बरबटलेले साहित्यक्षेत्र

Kavita Mahajan's picture
Kavita Mahajan in काथ्याकूट
13 Sep 2012 - 4:07 pm
गाभा: 

अखेर ह.मो. मराठेंना लेखनातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून अटक झाली. १५,००० रु. च्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. एबीपी माझा या चॅनलवर मी या मुद्द्याबाबत बोलले होते, तेव्हा सहसंवादक श्री. सदानंद मोरे म्हणाले होते की,"महाजनताईंचे विचार चांगले आहेत, पण भाबडे आहेत. निवडणुका म्हटलं की हे सारं करावंच लागतं."
हे ऐकून काही बोलण्याची संधी मिळाली नाही, कारण ते समारोपाचं बोलले होते. असंच असेल तर मग उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी उमेदवाराला किडनॅप करणे, मतदारांना पैसे वा काही वस्तू वाटणे, मतपेट्या पळवणे इत्यादी सगळे प्रकारदेखील राजकारणात प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आपण पाहत ऐकत आलेलो असतोच. हे सगळेही साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत होऊ द्यायचे का? कारण 'करावंच लागतं' मध्ये असं काहीही येऊ शकतं आणि निवडणुकांमध्ये ते क्षम्यही मानलं जातं.
"मी जात सांगून मत मागितलं नाही," असं ह.मो. म्हणत असले तरी मुळात जात सांगितलीच कशाला? जातिनिरपेक्ष विचार करणार्‍या दुसर्‍याची जात विचारण्याची व स्वतःहून ( अकारण ) स्वतःची जात सांगण्याची गरज भासत नाही. "असे करणे म्हणजे 'मी नाही त्यातली, कडी लावा आतली' हा प्रकार होतो", असे एक विधान मी केले. तेही अनेकांना आक्षेपार्ह वाटले. जुन्या समर्पक म्हणी आहेत. तिचा अर्थ पाहिला, तर ह.मों.च्या वर्तनाशी ती तंतोतंत जुळते. त्यात मला काही चुकीचे वाटत नाही. ह.मो. जर निवडून आले तर संमेलनावर ब्राह्मणी सावट असेल, असे मत चॅनलवर मांडले गेले. मग संमेलनाचे चिपळूणचे आयोजक यांनीही याचा निषेध केला. एकूण सारे साहित्यक्षेत्र या निवडणुकींच्या धुरळ्यात दरसाली बरबटते, याची मात्र खंत वाटते.

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

14 Sep 2012 - 6:58 pm | अत्रुप्त आत्मा

तथाकथित पुरोगामी साहित्तीक,,, जातिच्या बाबतीत अत्यंत दुधखुळे आणी तितकेच दांभिक असतात, ह.मो.मराठेही तस्सेच आहेत. त्यांच्या पुरोगामित्वाची इतिश्री म्हणजे, इतक्या वर्षांच्या त्यांच्या हयातीत त्यांना जात सोडणे म्हणजे काय..? हेच नीट कळलेलं नाही... त्यामुळे जे त्यांच्या मनात आहे,ते इतरत्र उघडं पडणारच....!

बाकी चालू द्या...!

भाग्या's picture

14 Sep 2012 - 10:39 pm | भाग्या

अत्रुप्त आत्मा दादा
ती हलणारी चित्रे कशी बनवता?

अत्रुप्त आत्मा's picture

16 Sep 2012 - 10:36 am | अत्रुप्त आत्मा

माझ्या खरडवहित भेटा/किंवा व्यक्तिगत निरोप पाठवा,,,तिथे सांगतो. :)

स्पा's picture

13 Sep 2012 - 4:43 pm | स्पा

शतकासाठी शुभेच्छा
आता बघा जातीवरून काय रणकंदन सुरु होईल :)



इस्पिक राजा's picture

13 Sep 2012 - 4:35 pm | इस्पिक राजा

दलित साहित्य संमेलन वेगळे सुरु झाले तेव्हा जातीचे राजकारण सुरु आहे असे वाटले नाही का हो तुम्हाला? त्यावेळेस साहित्यक्षेत्र बरबटल्यासारखे नाही का वाटले?

कॉमन मॅन's picture

13 Sep 2012 - 4:41 pm | कॉमन मॅन

दलित साहित्य संमेलन वेगळे सुरु झाले तेव्हा जातीचे राजकारण सुरु आहे असे वाटले नाही का हो तुम्हाला? त्यावेळेस साहित्यक्षेत्र बरबटल्यासारखे नाही का वाटले?

अगदी सहमत आहे..! त्या वेळी कविताताईंनी काही सरसावून लिहिल्याचे आमच्या पाहण्यात नाही..

आम्हीही सदर कर्यक्रम पाहिला होता. त्यात सदानंद मोरेंनी मांडलेली मते आम्हाला पटली. मोरेसाहेब हे खूपच व्यासंगी आणि सारासार व सांगोपांग विचार करून बोलणारे गृहस्थ वाटले..

असो, बाकी हल्ली ब्राह्मणांवर चिखलफेक करायची फ्यॅशनच सुरू झाली आहे..! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Sep 2012 - 8:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>बाकी हल्ली ब्राह्मणांवर चिखलफेक करायची फ्यॅशनच सुरू झाली आहे..!

अहो कॉमन मॅन, ह.मो.मराठे यांना ही चिखलफेक खपत नव्हती. पूर्वीपासून त्यांच्या मनात हा असंतोष खदखदत होता. ब्राह्मण बंधुंवर होणार्‍या अन्यायाच्या बाबतीत ह.मो. मराठे यांनी ''ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार'' अशी एक पुस्तिका २००४ लिहिली होती. आमचे आदरणीय जालमित्र रावसाहेब यांनी तेव्हाच ते पुस्तक विकत घेतले आणि त्यावर थोडे मंथनही ओसाड गावात घडवून आणले होते, त्याची आठवण आज होत आहे. :)

-दिलीप बिरुटे

नगरीनिरंजन's picture

13 Sep 2012 - 6:05 pm | नगरीनिरंजन

दलित साहित्य संमेलन वेगळे सुरु झाले तेव्हा

फरक आहे. तांत्रिक मुद्दा असा की दलित ही जात नाही. 'दलित' कोणीही होऊ शकते, असू शकते.
तरीही समजा असे म्हटले की दलित या जातीने वेगळे संमेलन केल्याने साहित्य क्षेत्र बरबटले तरी हमोंना अखिल भारतीय साहित्य संमेलनात जातपात आणण्याचा हक्क पोचत नाही. त्यांनीही स्वतःचे वेगळे संमेलन सुरु केले तर गोष्ट वेगळी.
पण मुद्दा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा आहे. त्यात जात-पात कशाला?
असुरक्षित वाटणार्‍यांनी आपले वेगळे संमेलन सुरु करावे हे बरे. असो.

अविनाशकुलकर्णी's picture

13 Sep 2012 - 4:42 pm | अविनाशकुलकर्णी

दलित शोषिताच्या अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा .. बोलणारा तो पुरोगामी
इस्लाम इसायांच्या अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा ..सेक्क्युलर .
हिंदू व ब्राह्मणाच्या अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा ..तो प्रतिगामी..जातीय वादी..देश तोडणारे लोक..
अश्या लोका विरुद्ध देश द्रोहाच गुन्हा का लावत नाही.. म्हणून ब्रिगेडी आंदोलन छेडणार आहेत

बाळ सप्रे's picture

14 Sep 2012 - 11:05 am | बाळ सप्रे

चूक!!

जो आपल्या शिक्षण्/व्यवसाय/देश/भाषा यापेक्षा जन्माची/चा जात/ धर्म याला आपली ओळख समजतो तो प्रतिगामी..
एखादा कलेक्टरसारख्या पदावर असूनदेखिल जन्माच्या जातीवरून स्वतःला मागासवर्गीय समजतो तो प्रतिगामी..
जो विशेष कर्तृत्व नसताना जन्माच्या जातीवरून स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो तो प्रतिगामी.
जर ह.मों.वर टीका करणारा जर पुरुषोत्तम खेडेकरला पाठीशी घालत असेल तर तोही प्रतिगामी.
जर आझाद मैदानातील दंग्यांचा निषेध करताना गुजरात दंगलीला पाठिशी घालत असेल तर तो देखिल प्रतिगामीच..

आनंदी गोपाळ's picture

14 Sep 2012 - 8:05 pm | आनंदी गोपाळ

सहमत.

सुजित पवार's picture

15 Sep 2012 - 11:32 am | सुजित पवार

सहमत

विकास's picture

13 Sep 2012 - 4:52 pm | विकास

सर्वप्रथम एक विनंती: मिपाची आकाशवाणी करून नये. अर्थात प्रतिसादांशी संवाद ठेवावात. मते वेगळी असणे यात गैर नसते पण संवाद न करणे हे काही योग्य नसते, विशेष करून जर कोणी स्वतःस विचारवंत समजत असेल तर. असो,

"जात नाही ती जात" ह्या वाक्याचा चावून चावून चोथा झाला आहे. पण जात अजून अनेकांच्या मनातून जात नाही हे वास्तव आहे.

"असे करणे म्हणजे 'मी नाही त्यातली, कडी लावा आतली' हा प्रकार होतो", असे एक विधान मी केले.

सहमत.

ह.मो. जर निवडून आले तर संमेलनावर ब्राह्मणी सावट असेल, असे मत चॅनलवर मांडले गेले.
हे वाक्य आपण म्हणाले आहे का? (उत्तर मिळाले नाही तर, आपण म्हणले असेच गृहीत धरूया). जर आपण म्हणले असले तर आपण पण जातीच्याच चष्म्यातून पहात आहात असे वाटत नाही का? आपण म्हणले नसले तर त्या वाक्याला त्या कार्यक्रमात आपण आक्षेप घेतला होता का?

माझ्या मते जातीचे राजकारण हे केवळ राजकारण्यांनी केलेले नाही तर त्याला जीवंत ठेवणारे माध्यमे आणि निधर्मी विचारवंत पण तितकेच जबाबदार आहेत. आता जे काही साहीत्यक्षेत्रात दिसत आहे ती या सगळ्याची अनेक वर्षात झालेली परीणीती आहे असे वाटते.

Kavita Mahajan's picture

14 Sep 2012 - 1:57 pm | Kavita Mahajan

हे वाक्य आपण म्हणाले आहे का? (उत्तर मिळाले नाही तर, आपण म्हणले असेच गृहीत धरूया)

हे वाक्य माझे नव्हते. चॅनलचा सूत्रसंचालक प्रसन्न याचे हे समारोपाचे वाक्य होते. या वाक्यानंतर चर्चा झाली नाही.

Kavita Mahajan's picture

14 Sep 2012 - 1:59 pm | Kavita Mahajan

मिपाची आकाशवाणी करून नये. अर्थात प्रतिसादांशी संवाद ठेवावात.

मान्य. ज्या विषयांमधले मला काही कळते असे मला वाटते, त्याविषयावर मी जरूर बोलते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Sep 2012 - 5:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अ.भा.म. साहित्य संमेलनाच्या बाबतीत अगदी कानातल्या कानात तर कधी जाहीर असं विचारपीठावरही नेहमीच बोलल्या गेलं आहे की अभामसासं हे ब्राह्मणी साहित्य संमेलन आहे. विद्रोही साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलन, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, वगैरे आपापले प्रत्येकाचे इथे संमेलने आहेत पण त्यातल्या त्यात अभामसासं हे सर्व मराठी माणसाचे आहे, असा एक आपल्या सर्व मराठी माणसाचा समज आहे तो किती खरा आणि खोटा ते सांगायला माझ्याकडे कोणताही विदा नाही. साहित्यसंमेलनाशिवाय मराठी माणसाचं काही अडत नाही हा भाग वेगळा. काही चर्चा, परिसंवाद, काही वादविवाद, काहींचे कौतुक, काहींना महाराष्ट्र शासनाच्या काही पदावर मिरवायला मिळालं म्हणजे साहित्य संमेलनाचं सूप वाजत असतं.

प्रत्येक थोरा मोठा साहित्यिकांचे साहित्याच्या बाबतीत आपापले झेंडे आहेत. अभामसासंमेलनात ब्राह्मणेतर साहित्य संमेलनाध्यक्ष झालाच नाही असं काही नाही. शंकरराव खरात, केशव मेश्राम हे दलित तर मुस्लीम म्हणुन यु.म. पठाण सर यांचं नाव घेता येईल. पण जाती-पाती सोडुन या निवडणुका होतात असं म्हणनं जरा धाडसाचं होईल. साहित्यसंमेलनात जातीची गटबाजी असते. आपापल्या प्रदेशाची गटबाजी असते. विद्वत्तेतील सिनियर-ज्युनियर असा वाद आहे. विविध अशा गटातटाचे राजकारण साहित्याला नवे नव्हे.

ह.मो.मराठे यांनी जरा घाईच केली. काहीही न बोलता त्यांना संमेलनात 'आपली' ठराविक मतं पडणारच होती. ब्राह्मणद्वेष कसा होतो त्यासाठी साहित्यिकांना पत्रक काढत मजकुर लिहिणे थोडं अतिच झालं असं माझं मत आहे. ब्राह्मणाचा कसा द्वेष होतो, ब्राह्मणांनी संघटन केले पाहिजे , ब्राह्मणांनी काय सुधारणा केल्या वगैरे मुद्दे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या मतांसाठी आवश्यक होते, असे मला वाट्त नाही. आणि ते ज्यांना आवाहन करीत होते ते लेखक मंडळी अशा आवाहनाला जाहीर प्रतिसाद देतील हा विचार त्यांच्या मनात आलाच कसा हे न उलगडणारे कोडे आहे. साहित्यिक म्हणुन ते मराठी सारस्वताला परिचित आहेत. जातीय द्वेष पसरविल्या जात आहे असे सिद्ध होणारच होते, माफी मागूनही त्यावर पडदा पडला नाही, असे दिसतच आहे.

-दिलीप बिरुटे

चौकटराजा's picture

14 Sep 2012 - 3:13 pm | चौकटराजा

काही चर्चा, परिसंवाद, काही वादविवाद, काहींचे कौतुक, काहींना महाराष्ट्र शासनाच्या काही पदावर मिरवायला मिळालं म्हणजे साहित्य संमेलनाचं सूप वाजत असतं.
अरे साहेब दोन तीन महत्वाचे मुद्दे राहिलेच की
"साहित्यप्रेमी" मुख्यमंत्र्याची हजेरी
आमरस पुरी , आम्रखंड पुरी वगैरे
पुस्तकाच्या प्रकाशकांची चांदी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Sep 2012 - 4:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो राजे, अजून भले बुरे खूप मुद्दे आहेत. पण धाग्याचे शेपूट पाहता...असो. सदरील धाग्याच्या निमित्तानं चर्चा प्रस्ताव टाकणार्‍या, मराठी साहित्यातील प्रतिभावंत लेखिका मला ज्यांच्याबद्दल आदर आहे आणि ज्यांच्या लेखनाचा मी चाहता आहे त्या कविता महाजन कदाचित त्यांच्या या धाग्यावर विषयाच्या निमित्तानं अधिक उणे लिहितीलही.

देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथे हे अभामसासं जवळून पाहता आले. अभामसासंमेलनात सर्वच वाईट आहे, असं नाही. तुमच्या माझ्यासारख्या वाचकांना पुस्तकाची मेजवानी असते. पूस्तक खरेदी करतांना भरपूर डिस्काउंट असतो. साहित्यिकांना जवळून पाहता येतं. हौशा गौशांचे आणि निवडक कवींचे कवीसंमेलन इंजॉय करता येते. . चर्चेचे विषय कधीकधी छानच असतात. राजकीय मंडळी साहित्याच्या निमित्तानं काही मनोगत किंवा काही विचारांची मांडणी करतात ते माहितीपूर्ण आणि मोठं गमतीदारही असतं. असो.

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

14 Sep 2012 - 7:17 pm | परिकथेतील राजकुमार

पुस्तकाच्या प्रकाशकांची चांदी

पुस्तकाच्या प्रकाशकांची चांदी झाली आहे असे एक संमेलन दाखवा*. तुमचे म्हणणे खरे ठरले तर तुमच्या हस्ते ह्या संमेलनाला माझ्याकडून ११,१११ /- रुपायांची देणगी मी देणार.

*आणि प्लिज पेपरात आलेली किंवा साहित्य संमेलन संयोजकांनी पुरवलेली आकडेवारी सादर करू नका. अशा चांदी झालेल्या प्रकाशकालाच समोर आणाल तर बरे होईल. कोणी म्हणेल की 'प्रकाशक कशाला कबूल करेल चांदी झाल्याचे '? हरकत नाही. निदान जायचा यायचा खर्च सोडून वर 'नफा' म्हणता येईल असे पैसे मिळाले असे म्हणणारा प्रकाशक तरी शोधाच.

गेल्या साहित्य संमेलनात अक्षरशः अध्यक्षांची पुस्तके देखील सगळ्या स्टॉल्स मध्ये मिळून ५ च्या वरती विकले गेली नसतील राव. ती क्रांतीतै कुठे गेली ? एकाच प्रकाशकांनी तिचे आणि डहाके साहेबांचे पण पुस्तक छापलेले आहे. तिला असेल अधिक माहिती बहूदा.

च्यायला, मला तर स्टॉल लावून पुस्तक विक्रीचे जेवढे पैसे नफा म्हणून मिळाले, त्याच्या पेक्षा जास्ती तर त्या संमेलनावरती लिहिलेल्या लेखाचे मिळालेत. :)

चौकटराजा's picture

15 Sep 2012 - 11:18 am | चौकटराजा

मागे एकदा अमृतवेल या कार्यक्रमात पुस्तक व्यवहार , साहित्य संमेलन यांचा संबधी काही प्रकाशकानी ( की विक्रेत्यानी ? ) माहिती दिली होती की वेव्हाराची व्याप्ती साहित्य संमेलनातील पुस्तक प्रदर्शनाचे वाढली आहे त्याचा अर्थ आम्ही प्रकाशकांची चांदी असा घेतला .तो कारणपरत्वे विक्रेत्यांची चांदी असा घ्यावयास
आमची हरकत नाही. प्रकाशकाच्या " वेदना" आपल्यासच ठाउक परा !

वामन देशमुख's picture

13 Sep 2012 - 5:33 pm | वामन देशमुख

ह. मो. मराठे "विद्वेषाच्या विरोधात जागृती" करण्याचे काम करताहेत, साहित्यक्षेत्र बरबटविण्याचे काम नव्हे! त्यांच्या कार्याला शुभेच्छा देणे होत नसेल तर विरोध तरी करू नका!

बरबटल्याची जाणीव फारच लवकर झाली....
मराठ्यांचे यासाठी आभार मानायला हवेत.

नाना चेंगट's picture

13 Sep 2012 - 6:37 pm | नाना चेंगट

मुळात आजकालच्या मराठी साहित्यक्षेत्रातील (जे एक डबके आहे असे आमचे वैयक्तिक मत आहे) घडामोडींचा मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, काही उपयोग आहे का? अध्यक्ष व्हायचे ही केवळ वैयक्तिक आकांक्षा घेत कंपूबाजी, अड्डेबाजी करत मीच किती प्रतिभावान, बाकीचे छचोर असली वैचारीक (!) बैठक असलेली अत्यंत संकुचित विचारसरणी, संकुचित सामाजिक जाणीव आणि तद्दन सुमार वकुबाची मंडळी साहित्यसंमेलनाच्या मार्फत आपली टिमकी ढोल असल्यासारख्या वागत असतात. त्यांच्यावाचून त्यांच्या घरच्यांचे सुद्धा अडत नसेल तर बाकीच्या जनतेला काय फरक पडतो !

असो. एक करमणूकीचा तमाशा एवढेच त्याचे महत्व ! घ्या मजा पाहून !! ;)

बाकी, धागे जसे येतात तसेच इतर धाग्यांवर प्रतिसाद पण दिले तर सदस्यत्व रद्द होत नाही हे धागाप्रवर्तकांना समजावून सांगायाची गरज पडत आहे असे वाटते :)

कॉमन मॅन's picture

13 Sep 2012 - 6:44 pm | कॉमन मॅन

मुळात आजकालच्या मराठी साहित्यक्षेत्रातील (जे एक डबके आहे असे आमचे वैयक्तिक मत आहे) घडामोडींचा मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, काही उपयोग आहे का?

हाही एक प्रश्न आहेच..!

तिमा's picture

13 Sep 2012 - 7:30 pm | तिमा

'ब्रा' हा शब्द टंकताक्षणीच प्रतिसाद वा धागा उडवला जाईल अशी काही तांत्रिक व्यवस्था या संस्थळावर करता येईल का ?
पुढचा सगळा त्रास वाचेल.

-- ब्राशिंगराव बरबटे

कपिलमुनी's picture

13 Sep 2012 - 7:30 pm | कपिलमुनी

१. तुम्ही खेडेकर आदी प्रभूतींची पुस्तके वाचली आहेत का ?
२. एखाद्या समाजाला टार्गेट करून त्या वर हीन टीका करणे योग्य आहे का ?
३. जर त्या टीकेला त्या समाजा मधल्या ज्येष्ठ साहित्यिकाने ( किंवा समाजा मधल्या कोणीही ) उत्तर दिले तर ते चुकीचे आहे का ??
४. एखाद्या समाज घटकासाठी दिलेले योगदानाचा उल्लेख करणे चुकीचा आहे का ?
( शाहु , फुले यांनी दलितांसाठी काम केले ...हा उल्लेख जातीवाचक आहे का ? )
५. जात सांगणे चुकीचे आहे तर मग संभाजी बिग्रेड कोणते राजकारण करत आहे ?
६. साहित्या मध्ये दलीत साहित्य असा उल्लेख केला तो योग्य आहे का ?
७. स्वताच्या जातीचा उल्लेख करणं यात काय गैर आहे ? जात ही भारतीय संविधानाने मान्य केलेली आणि सध्या समाज मान्य आहे ( आदर्शवादामधे मान्य नसेल तरीही )... आणि स्वताच्या जातीविरुद्ध विद्वेष पसरवणार्या विरुद्ध विरोध केला तर त्यात काय चुकले ..
८. दलीत समाजा साठी, हिंदू समाजासाठी , मुस्लीम समाजासाठी जे कार्य करतात त्यांचा उल्लेख चालतो ??

आणि ब्राह्मणांना विरोध म्हणजे 'पुरोगामीपणा' असे तुम्हाला वाटत आहे का ?

बाकी तुम्हाला खरडी मधून काही दुवे देतो ..ते पहा ..मग ह मों नी विरोध का केला ते कळेलच ..

आशु जोग's picture

14 Sep 2012 - 11:32 pm | आशु जोग

त्यांचा धागा आणि तुमचे विचार यांचा काय संबंध ?

बिग्रेड ने काय केलं हे बिग्रेड लाच विचारा ना !

--

स्वतःची जात विसरून प्रतिसाद लिहायला शिका.

---

टोपणनावे घेऊनही जात लपत नाही ती अशी

कपिलमुनी's picture

19 Sep 2012 - 5:19 pm | कपिलमुनी

ह मों नी बिग्रेडींच्या विद्वेषाला विरोध केला...कारण तो ब्राह्मणांच्या ( एका विशिष्ट जाती ) विरोधात होता..
म्हणून त्यांच्यावर आरोप करण्यापूर्वी मुळ विद्वेष काय आहे ते समजून घेतला पाहिजे ..

आणि कोणता मुद्दा असंबद्ध वाटला ते सविस्तर लिहा ..उत्तर देण्यात येइल ..
मूळ धाग्यामध्ये जात आहे त्यां मुळे जातीवाचक उल्लेख आला आहे...

आणि मी माझी जात लपवणार नाही ...त्यासाठी टोपणनावांची गरज नाही..
मी जात विसरणार नाही...फक्त त्याच्या आधारावर कोणताही भेद करत नाही

अविनाशकुलकर्णी's picture

13 Sep 2012 - 7:57 pm | अविनाशकुलकर्णी

ह.मो. मराठे, असीम त्रिवेदी आदींना एफ.आय.आर. दाखल झाल्यावर लगेचच अटक करण्याची तत्परता दाखवणारे पोलीस हीच तत्परता एफ.आय.आर. दाखल झालेले श्री. अशोक चव्हाण, श्री. राजेंद्र दर्डा, श्री. विजय दर्डा, सुरेश कलमाडी यांच्या बाबतीत का दाखवत नाहीत????

पैसा's picture

13 Sep 2012 - 8:15 pm | पैसा

तुका म्हणे उगी रहावे,
जे जे होईल ते ते पहावे

आम्ही साहित्यसंमेलनाला हजेरी पुस्तकं विकत घेण्यासाठी लावतो. इतर तमाशे चालू द्यात!

कवितानागेश's picture

13 Sep 2012 - 8:30 pm | कवितानागेश

"इंटरनेट वरती फोरम्स ( पक्षी: मिसळपाव) असताना वेगळे साहित्य संमेलन भरवायची आणि खर्च वाढवायची गरज आहे का?" असा एखादा धागा काढावा का? ;)

बाकी चालू द्या.

अर्धवटराव's picture

13 Sep 2012 - 9:14 pm | अर्धवटराव

या ई-संमेलनाचे अध्यक्षपद माऊबाईंनी भुषवावे अशी नम्र विनंती करतो.

अर्धवटराव

मराठी_माणूस's picture

13 Sep 2012 - 9:12 pm | मराठी_माणूस

ह.मो. ए़क्झॅटली काय म्हणाले, ज्या वरुन एव्हढा गदरोळ उठला आहे

मराठी_माणूस's picture

13 Sep 2012 - 9:13 pm | मराठी_माणूस

ह.मो. ए़क्झॅटली काय म्हणाले, ज्या वरुन एव्हढा गदरोळ उठला आहे

प्रभाकर पेठकर's picture

13 Sep 2012 - 9:20 pm | प्रभाकर पेठकर

धागा सुरू करणार्‍या बाई, भांडणं लाऊन, कुठे गेल्या?

अजुनही, मिपावर, जातीवाचक चर्चांचा धागा काढावयास परवानगी आहे?

Kavita Mahajan's picture

14 Sep 2012 - 2:04 pm | Kavita Mahajan

मी इथेच आहे. फक्त काल नेट आणि फोन बंद पडले होते दिवसभर. आणि हे भांडण लावणे नाही, असे आपले माझे मत!

धर्म, जात या वैयक्तिक बाबी आहेत, आणि त्या तशाच असू द्याव्यात असे मला वाटते.

साहित्य संमेलनच नाही तर कुठल्याही सार्वजनिक क्षेत्रात काम करताना, केवळ आपण भारतीय आहोत असेच समजून वावरावे, वागावे. (आणि सगळ्यानीच असे केले) तरच सामाजिक एकोपा निर्माण होऊ शकतो.

नाही तर असे वाद कधीच संपणार नाहीत.

Kavita Mahajan's picture

14 Sep 2012 - 2:05 pm | Kavita Mahajan

पूर्णतः १००% मान्य.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Sep 2012 - 1:07 pm | परिकथेतील राजकुमार

कोणी काही म्हणो, आम्हाला मात्र हा धागा आण लिखाण प्रचंड आवडले.

अहो, आजकालच्या ह्या धकाधकीच्या जीवनात हास्याचे चार क्षण मिळवून देणारे साहित्य तसे नष्टच होत चालले आहे. ह्या लेखनाने मात्र मनमुराद हसवले.

पुन्हा एकदा धन्यवाद.

बाकी, जात, पात, धर्म, त्यांचे अभिमानी - दुराभिमानी इत्यांदींना काही एक समज देणारी सुचना मधे स्वगृहाच्या पानावरती पाहिली होती. हा धागा अजूनही इथेच पाहता, त्या सुचनेची अंमलबजावणी होताना मात्र दिसणार नाही हे स्पष्ट जाणवत आहे.

आता लहान तोंडी मोठा घास घेत पुन्हा एकदा विचारावेसे वाटते, की ठरवून दिलेल्या काही एक धोरणांची, निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी दरवेळी नीलकांत येण्याचीच किंवा त्यानेच हस्तक्षेप करण्याची खरंच आवश्यकता आहे का ? 'कातडी बचाव' किंवा 'बाकीचे बघून घेतील' अशी भुमीका सोडून, नेमलेले अधिकारी लोक स्वतः कारवाई करायला कधी पुढे येतील का ?

स्पा's picture

14 Sep 2012 - 1:26 pm | स्पा

;)

सुप्पर लाईक

बॅटमॅन's picture

14 Sep 2012 - 2:08 pm | बॅटमॅन

डुप्पर लाईक ;)

मृगनयनी's picture

14 Sep 2012 - 3:04 pm | मृगनयनी

बाकी, जात, पात, धर्म, त्यांचे अभिमानी - दुराभिमानी इत्यांदींना काही एक समज देणारी सुचना मधे स्वगृहाच्या पानावरती पाहिली होती. हा धागा अजूनही इथेच पाहता, त्या सुचनेची अंमलबजावणी होताना मात्र दिसणार नाही हे स्पष्ट जाणवत आहे.

आता लहान तोंडी मोठा घास घेत पुन्हा एकदा विचारावेसे वाटते, की ठरवून दिलेल्या काही एक धोरणांची, निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी दरवेळी नीलकांत येण्याचीच किंवा त्यानेच हस्तक्षेप करण्याची खरंच आवश्यकता आहे का ? 'कातडी बचाव' किंवा 'बाकीचे बघून घेतील' अशी भुमीका सोडून, नेमलेले अधिकारी लोक स्वतः कारवाई करायला कधी पुढे येतील का ?

+++++++++++++++++९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९
सहमत!!!...

___________________

* आमचा प्रतिसाद 'मंडळा'ला बहुधा फारच लागलेला दिसतोये.. त्यामुळे तो डीलीट केल्या गेल्या असावा.... :)
असो!.. दखल घेतल्याबद्दल आभारी आहे.......

____________________

जातीवाचक लिखाणास बंदी असल्याचे नियम सर्वांना (पक्षी : ब्राह्मण, लेवा पाटील... इत्यादि) सारखेच लागू असावेत.. अशी पुन्हा एकदा माफक अपेक्षा आहे. :)

नाना चेंगट's picture

14 Sep 2012 - 3:20 pm | नाना चेंगट

हॅ हॅ हॅ

भलत्याच अपेक्षा ब्वा !

ब्राह्मणविरोधी म्हणजेच पुरोगामी हा विचार विसरु नका.

प्रभाकर पेठकर's picture

14 Sep 2012 - 8:13 pm | प्रभाकर पेठकर

कविता महाजनांनी कांही 'निवडक' प्रतिसादांना उत्तर दिले ही आनंदाची बाब आहे. पण अजून कांही, खालील जोडण्यांवर विचारलेल्या, प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत.

http://www.misalpav.com/node/22731#comment-425450

http://www.misalpav.com/node/22731#comment-425455

http://www.misalpav.com/node/22731#comment-425509

http://www.misalpav.com/node/22731#comment-425525

http://www.misalpav.com/node/22731#comment-425560

नाखु's picture

15 Sep 2012 - 9:28 am | नाखु

या प्रश्नांची संमेलन होईपर्यंत मिळतील काय? नाहितर एवितेवी संमेलन होऊन गेलेय (रद्द झाले नाही हि शक्यता धरली नाही) तेव्हा आता का खुलासा / उत्तर द्यायचे असा पवित्रा घेतला जाउ शकतो......

बाकी "वर्ण वर्चस्व" याला "ब्राम्हण वाद " असा शब्द वापरुन पुर्वापार फक्त आणि फक्त ब्राम्हणच जातिभेद पाळित असत असा आग्रही समज करून देण्यात तथाकथीत "विचारवंत्/पुरोगामी" जालावरच जास्त पसरले आहेत हे नम्रपणे नोंदवु ईच्छीतो...

नाखु's picture

15 Sep 2012 - 3:35 pm | नाखु

उत्तरे मिळाली कि आम्हाला पण कळवा.... तुमच्या बरोबर आम्च्या पण घोर अज्ञानाची जळमटे दूर होतील हि "बाप्पा" कडे प्रार्थना....

अजातशत्रु's picture

14 Sep 2012 - 5:01 pm | अजातशत्रु

हमोनी आत्मपरिक्षण केले असावे त्यांनी सपशेल माफि मागितली या वरुन वाटते
असो इथे प्रतिसादांची नुसतीच झोंबाझोबी दिसते
त्या दिवशीची चर्चा मी सुद्धा ऐकली आहे
कविता महाजन यांनी योग्य मते मांडली आहेत
अर्थात, तरीही हमोंची भुमिका ही तेवढि चुकिची आहे असे वाटत नाही
कारण त्यांच्या जागी इतर जात-धर्मिय असता
आणि तशी परिस्थिती असती तर त्यांनी सुद्धा तेच केले असते
जे हमों नी केले,(मला ते नैसर्गिक आणि समर्थनिय वाटते)
मात्र त्याची जागा साहित्या क्षेत्रासारख्या ठिकाणी नसावि

त्यामुळे नेहमीच वादासाठी कुप्रसिद्ध असलेले आणि शासनाचे २५ लक्ष अनुदान लाटणारे हे मंडळच बरखास्त करावे असे वाटते

अशा जातियवादी धाग्यांचा वास काढत तुम्ही बरोब्बर येता याचं कौतुक आहे.

अजातशत्रु's picture

14 Sep 2012 - 10:41 pm | अजातशत्रु

जे तुम्हि माझ्या मागे लागून करता तेच समजा हवे तर
तुम्हि स्वतः वरुन बरे जग ओळखता

बाकि या पुढे माझ्याकडून प्रतिवादाची अपेक्षा ठेवू नका
कारण तुम्हाला फाट्यावर मारण्यात येत आहे.

ता. क. या प्रतिसादास ज्यांना हवे तसे त्यांनी पहावे, हवे ते निष्कर्ष काढावेत
काय सोवळे -ओवळे पाळायचे ते पाळा

.
.
.
.
आणि वैयक्तिक बोलण्यापेक्षा मुळ चर्चेवर जमले तर बोला

शिल्पा ब's picture

15 Sep 2012 - 8:21 am | शिल्पा ब

तुमचं निरीक्षण आहे हे...आमचे अनुभव अनमोल आहेत त्यामुळे सगळीकडे ते उधळत नैत आम्ही..बरं का अ जात शत्रु ..

<<<आणि वैयक्तिक बोलण्यापेक्षा मुळ चर्चेवर जमले तर बोला

अ‍ॅ हॅ हॅ हॅ हॅ .....यालाच सौ चुहे खाके वेग्रे म्हणतात .

Kavita Mahajan's picture

15 Sep 2012 - 1:18 pm | Kavita Mahajan

मात्र त्याची जागा साहित्या क्षेत्रासारख्या ठिकाणी नसावि

त्यामुळे नेहमीच वादासाठी कुप्रसिद्ध असलेले आणि शासनाचे २५ लक्ष अनुदान लाटणारे हे मंडळच बरखास्त करावे असे वाटते.

दोन्हीही विधाने मान्य.

अप्पा जोगळेकर's picture

14 Sep 2012 - 9:21 pm | अप्पा जोगळेकर

कोण हा ह. मो. मराठे आणि कसले साहित्य संमेलन ? बोंबलेनात का तिथे ?
सामान्य माणसाच्या आयुष्यात त्याने काय फरक पडतो देव जाणे.
जे सांप्रतच्या काळाशी सुसंगत लिखाण करतात (उदा. गिरीश कुबेर, अच्युत गोडबोले, अतुल कहाते आणि असे असंख्य) ते कधी असल्या चिखलात लोळताना दिसत नाहीत. शिवाय
त्यांना बहुधा साहित्यिक म्हणायचे नसते असे वाटते.

>> सामान्य माणसाच्या आयुष्यात त्याने काय फरक पडतो देव जाणे

असा निरागस बुरखा घेणारे लोक
जास्त डेंजरस असतात

Kavita Mahajan's picture

15 Sep 2012 - 1:20 pm | Kavita Mahajan

लिहिणारे / लेखन करणारे सगळेच 'साहित्यिक' नसतात...!

अजातशत्रु's picture

15 Sep 2012 - 6:34 pm | अजातशत्रु

लिहिणारे / लेखन करणारे सगळेच 'साहित्यिक' नसतात...!
साहित्यिक असण्याची पात्रता काय असावी ?
एखादि व्यक्ति जर कविता करत असेल
किंवा एखादा वैचारीक लेख लिहित असेल तर तो साहित्यिक ठरू शकेल काय?
साहित्यिक असण्याचे निकष काय असावे?

प्रभाकर पेठकर's picture

15 Sep 2012 - 7:35 pm | प्रभाकर पेठकर

एखादि व्यक्ति जर कविता करत असेल किंवा एखादा वैचारीक लेख लिहित असेल तर तो साहित्यिक ठरू शकेल काय?

कार्यक्रमाची लिंक पाहीली असता कार्यक्रमाचे सुत्र संचालक श्री. प्रसन्न जोशी ह्यांनी श्री. विठ्ठल वाघ आणि श्री. हमोंचा उल्लेख अनुक्रमे ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक आणि साहित्यिक असा केला आहे. म्हणजे कवी आणि वैचारिक लेखन करणारा लेखक साहित्यिक वर्गात मोडतो. बाकी तांत्रिक अटींची कल्पना नाही.

आता, लेखक/लेखिका आणि साहित्यिक/साहित्यिका ह्यांच्या पातळीत दर्जात्मक काही फरक असतो का हेही ठाऊक नाही.

पाषाणभेद's picture

15 Sep 2012 - 12:12 am | पाषाणभेद

ह. मो. मराठे यांना विरोधकरणारे कोण तर संभाजी ब्रिगेडवाले जे मराठ्यांसाठी लढतात.
फारच विनोदी योगायोग आहे हा.
:-)

बाकी चालू द्या.

Kavita Mahajan's picture

15 Sep 2012 - 1:22 pm | Kavita Mahajan

ह. मो. मराठे आणि संभाजी ब्रिगेड या दोघांनाही विरोध करणारे अनेकजण आहेत. हे आपल्या माहितीस्तव.

नाखु's picture

15 Sep 2012 - 3:39 pm | नाखु

(विचारवंत )* हमोंना जाहीर (जालावर) व बिगेडला गुप्त (मनातल्या मनात) विरोध करतात..

शब्द्श्रेय..... मा. नानासाहेब..

श्रीरंग's picture

15 Sep 2012 - 12:15 am | श्रीरंग

ब्राह्मणी सावट!!

वाह! जबरदस्त. शब्द प्रचंड आवडला!!

आशु जोग's picture

15 Sep 2012 - 12:56 am | आशु जोग

लिंक

वरील लिंक पहा . यामधे धागाकर्त्याने उल्लेख केलेली चर्चा आहे.

जेणेकरुन विषय समजायला सोपा जाइल.

मैत्र's picture

15 Sep 2012 - 4:02 am | मैत्र

१. हमो मराठे यांचं लेखन हे अध्यक्ष पदाच्या दर्जाचं आहे का? ( इतर ललित गद्य लेखन)
त्यांच्या आततायी पणाचा नाही पण ब्रिगेडच्या हीन प्रचाराचा आणि गलिच्छ भाषेचा विरोध करण्याच्या भूमिकेचं मी समर्थन करतो.
त्यांच्या एकूण चार पानांच्या बायो डेटा (मराठी?) त्यांच्या साहित्य सेवे बद्दल माहिती असावी ज्या अनुषंगाने त्यांचं अध्यक्षपद योग्य ठरेल. ते सोडून त्यांनी लिहिलेल्या काही लेखांवर का इतका वाद होतो आहे?
ते जर तितके विशेष लेखक नसतील तर पडतील. इथे भले भले लेखक पोळलेले आहेत. हमोंचं काय विशेष?
त्यांनी जर भावनांना हात घालून ब्रिगेडविरोधाचा मुद्दा जातीवर नेऊन मते मिळवण्याचा प्रयत्न केला असेल तर तो अत्यंत फालतू दर्जाचाच म्हणावा लागेल.
किमान साहित्य संमेलनाला तरी यातून वगळावं.

महाबळेश्वरला काय झालं हे सर्वांना माहीत आहे. जर हमो असे वागत असतील तर तेही त्याच रांगेत आहेत.

२. कविता ताई - शिवरायांच्या बदनामीची केंद्रे हे प्रकाशित पुस्तक आहे ... पत्रक वगैरे नाही.
शिवधर्म ही कायमस्वरुपी वेब साईट आहे. अत्यंत गलिच्छ आरोप, घाणेरडी भाषा वापरली गेली आहे आणि अजूनही वापरली जात आहे.
आनंद यादवांच्या बाबतीत जे घडलं तेही जगजाहीर आहे.
एकच प्रश्न आहे की त्या वेळी तुम्ही कुठल्याही चर्चेत भाग घेतला होता का, प्रिंट, चॅनेल्स किंवा इतर कुठल्याही माध्यमातून तुम्ही तेव्हा संमेलनाशी थेट संबंध नसताना त्याचा पूर्ण विचका करणार्‍या कोनालाही काहीही प्रश्न विचारले होते का. किंबहूना हीच "बरबटलेपणाची" भूमिका तेव्हा मांडली होती का?
(असेलही. असल्यास स्पष्ट करावी ही विनंती. या मागे हमो बरोबर आणि ब्रिगेड तेवढी चूक असा माझा दावा नाही. पण दोन्ही extremist (मराठी ?) वृत्तींना एकच वागणूक दिली जावी. )

वरील दोन्ही प्रश्न आहेत, मुद्दे नाहीत (मला उत्तरे माहीत नाहीत..)

प्रभाकर पेठकर's picture

15 Sep 2012 - 10:53 am | प्रभाकर पेठकर

त्यांनी जर भावनांना हात घालून ब्रिगेडविरोधाचा मुद्दा जातीवर नेऊन मते मिळवण्याचा प्रयत्न केला असेल तर तो अत्यंत फालतू दर्जाचाच म्हणावा लागेल.

त्या चर्चे दरम्यान असा मुद्दा आला की मतदारांमध्ये ब्राह्मण बाहुल्य किती? पूर्वी होते, आता तसे नाही. मतदारांमध्ये सर्वजातींचे मिश्रण आहे. त्यात पुन्हा सर्व ब्राह्मणांची मते हमोंनाच मिळतील असे नाही. दुसर्‍या उमेदवारासही मिळतील. आणि पत्रक वाचून फक्त 'ब्राह्मण' उमेदवार म्हणून (त्यांचे साहित्यिक कार्य नाकारून) हमोंना मतदान करणारे किती? तर संख्या नगण्य असेल असे वाटते. म्हणजेच, पत्रकाने भावनिक आवाहन वगैरे मुद्दा गैरलागू ठरतो.

हमोंच्या साहित्याचे त्यांनी दोन भाग केले आहेत. एक ललित लेखन आणि दुसरे वैचारीक लेखन. कुठल्याही साहित्यिकाचा (ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतर) त्याच्या सर्व साहित्याचा साकल्याने विचार करून त्याचे साहित्यिक अनुदान लक्षात घेतले पाहिजे. ते तसे घेतले तर सर्व वादातील हवाच निघुन जाते आणि हमोंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यासाठी निर्माण झालेली संधी दुसर्‍या उमेदवाराच्या हातातून निसटून जाते. हे त्या उमेदवाराचे नुकसान आहे. त्यामुळे इथे मुद्दामहून, ठरवून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद घालून विरुद्ध पार्टीच्या उमेदवारास (श्री. बागवे), योग्यता असो वा नसो, 'बळ मिळवून द्यायचा प्रयत्न' हेही जातियतेला खतपाणी घालणारेच कृत्य आहे. मग प्रश्न असा येतो की फक्त हमोंवर ब्राह्मण्याचे लेबल लावून राळ का उडविली जावी? जातियतेला खतपाणी (ह्या चर्चेद्वारे) घालण्याच्या कार्यास श्री. बागवे आणि सौ. कविता महाजनबाई हे दोघांनीही हिरीरीने हातभार लाविला आहे. म्हणजेच मुद्दा जातीयतेवर नेऊन मते मिळविण्याचा प्रयत्न (केला जात असेल तर) दोन्ही पक्षांकडून होतो आहे. मग एकट्या हमोंवर आगपाखड करण्यात त्यांच्यावर अन्याय होतो आहे.

चर्चे दरम्यान महाजन बाईंचे छद्मी आणि श्री. बागवे ह्यांचे गालातल्या गालात हसणे बरेच 'बोलके' होते.

extremist (मराठी ?) वृत्तीं = अतिरेकी वृत्ती ('विचारसरणी' जास्त समर्पक शब्द वाटतो).

Kavita Mahajan's picture

15 Sep 2012 - 1:34 pm | Kavita Mahajan

मराठेंची भूमिका आणि संभाजी ब्रिगेड दोन्हींनाही माझा विरोध आहे. जे जे जातीयवादी आहे, त्या सर्वालाच आहे. तथापि वाईट / विघातक घटनांची यादी काढून त्यावेळी तुम्ही काय केले? असे कुणालाही विचारणे हे मला विनोदी वाटते. केवळ 'प्रतिक्रिया देत राहणे' हे कोणत्याही ललित लेखकाचे 'मुख्य काम' नसते. मात्र काही वेळा अशा असतात की एक व्यक्ती म्हणून / नागरिक म्हणून लेखक काही भाष्यं करतात आणि आपल्याच क्षेत्रात काही टोकाचे अयोग्य चालले असेल तर त्यावेळी मात्र खात्रीने प्रतिक्रिया त्यांनी द्याव्यात अशी अपेक्षा चुकीची नाही. बाकी गोष्टी त्यांच्या मुख्य लेखनातून वेळोवेळी उमटत असतातच. ती त्यांची एकातर्‍हेने प्रतिक्रियाच असते. मात्र वृत्तपत्रीय लेखनाप्रमाणे कथा-कविता-कादंबरी-शोधनिबंध या रोज लिहिल्या जाणार्‍या आणि तात्कालिक असणार्‍या गोष्टी नव्हेत.
साहित्य क्षेत्रातील चुकीच्या गोष्टींविषयी मी वेळोवेळी माझ्या मुख्य लेखनातून भाष्य केले आहे. माझी पुस्तके न्याहाळली, तर सापडेल. आनंद यादवांबाबत जे झाले त्यावेळी एक प्रदीर्घ लेख मी लोकसत्ता मध्ये लिहिला होता. ( इथे लिंक कशी द्यायची ते माहीत नाही. पण माझ्या भिन्न या ब्लॉगवर 'आम्ही लाचारांच्या फौजा' हा लेख इच्छुकांना वाचण्यास मिळेल.) त्यावर नंतर खूप चांगली चर्चा झाली, पण प्रत्यक्षात काही निष्पन्न झाले नाही. कारण लेखकांची युनियन इत्यादी नसते आणि लेखन हा क्वचितच कुणाचा पूर्णवेळ व्यवसाय असतो. त्यामुळे लेखक वेगळे, लेखनक्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते वेगळे दिसतात. महामंडळावरील बहुतेक लोक असे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी क्वचित काही हौशी लेखन केले आहे.

मैत्र's picture

15 Sep 2012 - 3:15 pm | मैत्र

वाईट / विघातक घटनांची यादी काढून त्यावेळी तुम्ही काय केले? असे कुणालाही विचारणे हे मला विनोदी वाटते.

यात विनोदाचा दूरवर संबंध नाही. याला विनोद म्हणून तुम्ही बगल देण्याचा प्रयत्न करता आहात.
मी दोन वेगळ्या गोष्टी मांडण्याचा / विचारण्याचा प्रयत्न केला. एक म्हणजे हमोंचा मुद्दा हा संमेलनाकडे वळवण्याचा. ब्राह्मण किंवा इतर या पेक्षा ते साहित्यिक म्हणून संमेलनाध्यक्ष अशा दृष्टीने किती योग्य आहेत हे महत्त्वाचं.
त्याबद्दल काही माहिती कोणालाही असेल तर इथे मांडल्यास सगळ्यांनाच समजेल.

दुसरं म्हणजे तुम्ही (कविता महाजन) कुठली बाजू घेत आहात हे स्पष्टपणे जाणून घेण्याचा प्रयत्न होता. कारण हमोंशी झालेल्या चर्चेत तुमचं मत हे हमोंच्या ब्राम्हण कार्डाचा मतांसाठी वापर याच्या विरोधा पेक्षा
ब्राम्हण विरोध अशा स्वरुपाचं वाटलं. हा त्या कार्यक्रमाच्या स्वरुपाचा दोष असू शकतो.

'आम्ही लाचारांच्या फौजा' लेखाची लिंक देता आली तर खूप उत्तम.
(लिंक देण्यासाठी वाविप्र पहा किंवा प्रतिक्रियेच्या चौकटीच्या वर जे आयकॉन्स येतात त्यात उजवीकडून सहावा हा पृथ्वी आणि एक साखळी दाखवतो. त्यावर टिचकी मारून येणार्‍या बॉक्स मध्ये लि़ंक पेस्ट करा. खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे दिसेल प्रकाशित होण्यापूर्वी.
इथे test च्या जागी तुमची लिंक असेल.
शब्दाच्या नंतर असू द्या. म्हणजे त्या शब्दावर hyperlink तयार होईल.
मिपाच्या परिभाषेत याला 'दुवा' म्हणतात.

Kavita Mahajan's picture

15 Sep 2012 - 9:57 pm | Kavita Mahajan

मी बगल दिलेली नाही. उलट या विधानानंतर माझे म्हणणे सविस्तर लिहिले आहे. वाक्य विनोदी वाटले तरी मी उत्तर गांभीर्यानेच दिले आहे.
एक लेखक म्हणून ह.मो. संमेलनाध्यक्षपदासाठी योग्य असले तरी त्यांनी जे जातीचे मुद्दे अकारण मध्ये आणले, त्यामुळे वातावरण गढुळले. हे मुद्दे मध्ये आणले नसते, लेखन पाहता ते एकमेव बरे नाव होते. बागवेंचे लेखन मला व्यक्तिशः सुमार वाटते. शिरीष गोपाळ देशपांडेंचे कोणतेही लेखन मला वाचनीय वाटले नाही. कोतापल्लेंनी तरुण वयात कुणीही लिहिते तसे काही लेखन केले आहे, नंतर आयुष्यभर काही उल्लेखनीय लिहिलेले नाही. या तुलनेत फक्त ह. मो. च आहेत, ज्यांच्या पुस्तकांची नावं तरी वाचकांना माहीत आहेत. त्यांच्या पुस्तिका वाचकांना माहीत होत्या. परिचय पत्रकात त्यांनी या लेखनाचा नुसता उल्लेख करण्यासही ( पुस्तकांच्या यादीत ) हरकत नव्हती. पण त्यासोबत त्यांनी जे काही लिहिले आहे त्यामुळे वाद उसळला. कोणत्याही जातीला वा त्या जातीच्या संस्था आपल्या जातीसाठी करत असलेल्या चांगल्या कार्याला माझा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. पण जात-धर्म-कर्मकांड अशा गोष्टी व्यक्तिगतच ठेवलेल्या बर्‍या.
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून त्यांनी केवळ आपले साहित्यिक कर्तृत्व सांगणे आणि तेवढेच सांगणे योग्य होते. व्यक्तिगत आयुष्यात आपण काय-काय केले आहे आणि नाही हे सांगण्याची ही जागा नव्हती. त्यांनी 'आपण जे केले आहे' असे म्हटले आहे, त्यावरही काही लोकांनी आक्षेप घेतले आहेत. त्याबाबतची हरि नरके यांची फेसबुकवरील प्रतिक्रिया आपल्या माहितीस्तव मी खाली देते.

Kavita Mahajan's picture

15 Sep 2012 - 10:05 pm | Kavita Mahajan

अ.भा.मराठी साहित्य संमेलनात वाद हे झडलेच पाहिजेत असा महामंडळाच्या घटनेत एखादा नियम आहे किंवा कसे याची मला माहिती नाही.सालाबादप्रमाणे चिपळुणला होणा-या संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणुक गाज
ु लागली आहे.गेल्या ८५ साहित्य संमेलनात न घडलेली जातीय प्रचाराची घटना यावर्षी प्रथमच पाहायला मिळत आहे.त्याचे मानकरी आहेत लेखक आणि अध्यक्षपदाचे एक उमेदवार श्री.ह.मो.मराठे. हमोंनी या निवडणुकीत जातीय प्रचार करुन या निवडणुकीला झेडपीच्या निवडणुकीच्या पातळीवर उतरविले आहे.
काही लोक दागिने मोडुन खातात,काही आपली गरिबी मोडुन खातात तशी हमोंनी निवडणुक प्रचारात स्वता:ची जात "मोडुन खायला" सुरुवात केली आहे.{आपले आडनाव ’मराठे’ असले तरी} आपण "ब्राह्मण" आहोत आणि आपणच एकमेव ब्राह्मणांचे तारणहार आहोत असे त्यांनी आपल्या प्रचारपत्रकात सुचकपणे नमुद केलेले आहे.ब्राह्मण समाजाच्या विरुद्धच्या सगळ्या अपप्रचाराला वाचा फोडण्याचे "ईश्वरी कार्य" आपण हाती घेतल्याची माहिती हमोंनी या पत्रकात देवुन मते मागितली आहेत.
हमो म्हणतात, "गेल्या दिडशे वर्षांपासुन महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेषाचे वातावरण पद्धतशीरपणे तयार करण्यात येत असुन सध्या त्याचा कळस गाठण्यात येत आहे." याचा अर्थ हमोंचा रोख महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याकडे आहे.दिडशे वर्षांपुर्वी त्यांचे स्त्री व दलित शिक्षणाचे काम सुरु झाले होते. हमोंचा अंगुलीनिर्देश तिकडेच आहे.
ब्राह्मण पुरुषांच्या सरसकट कत्तली करण्याची चिथावणी देणा-या पुरुषोत्तम खेडेकरांच्या विखारी पुस्तकाविरुद्ध हमोंनी भुमिका घेतल्याचे ते या पत्रकात ब्राह्मणांना आवर्जुन सांगतात.तेव्हा ते हे दडवुन ठेवतात की खेडेकरांच्या या पुस्तकाविरुद्ध पोलीसात तक्रार करणारे हमो नसुन शाम सातपुते,संजय सोनवणी आणि मधुकर रामटेके हे होते.हमोना केवळ लाजेकाजेस्तव नंतर भुमिका घ्यावी लागली पण पोलीसकेस झाल्यानंतर हे "शुर शिपाई" तब्बल सहा महिने पुस्तकावर मुग गिळुन गप्प राहिले होते.
या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण मतदार असल्याने त्यांना "भिक्षांदेही करण्यासाठी" हमोंनी हे पत्रक काढल्याची टिका एबीपी माझा वाहिनीने थेटपणाने करुन या जातीय प्रचाराचे वस्त्रहरण केले. टिका सुरु झाल्यावर हमोंनी साळसुदपणाचा आव आणुन केलेला खुलासा अतिशय विनोदी होता. "एबीपी माझा" शी बोलताना ते म्हणाले, "मी पत्रकात असे कुठे लिहिलेय की मी ब्राह्मण आहे म्हणुन ब्राह्मण मतदारांनो मला मत द्या."
वा: हमो! तुम्ही मतदारांना आणि महाराष्ट्राला बोळ्याने दुध पिणारे समजता काय?तुमचे जातीय डावपेच आम्हाला कळत नाहीत काय? हमोंच्या चार पानी पत्रकातील पुर्ण दोन पाने या ब्राह्मणकार्याची जाहीरात करणारी आहेत. त्यात हमोंनी घटनेने दिलेल्या सामाजिक आरक्षणाविरुद्धही गरळ ओकलेले आहे. त्यांनी सामाजिक न्यायाऎवजी त्याला "जातवार आरक्षण"असे संबोधले आहे. कष्टक-यांना जमिनीची मालकी देणा-या कुळकायद्यालाही हमोंचा विरोध आहे. रानडे,आगरकर,केशवसुत,कर्वे,लोकहितवादी यांची तोंडदेखली नावे घेणारे हमो नेमके कुणाचे वारसदार आहेत?गं.बा.सरदार,य.दि.फडके,अरुण साधु,वसंत बापट,लक्ष्मण्शास्त्री जोशी आदींचा वारसा हमोंना नको आहे.त्यांना सदानंद मोरे यांनी वाहिनीवर जातविरहीत प्रचाराचे प्रमाणपत्र देवुन त्यांची तळी उचलुन धरली असली तरी हमो हे विष्णुशास्त्री चिपळुणकरांचेच वारसदार आहेत आणि रानडे-केशवसुतांची नावे घेवुन ते त्यांना बदनाम करीत आहेत हे स्पष्ट आहे. मतदारांमध्ये दोन जातींचे लोक प्रामुख्याने आहेत.एकुणात ४० टक्के मतदार ब्राह्मण असल्याचे हमो सांगत असले तरी प्रत्यक्षात हे प्रमाण ५५ते ६० टक्केपर्यंत असावे असे जाणकारांचे मत आहे.त्याखालोखाल मतदार सत्ताधारी जातीचे आहेत.या दोघांची जुंपल्याचे चित्र निर्माण करुन हमोंना "विरोधीभक्त" ब्रिगेडकरवी ते मतदारांसमोर बिंबवायचे आहे. दोन प्रतिगाम्यांमध्ये कायम संगनमत असते हे अनेकदा दिसुन आले आहे.ही मिलीभगत ईथेही नसेलच असे नाही.
हमो म्हणतात,"पुढे जेम्स लेनचे पुस्तक व तो स्वत: यांची भारताच्या सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्तता केली."हमोंची ही मांडणी सत्याला धरुन नाही. सरकारने लेनच्या बदनामीकारक आणि विकृत पुस्तकावर बंदी घातली होती. घटनेच्या कलम १९ नुसार असणा-या लेखन व अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार न्यायालयाने ही बंदी उठवली.ती उठवण्यात आली कारण सरकारने हा आदेश काढताना खुप चुका केलेल्या होत्या.त्याचा फायदा पुस्तकाला मिळाला.पण ही याचिका लेनने केलेली नव्हती.किंवा लेनला निर्दोष ठरवावे अशीही मागणी नव्हती.पुस्तक वाचायला मिळावे अशी वाचकांची याचिका होती.लेनला कोर्टाने निर्दोष मुक्त केले ही हमोंची माहिती त्यामुळेच दिशाभुल करणारी आहे. हमोंनी या पुस्तकातील वादग्रस्त मजकुर आपल्या पत्रकात जसाच्यातसा उद्धृत करुन आणखी एक चुक केलेली आहे.ही चुक यापुर्वी फक्त संभाजी ब्रिगेडने हजारो पत्रके छापुन केलेली होती. तीच ब्रिगेड आत्ता हमोंना त्यासाठीच टार्गेट करीत आहे.आहे की नाही मिलीभगत?प्रागतिक मतदार यातुन हमोंपासुन दुरावले तरी सनातन्यांची मते पक्की करण्याच्या तसेच संभाजी ब्रिगेडसारख्या अतिरेकी आणि जातीयवादी मराठा संघटनांना जेम्स लेनचे कोलीत देवुन चिथवायचे आणि तटस्थ मतदारांची सहानुभुती मिळवुन निवडुन यायचे अशी गणिते धुर्तपणे मांडुन हमोंनी हे पत्रक काढलेले असावे. हा वाद ओढवुन घेवुन सहानुभुती मिळवायची आणि निवडुन यायचे असा डावपेच यामागे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.हा वाद कसे वळण घेतो त्यावर मराठे जिंकणारकी हरणार ते ठरेल.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या "माझी जीवनगाथा" या आत्मचरित्रात एक आठवण दिलेली आहे.१९२३ च्या राजकीय निवडणुकीत भास्करराव जाधव यांनी, "सातारा जिल्हा मराठा मतदारांचा असुन आपण मराठा आहोत सबब मराठ्यांची मते मराठ्यासच मिळाली पाहिजेत" असे प्रचारपत्रक काढले होते.{पान.२४४}
आज कायदे बदललेले आहेत. असा थेट जातीय प्रचार करता येत नसल्याने आजच्या "आडनावांच्या मराठ्यांनी"अधिक चतुर मार्ग वापरला आहे इतकेच.पण वृती तीच आहे.प्रागतिक महाराष्ट्राने याचा धिक्कार केला पाहिजे.

मैत्र's picture

15 Sep 2012 - 11:05 pm | मैत्र

स्पष्ट उत्तराबद्दल आभार.
या लेखातून असं दिसतंय की हमोंनी त्यांच्या पत्रकात लेनच्या पुस्तकातला मजकूर छापणे वगैरे प्रकार केले आहेत.
त्यांच्या ब्राम्हणांना किती काळ झोडपणार वगैरे लेखांचा समावेश करणे पण मान्य आहे. कारण तो त्यांच्या कामाचा , साहित्याचा भाग आहे. पण जर वरचा नरके यांचा लेख हा खरा असेल तर हमोंनी ब्रिगेडच्या आक्रस्ताळी उद्योगांचा खांदा करून मतपेटीवर बंदूक रोखली आहे. ही ब्राम्हण्यापेक्षा खरं तर जास्त राजकीय खेळी आहे इतर उमेदवारांना मागे टाकण्याची. एकूण ब्रिगेडविरोधी मते त्यांच्या पारड्यात जाऊ शकतात.

कार्यक्रम मात्र जरा एकांगी वाटला हमो विरोधात आणि सूत्र संचालक भावी वागळे होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसत होते. त्यामुळे इतकी चर्चा झाली.

अवांतरः तुमचा 'आम्ही लाचारांच्या फौजा' वाचण्याची इच्छा आहे, लेख जालावर उपलब्ध असल्यास. नाव वाचून अजून उत्सुकता वाढली आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Sep 2012 - 12:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता महाजन यांच्या भिन्न ब्लॉगवरील आम्ही लाचारांच्या फौजा चा हा दुवा.

-दिलीप बिरुटे

पांथस्थ's picture

16 Sep 2012 - 4:58 pm | पांथस्थ

आम्ही लाचारांच्या फौजा - http://bhinn.blogspot.com/2010/02/blog-post.html

हमो म्हणतात, "गेल्या दिडशे वर्षांपासुन महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेषाचे वातावरण पद्धतशीरपणे तयार करण्यात येत असुन सध्या त्याचा कळस गाठण्यात येत आहे." याचा अर्थ हमोंचा रोख महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याकडे आहे.दिडशे वर्षांपुर्वी त्यांचे स्त्री व दलित शिक्षणाचे काम सुरु झाले होते. हमोंचा अंगुलीनिर्देश तिकडेच आहे.

असा निष्कर्ष इतक्या ठामपणे तुम्ही कसा काढला. या बाबत ह.मो. ना त्यांची बाजू विचारायला हवी असे मला वाटते.

हमोंच्या चार पानी पत्रकातील पुर्ण दोन पाने या ब्राह्मणकार्याची जाहीरात करणारी आहेत.

ह. मो. हे ब्राम्हण आहेत आणि त्यांनी आपल्या जातीबांधवांसाठी काही कार्य केले असेल आणि त्याचा उल्लेख आपल्या पत्रकात केला असेल तर ते जातीयवादी ठरत नाहीत. ते दुसर्‍या जातीबद्दल कुठेही जाहीर पणे अपप्रचार करीत नाहीत. ते आपल्या लेखातून सामाजिक तेढ निर्माण करत आहेत असे या वरून सिद्ध होत नाही .

त्यात हमोंनी घटनेने दिलेल्या सामाजिक आरक्षणाविरुद्धही गरळ ओकलेले आहे .

असे म्हणणे मला संयुक्तीक वाटत नाही. घटनेने सर्वांना विचाराचे आणि ते विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्या विचाराचा प्रतिवाद करू शकता पण त्याला 'गरळ ओकणे ' असे लेबल लावणे योग्य वाटत नाही.

आणि जेम्स लेन च्या पुस्तकाबाबत ह. मो. नी स्वतःच सांगितले आहे त्या पुस्तकातील मतांशी ते सहमत नाहीत. फारतर ही नंतर केलेली सारवासारव आहे असे कुणी म्हणू शकतात.

हे सगळे वादविवाद ऐकताना, वाचताना एक मनात येते, कुणी कुणाला जातीयवादी म्हणावे?, सामाजिक तेढ नक्की कोण निर्माण करते आहे यावर सर्वांनी विचार करायला हवा.
आणि यात महाराष्ट्र शासनाने काही भूमिका घेणे गरजेचे आहे असे वाटते. जे शासन "माय नेम इज खान' सारख्या चित्रपटाला संपूर्ण संरक्षण देते, त्याच शासनाने तेच धोरण संमेलनासंदर्भात घ्यायला नको का?
ह. मो. जातीयवादी आहेत की नाही, त्यांची लेखक म्हणून पत काय आहे? हे त्यांचे मतदार ठरवतीलच. पण संमेलन कुठल्याही परिस्थितीत उधळले जाणार नाही याची हमी सरकारने घ्यायला हवी. तरच महाराष्ट्र हे वैचारीक स्वातंत्र्य जपणारे, आणि जातीयवाद न मानता सामाजिक समानतेवर विश्वास ठेवणारे राज्य आहे असे आपल्याला म्हणता येईल.

स्पा's picture

15 Sep 2012 - 11:04 am | स्पा

चर्चे दरम्यान महाजन बाईंचे छद्मी आणि श्री. बागवे ह्यांचे गालातल्या गालात हसणे बरेच 'बोलके' होते.

खि:खि:

यकु's picture

15 Sep 2012 - 11:24 am | यकु

कविता मॅडम कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेल्या वाट्टे..

अमोल केळकर's picture

15 Sep 2012 - 12:19 pm | अमोल केळकर

जातीचे विषारी फूल
निवडणुकीत फुलणार
साहित्य संमेलनही
मागे कसे राहणार ?

कामगिरी फत्ते झाली की
दिलगिरी येते पाठोपाठ
कुणाचे हीत कुणाचे मिलन
सर्वांना आहे तोंडपाठ

अमोल केळकर

प्रभाकर पेठकर's picture

16 Sep 2012 - 1:30 am | प्रभाकर पेठकर

हमोंचे ते वादग्रस्त पत्रक इथे उपलब्ध करून देण्यात आले तर त्या पत्रकाचा अभ्यास करून उत्तरे देता येतील. कारण कविता महाजन आणि श्री. नरके ह्यानी ते पत्रक तपशीलवार वाचले आहे (असे वाटते) आणि मिपा सदस्य फक्त 'त्या' मुलाखतीचा तपशीलच जाणतात. त्यामुळे चर्चा विषम पातळीवर होते आहे. पत्रक वाचून श्री. नरके ह्यांनी जे अर्थ लावले आहेत ते कितपत योग्य आणि कितपत अयोग्य आहेत हे कोण आणि कसे ठरवणार?

ह.मो. जर निवडून आले तर संमेलनावर ब्राह्मणी सावट असेल, असे मत चॅनलवर मांडले गेले.

कविता महाजनांच्या लेखातील त्यांचे वरील विधान, आशू जोग ह्यांनी दिलेली 'लिंक' पाहता, असत्य असल्याचे जाणवते. ह.मो. निवडून आल्यास संमेलनावर बाह्मणी सावट असेल का? असा प्रश्न प्रसन्न जोशींनी उपस्थित केला होता. 'सावट असेल' असे विधान केलेले नाही. डॉ. सदानंद मोरेंनीही ह्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी दिलेले आहे. श्री. बागवेंनीही नकारार्थी उत्तर दिले आहे आणि श्री. विठ्ठल वाघ ह्यांनीही 'नाही' असेच उत्तर दिले आहे. जिथे पुराव्यादाखल लिंक असताना स्वतःचा मुद्दा पटविण्यासाठी 'असत्य' विधाने केली जातात तर जे पत्रक मिपा सदस्यांनी पाहिले नाही, वाचले नाही त्यातील मुद्दे स्वतःच्या समर्थनार्थ, असत्याचा आधार घेऊन, कसेही वाकविता, वळविता येतील.

लोटीया_पठाण's picture

16 Sep 2012 - 2:05 pm | लोटीया_पठाण

खालील लिंक वर सदर प्रचार पत्रक पाहता येईल

https://docs.google.com/open?id=0B34x-3EqEd_6VzZGYWRVcmRaTHM

चेतन's picture

16 Sep 2012 - 3:29 pm | चेतन

धन्यवाद पठाण साहेब,

वरिल लिंक वाचुन मला तरी आक्षेपार्ह असे काही आढळले नाही. स्वतःची टिमकी वाजवण्याचा प्रकार म्हणुन या पत्रकाकडे आणी या काथ्याकूटाकडे नक्की पाहता येईल ;-)

असो...

या पत्रकातिल नक्की कोणत्या वाक्यांवरुन हमोंना अटक झाली हे कुणी सांगेल का?

चेतन
अवांतरः कंसात जर ब्राम्हण लिहले तर प्रतिसाद जातियवादी होतो का? हे प्रा डाँना विचारावे म्हणतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Sep 2012 - 3:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> कंसात जर ब्राम्हण लिहले तर प्रतिसाद जातियवादी होतो का? हे प्रा डाँना विचारावे म्हणतो.

कोणता शब्द कंसात लिहायचा आणि कंचा शब्द कंसाच्या बाहेर लिहायचा त्यासाठी आमची कशाला साक्ष लागते राव.

>>>> या पत्रकातिल नक्की कोणत्या वाक्यांवरुन हमोंना अटक झाली हे कुणी सांगेल का ?

पान नं ३ पासून आक्षेपार्ह लेखन सुरु होतं असं माझं मत आहे. पण पान नं ३ मधे तर काहीच आक्षेपार्ह दिसत नाही, असा एक व्यक्तिसापेक्ष विचारही सुरु होतो. ह.मोंना कायदेशीर प्रसंगाला सामोरं जावं लागलं ते क्रमांक तीनचं पान असावं. मटाची बातमी.

-दिलीप बिरुटे

धन्यवाद बिरुटे सर..
>> पण पान नं ३ मधे तर काहीच आक्षेपार्ह दिसत नाही, असा एक व्यक्तिसापेक्ष विचारही सुरु होतो
टिमकी वाजवणे नक्कीच आहे पण आक्षेपार्ह वाटत नाही. या बाबतीत मागे चिंतातुरजंतुना विचारलेल्या प्रश्नाची आठवण झाली.

>> कोणता शब्द कंसात लिहायचा आणि कंचा शब्द कंसाच्या बाहेर लिहायचा त्यासाठी आमची कशाला साक्ष लागते राव.
साक्ष नव्हे हो प्रश्न विचारला होता. आणि प्रा. डॉ. चा अर्थ तुम्हाला माहित आहेच. असे बरेच (प्रा. डॉ.) नक्कीच असावेत.

चेतन

प्रभाकर पेठकर's picture

16 Sep 2012 - 4:29 pm | प्रभाकर पेठकर

>>>>या पत्रकातिल नक्की कोणत्या वाक्यांवरुन हमोंना अटक झाली हे कुणी सांगेल का ?

पान नं ३ वरील एकच वाक्य. जे त्यांनी जेम्स लेनच्या पुस्तकात असल्याचे म्हंटले आहे. त्यावर संभाजी ब्रिगेडला आक्षेप आहे पण श्री. नरके म्हणतात तेच वाक्य संभाजी ब्रिगेडने छापून हजारो पत्रके वाटली होती. आणि आज हमोंच्या त्याच वाक्याला संभाजी ब्रिगेड आक्षेप घेत आहे.

नरके ह्यांच्या पत्रकातील विचार एकांगी आणि पूर्वग्रहदूषित वाटतात. ब्राह्मणद्वेषापोटी त्यांनी त्यांना सोयीचे अर्थ लावून आपले निष्कर्ष काढल्याचे दिसून येते.

मला तरी 'मी ब्राह्मण आहे म्हणून ब्राह्मणांनी मलाच मते द्यावीत' असे आवाहन कुठे दिसले नाही.

ब्राह्मण समाजाबद्दल हमोंनी जे कार्य केले आहे, जे साहित्य प्रसवले आहे त्याची माहिती त्या पत्रकात आहे. पण त्या मागिल भूमिका स्वतः हमोंनी स्पष्ट केली नसती तर त्यांच्या त्या कार्याचाच त्यांच्या विरुद्ध अपप्रचार केला गेला असता असे वाटून (आणि त्या वाटण्यात तथ्य असावे हे नंतरच्या गदारोळानंतर जाणवते) त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. एखाद्या साहित्यिकाचा अध्यक्ष पदासाठी विचार करताना त्याचे सर्व लेखन आणि सामाजिक कार्य लक्षात घेतले गेले पाहिजे असे मलाही वाटते.

'आपल्यावर अन्याय झाला आहे' ह्या भावनेपोटी सर्वच जातीं आपापल्या जातींची भूमिका विविध साहित्यातून/कार्यातून मांडत आणि मांडताना भांडत असतातच. जेंव्हा ब्राह्मणांवर अन्याय होतो आहे अशी भावना निर्माण झाली तर त्यांनाही त्यांची भूमिका मांडायचा अधिकार आहे. आणि तेच हमो करीत आहेत असा त्यांचा दावा आहे. पण म्हणून तो जातीय प्रचार होत नाही. कुठली जात श्रेष्ठ आणि कुठली जात कनिष्ठ असा तो प्रचार नाही. उलट स्वतंत्र भारतात सर्व जातींनी निर्वैर एकत्र सहजीवन आनंदाने व्यतित करावे असा त्यांचा आग्रह आहे.

मला तर सगळ्या चर्चेतुन एवढंच कळालं की, कविता महाजनांना एबिपि माझावाहिनीवर चर्चेसाठी बोलावलं होतं. एवढं सांगण्यासाठी एक धागा आणि अजुन एकाने पुणे ते रत्नागिरी जाण्याचा काढलेला धागा यात काही फरक वाटला नाही असो..

बाकी हा धागा अजुन टिकुन का आहे याचे आश्चर्य वाटते, उघड उघड भ्रष्टाचाराचे आरोप होणारे मंत्री लाल दिव्याच्या गाडीतुन फिरताना बघुन होतं तसे.

मिसळपाव.कॉम, हे मराठी साहित्य क्षेत्राशी विविध मार्गानं संबंधित असलं तरी आज जसा इथं एबिपि माझा वरच्या जातीयतेच्या चर्चेमुळं धुराळा उडतो आहे, तसं उद्या इथले संदर्भ दुस-या माध्यमांत बिनासंदर्भाचे वापरले जाउन नयेत अशी इच्छा.

ज्ञानराम's picture

16 Sep 2012 - 4:23 pm | ज्ञानराम

फक्त ५० यांच्याशी सहमत >>>>>> +१०१%

कवितानागेश's picture

16 Sep 2012 - 4:31 pm | कवितानागेश

या मजकूरात त्यांनी धोरण स्पष्ट केले आहे, त्यात आक्षेपार्ह काही दिसत नाही.
अटकेचे कारण मलातरी अजून कळत नाहीये.

यशोधरा's picture

16 Sep 2012 - 7:20 pm | यशोधरा

हमोंचे पत्रक वाचले. त्या पत्रकाचा दुवा दिल्याबद्दल आभार. पत्रकातले खालील उल्लेखही मह्त्वाचे वाटतात. इथे मला त्या ओळी चिकटवता येत नाहीत. माऊ, कसे केलेस गं?

पान ३ -

१. पहिल्या ३ ओळी. (आणखी एका विषयाबद्दल .... शंका येते)
२. १४ ते १९ ह्या ओळी - (त्याच किंवा त्याच्या दुसर्‍या दिवशी.... ही अनिष्ट प्रवृत्ती आहे.)
३. २९ ते ३२ ह्या ओळी - (माझी एकूण भूमिका... अशी माझी भूमिका आहे)

ह्या ओळींबद्दल आणि मध्ये, जी हमोंची भूमिका आहे, ज्यात काहीच विद्वेषमूलक वगैरे खरेच वाटत नाही, सुविद्य लेखिकेचे काय मत?

२. त्याउलट ज्या हरी नरके ह्यांची (तुमच्या मतांशी जुळणारी किंवा व्हाइसवर्सा) जी प्रतिक्रिया तुम्ही इथे चोप्य पस्ते केली आहे त्यात ही जी काही वाक्ये आहेत, ती वाचताना मला पडलेले प्रश्न.

१. हमोंनी निवडणुक प्रचारात स्वता:ची जात "मोडुन खायला" सुरुवात केली आहे.{आपले आडनाव ’मराठे’ असले तरी} आपण "ब्राह्मण" आहोत - आडनावावरुन नेहमीच जात पात लक्षात घेत असतील का हे नरके? कदाचित उघड बोलून दाखवत नसतील, पण मनातल्या मनात नोंदवत असतील का?

२. "गेल्या दिडशे वर्षांपासुन महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेषाचे वातावरण पद्धतशीरपणे तयार करण्यात येत असुन सध्या त्याचा कळस गाठण्यात येत आहे." याचा अर्थ हमोंचा रोख महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याकडे आहे.दिडशे वर्षांपुर्वी त्यांचे स्त्री व दलित शिक्षणाचे काम सुरु झाले होते. हमोंचा अंगुलीनिर्देश तिकडेच आहे. - विनाकारण फुले व सावित्रीबाईंचे नाव वापरुन जनमानस उचकावणे. समाजात तेढ अशीच पद्धतशीर पसरवतात का?

३. कष्टक-यांना जमिनीची मालकी देणा-या कुळकायद्यालाही हमोंचा विरोध आहे. - हे मला कुठे दिसले नाही हमोंच्या पत्रकात. माझ्या नजरेतून सुटले असल्यास क्षमस्व.

४. संभाजी ब्रिगेडसारख्या अतिरेकी आणि जातीयवादी मराठा संघटनांना जेम्स लेनचे कोलीत देवुन चिथवायचे हे कोणी मला समजावून सांगता का? ह मोंनी जेम्स लेन ह्यांना पुस्तक लिहायला आमंत्रित केले होते का? ह मोंच्या सांगण्यावरुन भांडारकरवर हल्ला झाला का? काहीतरी गोंधळ वाटतो आहे. आपल्या सोयीने वडाची साल पिंपळाला टाईप्स.

५. प्रबोधनकार ठाकरे यांच्या "माझी जीवनगाथा" या आत्मचरित्रात एक आठवण दिलेली आहे.१९२३ च्या राजकीय निवडणुकीत भास्करराव जाधव यांनी, "सातारा जिल्हा मराठा मतदारांचा असुन आपण मराठा आहोत सबब मराठ्यांची मते मराठ्यासच मिळाली पाहिजेत" असे प्रचारपत्रक काढले होते.{पान.२४४}
आज कायदे बदललेले आहेत. असा थेट जातीय प्रचार करता येत नसल्याने आजच्या "आडनावांच्या मराठ्यांनी"अधिक चतुर मार्ग वापरला आहे इतकेच.
- ही वाक्ये सुविद्य लेखिका ह्यांना जातीयवादी वाटताहेत का? आणि हीच वाक्ये हमोंनी म्हटली असती तर सुविद्य लेखिकेला ती जातीयवादी वाटली असती का?

असो. बाकी चालूदेत. एक सामान्य वाचकाच्या सामान्य मनात उठलेले हे बाळबोध, वेडेवाक्डे, ओबडधोबड प्रश्न समजा. कदाचित ह्या गदारोळामागे खूप काही असण्याची शक्यताही असू शकते. भविष्यावर नजर ठेवून केलेली बेगमीही असू शकते. अजूनही साहित्य संमेलने व्हायची आहेत, नाही का? आणि अजूनही माझ्यासारख्या सामान्य वाचकाच्या आकलनापलिकडचे बरेच काही असेल.

चालूद्या.

प्रभाकर पेठकर's picture

16 Sep 2012 - 8:23 pm | प्रभाकर पेठकर

श्रीयुत नरके ह्यांचे हमोंवर (कदाचित, हमो ब्राह्मण आहेत म्हणून) आगपाखड केलेले पत्र तुमच्या सुविद्य लेखिकेने इथे चिकटवले आहे त्या अर्थी त्यातील शब्दा-शब्दाशी त्या सहमत आहेत. ही साहित्यक्षेत्रातील 'कंपूबाजी' असावी.

श्रीयुत नरके ह्यांच्या पत्रातील मुद्यांचे विश्लेषण करीत बसले तर एक फार मोठा प्रतिसाद होईल. त्यामुळे तो उद्योग केला नाही.

नाखु's picture

17 Sep 2012 - 9:26 am | नाखु

मला लिंक कशी द्यायची माहित नाही पण लोकप्रभा दि. ५ ऑगस्ट २०११ मध्ये श्री नरके यांच्या सुस्पष्ट भुमिकेचा लेख व. ब्रिगेडिंचा पंचनामा केला आहे...

कुणी केला हा पंचनामा ? एखाद्य पोलिस स्टेशनच्या हवालदारानं का कुणा सुविद्य लेखकानं वैग्रे ?

आणि हो हरि नरके यांनी "रायगड वाघ्या प्रकरणात " संजय सोनवणी ना साथ दिली होती...

शिल्पा ब's picture

16 Sep 2012 - 10:03 pm | शिल्पा ब

बहुतेक सगळ्या प्रतिक्रिया वाचल्या. एवढंच समजलं की "ब्राह्मणांनी स्वजातियांबद्दल कै चांगलंचुंगलं लिहिलं की ते जातिय तेढ निर्माण करणारं ठरतं".

बाकी ब्रिगेड वगैरे धुराळा चालु द्या.

मृत्युन्जय's picture

17 Sep 2012 - 8:34 am | मृत्युन्जय

सुरुवातीस हा धागा वाचुन आणि एकुणच जो गदारोळ चालु आहे ते बघुन मला असे वाटत होते की "मी ब्राह्मण आहे म्हणुन मला मत द्या" अश्या आशयाचे नसले तरी आपले ब्राह्मण्य सांगुन मत मागण्याचा काही प्रकार असावा असे वाटले. आणि ते मला बरोबरही वाटले होते. ही निवडणुक लोकशाही मार्गाने चाललेली आहे आणी लोकशाही म्हटल्यावरा जातिधारि मत मागणे काही नविन नाही. जातिधारित राजकीय पक्ष आहेत तर यांनी का मत मागु नये असे माझे आपले मत होते. जोपर्यंत हमोंनी इतर जातिंवर टीक केलेली नाही तोपर्यंत ते ठिक आहे असे माझे मत होते.

परंतु हमोंचे पुर्ण पत्रक वाचल्यावर त्यांच्यावर टीका करणारे ठार मुर्ख आहेत असे माझे मत झाले आहे. ब्रिगेडी केवळ मुर्ख नाहित तर अक्कलशुन्य, गाढव, जात्यंध आणि अजुन बरेच काहीकाही आहेत याबद्दल दुमत नसावे. पण कविता महाजनांसारख्या ज्येष्ठ आणी श्रेष्ठ लेखिका असे काहितरी लिहितात आणि चक्क चुकीच्या बातम्या पसरवतात तेंव्हा खरेच मनापासुन दु:ख होते.

हमोंनी जे काही लिहिले आहे ते फक्त त्यांच्या लेखनामागची त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी म्हणजे त्याचा वापर करुन कोणी त्यांच्याविरुद्ध अपप्रचार करणार नाही. आता या लेखनाचाही विपर्यास होइल अशी अटकळ बांधण्याएवढी त्यांची मनोवृत्ती किडकी आणि सडकी नाही हे त्यांचे दुर्दैव.

३ पानी पत्रकात इतर गोष्टी न दिसता या जात्यंधजाना त्यात केवळ जातिवाचक प्रचार दिसतो हे मराठी समाजाचे दुर्दैव. हमोंनी स्वत:च्या लेखनाविषयी स्पष्टीकरण देताना हे स्पष्टपणे लिहिले आहे की:

" माझी अकुण भूमिका ब्राह्मण श्रेष्ठत्वाची किंवा चातुर्वर्ण्याची तरफदारी करण्यची नाहीच नाही, इतर जातींच्या विरोधातही नाही. हजारो जाती, धर्म, भाषा, परंपरा असलेल्या संमिश्र भारतीय समाजात जाति जातित निर्वैर सामंजस्य नांदले पाहिजे तरच भारतीय समाज एकसंध राहु शकेल. "

इतके स्पष्ट लिहुनही कोणाला असे वाटत असेल की हमो जातीचा हवाला देउन मतांचा जोगवा मागत आहेत तर तो त्या माणसाच्या सडक्या मनोवृत्तीचा प्रश्न आहे. आम्ही फक्त योग्य त्या मानसोपचार तज्ञाचा पत्ता देऊ शकतो आणि एवढेच म्हणू शकतो:

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Sep 2012 - 12:59 pm | विश्वनाथ मेहेंदळे

+१००००
एकदम असेच विचार आले होते मनात, ते पत्र वाचून.

पिलीयन रायडर's picture

17 Sep 2012 - 5:12 pm | पिलीयन रायडर

पत्रक वाचुन मला जे जे काही वाटलं ते ते लिहिल्याबद्दल धन्यवाद...!!

परंतु हमोंचे पुर्ण पत्रक वाचल्यावर त्यांच्यावर टीका करणारे ठार मुर्ख आहेत असे माझे मत झाले आहे. ब्रिगेडी केवळ मुर्ख नाहित तर अक्कलशुन्य, गाढव, जात्यंध आणि अजुन बरेच काहीकाही आहेत याबद्दल दुमत नसावे. पण कविता महाजनांसारख्या ज्येष्ठ आणी श्रेष्ठ लेखिका असे काहितरी लिहितात आणि चक्क चुकीच्या बातम्या पसरवतात तेंव्हा खरेच मनापासुन दु:ख होते.

यासाठी तर +१०००००

मला इतकाच प्रश्न पडलाय की ह.मो यांना उघडपणे ब्राह्मण महासंघानी पाठींबा का दिला नाही?

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2012 - 10:16 am | प्रभाकर पेठकर

पत्रकात इतर गोष्टी न दिसता या जात्यंधजाना त्यात केवळ जातिवाचक प्रचार दिसतो हे मराठी समाजाचे दुर्दैव.

'ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांवर अत्याचार केले' ह्या अपप्रचाराने प्रेरीत ब्राह्मणेतरांनी सर्व ब्राह्मणांना सर्व क्षेत्रातून पद्धतशीर रित्या हुसकाऊन लावणाचा प्रयत्न गेली अनेक वर्षे चालविला आहे. शिक्षणातील आरक्षण, नोकरी आणि नंतर बढती मिळविण्यामधील आरक्षण, राजकारण आणि आता साहित्यक्षेत्रातील ब्राह्मणांचे अस्तित्व टोचू लागल्याने तिथूनही ब्राह्मणांना हुसकाऊन लावायचा चंग कांही ब्राह्मणेतरांनी बांधलेला दिसून येतो. आता ह्या उदात्त हेतूसाठी दिसेल तिथे, आणि जिथे दिसणार नाही तिथे असत्याचा आधार घेत, ब्राह्मण्याची लेबले चिकटवित आपला लढा चालवायचा असा ह्या कांही ब्राह्मणेतरांच्या स्वयंघोषित मसिहांचा प्रयत्न दिसून येतो. पूर्वीच्या काळी कांही ब्राह्मणांनी आपल्या वर्चस्वाच्या लढाईत काही चुका केल्या त्याची शिक्षा आताच्या जातियतेपासून दुर जाणार्‍या ब्राह्मणांना द्यायची आणि त्यांना पुन्हा ह्या जातियतेच्या चिखलात ओढून आणायचे असे हे चित्र आहे. म्हणजेच जातीयतेला खतपाणी घालण्याचे आणि एकूण समाजातील जुन्या कल्पनांना, विचारांना, रिती-रिवाजांना सतत उजाळा देत जातीयता जागृत ठेवायची असा प्रयत्न कांही ब्राह्मणेतरांकडून केला जात आहे आणि स्वार्थासाठी 'उलट्या बोंबा' मारीत ब्राह्मणांनाच बदनाम करीत राहायचे.

आजही ब्राह्मणेतरांमध्ये, त्यांच्या जातीतीलच, उचनिचतेचे विचार ऐकले आणि प्रथा पाहिल्या की जातीयता कोण पसरवीत आहे ह्या बाबत संभ्रम निर्माण होतो. पण, जातियतेला मागे टाकायचे असेल तर त्यावर नुसत्या चर्चा करून जातीयता जिवंत ठेवण्यापेक्षा कृतीतून ती मागे टाकणे गरजेचे आहे.

एक लेखक म्हणून ह.मो. संमेलनाध्यक्षपदासाठी योग्य असले तरी त्यांनी जे जातीचे मुद्दे अकारण मध्ये आणले, त्यामुळे वातावरण गढुळले. हे मुद्दे मध्ये आणले नसते, लेखन पाहता तेकमेव बरे नाव होते.

वरील एका प्रतिसादात हे विधान करणार्‍या कविता महाजन ह्यांनी वाहिनीवरील चर्चे दरम्यान मात्र हमोंवर 'वैचारिक दारिद्र्या'चा आरोप केला आहे. म्हणजेच, 'वैचारिक दारिद्र्य' असणारा 'एकमेव' उमेदवारच संमेलनाध्यक्ष पदासाठी त्यांना आता योग्य वाटतो आहे. ह्याला दुटप्पी धोरण म्हणावे काय?

नाना चेंगट's picture

17 Sep 2012 - 1:39 pm | नाना चेंगट

>>> ह्याला दुटप्पी धोरण म्हणावे काय?

विचारवंत होण्यासाठी ती एक प्रमुख अट असते असे आमचे गुरू सांगतात.

Kavita Mahajan's picture

17 Sep 2012 - 4:56 pm | Kavita Mahajan

ह. मों.च्या या पुस्तिका लेखनात वैचारिक दारिद्र्य आहेच. बालकांडची प्रस्तावना वाचली तरी या दारिद्र्याचे दर्शन तिथेही घडते.
जर चारही उमेदवारांचे लेखनकाम पाहिले, तर मात्र पुस्तकांची संख्या आणि वाचकप्रियता या बाबतीत ह. मो. उजवे ठरतात... इतकेच मला म्हणायचे होते. याचे अधिक स्पष्टिकरण मी लिहिलेले आहे, इतरांनी काय केलेले नाही ते इथे पुन्हा सांगत नाही.

यशोधरा's picture

17 Sep 2012 - 5:38 pm | यशोधरा

हास्यास्पद प्रतिसाद.

नाना चेंगट's picture

17 Sep 2012 - 6:59 pm | नाना चेंगट

नुसताच हास्यास्पद नाही तर विचारवंती प्रतिसाद ;)

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2012 - 7:06 pm | प्रभाकर पेठकर

हा: हा: हा: वैचारिक दारिद्र्य असणारी व्यक्ती एवढी पुस्तके लिहीते आणि त्या व्यक्तीच्या पुस्तकांना वाचकप्रियताही लाभते म्हणजे ते सर्व वाचकही वैचारिक पातळीवर दरिद्रीच असले पाहिजेत आणि अशा वैचारिक दरिद्र्यांच्या वैचारिक दरिद्री साहित्यिकास संमेलनाध्यक्ष पदासाठी 'लायक' उमेदवार समजणे म्हणजे वैचारिक 'श्रीमंती' असावी.

आनंद आहे.

बाळ सप्रे's picture

17 Sep 2012 - 11:30 am | बाळ सप्रे

ह.मों.चे पत्रक होते प्रचारासाठी. त्यात त्यांच्या साहित्यविषयी कामगिरीचा आढावा घेणे इतपत ठीक होते. ब्राह्मणांविषयीच्या कार्याविषयी इथे लिहिण्याची गरज नव्हती. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ केवळ साहित्यासाठीच वापरायला हवे होते.

आणि जरी त्यांनी चूक केली तरी त्यात अटक करण्याइतके आक्षेपार्ह काही आढळलं नाही.
या लेखनाला जर अटक होणार असेल तर खेडेकरचा पुस्तकाबद्दल अजामीन पात्र गुन्हा मानावा लागेल.

अशाप्रकारे पोलिस दलाला अनावश्यक कामात गुन्तवण्यापेक्षा इतर कितीतरी महत्वाची कामे त्यांना करण्यास भाग पाडणे असे गृह खात्याला/ संबंधित अधिकार्‍याना वाटत नाही ही मोठी शोकांतिका आहे..

मैत्र's picture

17 Sep 2012 - 11:42 pm | मैत्र

ह.मों.चे पत्रक होते प्रचारासाठी. त्यात त्यांच्या साहित्यविषयी कामगिरीचा आढावा घेणे इतपत ठीक होते. ब्राह्मणांविषयीच्या कार्याविषयी इथे लिहिण्याची गरज नव्हती. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ केवळ साहित्यासाठीच वापरायला हवे होते.

बरोबर. यात जातीयता नव्हती तर जातीचं राजकारण होतं आणि भारतात बहुतेक सर्व राजकारण जातीवर होतं ही दुर्दैवाने वस्तुस्थिती आहे. यात चूक ही त्यांनी हे राजकारण किमान साहित्यापासून दूर ठेवायला हवं होतं.

आणि जरी त्यांनी चूक केली तरी त्यात अटक करण्याइतके आक्षेपार्ह काही आढळलं नाही.
या लेखनाला जर अटक होणार असेल तर खेडेकरचा पुस्तकाबद्दल अजामीन पात्र गुन्हा मानावा लागेल.

+११११११ ... या पत्रकासाठी त्यांना इतक्या तत्परतेने अटक होऊ शकते तर ब्रिगेडचं "साहित्य" राजरोस प्रकाशित असताना आणि कल्पनेपलिकडे जातीय द्वेष पसरवणारं असताना त्यावर काहीही कारवाई होत नाही.

अशाप्रकारे पोलिस दलाला अनावश्यक कामात गुन्तवण्यापेक्षा इतर कितीतरी महत्वाची कामे त्यांना करण्यास भाग पाडणे असे गृह खात्याला/ संबंधित अधिकार्‍याना वाटत नाही ही मोठी शोकांतिका आहे..

मराठा महासंघ ही ब्रिगेडची मातृसंस्था आहे. मराठा महासंघाचा कर्ता धर्ता पक्ष आणि महाराष्ट्र गृह खातं यातले संबंध जगजाहीर आहेत. अजून प्रत्यक्ष काय पुरावा हवा त्यांच्या पक्षपाती पणाचा?

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2012 - 12:15 pm | प्रभाकर पेठकर

त्यात त्यांच्या साहित्यविषयी कामगिरीचा आढावा घेणे इतपत ठीक होते. ब्राह्मणांविषयीच्या कार्याविषयी इथे लिहिण्याची गरज नव्हती.

मतदार साहित्यिक हमोंच्या फक्त साहित्याचाच विचार करून मतदान करणार असतील तर अत्यंत न्याय्य विधान मानावे लागेल. पण, हमोंची भिती (जी पूर्वानुभवावर आधारीत आहे) अशी आहे की त्यांच्या भूमिकेमुळे अपप्रचाराला संधी मिळेल आणि त्यांना निवडणूकीत पाडण्यासाठी त्याचा गैरवापर केला जाईल. तसे काही घडू नये म्हणून त्यांनी त्याची भूमिका विशद करून मांडली आहे.

असेही, नुसत्या साहित्याचा विचार करायचा झाला तर जे साहित्य त्यांनी ब्राह्मणांची बाजू मांडण्याकरीता प्रसवले आहे, ज्याला ते वैचारीक साहित्य म्हणून संबोधितात, ते 'साहित्य' नाही का? त्या साहित्याला, त्यांच्या एकूण साहित्यिक प्रवासात, मान नाही का? वर लिमाउजेट ह्यांनी इथेदिलेल्या उतार्‍यात हमोंनी व्यक्त केलेल्या भावना जातीयवादाला खतपाणी घालणार्‍या आहेत का? ब्राह्मणेतर लेखकांनी त्यांच्या जातीवर होणार्‍या/झालेल्या अन्यायांवर लेखन केले नाहीए का? 'झाडाझडती','उपरा' ह्या कादंबर्‍या त्या लेखकांच्या साहित्यिक कर्तृत्त्वात बसत नाही का?

जे साहित्यिक कार्य आहे तेच हमोंनी दिले आहे. त्यातील ब्राह्मण जाती बद्दल लिहिलेले जे साहित्य आहे, त्यामागची फक्त त्यांची भूमिका मांडली आहे. ती ही तशी गरज होती म्हणून. मला तरी त्यात काही गैर वाटत नाही.

बाळ सप्रे's picture

17 Sep 2012 - 1:13 pm | बाळ सप्रे

ह. मों. नी याविषयावर लेखन केले तिथपर्यंत ठिक आहे. 'झाडाझडती','उपरा' या पंक्तीत ते बसते. यावर वाद नाही.
पण मत मागताना जर त्यांनी साहित्यिक व्यासपीठावर ब्राह्मणांवरील अत्याचाराची बाजू जास्त मांडली असेल तर ते योग्य वाटत नाही. हे मुद्दे ब्राह्मण संघ वगैरे च्या व्यासपीठावर योग्य आहेत इतका नीरक्षीर विवेक बाळगायला हवा होता.

माझ्याआधीच्या एका प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे ह. मों.चे हे आवाहन देखिल प्रतिगामीपणाचे उदाहरण आहे.
एक साहित्यिक म्हणून आवाहन करायचे असते तर सर्व वाचकांना (irrespective of जात) आवाहन केले असते. साहजिकच हे आवाहन त्यांनी ब्राह्मणाना केले असे सत्कृत्दर्शनी दिसत असल्यामुळे एक ब्राह्मण असणे ही ओळख जास्त महत्वाची वाटली हे स्पष्ट आहे.

काही लोक नको तिथे जातीचे राजकारण करतात म्हणून तुम्ही देखिल तसेच करणे योग्य आहे का?

खरेतर यासर्व तथाकथित विद्वेषविरोधामुळे उगाच ब्रिगेड जास्त बोकाळते आहे. त्यांना शक्यतितके अनुल्ले़खाने मारणे योग्य ठरेल.

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2012 - 1:36 pm | प्रभाकर पेठकर

साहित्यिक व्यासपीठावर ब्राह्मणांवरील अत्याचाराची बाजू जास्त मांडली असेल तर ते योग्य वाटत नाही.

पत्रकात त्यांनी ब्राह्मणांची बाजू मांडली आहे की त्यांच्या त्या वैचारीक साहित्या मागील भूमिका मांडली आहे ह्यावर, ते पत्रक वाचून, पुन्हा एकदा विचार करावा ही विनंती.

आवाहन करायचे असते तर सर्व वाचकांना (irrespective of जात) आवाहन केले असते.

हे पत्रक सर्व वाचकांसाठी नसून, फक्त साहित्यिक मतदारांसाठी आहे.
तेही, हे पत्रक, फक्त आणि फक्त 'ब्राह्मण मतदारांनाच' पाठविले आहे असा उल्लेख माझ्या तरी वाचनात कुठे आला नाही.

साहजिकच हे आवाहन त्यांनी ब्राह्मणाना केले असे सत्कृत्दर्शनी दिसत असल्यामुळे.....

काय आवाहन त्यांनी केले आहे? मी ब्राह्मण आहे म्हणून, किंवा ब्राह्मणांसाठी काही कार्य केले आहे म्हणून मला मते द्या असे?
असे कुठलेही आवाहन त्यांनी केलेले नाही. त्यांनी फक्त त्या साहित्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2012 - 1:41 pm | प्रभाकर पेठकर

ह्या धाग्याची, एवढी जास्त, पात्रता नसताना फक्त धागाकर्ती एक ज्येष्ठ लेखिका आहे म्हणून एवढी चर्चा झाली. पण आता त्या स्वतः ह्यात सहभागी होत नसल्याने ह्यावर अजून चर्चा करावी असे मला वाटत नाही. दूसर्‍या धाग्यांनाही न्याय द्यावा असे वाटते.

नाना चेंगट's picture

17 Sep 2012 - 7:09 pm | नाना चेंगट

>>>>ह्या धाग्याची, एवढी जास्त, पात्रता नसताना फक्त धागाकर्ती एक ज्येष्ठ लेखिका आहे म्हणून एवढी चर्चा झाली.

स्वल्प विरामाची जागा चुकली असावी का?

ह्या धाग्याची एवढी जास्त पात्रता नसताना ,फक्त धागाकर्ती एक ज्येष्ठ लेखिका आहे , म्हणून एवढी चर्चा झाली.

असे असायला हवे होते का? कारण नाही तर अर्थ बराच वेगळा होतो
च्यामारी ओ मराठीचे प्राध्यापक जरा सांगा बरे... आमची समज जरा कमी आहे.

आशु जोग's picture

17 Sep 2012 - 7:51 pm | आशु जोग

ज्या लेखनावरून गोंधळ सुरू आहे
ते साहीत्य मानावे का मूळात प्रश्न आहे ?

त्यामुळे साहित्यबाह्य गोष्टींना खरेच काही महत्व नाही.

--