गाभा:
आजच्या मटामधे (इथे बहुसंख्य विरोधात असतील मटावाचनाबाबत) एक बातमी वाचली.
त्यात चीनमधील लोकांच्या प्रतिक्रिया चायनास्मॅक नावाच्या साइटवर आल्या आहेत. त्यात भारत हा एक गलिच्छ देश असल्याचे म्हटले आहे आणी ह्या गोष्टीच्या पुष्ट्यर्थ त्यांनी काही फोटोही दिलेले आहेत.
त्याची लिंक खाली देत आहे. फोटो प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर पहावेत. पहिल्या ६/७ फोटो नंतर उलटी येणेच बाकी रहाते.
तर दिलेल्या "गलिच्छ" ह्या पदवीबद्दल चीनने का सांगावे असा सुर आपली विद्वानमंडळी लावत आहे.
ह्या बाबत मिपाधुरीण/धुरीणींना काय वाटते म्हणुन हा केरळातला काथ्या कुटत आहे.
http://www.chinasmack.com/2010/pictures/filthy-india-photos-chinese-neti...
प्रतिक्रिया
24 Jul 2012 - 11:43 am | अन्या दातार
हीच गलिच्छता पाहुन ओस्कर मिळतो म्हने ;-)
24 Jul 2012 - 11:43 am | मी_आहे_ना
अहो आपलं आपल्याला (देश म्हणून) झालंय थोडं, ह्या असल्या लेखांना फाट्यावर मारा. अर्थात 'जिभेवर' असावा तसा 'श्रद्धेवर'ही ताबा असावाच!
24 Jul 2012 - 11:44 am | आप्पा
मी सकाळीच हे फोटो बघीतले. खुपच किळस आली. पण ही गंगेची वस्तुतीथी आहे. आपणास हे बदलणे जरुरी आहे. लोकांच्या अंधश्रध्दा बदलणे खुप अवघड आहे.
24 Jul 2012 - 11:52 am | गवि
हे सर्व खरं असेल तर भयानक किळसवाणं.. किळसवाणेपणापेक्षाही आरोग्याला घातक अपायकारक आहे..
गंगेमधे आंघोळ न करता फक्त पाय बुडवले होते तेव्हाही याच भावनेने. हरिद्वारला / ऋषिकेशला याहून काहीशी स्वच्छ असूनही गंगा गलिच्छच वाटली होती. नदीत आंघोळ नाही केली तरी हॉटेलातल्या बाथरूममधेही शॉवरला तेच पाणी येत होतं ही वस्तुस्थितीच.. आणि शुद्धीकरण न करता ते नळांमधून खेळवलं जात असावं असा माझा अंदाज..
लाजिरवाणी गोष्ट आहे हे खरंच आणि फोटोही ढवळून आणणारेच आहेत.. सडलेली प्रेतं नसली तरी मुंबई लोकलच्या कडेने आणि काही रस्त्यांवर यातील काही दृश्यं दिसतात. कोंकणातल्या गावी, रत्नागिरीला पाऊस पडल्याची मज्जा वाटायची मुंबईत थोडा पडला तर घाण आणि जास्त पडला की भीती वाटते..
24 Jul 2012 - 11:54 am | शिल्पा ब
फोटोंची लिंक पाहीली...गलिच्छ आहेच...त्या गंगेची काय वाट लावलीये. आत्तापर्यंत ऐकुन होते पण नाईलाजाने पहावं पण लागलं.
तिथेच डेड बॉडी जाळणे, इतरांची आंघोळ, तेच पाणि पिणे, घाण, माणसांच्या अन प्राण्यांच्या डेड बॉडीज तरंगत असणे, त्याच पाण्यातले मासे खाणे. :Sp :-S) :sick:
24 Jul 2012 - 12:29 pm | परिकथेतील राजकुमार
चायनावाले वेडझवे आहेत.
आमच्या पुण्याच्या मूळा-मुठेचे ह्यापेक्षा भारी भारी फटू मिळाले असते त्यांना. उगा बोंबलत गंगेच्या किनार्यावर हिंडत बसले.
बाकी http://www.topix.com/forum/world/australia/TPATO0HFKE13DJFCV इथली अल्बीनोची पोस्ट वाचली, व्हिडो पाहिले तर चायनावाले स्वतः किती शुद्ध आहेत हे कळून येते.
24 Jul 2012 - 2:21 pm | नाना चेंगट
24 Jul 2012 - 9:43 pm | शिल्पा ब
यातले दोन तीन व्हीडीओ पाहीले. ... भयंकर क्रुर आहेत.
कोणतेही फर विकत घेउ नका...मी स्वत: मुद्दामुन लेदर कधीच वापरत नाही अन फर तर अजुन एकदाही घेतलेलं नाही...
कोल्हा अन इतर प्राण्यांना अक्षर: जिवंत सोलुन त्यांचं फर विकलं जातं. :(
24 Jul 2012 - 1:23 pm | अन्तु बर्वा
पहिल्या काही फोटो नंतर पुढचे फोटो बघुच शकलो नाही. भलेही हा चीनचा आगाउपणा असेल पण जे फोटोत दिसतय ती वस्तुस्थिती आहे. गंगेच्या काठी वाढत असलेली बेसुमार लोकसंख्या, कापड गिरण्या, केमिकल कारखाने, खाणी यांनी गंगेला अगदी गुदमरुन टाकलं आहे.
24 Jul 2012 - 1:55 pm | चिगो
अगदी सहमत..चीनने सांगितले म्हणून "तूम्ही कोण सांगणारे?" म्हणून डिनायल मोडमध्ये जायची गरज नाही.. घाण आहे ती घाण आहे.. स्वच्छ कशी करायची, ते बघा. बाकी हृषीकेश, हरीद्वारच्या पुढे गंगा पाहिलेली नाही, पहायची इच्छा नाही.. :-(
24 Jul 2012 - 5:06 pm | श्री गावसेना प्रमुख
http://www.chinahush.com/2009/10/21/amazing-pictures-pollution-in-china/
24 Jul 2012 - 5:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत आहे.
-दिलीप बिरुटे
24 Jul 2012 - 2:04 pm | मन१
जगभरात मोठ्या शहरात एक चायनाटाउन एरिया असतोच ; तो कशासाठी प्रसिद्ध असतो हे स्वच्छताप्रिय चिन्यांना ठाउक असेलच.
तसेही पोलादी पकडित अडकलेल्यांना स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छतेची आवड ठेवणे परवडत असावे.
भारतात स्थिती अगदि १८० अंश उलट !!
24 Jul 2012 - 4:12 pm | यकु
गंगेच्या पाण्यात हाडंही विरघळून टाकण्याची शक्ती आहे ( पवित्रता, जीवंत तीर्थ असणे - गंगेत मृतदेह सोडून दिला / गंगेवर जाळला ( इव्हन गंगा वहाते त्या गावी मृत्यू झाला तरी ) त्या जीवाला मुक्ती मिळते) वगैरे समजांमुळे ही प्रेतं सोडण्याचा अपप्रकार होतो.
संत कबिरांचं उदाहरण या बाबतीत लोक आठवत नाहीत.
कबीर म्हणे गंगेवर मेलो म्हणजे मला मुक्ती मिळणार की काय? चल हट! मरत नाही गंगा किनार्यावर! कबीरांचं आयुष्य गंगाकिनारी गेलं, पण अंतकाळी त्यांनी देह सोडला तो गंगेपासून दूर जाऊन.
बाकी काही असो, कापालिकांना उपासनेसाठी मानवी कवट्या वगैरे गंगेतल्याच मृतदेहांपासून मिळतात हे एक बरंय - म्हणजे जी उपासना, स्वतःला जाणून घेण्याची एक पद्धत या देशात जन्मली ती चालू रहाण्यास गंगा दर्शनी दृष्ट्या सहायक आहे हे बरंच आहे म्हणून हे वाक्य. एरव्ही त्या लोकांनी कवट्या कुठे शोधायच्या?
इकडे ( आता तिकडे) उज्जैन वगैरे भागात चित्र वेगळं आहे - उज्जैन हेही तीर्थक्षेत्र, महाकालाचं स्थान ( + क्षिप्रा नदी) असल्याने तिथंही जाऊन बरेच लोक मरतात. पण तिथे बेवारशी मृतदेह नदीत वगैरे फेकले जात नाहीत - स्थानिक कार्यकर्त्यांना बेवारशी मृतदेहाबद्दल कळलं की ( त्यांनी उज्जैनच्या भिंती -भिंतीवर स्वतःचे मोबाईल नंबर लिहून ठेवले आहेत) लगेच ते स्वखर्चाने बेवारशी मृतदेह क्षिप्रेवरील स्मशानात नेऊन विधिवत अंत्यसंस्कार केले जातात.
बाकी गंगा प्रदुषण कमी करण्यासाठीही बरेच लोक झटत आहेत - पण काम करणारे कमी आणि घाण करणारे जास्त त्यामुळं गंगा अशी गलिच्छ !
24 Jul 2012 - 5:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे बाप रे.... संपूर्ण फोटो नाही पाहु शकत. :(
-दिलीप बिरुटे
24 Jul 2012 - 5:21 pm | गवि
वाराणसीला असतं तसं भयानक रुप हरिद्वारला दिसलं नाही. पण मधूनच प्लॅस्टिकच्या फुगलेल्या पिशव्या अन निर्माल्याचा लोंढा जाताना दिसायचा. पाण्याला वेग भयंकर होता. कोणत्याही वाहत्या वस्तूवर नजर ठरत नव्हती.
लास्टच्या "होडन सावर" अन "मख्खन चख्खन" फेम ट्रिपमधे हरिद्वारला माझ्या हॉटेलातून दिसणारी गंगा नदी अशी:
24 Jul 2012 - 5:23 pm | मदनबाण
गंगेत प्रदुषण होत आहे,हे आता चायनीज लोकांना देखील समजले तर !
24 Jul 2012 - 7:00 pm | प्रभाकर पेठकर
गंगेची दयनिय अवस्था करणार्यांवर सरकार अंकुश का नाही ठेऊ शकत?
दुर्दैवाने पूर्वी नव्हते ते 'सुरक्षा कवच', 'शनी कवच', 'संधी सुधा' आणि 'फेंगशुई' चे पेव वाहिन्यांवर फुटले आहे.
मुलांना अंधश्रद्धेपासून दूर ठेवा.
आपल्या जवळच्या नद्यांच्या किनार्यावरही निर्माल्य कलश ठेवलेले असतात. 'नदीच्या पात्रात प्लॅस्टीकच्या पिशव्या टाकू नका' असे फलक जागोजागी लावलेले असतात तरीपण शिकले-सवरलेले, सुशिक्षित (?), सुसंस्कृत (?) लोकं त्या कडे सोयिस्कर दुर्लक्ष करताना दिसतात. कांही सांगायला गेले तर बाह्या सरसाऊन मारामारी पर्यंत प्रकरणे जातात.
25 Jul 2012 - 7:52 am | नगरीनिरंजन
पूर्वी कोणी मरत असेल तर तोंडात गंगाजल घालायचे. आता एखादा मरता मरत नसेल तर त्याला गंगाजल पाजत असावेत.
बाकी चीनी घाणेरडे आहेत म्हणून आमच्या घाणीला त्यांनी घाण म्हणायचं नाही या अभिनिवेशाचं जाम हसू आलं.
हिंदू (आणि गंगेला पवित्र मानून तिच्या किनार्यावर कर्मकांडं करणारे कोणी असतील तर इतर धर्मीयांनी) आपल्या या अंधश्रद्धांचे कठोर आत्मपरीक्षण करणे आणि सांडपाणी व रासायनिक द्रव्ये गंगेत सोडणार्यांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे याच्याशी सहमत.
पण दुर्दैवाने धर्माभिमान म्हणजे पोकळ श्रेष्ठत्वाच्या कल्पना आणि अस्रुरक्षितता असल्यावर काय म्हणणार?
असो.
तरीही प्रेतांचे फोटो पाहून शांत शांत वाटलं. ज्या शरीराचे आपण चोचले पुरवतो ते एक दिवस असंच नष्ट होणार आहे हे पुन्हा प्रकर्षाने कळल्याने सगळी हाव आणि काही गोष्टी न मिळाल्याचं दु:ख विरून जातं.
25 Jul 2012 - 8:13 am | अर्धवटराव
>>प्रेतांचे फोटो पाहून शांत शांत वाटलं. ज्या शरीराचे आपण चोचले पुरवतो ते एक दिवस असंच नष्ट होणार आहे हे पुन्हा प्रकर्षाने कळल्याने सगळी हाव आणि काही गोष्टी न मिळाल्याचं दु:ख विरून जातं.
__/\__
अर्धवटराव
25 Jul 2012 - 8:28 am | मन१
+१
25 Jul 2012 - 10:20 am | नगरीनिरंजन
अगदीच स्मशान वैराग्य नाही पण आयुष्य लै सिरियसली घेऊ नये एवढं तर नक्कीच वाटतं. :)
25 Jul 2012 - 10:35 am | इरसाल
मेल्यावर जरी नसलो तरी सद्यस्थितीतल्या देहाची अशी विटंबना नको, त्यापेक्षा कुठेतरी वैद्यकिय महाविद्यालयाला दान केलेला बरा.
25 Jul 2012 - 10:47 am | गवि
खरंय आणि शिवाय त्या देहावर अत्यंत घातक जंतू माजतात (जे जिवंत असताना कंट्रोलमधे ठेवले जातात). ते पाण्यात मिसळून इतर जिवंत लोकांचेही केवळ देह राहायला नकोत.
अर्थात ननि यांनी म्हटलंय ते वेगळंच, त्यांना असे निसर्गनियमाने डिकंपोज होत चाललेले देह पाहून लाईफमधे भौतिक सुखांसाठी फार तडफड करण्यातला फोलपणा लक्षात आलाय..
.. ( वादविवादाच्या प्रस्थापित नियमांनुसार ननि हे मृतदेहांच्या विटंबनेचं / गंगेच्या गलिच्छिकरणाचं समर्थन करताहेत असं म्हणता येईल की..! :) )
25 Jul 2012 - 11:10 am | नगरीनिरंजन
धन्यवाद गवि! :)
हा मुद्दा माझ्या लक्षात आला नव्हता.
त्या मृतदेहांच्या विटंबनेचे समर्थन करण्याचा माझा कोणताही हेतू नाही हे स्पष्ट केल्याबद्दल आभारी आहे.
25 Jul 2012 - 10:51 am | नगरीनिरंजन
माझे वडील एका वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापक होते आणि मी नववीत असताना त्यांनी मला त्यांच्या महाविद्यालयात ठेवलेला आणि मधोमध पूर्णपणे फाडलेला मनुष्य देह दाखवला होता. माझ्या वडिलांनी चिमट्याने त्या माणसाची आतडी वगैरे उलगडून दाखवली. हृदय, जठर इत्यादी सर्व दाखवले.
यालाही काही लोक विटंबना म्हणतील.
25 Jul 2012 - 11:07 am | मन१
टीव्हीवर आम्हीही असे काही पाहिले होते. सर्वाधिक जाणवली ती गोष्ट म्हणजे यकृत, आतडी, जठर म्हटली तर फारसा फरक नाही कुणात. पण बाहेरच्या रंगरुपाकडं पाहून आपण जे श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवतो( टिपिकल भारतीय भूमिका म्हणजे "लडकी गोरी चाहिये") ते किती भंपक आहे, ते जाण्वलं होतं.
25 Jul 2012 - 10:44 am | मन१
फेमस वनलायनर आठवला.
Don't take your life seriously, because anyways none else does!
Take your life sincerely, not seriously. असं काहिसं ते होतं.
आपलं यश, आपलं आभाळाएवढं ( वाटणारं) दु:ख हे शेवटी क्षणभंगुर वगैरे आहे, हे अशा क्षणी जाणवतं. पण गंमत म्हणजे आमच्यासारख्या जीवांना हे असं जाणवणंही क्षणभंगुरच असतं!
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे
ह्या दासबोधातल्या ओळी कळतात, पण वळत नाहीत.
25 Jul 2012 - 12:21 pm | ५० फक्त
या सगळ्याचं माझ्यासाठीचं फायनल उत्तर म्हणुनच - ५० फक्त. http://misalpav.com/node/17095
किमान आपल्यासाठी तरी आयुष्य फार सुखी होउन जातं, शेवट माहित असला अन कळाला की मग प्रवासातली आजुबाजुची झाडं जास्त सुंदर दिसायला लागतात.
25 Jul 2012 - 11:41 am | इरसाल
२००६ की ०७ मधे हरिद्वारला गेलो होतो, मुख्य गंगाघाटावर, तिथे गर्दी होतीच पण वरच्या लिंकमधला खतरनाकपणा नव्हता.
तुम्ही दिलेले फोटो हे त्यामानाने खुपच सोज्वळ आहेत.
मुख्यत्वे हरिद्वार किंवा ऋषीकेश एथे असा बकालपणा जाणवला नाही.
25 Jul 2012 - 8:41 pm | अर्धवटराव
धार्मीक, पारलौकीक वगैरे बाबी बाजुला ठेऊया. स्वच्छता, आरोग्याची काळजी वगैरे गोष्टी सुद्धा एक भारतीय म्हणुन फाट्यावर मारु या (वादविवादाला भरपूर स्कोप आहे... पण आत्ता नको. आम्हि पांढरं निशाण फडकवतो). पाण्याचे स्त्रोत, पर्यावरण वगैरे... हे हे हे... कशाला उगाच कोळसा उगाळायचा. थोडक्यात काय, तर या सर्व अनावश्यक बाबी म्हणुन सोडुन देता येईल. पण पैसा... ते तर सर्वोच्च पदावर बसलेल्या राजकारण्यापासुन अगदी चतुर्थ श्रेणी शिपायापर्यंत सर्वांना मिळाला तेव्हढा कमीच आहे...
मग हे गंगेकाठी वा इतर कुठल्याही नदीकाठी होणार्या कार्यक्रमांना व्यवस्थीत बिझनेस माईण्डने ऑर्गनाईज करता येणार नाहि का? त्यातुन पैसा मिळेल... आणि धंदा व्यवस्थीत चालावा म्हणुन झक मारुन नद्यांची काळजी देखील घ्यावी लागेल. आज गरीब खेडेगावात व्हिलेज टुरीजम वगैरे जे फॅड निघालय तसलं काहितरी. धंदा, ठेकेदारी, पैसा शिवाय डिस्काऊंट मध्ये पुण्य. नाना पाटेकर एक "देऊळ" उभारुन गावाचा कायापालट करु शकतो... इथे तर अनेक देवळं ऑलरेडी एस्टेब्लीश झालेत... आय. पी. एल. च्या पुण्यवान मॅचेस...
अर्धवटराव
27 Jul 2012 - 9:17 pm | शिल्पा ब
क्रीमेशन टुरीझम ! आयड्या भारी ए!
27 Jul 2012 - 9:28 pm | अर्धवटराव
प्रेतयात्रेच्या खांदेकर्यांना फुकटात आणि इतरांना सवलतीच्या दरात पहिले चहा, कॉफी, भांग वगैरे... मग (पृथ्वीवरच्याच) अप्सरांचा नृत्यकार्यक्रम. तोपर्यंत भटजी आणि इतर चाकर वर्गाने प्रेताची योग्य विल्हेवाट लावणे. मग स्वच्छ नदीतला एक नौका विहार. तिथेच चिमुटभर राख (कुठलसं इकोफ्रेण्डली केमीकल मिसळुन) नदी पात्रात विसर्जन. आणि शेवटी या सर्व प्रोग्रामची व्हिडीओ सी डी स्थानीक नगरसेवकाच्या चेल्याच्या हातुन मोफत दान.
मरणार्यालाही सुख, नदी पण खुष, भटजी तर बाग बाग... आणि नातेवाईक मंडळींचा एक इव्हेण्ट सेलीब्रेशन.
या सर्व कार्यक्रमाला सरकारी सबसीडी.
अर्धवटराव
27 Jul 2012 - 10:27 pm | शिल्पा ब
कल्पना केली अन आवडली सुद्धा. आता होउन जाउद्या ! म्हंजे तुमच्या दुकानाचं उद्घाटन होउन जाउद्या ..
27 Jul 2012 - 10:50 pm | अर्धवटराव
कोणि असेल ज्योब सुटेबल तर रेकमेण्ड करा...
अर्धवटराव
28 Jul 2012 - 10:00 am | मन१
हायक्लास आयड्या....
28 Jul 2012 - 9:03 am | इरसाल
*** **** काय बरोबर ना?
28 Jul 2012 - 10:00 am | मन१
*** **** काय बरोबर ना?
हो. *** **** ज्यु. :)