नव्या जगाशी जडले नाते ....

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
3 Oct 2012 - 6:05 pm

फुटला ट्याहो..तुटली नाळ.
नव्या जगाशी जडले नाते ......

स्पर्श मायेचा..घोट दुधाचा
नव्या जगाशी जडले नाते.....

तुटले दुध..घास चिऊचा
नव्या जगाशी जडले नाते ...

डबा कडीचा ..लाडू पोळीचा
नव्या जगाशी जडले नाते ...

फुटली पाटी..सुटली शाळा ..
नव्या जगाशी जडले नाते

केस उगवले..दाढी केली
नव्या जगाशी जडले नाते......

लागे नोकरी..खुळखुळे दमड्या
नव्या जगाशी जडले नाते .....

एकच प्याला .पहिला घोट
नव्या जगाशी जडले नाते.........

घट्ट मिठी ..पहिले चुंबन
नव्या जगाशी जडले नाते.....

सुटे गाठ..मिटे लाज
नव्या जगाशी जडले नाते ......

लहान घरटे.. पिल्लू चीवचीवे
नव्या जगाशी जडले नाते .......

उडाली पाखरे.मोकळे घरटे
नव्या जगाशी जडले नाते..........

जीव घूस मटे. .श्वास थांबले
नव्या जगाशी जडले नाते .......

फोटो फ्रेम .फ्रेम मध्ये कैद
पितृ पक्षाशी जडले नाते........

अविनाश

करुणहे ठिकाण

प्रतिक्रिया

प्रास's picture

4 Oct 2012 - 12:52 am | प्रास

सुरूवातीला ती त्या सॉलोमन ग्रंण्डीवाल्या इंग्लिश कवितेसारखी पुढे जाणारी काकाश्रींची कविता एकदम पितृपक्षाकडे अशी काही झुकते की पहिल्या वाचनातच काकाश्रींचा हेतु साध्य झाल्याची जाणीव होते.

लगे रहो, काकाश्री!

:-)

ज्ञानराम's picture

4 Oct 2012 - 9:25 am | ज्ञानराम

मस्त

अत्रुप्त आत्मा's picture

4 Oct 2012 - 7:10 pm | अत्रुप्त आत्मा

केस उगवले..दाढी केली
नव्या जगाशी जडले नाते......

इथुन पुढच्या जगाशी जास्त सहमत...
=============================================
अवांतर-त्या अधिचेही जग आणी नाते मान्य,पण ते नुसतेच नवे आहे,,,मी अधोरेखित केलेल्या ''पुढच्यात'' नाविन्य(ही) आहे.म्हणुन ते जास्त मान्य....! ;-)