गाभा:
माझे आणि चित्रकलेचे वावडे. अशा ह्या अनाडी विद्यार्थ्याचे चित्रकले-बाबतीत काही प्रश्न आहेत.कूणी उत्तरे देवू शकतील काय?
१. चित्रकलेचा कागद कसा निवडायचा?
२. ब्रश कसे निवडायचे?
३. रंग कसे निवडायचे?
४. चित्रकला हे शास्त्र आहे की कला आहे?
५. माझ्या सारख्या "ढ" विद्यार्थ्याला पण ही कला आत्मसात करता येईल का? की मुळातच ही देवाची देणगी आहे? तसे असेल तर नादी न लागलेलेच उत्तम.
प्रतिक्रिया
11 Jun 2012 - 8:48 pm | जेनी...
मी पण ' ढ' च्या पूढच अक्षर आहे ...
पण मिपाला एक तर एक नाद लागतो
सद्ध्या चित्रांवर मला वाटत दोन टॉपिक आहेत ..
त्यावर तुम्हि हे प्रश्न विचारु शकता अस मला तरि वाटतय ...वेगळा टॉपिक काढण्याची खरच
गरज होती\ आहे का?
( निरागस प्रश्न आहे ,सो राग नसावा )
11 Jun 2012 - 8:59 pm | मुक्त विहारि
कारण मला जसे प्रश्न पडतात, तसेच इतरांना पण पडत असतीलच
आणि
प्रश्नोत्तरांचा एक वेगळा धागा असावा असे वाटले.
म्हणजे . लेख आणि प्रश्न एकमेकांत मिसळायला नकोत.
11 Jun 2012 - 10:53 pm | चित्रगुप्त
१. चित्रकलेचा कागद कसा निवडायचा?
चित्र कसे, कोणत्या माध्यमात करायचे आहे, यावर अवलंबून आहे.
तैल- रंगात चित्र करायला कॅन्व्हास वापरणे जास्त श्रेयस्कर.
पेनाने नुस्ते रेखाटन करण्यासाठी साधा कागद, बाँड पेपर, स्केचबुक, वगैरे. पेन्सिलीसाठी जरा जाडा, थोडासा खरबरीत कागद. चारकोल साठी सुद्धा खरबरीत, जाडा हँडमेड पेपर बरा.
जलरंगासाठी हल्ली उत्तम अॅसिड-फ्री कागद मिळतात. पूना-हँड मेड म्हणून पूर्वी आम्ही वापरायचो, करताना उत्तम, पण कालांतराने पिवळे पडतात.
जाड्या मजबूत कागदावर पांढर्या (वा हवेतर रंगीत) अॅक्रेलिक रंगाचा थर चढवून त्यावर तैल-रंग वा अॅक्रेलिक रंग वापरता येतात. मी एनॅमल रंगात खूप चित्रे केली. ही चित्रे छपाईसाठी वापरतात, त्या जाड, गुळगुळीत आर्ट पेपरवर केली होती.
यापैकी दोन चित्रः
कागदावर चित्रे करण्यातील फायदे म्हणजे कमी खर्चात जास्त काम करता येते, साठवण्यासाठी सोयिस्कर. परंतु यांचे आयुष्य कॅन्व्हास पेक्षा कमी असते, शिवाय भिंतीवर लावायचे म्हणजे काचेच्या फ्रेममधे बसवणे आवश्यक. फ्रेम च्या मागील हार्ड बोर्डमुळे चित्रे खराब होतात, म्हणून चित्राच्या आणि हार्डबोर्डच्या मधे पुरेसे कागद ठेवावेत.
'वॉश' पद्धतीने काम करायचे, तर कागद ओला करून बोर्ड वर पसरवून चारी बाजूंनी कागदी टेप (ओला करून) लावायचा. काही तासानंतर कागद वाळला, की अगदी घट्ट बसलेला असतो. आम्ही शिकत असताना हा एक समारंभच असायचा. आपल्याकडील पोथीचित्रे शेकडो वर्षे बासनात गुंडाळून ठेवलेली होती, तोवर त्यांचे रंग जसेच्या तसे राहिले. अलिकडे संग्रहालयात लावल्यानंतर मात्र ही चित्रे पिवळे पडू लागली आहेत.
अन्य प्रश्नांबद्दल लवकरच..
12 Jun 2012 - 12:48 am | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद....
11 Jun 2012 - 11:24 pm | पक पक पक
माझे आणि चित्रकलेचे वावडे. अशा ह्या अनाडी विद्यार्थ्याचे चित्रकले-बाबतीत काही प्रश्न आहेत.कूणी उत्तरे देवू शकतील काय?
*** च्या *** चा मुका कशाला घ्यावा... ?
:crazy: :crazy: :crazy: :crazy: :crazy: :crazy: :crazy: :crazy: :crazy:
11 Jun 2012 - 11:34 pm | मुक्त विहारि
तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा.
नसेल द्यायची तर नका देवू.
ज्यांना द्यावीशी वाटेल ते देतीलच.
आणि
मी "ढ" आहे हे सांगायची मला लाज वाटत नाही.
उगाचच आपण सर्वज्ञ आहोत, असे म्हणून स्वतःचीच XX स्वत: च लाल करून घेण्यापेक्षा हे उत्तम.
12 Jun 2012 - 8:38 am | रामपुरी
"उगाचच आपण सर्वज्ञ आहोत, असे म्हणून स्वतःचीच XX स्वत: च लाल करून घेण्यापेक्षा हे उत्तम"
हे लै भारी... आवडले
12 Jun 2012 - 9:21 am | चौकटराजा
वरील चित्राचे नीट निरिक्षण करा. हे चित्र ओळखीचे वाटते ना ? गाण्यात येरे येरे पावसा, गोष्टीत एक होता कावळा एक होती चिमणी कावळ्याचे घर शेणाचे यांचे जे स्थान आहे तेच
वरील चित्राचे चित्राच्या दुनियेत आहे.
वरील चित्र काढता येण्यासाठी अटी-
अ)घर हे घर म्हणून ओळखता येऊ नये.
ब )लांबचे झाड जवळच्या झाडापेक्षा मोठे दिसले पाहिजे.
क) ४४ म ४४४ व ४४४४ हे आकडे काढता आले पाहिजेत.
ड) सूर्य हा दोन डोंगरांच्या मधूनच उदयास येणे आवश्यक.
ई) मधली नदी लांबपर्यत निमुळती झालेली दिसता कामा नये.
फ) नदीतील मासा हा नदीच्या रूंदीएवढा मोठा आला पाहिजे .
ग) नारळाच्या झाडाच्या खोडाला जाडी असता कामा नये.
ह) सूर्यास डोळे, नाक ,तोंड व त्याच्या डोसक्यातून फुटलेल्या किरणांच्या दोर्या अत्यावश्यक .
खास सल्ला- वरील चित्रगुप्त काका भले आता भन्नाट चित्रे काढतात पण त्यांचे पहिल्या चित्राने वरील सर्व अटी पूर्ण केलेल्या आहेत. तात्पर्य कोणीही पूर्णपणे चित्रकलेत " ढ" नसतो.
सराव , निरिक्शण , आस "ढ" श्रेणी पासून अ श्रेणीपर्यंत घेऊन येतो.
आता वरील चित्राने सुरवात करा.. लगे रहो....
12 Jun 2012 - 3:42 pm | मुक्त विहारि
"तात्पर्य कोणीही पूर्णपणे चित्रकलेत " ढ" नसतो.
सराव , निरिक्शण , आस "ढ" श्रेणी पासून अ श्रेणीपर्यंत घेऊन येतो."
थोडा हुरूप आला.
17 Jun 2012 - 1:52 am | अभ्या..
या श्रेणी ठरवणार कोण? शेवटि मूळ प्रश्न आलाच. कला कशासाठि?
17 Jun 2012 - 2:07 am | तर्री
आपली जिज्ञासा वाखाणण्या योग्य आहे. तसेच आपण चित्रकलेत "ढ" आहोत असे जाहिर करण्याईतके आपण प्राण्जळ आहात.
तेंव्हा कागद , ब्रश , रंग ह्या पेक्षा आधी शिस पेन्सिल ( !) ने चित्र काढावी . कागद कोरा असावा. आणि त्याचा रंग पाण्ढरा असावा.
( पाटी / पेन्सिल -खडू / फळा ही चालेल सुरवातीला )
20 Jun 2013 - 5:43 pm | चित्रगुप्त
वर्षभरापूर्वीचा हा धागा आज अचानक दिसला.
धागाकर्त्यास अद्याप रुची असल्यास अन्य प्रश्नांवर चर्चा करता येइल.