शास्त्रिय गणकयंत्र घेण्याबाबत सल्ला हवाय

दादा कोंडके's picture
दादा कोंडके in काथ्याकूट
16 Sep 2012 - 1:06 am
गाभा: 

नमस्कार मंडळी.

कॉलेजात असताना कॅसिओ १०० एफेक्स आणि नंतर ९९१ मॉडेलचं कॅल्क्युलेटर घेतलं होतं. आताही पटकन आकडेमोड करण्यासाठी ऑफीसमध्ये मागच्या आठवड्या पर्यंत हेच वापरत होतो. पण मागच्या सोमवारी ते माझ्या चुकीने खाली पडून फुटलं. मग आता विचार केला की 'परीक्षेला चालणारं पाहिजे' ही अट नसल्यामुळे एखादं जास्तं फंक्षन असणारं मॉडेल घेउया.

आंजावर शोध घेतल्यावर तीनच चांगले ब्रँड असल्याचं समजलं. कॅसिओ, एचपी आणि टीआय. टीआयचे ८४ आणि एन्स्पायर छान आहेत असं वाटतं. काही फोरम्स वरती रिवियुस देखील वाचले. पण याची किंमत ६०००-१०००० मध्ये आहे. कॅसिओ-एफ एक्स ९७५० व ९८६० छान आहेत व किंमत पण ५००० च्या आतच आहे, पण लेआउट वरून विषेश वाटत नाहीत. त्यामुळे मी गोंधळून गेलो आहे. मिपाकरांपैकी कुणी सायंटीफीक कॅल्क्युलेटर वापरत असेल तर सल्ला घेण्यासाठी हा धागा काढला.

माझ्या अटी.

- किंमत १०००० पर्यंत असावी
- कोनीक, कॅल्क्युलस, मॅट्रीक्स, प्रोबॅबिलिटीसाठी वगैरे आकडेमोड करता यावी.
- इलेक्ट्रीकल इंजिनीअरींग साठी लागणारी आकडेमोड करता यावी
- साधी गणितं कमीत-कमी बटणात करता यावी (नाहीतर संगणकावरच मॅथकॅड, मॅटलॅब, एक्सेल वर केलेलं परवडलं)
- आधी कुठलाच ग्राफीक कॅल्क्युलेटर वापरत नसल्यामुळे सवयीचा (कंपॅटीबिलिटीचा) प्रश्न नाही

सुचना: खरडफळ्याची "विझिबीलीटी" जास्त नसल्याने धागा काढला आहे. काही दिवसांनी धागा उडवला तरी चालेल.

प्रतिक्रिया

लॉरी टांगटूंगकर's picture

16 Sep 2012 - 1:27 am | लॉरी टांगटूंगकर

नेमके त्यावर काय करायच आहे?ग्राफिकल कॅल्सी ची गरज खरच आहे का?का उगाच कंपनी १० के देते म्हणून वापरायचे आहेत?
Casio fx-9860G- II हा उत्तम वाटतोय पण तुमच्या बजेट मध्ये २ येतील :)

आम्ही ९९१इ एस वर खुष आहोत

दादा कोंडके's picture

16 Sep 2012 - 1:47 am | दादा कोंडके

नेमके त्यावर काय करायच आहे?

वरती धाग्यात सांगितलं आहे. पण इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्समधली आकडेमोड करण्यासाठी उपयोग करता येइल असा. जसं की डिफरन्शियल इक्वेशन्स, लाप्लास, वगैरे.

ग्राफिकल कॅल्सी ची गरज खरच आहे का?का उगाच कंपनी १० के देते म्हणून वापरायचे आहेत?

कॅल्क्युलेटरसाठी कंपनी पैसे देत नाही. पण ऑफीसमध्येच वापरायचा आहे.

Casio fx-9860G- II हा उत्तम वाटतोय पण तुमच्या बजेट मध्ये २ येतील

हो. मग तर छानच. बजेटचा आकडा जास्तीत जास्त असा आहे.

आम्ही ९९१इ एस वर खुष आहोत

अच्छा.

अमेरिकन त्रिशंकू's picture

16 Sep 2012 - 3:36 am | अमेरिकन त्रिशंकू
दादा कोंडके's picture

16 Sep 2012 - 5:19 pm | दादा कोंडके

चर्चा वाचली. आता यादीमध्ये एचपी-५०जी याची सुद्धा भर पडली आहे. पण तरीही आरपीएन पेक्षा अल्जेब्राइक एंट्री सोपी वाटते. (स्टॅकचा फायदा कळूनही).

आता गोंधळ जास्तच वाढला आहे. :)

मन१'s picture

16 Sep 2012 - 8:52 am | मन१

गणकयंत्राबद्दल फारसे ठाउक नाही. शंका:- डेस्कटॉप/लॅपटॉपवरच एखादे चांगले सॉफ्टवेअर इन्स्टॉल करुन घेणे जमणार नाही का? ते अधिक सोयीस्कर नसेल का?

दादा कोंडके's picture

16 Sep 2012 - 5:22 pm | दादा कोंडके

मी पण हे सगळं वापरतो पण तरीही हँडी काहितरी असलं तर छानच आहे कारण ही दोन सॉफ्टवेअर्स नेहमीच संगणकावर उघडी असतील हे सांगता येत नाही. आणि खूपच रिसोर्स ग्रीडी असल्यामुळे त्यांच्यासाठी चिल्लर असलेल्या गणितासाठी ३-४ मिनिटे वाट बघायला नको.

चेतनकुलकर्णी_85's picture

16 Sep 2012 - 12:16 pm | चेतनकुलकर्णी_85

एलेक्ट्रीकॅल व इलेक्ट्रोनिक्स आकडे मोडी साठी "matlab" च बेष्ट बघा...नाहीतर कॅल्क्युलेतर चे मनुअल च वाचण्यात वेळ जातो...
कॅल्क्युलेतर फार फार तर trigonometry functions साठी सोयीचा वाटतो...

दादा कोंडके's picture

16 Sep 2012 - 5:20 pm | दादा कोंडके

एलेक्ट्रीकॅल व इलेक्ट्रोनिक्स आकडे मोडी साठी "matlab" च बेष्ट बघा...नाहीतर कॅल्क्युलेतर चे मनुअल च वाचण्यात वेळ जातो...

हो पण एकदा मॅन्युअल वाचलं की कॅल्क्युलेटर जास्त हँडी आहे. मॅटलॅब वगैरे ठिक पण नेहमीच उघडून ठेवत नाही. एखादं सिम्युलेशन करण्याआधी थोडी आकडेमोड करायची झाल्यास अजुन एक मॅटलॅबची खिडकी उघडून करणं अवघड आहे.

कॅल्क्युलेतर फार फार तर trigonometry functions साठी सोयीचा वाटतो...

पण एकदा कॅल्युलेटरची सवय झाली की बाकीची आकडेमोड करायला पण मजा येते. जसं की कॉम्प्लेक्स नंबर्स वगैरे.

गवि's picture

17 Sep 2012 - 12:49 pm | गवि

कितीही सायंटिफिक असलेल्या का असेना पण कोणत्याही कॅल्युलेटरची किंमत १०००० पर्यंत असते हे वाचून वाचा बसली आहे. रुपयेच ना?

आनन्दा's picture

17 Sep 2012 - 1:01 pm | आनन्दा

+१

दादा कोंडके's picture

17 Sep 2012 - 1:43 pm | दादा कोंडके

कितीही सायंटिफिक असलेल्या का असेना पण कोणत्याही कॅल्युलेटरची किंमत १०००० पर्यंत असते हे वाचून वाचा बसली आहे.

बस का राव?
किंमत जास्त वाटते खरी पण एक गुंतवणुक म्हणूनच विचार करतोय.
आणि इतर गॅजेट मध्ये आणि कॅल्क्युलेटरमधला महत्वाचा फरक म्हणजे ही किमान २०-३० वर्षे टिकतात/वापरता येतात. (अर्थात चांगली वापरली तर)

दही: नविन कॅल्क्युलेटर घेतला की याच धाग्यात थोडिशी मनोरंजक तांत्रिक माहिती टाकण्याचा प्रयत्न करेन.