गाभा:
मिपावर अतिशय दर्जेदार लिखान मिपाकरांनी केलेले आहे.
जसे (अर्थात मला आवडलेले) जयंत कुलकर्णींचे इतिहास लेखन, 'परा'ची चित्रपट समिक्षा, हेमांगीकेचे लेख तसेच इतर लेखकांचे लेख ( ज्यांची नाही नावे घेतली त्या सर्व लेखाकांची माफी मागतो तेही तितकेच दर्जेदार आहेत राग मानु नये.)
मला प्रश्न असा पडतो कि यांना हे सर्व स्फुर्ते तरी कसे?
मला तर परिक्षेत निबंधाच्या प्रश्नाला कायम २ किंवा ३ मार्क्स पडायचे, (सात आठ ओळीच्यावर लिहिताच येत नसायचे)
मी सर्व दर्जेदार लेखकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या लिखाणाच्या प्रेरणेमागचे रहस्य (स्वेच्छेने) सांगावे.
त्यातुन मझ्यासार्ख्या नवलेखकाला काही प्रेरणा घेता येइल.
प्रतिक्रिया
28 Jun 2012 - 10:53 am | मराठमोळा
>>मी सर्व दर्जेदार लेखकांना विनंती करतो
माझं तर बोलणंच खुंटल मग :)
>>त्यातुन मझ्यासार्ख्या नवलेखकाला
झाले की तुम्ही लेखक...
असो.. तुमचे प्रश्न दर्जेदार लेखकांना व्यनी/खरड करुन पण सुटले असते हो जोयबोय साहेब.
28 Jun 2012 - 10:59 am | पियुशा
ह्या लेखात माझे नाव नै ,मी तुला माझे प्रेरणास्थान सांगणार नै ज्जा :p
( नवलेखिका पियु ) ;)
28 Jun 2012 - 2:18 pm | अमृत
टंकणार होतो ;-)
अमृत
28 Jun 2012 - 11:15 am | श्रीरंग_जोशी
पाखराच्या पिलांना आकाशात भरारी मारायची प्रेरणा मिळते कुठून...
वाघाच्या पिलांना शिकार करायची प्रेरणा मिळते कुठून...
मांजरीच्या पिलांना चोरून दूध प्यायची प्रेरणा मिळते कुठून...
माशाच्या पिलांना पोहायची प्रेरणा मिळते कुठून..
सरड्याच्या पिलांना रंग बदलायची प्रेरणा मिळते कुठून...
अरे या सर्वांना प्रेरणा देणारा तो, तिथे बसलाय ना वर... तोच आहे खेळवणारा..
आपण तर केवळ निमित्तमात्र जश्या सारीपाटातील सोंगट्या...
28 Jun 2012 - 11:36 am | ज्ञानोबाचे पैजार
जर कोणी दर्जेदार लेखक प्रतिक्रीया देणार असतील तर खालील गोष्टींबाबतही जरुर मार्गदर्शन करावे
जसे की,
त्यांचे प्रेरणास्थान कोणते? सकाळी उठल्या उठल्या माझ्या प्रेरणा स्थानावर गेल्यावर मला माझी प्रतीभा दुथडी भरुन वहात असते. पण बाहेर येई पर्यंत सगळे विसरायला होते. दर्जेदार लेखक आतमधे कागद घेउन जातात का? किंवा इतर काही?
अनेक वेळा कुंथुन कुंथुन एकदांचे पाडलेले साहीत्य प्रका शीSSSSत केले तरी त्या कडे कोणी ढुंकुनही पहात नाही. या साठी काय करावे?
जिलबी सम्राट, साहित्यासुर किंवा वराहमित्र असे पुरस्कार जर सुरु केले तर त्याचा नवोदीत लेखकांना काही फायदा होईल का?
चांगले लिहीणार्यांचे कौतुक वाटण्या ऐवजी त्यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न कसा करावा?
दुसर्या संस्थळावरुन चोरलेले लिखाण आपल्या नावावर खपवताना कोणती काळाजी घ्यावी?
(दर्जाहीन)
28 Jun 2012 - 11:51 am | नितिन थत्ते
>>मला तर परिक्षेत निबंधाच्या प्रश्नाला कायम २ किंवा ३ मार्क्स पडायचे, (सात आठ ओळीच्यावर लिहिताच येत नसायचे)
सेम हिअर
28 Jun 2012 - 12:01 pm | विजुभाऊ
लोकमान्य टिळकांच्या मते दिडकीची भांग घेतली की वाट्टेल तेवढ्या कल्पना सुचतात
28 Jun 2012 - 12:10 pm | गवि
लो.टिळकांच्या काळातील दिडकीची भांग म्हणजे आजच्या काळातल्या किती रुपयांची ते सांगून मदत करावी. उगाच डोस जास्ती व्हायला नको.
28 Jun 2012 - 12:54 pm | बॅटमॅन
कदाचित 'दीड पेग' भांग असेदेखील सूचित करावयाचें असेंल ;)
28 Jun 2012 - 2:51 pm | विजुभाऊ
हल्ली गणीतातूनदेखील पावकी निमकी सवायकी दिडकी अडीचकी हे हद्दपार झाले आहेत. त्यामुळे कालबाह्य परीमाणे वापरून उपयोग होणार नाही. त्या ऐवजी स्वतःचे वजन (रत्तल व बुशेल मध्ये) भागीले स्वतःच्या उदराचे वजन( अंसात) गुणीले. ३.१४२८५७ इतके मिलीग्राम वापरून घ्यावे. परीणा तब्यतीनुसार आणि पोटात असलेल्या अन्नाच्या आयुरेदीक गुणधर्मानुसार कमी जास्त होऊ शकतो
28 Jun 2012 - 1:48 pm | चौकटराजा
आंतरजालावर खूप दर्जेदार लिखाण वाचकाची वाट पहात असते. पण ते विंग्रजीत असते. त्यात काय मजा नाय ! आपल्या आयच्या भाषेत वाचायची गोडी और. ज्या मिपाकराना टंकायचा टंकाळा नाही ते इथे खूप काही आणू शकतात. ( कॉपी राईट चा अर्थ को अपि राईट म्हणजे कोणीही चोरले तरी चालेल असा अर्थ घेऊन) .आम्हाला वाटते असा टंकाळा नसणे
हीच खरी प्रेरणा असते.
28 Jun 2012 - 1:53 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
रामदास काकांच्या लेखांची प्रेरणा आणि अज्ञातकुल यांच्या कवितेची प्रेरणा कुठली हे जाणून घ्यायला खुप आवडेल.
28 Jun 2012 - 9:29 pm | जाई.
+१
28 Jun 2012 - 2:02 pm | तिमा
दर्जेदार लिखान
आम्ही याचे कधीच दावेदार होऊ शकणार नाही. बाकी 'दर्जेदार' लेखकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत .
28 Jun 2012 - 10:09 pm | अर्धवटराव
पण मिपावर बल्लवाचार्य आणि बल्लवाचार्या ( शब्द बरोबर आहे का हो?... नाहितर समस्त सुग्रण कंपू म्हणुया :) ) यांची प्रेरणा त्यांच्या रसनेच्या तृप्तीत आणि पाककल सिद्ध करायला घेण्यात आलेल्या परिश्रमात आहे.
तसच भटक्या मंडळींची प्रेरणा त्यांना भांडावुन सोडणार्या रानवार्यात, सागर गाजेत, सह्याद्री शिखरांत आणि शिवभक्तीत आहे.
आमच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या कलाविषयात, अर्थात मदिरा पान करण्यात, तुफान पारंगत असे सोत्री शास्त्री यांची प्रेरणा "मदहोशी का आलम" असावी... आणि आमचे लाडके गवि शेठ त्यांचे कट्टाप्रेम (हा कट्टा म्हणजे भाई लोकांचा तो देसी डबल बार सिंगल बार नव्हे) लेखणीतुन प्रसवतात अशी आमची खात्री आहे. परा ला त्याचा इंटरनेट कॅफॅ खुराक पुरवत असावा असा अंदाज आहे. ( मंडळी... तुम्हाला मी भेटेल तो बेखुदी वाला खंबा घेऊनच :) )
रामदासजी, श्रा.मो, पिडा काका, गुरुजी मंडळी ... तत्सम बापलोकांच्या बाबतीत आमची कल्पनाशक्ती अधु पडते, तेंव्हा न बोललेलच बरं
आयला, सगळ्या मिपाकरांनी आपापल्या वैशिष्ट्यांसह एकदम डोक्यात गर्दी केली... आणि हे सगळं टंकायचा मोह अनावर होतोय... अन्नदात्या कंपनीवर उपकार करुन मोह आवरता घ्यावा लागतोय :( पण मिपावर बहुतेकांना पु.ल. आणि तत्सम दिग्गजांनी बाळकडु पाजले असावे अशी खात्री आहे.
अर्धवटराव