तु ..

सुहास..'s picture
सुहास.. in जे न देखे रवी...
28 Sep 2012 - 4:20 pm

प्रेरणा : पळुन गेली आहे.

तु चॉकलेट केक आहेस,
'क' मालिकेत ला ब्रेक आहेस ,
पाच कोटीचा चेक आहेस,
... साक्षात मधुबाला चा रि-मेक आहेस,

तु खंबाटकी घाट आहेस
ऊन्हाळ्यातला गार पाण्याचा माठ आहेस,
चंदनाचा पाट आहेस,
मेंदुला आलेली गाठ आहेस,

तु कोल्हापुरी मिर्ची आहेस,
भारत-पाक मॅच च्या टिकीटाची पर्ची आहेस,
मिळवलेली अक्कल खर्ची आहेस,
सत्तेसाठी राखलेली खुर्ची आहेस,

तु माझी दिवाळी आहेस,
आजारपणात फुकटात मिळालेली शहाळी आहेस,
सगळ्यात निराळी आहेस,
बॉलीवुडमधली भन्साळी आहेस,

तु 'झणझणीत सुके मटण ' आहेस,
रवाळ तुपातले वरण आहेस,
कवितेतील चरण आहेस,
फेस-वॉशचा साबण आहेस,

तु 'यॉर्कर' आहेस.
महागडे पेन पार्कर आहेस,
हार्ट बीटवणारी वर्कर आहेस,
पर्मनंट मार्कर आहेस,

( आता तरी मला कवि म्हणाल काय ? )

कोडाईकनालभूछत्रीऔषधोपचार

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

28 Sep 2012 - 5:27 pm | श्रावण मोडक

आहेस तू कवी! एकूण अशा अनेक कविता वाचल्या आहेत. त्यात ही एक आरामात बसते. तेव्हा तू कवी आहेस!

नाना चेंगट's picture

28 Sep 2012 - 5:38 pm | नाना चेंगट

आधुनिकोत्तर कवीराज

जेनी...'s picture

28 Sep 2012 - 10:06 pm | जेनी...

हो , तु कवि आहेस
तु रटाळ आहेस
पण तु कवि आहेस !!