पुनुकु

वैशाली हसमनीस's picture
वैशाली हसमनीस in पाककृती
24 Jun 2008 - 12:49 pm

पुनुकु
साहित्य--एक वाटी तांदूळ,अर्धा वाटी उडदाची डाळ,बारीक चिरलेला कांदा,मिरचीचे तुकडे,मीठ्,कोथिंबीर,तेल
क्रुती-रात्री तांदूळ व डाळ वेगवेगळी भिजवावे,सकाळी मिक्सरवर एकत्र बारीक वाटावेत,नंतर त्यात कांदा ,मिरची,कोथिंबीर,मीठ व थोडे तेल घालून मिश्रण एक्जीव करावे,मिश्रण इडलीपीठाइतपत सैलसर ठेवावे.तेल तापवून भज्यांसारखे लहान लहान गोळे त्यात सोडून तळावेत.कोणत्याही पातळ चटणीबरोबर खायला द्यावेत

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

24 Jun 2008 - 1:06 pm | मनस्वी

वैशालीकाकू,

आपण जे नवनवीन दक्षिण भारतीय पदार्थ देता ते छान असतात आणि सोपे असल्याने करून बघावेसे वाटतात.
आपण पाककृतींबरोबर जर त्यांचे फोटो पण टाकले तर उत्तम, कारण हे पदार्थ आपल्या महाराष्ट्रीय लोकांना तसे नवीनच की!

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसोबा खेचर's picture

25 Jun 2008 - 7:58 am | विसोबा खेचर

आपण जे नवनवीन दक्षिण भारतीय पदार्थ देता ते छान असतात आणि सोपे असल्याने करून बघावेसे वाटतात.

मनस्वीशी सहमत..

वैशालीकाकू, येऊ द्यात अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ...

तात्या.

धनंजय's picture

24 Jun 2008 - 4:52 pm | धनंजय

पाककृती करून बघायला हवी.

अभिज्ञ's picture

24 Jun 2008 - 7:30 pm | अभिज्ञ

खुपच छान पदार्थ.महाराष्ट्रातील "मुगभजी" सारखाच हा पदार्थ आहे.
मी हैद्राबादला असताना रोजच हा पदार्थ न चुकता खातो.
ह्या पदार्थाचे नक्की नाव काय?
काहि लोक ह्याला "पुनुगुळू" असेहि उच्चारताना ऐकले आहे.

आंध्रप्रदेशातील असेच नवनवीन खाद्यपदार्थ मि.पा.वर चाखायला मिळोत.
(आंध्रप्रदेशाचे आणि मि.पा.चे नाते बाकी सांगायलाच नको. ):D