विलासराव देशमूख

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
7 Aug 2012 - 9:14 pm
गाभा: 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारतातील ज्येष्ठ राजकारणी विलासराव देशमूख यांची प्रकृती गंभीर आहे असे वाचण्यात आले.

मला राजकारण्याबद्दल आणि चित्रपटक्षेत्रातील अभिनेते आणि कलाकारांबद्दल विलक्षण आत्मियता आहे हे अगोदरच नमूद करतो.

विलासरावांचे मूंबई दंगलीबद्दल नेमकेच मूख्यमंत्रीपद गेले होते आणि त्याकाळातच त्यांचा पूण्यात एक सार्वजनिक समारंभात भाषण ऐकण्याचा योग आला होता. विलासरावांच्या चेहर्‍यावर विलक्षण असा ताण दिसत होता. मूख्यमंत्रीपदासारखे पद गमावल्यानंतर विलासराव बरेच कृद्ध अथवा निराश झालेले असतील आणि त्यांचा त्रागा भाषणात दिसेल असा कयास मला वाटत होता. परंतु जसे ते भाषण करायला लागले तसे त्यांनी अतिशय खेळकर पद्धतीने सर्व भाग सांगितला. मूख्यमंत्री पद नसतानाही आयोजकानी ठरविल्याप्रमाणे येण्याची गळ घातली याबद्दल त्यांनी आयोजकाचे आभारही मानले.

विलासारावांची व्यावसायिक कारकिर्द पुण्यातच चालू झाली. तेंव्हा वकिलीकरत असताना त्यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यावेळेस ते बरेच भावनाशिल झालेलेही मला जाणवले.

१९६७ च्या सुमारास प्रारंभीच्या काळी त्यांनी जो खटला चालवला होता त्याचे वृत्त त्यावेळेस वर्तमानपत्रात आलेले हे समजताच त्यांनी सायकलवर १० / १२ किमी जावून ती प्रतही मिळवली. तेंव्हाचा आनंद आणि आता वर्तमानपत्रात नाव आलेतर कशी भिती वाट्ते हेही त्यांनी हास्याच्या कल्लोळात सांगितले. जवळ जवळ ४०/ ५० मिनिटाच्या भाषणात त्यांनी मला बर्‍यापैकी प्रभावित केल्याचे आठवते.

काळाच्या ओघात अनेक भ्रष्टाचार्‍याच्या खटल्यात त्यांच्यावर ताशेरे मारलेले वाचतांना मला नेहमीच वाईट वाटत असे,

दोन्ही मूत्रपींडे आणि यकृतात बिघाड झाल्याने मला व्यक्तिगत त्यांच्याबद्दल काळजी आणि सहानूभुती वाटते.

विलासराव लवकरच बरे होवो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.

प्रतिक्रिया

कुंदन's picture

7 Aug 2012 - 9:23 pm | कुंदन

आताच आय बी एन - लोकमत वर बातमी ऐकतोय.
वागळे सांगतायत , विलासरावांना यकृताचा त्रास होतोय अन त्यामुळे खायलाही त्रास होतो म्हणे.
वागळे बहुधा लापशी / खिमट घेउन लवकरच चेन्नै ला पोहोचतील.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Aug 2012 - 6:21 am | अत्रुप्त आत्मा

अरे बाप रे... ! असं झालं होय? ;-)

पक पक पक's picture

8 Aug 2012 - 8:35 am | पक पक पक

मला राजकारण्याबद्दल आणि चित्रपटक्षेत्रातील अभिनेते आणि कलाकारांबद्दल विलक्षण आत्मियता आहे हे अगोदरच नमूद करतो.

मला फक्त चित्रपट अभिनेत्रीं बद्दल आत्मियता आहे.त्या मुळे माझा पास.... :bigsmile:

अत्रुप्त आत्मा's picture

8 Aug 2012 - 10:52 am | अत्रुप्त आत्मा

@मला फक्त चित्रपट अभिनेत्रीं बद्दल आत्मियता आहे.>>>

तर्री's picture

8 Aug 2012 - 8:46 am | तर्री

दिल्लीत साजूक तुपाचा रतीब चालू ठेवला की आपण आपली गुरे कशीही हकावीत - कुणाच्याही कुरणात चारावीत हे ओळखलेला व निर्ढावलेला राजकारणी मृत्यु शय्येवर आहे म्हणून सभ्य संकेतानुसार एवढेच !

विलास रावाना दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा !

सर्व प्रतिसाद वाचल्यानंतर ह्या प्रतिसादाशी एकदम सहमत.

-(संयत) सोकाजी

शेलार मामा मालुसरे's picture

8 Aug 2012 - 10:19 am | शेलार मामा मालुसरे

शेतकरयांचे तळतळाट !
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात अनेक गोर गरीब शेतकरयांच्या जमीनी हड़प करून त्याना दिलीप सानंदा अन त्यांच्या कुटुंबियांनी अनेकांना देशोधडीला लावले..त्यातील एका शेतकरयाने आत्मह्त्या केली; त्याच्या कुटुंबियांनी पुढे पोलिस तक्रार केली...सर्व सोंगे झाली..सानंदा हे विलासरावांचे निकटवर्तीय..अन हद्द झाली - त्यावेळी मुख्यमंत्री असणारया विलासरावांनी बुलढाण्याच्या जिल्हाधिकारयाना पत्र लिहून आदेश दिला की, तुम्ही सानंदावर कारवाई करू नका ... कारवाईचा फार्स लांबला...पुढे एका माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्याने हे प्रकरण उकरुन काढले..सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला गेला.. त्यात विलासराव दोषी आढळले..कोर्टाने त्यांच्यावर कठोर ताशेरे ओढले..टिका झाली...किरकोळ बोम्ब झाली..पण विलासराव जैसे थे - केसाचा कोम्बडा,खुनशी हास्य अन सोबतीला खुर्चीची ऊब !...उलट हा १० लाख रुपयाचा दंड महाराष्ट्र शासनाने जनतेच्या पैशाच्या तिजोरीतुन भरला....शेतकरी फासावर - विलासराव खुर्चितच - जनतेचा पैसा दंडासाठी ! हा हरामखोरी अन निर्लज्जतेचा कळस होता !!!!
पण त्या शेतकरयांचे तळतळाट विलासरावांना लागले नसतील काय ?
त्याचेच तर हे फळ नसेल काय ?

विलासरावांच्‍या दोन्‍ही किडन्‍या निकामी झाल्‍या आहेत. तसेच त्‍यांच्‍या यकृतावरही सूज आहे.

शिल्पा ब's picture

8 Aug 2012 - 11:01 am | शिल्पा ब

<<विलासरावांच्‍या दोन्‍ही किडन्‍या निकामी झाल्‍या आहेत. तसेच त्‍यांच्‍या यकृतावरही सूज आहे.

फक्त विलासरावांच्याच बाबतीत हे असं ऐकुन बाकी राजकारण्यांनासुद्धा असंच कैतरी होउन हा प्रश्न एकदाचा मिटावा असं वाटतंय.

माझीही शॅम्पेन's picture

8 Aug 2012 - 11:14 am | माझीही शॅम्पेन

अगदी मिपा स्टाइल कोण विलास-राव अस लिहिण्यासाठी आलो होतो पण नंतर आठवाल की त्याना मी नवीन पास-पोर्ट वरळी येथे टोकेन यंत्रणा बसवली तेंव्हा प्रत्यक्षयात भेटलो होतो आणि मीच पाहील टोकण त्याना प्रिंट करून दिल होत , टोकण प्रिंट होण्यासाठी जरा वेळ लागला तेंव्हा पटकन मिळण्यासाठी अजुन पैसे लागतील का असा टोला मारला होता.
(ह्या निमित्ताने अस्मदिक आज-तक वर झलक्‍याण्याची जाहिरात करून घेतो)

बाकी राजकारण्याविषयी मला फारशी आत्मियता नाही , एक गेला की त्याची जागा दुसरा घेतो आणि शोषण चालूच राहत....

पुण्याचे वटवाघूळ's picture

8 Aug 2012 - 11:31 am | पुण्याचे वटवाघूळ

विलासरावांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा निकाल न्यायालयातच लागेल. आजारी माणसाला लवकरात लवकर प्रकृतीस आराम पडो या सदिच्छेशिवाय आपण काही करू शकत नाही. पण विलासरावांच्या प्रकृतीविषयी एकेक वाईट कमेन्ट येत आहेत त्या सहृदय माणसांना शोभणार नक्कीच नाहीत.

विलासरावांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा निकाल न्यायालयातच लागेल.

खरंच?

दादा कोंडके's picture

9 Aug 2012 - 10:21 am | दादा कोंडके

आजारी माणसाला लवकरात लवकर प्रकृतीस आराम पडो या सदिच्छेशिवाय आपण काही करू शकत नाही.

खरंय, ह्या वेदनेतून त्यांची लवकरात लवकर कायमची सुटका कर देवा! ;)

(कावळा) दादा

पुण्याचे वटवाघूळ's picture

8 Aug 2012 - 11:31 am | पुण्याचे वटवाघूळ

विलासरावांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा निकाल न्यायालयातच लागेल. आजारी माणसाला लवकरात लवकर प्रकृतीस आराम पडो या सदिच्छेशिवाय आपण काही करू शकत नाही. पण विलासरावांच्या प्रकृतीविषयी एकेक वाईट कमेन्ट येत आहेत त्या सहृदय माणसांना शोभणार नक्कीच नाहीत.

सुनील's picture

8 Aug 2012 - 9:24 pm | सुनील

विलासरावांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा निकाल न्यायालयातच लागेल. आजारी माणसाला लवकरात लवकर प्रकृतीस आराम पडो या सदिच्छेशिवाय आपण काही करू शकत नाही. पण विलासरावांच्या प्रकृतीविषयी एकेक वाईट कमेन्ट येत आहेत त्या सहृदय माणसांना शोभणार नक्कीच नाहीत.
सहमत.

नितिन थत्ते's picture

9 Aug 2012 - 10:25 am | नितिन थत्ते

>>विलासरावांच्या प्रकृतीविषयी एकेक वाईट कमेन्ट येत आहेत त्या सहृदय माणसांना शोभणार नक्कीच नाहीत.

लोक जगातून गेलेल्या व्यक्तींबद्दल सुद्धा वाईट साईट बोलतात. तर जिवंत असलेल्याची काय कथा.

सुनील's picture

9 Aug 2012 - 9:20 pm | सुनील

लोक जगातून गेलेल्या व्यक्तींबद्दल सुद्धा वाईट साईट बोलतात. तर जिवंत असलेल्याची काय कथा.

:)

हीच मंडळी भारतीय संस्कृतीवरदेखिल गफ्फा हाणताना दिसतात. तेव्हा गेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलणे हीच भारतीय संस्कृती असावी. काय? ;)

अप्रतिम's picture

9 Aug 2012 - 10:58 pm | अप्रतिम

अहो विलासराव अजून गेले नाहीत...गेल्यानंतर कदाचित चांगले म्हणतील त्याना...

अर्धवटराव's picture

9 Aug 2012 - 10:08 pm | अर्धवटराव

ज्यांनी अनेकांचे संसार उध्वस्त केले अशा लोकांच्या मग आरत्या गायच्या काय?

अर्धवटराव

केलेली पापं याच जन्मात फेडावी लागतात म्हणे....

अवांतर - राजकारणी हजारो कोटींची मालमत्ता कशी जमवतात याचा विचार करत आहे.

जमवलेल्या हजारो कोटींचं काय करतात हा अजुन एक प्रश्न....निवडणुका जिंकायला प्रत्येकवेळी एवढे लागत नसावेत हा एक अंदाज.

जमवलेल्या हजारो कोटींचं काय करतात याचे उत्तर कदाचित ते जमवल्यावरच(त्या स्तरावर गेल्यावर) मिळत असेल. साधे उदा. लहान असताना १०० रुपये कसे खर्च होऊ शकतात असे वाटायचे, कॉलेजात असताना महिना १५,००० पेक्षा जास्त पगार घेऊन काय करायचं असे वाटायचे आणि आता कळतेय च्यायला ३०-४० लाख रुपयेदेखील कसे अपुरे पडू शकतात ते.

अर्धवटराव's picture

9 Aug 2012 - 12:15 am | अर्धवटराव

मित्रा... असले कसले महगडे शौक म्हणायचे तुझे कि ३० - ४० लाख अपुने पडावेत ;)

अर्धवटराव

बॅटमॅन's picture

9 Aug 2012 - 12:19 am | बॅटमॅन

हॅ हॅ हॅ... घर घर लागली की होते हो तसे ;)

अर्धवटराव's picture

9 Aug 2012 - 12:33 am | अर्धवटराव

घर घर = २ घर
याला म्हणतात हौस मौज :)

अर्धवटराव

बॅटमॅन's picture

9 Aug 2012 - 12:24 am | बॅटमॅन

डुप्रकाटाआ

आनंदी गोपाळ's picture

9 Aug 2012 - 12:25 am | आनंदी गोपाळ

कसे पडतात अपुरे?

प्रभाकर पेठकर's picture

8 Aug 2012 - 12:05 pm | प्रभाकर पेठकर

अन्याय झालेले, शोषण झालेले, दडपशाही झालेले जास्त की हितचिंतक जास्त ह्या दोलायमान तराजूवर विलासरावांचे आयुष्य लोंबकळते आहे. नियतीच काय तो न्यायनिवाडा करेल अशी आशा आहे.

पुण्याचे वटवाघूळ's picture

8 Aug 2012 - 12:47 pm | पुण्याचे वटवाघूळ

अन्याय झालेले, शोषण झालेले, दडपशाही झालेले जास्त की हितचिंतक जास्त ह्या दोलायमान तराजूवर विलासरावांचे आयुष्य लोंबकळते आहे.

नाही हो. प्रत्येकाला कधीनाकधी जावेच लागते. हितचिंतक जास्त की दडपशाही झालेले जास्त या तराजूवर काही अवलंबून नसते. तुम्ही म्हणता त्या न्यायाने आपले शिवराय अजूनही भूतलावरच असायला हवे होते.

प्रभाकर पेठकर's picture

8 Aug 2012 - 12:59 pm | प्रभाकर पेठकर

प्रत्येकाला कधीनाकधी जावेच लागते.

मी प्रत्येकाच्या आयुष्याबद्दल लिहिलेले नसून फक्त विलासरावांच्या आयुष्याबद्दल लिहिलेले आहे. पाप-पुण्याची संकल्पना आपल्या संस्कृतीत पूर्वापार चालत आली आहे त्याला अनुषंगुन ते वाक्य आहे. असो.

अक्षया's picture

8 Aug 2012 - 12:58 pm | अक्षया

||नाही हो. प्रत्येकाला कधीनाकधी जावेच लागते. हितचिंतक जास्त की दडपशाही झालेले जास्त या तराजूवर काही अवलंबून नसते. तुम्ही म्हणता त्या न्यायाने आपले शिवराय अजूनही भूतलावरच असायला हवे होते.||
यावर सहमत..

सर्वच आजीमाजी अन भावी इच्छुक राज्यकर्त्यांनी धाग्यावरचे प्रतिसाद वाचावेत अशी इच्छा.. कितीही धनलाभ झाला तरी जनमानसात वाईट राजकारणी म्हणून आपली कशी प्रतिमा होऊ शकते.. इतकी खालावलेली प्रतिमा की इतर कोणालाही अशा नाजुक आरोग्यस्थितीच्या वेळी लोक शुभआरोग्य चिंततील पण आपल्याला तेवढेही लाभणार नाही याची भयंकर जाणीव होऊन आधीच कारभारपद्धतीत काही सुधारणा झाली तर?

स्पा's picture

8 Aug 2012 - 2:05 pm | स्पा

प्रचंड अनुमोदन
बाकी आता विलासरावांवर लेख लिहायला घेईन म्हणतो .. उपयोगी पडेल ;)

प्यारे१'s picture

8 Aug 2012 - 2:29 pm | प्यारे१

कल्पनाविलास चांगला आहे.

' कामातुराणां न भयं न लज्जा ...'मध्ये 'काम' म्हणजे फक्त कामेचकामेअसं नाही तर इच्छा/वासना असा देखील अर्थ आहे म्हणतात. त्यामुळे हे (सुभाषित किंवा जे असेल ते) इकडे देखील लागू होतेच... :)

चिरोटा's picture

8 Aug 2012 - 2:44 pm | चिरोटा

बाकी आता च विलासरावांवर लेख लिहायला घेईन म्हणतो

१९७९ साली जयप्रकाश नारायण जसलोक हॉस्पिटलमध्ये डायालिसिसवर होते. त्यावेळी ते 'गेल्याच्या' अफवा सारख्या पसरत असल्याने काही पत्रकारांनी तेव्हा लेख तयारच ठेवले होते. एकदा अफवा खरी मानून एका इंग्रजी दैनिकाने लेख छापलाही! नंतर माफी मागितली.(काही दिवसांनी जे.पी. खरेच गेल्याने मग लेख थोडासा बदल करून छापला).

डीएनए वर्तमानपत्राने काल अशीच बातमी विलासरावांची छापली.

सुनील's picture

8 Aug 2012 - 9:23 pm | सुनील

काही पत्रकारांनी तेव्हा लेख तयारच ठेवले होते
प्रत्येक वर्तमानपत्र "संभाव्य" व्यक्तींबाबत असे लेख तयारच ठेवते. मिपावरील ह्या क्षेत्रातील जाणकार योग्य काय ते सांगतीलच.

सुनील's picture

8 Aug 2012 - 9:20 pm | सुनील

मिपावरील ५-२५ प्रतिसाद म्हणजे जनमानसातील प्रतिमा हे वाचून एक मिपाकर म्हणून द्वाळे पाणावले! चार जणांची टीम अण्णा १२० कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करते, हेदेखिल जाताजाता आठवून गेले!

लोकशाहीत जनमानसातील प्रतिमा ठरविण्याचा निकष निवडणूकीच्या मार्गाने जातो.

गवि's picture

9 Aug 2012 - 11:08 am | गवि

मिपावरील ५-२५ प्रतिसाद म्हणजे जनमानसातील प्रतिमा हे वाचून एक मिपाकर म्हणून द्वाळे पाणावले! चार जणांची टीम अण्णा १२० कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करते, हेदेखिल जाताजाता आठवून गेले!

लोकशाहीत जनमानसातील प्रतिमा ठरविण्याचा निकष निवडणूकीच्या मार्गानेच जातो.

दादा... अहो उलट मला वाटतं की मिपावरचे प्रतिसाद हेच जनमानसातल्या प्रतिमेच्या जास्त जवळ जातात. इथे विशिष्ट नेत्याच्या बालेकिल्ला मतदारसंघात असलेला कोणताही लाभार्थी / पीडित नागरिकगट एकत्र आलेला नाही.. अत्यंत वेगवेगळ्या भौगोलिक स्थानांवरुन दिलेले अत्यंत व्यक्तिगत मताला दर्शवणारे प्रतिसाद आहेत हे.

उलट निवडणुकीच्या मार्गाने आलेल्या निकालात जनमानसातील नैतिक प्रतिमा ठरत नसून मुत्सद्दीपणाची / ताकदीची परीक्षा होते.

बारामती, सांगली, लातूर, अमेठी अशा कोणत्याकोणत्या एरियातल्या लिमिटेड लोकांना प्रचंड उपकृत करुन आणि त्यांच्यावर उपकारसदृश छाप ठेवून तिथे निवडणुकीत उभे राहून हुकमी विजय मिळवणं याला "देशविदेशातल्या भारतीयांच्या जनमानसातली प्रतिमा" म्हणणं पटत नाही. मी ज्या ज्या गावात राहिलो आहे तिथे हे पाहिलं आहे की तिथे हमखास निवडून येणार्‍या नेत्यांचा भ्रष्टपणा तिथले लोक जोखूनच होते. फक्त ते लाभार्थी ठरत असल्याने, कसा का असेना, माझ्या एरियातला आहे म्हणून माझ्या एरियाकडे खास लक्ष देईलच असं म्हणून त्याला मत देणारेच बरेच असतात..

सुनील's picture

9 Aug 2012 - 9:11 pm | सुनील

फेसबुकी विचारवंतांची भूमिका ;)

टीम अण्णादेखिल हेच म्हणत होती :)

चालू द्या...

आमीच लै भारी असं म्हणायचं नाहीये..तुमच्या मतावर फक्त माझं मत दिलं इतकंच. माझ्या मतात दुराग्रह दिसत असला (इथे किंवा आणखी इतर धाग्यांवरही कुठे) तर आमी भारी किंवा आमची लाल असं म्हणता येईल.

पण आता तुम्ही एकदम मत बनवलेलं दिसतंय. तेव्हा ते जाऊ दे.

बाकी या धाग्यावर अनेकांनी सिरियसली आजारी असलेल्या नेत्याला शुभेच्छा न देता (शुभेच्छा न देणंही एकवेळ ठीकच) स्पष्टपणे किंवा अस्पष्टपणे त्याला अधिक त्रास व्हावा किंवा जे होतं आहे ते योग्यच आहे असं म्हणणं कुठेतरी वाईट वाटलं.

शिल्पा ब's picture

14 Aug 2012 - 11:10 am | शिल्पा ब

सारखं आपलं "आम्ही कसे बै चांगल्या मनाचे, कसं बै सगळ्यांना समजुन घेतो" असं दाखवल्याशिवाय तुम्हाला कै चैन पडत नै वाटतं !

बाकी देशमुख किंवा त्यासारखा इतर कोणी नेता आजारातुन बरा झाल्यावर काय दिवे लावणार आहे ? कोणाचं भलं करणार आहे - स्वतः अन स्वत:च्या पिलावळीशिवाय?

ह्या असल्या विचारांमुळेच मुंबई प्रकरण पुन्हा झालंय अन होतंच राहील एवढं नक्की.

चालु द्या.

ज्याला सरळसरळ फाशीची शिक्षा झाली आहे असा सिद्ध गुन्हेगार, उदा. कसाब याला लवकर फाशी द्यावी अश्याच मताचा मी आहे पण त्याच्याही बाबतीत ही प्रवृत्ती संपवायची असा न्याय करण्यासाठी त्याचा मृत्यू योग्य वेळेत घडवून आणावा असा भाव पाहिजे. त्याला मारण्याच्या विविध पद्धती किंवा तो मृत्यू घडत असताना त्याचा तमाशा पाहणं हे कितीही समाधानकारक वाटत असलं तरी चांगलं नव्हे असं मलातरी वाटतं. अशाने आपणही कसाबच्या दुसर्‍या टोकाला पोचतो.

इथे एक नेता मरणोन्मुख आहे अशा वेळी मी कसाबची तुलना या केसशी करत नाहीये, पण अगदी तसं असलं तरी आपण न्यायबुद्धीने वागावं सूडबुद्धीने नाही हे मला पटलं आहे. मी इथेच पूर्वी एका लेखात सूडबुद्धीला कायदेशीर मान्यता का नसावी? असा प्रश्न विचारला होता. गुन्ह्याचे जे बळी आहेत त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांनाच शिक्षा ठरवण्याचा हक्क असावा असं माझं मत होतं. पण नंतर विचारा अंती ते बदललं. सुडातून काही संपत नाही. कोणाला सोडून द्यावं किंवा माफ करावं असं अजिबात नव्हे पण हत्याही केवळ न्यायनिवाडा म्हणूनच केली पाहिजे.

"विलासराव मरेनात का. जितके हाल होतील तितके चांगलेच.." वगैरे प्रकारच्या वक्तव्यांनी अस्वस्थ वाटलं आणि सर्वांनाच वाटावं अशी इच्छा आहे. याला फेसबुकी म्हणायचं की विचारवंत / जंत वगैरे हा व्यक्तिगत पर्स्पेक्टिव्ह झाला.

पण तुम्ही म्हणता आहात की :

सारखं आपलं "आम्ही कसे बै चांगल्या मनाचे, कसं बै सगळ्यांना समजुन घेतो" असं दाखवल्याशिवाय तुम्हाला कै चैन पडत नै वाटतं !

त्यामुळे असोच.

न्यायबुद्धी कोणासाठी वापरावी याचेही निकष नसतील तर असलेच पाहीजेत...
पृथ्वीराज चौहानने घोरीला ७ वेळा जिवंत पकडुन सोडुन दिलं...असंच न्यायबुद्धी, सहानुभुती, सर्‍हदयता(कसं लिहायचं? ) वगैरे विचार

घोरीने एकदाच पृथ्वीराजांना पकडलं अन मारुन टाकलं

असो, इतिहासातुन काहीच न शिकण्याची भारतीयांची वृत्ती जाणार नाही. दुर्दैव !

न्यायबुद्धी कोणासाठी वापरावी याचेही निकष नसतील तर असलेच पाहीजेत...

समोर कोण आहे ते पाहून न्यायाची पद्धत /न्यायबुद्धी बदलायची हा विचार व्याख्येतच बाधित होणारा आहे. "सब्जेक्टिव्ह न्याय" असूच शकत नाही.

पृथ्वीराज चौहानने घोरीला ७ वेळा जिवंत पकडुन सोडुन दिलं...असंच न्यायबुद्धी, सहानुभुती, सर्‍हदयता(कसं लिहायचं? ) वगैरे विचार

घोरीने एकदाच पृथ्वीराजांना पकडलं अन मारुन टाकलं

घोरीला पकडून पहिल्यावेळीच मारायला हवं होतं. सोडलं ही चूक, सोडलं हाच अन्याय झाला. न्याय नव्हे. "सूड नको न्याय हवा" हा विचार म्हणजे बोटचेपेपणा किंवा आचरट सहिष्णुता नव्हे.

अशा वेळी घोरी आजारी पडला आहे तर त्याला सडत तसाच मरु द्यावा की त्याला तहानभुकेने मारावा अशा प्रकारे दिशा असली तर त्याला सूड म्हणता येईल. न्याय नव्हे. त्या वेळच्या लोक आणि राजमान्य पद्धतीने फाशी किंवा अन्य प्रकारे एक्झेक्युशन करायला हवं. हे त्या वृत्तीच्या प्रीव्हेन्शनसाठी आहे.

असो, इतिहासातुन काहीच न शिकण्याची भारतीयांची वृत्ती जाणार नाही. दुर्दैव !

अगदी मान्य..
इतिहासातून सकारात्मक आणि कठोर असं काही न शिकण्याची भारतीयांची वृत्ती जाणार नाही हे दुर्दैव. इतिहास रानटी आहे तर आपणही रानटी होऊ. रानटीच रानटीला संपवू शकतो.. हो ना?
शक्ती वापरुन फक्त रानटीपणा संपवून आपली दिशा माणूसपणाकडे ठेवू असं नव्हे. ज्याला संपवायचं असं नियमांनुसार ठरलं आहे त्याला संपवण्याच्याही पद्धती व्यक्तिगत नसाव्यात..

शिल्पा ब's picture

14 Aug 2012 - 7:10 pm | शिल्पा ब

<<इतिहासातून सकारात्मक आणि कठोर असं काही न शिकण्याची भारतीयांची वृत्ती जाणार नाही हे दुर्दैव.

एवढं होउनही फक्त वरचंच वाक्य अधोरेखीत होतंय दुसरं काही नाही.

<<"सूड नको न्याय हवा" हा विचार म्हणजे बोटचेपेपणा किंवा आचरट सहिष्णुता नव्हे.
कोण न्याय देणार हो?

डोकं फोडुन घेण्याची स्मायली द्या हो सरपंच !

धन्यवाद.

मन१'s picture

14 Aug 2012 - 4:44 pm | मन१

मी मेलो, माझं आख्खं घरदार उजाड झालं तर देशमुखाची प्रतिक्रिया काय असणार आहे?
इथे हळहळणार्‍या काही सज्जन लोकांच्या बद्दल देव न करो असं काही झालं तर देशमुखराजे काय म्हणतील?

गवि's picture

14 Aug 2012 - 4:56 pm | गवि

मी मेलो, माझं आख्खं घरदार उजाड झालं तर देशमुखाची प्रतिक्रिया काय असणार आहे?
इथे हळहळणार्‍या काही सज्जन लोकांच्या बद्दल देव न करो असं काही झालं तर देशमुखराजे काय म्हणतील?

काय म्हणतील कल्पना नाही रे. पण अशा वेळी त्यांनी किंवा कोणीही काय "म्हणू नये" याविषयीची इच्छा आणि अपेक्षा मात्र आहे.

मन१'s picture

14 Aug 2012 - 6:14 pm | मन१

मी क्लीन ट्रॅप झालेलो आहे.
मुद्दा समजला. मान्य.

@ सुनिल

आमीच लै भारी!!!

आपले मत जर एखाद्याला पटले नाही आणि तसे त्याने नमुद केले तर काय बिघडले. यात आम्हीच लै भारी हे तरी कुठे जाणवले नाही..
मात्र आमच्या मुद्याच्या उलट तुम्ही लिहिता आणि ते ही वाईट शब्द न वापरता तर तुम्ही फेसबुकी विचारवंत असे म्हणणे पटले नाही...

श्रीरंग's picture

9 Aug 2012 - 10:53 pm | श्रीरंग

१००% सहमत.

जास्त दारू पिऊन यकृत बिघडते म्हणतात. पण जास्त पैसा खाल्लयाने पण यकृत बिघडते हे माहीत नव्हते!

चेतन माने's picture

8 Aug 2012 - 5:47 pm | चेतन माने

त्यांच्या यकृताने सुद्धा घोटाळा केला !!!

अत्रुप्त आत्मा's picture

8 Aug 2012 - 6:29 pm | अत्रुप्त आत्मा

@यकृताने सुद्धा घोटाळा केला !!!

तिमा's picture

8 Aug 2012 - 6:43 pm | तिमा

कोणी तिरस्करणीय असू दे वा प्रातस्मरणीय असू दे. त्याच्या अंतकाळी वाईट लिहिणे, हे आपल्याच संस्कृतीचे प्रदर्शन करते.

शिल्पा ब's picture

8 Aug 2012 - 11:35 pm | शिल्पा ब

अगदी अगदी ! हेच आम्हाला सगळ्या राजकारण्यांविषयी अन त्यांचे पाहुणे जे की श्री. श्री. कसाब साहेब, श्री. अफजल गुरु साहेब, ब्रिगेडी साहेब इ. बद्दल वाटतं हेच फक्त नमुद करु इच्छीते.

पवार साहेबांनी जशी पॅरालिसीसशी झुंज देउन नवी सुरुवात केली तोच "आदर्श" सगळ्यांनी ठेवावा हीच इश्वरचरणी प्रार्थना.

अँग्री बर्ड's picture

9 Aug 2012 - 10:03 am | अँग्री बर्ड

पवार साहेबांनी जशी पॅरालिसीसशी झुंज देउन नवी सुरुवात केली तोच "आदर्श" सगळ्यांनी ठेवावा

ईन्टरफेल's picture

15 Aug 2012 - 9:04 pm | ईन्टरफेल

>>>>कोणी तिरस्करणीय असू दे वा प्रातस्मरणीय असू दे. त्याच्या अंतकाळी वाईट लिहिणे, हे आपल्याच संस्कृतीचे प्रदर्शन करते.<<< +१

सूड's picture

8 Aug 2012 - 6:46 pm | सूड

'कुठे जाशी भोगा..आलो तुझ्या मागा' अशी कायशी म्हण आहे ती आठवली !! त्यांच्या नव्या सुनेचा पायगुण महाराष्ट्राला फलदायी होवो.

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Aug 2012 - 8:59 am | श्री गावसेना प्रमुख

त्यांच्या नव्या सुनेचा पायगुण महाराष्ट्राला फलदायी होवो
म्हणुनच दुष्काळ ?

अपूर्व कात्रे's picture

8 Aug 2012 - 10:31 pm | अपूर्व कात्रे

विलासराव देशमुखांच्या प्रकृतीस आराम पडो आणि ते लवकरच बरे होवोत अशी प्रार्थना (मला असे वाटत नसतानाही) करणे हे मला चुकीचे वाटते. कोणताही माणूस (मग तो विलासराव देशमुखांसारखा भ्रष्टाचारी का असेना?) लवकर मरो असेही म्हणावेसे वाटत नाही.
शेवटी देवाशी एकाच प्रार्थना.... त्यांना या जन्मीचे याच जन्मी भोगायला लागो.

अपूर्व कात्रे's picture

8 Aug 2012 - 10:33 pm | अपूर्व कात्रे

विलासराव देशमुखांच्या प्रकृतीस आराम पडो आणि ते लवकरच बरे होवोत अशी प्रार्थना (मला असे वाटत नसतानाही) करणे हे मला चुकीचे वाटते. कोणताही माणूस (मग तो विलासराव देशमुखांसारखा भ्रष्टाचारी का असेना?) लवकर मरो असेही म्हणावेसे वाटत नाही.
शेवटी देवाशी एकाच प्रार्थना.... त्यांना या जन्मीचे याच जन्मी भोगायला लागो.

आनंदी गोपाळ's picture

8 Aug 2012 - 10:40 pm | आनंदी गोपाळ

समजा तुम्ही केलीत प्रार्थना, अन झालेत ते बरे. तर कोर्टासमोर काय ते इथेच अन अत्ताच 'फेडायला' उभे रहावे लागेल ना? त्यात काय चूक?
शेवटी त्यांना या जन्मीचे याच जन्मी भोगायला लागायचे असेल तर हा जन्म जरा प्रोलाँग व्हावा अशी इच्छा करणेच बरोबर नाही काय?

(तटस्थ, म्हणून आनंदी) गोपाळ

विलासराव देशमुखांच्या प्रकृतीस आराम पडो आणि ते लवकरच बरे होवोत अशी प्रार्थना .
विलास रावां बद्द्ल लो़कात इतका राग असेल अस वाटल नव्हत.

विलासराव's picture

8 Aug 2012 - 11:26 pm | विलासराव

विलास रावां बद्द्ल लो़कात इतका राग असेल अस वाटल नव्हत.
:) :-)

माझीही शॅम्पेन's picture

8 Aug 2012 - 11:52 pm | माझीही शॅम्पेन

या विलासराव तुमचीच धाग्यावर वाट पाहत होतो

:) :) :)

वेताळ's picture

9 Aug 2012 - 9:27 am | वेताळ

ज्याना कुणाला वाईट वाटले त्यानी आप आपल्या आयुष्यातील एक- दोन महिने विलासरावाना मिळावे अशी देवा जवळ प्रार्थना करावी असे मला वाटते.

इरसाल's picture

9 Aug 2012 - 9:42 am | इरसाल

१/२ महिने जास्त होतील राव.ह्यांना* पण घरदार आहे.

*ज्याना कुणाला वाईट वाटले

बाकी त्यांचा रितेश किडनी लिव्हर द्यायला तयार आहे. ज्यांना कंत्राटे, प्रमोशने, बदल्या, जागा, नोकर्‍या, टोल नाके, पदे, पारितोषिके, सत्कार, परदेश प्रवास, ई. ई. त्यांच्याकडून मिळाले आहे, ते महिने देतात का बघा.

आनंदी गोपाळ's picture

9 Aug 2012 - 12:39 pm | आनंदी गोपाळ

प्रकृतीला थोडा उतार पडलाय म्हणे..

परिकथेतील राजकुमार's picture

9 Aug 2012 - 7:07 pm | परिकथेतील राजकुमार

हाथी चले बाजार...

मदनबाण's picture

10 Aug 2012 - 11:37 am | मदनबाण

*

स्वैर परी's picture

10 Aug 2012 - 6:43 pm | स्वैर परी

विलासरावांचे वय ६७ वर्षे आहे. थोडक्या आजोबा टाईप! त्यात आयुष्यभरात केलेल्या कुकर्मांची फळे सुद्धा या जन्मीच भोगावी लागतील. तेव्हा जनतेने त्यांची बाजु घेण्यात किंवा त्यांच्या कुकर्मांचा पाढा वाचण्यात काही फायदा नाहिए!

KHADADBHAU's picture

11 Aug 2012 - 4:01 pm | KHADADBHAU

छान !

अप्पा जोगळेकर's picture

11 Aug 2012 - 4:21 pm | अप्पा जोगळेकर

छान. पण आनंद फार काळ टिकणार नाही असं वाटतंय.
सध्या तरी विलासची प्रकॄती स्थिर आहे अशीच बातमी आहे.
जितका त्रास होईल तेवढं बरंच आहे.

बॅटमॅन's picture

13 Aug 2012 - 1:06 am | बॅटमॅन

+१.

मरेनात तेच्यायला . तेवढाच काव्यात्मक (आणि बव्हंशी फोल) न्याय.

शेलार मामा मालुसरे's picture

13 Aug 2012 - 9:19 pm | शेलार मामा मालुसरे

विलास ....भोग विलास ....सुधार .....कल्पनाविलास..... भोगमुख ....वि-देश वि-मुख .....शेवट..... वरासलावि-विमुख!
मरेना का तिकडे ?

मराठी_माणूस's picture

13 Aug 2012 - 10:00 pm | मराठी_माणूस

शंभरी भरण्या आधी काही दिवस (अगदी दोन दिवस सुध्दा चालतील) गजा आड काढावेत ही सदिच्छा

दादा कोंडके's picture

13 Aug 2012 - 10:08 pm | दादा कोंडके

विलासरावाच्या मरणावर टपलेली एव्हडी लोकं बघून आनंद वाटला. आता एक शिवी देउनच घेतो,

विलासरावाच्या बैलाला........ हो! :)

पुष्करिणी's picture

13 Aug 2012 - 10:15 pm | पुष्करिणी

नरेंद्र मोदींनी त्यांच्या कार्य्कर्त्यांना विलासरावांसाठी एका यकृताची तातडीनं सोय करायला सांगितलं आहे अशी बातमी वाचली. नुकत्याच निवर्तलेल्या मनुष्याच्या शरिरातून चांगलं यकृत असेल तर काढून घेउन वापरता येतं म्हणे.

नितिन थत्ते's picture

14 Aug 2012 - 7:43 am | नितिन थत्ते

नरेंद्र मोदी झिंदाबाद !!! (नाय...... त्यांनी काहीही केलं की त्यांचं कौतुक करायचं असतं म्हणून झिंदाबाद)

शिल्पा ब's picture

14 Aug 2012 - 10:36 am | शिल्पा ब

हो ना! काँग्रेसवाल्यांचं कोण्णी म्हणुन कौतुक करत नै बै ! काय तरी लोकं असतात नै ?

कुंदन's picture

14 Aug 2012 - 11:03 am | कुंदन

थत्ते चाचा ,
जाउन आलात का चेन्नै ला?
कधी आहे म्हणे ऑपरेशन ?
वागळे होते ना तिथेच , खिमट भरवायला ?

परिकथेतील राजकुमार's picture

14 Aug 2012 - 2:13 pm | परिकथेतील राजकुमार

तुमच्याकडे पाहिले ना, की का कोणास ठावूक पण मला कायम बॅ. गाडगिळांची आठवण येते. ;)

नितिन थत्ते's picture

14 Aug 2012 - 9:55 pm | नितिन थत्ते

कोणते गाडगीळ ?

न. वि. गाडगीळ की विठ्ठलराव की अनंतराव की आणखी कोणी गाडगीळ?

पराला न. वि. गाडगीळ किंवा विठ्ठलराव गाडगीळ आठवायची शक्यता कमीच आहे

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Aug 2012 - 11:59 am | बिपिन कार्यकर्ते

थत्तेसाहेब, पराला एवढा अंडरएस्टिमेट करू नका. तुम्हाला माहित नाहीये तो काय प्रकार आहे ते. :)

पुष्करिणी's picture

14 Aug 2012 - 2:26 pm | पुष्करिणी

प्रश्नच नाही, कौतुकास्पद वर्तन करणार्‍याचं कौतुक करावंच.

वसईचे किल्लेदार's picture

14 Aug 2012 - 3:54 pm | वसईचे किल्लेदार

केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन

विजय_आंग्रे's picture

14 Aug 2012 - 4:02 pm | विजय_आंग्रे

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन
श्रद्धांजली :sad:

चिरोटा's picture

14 Aug 2012 - 4:03 pm | चिरोटा

'आदर्श' नेता हरपला.

इरसाल's picture

14 Aug 2012 - 4:09 pm | इरसाल

नंतर नाही म्हणणार्‍या त्या मृत ड्रायव्हरच्या(ज्याची किडनी,यक्कृत लावणार होते) नातेवाईकांचा तीव्र निशेध.

झाले मनासारखे ???

आपली ती संस्कृती नाही म्हणुन श्रद्धांजली.

मोदींचा सौम्य धिक्कार. एक यकृत नाय देवु शकले.
बरं असो. ते पल्याडचे होते त्यांना दोष देवुन काय उपयोग.पण अल्याडच्यांनी काय @#$% घेतले.

पुष्करिणी's picture

14 Aug 2012 - 4:17 pm | पुष्करिणी

देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

पण लोकसभा तहकूब कशासाठी ?

माणुस व्हेन्टीवर किती दिवस काढु शकेल?

कपिलमुनी's picture

14 Aug 2012 - 4:40 pm | कपिलमुनी

विदर्भामधले आत्महत्या केलेले ४१० शेतकरी त्यांची वाट बघत असतील ..

विलासराव देशमुख गेले अखेर.

स्वातीविशु's picture

14 Aug 2012 - 5:18 pm | स्वातीविशु

देव करो अन म्रुतात्म्यास सद्गती लाभो.

स्मिता.'s picture

14 Aug 2012 - 6:16 pm | स्मिता.

विलासराव देशमुख यांना श्रद्धांजली!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Aug 2012 - 6:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विलासराव देशमुख यांना माझीही श्रद्धांजली !

-दिलीप बिरुटे

विलासराव देशमुख यांना माझीही श्रद्धांजली !

कोणीही त्याना मनापासुन आपल्या आयुष्यातील एक्-दोन महिने देवु केले नाहीत.
शेवटी काय आप-आपल्या कर्माची फळे................

तिमा's picture

14 Aug 2012 - 6:42 pm | तिमा

आत्ता टी.व्ही. वरील बातम्या बघितल्या. ढोंगी राजकारणी, विलासरावांवर जी स्तुतीसुमने उधळत होते, ती पाहून वाटले की हेच राजकारणी जेंव्हा कधी नैसर्गिकरीत्या 'कसाब' मरेल तेंव्हा त्याच्यावरही अशीच उधळण करायला कमी करणार नाहीत. 'त्याने इतकी वर्षे इथे राहून आम्हाला लळा लावला होता', अशीही वाक्ये ऐकू येतील. असो.
मृतात्म्यास सदगती लाभो.

दादा कोंडके's picture

14 Aug 2012 - 9:47 pm | दादा कोंडके

'त्याने इतकी वर्षे इथे राहून आम्हाला लळा लावला होता', अशीही वाक्ये ऐकू येतील.

हा हा.. खरंय!

अवांतरः माझी देखील विलास देशमुखना विनम्र श्रद्धांजली.

येथे चर्चेला उत आला आणि फाकडा मंत्री दगावला !
अश्या आजारी माणसाची आणि त्याच्या कारकीर्दीची चर्चा हया पुढे करू नये हया ठरावासह श्रद्धांजली !

मन१'s picture

14 Aug 2012 - 6:59 pm | मन१

राजकारण्याला श्रद्धांजली.

हारुन शेख's picture

14 Aug 2012 - 8:07 pm | हारुन शेख

विलासराव देशमुख यांना माझी श्रद्धांजली !

कलंत्री's picture

14 Aug 2012 - 9:12 pm | कलंत्री

विलासरावजी यांचे निधन झाल्याचे वृत्त वाचले. परमेश्वर मृतात्म्यास शांती देवो.

काही गोष्टींचे वाईट वाटल्याशिवाय राहवत नाही. विलासरावजी आपल्या मूलांच्या प्रेमात नको तितके वाहवत गेले. पूत्रमोह आवरला असता तर विलासरावजी एक निष्णांत राजकारणी म्हणून नक्कीच आपल्या सर्वांच्या स्मृतीत राहिले असते.

शेवटच्या वर्षभर त्यांची प्रकृतीही ठिक नव्हती, हे जर खरे असेल तर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यायला हवी होती. शेवटी पूर्वपुण्याईवर राजकारणाची जागा अडवून बसणे त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसे नव्हते.

यशवंतरावांचा वारसा जपणारा राजकारणी कधी जन्माला येईल कोणास ठाऊक?

अर्धवटराव's picture

14 Aug 2012 - 10:04 pm | अर्धवटराव

विलासरावांना विनम्र श्रद्धांजली.
प्रकृती त्रास देतेय, जीवावरचं दुखणं मागे लागलय, मुलांना राजकारणात सेटल करायचय, उघड आणि गुप्तहितशत्रुंना चाप लावायचाय, आदर्श वगैरे प्रकरणातुन आपली अब्रु वाचवायची आहे.. एक ना दो, हजार कटकटींपासुन एका झटक्यात सुटले विलासराव.
अवांतर : अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, आपले सी.एम. साहेब वगैरे मंडळींना मनात थोडंफार हायसं वाटलं असेल... आता सगळ्या "आदर्श"चं बालंट त्या दिवंगत व्यक्तीच्या नावे खपवलं कि हे सगळे मोकळे :(

अर्धवटराव

चेतनकुलकर्णी_85's picture

14 Aug 2012 - 10:23 pm | चेतनकुलकर्णी_85

पूर्वी ह्यांच्या पोराचा पहिला चित्रपट प्रदर्शित झालेला तेव्हा पासून ते आत्तापर्यंत(किंवा बर्याच वर्षान पर्यंत ) त्य चित्रपटाची एकदाही पायरसी झालेली नाहीहे..काय वट आहे...!!!!!
बाकी आत्ता बातम्यान मध्ये पहिले कि आपले नव गृहमंत्री नकाश्रू ढळत होते माझा मित्र गेला म्हणून..(मनात म्हणंत असतील च्यायला जणारास च होतास तर आदर्श चा ब्लेम तरी घेऊन जायचास!!)
आता कोणत्या पावर फुल्ल माणसाची वर्णी लागत्येय ते पाहूया..
एक राजकारणी गेला कि पंचक पूर्ण होते असे ऐकले आहे.. :)

काळा पहाड's picture

14 Aug 2012 - 11:16 pm | काळा पहाड

याच राजकारण्यांनी आपल्या वैद्यकीय व्यवस्थेची वाट लावलीये ना? यांना कल्पनाही नसेल की त्याच मुळे यांचा ही बळी जाइल म्हणून. एवढे सगळे कॉलेजेस काढले, जागा हडपली, पैसे ढापले आणि एक यकृत मिळालं नाही?

विकास's picture

15 Aug 2012 - 12:16 am | विकास

विलासरावांना श्रद्धांजली...

एक यकृत मिळालं नाही?

यकृत आणि मुत्रपिंड दोन्ही मिळाले होते. चेन्नईतील एका ब्रेनडेड टॅक्सिड्रायव्हरचा रक्त गट वगैरे सर्वकाही जुळले होते. त्याच्या कुटूंबियांनी देखील यक्रूत आणि मुत्रपिंडदानासाठी परवानगी दिली. त्यानंतर कायद्याप्रमाणे लागणार्‍या सर्व अधिकृत परवानग्या देखील राज्यसरकारकडून मिळाल्या. शस्त्रक्रियेची तयारी होत असतानाच, त्या मृत ड्रायव्हरच्या कुटूंबियांनी मत बदलले आणि अवयवदानास नकार दिला. त्यामुळे शस्त्रक्रिया होऊ शकली नाही....

विलासराव, त्यांचे राजकारण वगैरे आवडो-न आवडो हा ह्यातील दुय्यम भाग आहे. पण अवयवदानाने जर कोणाचा प्राण वाचत असेल तर त्यासाठी मदत करता येत असताना देखील मदत न करण्याची वृत्ती आपल्या समाजासाठी दुर्दैवी आहे, इतकेच या घटनेमुळे वाटले.

आंबोळी's picture

14 Aug 2012 - 11:29 pm | आंबोळी

विलासरावांना श्रद्धांजली!!

खेडेकर वगैरे प्रभ्रुती पहाता विलासराव देशमुख खरच सुसंस्कृत होते हे (बाकीच्या आदर्श गोष्टींकडे डोळेझाक करून) म्हणावेसे वाटते.

अताच कोणी तरी आयबिएन लोकमत वर 'त्यांच्याकडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता होती' असे स्टेटमेंट केले ते जरा अतिशयोक्तीपुर्ण वाटतय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Aug 2012 - 11:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दै. सकाळच्या औरंगाबाद आवृत्तीत मोरपीस या शीर्षकाचा विलासरावांच्या आठवणीचा एक सुंदर लेख कवी प्रा.फ.मु.शिंदे यांनी लिहिला आहे, काही वाचकांना आवडेल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर's picture

15 Aug 2012 - 12:42 pm | प्रभाकर पेठकर

काही वाचकांना आवडेल असे वाटते.

हा: ..हा:..हा:...किती घाबरत-घाबरत हे विधान केले आहे!

श्रीरंग's picture

15 Aug 2012 - 5:26 pm | श्रीरंग

हाहाहा! सानंदा प्रकरणात, या 'राजहंसाच्या' वरदहस्ताखाली ज्यांच्या जमीनी गेल्या आहेत, त्यांना नक्कीच आवडणार नाही हा लेख.

शेलार मामा मालुसरे's picture

15 Aug 2012 - 5:09 pm | शेलार मामा मालुसरे

लातुर पोरके कि काय झाले म्हणे !
आम्च्या सोलापुरने काय घोडे (नेमका हाच प्राणी का ? हे माहित नाही ,प्राणीमित्रांनी उगाच संशय घेउ नये म्हणुन हा कंसात्मक खुलासा ) मारले हे काही कळतच नाही ..... ज्ञानी जनतेने प्रकाश टाकावा ....!

सोम्यागोम्या's picture

16 Aug 2012 - 7:58 am | सोम्यागोम्या

मिपावरील जाणकार? वाचकांच्या प्रतिक्रिया पाहून आश्चर्य वाटले. एखाद्या माणसाच्या ३२ वर्षांच्या सामाजिक जीवनातील उणे पुरे दोन चार प्रसंग माहित झालेल्या लोकांनी विलासरावांच्या बद्दल इतक्या वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत विशेषतः ते मृत्यूशय्येवर असताना हिणकसपणे लिहिलेल्या काही प्रतिक्रिया पाहून वाईट वाटले. प्रथम मी काँगेस व विलासराव यांचा समर्थक /लाभार्थी नाही हे स्पष्ट करु इच्च्छितो. त्यांच्यववर भ्रष्टाचाराचे आरोप झाले व त्यात तथ्य असेलही.
सानंदा, व्हिसलिंविवुड्स, आदर्श, राम गोपाल वर्मांची सोबत हे त्यांच्या कारकिर्दीतिल वादग्रस्त निर्णय ठरले. या प्रकरणांमुळॅ काही लोकांनी इतक्या वाईट प्रकारे प्रतिक्रिया दिल्या असतील तर ही चीड इतर राजकारण्यां विरुध इतक्या ठळकपणे या व्यासपिठावर का मांडली गेली नाही? शरदराव पवार, अजित पवार, ए राजा, येडि, मनमोहन(कोळसा घोटाळा), चिदंबरम, हे मेले तर बरे होईल असे विधान माझ्या तरी वाचण्यात आले नाही.
विलासरावांबद्दल काही चांगले माझ्या अनुभवानुसारः
विलासरावांमध्ये निर्णय क्षमता होती व निर्णयांची अम्मलबजावणी करुन घेण्याची प्रशासकीय जाणही होती. त्यांचा जनसंपर्क प्रचंड होता कार्यकर्त्यांना व्यक्तिशः ते ओळखत असत. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही आपुलकीने चौकशी ते करत असत. नुसतीच चौकशी नाही तर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी वाहनाची जेवणाखाण्याची व्यवस्था केल्याची उदाहरणे मला ठाऊक आहेत. १०-१५ वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या सरकारी अधिका-यांशी (यात त्यांना कसलाही फायदा नसताना)स्वतःहून व्यक्तिगत संपर्क त्यांनी ठेवला होता. हे सर्व ते मुख्यमंत्री असताना सुद्धा करत होते. जबरदस्त वक्तृत्रुत्वगुण तांच्या जवळ होते. जे एक उत्कृष्ट राजकारणी होण्यासाठी आवश्य्क आहेत.
त्यांना कला, संस्कृती याबद्दल आस्था होती. शास्त्रीय संगीताचे ते मोठे चाहते होते. गाण्याला कलेला दाद देणारे ते रसिक होते. महारष्ट्राचे नुसतेच राजकरण नव्हे तर संस्कृती चे ते जाणते होते. आघाड्यांचे राजकारण राजकीय डावपेच यात ते तरबेज होते.
मुंबईच्या गिरणीकामगरांच्या प्रश्नातील त्यांनी केलेली मदत असेल, पहिली पासून इंग्रजी शिक्षणाच्या निर्णयाचे समर्थन असेल अशी लोकोपयोगी कामे त्यांनी केली . मराठवाड्यातील अनेक गावांचे पाण्याचे प्रश्न त्यांनी सोडवले. महिन्यातून दोन वेळा पाणी येणा-या घरात एक दिवसाआड पाणी आले की कसे वाटते हे समजण्यासाठी ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असावी लागते. मराठवाड्यात त्यांनी सुरु केलेल्या रेल्वे असोत किंवा विमानसेवा असोत किंवा त्यांनी आणलेले उद्योग धंदे असोत त्यामुळे विकासाला हातभार लागला हे मान्य करावेच लागेल. फक्त मराठवाड्यासाठी च त्यांनी कार्य केले असा प्रतिवाद कुणी करु इच्छित असतील तर त्यांना सांगावेसे वाटते की कोणीच काही न केलेल्या प्रदेशासाठी त्यांनी कार्य केले हे काही कमी नाही. व मराठवाडा हा महाराष्ट्राचा भाग असल्याने त्यांनी पर्यायाने महाराष्ट्राच्याच विकासाला हातभार लावला असे म्हणावे लागेल.
त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराला व पदाचा दुरुपयोग करुन परिचितांना लाभ मिळवून देण्याच्या त्यांच्या कृतींना मी कदापि समर्थन देणार नाही. पण एखाद्याच्या मृत्यूबद्दल असुरी आनंद व्यक्त करणे रुचले नाही म्हणून हा टंकन प्रपंच.

मराठवाड्यातील अनेक गावांचे पाण्याचे प्रश्न त्यांनी सोडवले. महिन्यातून दोन वेळा पाणी येणा-या घरात एक दिवसाआड पाणी आले की कसे वाटते हे समजण्यासाठी ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असावी लागते. मराठवाड्यात त्यांनी सुरु केलेल्या रेल्वे असोत किंवा विमानसेवा असोत किंवा त्यांनी आणलेले उद्योग धंदे असोत त्यामुळे विकासाला हातभार लागला हे मान्य करावेच लागेल

प्रचंड अनुमोदन्.बाकि प्रतिक्रिया देणार्यानि एकदा लातुरला जाऊन यायला हर्कत नाहि...

मराठवाड्यातील काही गावांमध्ये एकदिवसाआड पाणी... अरे वाह! भलतीच दैदिप्यमान कारकीर्द म्हणायची, अख्ख्या महाराष्ट्राचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री बनून राहिलेल्या माणसाची. तहानलेला विदर्भ याच महाराष्ट्रातला ना हो? असो.
हजारो कोटीची संपत्ती त्यांनी कशी जमवली हे पण सांगा जरा. अनुकरणीय असेल तर आपण सर्वच प्रयत्न करू.
शरदराव पवार, अजित पवार, ए राजा, येडि, मनमोहन, चिदंबरम, यांच्यापेक्षा ते कमी भ्रष्ट असल्याचं तुम्ही सुचवू पाहताय. ही देखील मोठी अचीव्हमेंट मानली पाहिजे का?
बाकी मनमिळावू, विनोदी, कर्यकर्त्यांशी गोग्गोड बोलणारे वगैरे ते असतील कदाचित.

'फेसबुक'वर आलेला आणि मला आवडलेला एक प्रतिसाद:
"इतर कुठल्याही देशात अशा भ्रष्ट माणसाचे निधन एकाद्या इस्पितळात न होता एकाद्या तुरुंगात झाले असते! आता त्यांच्या वैद्यकीय इलाजापायी आलेल्या खर्चाची तरतूद आपल्यासारख्या करदात्यांनाच करावी लागणार."
"मरणांति वैराणि" अशी आपली संस्कृति असूनही विलासरावांच्या निधनानंतर दुर्दैवाने असे नकारात्मक प्रतिसादच बहुतांशी वाचायला मिळाले हे मात्र खरे.

भीमाईचा पिपळ्या.'s picture

16 Aug 2012 - 7:40 pm | भीमाईचा पिपळ्या.

काय काय प्र आहेत :(
आरेरे वाईत वाटले

बॅटमॅन's picture

17 Aug 2012 - 2:01 pm | बॅटमॅन

तुम्हाला बरा पुळका राजकारण्यांचा?

मन१'s picture

20 Aug 2012 - 5:06 pm | मन१

विलासराव जाउन मोठेच नुकसान झालेले दिसत आहे. त्यांच्यासारख्यांना वाचवायला हा तरी उपाय वापरायला हवा होता.
मागचे काही दिवस "कसाबला फासावर लटकवा " अशी मागणी बरेच लोक करत होते.

मला तर वाटते आत्यंतिक क्रूर गुन्हा केलेल्यास फाशी देण्यापूर्वी त्यांची एखादी किडनी, शेवटच्या क्षणी यकृत वगैरे का काढून घेउ नये? समाजासाठी ते हितावह नाही का? आमचे दिग्गज विलासराव तरी वाचले असते कसाबचे यकृत जुळले असते तर. मला तर विश्वास वाटतो की ते नक्की जुळले असते. कसाब आणि विलासराव एकाच रक्ताचे (आय मीन एकाच रक्तगटाचे) आहेत असा मला विश्वास आहे

कुंदन's picture

20 Aug 2012 - 5:15 pm | कुंदन

मग ते नवीन आदर्श ठेवायला अजुन जोमाने काम करु शकले असते.

अविनाशकुलकर्णी's picture

21 Aug 2012 - 1:48 am | अविनाशकुलकर्णी

पायगुण वगैरे असतो का???

इरसाल's picture

21 Aug 2012 - 9:35 am | इरसाल

ठोठोठो !!!!!!!!
ढिच्क्यांव ढिच्क्यांव ढिच्क्यांव...............

का उगा त्या गरीब बापुडीला दोष लावत आहात.