गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु ,
गुरुर देवो महेश्वरा |
गुरुर साक्षात परब्रम्हा ,
तस्मयी श्री गुरुवे नम: ||
आज शि़क्षक दिन, सर्व गुरुवर्यांना वंदन करुन आजचा दिवस गोडाने सुरु करुयात :)
साहित्य:
१ वाटी बासमती तांदूळ ( स्वच्छ धुवून , निथळत ठेवावे)
१/२ वाटीपेक्षा थोडीच जास्त साखर
३-४ लवंगा
१ टीस्पून केशर ( हलकेच भाजून घेणे )
१ टीस्पून वेलचीपूड
तूप
काजू, बदामाचे काप, बेदाणे
पाकृ:
पॅनमध्ये तूप गरम करून काजू हलक्या सोनेरी रंगावर परतून घेऊन बाजूला काढून ठेवणे.
आता त्याच पॅनमध्ये लंवगा घालून, निथळून ठेवलेले तांदूळ घालून परतणे.
परतलेल्या तांदळात २ वाट्या पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्यावा.(मी मायक्रोवेव्हमध्ये शिजवला आहे)
शिजवलेला भात ताटात काढून पसरवून घ्यावा.
पॅनमध्ये साखर व पाव वाटीपेक्षा थोडे कमी पाणी घालून एकत्र करा.
त्यात भाजलेले केशर घाला व गोळीबंद पाक करावा.
पाक खूप पातळ राहता काम नये नाहीतर भात मिसळताच तो पांचट होईल.
पाक चिकट झाला की त्यात गार केलेला भात घालून एकत्र करा.
त्यात तळलेले काजू, बदामाचे काप व बेदाणे घालावेत व झाकून मंद गॅसवर एक - दोन वाफा काढाव्यात.
वरुन थोडे साजूक तूप सोडावे.
थोडा गार झाला की वेलचीपूड घालावी.
हा भात आदल्या दिवशी करुन ठेवावा म्हणजे छान मुरतो व चवीला ही छान लागतो.
प्रतिक्रिया
5 Sep 2012 - 4:10 am | Pearl
खूपच सुंदर दिसतो आहे साखरभात.रेसिपीसाठी धन्यवाद.
तयार भाताचा पण साखरभात करता येतो का. असेल तर त्याची रेसिपी काय आहे.
5 Sep 2012 - 5:33 am | अर्धवटराव
कसला "गोड" दिसतोय भात :)
अर्धवटराव
5 Sep 2012 - 8:12 am | किसन शिंदे
भारीच!!
इथून पुढे दर बुधवारची वाट पाहणे आले. ;)
5 Sep 2012 - 8:53 am | प्रचेतस
छळ मांडीयेला.
5 Sep 2012 - 8:53 am | भरत कुलकर्णी
तोंपासु
~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~
(वर असलेली चिन्हे लाळेच्या लाटा आहेत.)
5 Sep 2012 - 9:59 am | अत्रुप्त आत्मा
5 Sep 2012 - 10:10 am | ५० फक्त
पाकृ मस्तच, धन्यवाद.
अवांतर -
सर्व गुरुवर्यांना वंदन करुन आजचा दिवस गोडाने सुरु करुयात - पण आमच्या शिक्षणाची सुरुवातच
ग ग गडुचा मास्तर लई *डुचा, अशानं झाली आहे.
5 Sep 2012 - 10:20 am | मदनबाण
सकाळी सकाळी असे धागे उघडले की अख्खा दिवस त्या पदार्थाच्या आठवणीत जातो ! ;)
लयं ब्येस्ट ! :)
5 Sep 2012 - 11:00 am | जाई.
झकास!!!!!
5 Sep 2012 - 3:08 pm | तर्री
हया सुरेख पा.कृ. साठी आपला जाहीर निषेध !
5 Sep 2012 - 3:45 pm | गणपा
ब्येष्टंय.
5 Sep 2012 - 4:05 pm | इरसाल
भारी हाये भात.
5 Sep 2012 - 4:20 pm | पिंगू
साखरभात माझ्या आवडीचा आहे..
5 Sep 2012 - 6:10 pm | पैसा
मस्त! मस्त!! मस्त!!!
5 Sep 2012 - 6:17 pm | रेवती
शेवटचा फटू नेहमीप्रमाणे भारी.
एक प्रश्न- भात मोकळा शिजवायचा तो पूर्णपणे शिजलेला हवा ना?
5 Sep 2012 - 8:56 pm | सानिकास्वप्निल
हो भात पूर्णपणे शिजलेला हवा नाहीतर अरधवट शिजवलेला भात पाकात घालताच आळण्याची शक्यता असते.
5 Sep 2012 - 9:30 pm | रेवती
ओक्के. धन्यवाद.
6 Sep 2012 - 1:45 am | प्रभाकर पेठकर
आहारात साखर वर्ज्य असल्याने माझा पास.
पण जेंव्हा साखर वर्ज्य नव्हती तेंव्हा साखरभात/केशरभात/नारळीभात भरपूर खाल्ला आहे. गोडाच्या भाताला केशर, वेलचीच्या चवीवर मात करणारी लवंग आणि साजुक तुपाची चव.... आहाहा..... अवर्णनिय.
6 Sep 2012 - 1:45 am | शुचि
सुरेख!!!
6 Sep 2012 - 8:00 am | कच्ची कैरी
झक्कास्स !!!!!!!!!
6 Sep 2012 - 1:41 pm | मधुरा ashay
खूपच छान छान
6 Sep 2012 - 7:24 pm | हारुन शेख
रेसिपी पाहून डोळे तृप्त झाले. आमच्या घरी असाच भात बनवतात (म्हणजे दिसतो असाच) त्याला 'जर्दा' म्हणतात. नक्कीच लझीझ असणार.
6 Sep 2012 - 7:31 pm | कॉमन मॅन
साखरभाताचं चित्रं छानच आहे, परंतु चित्रावरून तरी भात थोडा फडफडीत झाला आहे असे दिसते. भात मोकळा जरूर असावा, परंतु मऊ अन् मोकळा असावा..
असो..
1 Oct 2012 - 10:28 am | ऋषिकेश
काल किचनचा ताबा घेऊन हा भात आणि पेठकरकाकांनी दिलेली मश्रुम लसुणी असा बेत केला होता..
भात अप्रतिम झाला होता.. आभार!