मुमताझ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
30 Jul 2012 - 10:14 pm
गाभा: 

मुमताझ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझ्या अतिशय आवडत्या अश्या दुश्मन या चित्रपटात त्यांनी उत्तम भुमिका केली होती.

http://timesofindia.indiatimes.com/entertainment/bollywood/news-intervie...

http://en.wikipedia.org/wiki/Mumtaz_(actress)

वरील दोन्ही लेख चित्रपट रसिकांना आवडतीलच.

माझ्या मनात बर्‍याच दिवसापासून एक प्रश्न अनुत्तरित आहे की भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक अभिनेते सम्राट आहेत उदा. राज, देव, दिलीप, राजेश, अमिताभ इत्यादी परन्तु अभिनेत्री सम्राज्ञी कोण आहे?

असो, मुमताझ यांना मिपातर्फे शुभेच्छा.

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

30 Jul 2012 - 10:21 pm | पक पक पक

केक वगैरे कापला कि नाय मग..? ;)
चांगल आहे , चालु द्या तुमच ....

सचिन कुलकर्णी's picture

30 Jul 2012 - 10:27 pm | सचिन कुलकर्णी

...परन्तु अभिनेत्री सम्राज्ञी कोण आहे? ---- एकमेव तीच ... मधुबाला !! नि:संशय.
(माधुरी दीक्षितच्या जमान्यातला) सचिन. :-)

नर्गीस चा अभिनय खूप आवडतो.

पिवळा डांबिस's picture

31 Jul 2012 - 1:21 am | पिवळा डांबिस

ते शुभेच्छा वैग्रे देऊ हो, पण फोटू कुठाय? तिच्या काळात सगळ्यात मादक अभिनेत्री होती ती!!
नाना, परा वगैरे चित्रमहर्षींनी कलंत्रीकाकांसकट मिपाकरांना उपकृत करावे ही विज्ञापना!!
:)

कापूसकोन्ड्या's picture

31 Jul 2012 - 2:42 am | कापूसकोन्ड्या

परिकथेतील राजकुमार's picture

31 Jul 2012 - 11:32 am | परिकथेतील राजकुमार

पिवळा डांबिस's picture

1 Aug 2012 - 2:00 am | पिवळा डांबिस

काको आणि परा,
अनेक धन्यवाद!!
;)

प्रभाकर पेठकर's picture

31 Jul 2012 - 1:50 am | प्रभाकर पेठकर

मुमु बेबी म्हणजे भाऊ पाध्यांची अत्यंत आवडती नटी. तिचा चित्रपट आला कि त्या चित्रपटाच्या परिक्षणात भाऊ पाध्यांची लेखणी मुमु बेबीवरच चालायची. असो.

मुमताज एक एक्स्ट्रा आणि नर्तिका म्हणून चित्रपट क्षेत्रात आली. एका निर्मात्याच्या मर्जीतून काही कारणाने ती उतरली तेंव्हा 'तू नायिका बनायची स्वप्न पाहू नकोस. नर्तिका म्हणून आली आहेस नर्तिकाच राहशील' असं कडवट मत त्याने सेटवर सर्वांसमोर व्यक्त केले होते. ह्या घटनेने चिडून जाऊन मुमताजने पण केला की मी नायिका बनून दाखवेनच. आणि पुढे ती नुसतीच नायिका बनली नाही तर शिखरावर पोहोचली. सुपरस्टार बनली. नुसत्या मुमताजच्या नांवावर चित्रपट चालू लागले. असो.

तिचा पहिला (आणि बर्‍याच काळाकरीता) हिरो दारासिंग होता.

कलंत्री's picture

31 Jul 2012 - 10:01 pm | कलंत्री

पूर्वी युध्दस्य रम्य कथा असे सांगितले जायचे ते आता बदलुन चित्रपटस्य रम्य कथा असे सांगावे लागेल. मुमताझ मात्र त्या नृत्यदिग्दर्शकाचे आभारच मानत असेल.

चित्रगुप्त's picture

31 Jul 2012 - 3:00 am | चित्रगुप्त


मुमताजचा सर्वात पहिला सिनेमा 'रुस्तुम सोहराब' (१९६३) होता, असे ऐकले होते.
सज्जाद हुसैन चे संगीत, सुरैय्या आणि लताची गाणी अविस्मरणीय.
मुमताज-प्रेमनाथ चे एक गाणे:
http://www.youtube.com/watch?v=8sPQ1eRzkX0

सुरैय्याचे गाणे:
http://www.youtube.com/watch?v=pBeNuDzOYlc&feature=related

गूगलवर मात्र मुमताज हुडकल्यास तमिळ अभिनेत्री मुमताज इचे फोटोच जास्त दिसतातः

प्रभाकर पेठकर's picture

31 Jul 2012 - 9:42 am | प्रभाकर पेठकर

गूगलवर मात्र मुमताज हुडकल्यास तमिळ अभिनेत्री मुमताज इचे फोटोच जास्त दिसतातः

असू द्या. तिचाही वाढदिवस येतो आहे पुढच्या ५ जुलैला.

विजुभाऊ's picture

31 Jul 2012 - 10:10 am | विजुभाऊ

मुमताझ चे दोन्ही हीरो दारासिंग आणि राजेश खन्ना या म्हैन्यातच देहावसान पावलेत. हा ही एक योगायोग

उदय के'सागर's picture

31 Jul 2012 - 11:45 am | उदय के'सागर

मुमताझ म्हंटले की तिचे 'इवलुसे' 'क्युट' नाक आठवते.. कसली गोडं दिसायची... :) अपरे/नकटे नाकाचे लोकही सुंदर आणि आकर्षक असू शकतात ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे 'मुमताझ' :)

परवाच कुठल्याश्या चॅनल वर "आइना" हा मुमताझ चा चित्रपट पाहिला. विशेष म्हणजे तिची मुख्य भूमिका असलेला चित्रपट फार फार वर्षांनी पहिला. तिचे सौंदर्य दोनही 'गेट-अप' मधे केवळ अप्रतिम होते (एक मध्यमवर्गीय मराठी घरातली मुलगी जी छोट्या नोकरीतून घरच्या आर्थिक गरजा पुर्ण करते आणि नंतर त्याच गरजा पुरवता पुरवता एक वेश्या बनते असा विषय - ह्याचाच काहिसा रिमेक 'लागा चुनरी मे दाग' )

मुमताझ जी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

- (तिच्या नकट्या नाकाचा आणि नृत्याचा एक 'वेडा' फॅन) उदय