमध्ये थोडे कोमट पाणी मिळते पिण्यासाठी. "सुडू तन्नी" म्हणून सांगितल्यास काहीसे फिकट गुलाबीसर कोमट पाणी येते. त्याने तब्येत ठीक राहते आणि हवेचा त्रास होत नाही - केरळ आयुर्वेदाप्रमाणे.
नाश्ता:
केरळ मध्ये इडली डोसा आहे पण तो तसा स्थानिक नाही. उत्तम म्हणजे
पुट्टू आणि कडला करी, केरळा पराठा आणि चिकन करी किंवा फिश करी, इडि अप्पम हे घ्या.
पुट्टू सोप्या भाषेत नारळ घातलेल्या cylindrical लंबगोल इडली प्रमाणे असते. ते जरा चमचमीत अशा हरबर्‍याच्या (चना) उसळीबरोबर खातात. मस्त प्रकार आहे.
नाश्ता सुद्धा थोडा मसालेदार आणि तब्येतीने करण्याची पद्धत आहे.
मुख्य जेवणः
सर्व समुद्री जीव. मुख्यतः मासे.
अलेप्पी / कुमारकोम भागात दोन विशेष प्रकार प्रसिद्ध आणि उत्तम आहेत:
करिमीन - हा एक माशाचा प्रकार आहे करी किंवा शॅलो फ्राय .
डक आणि कप्पा - कुमारकोम भागात लहान ठि़काणी विचारणा केल्यास उत्तम बदक करी कप्पा म्हणजे टॅपिओका बरोबर मिळते. ब्राउन रंगाची मसालेदार चविष्ट बदकाची डिश बटाट्यासारख्या कप्पा बरोबर बहार आणते.
थेक्काळी मीन करी -- टोमॅटो बेस मधली करी आहे .. अलेप्पि आणि दक्षिण केरळामध्ये जास्त उत्तम.
केळीच्या पानात वाफेवर शिजवलेला अतिशय मसालेदार मासा -- नाव आठवत नाही.
बाहेर कुठे गेल्यास 'साध्या' सांगितलं तर जरा मोठ्या हॉटेलात केळीच्या पानावर जेवण येतं. उत्तम व्हेज आहे.
केरळची मजा घ्यायची असेल तर आठ दिवस पोन्नी बॉइल्ड राईस, सांबार आणि फिश करी यावर आडवा हात मारा.

मुन्नार मधला टी म्युझियम मधला चहा मस्त आहे. अगदी कडक चहाचीच सवय असेल तर नाही आवडणार पण नक्की छान आहे - "कन्नन देवन" टी इस्टेटचा चहा.
मुन्नार मध्ये आणि कोचीन मध्ये मसाल्याचे सर्व पदार्थ मिळतात. पुण्या मुंबईपेक्षा बरेच स्वस्त आणि मुख्य नेहमीच्या किराणा दुकान अथवा फुड मॉल्स पेक्षा खुप उत्तम दर्जाचे. काळ्या मिरीच्या उत्पादनात केरळ जगात अग्रेसर आहे.
काळी मिरी, लवंग, वेलदोडे हे सगळ्यात उत्तम. पण दालचिनी, जायफळ, जायपत्री, सर्व काही उत्तम मिळतं. ब्राम्ही आणली होती च्यवनप्राश सारखी खाण्यासाठी - उत्तम होती.

धार्मिक वृत्ती आणि देवस्थाने पाहण्याची इच्छा असेल तर तीन ठिकाणं आहेत -
१. आता प्रसिद्ध झालेले पद्मनाभस्वामी मंदिर - सध्याच्या परिस्थीती मध्ये कल्पना नाही दर्शनाची. पण अतिशय अप्रतिम, भव्य मंदिर परिसर आणि कायम मनात राहणारे अनंतशयन विष्णूमुर्तीचे दर्शन.. अतिशय युनिक असे मंदिर आहे म्हणून आवर्जून पहा. त्रिवेंद्रम मध्ये हे मंदिर, षण्मुगम बीच आणि कोवालम बीच वगळता इतर काही विशेष नाही.
म्युझियम लहान आहे. खूप आवड असल्यासच जावे.
२. कालडी - आदी शंकराचार्य मंदिर / जन्मस्थान. छान जागा आहे. इथे जायचे असल्यास त्रिसूर मार्गे प्लॅन करता येईल.
३. गुरूवायूर - प्रत्येक मल्याळी साठी सर्वात मोठे श्रद्धास्थान. हेहि त्रिसूर मार्गे करावे लागेल. किंवा कोचीनपासून एक लांब पल्ल घेउन. तिरुपती प्रमाणे दर्शनाची गर्दी होते. पण मंदिर अप्रतिम आहे.

मुन्नार मध्ये कथकली आणि कलरी पायटू (मार्शल आर्ट) चे छोटे कार्यक्रम होतात. टीव्ही पेक्षा प्रत्यक्ष पाहणे हा कायम लक्षात राहणारा अनुभव आहे.
केरळ देवभूमीच आहे कारण देव आशीर्वाद असल्या शिवाय इतकि संपन्न आणि वैविध्यपूर्ण रचना इतक्या लहान आकारात होणार नाही आणि अशी विलक्षण संस्कृती पण कुठेही नाही.

माहिती साठी व्य नि केला आहे.

अथरापल्ली आणि वाझाचल वॉटरफॉल हे पण खूपच सुंदर आहे. चुकवू नयेत अशी ठिकाणे. कोचिन पासून जवळच म्हणजे ७०-८० किमी. वर आहेत. http://www.keralagreenery.org/athirapally-vazhachal-waterfalls.html आजूबाजूचा परिसरही खूपच नयनरम्य आहे. अथरापल्लीला गाडी पार्क केल्यावर धबधब्यापाशी जायला जरा चालावे लागते. पण तिथे पोहोचल्यावर स्मोरचा देखावा पाहून चालण्याचे श्रम सार्थकी लागले असे वाटते.

पक्या's picture

19 Oct 2012 - 12:18 pm | पक्या

केरळमधील एक मोठे शहर आणी भारतातील एक मोठे बंदर म्हणून वास्को द गामा व इतर गोष्टींमुळे ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले कोचीन ही एखादा दिवस बघायला हरकत नाही. आम्ही कोचिन ला कथकली चा लाइव शो पाहिला होता. छान होता. कथकली कलाकार मेकप कसा करतात, नॄत्यासाठि काय काय तयारी करतात, त्यांचा ड्रेस कसा असतो वगैरे बाबी शो च्या आधी १ तास भर बघायला दिल्या होत्या. मजा आली होती.
गुरूवायुर ला गेलात तर elephant Sanctuary हत्तीशाळा बघाच. खूप मोठे ठिकाण आहे आणि असंख्य हत्ती आहेत. आम्ही तिथे गेलो असता एका हत्तीला आंघोळ घालण्याची संधी मिळाली होती. बच्चेकंपनी एकदम खुश झाली ह्या कामासाठी. मुन्नार किंवा टेक्कडी ला हत्तीवरुन सफर करता येते. आम्ही टेक्कडी येथील एलीफंट जंक्शन ह्या ठिकाणाहून हत्तीसफर केली होती. आधी माणशी बरेच पैसे सांगितले होते. पण एवढ्या पैशांमुळे आम्ही जास्त रस दाखवला नाही म्हणून गुपचे पैसे लावले. ते चांगले डिल मिळाले. हत्तीसफरी नंतर हत्ती च्या सोंडला मिठी मारणे, सोंड डोक्यावर ठेवून घेणे, हत्तीला खायला घालणे आणि हे करताना प्रत्येक कृतीचे फोटो असेही त्या डिल मधे अ‍ॅड केले. ग्रुपमधील मुलांना भारी मजा आली होती. कपल्सनाही मजा येते. http://www.elephantjunction.com/

इरसाल's picture

19 Oct 2012 - 4:56 pm | इरसाल

अम २ मैना केरलामे निकाल्के आया जी. दागा डालनेका सोच्चा ता मगर टायम नै मिल रआ जी ! अब मै देकता कब तायम मिलता ?

बंडा मामा's picture

19 Oct 2012 - 8:11 pm | बंडा मामा

फारंच सुंदर माहिती. गणेशा, मैत्र पक्या ह्यांनी दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आणि नेमकी आहे. आमच्या सहलीच्या प्लानिंगसाठी ह्याचा खूपच उपयोग होतो आहे. गणेशा ह्यांनी दिलेल्या फोन नंबरसकट टिप्स आणि मैत्र ह्यांच्या खाद्यविषयक टिप्स तर अफलातुन. धागा बुकमार्क करुन ठेवतो आहे.

माहिती देणार्‍या सर्व मिपाकरांचे अनेक आभार.

मैत्र's picture

21 Oct 2012 - 10:41 pm | मैत्र

केळीच्या पानात वाफेवर शिजवलेला अतिशय मसालेदार मासा -- नाव आठवत नाही. ==>
मीन पोल्लिचेट्टू
बहुधा पापलेट किंवा त्या वर्गातला मासा असतो... किंवा अलेप्पी / कुमारकोमचा स्थानिक "करिमीन"

मैत्र's picture

21 Oct 2012 - 10:55 pm | मैत्र

हॉटेल डील्स.. शक्य असल्यास ब्रेकफास्ट आणि डिनर या सह घ्या. ( ट्रॅव्हल बुकिंगच्या भाषेत याला MAP (Modified American Plan -- 2 meals included) म्हणतात)
डील मध्ये स्वस्त पडतं. सकाळी आवरून बाहेर पडण्यापूर्वी बाहेर ब्रेकफास्ट शोधणं यापेक्षा लंच पर्यंत फिरण्याची सोय होते.
दिवस भर भटकंती / बोटिंग झाल्यावर दमणूक थोडी होते तेव्हा परत येऊन हॉटेलमधल्या सोयींचा आनंद घेऊन रात्रीचं जेवण निवांतपणे घेतलं तर थोडा बाहेर आराम करून आपल्या रुमवर जाणं सोयीचं.
रात्रीच्या जेवणाला बाहेर शोधणं हे या आराम, सोय आणि ड्रायव्हर या दृष्टिने सुटेबल होत नाही..

ते केसरी ट्रॅव्हल्सवाले या सोयी देतात का? म्हणजे त्यांच्याकडेच गेलेलं बरं.

मैत्र's picture

22 Oct 2012 - 5:07 pm | मैत्र

आपण हवं तसं बनवून घ्यावा प्लॅन / itinerary
केसरीच्या वैयक्तिक टुर्स बद्दल कल्पना नाही. त्यांचं नाव बसमध्ये ४०-५० लोकांबरोबर केलेल्या टुर्स साठी जास्त चांगलं आहे.
मेकमायट्रिप आणि क्लिअरट्रीप सुद्धा तुम्हाला हवा असा प्लॅन फ्लाईट सह करून देतात.
जाहिरात चालूच आहे तर व्य नि सोडून मीही इथे टाकतो एक नाव जे माझ्या अनुभवाने मला अतिशय उत्तम वाटते
http://www.wondertours.in/
वैयक्तिक गरजेप्रमाणे बुकिंग आणि टूर प्लॅनिंग साठी बेस्ट आहे.
हव्या तशा रेंजमध्ये पूर्ण माहितीसह उत्तम प्लॅन .. फक्त तुम्हाला या ठिकाणी जायचं मग मी बुक करुन देतो असं नाही तर तिथे काय योग्य आहे, किती वेळ लागेल, तुमच्या गरजेप्रमाणे कुठले ठिकाण / हॉटेल चांगले, किती गोष्टी बसवता येतील असलेल्या वेळात.. माझ्या मते ही सर्व्हिस सगळ्यात उत्तम.
कुठल्याही ठिकाणी जाताना सजेस्टेड हॉटेल्स tripadvisor वर पहावीत. बरेचदा फायदा होतो.
सहज यांच्या प्रमाणे काहि अजून सजेशन्सः

कुमारकोम : १. KTDC WaterScapes (http://www.waterscapeskumarakom.com/),
2. Coconut Lagoon (http://www.cghearth.com/coconut-lagoon)
(दोन्ही पंचतारांकित आहेत)
थोडे लांब अलेप्पी पासुन एक तासावर KondaI Lip (३-४ तारे पण आराम करण्यासाठी सर्वोत्तम)

मुन्नारः ब्लॅकबेरी हिल्स (४-५ तारे) (http://www.kondailip.com/), देशदान (३-४ तारे) (http://www.deshadan.com/)

त्रिवेंद्रम: शहरात जेवणासाठी उत्तम जागा - हॉटेल पंकज टेरेस रेस्टॉरंट - सेक्रेटेरियट समोर (सामिष आणि विशेषतः समुद्री जीव)

रेवती's picture

22 Oct 2012 - 7:57 pm | रेवती

धन्यवाद मैत्र.

सहज's picture

22 Oct 2012 - 7:08 am | सहज

१) ताज निवांत आपलं विवांता

२) महिंद्रा होम स्टे

३) नीमराणा हॉटेल्स एक अथवा दुसरे

४) मेक माय ट्रीप डॉट कॉम