आजच पेपरात ही बातमी वाचली आणि (नसलेले)डोके अधिकच बधीर झाले.८२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सानफ्रान्सिसकोला भरणार आहे,असा निर्णय सोळा सदस्यांच्या़ कमिटीने घेतला आहे्. हे सदस्य कोण आहेत,किती विरोधी मतदान झाले वगैरे तपशील सां गितले गेले नाहीत याचाच अर्थ काहीतरी गोलमाल आहे.दुसरे असे की संमेलने ही 'बहुजन हिताय,बहुजन सुखाय'भरवायची असतात.अमेरीकेत असे कितीसे मराठी हया संमेलनास हजर राहू शकतील?अमेरीकेत ५ दिवस राहण्याच खर्च ७० ते७५ हजार रु.येणार,आपल्याकडील कितीजण हा खर्च करु शकतील? मला तर असे वाटते की हे संमेलनाचे नाटक आहे.कमिटीला फुकटात अमेरीका वारी करणे आहे.जमले तर तिथल्या नातलगांना भेटणे जमेल.तिथल्या यंग जनरेशंला म्हणे संस्कार करता येतील.मग इथल्या तरूणांचे काय?ज्या गावात साहित्य संमेलन भरते त्या व आसपासच्या शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अशी संमेलने ,त्याला हजर राहणारे लेखक,कवि जवळून बघता येतात.त्यांचा सहवास घडतो.साहित्याची रुचि निर्माण होते.ह्याचा विचार केला गेला का?साहित्य संमेलन म्हणजे मूठभर लोकांची मक्तेदारी नव्हे.सरकारनेही विचार करावा कारण त्याला २५ लाखांचे सरकारी अनुदान मिळते,म्हणजे मंत्री व अधिकारी वर्गालाही फुकट अमेरीकावारी.मराठी मराठी अशी हाकाटी पिटणारे आता गप्प का?की त्यांचा आणि साहित्याचा सुतराम संबंध नाही?की त्यांचेही हितसंबंध गुंतलेले?आपण सर्वांनी मिळून ह्याला विरोध केला पा हिजे.आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा.
प्रतिक्रिया
23 Jun 2008 - 1:10 pm | अमेयहसमनीस
आपल्या मताशी सहमत अहे मी
23 Jun 2008 - 1:11 pm | अमेयहसमनीस
आपल्या मताशी सहमत अहे मी
23 Jun 2008 - 1:19 pm | विसोबा खेचर
आपण सर्वांनी मिळून ह्याला विरोध केला पा हिजे.आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा.
वैशालीताई, आपण अंमळ उशिरा आलात.ह्याच विषयावर येथे चर्चा सुरू आहे! :)
तात्या.
23 Jun 2008 - 11:39 pm | अथांग सागर
विरोधी मतदानाची फक्त २ मते पडली..
24 Jun 2008 - 7:38 am | सर्किट (not verified)
वैशाली ?
मराठी परदेशी गेली ते किमान ज्ञात इसमांतून डॉ. आनंदीबाईं जोशींकडून विसाव्या शतकाच्या सुरवातीला !
आपण अंमळ एक शतक उशीर लावलात ह्याविषयी आवाज उठवण्यात !
- सर्किट
24 Jun 2008 - 7:48 am | धमाल नावाचा बैल
हे थांबायलाच हवं !!!!
आपला,
बैलोबा.
24 Jun 2008 - 7:56 am | धमाल नावाचा बैल
मध्यंतरी वाचलं होतं की त्या नाटक कंपनीच्या लोकांना माजुरड्या अमेरिअक्न कौन्सुलेटने व्हिसाच नाकारला होता. आता ह्या साहित्यिकांना देणार का हे व्हिसा?
24 Jun 2008 - 8:13 am | सर्किट (not verified)
या संकेतस्थळावर आपल्या प्रश्नाचे उत्तर खरेच मिळणार आहे का ?
जे उत्तर देऊशकतील त्यांनाच विचारा ना, प्लीज !
- सर्किट