अनपेक्षित ..

विदेश's picture
विदेश in जनातलं, मनातलं
13 Jul 2012 - 12:53 pm

.
काहीतरी चांगल पोस्ट करायला जातो,
नेमकी एरर समोर येते आणि आपण काहीतरी करण्याआधीच पोस्ट अपडेट होते
.. अनपेक्षित पेचातून सुटका !
पोस्टला कुणी लाईक केले आहे का पहातो, तो पोस्टला चार शेअर दिसतात
.. अनपेक्षित आनंदाचा झटका !
रस्त्यातून जाताना पुढच्यास ठेच- म्हणून शहाणा व्हायला जातो,
तर आपल्याला ठेचच लागत नाही तर आपण नेमके समोरच्या खड्ड्यात पडतो
.. अनपेक्षित शहाणपणापणाला फटका !
वाहतुकीचा सिग्नल तोडून पुढचे दोघे भरधाव निघाले की,
आपणही 'प्रयत्न' करायला जातो आणि नेमके 'त्या'च्या तावडीत सापडतो
.. अनपेक्षित प्रयत्न लटका !
बायकोला फोन करून खूष करण्यासाठी सिनेमाची तिकीटे घेऊन गेल्यावर,
समोरच घरात पाहुणे आलेले दिसतात
.. अनपेक्षित बायकोशी उडणारा अबोल्याचा खटका !
जमा झालेले मासिक वेतनच पाहायला जातो,
तेव्हां अचानक कसलातरी जुना फरक जमा झालेला दिसतो
.. अनपेक्षित लागलेला मटका !
ह्या आणि असल्या अनपेक्षितपणाने आयुष्यात घडणाऱ्या घटनामुळे तर जीवन सुसह्य अथवा असह्य होते ..
जगणे जगणे म्हणतात, ते असल्या झटक्या-फटक्यांमुळे तर जगावे वाटते.
.. नाहीतर जीवन नीरसच !
पटतंय का ?
.

जीवनमानमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

13 Jul 2012 - 1:34 pm | मुक्त विहारि

मस्त लिहिले आहे..

इनिगोय's picture

13 Jul 2012 - 3:04 pm | इनिगोय

मस्त.

अनपेक्षित बायकोशी उडणारा अबोल्याचा खटका

म्हंजे काय हो?

बॅटमॅन's picture

13 Jul 2012 - 6:48 pm | बॅटमॅन

क्रिया की क्रियाविशेषण ;)

चिम् चिम् मामा's picture

13 Jul 2012 - 6:25 pm | चिम् चिम् मामा

अनपेक्षित विचाराने छान लिहिणे....
----विचाराचा झटका....

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jul 2012 - 6:36 pm | परिकथेतील राजकुमार

अशा कविता चेपूवरच टाकत चला.
इकडे काय सद्दी नाय अशा कवितांची.

नाना चेंगट's picture

13 Jul 2012 - 6:42 pm | नाना चेंगट

का का का का का

काही नाही यमक हो !

अमितसांगली's picture

14 Jul 2012 - 12:37 pm | अमितसांगली

मस्त...

विदेश's picture

14 Jul 2012 - 11:24 pm | विदेश

अशा कविता चेपूवरच टाकत चला.
इकडे काय सद्दी नाय अशा कवितांची.

सुन्दर दोनोळी.

('कविता' असती , तर ती मी नक्कीच ' जे न देखे ..' मधे टाकली असती .
ज्याअर्थी 'जनातल मनातल' मधे लिखाण टाकल आहे .....
सूज्ञास अधिक ...)