इशान्य भारत एक ओळख

विश्वास कल्याणकर's picture
विश्वास कल्याणकर in भटकंती
28 Aug 2012 - 5:43 pm

एखादा किचकट विषय जेंव्हा आपण हाताळतो तेंव्हा तो केंव्हा हाताबाहेर काढतो असे आपले होते.

नेहरुंच्या काळापासुन इशान्य भारताची समस्या कांग्रेस च्या मानगुटीवर बसली आहे ती काही पिच्चा सोडत नाही. तसे बघितले तर कुठलीच समस्या आपोआप सुटत नसते.

संघाने मात्र हा विषय खुप गंभीरतेने घेतला आहे. संघाचे अनेक कार्यकर्ते गेल्या ६० वर्षापासुन इथे काम करित आहेत. प्रचारक या शब्दाचा अर्थ मला आजही पुर्णपणे कळला नाही. प्रचार करणारा म्हणजे आपल्या सोप्या भाषेत मार्केटींग करणे असा होतो. पण संघाने याचा अर्थ खुप सोपा केला आहे. प्रचारक नक्की काय करत असतो असे विचारले असता एका वरीष्ट प्रचारकाचे उत्तर खुप् मार्मीक होते. तो म्हणाला की रोज गावात ठराविक सं ख्येच्या लोकांना भेटावयाचे व त्यांची ख्याली खुशाली विचारणे. त्यांच्या रोजच्या समस्यावर त्यांना एक मित्र म्हणुन सल्ला देणे व त्यांच्या उपयोगी पडणे हे प्रचारकाचे काम असते. याचाच अर्थ आजच्या जगात जेंव्हा शेजारच्या फ्लैट मध्ये कुणी आजारी असेल तरी आपण साधी चौकशी देखील करीत नाही तिथे हा प्रचारक एका अनोळखी गावात एका कुटुंबाचा मित्र म्हणुन अनेक वर्षे राहतो व त्यांच्या सुखदुखात सहभागी होतो. आणी हे काम तो सतत अनेक वर्षे करीत आहे.

इशान्ये कडील राज्ये आधीच खुप दुर्गम तीथे अनेक गैरसोयी ना तोंड देत हे प्रचारक तेथील ग्रामस्थाच्या कुटुंबीयांचे एक सदस्य म्हणुन तिथे अनेक वर्षे काम करित असतांना त्यांच्यात जवळीक न झाली तरच नवल.

राजेश देशकर तब्बल ८ दिवस अरुणाचलच्या एका दुर्गम गावात न जेवता झाडावर राहीले. त्यानंतर ६ महीने तेथील एका स्मशानातील एका पडीत घरात राहीले व तेथील गावातील लोकांशी जवळीक साधली व त्यांचेच होवुन राहीले. त्यांच्या आजारपणात त्यांच्या नाते वाईकां च्या पेक्षाही जवळचे होवुन राहीले यातच संघाच्या प्रचारकांच्या कार्याची महती कळते. असे अनेक कार्यकर्ते प्रसिध्दी च्या खप दुर आजही तिथे आहेत. त्यांच्या पैकी ज्यांच्याशी माझी जवळीक झाली त्यांच्या सोबत फोटो काडुन घेण्यात मला जो आनंद मिळाला तो अवर्णनी य आहे.

अरुणाचलच्या चांगलांग येथे तब्बल २० वर्षे तेथील रंगफ्रा चळवळी ला उर्जीतावस्था प्राप्त करुन देणारे राजेश दिवेकर.

सध्या पेटलेल्या कोक्राजार जिल्ह्यात मला घेउन जाणरा मिलींद दास

मेघाल्यातिल वेस्ट गारो हील्स च्या बेल्बारी शाळेतील २०० विद्यर्थ्यांचा पालक राहुल पारेख

मणीपुर्च्या इंफाल मध्ये मला सुभाष बाबुंच्या स्मारकाला भेट देणे अगत्याचे असल्याने मला आवर्जुन घेवुन जाणारा मैती जमातीचा रणबीर व रानी

अरुणाचल च्या मालीनी थान व दापोरीजोची सहल घडवुन आणणारे मुळ अकोल्याचे पण गेल्या १५ वर्षापासुन अरुणाचल मध्ये काम करीत असलेले दिपक बोरोडे.

गाडी खराब ज्झाल्यामुळे रात्रभर अरुणाचलात आपल्या घरात रात्रीच्या मुक्कामाची सोय करणारा अरुणाचल विकास परिषदेचा कार्यकर्ता मारक

अरुणाचल्च्या बोमडीला येथे गेल्या १० वर्षापासुन कार्यरत असलेले नांदुर्‍याचे राजेश राठोड.व अरुणाचल्चे प्रान्त प्रचारक पण मुळचे वर्ध्याचे प्रदीप जोशी.

अशी खुप मंडळी मला माझ्या इशान्य भारताच्या प्रवसात भेटली व माझे आयुष्य सम्रुध्द करीत आहेत. या सर्व अज्ञात सैनिकांना सलाम.

प्रतिक्रिया

तर्री's picture

28 Aug 2012 - 5:57 pm | तर्री

वाचून संघावरचा विश्वास अधिक दृढ होतो.
कुणाला काय हो त्याचे ?

वैनतेय's picture

28 Aug 2012 - 11:36 pm | वैनतेय

असाल तर सुरेंद्र तालखेडकर नक्की भेटतील.... केशव नांदेड्कर मिझोराम मध्ये आहेत... नक्की भेटा त्याना...

विश्वास कल्याणकर's picture

30 Aug 2012 - 9:13 am | विश्वास कल्याणकर

सुरेंन्द्र सध्या गेल्या २ वर्षांपासुन गोहाटी ला असतात व सध्या ते सेवा भारती पुर्वांचलचे सेवा प्रमुख आहेत. केशवजी हे तिकडे येवुन जाउन असतात.

वैनतेय's picture

30 Aug 2012 - 11:47 am | वैनतेय

सुरेंद्र तालखेडकरांचा भ्रमणध्वनी व्यनि कराल काय?

विश्वास कल्याणकर's picture

30 May 2013 - 10:57 am | विश्वास कल्याणकर

०९४३६१६०२१७

प्रचेतस's picture

29 Aug 2012 - 8:41 am | प्रचेतस

तळमळीने काम करणार्‍या कार्यकर्त्यांची ओळख आवडली.

कॉमन मॅन's picture

29 Aug 2012 - 1:02 pm | कॉमन मॅन

सहमत..

जाई.'s picture

29 Aug 2012 - 11:02 pm | जाई.

+१
सहमत

अत्रुप्त आत्मा's picture

29 Aug 2012 - 10:34 pm | अत्रुप्त आत्मा

__^__

मन१'s picture

29 Aug 2012 - 11:05 pm | मन१

कुणीतरी काहीतरी चांगलं करतोय हे ऐकून नेहमीच बरं वाटतं.
चांगली ओळख.

मी_आहे_ना's picture

3 Sep 2012 - 3:00 pm | मी_आहे_ना

असेच म्हणतो

खर्‍या कार्यकर्त्यांची ओळख आवडली. तिथल्या आताच्या परिस्थितीबद्दल पण वाचायची उत्सुकता आहे. तुम्हाला जे काही ऐकू आलं असेल ते लिहाल का?

विश्वास कल्याणकर's picture

30 Aug 2012 - 9:22 am | विश्वास कल्याणकर

सरकारचे एक धोरण असते. एखाद्या समस्येवर तोडगा काढायचा नसेत तर ती तशीच भिजत घोंगडे सारखी ठेवायची. काश्मीर व इशान्य भारत या दोन्ही समस्या या नाकरते पणामुळे आजच्या स्थीतीला आल्या आहेत. केवळ समस्या सोडवायची हा एकच उद्देश असेल तर समस्या सुटण्यास काहीच हरकत नसते. पण त्यात राजकीय स्वार्थ देखील साधायचा असेल तर मग ती समस्या चिघळत असते.

या विषयावर याच मि.पा वर मी बरेच लेख लिहीले आहेत. सध्या वर्तमान पत्रात व मिडीयात देखील या विषयावर बरेच चर्वण झाले आहे. त्यामुळे हा विषय बर्‍यापैकी माहीत झाला आहे.

धन्यवाद, तुमचा हा लेख माझ्या ब्लॉगवर व चेपुवर शेअर करीत आहे, या अज्ञात सैनिकांची जगाला निदान तोंडओळख तरी होईल या आशेने.

विश्वास कल्याणकर's picture

30 Aug 2012 - 10:47 am | विश्वास कल्याणकर

ईशान्य भारताच्या इतिहासाबद्दल एक लेख इंग्रजी मध्ये इंडियन एक्स्प्रेस मध्ये २००८ मध्ये आला होता. त्यावरुन या भागाबद्दल बरीच माहीती मिळेल तो धागा येथे देत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 May 2013 - 12:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

मानवतेची आणि भारताची अशी अनाम आणि अनपेक्ष सेवा करणार्‍या खर्‍या देशभक्तांना सलाम ! थोड्या किंवा न केलेल्या कामाची आपल्या नावाचा फलक चौकात फडकावून जाहिरात करणार्‍या "कार्यकर्त्यांच्या" गदारोळात असे लोक नेहमीच विसरले जातात. त्यांची इथे आठवणीने ओळख करून दिल्याबद्दल, कल्याणकर साहेब, अनेक धन्यवाद !

अनिरुद्ध प's picture

30 May 2013 - 3:21 pm | अनिरुद्ध प

माहिती आहेच तसेच अनेक कालीक प्रचारक सुद्धा आहेत कि जे जाउन आले आहेत्,त्यान्चे अनुभव कथनसुद्धा ऐकले आहेतरिसुद्धा आपण या विषयावर आपण ईथे लेख लिहावा हि विनन्ति.

आशु जोग's picture

30 May 2013 - 10:21 pm | आशु जोग

सावकाश वाचत आहे.
विश्वास कल्याणकर यांचे लेख नवी माहिती देणारे असतात असा अनुभव आहे.