नमस्कार मिपाकरांनो,
पुण्या मुंबईतील भटके आणि खादाड असे प्रसिद्ध झालेल्या मिपाक्ररांच्या डोक्यातुन निघालेली एक आय्डिया,
२ सप्टेंबरच्या रविवारी साता-याजवळच्या एक दोन ठिकाणी फिरायला जावं, अर्थात एक ठिकाण फिक्स आहे पाटेश्वर आणि दुसरं सज्जनगड ( जेवणासाठी) किंवा ठोसेघर धबधबा (पाण्याच्या आणि भिजण्याच्या आनंदासाठी) किंवा सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेला उरमोडीचा कॅनल ( पुन्हा भिजण्याच्या आनंदासाठी )
तर अशी सहल आयोजित करायचे ठरले आहे, नेहमीचे यशस्वी भटके आणि झोपाळु सदस्य असणारच आहेत, पण आम्हाला बोलावलं तर आलो असतो असे होउ नये म्हणुन हे आमंत्रण, सहकुटुंब आलात तरी चालेल फक्त ही अधिक महिन्यातली धार्मिक सहल नाही हे लक्षात घ्यावे ही विनंती.
सध्याच्या येणा-यांची संख्या पाहता दोन चार चाकींची व्यवस्था केलेली आहे, अजुन किती जण येणार आहेत त्यावर फायनल वाहन व्यवस्था व खर्चाचे हिशोब करायचे आहेत, त्यामुळे बुधवार दिनांक २९ ऑगस्ट पर्यंत मला किंवा वल्लीला किंवा किसन शिंदेना व्यनि करुन येणार असल्याचे कळवा अर्थात फोन नंबर सहित म्हणजे शुक्रुवारी संध्याकाळ पर्यंत बाकीचे डिटेल तुम्हाला कळवता येतील.
ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत, ते जर वाहन घेणार असतील तर आतापर्यंतच्या अनुभवाप्रमाणे रु. ५ प्रतिकिलोमिटर प्रमाणे वाहन खर्चाचा हिशोब करण्यात येईल, अन्यथा सदस्य संख्येनुसार बस ठरवावी किंवा कसे याचा विचार करण्यात येईल, येणारे किंवा न येणारे यांची या बाबतीत मदत अपेक्षित आहे, प्राथमिक अंदाजानुसार दरडोई खर्च ८०० /- अपेक्षित आहे, प्रवासखर्च, नाष्टा, दोन जेवणं (वेळेत आणि शिस्तित गेल्यास सज्जनगडावरच्या जेवणाचा खर्च वजा होईल) आणि चहा इत्यादी सहित.
आगाउ धन्यवाद.
५० फक्त.
प्रतिक्रिया
27 Aug 2012 - 9:18 am | प्रचेतस
पाटेश्वरला जाणे आहेच.
इतरही मिपाकरांनी अवश्य सहभागी व्हावे.
27 Aug 2012 - 10:51 am | मोदक
सूचना - :-p
१) मोठा ग्रूप झाला तर ठोसेघर धबधबा टाळता येईल का ते बघा - लै डेंजर प्वाईंट आहे तो.
२) ठोसेघर पासून थोडे पुढे चाळकेवाडी ला महाराष्ट्रातले (एके काळचे) सर्वात मोठे विंडमील फार्म आहे. मला पवनचक्कीच्या जवळ जाता आले होते.. सध्या शिक्यूरीटी टाईट झाली असेल तर कल्पना नाही.
३) "निवांत रिसॉर्ट" या नावाचे एक साधेसुधे रिसॉर्ट आहे त्याच एरीयात, चांगले आहे असे कळाले आहे. नेटावर सापडेलच..
४) वाटेत कोयनेच्या बॅकवॉटरचे मनोहारी दृश्य दिसेल असे एखादे ठिकाण आवर्जून ठरवा.
सहलीसाठी शुभेच्छा! :-)
27 Aug 2012 - 11:06 am | विलासराव
सज्जनगड असेल तर येतो.
27 Aug 2012 - 11:27 am | अत्रुप्त आत्मा
आमच्याही पासात्मक शुभेच्छा....! :)
27 Aug 2012 - 11:30 am | मन१
धमाल होउ द्यात मस्त.
27 Aug 2012 - 11:43 am | अभ्या..
गाववाले पण आपण निघणार कुठून? सोडणार कुठे?
27 Aug 2012 - 11:58 am | ५० फक्त
निघणार पुण्यातुन आणि सोडणार पुण्यातच, जेवढे लोक जमतील त्यानुसार स्वारगेट किंवा सिंहगड रोड वगैरे ठरवलं जाईल. हे सगळे डिटेल शुक्रुवारी कळवण्यात येतील इथंच.
27 Aug 2012 - 11:48 am | गवि
पण पुणे टू पुणेवाल्यांना जास्त चांगली आहे.
मुंबई टू - सातार्याजवळची एकाहून अधिक ठिकाणे & बॅक टू मुंबई एका दिवसात (स्थलदर्शनासहित) फार ओढाताणीचं होतं. ओढाताण आनंदाची तेव्हा होते जेव्हा दुसर्या दिवशी सुट्टी असेल.
तो दिवस रविवार (दुसर्या दिवशी पहाटे पहाटे उठून हपीसमार्ग धरणे क्रमप्राप्त असलेला)... मग कठीणच..
एरवी यायची इच्छा खूप आहे. पुन्हा कधीतरी.
27 Aug 2012 - 12:41 pm | प्रेरणा पित्रे
>>मोठा ग्रूप झाला तर ठोसेघर धबधबा टाळता येईल का ते बघा - लै डेंजर प्वाईंट आहे तो.
लहान मुले सोबत असल्यास टाळावाच..
>>"निवांत रिसॉर्ट" या नावाचे एक साधेसुधे रिसॉर्ट आहे त्याच एरीयात, चांगले आहे असे कळाले आहे
"निवांत रिसॉर्ट" हे सातारा - कास रोडवरच आहे.. आणि सप्टेंबरचा पहिला आठवडा हा कास पठारावरिल फुलांचा पिक सिझन आहे.. अनायसे कासचा तलाव पण बघता येईल...जमल्यास नक्की ठरवा..
शुभेच्छा..
29 Aug 2012 - 10:40 am | ५० फक्त
येउ इच्छिणा-यांना विनंती, मला / किसन / वल्लीला व्यनि करुन कळवावे, यानंतरच्या व्यवस्थेबद्द्ल व्यनितुन संपर्क केला जाईल.
29 Aug 2012 - 1:03 pm | कॉमन मॅन
प्रस्तावित सहलीला हार्दिक शुभेच्छा...
29 Aug 2012 - 8:57 pm | Pearl
चांगला उपक्रम.
सहलीला शुभेच्छा.
फुल्टू धमाल करा आणि मस्त वृत्तांत टाका.
30 Aug 2012 - 6:38 am | ५० फक्त
सर्व मिपाकरांना धन्यवाद,
वल्ली, विलासराव, किसन शिंदे, वपाडाव, पिंगु, नादखुळा व मी, असे सात जण जाणार आहोत.
30 Aug 2012 - 9:00 am | सूड
शुभेच्छा !!
4 Sep 2012 - 5:26 pm | विजुभाऊ
वर दिलेले नम्दीचे चित्र हे कास ठोसेघर किंवा सज्जनगड यापैकी कुठलेच नाही.
असो..........
मी येइन
4 Sep 2012 - 5:34 pm | अत्रुप्त आत्मा
@असो..........
नको ते पाहायची सवय असली ना,,,की हे असं होतं...(आयला पळा आता ;) ) 
मी येइन>>>