एक खटकलेली बातमी ...

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in काथ्याकूट
26 Jun 2008 - 3:26 pm
गाभा: 

गेल्याच महिन्यात वर्तमानपत्रात एक बातमी वाचली...
मथळा होता " लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार" .........
असल्या बातम्या सतत वाचनात येतात... ही सुद्धा वाचली , त्यात नेहमीप्रमाणेच

..." एक गावाकडची मुलगी होती, कॉलेजात जाणारी , सज्ञान ..तिथे हा एक ओळखीचा मुलगा / बाप्या आला...तिला तो आवडला, प्रेम निर्माण झालं ... घरच्यांची परवानगी मिळणार नाही म्हणून मग त्याने तिला शहरात (पळवून !!! )आणलं... ते दोघे सहा महिने वेगवेगळ्या लॉजवर राहिले, वेगवेगळ्या शहरात राहिले, फिरले... मग नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.. मग ही पोलीसात गेली आणि त्याच्यावर बलात्काराचा आरोप करत फिर्याद दाखल केली..."....

थोड्याफार फरकाने या बातम्या अशाच असतात...
मला या प्रकारच्या बातम्यांमधली विसंगती नेहमी खटकते.... आमीष म्हणजे काय?
त्याने तिला फसवले ,हे मान्य पण म्हणून बलात्काराचा गुन्हा कसा काय ?? सहा महिने इतक्या लॉजमध्ये हिंडत हिंडत हा तिच्यावर बलात्कार करत होता काय ?? बलात्काराची व्याख्या काय?
...
इथे कोणी कायदा जाणत असेल तर कृपया स्पष्ट करावे... त्याने लग्नाला नकार दिला म्हणून ; सहा महिन्यांपासून घडत असलेल्या व तिच्या संमतीने होत असलेल्या रूटीन घटनेचे एकदम बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात रूपांतर झाले?
हे कसे काय बुवा ?किंवा त्याने तिच्याशी सहा महिन्यांनी लग्न केले असते तर मग पूर्वी घडलेल्या त्या सार्‍या घटना गुन्हा नव्हत्या???
एखाद्या गुन्ह्याची व्याख्या इतकी सापेक्ष कशी असू शकते ?? ( तीच घटना --- असे घडले तर गुन्हा आणि तसे घडले तर गुन्हा नाही..)

यात पुरुषाची चूक आहेच, पण बाई भासवते तितकी इनोसंट भोळी भाबडी कशी काय ? साध्या शब्दांत बोलायचे तर तिने सहा महिने काय त्या क्षणांचा आनंद लुटला नसेल ? म्हणजे आधी "जमानेसे क्या डरना " टाईप सिनेमा प्रमाणे क्रांती करायला पळून जायचे ,तो भौ पळाला की मग एकदम क्रांती वगैरे विसरून पोलीस केस करायची ?

की आम्ही पूर्वीच्या एका धाग्यात लिहिल्याप्रमाणे ही स्त्री " प्रेमात पडल्यावर मला बाई जबरदस्तीच आवडते" अशा विचारांची असते?? आणि लग्न करायला नकार मिळाल्यावर तिला साक्षात्कार होतो की आपल्यावर बलात्कार झाला ???? ही तर जबाबदारी झटकणं झालं...
______________________________
लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवणे याबाबत ज्याचंत्याचं वैयक्तिक मत असलं तरी ते अत्यंत जबाबदारीचं काम आहे , असं आमचं वैयक्तिक मत आहे....
स्वतः केलेल्या कामाची जबाबदारी न घेता दुसर्‍यावर खापर फोडणं सर्वथा चूक...

प्रतिक्रिया

शेखर's picture

26 Jun 2008 - 3:35 pm | शेखर

मास्तर ,

एक चांगल्या विषयास तोंड फोडल्या बद्दल अभिनंदन...

परंतु मला वाटते कि फसवुन ठेवलेला शरीरसंबध हा कायद्याने गुन्हा आहे. हे एक प्रकारचे लैंगिक शोषण आहे आणि कायद्यास अमान्य आहे..

शेखर

कौस्तुभ's picture

26 Jun 2008 - 3:39 pm | कौस्तुभ

त्याने लग्नाला नकार दिला म्हणून ; सहा महिन्यांपासून घडत असलेल्या व तिच्या संमतीने होत असलेल्या रूटीन घटनेचे एकदम बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात रूपांतर झाले?

...विचार करण्यासारखा प्रश्न! यात सामाजीक संकेत पहाता दोन्हीही तितकेच गुन्हेगार आहेत.
बलात्कारा मध्ये 'बल' हा शब्द आहे, जर असे संबंध ठेवताना बळाचा वापर झालाच नसेल तर, तो
बलात्कार कसा होउ शकतो, आणि हल्ली स्त्री सबला आणि सुशीक्षीत झाली आहे, तेंव्हा वरचा प्रसंगात तो बलात्कार होउच शकत नाही !!!

ऋचा's picture

26 Jun 2008 - 3:40 pm | ऋचा

मला असं वाटतं की ती मुलगी का त्या मुलाला नाही म्हणाली नाही?
का ती असं बोलली नाही की आपण आधी लग्न करुयात?
म्हणजे असा त्याचा अर्थ होतो की तिलाही ते हवं होतं.

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

भडकमकर मास्तर's picture

26 Jun 2008 - 3:50 pm | भडकमकर मास्तर

म्हणजे असा त्याचा अर्थ होतो की तिलाही ते हवं होतं.
करेक्ट ...आणि मग कांगावा का?

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

26 Jun 2008 - 3:49 pm | भडकमकर मास्तर

ती तिच्या मर्जीने त्याच्याबरोबर पळून गेली...
तिच्या मर्जीने संबंध ठेवले...
( त्याने कोणतेतरी कर्ज फेडणे, नोकरी लावून देणे, बढती देणे अशा आमिषाने हे केले तर एक वेळ शोषण होईल)
( याच लिस्ट मध्ये लग्न लावणे येते का? आले तर आमचे आर्ग्युमेंटच संपले की काय?? )

म्हणून तर म्हणतो, त्याने तिच्याशी सहा महिन्यांनी लग्न केले असते तर मग पूर्वी घडलेल्या त्या सार्‍या घटना गुन्हा नव्हत्या???
जर या प्रश्नाचे उत्तर "त्या घटना गुन्हा होत्या " असेल तर लग्नानंतरही त्या गुन्हाच असल्या पाहिजेत.
आणि "त्या घटना गुन्हा नव्हत्या" असे उत्तर असेल तर आत्ता बलात्कार झाला असे तिने का म्हणावे??

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अवलिया's picture

26 Jun 2008 - 3:49 pm | अवलिया

माझ्या पोलिसांमधील मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार

९५ टक्के बलात्काराच्या केसेस सेटलमेंट नीट न झाल्यामुळे बाई फिर्याद करते आता बोला

नाना

पद्मश्री चित्रे's picture

26 Jun 2008 - 3:58 pm | पद्मश्री चित्रे

जर स्त्री कायद्याने सज्ञान असेल आणि तिच्या मर्जीने शारिरिक संबंध ठेवले गेले असतील तर तो कायद्याने बलात्कार मानला जात नाही.
इथे तसेच असेल ,तर ती फसवणुक म्हणता येइल.. बलात्कार नाही..

भडकमकर मास्तर's picture

26 Jun 2008 - 4:01 pm | भडकमकर मास्तर

धन्यवाद,
तसे असेल तर गुन्हा नोंदवतानाही या पद्धतीने नोंदवला जाऊ नये आणि वर्तमानपत्रांनी सुद्धा बातमी देताना काळजी घ्यायला हवी...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

साती's picture

26 Jun 2008 - 4:00 pm | साती

आय्.पी.सी. ३७५ नुसार एखाद्या पुरूषाने एखाद्या स्रीशी तिच्या मर्जीविरूद्ध केलेल्या संभोगाला बलात्कार म्हणतात. जर ती स्त्री त्या पुरुषाची पत्नी असेल आणि तिचे वय १५ वर्षांपेक्षा जास्त नसेल तर तिच्या मर्जीने केलेल्या या कृत्यालाही बलात्कारच समजले जाते. जर ती स्त्री पत्नी नसेल आणि तिचे वय १६ वर्षांपेक्षा जास्त नसेल तर तिच्या मर्जीने केलेले कृत्यही बलात्कारच.
आपण म्हणता त्याप्रकारे सर्वकाही राजीखुशीने करून नंतर बलात्काराचा गुन्हा नोंदविल्याच्या खूप केसेस आहेत. अशा केसेसमध्ये एक्सपर्ट ओपिनियनसाठी कोर्टात जावे लागले आहे. तेव्हाचे एकंदर सवालजबाब फारच मजेशीर असतात.
साती

भडकमकर मास्तर's picture

26 Jun 2008 - 4:22 pm | भडकमकर मास्तर

अशा केसेसमध्ये एक्सपर्ट ओपिनियनसाठी कोर्टात जावे लागले आहे.
योग्य माहितीबद्दल धन्यवाद...
तेव्हाचे एकंदर सवालजबाब फारच मजेशीर असतात.
हम्म्म.... कल्पना येतेय थोडीशी...
(शक्य असल्यास, आपल्याला योग्य वाटल्यास) एखादी झलक देता येईल का?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

काळा_पहाड's picture

26 Jun 2008 - 4:12 pm | काळा_पहाड

ते दोघे सहा महिने वेगवेगळ्या लॉजवर राहिले, वेगवेगळ्या शहरात राहिले, फिरले... मग नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.. मग ही पोलीसात गेली आणि त्याच्यावर बलात्काराचा आरोप करत फिर्याद दाखल केली..."....

मला वाटते प्रेमाच्या धुंदीत ती त्याच्याबरोबर पळाली तेव्हा तिचा बावळटपणा म्हणा अथवा मुर्खपणा 'हा आपल्याशी लग्न करेल ' हा विश्वास तिला असावा.
मात्र सहा महिन्यांनी जेव्हा त्याने नकार दिला तेव्हा तिच्यापुढे तीन पर्याय होते :
१ . आत्महत्या
२. आलीया भोगासी असावे सादर - या मार्गाने ती कुठे पोहोचेल हे शहाण्यास सांगणे न लगे.
३. घरी परतणे. त्यासाठी तिला 'फेस सेविंग' की काय म्हणतात ते हवे. त्यासाठी ही बलात्काराची ष्टोरी.
काळा पहाड

भडकमकर मास्तर's picture

26 Jun 2008 - 4:16 pm | भडकमकर मास्तर

काळा पहाड , धन्यवाद
३. घरी परतणे. त्यासाठी तिला 'फेस सेविंग' की काय म्हणतात ते हवे. त्यासाठी ही बलात्काराची ष्टोरी.
हे एकदम पटण्यासारखे...
एकूण कायदा हे प्रकरण फारसे गंभीररित्या घेत नाही असे दिसते, ते योग्यच......
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

26 Jun 2008 - 4:12 pm | विसोबा खेचर

ढोबळ मानाने सांगायचं तर १८, आणी काही केसेस मध्ये १६ वर्षांवरील स्त्रीशी तिच्या संमतीविरुद्ध जर बळजबरीने शारिरिक संबंध ठेवले किंवा तसे करण्याचा प्रयत्न केला तर तो भारतीय दंड संविधान कलम ३७५, ३७६ अनुसार बलात्काराचा गुन्हा ठरतो.

आणि जरी संमती असली तरी १८ वर्षांखालील आणि काही केसेसमध्ये १६ वर्षाखालील मुलीशी शारिरिक संबंध ठेवल्यास तो बलात्काराच गुन्हा ठरतो!

अर्थात, कलम ३७५, ३७६ बद्दल ही ढोबळ माहिती झाली. याची उपकलमे बरीच आहेत...

आपला,
(फौजदारी दाव्यांचा अभ्यास असलेला व स्वत: मोटर वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत शिक्षा भोगलेला!) तात्या.

तिमा's picture

29 Jun 2008 - 3:27 pm | तिमा

फौजदारी दाव्यांचा अभ्यास असलेला व स्वत: मोटर वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत शिक्षा भोगलेला!) तात्या
काय की बुवा, ह्याचा अर्थ कळंना, म्हंजी तुमी मोटरीवर बलात्कार केला व्हता का वो ?

ऋचा's picture

26 Jun 2008 - 4:22 pm | ऋचा

ते दोघे सहा महिने वेगवेगळ्या लॉजवर राहिले, वेगवेगळ्या शहरात राहिले, फिरले... मग नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.. मग ही पोलीसात गेली आणि त्याच्यावर बलात्काराचा आरोप करत फिर्याद दाखल केली..."....

मुळात ते दोघे पळुन गेले ही त्यांची महाचुक आहे.
आणि मग पळुन गेल्यावर रहायचा प्रश्न कायम असतोच कारण ह्या केसेस मधे मुलगा ८०% नालायक्,कामचुकार,.... असतो.
आणि मग मुलीने आणलेले पैसे संपले की तीला टांग देऊन निघुन जायच.
मी असं म्हणत नाहीये की मुलगाच चुक आहे, मुलगीही तितकीच जबाबदार आहे.
मग हे अस सगळ झाल्यावर तीने मुलावर केस करु नये. ज्यावेळी पळुन जायचा निर्णय घेतला होता तेव्हा अक्कल शेण खात होती का?
"प्यार अंधा होता है" वैगेरे ह्या गोष्टी ठीक आहेत पण त्या सिनेमात.
खर्‍या आयुष्यात अस क्वचितच कधी घडतं.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

चाणक्य's picture

26 Jun 2008 - 4:25 pm | चाणक्य

म्हणजे असा त्याचा अर्थ होतो की तिलाही ते हवं होतं.

सहमत. लग्नाची वेळ आल्यावर त्याने नकार दिला पण ईतके महीने "जे" चालंलं होतं ते अर्थातच दोघांच्याही संमतीनं च चालू होतं. 'बलात्काराची' कायदेशीर व्याख्या पुढीलप्रमाणे आहे
(दुवा : http://www.netlawman.co.in/acts/indian-penal-code-1860.php?pageContentID=516)

375. Rape –

A man is said to commit "rape" who, except in the case hereinafter excepted, has sexual intercourse with a woman under circumstances falling under any of the six following descriptions –

Firstly – Against her will.

Secondly – Without her consent.

Thirdly – With her consent, when her consent has been obtained by putting her or any person in whom she is interested in fear of death or of hurt.

Fourthly – With her consent, when the man knows that he is not her husband, and that her consent is given because she believes that he is another man to whom she is or believes herself to be lawfully married.

Fifthly – With her consent, when, at the time of giving such consent, by reason of unsoundness of mind or intoxication or the administration by him personally or through another of any stupefying or unwholesome substance, she is unable to understand the nature and consequences of that to which she gives consent.

Sixthly – With or without her consent, when she is under sixteen years of age.

Explanation.-Penetration is sufficient to constitute the sexual intercourse necessary to the offence of rape.

Exception.-Sexual intercourse by a man with his own wife, the wife not being under fifteen years of age, is not rape.

या व्याख्येनुसार बघितलं तर मुलगी १६ वर्षाखालील असेल तर तिची मर्जी असो वा नसो, तो बलात्कार म्हणून गणला जातो. पण जर तिचं वय १६ वर्षापेक्षा जास्त असेल आणि तिने स्वखुषीने शरीरसंबंध ठेवले आणि ती घटना सबसेक्शन ३/४/५ च्या आवाक्याबाहेर असेल तर तो बलात्कार नसेल.

मास्तर, घडलेल्या घटनांचे details समजल्याशिवाय काही निष्कर्ष काढता येणार नाही

केशवराव's picture

27 Jun 2008 - 1:52 am | केशवराव

चणक्यने केलेले विवेचन अतिशय मुद्देसूद आहे.
पटकन कुठल्या निष्कर्शाला येणे योग्य नव्हे.

झकासराव's picture

26 Jun 2008 - 7:00 pm | झकासराव

सहा महिन्यांपासून घडत असलेल्या व तिच्या संमतीने होत असलेल्या रूटीन घटनेचे एकदम बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात रूपांतर झाले>>>>>>>>>>..
मला वाटत की त्या कलमांमध्ये लग्नाच किंवा इतर कसलही आमिष दाखवुन शरिरसंबंध ठेवणे (हे त्या बाइच्या मर्जीने असल तरी) हा गुन्हाच आहे.

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

आंबोळी's picture

26 Jun 2008 - 7:42 pm | आंबोळी

एका अत्यंत संवेदनशील विषयाला तोंड फोडल्या बद्दल मास्तर तुमचे अभिनंदन!
पेपरवाल्याना आणि एकुणच मेडियाला चटपटीत बातम्या पाहिजे आसतात. आता याच बातमीचे बघा..
" लग्नाचे आमीष दाखवून तरुणीला फसवले" अशी बातमी आसति तर गेला आसता का तुम्ही ती वाचायला? पण " लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार" अशी हेड्लाईन वाचुन लगेच तुम्ही पुर्ण बातमी वाचुन काढली आणि त्या अनुशंगाने इथे एक लेख ही चढवलात.....
असो.
पण तुम्ही उपस्थीत केलेले मुद्दे एकदम बिनचुक आहेत.

अवांतर : तेवढे ६ महिने एखादीला फिरवुन पुन्हा बलात्काराच्या केस मधे न आडकण्याचे क्लासेस काढता आले तर बघा... (ह.घ्या)

आंबोळी

मयुरयेलपले's picture

26 Jun 2008 - 8:07 pm | मयुरयेलपले

जरा त्यांच्यात आसलेला मुर्खपणा (प्रेम) समजुन घ्यायला हवा.. (बहुतांश केलेले निरीक्षण)
प्रेमात पहिल्यांदा बर्याच विषयावर बोलता बोलता ते अनेक आनाभाका घेतात ... "जे काय माझ ते तुझ", "जगु सोबत, मरू पण सोबत" आणि आसे बरेच काहि... आणि या नियमां प्रमाणे ते सर्वस्व (तन, मन, धन) एकमेकाला देवुन बसतात (याला निस्वार्थ, खरे प्रेम करनारे आपवाद आसतात)...पण ज्यांच प्रेम हे आकर्षनातुन निर्माण झाल आहे... ते फक्त शारिरिक सोंदर्य आणि वासना या कडेच लक्ष देतात ...
आणि यातुन अविचारि लोक (प्रेमि युगुल) लग्ना आगोदर शरिर संबंध ठेवायला हि कमि करत नाहित... पण शेवटि प्रेमान पोट भरत नाहि हे जेव्हा त्या मुलिला /मुलाला कळतं तेव्हा त्या (मुला/मुलि)पासुन सोडवणुक करण्याचा प्रयत्न केला जातो... आणि यातच त्यांचे आइ वडिल हे कायदे सल्लागाराकडुन सल्ला घेतात आणि आपलि बाजु किति पांढरि आहे हे दाखवण्या साठि वाट्टेल ते आरोप विरुध्द पक्षावर केले जातात.......... आणि हे तर का केल जात? कारण त्यांना हे समाजाला दाखवायच आसत माझ पोर लै गुणि होत पण.
फसवल त्याला...!!

आपला मयुर

अभिरत भिरभि-या's picture

26 Jun 2008 - 8:12 pm | अभिरत भिरभि-या

मध्यंतरी एका वाहिनीवर एक बातमी बघितली ...
यात एका युवतीने युवकावर आरोप केला होता .. व याला उत्तर म्हणुन मुलाने लैगिक अत्याचाराची/ जबरदस्तीची तक्रार गुदरली होती ...
कायद्याच्या दृष्टीकोनातून स्त्री बलात्कार -कर्ती असणे शक्य आहे का ?

धनंजय's picture

27 Jun 2008 - 4:36 am | धनंजय

लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवणे याबाबत ज्याचंत्याचं वैयक्तिक मत असलं तरी ते अत्यंत जबाबदारीचं काम आहे , असं आमचं वैयक्तिक मत आहे....

+१. हेच मत लग्न-बाह्य संबंधांबद्दलही. (म्हणजे लग्नाचे वचनही नसून संबंध ठेवण्याबद्दल.)

तसेच लग्नानंतरही शरीरसंबंध ठेवताना जोडीदारांनी एकमेकांच्या इच्छेचा मान राखावा - केवळ भारतातला कायदा मुभा देतो म्हणून संमतीच्या सोपोस्काराला फाटा देऊ नये.

मेघना भुस्कुटे's picture

27 Jun 2008 - 10:24 am | मेघना भुस्कुटे

बलात्कार या शब्दाला असलेला आक्षेप समजू शकतो. पण शरीरसंबंधांना मुलीची संमती असल्यामुळे घडलेल्या प्रकारात काही गुन्हाच नाही, असं मात्र नाही.
लग्न हा मुलीच्या उपजीविकेचा एक मार्ग मानला गेला आहे. आता परिस्थिती बरीच बदललेली असल्यामुळे सुदैवाने त्यासाठी लग्नावर अवलंबून राहण्याची गरज नाही खरी. पण तरीही सामाजिक स्वीकार, प्रतिष्ठा, अनेक आर्थिक आणि कायदेशीर फायदे यांसाठी लग्नाच्या शिक्कामोर्तबाची गरज अजूनही असतेच. शिवाय नवर्‍याखेरीज इतर कुणाशीही संबंध म्हणजे 'अब्रह्मण्यम' ही एक खोलवर रुजलेली समजूत अजूनही आपल्याकडे आहेच.
या सगळ्याचा विचार करता, वरील घटना बलात्काराची नसेलही. पण त्यात त्या मुलाचा काहीच गुन्हा नाही, असं मात्र अजिबात म्हणता येणार नाही.

ऋचा's picture

27 Jun 2008 - 10:29 am | ऋचा

>>नवर्‍याखेरीज इतर कुणाशीही संबंध म्हणजे 'अब्रह्मण्यम' ही एक खोलवर रुजलेली समजूत अजूनही आपल्याकडे आहेच.

ही समजुत नाहीय.
हे असच असावं. आणि जर कोणाला तसं वाटत नसेल तर त्यांनी हे असं घडल्यावर त्याचा तमाशा घालु नये. जे आहे ते स्विकारावं,
कोणालाही दोषी मानु नये.

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

ज्यावेळी प्रेमप्रकरण चालु होते त्यावेळी कोणीच लग्नाबद्दल बोलत नाही. पहिला वाक्य असते कि तु मला आवडतेस,माझे तुझ्यावर प्रेम आहे ,हे हळुहळु वाढत जाते. ती त्याला हो म्हणते,मग चोरुन भेटायचे कुठे हे ठरवले जाते.चोरुन भेटताना कधी शारीरिक आकर्षण निर्माण होते हे कळत पण नाही. त्या आकर्षणातुन मिळणारा आनंद हवा हवा वाटु लागतो. सुरुवातीला मला हे आवडत नाही, आता नको लग्नानतंर बघु. अशी कारणे एकमेकाना सांगितली जातात. पण एक दिवस तो तिला लॉज नेतो. इथे आपण कशाला आलो हे तिला नक्कीच माहित असते. जे व्ह्यायचे ते होऊन जाते.सगळे घडुन गेल्यावर रडारड सुरु होते.तो तिला शांत करतो. परत लॉज न भेटण्याचे ठरते.तो तिला टाळु लागतो नंतर ती ला राहवत नाही व स्वःता त्याला लॉज भेटायला बोलवते. ह्यातुन पुढे लफडे चालु होते.
वरील प्रसंग जवळजवळ सर्व म्हणजे ९०% सगळ्या ठिकाणी घडत असतो. चुक एकाची नसते ती दोघाची असते.एकांतात भेटायला तो बोलवतो म्हणजे नेमके काय होणार त्या मुलीला पण माहित असते.तीलाते अनुभवायचे असते म्हणुन ती पण जाते.एकांतात तो अन ती काय लग्नाची चर्चा करणार असतात काय?
पण पळुन जाताना मात्र लग्न करायचे ह्या एकच उद्देश असतो. मुलीने त्या मुलाशी सबंध ठेवण्या अगोदर लग्ननाची काय काय तयारी त्याने केली आहे हे विचारले पाहिजे,वरिल प्रकरणात ती ६ महिने त्याच्या बरोबर वेगवेगळ्या लॉज वर मज्ज्जा करत बसली . ह्यात तिचा दोष नक्की आहे. परंतु एकादी मुलगी प्रेमाखातर तुमच्या बरोबर पळुन आली आहे, तिच्याशी लग्न न करता तुम्ही मज्जा करता व तीला सोडुन देता हा मोठा विश्वासघात आहे.त्यामुळे त्या मुलाला सहानुभुती दाखवणे ही पण एक चुक आहे.त्यामुळे हा बलात्काराचा गुन्हा होऊ शकतो. असे माझे मत आहे.
वेताळ

डॉ. श्लोक _भातखंडे's picture

28 Jun 2008 - 9:34 am | डॉ. श्लोक _भातखंडे

परंतु एकादी मुलगी प्रेमाखातर तुमच्या बरोबर पळुन आली आहे, तिच्याशी लग्न न करता तुम्ही मज्जा करता व तीला सोडुन देता हा मोठा विश्वासघात आहे.त्यामुळे त्या मुलाला सहानुभुती दाखवणे ही पण एक चुक आहे.
सहमत ....


त्यामुळे हा बलात्काराचा गुन्हा होऊ शकतो. असे माझे मत आहे.

१०० % असहमत..

म्हणून तर वरती बलात्काराच्या गुन्ह्याची कोणीतरी व्याख्या दिलेली आहे.... विश्वासघात म्हणजे बलात्कार आहे का???

आपला अभिजित's picture

28 Jun 2008 - 10:44 am | आपला अभिजित

मित्रहो,

व्रुत्तपत्रांना चवीने द्यायला आवडते, असे म्हणून तुम्हीही बरीच चवीचवीने चर्चा केली आहे. असो.

बलात्काराची व्याख्या वरती कुणीतरी दिलीच आहे. त्यात `पेनिट्रेशन ऑफ पेनिस इन्टू व्हजायना' याचा पण समावेश आहे. म्हणजे पेनिट्रेशन नसेल, तर तोही बलात्कार धरला जात नाही, बहुधा. कोर्टात तर तो सिद्ध व्हायला बरेच तांत्रिक मुद्दे असतात. ते अनेकदा सिद्ध होत नाहीत.

राहता राहिला प्रश्न व्रत्तपत्रातल्या बातम्यांचा आणि पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यांचा. कोणतीही महिला तिच्यावर बलात्काराचा आरोप करू शकते. अनेकदा हा आरोप संमतीने झालेले शरीरसंबंध अंगाशी आले, की केला जातो, हे तर खरंच आहे. काही वेळा कॉलगर्ल आणि वेश्याही हा आरोप करतात. पण तांत्रिक द्रुष्ट्या तो बलात्कार म्हणूनच नोंदविला जातो. बातम्यांमध्येही तसाच उल्लेख करायला लागतो.

मित्रान्नो,
"बाईच्या मर्जीने झाला तर सत्कार नाही तर बलात्कार." हीच सोपी व्याख्या आहे. जो वर तीची मर्जी आहे तो पर्यन्त तो बलात्कार ठरत नाही.

आंबोळी's picture

30 Jun 2008 - 1:38 pm | आंबोळी

बाईच्या मर्जीने झाला तर सत्कार नाही तर बलात्कार
हे सगळ्याना माहित आहे हो.... इथे प्रश्न पडलाय की ६ महिने झालेल्या सत्काराचे अचानक बलात्कारात रुपांतर कसे होते?
सहा महिन्यांपासून घडत असलेल्या व तिच्या संमतीने होत असलेल्या रूटीन घटनेचे एकदम बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात रूपांतर झाले?इति मास्तर
मुलाने लग्नाचे आमीष दाखवले आणि नंतर वायदा पाळला नाही म्हणून संमतीने घडला असला तरी तो बलात्कारच असा एकन्दर वरिल चर्चेतून गोषवारा निघेल.

यावरून "काय द्याच बोला" मधील एक संवाद आठवला.... "सिध्ध काहीही करता येइल हो... पण त्यामुळे वास्तव कस बदलेल?"

आता दुसरी केस बघू....काही वर्षापूर्वी वर्तमानपत्रात आलेली..

एका मध्यम वयाच्या(वय ३५-४०) लग्न झालेल्या स्त्रीने शेजारिच रहाणार्‍या एका कॉलेज मधे जाणार्‍या मुलावर (वय १७-१८) बलात्काराची फिर्याद दाखल केली.
पोलिसानी अधिक तपास करता असे कळाले की त्या स्त्रीने त्याला व्यवस्थीत गटवले होते. नवरा घरात नाही हे बघुन ४-५ वेळा दोघांच्य संमतीने सत्कार झालेला होता . नंतर त्या मुलाला उपरती झाली व त्याने संबंध ठेवायला नकार दिला म्हणून चिडून त्या स्त्रीने त्या मुलावर बलात्काराचा आरोप केला. आता इथे बाईच्या मर्जी फिरली म्हणून लगेच हा बलात्कार कसा ठरतो?
या केस मधे संबंध ठेवायच्या आधी कुठलेही अमीष कुणीही कुणालाही दाखवले नव्हते. असे आसेल तर नक्की कोण कुणावर ,कुठल्या कलमान्वये बलात्काराचि फिर्याद गुदरू शकतो?

इनोबा म्हणे's picture

30 Jun 2008 - 2:08 pm | इनोबा म्हणे

परंतु एकादी मुलगी प्रेमाखातर तुमच्या बरोबर पळुन आली आहे, तिच्याशी लग्न न करता तुम्ही मज्जा करता व तीला सोडुन देता हा मोठा विश्वासघात आहे.त्यामुळे त्या मुलाला सहानुभुती दाखवणे ही पण एक चुक आहे.
पण एखाद्या मुलीने मुलाबरोबर मज्जा मारुन नंतर लग्नाला नकार दिल्यास, त्या मुलीविरुद्ध मुलाला बलात्काराचा गुन्हा नोंदवता येऊ शकतो का? अशावेळी त्या मुलीला सहानुभुती दाखवणे ही सुद्धा चूकच म्हणावी लागेल.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर