भारताचे अनभिषिक्त राजघराणे म्हणजे नेहरु गांधी कुटुंब. ह्या कुटुंबाच्या अफाट त्यागामुळेच हा देश बनलेला आहे त्यामुळे त्या कुटुंबात जन्मलेल्या वा त्या कुटुंबाशी नातेसंबंध असणार्या तमाम विभूतींकडे लोकांचे बारीक लक्ष असते. मग महाराणी सोनियाजींच्या स्वखर्चाने केलेल्या परदेश वार्या असोत वा राजजमाई राबर्टसाहेबांकरता असणारी खास सुरक्षा व्यवस्था असो.
(http://www.wikileaks-forum.com/index.php?topic=7147.0)
आता कुणी केजरीवाल नामक इसमाने राजजामात राबर्टजींच्या अफाट संपत्तीबद्दल आक्षेप घेतला आहे.
ह्या हीन कृत्याबद्दल इथे वाचा
http://online2.esakal.com/esakal/20121005/5555436691927661260.htm
आता इतक्या त्यागी कुटुंबाशी इतके जवळचे नाते असणारा माणूस अवैध संपत्ती मिळवायचा विचारही करेल का?
किंबहुना ह्या राजघराण्याकडे असणारी संपत्ती कायद्यानेच वैध घोषित केली जावी अशी त्यांची योग्यता आहे.
राबर्टजी कर्तृत्ववान आहेत. कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय त्यांनी ही संपत्ती जमा केली आहेत ती सर्वथा त्यांचीच आहे असे घोषित केले जावे आणि ह्या केजरिवाल आणि अशा नतद्रष्ट लोकांना कायमचे तुरुंगात डांबावे हीच आजची गरज आहे.
तसेही केजरीवालचा रा स्व संघाशी संबंध असल्यामुळे आपोआपच त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात येते. आता असा राष्ट्रद्रोही आरोप करून तो अधिकच खालच्या पातळीवर जाऊ पहातो आहे.
अर्थातच राजघराण्यातील कुणालाही ह्याचा त्रास होऊ नये आणि त्यांना ह्या संबंधी कुठलेही स्पष्टीकरण देण्याचे क्लेष होऊ नयेत हीच मनापासून इच्छा.
राष्ट्रद्रोह - राजजामात राबर्टजींवर राळ
गाभा:
प्रतिक्रिया
5 Oct 2012 - 10:31 pm | आशु जोग
वाचली हो अगदी ताजी आहे बातमी !
थँक्स !
5 Oct 2012 - 11:45 pm | अत्रुप्त आत्मा
6 Oct 2012 - 12:13 am | श्रीरंग_जोशी
लोकसत्तेमधील आजच्या श्वेतपत्रिकेप्रमाणे अआ यांचा श्वेतप्रतिसाद!!
बाकी मूळ चर्चाविषयाला आमचा पास.
अवांतर प्रति-प्रतिसादाबद्दल क्षमस्व.
6 Oct 2012 - 6:42 am | अत्रुप्त आत्मा
@अआ यांचा श्वेतप्रतिसाद!! >>> हुई हुई हुई, ;-)
पाप कुणाचे?शाप कुणाला? :-p
6 Oct 2012 - 7:04 am | श्रीरंग_जोशी
हापिसातल्या प्रॉक्सीद्वारे स्मायलीची साईट प्रतिबंधित असावी. त्यामूळे तुमच्या प्रतिसादात काहीच दिसले नाही.
यापूढे हि बाब ध्यानात ठेवीन.
6 Oct 2012 - 10:18 pm | आशु जोग
म्हणजे स्मायली टाकली तरी
ती शब्दातही टंकावी
इथे स्मायली समजून घ्यावी म्हणून
6 Oct 2012 - 8:46 am | चौकटराजा
आण्णा हजारे, मेधा पाटकर, केजरीवाल यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे ! त्यानी कोर्टात जावे व २५ वर्षानी न्याय मिळवावा. कोर्टके घर देर है लेकिन अंधेर नही !
संपादित
आपला निष्ठावंत कांग्रेसवाला.
6 Oct 2012 - 10:43 am | नितिन थत्ते
आता २०१४ च्या निवडणुकीत केजरीवालांची पार्टी निवडून येणार आहे. हो की नाही? मग केजरीवाल पंतप्रधान झाले की १ म्हैन्यात जनलोकपाल आणि दोन म्हैन्यात सगळी वैट्ट आणि भ्रष्ट माणसं जेलात. हाकानाका.
6 Oct 2012 - 10:51 am | अप्रतिम
१ महिन्यात नव्हे १० दिवसात.
6 Oct 2012 - 1:21 pm | पुण्याचे वटवाघूळ
हा हा हा. मला वाटते की केजरीवालांची पार्टी तीन-चतुर्थांश बहुमत जिंकणार बघा!! :)
(प्रत्यक्षात स्वतः केजरीवालांचे डिपॉसिट वाचले तरी खूप झाले)
7 Oct 2012 - 7:03 am | सुहास
मला वाटते की केजरीवालांची पार्टी तीन-चतुर्थांश बहुमत जिंकणार बघा!!
असे झाले तर काश्मीरचे काय होईल..?
--सुहास
8 Oct 2012 - 10:50 am | llपुण्याचे पेशवेll
असे झाले तर काश्मीरचे काय होईल..?
ते सोड सध्या या धाग्याचे काय होईल.
8 Oct 2012 - 11:27 am | पुण्याचे वटवाघूळ
काळेकाकांनी यावर लिहिल्यास चांगले होईल.
8 Oct 2012 - 12:58 pm | गणपा
काश्मीर जे होईल ते होईलच पण या धाग्याचा आत्ताच काश्मीर झालाय. ;)
6 Oct 2012 - 10:25 pm | आशु जोग
केजरीवाल आणि अण्णा यांना शिव्या घातल्याने आपण शाहाणे ठरतो
असा समज असेल तर तो चूकीचा आहे
6 Oct 2012 - 11:36 pm | नितिन थत्ते
>>केजरीवाल आणि अण्णा यांना शिव्या घातल्याने आपण शाहाणे ठरतो
कोणी केजरीवालना शिव्या घातल्या? आपण तर ते पॉलिटिक्समध्ये आल्याने समाधानी आहोत. त्यांचा उमेदवार पाहून मतसुद्धा देईन कदाचित. ;)
6 Oct 2012 - 1:25 pm | पुण्याचे वटवाघूळ
यातील पहिल्या आणि तिसर्या व्यक्तीविषयी माहित नाही पण मधल्या व्यक्तीविषयी हेच अनुमान मी कित्येक वर्षांपूर्वीच बांधले होते.
7 Oct 2012 - 7:08 am | सुहास
ये हुयी ना बात..! भ्रष्टाचाराचा फोकस एन् सी पी कडून पुन्हा आय एन् सी कडे गेल्याचे पाहून आनंद झाला..!
-- सुहास (दादा द्वादशमतीकर)
7 Oct 2012 - 6:32 pm | तिमा
अहो, ज्यांच्या नांवातच वढेरा आहे ते आपली संपत्ती वाढवणारच. तुम्हाला कोणी रोखलंय ?
7 Oct 2012 - 6:36 pm | अविनाशकुलकर्णी
रिअल्टी कंपनी डीएलएफसोबत आपल्या व्यावसायिक संबधांबाबत अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत. फुकटातल्या प्रसिद्धीच्या मागे धावणाऱ्या लोकांनी आपल्यावर हे बिनबुडाचे आरोप केल्याचं त्यांनी म्हटलंय.
आपण गेल्या २२ वर्षांपासून व्यावसायिक क्षेत्रात आहोत आणि व्यापाराशी संबंधित सगळे व्यवहार आपण पारदर्शी पद्धतीनं केले आहेत आणि आपण कायद्यांना मानणाऱ्या व्यक्तींपैकी एक असल्याचं वढेरा यांनी म्हटलंय. असे बिनबुडाचे आरोप करून आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र असल्याचं वढेरा म्हणतात. ‘स्वस्तात लोकप्रियता मिळवण्यासाठी माझ्यावर असे आरोप केले जात आहेत’ असा आरोप वढेरा यांनी केलाय.
प्रियंका गांधी यांचे पती आणि सोनिया गांधी यांचा जावई रॉबर्ट वढेरा यांनी गेल्या ४ वर्षात सुमारे ३०० कोटी रुपयांची संपत्ती कमावली असल्याचे सणसणीत आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे सदस्य अरविंद केजरीवाद यांनी केला आहे. त्यावर वढेरा यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. डीएलएफ या कंपनीनंही कोणत्याही प्रकारची संपत्ती वढेरा यांना विकल्याच्या आरोपांना नकार दिलाय.
7 Oct 2012 - 7:00 pm | चौकटराजा
आणि आपल्या हातून श्री वाड्रा यांची बदनामी झाली आहे असे त्याना वाटत असेल तर त्यानी खुशाल अब्रू नुकसानीचा दावा ठोकावा असे पतिआव्हानही श्री केसरीवाल यानी दिलेले आहे. आमचे आठवणी प्रमाणे आतापर्यंत मोरारजी देसाई सोडले तर एकाही राजकारण्याने अब्रूनुकसानीचा खटला शेवटपर्य़त लढवून नुकसान भरपाई घेण्यात यश मिळविलेले नाही. अबू नुकसानीचा दावा लावला तर सत्य बाहेर येण्याचीही दाट शक्यता असते हे तर त्याचे कारण नसेल ??
आताच सांगतो गडकरीनी अंजली यांचेविरूद्ध केलेला दावा जिंकून दाखवावाच !
7 Oct 2012 - 9:49 pm | नितिन थत्ते
>>आपल्या हातून श्री वाड्रा यांची बदनामी झाली आहे असे त्याना वाटत असेल तर त्यानी खुशाल अब्रू नुकसानीचा दावा ठोकावा असे पतिआव्हानही श्री केसरीवाल यानी दिलेले आहे.
सामान्यपणे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार जो आरोप करतो त्याने पुरावे देऊन सिद्ध करावे अशी पद्धत आहे. मात्र भारतातल्या पब्लिक डिसकोर्समध्ये आरोप करणारा काहीही आरोप करू शकतो आणि मग ज्याच्यावर आरोप झाले त्याने आपले निर्दोषत्व शाबीत करावे - अब्रूनुकसानीची फिर्याद करावी अशी अपेक्षा दिसून येते. (गिल्टी अनटिल प्रूव्हड अदरवाइज).
वडेरा यांना अब्रूनुकसानीचा खटला भरण्याचे आव्हान द्यायच्या ऐवजी केजरीवाल स्वतः न्यायालयात जनहितयाचिका का दाखल करत नाहीत?
7 Oct 2012 - 10:44 pm | दादा कोंडके
सद्य परिस्थिती बघता माझ्या आवडत्या चित्रपटातला एक संवाद आठवला,
"देअर इज नो कोर्ट इन धिस कंट्री फॉर मेन लाईक प्रोथेरो"-वी
7 Oct 2012 - 11:24 pm | सुनील
वडेरा यांना अब्रूनुकसानीचा खटला भरण्याचे आव्हान द्यायच्या ऐवजी केजरीवाल स्वतः न्यायालयात जनहितयाचिका का दाखल करत नाहीत?
कै च्या कैच ;)
तसं केलं तर चार दिवसांची प्रसिद्धी कशी मिळेल? आणि हो, जनतेचे फुकटची करमणूक कशी होईल?
पवारांविरुद्धच्या ट्रकभर पुराव्याचं काय झालं?
8 Oct 2012 - 9:14 am | चौकटराजा
नीट पाहिले तर लोकांमधे केलेला आरोप हा कायद्यानुसार " आरोप" असतो काय? सामान्य माणसाने आरोप करायचे अपेक्षितच नाही त्याने आरोपसद्रुश अशी शंका उपस्थित करण्याचा त्याला हक्क आहेच. म्हणून तर सुनबाईची आत्महत्या
संशयास्पद आहे अशी असंबंधित माणसाला ही शंका व्यक्त करता येते. अशी शंका त्याला रीतसरपणे पोलिसांकडे देता येते. आरोप दाखल करणे हे पोलिसांचे काम असून ते जे दाखल करतात त्यालाच " आरोप" म्हणता येते. सध्या केजरीवाल जनहित दाखल करत नसावेत कारण त्याना आशा असावी की या बाबत आणखी शंका उपस्थित केल्यास दीएलएफ किवा वाड्रा यांचेकडून एखादे विसंगत विधान बाहेर पडेल.
मुळात केजरीवाला यानी आरोप देखील केलेले नाहीत तर पन्नास लाख ते पाचशे कोटी हा प्रवास तीन वर्षात कसा झाला याबाबत त्यानी शंका व्यक्त केली आहे. सदर व्यवहाराची माहिती अगोदरपासूनच बर्याच जणाना माहीत आहे. पण सर्वानाच हे कोणत्या कलमात बसवायचे याचा संभम आहे .कारण केलेले व्यवहार कायद्याच्या चौकटीत बसूनच केले आहेत
हे प्रशांत भूषण याना काय माहीत नाही काय ?
9 Oct 2012 - 12:02 am | दादा कोंडके
हे बघा,
http://www.esakal.com/esakal/20121004/5518895219024100402.htm
राजा आणि कलमाडीवर रितसर न्यायालयातच खटले चालले होती ना?
9 Oct 2012 - 11:53 pm | विकास
अगदी अगदी मनातलं बोललात... म्हणूनच आजही गांधीहत्येवरून ज्यांना निर्दोष म्हणून सोडले गेले त्यांना त्याच बाबतीत टोचताना आपण पहातो. आणि तसेच, हो मोदींना पण "गिल्टी अनटिल प्रूव्हड अदरवाइज" हे तत्व लागू असावे असे वाटते. तुम्हाला काय वाटते? ;)
7 Oct 2012 - 7:27 pm | श्रीरंग_जोशी
पुण्यातील भाजपचे तत्कालीन नगरसेवक श्री अतुल भातखळकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्यावर भ्रष्ट पद्धतीने पुण्यातील टेकड्यांवरील आरक्षण हटवण्याचा जाहीर आरोप केला होता.
विलासरावांनी त्यांच्याविरुद्ध खटला भरला होता. न्यायालयात आरोप सिद्ध करू न शकल्याने भातखळकर यांनी विलासरावांची जाहीर माफी मागितली व विलासरावांनीही त्यांना उदार मनाने माफ केले.
विलासरावांनी माफ केले नसते तर भातखळकरांना तुरुंगात जावे लागले असते.
8 Oct 2012 - 9:33 am | चिंतामणी
श्री. अतुल भातखळकर हे मुंबई भाजपचे सरचिटणीस आहेत.
बाकी चालू द्या.
8 Oct 2012 - 11:44 am | श्रीरंग_जोशी
सदर प्रकरण पुण्यातील टेकड्यांचे असल्यामुळे माझा तसा समज होता.
7 Oct 2012 - 7:55 pm | चिरोटा
बिल्डर आणि राजकारणी ह्यांची युती जुनी आहे.किंबहुना राजकारणी,सत्ताधीश ह्यांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रचंड जमीनीचे व्यवहार करता येत नाहीत हे लहान मुलालाही कळते.डी.एल्.एफ. हा असाच मोठा बिल्डर आहे.अनेक वर्षांपासून जमीनीचे व्यवहार करण्याबद्दल ख्याती आहे. मुंबईतील मलबार हिल भागाताला आमदार अशाच मोठ्या जमीनींच्या व्यवहाराबद्दल (कु)प्रसिद्ध आहे. विरोधी पक्षाचा असला तरीही तो सत्ताधारी लोकांशी व्यवस्थित संबंध ठेवून असतो.
7 Oct 2012 - 8:15 pm | श्रीरंग_जोशी
सध्याचे मुख्यमंत्री या लॉबीला चाप लावण्याचा जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत.
या कार्यात त्यांना यश लाभो.
7 Oct 2012 - 9:05 pm | पाषाणभेद
खरोखर राजजामात राबर्टजींवर राळ अन आळ आणने हा एक राष्ट्रद्रोह आहे.
(फोटोसौजन्य: संबंधीत वेबसाईट व ईंटरनेट)
या वरील फोटोत राजजावई यांना विमानप्रवास करतांना सुरक्षेतून ढिल दिलेली दिसत आहे.
बाकी राजजावई रॉबर्ट यांच्या मिशा फार छान आहेत ब्वॉ.
अजितः मो(ह)न(|), मोना को रॉबर्ट को बोलने लिए बोलना के, "लुट लो सोना" |
अजितः मोना डार्लींग, रॉबर्ट तो स्मार्ट है |
अजितः मोना डार्लींग, रॉबर्ट के साथ सोना...ले जावो |
7 Oct 2012 - 10:01 pm | नितिन थत्ते
एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा पोस्ट केली म्हणजे ती खरी होत नाही.
वरील फोटोतील बोर्ड नीट वाचला तर दिसून येईल ही रॉबर्ट वडेरांना एसपीजी प्रोटेक्टीज* (ज्यांना एसपीजीचे संरक्षण दिले गेले आहे) अशा व्यक्तींबरोबर जातानाच फक्त सुरक्षा चाचणीतून सूट आहे. ते एकटे प्रवास किंवा एसपीजी प्रोटेक्टीज खेरीज इतर कुणाबरोबर प्रवास करत असतील तर त्यांना ती सूट उपलब्ध नाही. याचा अर्थ ही सवलत वडेरा यांना दिलेली नसून एसपीजी प्रोटेक्टीजच्या सोयीसाठी दिलेली आहे.
या विषयावर मिपावरच पूर्वी चर्चा झालेली आहे. आणि पाषाणभेद हे काही नवे सदस्य नाहीत.
8 Oct 2012 - 12:29 am | इष्टुर फाकडा
प्रश्न त्या वढेराचं नाव तिथे आलंच कसं याबाबत आहे. तो माणूस त्यावरील दिलेल्या कोणत्याच वर्गवारीत येत नाही, वो है कोण यार ? आणि हे spg म्हणजे कोण तेही काय कल्ला नाय बा. थत्ते काका सांगितलत तर बरे होईल.
8 Oct 2012 - 12:50 am | श्रीरंग_जोशी
SPG बद्दल इथे माहिती मिळेल.
8 Oct 2012 - 8:08 am | पाषाणभेद
मग वर त्या पाटीत तो पॉईंट "Any other person while travelling with SPG protectees" असा असायला हवा.
एक उदाहरण देतो.
समजा ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. राम आहेत. बहूतेक सामाजिक ट्रस्ट वर किंवा मोठ्या मोठ्या मंदीरांच्या कार्यकारणीत जिल्हाधिकारी हे अध्यक्ष किंवा माननिय सदस्य असतात. तेथील बोर्ड वर किंवा संस्थेच्या लेटरहेडवर त्या केवळ पदाचा उल्लेख असतो. जसे की: "अध्यक्ष: माननिय जिल्हाधिकारी - ठाणे जिल्हा" असा.
श्री. राम हे खाजगी नाव तेथे नसते. वरील बोर्डात तो संकेत डावलेला गेला आहे.
अशाच कित्येक संकेतांची पायमल्ली सरकारदरबारी/ संसदेत असणार्या/ इतर प्रशासकिय संस्थेतील सदस्यांच्या नातेवाईकांकडून नेहमीच होत आलेली आपण नेहमीच पाहतो. हा देखील त्यातलाच अश्लाध्य प्रकार आहे. त्याचा निषेध करावाच लागेल.
8 Oct 2012 - 9:35 am | चिंतामणी
त्याच बोर्ड्वर ज्यांना सवलत आहे ते सगळे पदाधीकारी आहेत.
कोणाचेही वैयक्तीक नाव नाही तीथे.
11 Oct 2012 - 1:50 pm | इष्टुर फाकडा
अहो हो...काकांना बोलुद्याकी जरा...आम्हाला त्यांचे ऐकायचे होते.
9 Oct 2012 - 1:03 am | विश्वनाथ मेहेंदळे
उद्या नितीन थत्ते हे SPG बरोबर प्रवास करत असतील तर त्यांना अशी सूट मिळेल काय? कुणाही सामान्य माणसाला न मिळणारी सवलत या इसमाला काय म्हणून मिळाली?
थत्ते चाचा, उगाच बुद्धीभेद करणे सोडा आणि या बोर्डावर जो मजकूर आहे तो तुम्हाला पटतो का याचे रोखठोक उत्तर द्या.
9 Oct 2012 - 11:04 am | अर्धवटराव
>>कुणाही सामान्य माणसाला न मिळणारी सवलत या इसमाला काय म्हणून मिळाली?
-- गांधी कुटुंबीयांना खास संरक्षणाचा कायदा आहे बहुतेक. हा कायदा इंदीराजी कि राजीवजींच्या हत्येनेंतर बनला असावा. आता गांधी परिवाराच्या परिघात कोण कोण येतो, वा हा कायदाच अवास्तव नाहि काय वगैरे भाग वेगळा...
अर्धवटराव
7 Oct 2012 - 10:45 pm | आशु जोग
>>रॉबर्ट वढेरा यांनी गेल्या ४ वर्षात सुमारे ३०० कोटी रुपयांची संपत्ती कमावली
आता मला कळलं
बारमतीच्या साहेबांचा कॊंग्रेसशी युती करताना स्वाभिमान का आड येत नाही...
या दोघांचं चांगलं जमतं
8 Oct 2012 - 6:12 pm | तिमा
रॉबर्टरावांची कित्ती कित्ती काळजी आहे काही लोकांना ! हे पाहून डोले पानावले.
8 Oct 2012 - 10:36 pm | दादा कोंडके
त्यानी फेसबूकचं अकाउंटच डिलीट केलं म्हणे.
8 Oct 2012 - 11:29 pm | आशु जोग
रॉबर्टना फेमस केल्याबद्दल
रॉबर्ट वधेरा यांच्या वरील कमेंटस पहा
9 Oct 2012 - 11:14 am | अर्धवटराव
सत्ताकेंद्राशी लग्नसंबंधासारख्या घट्ट धाग्याने बांधलेली कोण व्यक्ती असले व्यवहार करणार नाहि? साध्या हवालदाराचं पोरगं पानटपरीवरुन फुकट विडी-काडी घेऊन जातं... भारतीय समाजमनाचा, राजकारणाचा गंध नसलेल्या सोनियाजी त्याकाळी भारतीय लोकशाहीच्या सर्वात महत्वाच्या राजकीय पक्षाची सर्वेसर्वा बनल्या ... बाकी दिग्गज धुरीणांना बाजुला सारुन... आणि ते करप्शन भारतीयांनी सहज स्विकारलं... हत्ती गेला त्या छिद्रातुन त्याचं शेपुट देखील गेलं तर एव्हढा बाऊ कशाला करायचा.
अर्धवटराव
9 Oct 2012 - 2:55 pm | चौकटराजा
काल एका चॅनेलवरील चर्चेत प्रकाश बाळ यानी अशाच काहीशा प्रकरणाची व त्याचा पाठपुरावा कसा चिकाटीने करायचा याची
आठवण करून दिली. बॅ अंतुले यानी सिमेट वाटपात कायदेशीरपणे गैरव्यवहार करून आपल्या प्रतिष्ठानाला देणग्या मिळविल्या . त्याचा रीतसर पाठपुरावा मृणाल गोरे बाईनी करून दाखविला. अंतुलेना तुरुंगवास काही झालेला नाही पण त्याना राजीनामा द्यावा लागला. वधेरा हा सत्तेतील व प्रशासनातील माणूस नाही त्याला अडकवणे कठीण आहे.
10 Oct 2012 - 12:14 am | विकास
बच्चे लोग चुपचाप बैठो! आत्ताच इकॉनॉमिक टाईम्स मध्ये विरप्पा मोईलींचे खालील विधान वाचले:
तेंव्हा आता काळजी नसावी. :-)
10 Oct 2012 - 12:20 am | आशु जोग
>> हत्ती गेला त्या छिद्रातुन त्याचं शेपुट देखील गेलं तर एव्हढा बाऊ कशाला करायचा.
सोशिक भारतीय जनता
10 Oct 2012 - 1:44 am | अर्धवटराव
होय. ते खरे आहे :(
अर्धवटराव
10 Oct 2012 - 10:25 pm | सुधीर१३७
आत्ता कळलं की हिंदी सिनेमातील सर्व गुंड, डाकू, लुटेरे, चोर, बदमाश यांचं नाव "रॉबर्ट" च का होतं ते.
10 Oct 2012 - 11:26 pm | आशु जोग
अहो आम्ही लिन्क दिलीय ना