फोटोवरून निसर्गचित्र कसे बनवावे: फोटो पाठवा.

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in कलादालन
21 Jun 2012 - 2:15 am


(Paintings by Claude Monet: wikkimedia)
या आधीच्या धाग्यात आधी काहीही पूर्व-योजना न करता, अमूर्त चित्र बनवून त्यातून एक निसर्ग चित्र केले, आता आपण एकाद्या फोटोवरून निसर्ग-चित्र कसे बनवू शकतो, हे बघूया.
परंतु यासाठी तुम्हाला आवडतील, असे फोटो पाठवा. त्यापैकी एखादा निवडून पुढे जाऊ. हे चित्र साधारणपणे इंप्रेशनिस्ट पद्धतीचे असेल, त्यामुळे फोटोत खूप बारकावे असण्याची गरज नाही. एकंदरीत दृश्य सुंदर असावे, त्यात घरे, इमारती वगैरेही असू शकतात....
तर पाठवा तुमचे फोटो.



Paintings by Frederic Edwin Church (wikkimedia)

(वर दिलेली चित्रे सहजच इथे डकवली आहेत. या धाग्यातील होणार्‍या चित्राचा त्यांचेशी काही संबंध नाही).

कला

प्रतिक्रिया

छान उपक्रम.

बाकी इंप्रेशनिस्ट पद्धतीबद्दल अधिक माहिती मिळेल काय?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Jun 2012 - 9:41 am | निनाद मुक्काम प...

हेच म्हणतो

अन्या दातार's picture

21 Jun 2012 - 4:27 pm | अन्या दातार

इंप्रेशनिस्ट पद्धतीबद्दल अधिक माहिती हवी असल्याने मुद्दाम धागा वर काढत आहे.

गणपा's picture

21 Jun 2012 - 4:49 pm | गणपा

..........तर पाठवा तुमचे फोटो.

हे म्हणजे नक्की काय?
आम्ही काढलेली की आम्हाला आवडलेली जालावरची.
जर जालावरची असली तर एखाद्याच्या कॉपीराईटचं काय?

तुम्ही दिलेली चित्रं मात्र सुरेख आहेत.

चित्रगुप्त's picture

21 Jun 2012 - 5:17 pm | चित्रगुप्त

तुमचे फोटो पाठवा, यात तुम्ही स्वतः काढ्लेले, अन्य कुणी काढलेले, अथवा जालावरचेही असू शकतात. कॉपीराईट असलेल्या फोटोवरून हाताने चित्र काढून प्रसिद्ध करण्यात कॉपीराइटचा भंग होत नाही, ती एक स्वतंत्र निर्मिती असते.
मात्र हे मुळातच कुणीतरी काढलेले चित्र नसावे.
या धाग्याचा हेतु आपण काढलेल्या वा आवडलेल्या फोटोवरून चित्र कसे रंगवावे, याचे प्रात्यक्षिक देणे हा आहे.

चित्रगुप्त's picture

21 Jun 2012 - 5:11 pm | चित्रगुप्त

'इंप्रेशनिझम' हा शब्द रूढ होण्यामागे खालील चित्र कारणीभूत ठरले:

Claude Monet: 'Impression- Sunrise' 1872

इंप्रेशनिझम बद्दल विपुल साहित्य उपलब्ध आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Impressionism
http://www.ibiblio.org/wm/paint/glo/impressionism/
http://www.discoverfrance.net/France/Art/impressionism.shtml
http://www.impressionism.org/

तसे इंप्रेशनिस्ट चित्रांविषयी पुष्कळ काही सांगता येइल, परंतु या धाग्यापुरते बोलायचे झाले, तर असे चित्र, ज्यात खूप बारकावे, तपशील चित्रित केलेले नाहीत (उदा. चित्रातील झाड चिंचेचे आहे की आंब्याचे, इमारतीला सत्तावन खिडक्या आहेत की बावन्न, दिवसाच्या नेमक्या कोणत्या वेळी चित्र वा फोटो काढले आहे, नेमकी जागा कोणती, चित्रातील व्यक्ती कोण आहेत हे ओळखता येणे, अश्या बाबींना महत्व न देता कलात्मक दृष्ट्या चित्र चांगले व्हावे, यावर भर).

अशी चित्रे जलद गतीने केली जातात, त्यामुळे त्यात ब्रशचे फटकारे दिसत असतात, त्यातून चित्र रंगवण्याची पद्धत वा प्रक्रिया समजते, आणि एक वेगळे परिमाण चित्राला लाभते.
धाग्याच्या सुरुवातीची दोन चित्रे इंप्रेशनिस्ट आहेत, तर खाली दिलेली तीन चित्रे जास्त वर्णनात्मक आहेत.
या चित्रासाठी मिपाकरांनी फोटो पाठवावेत, अशी अपेक्षा आहे, त्यातून चित्रासाठी कसे फोटो उपयुक्त असतात, वगैरे चर्चाही करता येइल.

इनिगोय's picture

21 Jun 2012 - 5:34 pm | इनिगोय

चित्र डकवण्याचा पहिलाच प्रयत्न, दिसते आहे काय?

गणपा's picture

21 Jun 2012 - 6:12 pm | गणपा

तुमचा पिकासा फोल्डर शेयर(पब्लिक) करा. चित्रे दिसत नाही.

इनिगोय's picture

21 Jun 2012 - 8:16 pm | इनिगोय

आभार्स.. आता जमलं.

प्रास's picture

21 Jun 2012 - 6:22 pm | प्रास

आणि

ही असली चालतील का, काका?

चौकटराजा's picture

21 Jun 2012 - 8:36 pm | चौकटराजा

वरील चित्र हे मेटुपटी धरण केरळ राज्य येथील .

डावखुरा's picture

21 Jun 2012 - 11:40 pm | डावखुरा

मराठे's picture

22 Jun 2012 - 1:39 am | मराठे

प्रकाटा

आबा's picture

22 Jun 2012 - 5:18 am | आबा

पुढच्या धाग्याची वाट पाहतोय !

डावखुरा's picture

22 Jun 2012 - 12:16 pm | डावखुरा

सहमत

चित्रगुप्त's picture

22 Jun 2012 - 12:19 pm | चित्रगुप्त

....पुढच्या धाग्याची वाट पाहतोय !
म्हणजे या धाग्यात पुढे काय होते त्याची, की हा धागा ओलांडून यापुढील आगामी धाग्याची ? :)

आबा's picture

22 Jun 2012 - 3:32 pm | आबा

निसर्ग चित्र पूर्ण होताना पहायची इच्छा आहेच !

(अवांतर : मला यातले सगळेच फोटोग्राफ्स आवडताहेत, तुम्ही कोणता निवडताय ते पहायला आवडेल. मी काढतो ते फोटोज आधिच एक्स्प्रेशनिस्ट स्टाईल मध्ये असतात ! :) )

चित्रगुप्त's picture

22 Jun 2012 - 4:29 pm | चित्रगुप्त

आलेले सर्व फोटो उत्तम असले, तरी चित्र करायची ठिणगी पडेल, असा अजून मिळालेला नाही.
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे पुष्कळ छान फोटो मिपावर असतात, त्यापैकी ....?
फोटों मधे भरपूर बारकावे असले, तरी चालेल, त्यातील निवडक चित्रासाठी वापरता येतात.

@आबा: तुमचे एक्स्प्रेशनिस्ट फोटो पण येउ द्याना.

प्रभाकर पेठकर's picture

24 Jun 2012 - 4:36 pm | प्रभाकर पेठकर

Mt.-Titlis

माऊंट टिटलिस

विलासराव's picture

24 Jun 2012 - 6:18 pm | विलासराव

1

2

3
4

बहुगुणी's picture

24 Jun 2012 - 6:38 pm | बहुगुणी

त्यामुळे मिपाकरांची काही सुंदर प्रकाशचित्रे पहायला मिळताहेत.

(वाहत्या गंगेत आपणही हात धुवून घ्यावेत;-)

आबा's picture

25 Jun 2012 - 4:27 pm | आबा

तुमचा शेवटचा फोटोग्राफ, अगदी "चित्रगुप्त स्कूल" चा वाटतोय !

बहुगुणी's picture

25 Jun 2012 - 9:52 pm | बहुगुणी

म्हणूनच तर दिलंय हे प्रकाशचित्र ;-)

इटलीच्या दक्षिणेकडच्या ब्रिंडिसी (Brindisi) या पुलिया (Puglia/Apulia) प्रांतातील भागातल्या ओस्टूनी या पुरातन गावातलं हे प्रकाशचित्र आहे. मी (हे गाव पाहिलं तेंव्हाच मला चित्रगुप्तांची आठवण झाली होती!)