भारतीय पध्दती-ग्लोबल वार्मिंग-वगैरे वगैरे....

अभिज्ञ's picture
अभिज्ञ in काथ्याकूट
20 Aug 2012 - 1:58 am
गाभा: 

त्यादिवसापर्यंत ही असली समस्या कधी अनुभवला नव्हती. अगदी लहानपणि चाळिपासून ते भारतातल्या उंची हाटिलापर्यंत माझा वावर झाला असला तरी अशी वेळ आली नव्हती. कारण तिथे आपल्याला हवी तशी व्यवस्था होती. इथे हे मात्र भलतेच.
पहिल्यांदाच परदेशात जाताना माणुस काय काय म्हणून तया-या करत असतो. मी देखिल ती काळ्जी घेतली होतीच. परंतु ह्या गोष्टीचा मात्र साफ़ विसर पडला होता. त्यात काय एवढेसे म्हणून कदाचित लक्षात आलेही नव्हते.
पहिला धक्का बसला तो सिंगापुरात.एअरपोर्टावरच. एकतर सकाळि साडे सातची फ़्लाइट म्हणून भल्या पहाटे घर सोडलेल. फ़्लाईटात उरकून घेवुयात म्हणून उठलो तर टर्ब्युलन्स लागलेला. हवाई सुंदरीने आत्ता नाही म्हणून परत जागेवर पाठवले.जाम वैताग आला. एअरपोर्टवर उतरल्यावर पहिले काम ते करायचे म्हणून लगोलग इच्छित स्थळी पोहोचलो. संपुर्ण कार्यक्रम पार पडेस्तोवर मी गाफ़ील होतो. पण झाली कि पंचाईत. च्यायला पाण्याचा नळच नव्हता. मीन्स शॊवर बिवर काय असतो तो. बादली तर लांबच राहीली. बघतो तर एका गोल डिस्पेन्सर मध्ये कागद सापडले. टिश्यु पेपर्स.
हे असले काही वापरायची पहिलिच वेळ.झक मारत वापरावा लागला.आतमध्येच अख्खी सॆनिटायझरची बाट्ली हातावर उपडि केली असेन.कसाबसा उरकून बाहेर आलो. मनात विचार आला कि च्य़ायला ह्यांना सॆनिटाय्झर ठेवायला परवडते परंतु बादलीभर पाणि ठेवायला काय जाते.
नंतर नंतर "हि" पध्दत देखील अंगवळणि पडलि व आता त्याचेही फ़ारसे काहि वाटतहि नाही.
परवाच इथे एका हॊटेलात जेवायला गेलो होतो.बरोबर एक युरोपियन ग्रुप होता. ह्या मंडळींना भारतात जायचे होते. कुठल्याश्या एनजीओ तर्फ़े ग्रामीण भारतात काहितरी समाजसेवा/अभ्यास करायला हि मंडळि जाणार होती. भारताविषयी माझ्याकडून जेव्ढी माहीती घेता येईल तेवढी त्यांना हवीच होती.
बोलता बोलता एकाने भारताचे कौतुक करायला सुरु केले.भारतामुळे ग्लोबल वार्मिंग खरच किती आटोक्यात आहे. नाहितर काय परिस्थिती उद्भवली असती. बाकिच्यांनीहि त्याच्या हो त हो मिळवला. मला एकदम समजेना कि हि मंडळी नक्की कशाबद्दल बोलताहेत. भारताने एकदम असे काय दिवे लावले आहेत कि ग्लोबल वार्मिंग आटोक्यात आले आहे?
आता खरेतर जेवायच्या टेबलावर बोलायच्या लायकीचा हा विषय अजिबातच नव्हता. परंतु मला समजून सांगण्याकरिता त्यांना बोलावेच लागले. विषय होता भारतीय शॊच पध्दती. भारताची एवढी अजस्त्र लोकसंख्या आहे. तुम्ही लोक आजदेखील शौचाला जाण्याकरीता पाणीच वापरता. जगावर केवढे मोठे उपकार आहेत हे. तुम्ही लोक जर आमच्यासारखे टिश्यु पेपर्स वापरायला लागलात की काय भयानक अवस्था होईल. एव्ढा कागद बनवायला कित्येक लाख झाडे तोडावी लागतील वगैरे वगैरे...
एकाने तर त्यापुढे जाउन मला एक भलताच विनोदी व्हीडियोच दाखवला.हा व्हिडियो पाहून मला तर जाम हसू फ़ुटले होते.
पण गोरी मंडळि फ़ारच सिरीयसली बोलत असल्याने फ़ारसे हसु दाखवता आले नाही.
हा व्हिडियो इथे पाहता येईल.

ह्या कलाकाराचे नाव आहे विल्बर सर्गुनराज. भारतात आल्यावर विशेषत: पाश्चिमात्य लोकांना भारतीय संडास कसा वापरायचा ह्याचे ह्याने प्रात्यक्षिकच करून दाखवलेय. अर्थात त्यात त्याने हा पर्यावरणाचा संदेश दिलाच आहे.
हया कलाकाराचे आणिक बरेच व्हिडियो देखील सापडतात. ते देखील भन्नाटच आहेत.
तेव्हापासून मी देखील कागदा पासून परत पाण्याकडे वळायचा विचार करतोय. :)

प्रतिक्रिया

कुंदन's picture

20 Aug 2012 - 2:16 am | कुंदन

अरे , "पिज्झा कॉर्नर" अथवा "पास्ता किंग" वर टाकायचा धागा चुकुन इकडे "मिसळ पाव" वर टाकलाय्स की काय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Aug 2012 - 8:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्हिडियो पाहुन ह ह पुवा झाली.

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

20 Aug 2012 - 9:11 am | मदनबाण

हॅहॅहॅ... अय्ययो अय्यो ! ;) क्या विडीयो है जी ! यकदम "क्लीन" लर्नींग जी. ;)

अन्या दातार's picture

20 Aug 2012 - 10:01 am | अन्या दातार

मग! भारतीय संस्कृती आहेच पर्यावरणप्रेमी ;)

का कुणास ठाउक पण मला खरचं नाही हसु आलं व्हिडियो पाहुन.
भावबा बोथट झाल्या की काय माझ्या?
बाकी तुझ्या लेखाने काही 'खास' आठवणी मात्र जाग्या केल्या. :)

प्रभाकर पेठकर's picture

20 Aug 2012 - 11:56 am | प्रभाकर पेठकर

का कुणास ठाउक पण मला खरचं नाही हसु आलं व्हिडियो पाहुन.

सहमत. मलाही नाही आलं हसू.

पुष्कर जोशी's picture

27 Aug 2012 - 6:13 pm | पुष्कर जोशी

पूर्ण पहिलाच नाही video