काल एका दूर चित्र वाहीनीवर एक गृहिणी कालाजाम नावाचा एक पदार्थ करून दाखवीत
होत्या. त्यासाठी त्यांनी समप्रमाणात पनीर व खवा घेऊन त्यात पुरेसे
कॉर्नचे पीठ मिसळून गोळे करून ते तुपात तळून घेतले होते व त्यानंतर त्यांना
पाकात सोडले होते. गोळ्यांचा आकार गुलाबजाम पेक्षा मोठा व रंग अधिक तांबूस
होता.
आदले दिवशी म्हणजे तारीख २० रोजी बंध, हरताळ व चक्काजाम ची मोहीम सरकारविरोधी
पक्षांनी राबविली होती. म्हणून एक विचार मनात आला की वर दिलेल्या पाक क्रियेत
पनीरच्या जागी चक्का वापरला तर चक्काजाम नावाचा एक नवीन पदार्थ करता येईल.
मी नेहमीच असे पदार्थ करावयास सांगतो (करतो असे नाही). तरी मिसळपाववर वेळोवेळी
पाकक्रिया सादर करणार्या सदस्यांनी हा पदार्थ करून पाहण्यासारखा आहे कि नाही
हे ठरवावे.
लहानपणी राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या रिकामपणाची कामगिरी या लेखात पाठीचे
धिरडे , बर्फीची चटणी, अब्रूचे खोबरे या व तत्सम पदार्थांच्या पाककृती विषयी
वाचल्याचे स्मरते.
चक्काजाम तीतकाच काल्पनिक ठरणार नाही असे वाटते.
रमेश आठवले
चक्काजाम
गाभा:
प्रतिक्रिया
22 Sep 2012 - 6:00 pm | बापु देवकर
नाव छान आहे...करुन दाखविली असती तर कळाले असते..
23 Sep 2012 - 7:37 am | शरद
पूर्वांचलमध्ये हा पदार्थ दह्याबरोबर खातात. हा इतका लोकप्रिय आहे की प्रत्येक आठवड्यात एकातरी राज्यात "चक्काजाम" झाल्याची बातमी वर्तमानपत्रात झळकतेच !
शरद
23 Sep 2012 - 11:05 am | तिमा
धागा उच्च अभिरुची दाखवणारा आहे. तो पाकक्रिया या सदरात आणखी खुलून दिसला असता. वाचनखुणेत साठवण्यायोग्य.
23 Sep 2012 - 12:01 pm | रमेश आठवले
मी लेख पाककृती या विभागात टाकला होता. काल रात्रीपर्यंत हा लेख त्याच विभागात होता. आज सकाळी तो चर्चा सदरात आलेला दिसला . हा विभाग बदलण्याचा निर्णय बहुधा संपादक मंडळाचा असावा.