साहित्यः
दीड वाट्या बासमती तांदळाचा मोकळा शिजवलेला भात
३-४ अंडी फेटून घेतलेली
१ वाटी पातळ उभा चिरलेला कोबी
१ वाटी पातळ उभा चिरलेला गाजर
१ वाटी पातळ उभी चिरलेली भोपळी मिर्ची
१/२ वाटी बारीक चिरलेली फरसबी
१/२ कप कांद्याची पात चिरुन
पातीचे कांदे उभे चिरुन
१/२ टेस्पून आले
१ टेस्पून लसूण
दीड टेबल्स्पून सोया सॉस
दीड टेबल्स्पून हॉट चिली सॉस (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टेबल्स्पून स्वीट चिली सॉस
१ टीस्पून पांढरी मिरपूड (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
मीठ लागले तर
तेल
पाकृ:
प्रथम नॉन-स्टीक पॅनमध्ये फेटलेली अंडी घालून चमच्याने सतत हलवत रहावे.
जसे जसे अंडी शिजू लागतील तसे ते गोळा होऊ लागेल. (स्क्रॅम्बल्ड एगप्रमाणे)
अंडी पूर्ण शिजली की बाजूला काढून ठेवावी.
त्याच पॅनमध्ये तेल गरम करुन घ्यावे व त्यात बारीक चिरलेले आले + लसूण चांगले परतवून घ्यावे.
त्यात चिरलेला पातीचा कांदा व फरसबी घालून ४-५ मिनिटे परतावे.
आता त्यात चिरलेला कोबी व भोपळी मिरची घालावी. आच मध्यम असावी.
सगळ्यात शेवटी चिरलेला गाजर व कांद्याची पात घालावे व ३-४ मिनिटे परतावे.
सगळ्या भाज्यांचा थोडा करकरीतपणा (क्रंचीनेस) असला पाहिजे.
आता त्यात सोया सॉस, हॉट चिली सॉस, स्वीट चिली सॉस व पांढरी मिरपूड घालून सगळे एकत्र करावे.
चव घेऊन बघावे, लागले तरचं मीठ घालावे, सगळ्या सॉसमध्ये मीठ असते. (भातात ही शिजवताना मीठ घातले होते)
आता त्यात शिजवलेली अंडी व शिजवलेला भात घालून नीट मिक्स करावे.
सगळ्या भाताला सॉस व भाज्या नीट लागल्या पाहीजे.
झाकून एक वाफ काढावी.
गरमा-गरम व्हेजिटेबल - एग फ्राईड राईस खाण्यासाठी तयार आहे.
आवडत असल्यास तुम्ही व्हेज किंवा चिकन मंच्युरियन बरोबर किंवा हनी - चिली पोटॅटो बरोबर सर्व्ह करु शकता.
प्रतिक्रिया
29 Aug 2012 - 4:33 am | Mrunalini
मस्त एकदम.... :) तोंपासु
29 Aug 2012 - 6:18 pm | बॅटमॅन
+१.
असेच म्हणतो.
बाकी "तोंपासु" वाचून चैनीज/जाप्नीज डिश आहे की काय असे वाटले क्षणभर ;)
29 Aug 2012 - 4:42 am | बहुगुणी
मस्त पदार्थाची निवड आणि अप्रतिम मांडणी!
(अंड्याऐवजी तसंच अंड्याव्यतिरिक्त टोफू घालून फ्राईड राईस खाल्लेला आहे, तोही आवडतो. तळलेला टोफू 'क्रंची' लागत असला तरी स्टीम्ड टोफू हा प्रकृतीला आधिक चांगला असं ऐकलंय.)
29 Aug 2012 - 4:43 am | बहुगुणी
दोनदा आल्याने...
29 Aug 2012 - 5:59 am | रेवती
अरे वा!! चांगला प्रकार आहे.
भाताचा रंग, भाज्या सगळं छान दिसतय......एकदम रंगीबेरंगी!
ही पाकृ अंडे न घालताही करता येईल असे वाटते. ;)
आमच्यासारख्यांची सोय झाली.
29 Aug 2012 - 6:45 am | कौशी
मस्तच जमलाय भात...
29 Aug 2012 - 10:27 am | अस्मी
वाह...मस्स्त, छान , सुरेख :)
एकदम सह्ही पाकृ आणि फोटो तर लाजवाब!!
29 Aug 2012 - 11:09 am | अक्षया
नेहमी प्रमाणेच अप्रतिम.. :)
29 Aug 2012 - 11:21 am | sagarpdy
पाकृ करून पाहण्यात येईल. फोटू झकास! :)
अवांतर : हा राइस खरोखर चॉपस्टिकस वापरून खाता येतो का ?
29 Aug 2012 - 11:48 am | प्रभाकर पेठकर
मस्तं. पाककृती आणि छायाचित्रं दोन्ही झकास.
sagarpdy प्रमाणेच मलाही प्रश्न पडला आहे. चॉपस्टीक्स् वापरून हा भात खाता येईल? मला वाटते चॉपस्टीक्स् वापरून खायचा भात जरा गिचका गोळा असतो. एवढा मोकळा फडफडीत नसतो. अर्थात, मी कधी प्रयत्न केलेला नाही मला काटा-चमचाच आवडतो (कारण, जमतो).
'व्हेजिटेबल-एग फ्राईड राईस' नांव गोंधळात टाकणारे आहे. कारण 'व्हेजिटेबल फ्राईड राईस' हे शाकाहारी भाताचे नांव कानवळणी पडले आहे. ह्या भाताला 'व्हेजिटेबल्स अँड एग फ्राईड राईस' असे नांव जास्त समर्पक वाटते.
29 Aug 2012 - 1:12 pm | सानिकास्वप्निल
चॉपस्टीक्स् हा सादरीकरणाचा भाग म्हणून वापर केला आहे, तरीही चॉपस्टीक्स् कसे वापरतात ह्याचे कुतूहल किंवा शिकण्याची हौस म्हणा हव तर म्हणून मी विकत आणले आहे पण अजून काही त्याने खाणे जमले नाही, प्रयत्न सुरु आहे :)
पेठकर काका म्हणतात तसा चॉपस्टीक्सचा वापर छोटे तुकडे किंवा गिचका ,गोळा भात असतो तो उचलण्यास सोयीचे पडते, तरीही जो मोकळा, कोरडा (लाँग ग्रेन राईस) भात असतो तो खाण्यास ही चॉपस्टीक्स् वापरु शकता. खालील माहिती आंजावरून घेतली आहे.
In chopstick-using cultures, food is generally made into small pieces; however, some chopstick designs have carved rings encircling the tips to aid in grasping larger pieces of food. Short grain rice sticks together well, as does medium grain rice. Long grain rice, which has more amylose, is more commonly found in the Western world. Amylose is a long, straight, starch molecule that does not gelatinize when cooked. So, this type of rice is "fluffy" and the end result is more dry. The method of cooking determines the moisture, but even if long grain rice is cooked with more water, it will not stick together the same way medium or short grain rice will—it will just become a mass of mush at the bottom of the pot. The different types of starches in rice give the different varieties their unique texture and characteristics. Chopsticks are easier to use on short and medium grain rice, as the rice will clump together, but can still be used comfortably on long grain rice. Additionally, in traditional Chinese culture, holding the rice bowl up to the mouth and using chopsticks to transfer the rice directly into the mouth is considered proper eating etiquette. The types of rice used make no difference under this etiquette since rice is rarely served on the plate in China.
29 Aug 2012 - 1:30 pm | sagarpdy
प्रयत्न करून बघतो :)
31 Aug 2012 - 10:12 pm | आनंदी गोपाळ
माझ्या निरिक्षणानुसार चॉपस्टिक्स (भात) "ढकलण्यासाठी" वापरतात. तो बाऊल असा तोंडाजवळ धरून भात भराभर तोंडात ढकलत जेवता येते.
नूडल्स कोणत्याही काट्याचमच्याने खावे तसे चॉपस्टीक्सने उचलून खाता येते.
मोठे 'पिसेस' सहज उचलता येतात..
पण मुख्यतः ढकलणे!
29 Aug 2012 - 8:20 pm | सानिकास्वप्निल
पाकृचे नाव बदलले आहे व्हेजिटेबल्स अँड एग फ्राईड राईस असे ठेवले आहे
धन्यवाद
29 Aug 2012 - 8:27 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद सानिकास्वप्निल,
नांव बदलाचे स्वागत आहे.
29 Aug 2012 - 12:16 pm | धनुअमिता
मस्त.
अप्रतिम.
29 Aug 2012 - 12:22 pm | इरसाल
सध्या जवळपास रोजच चिकन फ्राइड राइस, वेज फ्राइड राइस, एग्ग फ्राइड राइस, शेजवान फ्राइड राइस वर जोर आहे.
मज्जा येतेय एवढेच.
29 Aug 2012 - 12:41 pm | कॉमन मॅन
छानच..
29 Aug 2012 - 12:46 pm | गणपा
आहाहा काय ते फोटु........ तोंडात जिव्हारसाची त्सुनामी उठली आहे.
29 Aug 2012 - 1:07 pm | कॉमन मॅन
"तोंडात जिव्हारसाची त्सुनामी उठणे.."
वाक्प्रचार खूपच आवडला. अवांतराबद्दल क्षमस्व..
29 Aug 2012 - 1:19 pm | स्मिता.
पहिलाच फोटू कसला टेम्टिंग आहे! मस्तच... तुझ्या पाकृ करून खाण्यापेक्षा फक्त बघत रहाव्याश्या वाटतात :)
29 Aug 2012 - 1:31 pm | कॉमन मॅन
अहो पण केल्याशिवाय बघता कशा येणार..?
29 Aug 2012 - 1:45 pm | स्मिता.
बघायच्या म्हणजे इथल्या फोटोतच बघायच्या! (कारण एवढं हाय क्लास सादरीकरण मला जमणारच नाही ;) )
29 Aug 2012 - 1:48 pm | कॉमन मॅन
प्रांजळ खुलाश्याबद्दल आभारी आहे..
29 Aug 2012 - 1:39 pm | अत्रुप्त आत्मा
@तुझ्या पाकृ करून खाण्यापेक्षा फक्त बघत रहाव्याश्या वाटतात >>> १०००++++
29 Aug 2012 - 5:35 pm | पैसा
सगळे फोटो अप्रतिम. पाकृ खूप सोपी आणि छान दिसणारी! झक्कास!
29 Aug 2012 - 5:41 pm | चिंतामणी
बाकी नेहमी प्रमाणेच.
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
एक गोष्ट लै भारी.
व्हेजिटेबल - एग फ्राईड राईस अशी एकत्रच पाकृ असल्याने "ही पाकृ अंडे घालून कशी करायची" असा ठरावीक (वाह्यात) प्रश्ण विचारणा-यांची बोलती बंद झाली.
29 Aug 2012 - 5:56 pm | गवि
छान आहे पाककृती.. करुन पाहण्याची इच्छा होईल अशी.
याचं नाव वेजिटेबल एग फ्राईड राईस असं न ठेवता, एग & व्हेजीज फ्राईड राईस किंवा एग फ्राईड राईस विथ वेजिटेबल्स / वेजीज असं काही ठेवलं असतं तर व्हेजिटेबल शब्दाने सुरुवात केल्यावर येणारा "शुद्ध वैष्णो ढाबा" इफेक्ट येणार नाही.
29 Aug 2012 - 7:38 pm | राणि
अप्रतिम पाककृती......
29 Aug 2012 - 9:08 pm | एस
एकतर आधीच जाम भूक लागलीय आणि त्यात ही अप्रतिम पाकृ वाचली. त्यामुळे जी अवस्था झालीय त्याबद्दल तुमचा निषेध असो... :)
मी कितीतरी वेळ तो पहिला फोटो पाहत बसलोय... :(
29 Aug 2012 - 11:17 pm | जाई.
वाह
30 Aug 2012 - 1:38 pm | मुक्त विहारि
आणि खालील वाक्य तर खासच,,,
"गरमा-गरम व्हेजिटेबल - एग फ्राईड राईस खाण्यासाठी तयार आहे."
30 Aug 2012 - 1:41 pm | चिंतामणी
>>>आवडत असल्यास तुम्ही व्हेज किंवा चिकन मंच्युरियन बरोबर किंवा हनी - चिली पोटॅटो बरोबर सर्व्ह करु शकता.
हनी - चिली पोटॅटोची पाकृ झटकन देउन टाक.
30 Aug 2012 - 1:41 pm | चिंतामणी
>>>आवडत असल्यास तुम्ही व्हेज किंवा चिकन मंच्युरियन बरोबर किंवा हनी - चिली पोटॅटो बरोबर सर्व्ह करु शकता.
हनी - चिली पोटॅटोची पाकृ झटकन देउन टाक.
30 Aug 2012 - 2:36 pm | सानिकास्वप्निल
लवकरचं देण्यात येईल :)
धन्यवाद
30 Aug 2012 - 2:44 pm | चिंतामणी
:)
30 Aug 2012 - 2:38 pm | कच्ची कैरी
अप्रतिम! अप्रतिम ! अप्रतिम ! याशिवाय दुसरा काही शब्दच सुचत नाहीये :)
31 Aug 2012 - 6:25 am | शुचि
चविष्ट असणारच...... सुंदर दिसते आहे.
1 Sep 2012 - 10:12 am | सुहास झेले
काय बोलावे सुचत नाही आहे..... किती स्तुती करणार आणि कितीवेळा? :) :)
एकदम भन्नाट रेसिपी :) :)
1 Sep 2012 - 10:54 am | अमोल केळकर
१ नंबर :)
अमोल केळकर
1 Sep 2012 - 11:53 am | मदनबाण
मस्त ! :)
1 Sep 2012 - 12:20 pm | मिरची
जबर्या......नक्कीच करुन बघेन......
अवांतर पण महत्त्वाचे......या पा.क्रुंना वाचणखुण साठवा ही सुविधा का नाही?
1 Sep 2012 - 12:25 pm | सोत्रि
शॉल्लिट!
- (तोंपासु) सोकाजी