दही खस्ता कचोरी

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
21 Jun 2012 - 11:52 am

.

साहित्य कचोरीचे सारणः

१ वाटी पिवळी मुगाची डाळ चांगली धुवून, ४ तास भिजवून, निथळून घेणे
दीड टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टीस्पून भरडसर धणेपूड
१ टीस्पून बडीशेप पावडर
१ टीस्पून जीरेपूड
१/२ टीस्पून गरम-मसाला
१/२ टीस्पून आमचुर पावडर
मीठ चवीनुसार
कढीपत्ता
बारीक चिरलेली कोथींबीर
तेल

.

पाकृ:

डाळ मिक्सरवर भरडसर वाटून घ्यावी. (पाणी अजिबात घालायचे नाही)
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कढीपत्ता घालावा.
तो तडतडला की त्यात वाटलेली डाळ घालून मंद आचेवर परतावी.
झाकून वाफेवर ५-७ मिनिटे शिजु द्यावी.
शिजलेली डाळ हळू-हळू कोरडी होऊन मोकळी होऊ लागेल.
त्यात लाल तिखट, धणेपूड, जीरेपूड, गरम - मसाला, बडीशेप पावडर, आमचुर पावडर व मीठ घालावे.
चांगले एकत्र करून मिश्रण कोरडे होईपर्यंत परतावे .
बारीक चिरलेली कोथींबीर घालून एकत्र करावे.
तयार सारण एका ताटात काढून ते गार होऊ द्यावे.

.

साहित्य कचोरीचे आवरणः

१ वाटी मैदा
२ टेस्पून रवा
२ टेस्पून तेल
१ टीस्पून ओवा
मीठ चवीनुसार
बर्फाचे पाणी कणीक भिजवण्यासाठी (रवा आणी गार पाण्यामुळे कचोर्‍या खुसखूशीत होतात)

.

पाकृ:

मैदा, रवा , ओवा, मीठ व तेल एकत्र करावे. बर्फाच्या पाण्याने कणीक भिजवावी.
कणीक फार घट्ट किंवा सैल मळू नये, मध्यम सैल भिजवावी.
झाकून १५-२० मिनिटे ठेवावी.

.

पाकृ कचोरी:

मैद्याच्या पीठाचे सारखे गोळे करावे.
तळहातावर थोडे तेल लावून घेणे.
एक गोळा घेऊन चपटा करून त्याची पारी तयार करुन घ्यावी.
त्यात चमच्याने सारण भरून, कडा उचलून बंद करून घ्याव्यात.
हलकेच तळहाताने चपटे करावे. (मी कचोर्‍या अजिबात लाटत नाही , नाहीतर त्या फुगत नाही तळताना)
अश्याच सगळ्या कचोर्‍या तयार कराव्यात.
तेल मंद आचेवर तापवायला ठेवावे.
एक एक करून कचोर्‍या तेलात सोडाव्यात व मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्याव्या.
साधारण ७-८ मिनिटे लागतात.
कचोर्‍या खुसखुशीत झाल्या पाहिजेत.

.

सर्व्हिंगः

तयार कचोर्‍या, पुदीन्याची चटणी, चिंच - खजुराची चटणी, मसाला दही ( दह्यात चवीनुसार मीठ, साखर घालून फेटणे. त्यात जीरेपूड व लाल तिखट भुरभुरावे)
बारीक चिरलेली कोथींबीर,
बारीक शेव

.

कचोरीला सर्व्हिंग प्लेटमध्ये काढावे.
त्यावर चमचाने भोक पाडून त्यात पुदीन्याची चटणी, चिंच - खजुराची चटणी, मसाला दही घालावे.
वरून बारीक चिरलेली कोथींबीर व शेव भुरभुरावी.

.

चटपटीत दही खस्ता कचोरी खाण्यासाठी तयार आहे :)

.

नोटः

आवडत असल्यास ह्यात कच्चा कांदा ही घालू शकतो.
खस्ता कचोरी नुसत्या चिंचेच्या चटणीसोबत ही सर्व्ह करु शकता.

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

21 Jun 2012 - 12:05 pm | मृत्युन्जय

हे असले फोटो दाखवुन आम्हाला जळवल्याबद्दल देवबाप्पा तुम्हाला नक्कीच शिक्षा करेल

तर्री's picture

21 Jun 2012 - 12:07 pm | तर्री

सुंदर छायाचित्रे व पाकृ.
"डेरी फारम" छाप दुकानातून मिळणारा ,हा पदार्थ घरी करता येईल असे नव्हते वाटले.
आजच पांडेजी कडे जायला हवे.

किलमाऊस्की's picture

21 Jun 2012 - 1:45 pm | किलमाऊस्की

माझा आवडता पदार्थ. बाकी सगळंच म्हणजे कृती , फोटो नेहमीप्रमाणे झक्कस !!!

नो "खस्ता "कचोरी असं नाव हवं होतं ;-)

योगप्रभू's picture

21 Jun 2012 - 12:29 pm | योगप्रभू

कृती मस्त आहेच, पण पहिल्या क्रमांकाचा फोटो खूप छान...

अगदी दुकानातल्या कचोर्‍यांना लाजवतील अश्या.

प्रेरणा पित्रे's picture

21 Jun 2012 - 1:00 pm | प्रेरणा पित्रे

पावसाळी वातावरणात भुकेच्या वेळी हे असले फोटो नका दाखवत जाऊ... :)

घरी करेन तेव्हा करेन पण आज मात्र हापिसातुन घरी जातांना कचोरी पार्सल घेऊन जाणार...

पहिला फोटो एकदम कडक... :)

पियुशा's picture

21 Jun 2012 - 1:03 pm | पियुशा

मार डाला !!!!
कसल्या जबर्या दिसताहेत यम्म्मीईईईईईईईईईईईईईईईईई :)

श्रीरंग_जोशी's picture

21 Jun 2012 - 1:10 pm | श्रीरंग_जोशी

पाककृती अन छायाचित्रे पण.

अवांतर -फार खस्ता खाव्या लागतात का हो ह्या कचोऱ्या बनवताना?

जाई.'s picture

21 Jun 2012 - 1:49 pm | जाई.

मस्तच

jaypal's picture

21 Jun 2012 - 2:07 pm | jaypal

रेसीपी वाचली.
शेवटचा फोटो बघितला.
सगळ विसरुन गेलो.

बाळ सप्रे's picture

21 Jun 2012 - 2:12 pm | बाळ सप्रे

वॉव!!
फोटो तर एकदम प्रोफेशनल वाटले..

कचोरीत नंतर दही,चटणी,शेव हे सगळं आत भरायचचं असल्याने.. आधीचं मुगाच्या डाळीचं सारण नसलं तरी चालेल अस वाटलं..

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jun 2012 - 2:14 pm | परिकथेतील राजकुमार

सदेह खस्ता झालेलो आहोत.

जमल्यास 'चिंच खजुराची चटणी ' पाकृ व्यनी / खरड करावी. इथे अज्जीबात देऊ नये. चार नादान माणसे चार अजून काहीतरी सुधारणा सुचवतात आणि सगळ्याची माती करतात.

दिपक's picture

21 Jun 2012 - 2:28 pm | दिपक

मोहनराव's picture

21 Jun 2012 - 2:31 pm | मोहनराव

मार डाला!! _/\_

जेवण झाल्यावर सुद्धा बादलीभर लाळ गळली.

असो.

बाकी नेहमीप्रमाणेच.

XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX

XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX

XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX

XXXXXXXXXXXXXXXXXXXXX

XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX

नाना चेंगट's picture

21 Jun 2012 - 3:44 pm | नाना चेंगट

फटू पाहून नाना सदेह स्वर्गात गेला

स्मिता.'s picture

21 Jun 2012 - 3:51 pm | स्मिता.

.

स्वाती दिनेश's picture

21 Jun 2012 - 4:21 pm | स्वाती दिनेश

कचोरी मस्तच ग, पहिला फोटो तर.. अहाहा..
स्वाती

धनुअमिता's picture

21 Jun 2012 - 4:54 pm | धनुअमिता

मस्तच.

माझा आवडता पदार्थ.नक्की करणार.

पाककृती मस्त आहेच, पण फोटो त्याहुनही मस्त ! :smile:

मुक्त विहारि's picture

21 Jun 2012 - 5:33 pm | मुक्त विहारि

मस्त मस्त..

हा धागा वाचण्यात आला आहे याची नोंद.

sneharani's picture

21 Jun 2012 - 5:40 pm | sneharani

मस्त, पहिलाच फोटो खल्लास !
:)

पिंगू's picture

21 Jun 2012 - 5:46 pm | पिंगू

दिल खल्लास आणि मी स्वर्गात.... ;)

अमोल केळकर's picture

21 Jun 2012 - 5:51 pm | अमोल केळकर

खुप मस्त ..... :)

अमोल केळकर

मिहिर's picture

21 Jun 2012 - 5:53 pm | मिहिर

काय मस्त फोटो आहेत! पाणी सुटलं तोंडाला! मस्त!

धन्य आहेस सानिका!
पहिला फोटू भारी आलाय.
पाकृही छान सांगितलीस.

शुचि's picture

21 Jun 2012 - 7:07 pm | शुचि

जबरदस्त!!! कातील.

खत्रा कचोरी आहे!
जेवणाच्या वेळी असले फोटो दाखवून जळवल्याबद्धल तुमचं घर उन्हात बांधायला सांगणार!

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jun 2012 - 10:34 pm | अत्रुप्त आत्मा

नेमका आजच संध्याकाळी कर्वे पुतळ्या जवळचा माझा फेवरिट ,याच स्टाइलचा दहि/चटणी/शेव टाकलेला कट पॅटिस खाल्ला. ही कचोरी त्यापेक्षा कातिल लागणार यात शंका नाही. :-)

निवेदिता-ताई's picture

21 Jun 2012 - 11:23 pm | निवेदिता-ताई

अतिशय सुंदर्,,,,नेहमीप्रमाणेच

मस्त. एव्हढा संयम , पुरा दिवस जाइल माझा तर. पण घरच्या खाण्याची चवच वेगळी.
मस्त सानिका, खरच मस्त.

पैसा's picture

22 Jun 2012 - 8:13 pm | पैसा

कचोरी मला आवडत नाही, पण फोटो अप्रतिम देखने आलेत!

अन्नू's picture

22 Jun 2012 - 11:18 pm | अन्नू

ओए होए!
मर जावा कचोरी खाके!

किसन शिंदे's picture

23 Jun 2012 - 8:33 am | किसन शिंदे

फोटो पाह्यले.. :)

श्रीयुत संतोष जोशी's picture

23 Jun 2012 - 10:39 am | श्रीयुत संतोष जोशी

क्या बात है ..........मस्त !!!!! एकदम मस्त.

मराठमोळा's picture

23 Jun 2012 - 10:48 am | मराठमोळा

सानिकातै,
मी तुमच्याकडे पाहुणा म्हणून येऊ का थोडे दिवस.. :)

भन्नाट फोटु आणि पाकृ..

प्रभाकर पेठकर's picture

23 Jun 2012 - 2:57 pm | प्रभाकर पेठकर

व्वा..! 'खस्ता' कचोरीसाठी फार काही खस्ता खाव्या लागत नाहीतसे दिसते आहे.
लवकरच करून पाहावी (आणि खावी) असा विचार करतो आहे.
अभिनंदन.

खादाड's picture

3 Jul 2012 - 4:19 pm | खादाड

पहिला आणि शेवटचा फोटो जीवघेणा आहे !! :)

नगरीनिरंजन's picture

4 Jul 2012 - 3:25 pm | नगरीनिरंजन

अत्यंत आवडीचा प्रकार आहे हा.
त्यात सादरीकरण आणि सजावट पाहून या पाकृवर फिदा झालेलो आहे. वाचनखूण साठवत आहे.

-वर्धमानसमोरच्या रगडाकचोरीच्या आठवणीने अंमळ हळवा झालेला

मस्तच दिसते कचोरी, फोटो मस्तच.

priya_d's picture

17 Nov 2016 - 6:39 am | priya_d

सानिका,

वर दिलेल्या प्रमाणात किती कचो-या होतात?